Is Lent Biblical ? लेंटविषयी गैरसमज


Is Lent Biblical ?  

  लेंटविषयी गैरसमज 

What is lent ?

आत्मत्याग हे ख्रिस्ती जीवनाचा एक मुख्य भाग आहे

संपूर्ण मानवजातीला पापांपासून वाचवण्यासाठी ख्रिस्ताने स्वताःच्या जीवनाचे बलिदान दिले. त्याच्या या बलिदानावर  विश्वास ठेवणारया प्रत्येक व्यक्तीस येशू पापक्षमेची खात्री देतो.

म्हणून ख्रिस्ताच्या या त्यागमय जीवनाने आपणास देखील त्यागमय जीवन जगण्यास प्रेरित व्हायला हवे ; आणि हे एकदा किंवा दोनदा नाही तर ते आयुष्यभर जगावे .

 

Is Lent Biblical ?
Is Lent Biblical ?

    बायबल ख्रिस्ती व्यक्तिस स्वतःकरीता जगण्यास नव्हे तर ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळले जावे आणि केवळ ख्रिस्तासाठीच समर्पित जीवन जगावे अशी आज्ञा देते.

   मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभी दिलेला आहे," आणि यापुढे मी जगतो असे नाही, तर खिस्त माझ्यामध्ये जगतो" आणि आता देहात जे माझे जिणे आहे ते विश्वासात, म्हणजे देवाच्या पुत्राच्याठायी जो विश्वास" त्यात आहे; त्याने माझ्यावर प्रीती केली" आणि आपणाला माझ्याकरिता दिले” [गलती २:२० प.रमाबाई]

 Lent Fasting Rules

    कॅथोलिक पंथ या परंपरेचे समर्थन करतात. याची सुरवात राखेच्या बुधवारने होऊन पुढील चाळीस दिवसाच्या कालावधीमध्ये उपवास ,आत्म-त्याग, मांसाहार भोजन किंवा विशेष वाईट सवयी किंवा वृत्तीचा त्याग करतात.विशेषत: कॅथोलिक ख्रिस्ती हा समय मोठ्या उत्साहाने पाळतात. याचा प्रभाव काही प्रोटेस्टंट संप्रदायामध्ये पहाण्यास मिळतो. विशेष म्हणजे,बायबलमध्ये लेंट पाळण्याविषयी आज्ञा किंवा उल्लेखही नाही. 

What do Catholics give up for lent?

 लेंटविषयी  मुख्य चांगुलपणा म्हणजे आत्म-त्याग होय.

 लेंट समयात कोणतेही वाईट कृत्य घडू नये म्हणून विशेष काळजी घेतात. लेंटमधील  चांगुलपणा म्हणजे  आत्म-त्याग होय.बायबलमध्ये  देखील आत्म-त्याग करण्याची आज्ञा आहे ,मग या विशिष्ट दिवसात मांसाहार अन्न,वाईट सवयी किंवा वाईट वृत्तीचा त्यागी जीवन स्विकारतात . शुद्ध जीवन व्यतीत करण्याचा प्रयत्न करतात.

 

लेंटबद्दलची वाईट गोष्ट म्हणजे खोटे शिक्षण

ख्रिश्चनांमध्ये एक खेदजनक खोटा विरोधाभास निर्माण झालेला पहाण्यास मिळतो.तो असा कि, जे ख्रिश्चन लेंट पाळतात ते धार्मिक ख्रिश्चन आहेत आणि जे पाळत नाहीत ते अधार्मिक ख्रिश्चन आहेत. उपवासकाळातील उपवासाने ख्रिश्चनांचे गतजीवनातील पापे आणि आज्ञाभंग पुसली जातात.हे संपूर्णतः चुकीचे शिक्षण आहे.

चांगली कृत्ये वाईट कृत्यांना पुसत नाहीत. तर  ख्रिस्तावर विश्वास ठेवून पश्चात्ताप व कबुली देऊन पाप करणे सोडून दिले तरच देव आपल्या पापांची क्षमा करतो.

 जर आपण आपली पापे पदरी घेतली, तर तो विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करील, व आपल्याला सर्व अनीतीपासून शुद्ध करील. [ १ योहान १:९] 

 What is original meaning of lent ?

