William Tyndale Biography

William Tyndale Biography


William Tyndale Biography

लंडनच्या नॅशनल पोर्ट्रेट गॅलरीमध्ये एक चित्र ठेवलेले आहे, त्या चित्रात एक व्यक्ती काळे कपडे घालून एका अंधाऱ्या खोलीत बसलेली आहे. त्याच्या चेहऱ्यावर मेणबत्तीचा प्रकाश पडत आहे आणि तो त्याच्या डाव्या हाताने एक पुस्तक पकडून त्याच्या उजव्या हाताच्या बोटाने तो त्या पुस्तकाकडे बोट दाखवत आहे . जणू तो सांगत आहे माझ्याकडे पाहू नका तर या पुस्तकाकडे पहा. त्याच्या हातात असलेले पुस्तक दुसरे तिसरे काही नसून बायबल आहे. आणि ही ती व्यक्ती आहे ज्यास बायबलचे भाषांतर केल्यामुळे जिवंत जाळण्यात आले.  

चला तर या महत्वाकांक्षी व्यक्तीबद्दल जाणून घेण्यासाठी या लेखाचे पूर्ण वाचन करु या .  

Church Background of England

500 वर्षांपूर्वी इंग्लंडमध्ये म्हणजेच 1494 च्या सुमारास अशी परिस्थिती होती. की लोकांकडे बायबल नव्हते. मुळात चर्चचे पाद्री आणि धर्मगुरू  यांनाच सामान्य लोकांकडे बायबल असावे हे मान्य नव्हते . शिवाय बायबल फक्त लॅटिन भाषेतच उपलब्ध होतेकोणत्याही सामान्य नागरिकाला लॅटिन भाषा समजत अथवा वाचता येत नव्हती. बायबल हे त्यांच्या मातृ भाषेत नसल्याने बायबलचे शब्द ऐकण्यासाठी ते  कोणावर अवलंबून असत, अर्थात धर्मगुरू आणि पाद्री यांच्यावर अवलंबून होते. याचा फायदा घेत चर्चमध्ये भ्रष्टाचार वाढला होता .

चर्चमधील बहुतेक धर्मोपदेशक आपापले व्यवसाय चालवत होते. बाप्तिस्म्यापासून दफनविधीपर्यंत लूटमार होत होती. प्रार्थना करून घेण्यासाठी लोकांकडून पैसे मागत . कारण त्या लोकांना सांगितले जात होते की या गोष्टी बायबलमध्ये लिहिलेल्या आहेत. त्यांच्या भाषेत बायबल उपलब्ध नसल्याने भ्रष्टाचार शिगेला पोहोचला होता.

जेव्हा लोक चर्चमध्ये येत असत तेव्हा त्यांना बायबल हे लॅटिन भाषेत वाचून दाखवले जात. आणि म्हणत, आता तुम्ही पवित्र शब्द ऐकले आहेत. हे जाणून घेण्याची आणि समजून घेण्याची काय गरज आहे ? इंग्लंडच्या राजाने तसेच धर्मगुरूंनी देखील देवाचे शब्द प्रजेपर्यंत पोहोचू नयेत यासाठी खूप प्रयत्न केले.

बायबल जेव्हा लिहिले गेले ते हिब्रू , अरेमिक आणि ग्रीक भाषेत लिहिले गेले. आणि त्यानंतर ते रोमच्या राजवटीत लॅटिन भाषेतही होते. लॅटिन भाषा ही रोमची अधिकृत भाषा होती, जसे आज आपल्या राज्याची अधिकृत भाषा मराठी आहे, मराठीत अधिकृत कागदपत्रे आहेत. याचप्रकारे रोममध्येही अधिकृत कागदपत्रे लॅटिन भाषेत असायची. त्यामुळे बायबल फक्त लॅटिन भाषेतच असावे. देवाचे वचन सामान्य लोकांपर्यंत पोहोचू नये म्हणून सैतानाने या प्रकारची खोटी समजूत पाद्री ,पुढारी आणि रांजाची केली होती.

परंतु प्रभु येशू ख्रिस्ताचे कार्य कधीही थांबू शकत नाही. कितीही मोठा सम्राट त्याच्या विरोधात उभा राहिलाकितीही मोठा पंतप्रधान उभा राहिला, कितीही मोठा मुख्यमंत्री उभा राहिला तरी प्रभु येशू ख्रिस्ताचे कार्य थांबणार नाही. हे पवित्र आत्म्याचे कार्य आहे, ते सतत होत असते.

