पवित्र आत्मा, Holy Spirit


 

देव-पवित्र आत्मा

प्रस्तावना

त्रैक्य देवत्वामधील तिसरी व्यक्ती म्हणजे देव-पवित्र आत्मा. देवपित्याला व देवपुत्राला व्यक्तित्व आहे तसेच पवित्र आत्म्यालाही व्यक्तित्व आहे. पवित्र आत्मा दिव्य व्यक्ती आहे, असे स्पष्ट शिक्षण पवित्र शास्त्रामध्ये अचूकपणे दिले आहे.

पवित्र आत्मा, Holy Spirit
पवित्र आत्मा, Holy Spirit

पवित्र शास्त्रात पवित्र आत्म्याला दिलेली नावे व प्रतीके यावरून त्याचा स्वभाव व कार्ये प्रकट केलेली आहेत. पवित्र आत्मा मनुष्याला त्याच्या पापांची जाणीव देऊन तारणाचे आशीर्वाद प्राप्त करून देतो; तसेच तो विश्वासणाऱ्याच्या जीवनात अनेक कार्ये करतो.पवित्र आत्म्याशिवाय तारणाची खात्री होत नाही व ख्रिस्ती जीवन जगणेही शक्य नाही.

१. पवित्र आत्म्याचे व्यक्तित्व

 देवपिता व देवपुत्र हे दोघे व्यक्ती असल्याचे आपण पूर्वी पाहिले आहे. अनेक लोक पवित्र आत्मा व्यक्ती नाही, असे चुकीने समजतात. व्यक्तित्वाला लागणारी लक्षणे पवित्र आत्म्याच्या ठायी आहेत किंवा नाहीत याविषयी पवित्र शास्त्र काय सांगते हे पाहू.

 पवित्र आत्म्याच्या व्यक्तित्वाची लक्षणे

१) ज्ञान २) भावनांची जाणीव होण्याची शक्ती ३)  इच्छाशक्ती  ४)  निवड करण्याची शक्ती

१. ज्ञान  

 १ करिंथ.१२:८. एखाद्याला आत्म्याच्या द्वारे ज्ञानाचे वचन मिळते. पवित्र आत्मा मनुष्याला ज्ञान देतो.

२. भावनांची जाणीव होण्याची शक्ती   

 इफिस. :३० - देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. पवित्र आत्मा प्रेम करतो. त्याप्रमाणे काही गोष्टींनी तो खित्र होतो. केवळ व्यक्तीला अशा भावना होऊ शकतात. रोम.१५:३० - आत्म्याच्या द्वारे निष्पन्न झालेल्या प्रेमामुळे...

. इच्छाशक्ती 

 १ करिंथ.१२:११- तरी ही सर्व कार्ये तोच एक आत्मा करितो. तो आपल्या इच्छेप्रमाणे एकेकाला ती (दाने) वाटून देतो. पवित्र आत्म्याला इच्छा करण्याची शक्ती आहे व त्याप्रमाणे तो कार्य करतो.

. निवड करण्याची शक्ती  

  प्रेषित १३:-...पवित्र आत्मा म्हणाला की,बर्णबा व शौल ह्यांना ज्या कार्यासाठी मी बोलाविले आहे त्यासाठी त्यांना माझ्याकरिता वेगळे करून ठेवा.  सुवार्ताप्रसार करण्यासाठी पवित्र आत्म्याने बर्णबा व पौल ह्यांना पाचारण केले.

२. पवित्र आत्मा व्यक्तीप्रमाणे कृती करतो

. पवित्र आत्मा बोलतो

 प्रकटी.:- आत्मा मंडळ्यांस काय म्हणतो..

. पवित्र आत्मा प्रार्थना करण्यास मध्यस्थी करतो .    रोम.:२६- आत्माहि आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो ... पण आत्मा स्वतः आपल्यासाठी विनंती करतो.

अधिक प्रार्थने विषयी वाचण्यासाठी क्लिक करा   👉  आत्म्याने प्रार्थना

. पवित्र आत्मा शिकवतो .     योहान.१४:२६- पवित्र आत्मा तुम्हांला सर्व शिकवील.

 . पवित्र आत्मा साक्ष देतो .   योहान.१५:२६- सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो माझ्याविषयी साक्ष देईल.

 . पवित्र आत्मा मार्गदर्शन करतो.    रोम.:१४- देवाचा आत्मा चालवितो.

 . पवित्र आत्मा आज्ञा करतो .    प्रेषित.१६:,- आशिया प्रांतात वचन सांगण्यास त्यांना पवित्र आत्म्याकडून प्रतिबंध झाल्यामुळे ...परंतु येशूच्या आत्म्याने त्यांस जाऊ दिले नाही.