आपण उपवास करून झाल्यानंतर देखील, जर देवाची आज्ञा मोडत राहिलो तर उपवासाचा चांगुलपणा तो काय ?

उपासकाळा दरम्यान त्यागलेले दुर्गुण (उदा. दारू, सिगारेट,राग,खोटे बोलणे इ.) उपासकाळ संपल्यावर देखील पुन्हा तेच दुर्गुण चालू ठेवायचेच असेल तर सोडण्यात काय फायदा ? पुन्हा सुरु करण्याच्या मनतयारीने केलेला त्याग, हा निव्वळ ढोंगीपणाच आहे.

पुन्हा सुरु करण्याच्या पूर्वतयारीने लेंट समयातील तात्पुरता आत्म-त्याग केल्याने माणूस पवित्र बनत नाही. जे लोक कायमस्वरूपी स्वता:चे वाईट सवयी सोडून देतात आणि सतत पाठपुरावा करत राहातात. असाच कायमस्वरूपी आत्म-त्याग प्रभूला मान्य आहे. तात्पुरता आत्म-त्याग निरुपयोगी आहे.त्यापासून काहीच लाभ नाही .

लेंट पाळण्याच्या बदल्यात देवाकडून भौतिक आशीर्वाद मिळतील हा चुकीचा समज आहे.

प्रभु येशूने म्हटले, [तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे न्यायीपण मिळवायला झटा, म्हणजे त्यांवर ह्या सर्व गोष्टीही तुम्हांला मिळतील.” मत्तय ६:३३ .रमाबाई].

म्हणून, जेव्हा आपण प्रभूयेशूला व त्याची धार्मिकता आपल्या जीवनात प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा देव आपणास नक्कीच त्याच्या जवळ करतो, तात्पुरते नाही तर कायमस्वरूपी. जरी लेंट समय नाही पाळला तरी. लेंट काळातील उपवास करणारे  ख्रिश्चन देवाच्या दृष्टीने धार्मिक असतात आणि तसेच ,याउलट जे ख्रिश्चन लेंट दरम्यान उपवास करत नाहीत ,परंतु देवाचा शोध सतत घेतात,ते काही अधार्मिक ख्रिस्ती होत नाहीत.  

यास्तव, जे ख्रिश्चन देवाचे आशीर्वाद किंवा सहख्रिश्चनांपेक्षा अधिक धार्मिक श्रेष्ठत्व मिळविण्याच्या हेतूने उपवासकाळ पाळत असेल तर त्याचे  हे मूर्खपण आहे .


 हे देखील वाचा . - 👉 वधस्तंभावरील सात शब्द


कर्मकांड किंवा परंपरा हे लेंटची कुरूपता आहे. 

कर्मकांड किंवा परंपरा म्हणजे आपणास देवापासून दूर नेण्यासाठी सैतान करत असलेली घोर फसवणूक आहे, कारण आपण देवापेक्षा विधींवर किंवा रूढी-परंपरावर अधिक लक्ष केंद्रित करतो. कांही ख्रिस्ती तर या दिवसात अगदी लग्न, वाढदिवस, विशेष पक्वान्न बनवणे किंवा इतर आनंद-उत्सव देखील साजरे करत नाहीत .

Is lent biblical ?
Is lent biblical ?

जेंव्हा आपण रूढी-परंपरा पाळतो तेंव्हा ते दैहीकरीत्या असते.परंतु मन ख्रिस्तापासून दूर असते.त्यामुळे ख्रिस्तापासून काहीही प्राप्त होत  नाही. प्रभू येशूबरोबर समर्पित वेळ न घालवता रूढी-परंपरेनुसार उपवास करणे म्हणजे निरर्थक होय .

त्याचप्रमाणे,धार्मिक रूढी-परंपरा पूर्ण करण्याच्या हेतूने चर्चला हजेरी लावल्याने ख्रिश्चनांना आध्यात्मिक लाभ होत नाही.

त्याऐवजी प्रत्येक ख्रिस्तीने आपल्या हृदयात वधस्तंभावर खिळलेले ख्रिस्त घेऊन विश्वासणार्यां चर्चमध्ये नियमितपणे उपस्थितीत राहून त्याची आत्म्याने व खर्याने आराधना करावी.