विल्यम टिंडलचे शिक्षण,पार्श्वभूमी Life Of William Tyndale 

अशा परिस्थितीत प्रभु येशू ख्रिस्ताने विल्यम टिंडल नावाच्या व्यक्तीस पाचारण केले , विल्यम टिंडल यांचा जन्म 1494 मध्ये इंग्लंडमधील ग्लुसेस्टरशायर नावाच्या ठिकाणी झाला. वयाच्या १२ व्या वर्षी त्याने ऑक्सफर्ड विद्यापीठात प्रवेश घेतला . आणि देवाची कृपा अशी झाली की त्याने तेथे 10 वर्षे कालावधीत त्याने ग्रीक भाषेसह आठ पेक्षा भाषांवर प्रभुत्व मिळवले. जेव्हा नवीन करार लिहिला गेला  तो मूळतः ग्रीक भाषेत लिहिला गेला होता. त्याच प्रभुने त्याचा सेवक विल्यम टिंडल याला ग्रीक भाषेवर प्रभुत्व दिले.  

विल्यम टिंडलला पाचारण

जेव्हा विल्यमने ग्रीकमध्ये बायबल वाचले तेव्हा त्याला समजले की देव खरोखर काय आहे. परमेश्वर काय इच्छितो ? बायबलने त्याचे डोळे उघडले. त्याचे हृदय आनंदाने भरून गेले आणि देवाने त्याच्या मनात ज्वलंत इच्छा ठेवली की, हे बायबल म्हणजेच येशू ख्रिस्ताचे शब्द, शिकवण सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवयाचे आहे. दीन-दरिद्री, श्रीमंत ,उच्चनीच या सर्वाबरोबर  प्रभु येशू ख्रिस्त या बायबलद्वारे बोलु इच्छितो . म्हणून, पवित्र आत्म्याने विल्यम टिंडलच्या हृदयात एक गोष्ट ठेवली. माझ्या मुला तुला बायबलचे भाषांतर करावे लागेल. 

इतर भाषेत देवाचे वचन बोलणे किंवा शिकवणे हा दंडनीय गुन्हा

त्या वेळी, लॅटिन शिवाय इतर कोणत्याही भाषेत लोकांना देवाचे वचन बोलणे किंवा शिकवणे हा दंडनीय गुन्हा होता. भाषांतर करणे तर दूरच . जर एखाद्या व्यक्तीने लॅटिन भाषेतून इंग्रजी भाषेत भाषांतर केले तर तो व्यक्ती  स्वत:साठी फाशीची शिक्षा ठरवत आहे हे निश्चित होते.

वचनाशिवाय परमेश्वराचे लोक अंधारात जीवन जगत होते. ते राजावर नाराज होते, ते पाद्रीवर नाराज होते,  कारण त्यांना लुटले जात होते. बायबलचे ज्ञान नसल्याने देवाच्या लोकांचा नाश होत होता . इंग्लंडचा राजा हेन्री , कार्डिनल थॉमस वॉस्ले आणि उच्च वर्गातील लोकांनी इंग्लंडच्या सामान्य लोकांना राजांच्या राजापासून दूर ठेवले होते.

विल्यम जेंव्हा ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत शिकून बाहेर आला तेव्हा त्याला कळाले कि, जो कोणी इंग्रजीमध्ये बायबल वाचण्याचा प्रयत्न करतो त्यास जाळले जाते . एका पुढार्याने एका मुलाला विचारले, "मुला, तू प्रभूची प्रार्थना म्हणू शकतोस का ? परंतु इंग्रजीतच. विचारण्याचा हेतू हा होता कि, या मुलाने बेकायदेशीरपणे इंग्रजीतून बायबल शिकले तर नाही ना ?  किंवा बायबलमधील वचन इंग्रजीत पाठ तर नाही केले ना ?  कारण या काळात इंग्रजीत बायबल वाचणे किंवा पाठ करणे बेकायदेशीर होते . त्या मुलाने आपल्या निरागसतेने पुढाऱ्याला ही प्रार्थना ऐकवली. “ हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो”. इंग्रजीतून प्रार्थना एकून तो पुढारी रागाने लालबुंध झाला आणि त्याने लगेचच या मुलाला आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाला जाळून राख करण्याचा आदेश दिला. कारण त्याने मोठे पाप केले आहे. त्याने इंग्रजीत बायबल बोलला आहे.