तो ही सर्व कामे केवळ व्यक्तीकडून होऊ शकतात. पवित्र आत्मा ही कामे करतो म्हणून व्यक्ती आहे.

३. पवित्र आत्म्याचे देवत्व

 पवित्र आत्मा दिव्य व्यक्ती आहे असे स्पष्ट व अचूक शिक्षण पवित्र शास्त्रात आहे. पवित्र आत्म्याचे दैवी गुण

.सार्वकालिकता.   इब्री.:१४- तर सार्वकालिक आत्म्याच्या योगे...  

२. सर्वज्ञता  योहान. १४:२६- तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठवील तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हांला सर्व काही शिकवील आणि ज्या गोष्टी मी तुम्हांला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हांस आठवण करून देईल.

. सामर्थ्य  प्रेषित१:- पवित्र आत्मा तुम्हांवर येईल,तेव्हा तुम्हांस सामर्थ्य प्राप्त होईल.

. सर्वव्यापकता  स्तोत्र.१३९:७ ते १० - मी तुझ्या आत्म्यापासून कोठे निघून जाऊ ?

. पवित्रता  लूक.११:१३- ...तो किती विशेषेकरून पवित्र आत्मा देईल.

६. सत्यता  १ योहान.५:७- आत्मा हा साक्ष देणारा आहे,कारण आत्मा सत्य आहे. पवित्र आत्म्याच्या ठायी दैवी गुण आहेत,एवढेच नव्हे,तर तो दैवी कृत्येही करतो.

देवपिता,देवपुत्र व देव-पवित्र आत्मा यांची नावे समान पातळीवरच घेतली जातात.

 ४. पवित्र आत्म्याची पिता आणि पुत्र ह्यांच्याशी समानता

१. बाप्तिस्याविषयी दिलेली आज्ञा मत्तय.२८:१९- यास्तव तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांना शिष्य करा, त्यांस पित्याच्या,पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने  बाप्तिस्मा  द्या.

२.आशीर्वचन

२ करिंथ. १३:१४- प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीति आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांसह असो.

पवित्र आत्मा व्यक्ती असून देवत्वास लागणारी लक्षणे त्याच्या ठायी आहेत. पवित्र आत्मा हा त्रैक्य देवत्वातील तिसरी व्यक्ती आहे. जो मान व आदर देवपित्याला व देवपुत्राला दिला जातो तो देव-पवित्र आत्म्यालाही दिला जावा. मनुष्याने त्याच्याशी आदराने बोलावे, वागावे. त्याला खिन्न  करू नये म्हणजेच त्याला आवडणार नाहीत अशा गोष्टी करू नयेत.

५. पवित्र आत्म्याची नावे

१.     आत्मा  योहान.: ...आणि जे आत्म्यापासून जन्मलेले ते आत्मा आहे.

. पवित्र आत्मा   लूक. ११:१३ - तर मग स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात त्यांस तो किती विशेषेकरून पवित्र आत्मा देईल?

. परमेश्वराचा आत्मा  यशया ११: - परमेश्वराचा आत्मा ...

. सदाजीवी देवाचा आत्मा  २ करिंथ.:.तर सदाजीवी देवाच्या आत्म्याने...

. ख्रिस्ताचा आत्मा  रोम.: ....कोणाला ख्रिस्ताचा आत्मा नाही तर तो त्याचा नाही.

 . येशूचा आत्मा  फिलिप्पै.:१९ ....येशू ख्रिस्ताच्या आत्म्याने ...

 . जीवनाचा आत्मा  रोम.: - ख्रिस्त येशूमधील जीवनाच्या आत्म्याचा जो नियम त्याने तुला पाप व मरण ह्यांच्या नियमापासून मुक्त केले आहे.

.देऊ केलेला आत्मा  इफिस.:१३ - त्याने देऊ केलेल्या पवित्र आत्म्याचा ...शिक्का मारण्यात आला आहे.

 .सत्याचा आत्मा  योहान. १४:१६ - मी पित्याला विनंती करीन मग तो तुम्हांला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल.

१०. कृपेचा आत्मा   इत्री. १०:२९ - ज्याने देवाच्या पुत्राला पायाखाली तुडविले, आणि कृपेच्या आत्म्याचा अपमान केला.

११. गौरवाचा आत्मा   पेत्र.:१४ - कारण गौरवाचा आत्मा म्हणजे 'देवाचा आत्मा' तुम्हांवर येऊन राहिला  आहे.

