देवदूताचा सिद्धांत Angelology

देवदूताचा सिद्धांत (Angelology)

Angelology


Angelology  देवदूताचा सिद्धांत 



 बायबल मध्ये देवदू्ता विषयी अपणास माहीती मिळ्ते. देवदुताचे अस्तित्वात आहे .व ते अद्रुश्य रितीने कार्य करतात असे पवित्रशास्र शिकवते.देवदुत आपल्या साह्यासाठी आहेत असे शिक्षण सुमरे ३०० वेळा आलेले आहेत. परंतु मडंळ्यामध्ये देवदुताविषयी पुरेसे शिक्षण दिले जात नाही. देवदुत  देवाची व मानवाची सेवा कारतात.       

A)       देवदूताचा स्वभाव व स्थान


  1) ते निर्मीत आहेत..   कलस्से.: १६ 
 कारण आकाशात व पृथ्वीवर असलेले, दृश्य व अदृश्य असलेले, राजे, अधिपती, सत्ताधीश किंवा अधिकारी असलेले, जे काही आहे ते सर्व त्याच्यामध्ये निर्माण झाले; सर्वकाही त्याच्या द्वारे व त्याच्यासाठी निर्माण झाले आहे
2)  दुत बळाने व पराक्रमाने मनुष्यापेक्षा श्रेष्ट आहेत.   २पेत्र २;११  बळाने व सामर्थ्याने अधिक मोठे असलेले देवदूतही प्रभूसमोर त्यांची निंदा करून त्यांना दोषी ठरवत नाहीत.

3) दुत महासामर्थ्यावान आहेत.
२ थेस्स १; तुमच्यावर संकट आणणार्‍या लोकांची परत संकटाने फेड करणे आणि संकट सोसणार्‍या तुम्हांला आमच्याबरोबर विश्रांती देणे, हे देवाच्या दृष्टीने न्याय्य आहे,

प्रेषित १२;   तेव्हा पाहा, प्रभूचा दूत त्याच्याजवळ उभा राहिला आणि खोलीत उजेड चकाकला; त्याने पेत्राच्या कुशीवर थापटून त्याला जागे करून म्हटले, “लवकर ऊठ.तेव्हा त्याच्या हातांतील साखळदंड गळून पडले.

प्रेषित १२;२३  त्याने देवाचा गौरव केला नाही, म्हणून तत्क्षणी प्रभूच्या दूताने त्याच्यावर प्रहार केला आणि तो किडे पडून मेला.

4) दुत लग्न करत नाहीत मरत  नाही.  लुक २०;३५,३६ परंतु ते युग व मेलेल्यांतून पुनरुत्थान हे प्राप्त करून घेण्यास जे योग्य ठरतील ते लग्न करून घेणार नाहीत व लग्न करून देणारही नाहीत; आणि ते पुढे मरणारही नाहीत, कारण ते देवदूतांसमान आहेत आणि पुनरुत्थान पावलेले असल्यामुळे ते देवाचे पुत्र आहेत.

5) दुताना पुष्कळ ज्ञान आहे. परंतु सर्वज्ञ नाहीत.
इफ़िस ३;१०,११ ह्यासाठी की, जो युगादिकालाचा संकल्प त्याने ख्रिस्त येशू आपला प्रभू ह्याच्यामध्ये सिद्धीस नेला आहे, त्याप्रमाणे देवाचे नानाविध ज्ञान स्वर्गातील अधिपती व अधिकारी ह्यांना मंडळीच्या द्वारे आता कळावे.

6) दुताची भाक्ति  करावयाची  नाही.
 प्रकटी २२;,
हे ऐकणारा व पाहणारा मी योहान आहे. जेव्हा मी ऐकले व पाहिले तेव्हा हे मला दाखवणार्‍या देवदूताला नमन करण्यासाठी मी त्याच्या पाया पडलो; परंतु तो मला म्हणाला, “असे करू नकोस; मी तुझ्या सोबतीचा, तुझे बंधू संदेष्टे व ह्या पुस्तकातील वचने पाळणारे लोक ह्यांच्या सोबतीचा दास आहे; नमन देवाला कर.