तेव्हा त्याचा मित्र म्हणाला, विल्यम, मला वाटतं तू हा अतिशय धोकादायक निर्णय घेत आहेस. त्या मुलाचे आणि त्याच्या कुटुंबाचे काय झाले ते तुम्ही पाहिलेस ना ? असे अनेक लोक मारले गेले आहेत. यावर विलियम उदगारला की, प्रभु येशू ख्रिस्ताने माझ्यात एक दृष्टांत ठेवला आहे, माझ्यासाठी जगणे हेच ख्रिस्त आणि मरणे हेच लाभ आहे. काहीही असो मी प्रभूचे कार्य करीन.

प्रिय विल्यम टिंडलचा मित्र त्याला म्हणतो की तुला खूप ज्ञान आहे. तू मोठा पदवीधर आहेस . तू ठरवलेस तर तु विलासी जीवन जगू शकतो , सरकारी नोकरी करून आरामात राहू शकतो .  संपूर्ण जग या सुखसोयीच्या शोधात आहे, आणि तू  हे सुखसोयी सोडून मृत्यूला का कवटाळतोस ? तेही प्रभु येशू ख्रिस्तासाठी.मित्रा, खरा ख्रिस्ती तो आहे जो येशूवर स्वताच्या जीवापेक्षा अधिक प्रेम करतो. कारण वचन सांगते. जो स्वतःला नाकारत नाही, तो माझ्या मागे येण्यास योग्य नाही. मी मेलो आहे, आता ख्रिस्त माझ्यामध्ये जगत आहे

विल्यम टिंडेल विरोध असताना देखील इंग्रजीत संदेश देतो .

विल्यम टिंडेल चौकात उभा राहून लोकांना इंग्रजीत संदेश देऊ लागला. कोणतीही भीती बाळगता तो इतरांना सांगु लागला की तुमचे पाळक, तुमचे प्रमुख याजक तुम्हाला लुटत आहेत. बायबलमध्ये असे कुठेही लिहिलेले नाही की, तुम्हाला प्रार्थना करण्याच्या बदल्यात पैसे द्यावे लागतील. जर देवाने त्याच्या प्रेमाच्याखातर त्याचा एकुलता एक पुत्र दिला तर तुम्हाला असे का वाटवे की काही रुपये देऊन तुम्ही परमेश्वराला प्रसन्न करू शकता


William Tyndale Biography
William Tyndale  preaching 

हे पुढारी , पाद्री तुमच्याशी खोटे बोलत आहेत. देव तुमच्यावर प्रेम करतो. त्याचे आशीर्वाद पैशाने विकत मिळत नाहीत . विल्यम तिथे उभा राहून या गोष्टी बोलत असताना अचानक याजकांनी त्याला पाहिले. त्यांनी ही बातमी उच्च बिशपकडे नेली . पुढार्यानी आणि इतर उच्च बिशपांनी विल्यम टिंडल विरुद्ध नोटीस जारी केली. लोकांमध्ये चुकीची शिकवण पसरवत आहात, असा आरोप करत त्यास  बोलावून घेतले. आणि ताकीद  दिला की, विल्यम टिंडल, नीट ऐक, येथून पुढे तू इंग्रजी भाषेत कुणालाही बायबल समजावून सांगायला जाणार नाहीस.

परंतु विल्यम टिंडलने प्रत्युत्तर केले कि, जर मला संधी मिळाली तर मी एका शेतकऱ्याच्या मुलालाही धर्मगुरू बनवीन. जेणेकरून त्याला याजकापेक्षा बायबलचे अधिक ज्ञान मिळू शकेल. हे ऐकून सर्व धार्मिक पुढारी फारच संतापले. “तुला काय वाटतं ? ग्रीक, लॅटिन आणि हिब्रूसारख्या कठीण भाषांमध्ये लिहिलेले पुस्तक इतके सोपे आहे. तुला असे वाटते का, हे अज्ञानी लोक बायबलच्या कठीण गोष्टी समजून घेऊ शकतील. जे दूध पिऊ शकत नाहीत.  तुम्ही त्यांना मांस खायला देता” . विल्यम म्हणाला, मला हे माहीत आहे की मुल मांस खाऊ शकत नाही. तूम्ही तर मला दूधही देऊ देत नाहीत . या मुलासाठी यापेक्षा मोठा अत्याचार काय असू शकतो . तुम्ही लोकांच्या शाश्वत जीवनाशी खेळत आहात.