योहान ४;२४ - देव आत्मा आहे; आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे.

सकाळ व संध्याकाळच्या रूढी प्रार्थनां आपणास देवाच्या जवळ  घेऊन जाऊ शकत नाही. जर त्या दोन प्रार्थनांमधील आपले जीवन जगिक लोकांसारखे रूढीवादी असेल. तसेच रूढीवादी शास्त्र-वाचन देखील आपल्याला देवाच्या जवळ आणणार नाही.सैतान देखील बायबल वचने जाणून आहे.  [ लुक १०;२७ आणि त्याने उत्तर देऊन म्हटले, तू आपल्या सर्व अंत:करणाने व आपल्या सर्व जिवाने व आपल्या सर्व शक्तीने व आपल्या सर्व मनाने तुझा देव प्रभू' याच्यावर प्रीती कर, आणि जशी स्वत:वर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर.”]

म्हणून, जर आपण लेंट समय हा कर्मकांड किंवा रूढीपरंपरा म्हणून पाळत असाल तर, असला धार्मिकपणा हा ढोंगीपणा होय.

एक चांगला ख्रिस्ती  म्हणजे जो प्रभु येशूमध्ये राहतो व त्याच्यावर विश्वास ठेवतो. लेंट समयातील समर्पित भक्ती केवळ पवित्रतेत वाढ करण्याचे एक साधन आहे.जर आपण ख्रिस्तामध्ये टिकून राहावे अधिक मजबूत व्हावे या हेतूने जर आत्मत्याग केला असेल तरच लेंटचे पालन हे आशीर्वादाचे कारण होईल.

        आत्मत्याग किंवा उपवास करण्यामागचा उद्देश काय असावा ? तर देवासोबत अधिक वेळ घालवणे होय.देवाकडून आशीर्वाद मिळवण्यासाठी कुठल्याही परिस्थितीत ख्रिस्तासोबत एकनिष्ठ आणि निरंतर विश्वासू असणे गरजेचे आहे  .जेव्हा एखादा ख्रिश्चन ख्रिस्ताला समर्पित असतो, तेव्हा तो देवाद्वारे जग पाहतो. त्याचे आशीर्वाद [भौतिक आशीर्वाद नव्हे] अफाट असतात. 

 How to glorify God through Lent?

लेंटद्वारे देवाचे गौरव कसे होईल ?

जेव्हा आपण देवाचे गौरव करणारी कृत्ये आपणाकडून घडतील जसे कि , प्रार्थना करणे (देवाकडून ऐकणे व बोलणे), बायबल वाचन आणि अभ्यास करणे. इतरांनाही ख्रिस्ताची सुवार्ता विदित करणे,स्वता:च्या जीवन परिवर्तनाची साक्ष सांगणे. एकदा ख्रिस्ती झाल्यानतर सर्व दिवस येशुला समोर ठेऊन साक्षमय जीवन जगणे .

Is lent biblical ?
Is lent biblical ?

जर ख्रिस्ती लोकांनी वाईट सवयी किंवा वृत्ती कायमचे काढून टाकण्यासाठी या संधीचा उपयोग केला तर लेंटचे पालन करणे हे आपणासाठी एक आशीर्वाद असेल. लेंट दरम्यान वाईट सवय सोडणे आणि लेंट नंतर पुन्हा जोमाने त्याच वाईट सवयींचा पाठपुरावा करणे हे पूर्णपणे ढोंग आहे. लक्षात ठेवा हा ढोंगीपणा करत असताना आपण देवाच्या कृपेचा गैरवापर करत आहात.

जिवंत देवाची सर्वात उत्तम उपासना म्हणजे सतत त्यागयुक्त समर्पीत जीवन जगणे. बायबल सांगते [रोम१२:- “म्हणून बंधुजनहो, मी देवाच्या करुणांमुळे तुम्हांला विनवतो की, तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावीत; ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे”.]