7) दुतामध्ये वर्ग आहेत .  ते सर्व येशुच्या स्वाधिन आहेत.
१ थेस्स४; कारण आज्ञाध्वनी, आद्यदिव्यदूताची वाणी व देवाच्या तुतारीचा नाद होत असता प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल;
१पेत्र ३;२२ तो येशू ख्रिस्त स्वर्गात गेला आणि आता देवाच्या उजवीकडेआहे, त्याच्या स्वाधीन देवदूत, अधिकारी व सत्ताधीश हे ठेवले आहेत.
8) दुत  गौरवी  प्राणी  आहेत  मत्त २८;, त्याचे रूप विजेसारखे होते व त्याचे वस्त्र बर्फासारखे शुभ्र होते.
प्रकटी १०;मी आणखी एक बलवान देवदूत स्वर्गातून उतरताना पाहिला; तो मेघवेष्टित असून त्याच्या डोक्यावर मेघधनुष्य होते, त्याचे तोंड सूर्यासारखे, व त्याचे पाय अग्निस्तंभासारखे होते.

दानी १०;  त्याचे शरीर वैडूर्यमण्यासारखे असून त्याचे मुख विद्युल्लतेसारखे होते. त्याचे नेत्र पेटलेल्या दीपांसमान होते, त्याचे हातपाय उज्ज्वल पितळेसारखे होते आणि त्याच्या शब्दाचा ध्वनी एखाद्या समुदायाच्या गजबजाटासारखा होता.

९) पातित देवदुताना शिक्षा  होते.
२ पेत्र२; कारण ज्या देवदूतांनी पाप केले त्यांची देवाने गय केली नाही; तर त्यांना नरकात टाकले आणि न्यायनिवाड्याकरता अंधकारमय खाड्यात  राखून ठेवले;

१०) विश्वासणारे दुतांचा न्याय ठरवतील . १ करिथ ६; आपण देवदूतांचा न्यायनिवाडा करणार आहोत हे तुम्हांला ठाऊक आहे ना? तर मग व्यावहारिक गोष्टींविषयी सांगणे नकोच.

११) दुताना मणुष्यानी कधी कधी मणुष्यानी पाहीलेले आहे. 
  
what-is-angelology
angel



लुक ;,१३ तेव्हा प्रभूचा दूत त्यांच्याजवळ उभा राहिला, प्रभूचे तेज त्यांच्याभोवती प्रकाशले आणि त्यांना मोठी भीती वाटली.इतक्यात स्वर्गातील सैन्याचा समुदाय त्या देवदूताजवळ अकस्मात प्रकट झाला आणि देवदूत देवाची स्तुती करत म्हणाले,
भिऊ नका, कारण बघा, सर्व लोकांना जो मोठा आनंद होईल त्याची मी तुम्हाला सुवार्ता सांगतो;
उत्पत्ती ३२;,  इकडे याकोब आपल्या वाटेने जात असता देवदूत त्याला भेटले.  त्यांना पाहून याकोब म्हणाला, “हे देवाचे सैन्य आहे, म्हणून त्या ठिकाणाचे नाव त्याने महनाईम’ (दोन सैन्ये) ठेवले.

१२) दुत  खातात    स्तोत्र ७८;२५ दिव्यदूतांची भाकर मानवांनी खाल्ली; पुरून उरेल इतके अन्न त्याने त्यांना दिले.     

B )      दुतांची सख्यां


दुतांचे सैन्य ,समुदाय आहेत . प्रकटी ५;११ तेव्हा मी पाहिले तो राजासन, प्राणी व वडील ह्यांच्याभोवती अनेक देवदूतांची वाणी ऐकू आली; आणि त्यांची संख्या अयुतांची अयुते व सहस्रांची सहस्रे होती.
२ राजे ६;१७,  लीशाने प्रार्थना केली की, “हे परमेश्वरा, ह्याचे डोळे उघड, ह्याला दृष्टी दे.परमेश्वराने त्या तरुणाचे डोळे उघडले, तो पाहा, अलीशाच्या सभोवतालचा डोंगर अग्नीचे घोडे व रथ ह्यांनी व्यापून गेला आहे असे त्याला दिसले.

मत्त २६;५३ तुला असे वाटते काय की, मला माझ्या पित्याजवळ मागता येत नाही, आणि आताच्या आता तो मला देवदूतांच्या बारा सैन्यांपेक्षा अधिक पाठवून देणार नाही?