मला असे वाटत नाही, प्रभु येशू ख्रिस्ताने सांगितलेल्या कथा. वर्णन केलेल्या बोधकथा इतक्या अवघड आहेत की सामान्य लोकांना त्या समजू शकत नाहीत. मात्र पुढारी वर्ग प्रचंड संतप्त होते . आणि त्याला धमकावून सांगत होते की पुन्हा कोणालाही बायबल सांगण्याची गरज नाही.  

काहीही असो सामान्य लोकांपर्यंत बायबल गेलेच पाहिजे . आणि  लोकांकडे त्यांच्या बोलल्या जाणाऱ्या भाषेत, म्हणजेच इंग्रजीमध्ये बायबल उपलब्ध नाही. ही बाब त्याला रात्री शांत झोपू देत नव्हती. या कालावधीत त्याला लंडनच्या बिशप टनेल यांना भेटण्याची संधी मिळते. या भेटीततो बिशपला ग्रीक भाषेत नवीन करारात बायबलचे भाषांतर करण्याची परवानगी देण्याची विनंती करतो. बिशप म्हणतात तुमचा विचार चांगला आहे. परंतु राजे आणि वरिष्ठ धार्मिक पुढारी तुमच्या विरोधात उभे आहेत. आणि तुला मदत करून मी मृत्यूला आमंत्रण देऊ शकत नाही.

विल्यम टिंडेल जर्मनीत William Tyndale in Germany

विल्यम टिंडलला आता कळून चुकले की, लंडनमध्ये राहून हे काम फार कठीण आहे . येथे इंग्रजी भाषेत केलेले भाषांतर छापण्यासाठी कोणताही छापखाना तयार होणार नाही. यासाठी तो युरोपला जाण्याचा विचार करतो . मार्टिन ल्यूथरच्या प्रभावामुळे तिथल्या लोकांमध्ये जागरुकता येत होती. म्हणून तो जर्मनीला जाण्याचा निर्णय घेतो.1525 मध्ये तो जर्मनीतील कोलोन नावाच्या ठिकाणी पोहोचतो. जर्मनीत येत असताना त्यांना कळले की आणखी एका व्यक्तीला जिवंत जाळण्यात आले. कारण त्याने इंग्रजीत आमच्या पित्याची प्रार्थना केली. विल्यमला चांगलंच माहीत होतं की तो आपल्या देशातून बाहेर जात असला तरी तो इंग्लंडचा राजा आणि त्या महायाजकांच्या आवाक्यापासून दूर नाही. परंतु तो परमेश्वराचे कार्य करण्यास वचनबद्ध होता. विल्यम टिंडलला माहीत होते की जर तो पुन्हा इंग्लंडला आला तर त्याच्यासाठी फाशीच्या शिक्षेशिवाय दुसरे काहीही वाट पाहणार नाही.

जर्मनीत असतांना विल्यम टिंडल अशा व्यक्तीचा तो शोधात असतो , जो व्यक्ती ग्रीकमधून इंग्रजीत केलेले बायबलचे भाषांतर मुद्रित करू शकेल. आणि बायबल सामान्य लोकांपर्यंत पोहोचेल. त्यांना सत्य समजेल आणि सत्य त्यांना मुक्त करेल

इंग्रजी बायबलचे छपाई  William Tyndale Bible 

लक्षात घ्या, 500 वर्षांपूर्वी, मुद्रण करणे सोपे काम नव्हते. ही खूप थकवणारी प्रक्रिया होती. प्रत्येक अक्षर छपाईसाठी धातू आणि लाकडी ठोकळे वापरण्यात येत. या कामासाठी त्याला पीटर क्विंटल नावाचा माणूस भेटला. त्यास हा एक फायदेशीर करार वाटला कारण त्याला माहित होते की आजपर्यंत इंग्लंडमध्ये इंग्रजीमध्ये एकही बायबल नाही. आणि जर त्याने हे बायबल प्रकाशित केले तर त्याला खूप फायदा होईल. पीटर क्विंटल या कामासाठी तयार झाला. आणि त्याने मत्तय पुस्तकाची इंग्रजी भाषेतील प्रत चाचणी घेण्याच्या उद्देशाने विल्यमकडे पाठवतो. नवीन कराराची ती प्रत पाहून विल्यम खूप भावूक होतो. विल्यम टिंडल यांनी ग्रीकमधून इंग्रजीत अनुवादित केलेल्या बायबलचे छपाई चालू होते.