 आपण लेंट पाळत असो किंवा नसो ,हा सर्वस्वी स्वता:चा निर्णय आहे . ख्रिस्तामध्ये राहणे हेच आपले प्राधान्य असले पाहिजे. लेंटचे पालन करणे किंवा न करणे महत्त्वाचे नसून ख्रिस्त महत्त्वाचा आहे. कारण तो आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू  आहे. ख्रिस्त आपले जीवनशैली आहे. आमेन.


येणारा गुड फ्रायडे  कसा साजरा कराल पुढील व्हिडीओतून सुंदर मार्गदर्शन 👇👇 



लेंट पालन विषयी लोकांचे सर्वसामान्य व बायबलचा आधार नसलेल्या विचार  किंवा समज  

  • येशूने आपल्यासाठी ४० उपवास केला . म्हणून मी देखील ४० दिवस उपवास करतो.   स्पष्टीकरण आत्म्याने येशूला अरण्यात नेले आणि ४० दिवस तेथे येशूची परीक्षा घेण्यात आली. त्या अवधीत त्याला भूक लागली नाही. हा संधर्भ घेऊन आपण उपवास करावा.अशी शिकवण बायबल मध्ये नाही. [मत्तय ;, ]
 
  • येशूने ४०  दिवस दुख;सोसले आणि वधस्तंभावर प्राण दिला. म्हणून मी देखील येशूच्या दुख;मध्ये सहभगी होण्यासाठी ४० उपवास करून दिवस दुख: पाळतो.  स्पष्टीकरण –,येशूला आपल्या  सांत्वनाची गरज नाही . ख्रिस्ती भक्तांनो  येशू स्पष्ट शब्दात काय सांगत आहे बघा 
येशू त्यांच्याकडे वळून म्हणाला, “अहो यरुशलेमेच्या कन्यांनो, माझ्यासाठी रडू नका, तर स्वतःसाठी आपल्या मुलाबाळांसाठी रडा. [लुक २३;२८]"

       अहो कष्टी व भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हांला विसावा देईन. [मत्तय ११;२८]


  •  बुधवार पवित्र आहे. शुक्रवार पवित्र आहे . स्पष्टीकरण – देवासाठी सर्व दिवस सम आहेत
 "मी प्रतिदिवशी तुझा धन्यवाद करीन; आणि सदासर्वकाळ तुझ्या नावाचे स्तवन करीन." [स्तोत्र १४५;] 
 
  • लोकासमोर  असलेला पुढीलप्रमाणे  ४० दिवस उपासकाळाचा क्रमवार, जो पूर्णपणे चुकीचा आहे
  1.   राखेचा बुधवारपासून उपवास 
  2. गुड फ्रायडे [ त्यास वधस्तंभावर देणे
  3.  ईस्टर .   
स्पष्टीकरण  मत्तयचा संपूर्ण था अध्याय वाचा  -  येशूचा बाप्तिस्मा झाल्यानंतर लगेच ४० दिवस अरण्यात परीक्षा झाली. तर बायबल स्पष्ट नोंद देते कि, परीक्षा झाल्यानंतर येशूने साडे तीन वर्ष सुवार्ता सांगितली, चिन्हे,चमत्कार केले, आजार बरे केली ,. कामे केली. हे सर्व झाल्यानंतर त्यास वधस्तंभावर खिळले. परिक्षेचे  हे ४० दिवस संपल्यावर लगेच नव्हे.  
  •  लेंट पाळण्याद्वारे किंवा चांगल्या कर्माच्या द्वारे तारण मिळते. स्पष्टीकरण लेंटची कल्पनाच बायबलमध्ये नाही.   
कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर हे देवाचे दान आहे; कोणी आढ्यता बाळगू नये म्हणून कर्मे केल्याने हे झाले नाही. [ इफिस :,.]
 
Please share  to your friends... 🙏🙏
 
पुढील लेख देखील आपल्या बायबल अभ्यासात वाढ करतील . 👇👇
Next Post Previous Post
2 Comments
  • अनामित
    अनामित ४ मार्च, २०२३ रोजी १०:५१ AM

    सूंदर लेख आहे.सत्य सर्वांना कळले पाहीजे.

  • अनामित
    अनामित १८ फेब्रुवारी, २०२४ रोजी ९:२५ AM

    चागली माहिती आहे

Add Comment
comment url