C )      दुतांचे वस्तीस्थान

 

आज  दुत  स्वर्गात राहातात.  इफ़ीस ३; १० ह्यासाठी की, जो युगादिकालाचा संकल्प त्याने ख्रिस्त येशू आपला प्रभू ह्याच्यामध्ये सिद्धीस नेला आहे, त्याप्रमाणे देवाचे नानाविध ज्ञान स्वर्गातील अधिपती व अधिकारी ह्यांना मंडळीच्या द्वारे आता कळावे.,
योहान १; ५१ मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो, आकाश उघडलेले आणि देवदूतांना चढताना व मनुष्याच्या पुत्रावर उतरताना तुम्ही पाहाल.
 , लुक २; १३,१५ इतक्यात स्वर्गातील सैन्याचा समुदाय त्या देवदूताजवळ अकस्मात प्रकट झाला आणि देवदूत देवाची स्तुती करत म्हणाले,

D )      दुतांचे सेवाकार्य


what-is-angelology
Angel

. तारणाच्या  वारसासबंधी दुताचे कार्य

        a ) दुत त्याची सेवा करातात  ईब्री १;१३,१४ पण त्याने कोणत्या देवदूताविषयी असे कधी म्हटले, “मी तुझ्या वैर्‍यांना तुझ्यासाठी पदासन करीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बस

b) दुत अन्न पुरवातात.  १राजे १९ ;- तो रतामाच्या झुडपाखाली पडून झोपी गेला; तेव्हा एका देवदूताने त्याला स्पर्श करून म्हटले, “ऊठ, हे खा.त्याने पाहिले तो निखार्‍यावर भाजलेली एक भाकर व पाण्याची एक सुरई आपल्या उशाशी ठेवली आहे असे त्याच्या दृष्टीस पडले. तो खाऊनपिऊन पुन्हा झोपी गेला. परमेश्वराचा देवदूत पुन्हा दुसर्‍यांदा त्याच्याकडे आला व त्याला स्पर्श करून म्हणाला, “ऊठ, हे खा; कारण तुला दूरचा खडतर प्रवास करायचा आहे.
 c) दुत  रक्षण करतात.  स्तोत्र ९१;११,१२ कारण तुझ्या सर्व मार्गांत तुझे रक्षण करण्याची तुझ्याविषयी तो आपल्या दिव्यदूतांना आज्ञा देईल. तुझ्या पायांना धोंड्याची ठेच लागू नये म्हणून ते तुला आपल्या हातांवर झेलून धरतील.

d) दुत सेवकाचे रक्षण करातात.  मत्त २६;५३   तुला असे वाटते काय की, मला माझ्या पित्याजवळ मागता येत नाही, आणि आताच्या आता तो मला देवदूतांच्या बारा सैन्यांपेक्षा अधिक पाठवून देणार नाही?

 , उत्पत्ती१९;११   घराच्या दाराशी जी लहानथोर माणसे जमली होती त्यांना त्यांनी आंधळे करून टाकले; मग ती घर शोधून शोधून थकली.

२ राजे ६; अरामी लोक अलीशावर चालून आले तेव्हा त्यांनी परमेश्वराची प्रार्थना केली की, “ह्या लोकांना आंधळे कर.अलीशाच्या म्हणण्याप्रमाणे त्याने त्यांना आंधळे केले.

e) दुत देवाच्या लोकाना संकट व धोका यापासुन सोडवतात . दानि ६;२२   माझ्या देवाने मला वाचविण्यासाठी, देवदूताला पाठविले देवदूताने सिंहाची तोंडे बंद केली

f) दुत सेवकाचे कष्टात व संकटात सात्वंन करतात.  प्रेषित २७;२३  कारण ज्याचा मी आहे व ज्याची मी सेवा करतो त्या देवाचा दूत गेल्या रात्री माझ्याजवळ उभा राहून म्हणाला,

g) दुत देवाचा मनोदय त्याच्या सेवकाना प्रकट करतात.  
 लुक १;११,१३,१९ त्याला धुपाच्या वेदीच्या उजवीकडे प्रभूचा दूत तेथे उभा असलेला दिसला.“जखर्या, भिऊ नको, कारण तुझी प्रार्थना ऐकण्यात आली आहे;
 