निशितच सैतान या कामामुळे जागा होतो आणि या कामी अडथळे आणण्यास सुरुवात केली. कोकली कॅस नावाचा एक दुष्ट माणूस येऊन छपाई थांबवतो. कोकली हा मार्टिन ल्यूथरचाही मोठा विरोधक होता. त्यास गुप्तपणे कोणीतरी याची माहिती देते कि, विल्यम टिंडल आणि पीटर क्विंटल संयुक्तपणे इंग्रजीत बायबल प्रकाशित करत आहेत. तो आपल्या सैनिकांसह पीटर क्विंटलच्या छापखान्यावर हल्ला करतो. पण देवाची अशी दया होते की,  विल्यम टिंडलचा मित्र त्याच्याकडे धावत येऊन सांगतो कि, विल्यम विल्यम, घाई कर आणि इथून जा. कारण सैनिक येत आहेत. त्यांना आमची सगळी मेहनत नष्ट करायची आहे. सर्व भाषांतरे बंद करायची आहेत. विल्यम टिंडल त्वरीत तेथून वचनांच्या सर्व प्रतींची साधने घेऊन वर्म्स नावाच्या दुसऱ्या गावात पळून जातो.

विल्यम टिंडल हा एक शिक्षित आणि विद्वान व्यक्ती होता. त्याचे अनेक भाषांवर प्रभुत्व होते. तो एक विलासी जीवन जगू शकला असता परंतु बायबल सामान्य लोकांना मिळावे याकरिता लपवून-छपून जीवन जगावे लागले. अशाही परिस्थितीत त्याने आपले काम बंद ठेवले नाही .

जर्मनीहून इंग्रजी बायबलची तस्करी English Reformation

विल्यम टिंडलचे स्वप्न पूर्ण होत होते. नवीन कराराच्या या प्रती इंग्रजी भाषेत छापल्या जात होत्या. आता  देवाचे वचन हे दुःखी , गरीब ,त्रासलेली देवाची सामान्य लोकापर्यंत पोहोचले जात होत. जर्मनीहून नवीन कराराच्या इंग्रजी प्रती इंग्लंडला पाठवले जात होते.  6000 हून अधिक प्रती इंग्लंडमध्ये पोहोचल्या होत्या. तर इंग्लंडमध्ये त्या  कशाप्रकारे पाठवल्या जात होत्या ? अर्थातच ते उघडपणे तर शक्य नव्हतेच.तर त्याची तस्करी केली जात होती. म्हणजे हे बायबल फळ आणि धान्याच्या पोत्यात लपवून इंग्लंडला पाठवले जात होते.  

William Tyndale Biography
William Tyndale  smuggling bible

विचार करा, स्वतःच्या भाषेत बायबल वाचणे म्हणजे जिवंत जाळण्याची शिक्षा स्वतःवर आणणे. पण तरीही लोक जोखीम पत्करत होते . कारण त्यांना वचनाची भूक आणि तहान लागली होतीत्यावेळेस इंग्लडच्या लोकांमध्ये जी भूक होती ती लोक जीव धोक्यात घालून बायबल विकत घेत होते.

आज अशी भूक आणि तहान आपल्यात आहे का ?

जेंव्हा याजकांना चाहूल लागते कि, बायबलची तस्करी होत आहे. विल्यम टिंडल जर्मनीहून हे बायबल इंग्रजीत छापून इकडे पाठवत आहे . म्हणून त्यांनी ठरवले की प्रत्येक ख्रिश्चनांच्या घरावर छापा टाकायचा . चर्चने प्रत्येक ख्रिश्चनांच्या घरांवर छापे टाकले. आणि इंग्रजी बायबलच्या प्रती सापडलेल्या प्रत्येक घरातील व्यक्तीला शिक्षा झाली. त्यांना जाळून मारले.

मनुष्याने देवाचे वचन जाणून घेतल्याने सैतान इतका का घाबरतो ? विचार करा , जर आज आपण बायबल वाचत नसेल तर या मागे कोण असू शकतो ? मनुष्याने देवाचे वचन जाणून घेणे किती महत्त्वाचे आहे.