h) दुत देवाच्या सेवकानी काय करावे ते दाखवतात.  मत्त २;१३ , पाहा, प्रभूचा दूत योसेफास स्वप्नात दर्शन देऊन म्हणाला, “ऊठ, बालक व त्याची आई ह्यांना घेऊन मिसर देशास पळून जा आणि मी तुला सांगेपर्यंत तेथेच राहा; कारण बालकाचा घात करण्यासाठी हेरोद त्याचा शोध करणार आहे.
, प्रेषित ८; २६ प्रभूच्या दूताने फिलिप्पाला म्हटले, “ऊठ, जी वाट यरुशलेमेपासून गज्जाकडे जाते त्या वाटेने दक्षिणेकडे जा; ती ओसाड आहे.

दुत देवाच्या सेवकाना म्रुत्युनतंर सुखलोकात नेतात. लुक १६;२२ आणि देवदूतांनी त्याला अब्राहामाच्या उराशी नेऊन ठेवले; श्रीमंतही मेला व त्याची उत्तरक्रिया करण्यात आली.

दुत येशुच्या दुसर्या येन्याच्यावेळी सर्व  विश्वासणार्याना एकत्र जमवतील.
 मत्त २४;३१ कर्ण्याच्या महानादाबरोबरतो आपल्या दूतांना पाठवील, आणि ते आकाशाच्या एका सीमेपासून दुसर्‍या सीमेपर्यंतत्याच्या निवडलेल्यांना चार्‍ही दिशांकडून जमा करतील..

 ) दुताद्वारे नियमशास्र दिले गेले.  गलती ३;१९  नियमशास्त्र हे उल्लंघनांमुळे लावून देण्यात आले; ते मध्यस्थाच्या हस्ते देवदूतांच्या द्वारे नेमून देण्यात आले.

प्रेषित ;५३ अशा तुम्हांला देवदूतांच्या योगे योजलेले नियमशास्त्र प्राप्त झाले होते;

) येशु न्याय करायला येईल तेव्हां दुत त्याच्याबरोबर येतील.  २थेस्स१;  म्हणून प्रभू येशू प्रकट होण्याच्या समयी ते होईल; तो आपल्या सामर्थ्यवान दूतांसह स्वर्गातून अग्निज्वालेसहित प्रकट होईल;

४ )दुत शिक्षेची अमलबजावनी करतील
  मत्त१३;३९-ते पेरणारा वैरी हा सैतान आहे; कापणी ही युगाची समाप्ती आहे; आणि कापणारे हे देवदूत आहेत. तेव्हा जसे निदण गोळा करून अग्नीत जाळतात तसे युगाच्या समाप्तीस होईल. मनुष्याचा पुत्र आपल्या दूतांना पाठवील, आणि ते सर्व अडखळवणार्‍यांना व अनाचार करणार्‍यांनात्याच्या राज्यातून जमा करून त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकतील; तेथे रडणे व दात खाणे चालेल.
, मत्त१३; ४९, ५० तसे युगाच्या समाप्तीस होईल; देवदूत येऊन नीतिमानांतून दुष्टांना वेगळे करतील
आणि त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकतील; तेथे रडणे व दात खाणे चालेल.



सारांश
 १. दूत महासामर्थ्यवान असले,त्यांना ज्ञान असले, तरी ते भक्तीचे विषय नाहीत.
२. दूतांचा समुदाय असून ते स्वर्गात राहतात.
३. दूत विश्वासणाऱ्यांची सेवा करतात,रक्षण करतात,देवाचा मनोदय प्रगट करतात.
. दूत आमच्यासाठी अनेक प्रकारे मदत करीत असले, तरी आम्ही त्यांची भक्ती
करता कामा नये.
५ देवाच्या संकल्पाप्रमाणे दूत ख्रिस्ती लोकांसाठी अनेक कार्ये करतात याबद्दल
देवाची स्तुती करावी.
 ६ . आम्ही दूतांचा न्याय करणार आहोत हे लक्षात ठेवून स्वतःला परिपूर्ण करण्याचा
प्रयत्न करावा.


Next Post Previous Post
1 Comments
  • Godspeaks
    Godspeaks २० एप्रिल, २०२० रोजी ११:४२ AM

    Please share and follow this blog for spiritual grwoth

Add Comment
comment url