इंग्लंडच्या धर्मगुरूंनी छापेमारीत मिळालेले सर्व बायबल गोळा करून एकत्र जाळले. पण विल्यम टिंडल यांनी त्यांचे काम थांबवले नाही . कारण ते परमेश्वराचे कार्य होते. कोणताही धर्मगुरू, कोणीही सम्राट प्रभु येशू ख्रिस्ताचे कार्य थांबवू शकत नाही.

विल्यम टिंडल जुना करार देखील भाषांतर करतो.

20,000 हून अधिक प्रती गुप्तपणे धान्य आणि फळांच्या पोत्यात इंग्लंडला पाठवल्या गेल्या होत्या. इंग्लंडच्या बिशपने , प्रमुख याजकांनी जास्तीत जास्त बायबल गोळा करण्याचा खूप प्रयत्न केला. तसेच नष्ट करण्याच्या हेतूने अधिक प्रती विकत घेतल्या. लोकांकडून इंग्लिश बायबल हिसकावून घेऊन एकत्रित जाळून टाकल्या . परंतु विल्यमने हिंमत हारली नाही. आत्तापर्यंत मी फक्त नवीन कराराचे भाषांतर केले होते. आता मी जुन्या कराराचे देखील भाषांतर करेन. हिब्रू भाषा शिकण्यासाठी तो व्हॅन्स नावाच्या ठिकाणी राहु लागला. हिब्रू भाषा शिकण्यात त्यांनी बरीच वर्षे घालवली. हिब्रू भाषा शिकल्यानंतर त्याने प्रथम मोशेच्या पहिल्या पाच पुस्तकांचा इंग्रजीत अनुवाद केला. अशा प्रकारे तो बायबल छापून इंग्लंडला पाठवत राहिला. लोक गुप्तपणे बायबल विकत घेत राहिले

विल्यम टिंडेल राजा हेन्रीचे आमंत्रण नाकारतो.

एक दिवस इंग्लंडची राणी ॲन बोलेन कडे  बायबल पोहचते, जी इंग्लंडचा राजा हेन्रीची दुसरी पत्नी होती. विल्यम टिंडल यांनी अनुवादित केलेले बायबल त्यांना खूप आवडले. आणि राजाला कळून चुकले की जर विल्यम टिंडलने या वेगाने बायबलचे इंग्रजीत भाषांतर करणे सुरू ठेवले तर इंग्लंडच्या राजापेक्षा तो अधिक प्रभावी ठरेल. म्हणून ॲन बोलन चतुराईने विल्यमला आपल्या राजदरबारात येऊन काम करण्यास आमंत्रित केले. इंग्लंडच्या राजाने स्टीव्हन वन नावाच्या माणसाला विल्यम टिंडलकडे पाठवले. विल्यम टिंडल शोधणे इतके सोपे नव्हते. कारण विल्यम टिंडलच्या मागे रोमन सम्राटाचे हेर होते, पोपचे हेर होते आणि राजाचे हेर होते. आणि स्टीव्हन वन, ज्याला राजा हेन्रीने मोठ्या कष्टाने पाठवले होते, विल्यमला खूप सावधगिरी बाळगावी लागली. स्टीव्हन वन रात्री टेंडलला एका फार्मजवळ भेटतो आणि विल्यमला ऑफर देतो ,मी तुझ्यासाठी महाराजांचा संदेश घेऊन आलो आहे. तुम्ही आपण राजदरबारात याल तर तुम्हाला सर्व सुखसोयी आणि सरकारी सुविधा दिल्या जातील. यासाठी तुम्ही बायबलचे भाषांतर थांबवा.

William Tyndale Biography


विल्यम टिंडल म्हणाले, "मी नक्की येईन, महाराजांची सेवा करायला माझा काही आक्षेप नाही, पण माझी एक अट आहे, की किंग हेन्रीने मी इंग्रजी भाषेत अनुवादित केलेले बायबल छापावे. त्यास राजेशाही मान्यता द्यावी . जेणेकरून शाही मान्यतेने इंग्रजी बायबल सामान्य लोकांपर्यंत पोहोचेल . महाराजांनी असे केले तर मी त्यांच्या दरबारात नक्की येईन. स्टीव्हन हा निरोप इंग्लंडचा राजा हेन्रीला देतो. विल्यम टिंडलने सम्राटाची आज्ञा नाकारण्याचे धाडस केल्याने सम्राट त्याच्या कामास अधिकाधिक जोमाने दडपण्याचा आदेश देतो. यानंतर विल्यमला अधिकाधिक विरोध होऊ लागला. पण विल्यमने धीर सोडला नाही

विल्यम टिंडेलला अटक

आता सैतानाने खवळून  इंग्लंडच्या अधिकाऱ्यांच्या मनात एक कट रचला. इंग्लंडचे अधिकार्याने विल्यम टिंडलचा मित्र हेन्री फिलिप्स बोलावून म्हटले की जर तु विल्यम टिंडलला अटक करण्यास मदत करशील तर बदल्यात तुला मोठा मोबादला देऊ. विल्यम टिंडलचा मित्र हेन्री फिलिप्स हा लोभी माणूस होता. एक दिवस पैशाच्या लोभापोटी तो विल्यम टिंडलला स्वता:च्या घरी जेवायला घेऊन जायचा आग्रह करतो . विल्यम टिंडल खुश होऊन त्याच्याबरोबर जाण्यास निघतो परंतु रस्त्यात दबा धरून बसलेले पोलिस त्याला अटक करून घेऊन जातात..

त्याचा मित्र हेन्री फिलिप्सने त्याचा विश्वासघात केल्यामुळे विल्यम टिंडलला खूप दुखी होत. त्याला त्याची चूक उमगते कि,  “मी फक्त प्रभु येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवण्याएवजी  माणसावर विश्वास ठेवला” .  विल्यम टिंडलला बेल्जियमला ​​नेण्यात येते . जिथे त्याला रोमन सम्राटाच्या दरबारात उभे केले जाते. आणि खोट्या शिकवणीचा प्रसार केल्याच्या खोट्या आरोपाखाली त्याला तुरुंगात टाकले जाते. त्याच्यावर दबाव टाकला जातो की, जर तू तुझे पाचारण आणि तु केलेली भाषांतरे सर्व खोटी आहेत असे लोकासमोर कबूल करशील, तर आम्ही तुझी सुटका करू.

परंतु विल्यम टिंडलने परखडपणे स्पष्ट केले, माझ्या जीवनातील प्रभु येशू ख्रिस्ताने केलेले  माझे पाचारण सत्य आहे. आणि मी बायबल भाषांतरीत केलेले माझे काम अगदी परिपूर्ण सत्य आहे. परमेश्वराने मला दिलेले ग्रीक भाषेचे ज्ञान, त्या ज्ञानाचा उपयोग करून, मी इंग्रजी भाषेतील बायबल लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे.

          हे एकून रागा-रागाने अधिकाऱ्यांनी त्याला तुरुंगात टाकले. सोळा महिने विल्यम टिंडल खोल अंधारकोठडीत होता. त्या अंधारकोठडीत खूपच थंडी होती. विल्यम टिंडल तुरुंगातील अधिकाऱ्यांना विंनती करतो की त्याला एखादे ब्लँकेट दिले जावे . पण त्याला ती दिली गेली नाही.

या खोल अंधारकोठडीत अनेक वेळा त्याचे मन खूप अस्वस्थ झाले. हा अंधार खूप भितीदायक होता. बायबलचे भाषांतर करत असताना त्याच्या हृदयात देवाच्या वचनाचा जो प्रकाश चमकत होता त्याच प्रकाशाच्या मदतीने बायबलचे ते शब्द आठवून, येशूचे ते गोड शब्द आठवून, तो आतून समाधान पावत होता की त्याने आपले काम निष्ठेने केले आहे. आणि हे जीवन जे प्रभु येशू ख्रिस्तासाठी खर्च केले आहे.

इतिहासकार जॉन फॉक्सच्या म्हणण्यानुसार, विल्यम टिंडलने त्याच्या या असहनीय स्थितीतही सुवार्ता सांगणे थांबवले नाही. त्याच्या सुवार्ताद्वारे जेलर, त्याची मुलगी आणि त्याचे संपूर्ण कुटुंब  ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकार केला . .

विल्यम टिंडल रक्तसाक्षी होतो . William Tyndale death, Martyr

एक दिवस आला,ज्या दिवशी विल्यमला तुरुंगातून बाहेर काढण्यात आले. तो दिवस 6 ऑक्टोबर 1536 रोजी सकाळ होती . त्याचा अपमान करत त्याला जमावासमोर उभे केले. विल्यम टिंडलला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. त्याचा गळा दोरीने आवळून त्याला खांबाला बांधण्यात आले. आणि त्याला त्याच्या चहोबाजुने लाकडे उभी केली . कारण लोक आता विल्यम टिंडलला जाळले जाणार होते. लाकडाना आग लावली जाते. या अग्नीच्या लोळात विल्यम टिंडेलचे शरीर जळून राख होते.

William Tyndale Last Words

रक्तसाक्षी होत असतानाच विल्यम टिंडेल राजांच्या राजा प्रभुयेशुकडे पहात, आपले डोळे स्वर्गाकडे लावत प्रार्थना करतो , हे सर्वोच्च देवा, माझ्या प्रभु येशू ख्रिस्त, राजांचा राजा, मी तुला प्रार्थना करतो, इंग्लंडच्या राजाचे डोळे उघड ,इंग्लंडच्या राजाचे डोळे उघड

William Tyndale Biography
William Tyndale martyr 

काय ही प्रार्थना प्रभुने ऐकलीहोय, सामान्य लोक बायबल इंग्रजीत प्रकाशित होण्याची वाट पाहत होते. दहाच महिन्यात असे घडले की ,परमेश्वराने इंग्लंडच्या राजाचे डोळे उघडले जो राजांच्या राजाच्या कामात अडखळण करत होता, त्याच राजाने सांगितले की प्रत्येक चर्चमध्ये इंग्रजी बायबल असणे अनिवार्य आहे. विल्यम टिंडलच्या बलिदानाने सामान्य लोकांसाठी बायबल देवाचे जिवंत वचन त्यांच्या भाषेत उपलब्ध झाले. त्यांना बायबल वाचण्याची परवानगी मिळाली.

आपल्या प्रार्थनांमध्ये अशा प्रार्थनाविंनतीचा  समावेश असला पाहिजे.  “परमेश्वरा, माझ्या देशाच्या राजाचे डोळे उघड, माझ्या देशाच्या पंतप्रधानांचे डोळे उघड, मुख्यमंत्र्यांचे डोळे उघड, परमेश्वरा त्या अधिकाऱ्यांचे डोळे उघड. जे प्रभु येशू ख्रिस्ताची सुवार्तेला विरोध करत आहेत त्यांचे डोळे उघड .

आजही अनेक ठिकाणी सैतानाने बायबल लोकांपर्यंत पोहोचू नये म्हणून अनेकांचे डोळे बंद ठेवले आहेत. सैतान त्यांचा वापर करत आहेपरंतु आपल्या प्रार्थनेद्वारे, सर्वशक्तिमान देव, राजांचा राजा कार्य करेलज्या इंग्लंड देशात विल्यम टिंडलला जाळण्यात आले, ज्या देशात बायबल वाचल्यामुळे अनेकांना जाळण्यात आले. त्या देशाच्या सम्राट किंग जेम्स याने आदेश जारी केला की आता राजाच्या वतीने इंग्रजी बायबल छापले जाईल.

ज्या प्रभू येशू ख्रिस्ताने इंग्लंडच्या राजाचे डोळे उघडले. त्या प्रभु येशू ख्रिस्ताला काहीही अशक्य नाहीतुमच्या प्रार्थनेने सिंहासने हलतील.

तुमच्याकडे कोणतेही बायबलचे भाषांतर असू ते सहज असे आपल्या हातात आलेले नाही .आपणास  या जीवनचरित्र द्वारे समजले असेलच. पवित्र वचन बायबल तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी  पुष्कळाना रक्तसाक्षी व्हावे लागले. आज तुमच्या हातात जे बायबल आहे , काय तुम्ही त्याचे नियमित वाचन करत आहात का ?


जर आपण या जीवन चरित्र वाचून आशीर्वादित झाला असाल तर जरूर कमेंट्स करा, शेअर करा.  मनापासून धन्यवाद ...!

source  - wkipedia Dr. David Daniell ,and couple of articles 

Next Post Previous Post
1 Comments
  • अनामित
    अनामित २ सप्टेंबर, २०२४ रोजी १०:१४ AM

    Thank you Jesus 🙏🏼🙏🏼

Add Comment
comment url