१२. सार्वकालिक आत्मा   इबी.:१४ - तर सार्वकालिक आत्म्याच्या योगे...

१३. पवित्रतेचा आत्मा रोम.: - पवित्रतासंपन्न आत्म्याच्या योगे ...

 १४. देवाच्या पुत्राचा आत्मा   गलती. : . यास्तव देवाने अब्बा, बापा अशी हाक मारणाऱ्या आपल्या पुत्राच्या आत्म्याला तुमच्या आमच्या अंतःकरणात पाठविले आहे.

१५. कैवारी   योहान. १४:२६ - तरी ज्याला पिता माझ्या नामाने पाठवील तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा..

ग्रीक भाषेतील ‘मदत करण्यासाठी आपल्याजवळ बोलाविलेला' या अर्थाच्या शब्दाचे 'कैवारी' हे मराठी भाषांतर आहे. देवाने आपल्या लोकांना मदत करण्यासाठी पवित्र आत्म्याला पाठविले.

देवपिता,देवपुत्र व देव-पवित्र आत्मा यांची नावे अनेकदा एकत्र घेतली जातात, यावरून त्यांचा निकटचा संबंध आहे असे स्पष्ट होते. त्यांना एकच सामर्थ्य, गौरव व ईश्वरत्व आहे. पिता, पुत्र व पवित्र आत्मा ह्या तीन दैवी व्यक्ती आहेत; हे तीनही एक देव आहेत.

६.  पवित्र आत्म्याची प्रतीके

 पवित्र आत्म्याला दिलेल्या प्रतीकांवरून आपणांला त्याचा स्वभाव व कार्ये यांविषयी शिकता येते.

dove-देव-पवित्र आत्मा, Holy -Spirit

. कबुतर  ;  येशू ख्रिस्ताच्या बाप्तिस्म्याच्या वेळेस पवित्र आत्मा येशूवर उतरला.

मत्तय. :१६ - तेव्हा त्याने परमेश्वराचा आत्मा कबुतरासारखा उतरताना . .

. पाणी   ; पाणी हे देवाच्या वचनाचे व पवित्र आत्म्याचेही प्रतीक आहे.

योहान.: - पाण्यापासून व आत्म्यापासून जन्मल्यावाचून ..

पाणी धान्य पिकविते, स्वच्छता करते व ताजेतवाने करते. त्याप्रमाणे पवित्र आता विश्वासणाऱ्याच्या जीवनात कार्य करतो. त्याच्या प्रभावाने आत्मिक फळे मिळतात. तो पापांची जाणीव करून देतो व पश्चात्तापाचा आत्मा देतो. तो विश्वासणाऱ्यांचे जीवन आनंदी करतो.

 . अग्नी

मत्तय.:११ - तो पवित्र आत्म्याने व अग्नीने तुमचा बाप्तिस्मा करणार आहे.

अग्नी हीण जाळतो व शुद्ध करतो. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने विश्वासणाऱ्यांच्या जीवनातील दुर्गुण नष्ट होतात. जुन्या सवयी नष्ट होतात. अशा रीतीने त्यांचे जीवन शुद्ध होते.

४ वायु

योहान. : - वारा पाहिजे तिकडे वाहतो ...जो कोणी आत्म्यापासून जन्मला त्याचे असेच आहे.

वायु समर्थ आहे. तो आपल्याला दिसत नाही, तरी त्याची कार्ये दिसतात. त्याप्रमाणे पवित्र आत्मा अदृश्य आहे,तरी त्याची कार्ये आपल्या जीवनात होतात.

 . तेल

शमु. १६:१३ - मग शमुवेलाने तेलाचे शिंग हाती घेऊन त्याच्या भावांमध्ये त्यास अभिषेक केला.

पवित्र आत्मा सेवेसाठी अभिषेक करतो; ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी कृपा पुरवतो; अंतःकरण प्रकाशित करतो,सत्याचे प्रगटीकरण करतो आणि शारीरिक रोग बरा करतो.

७. पवित्र आत्म्याचे कार्य

पिता, पुत्र व पवित्र आत्मा मिळून कार्य करीत असतात, असे पवित्र शास्त्रातील शिक्षण आहे. यात प्रत्येकाचे विशिष्ट कार्य आहे. कारखान्यातील सर्व लोक एकाच प्रकारचे काम करीत नाहीत .ते भिन्न कामे करतात, तरी एकच विशिष्ट वस्तू किंवा पदार्थ तयार करणे,हा  त्यांच्या कामाचा हेतू असतो. त्रैक्य देवाच्या कार्याचा हेतू एकच असतो, तरी या कार्यात प्रत्येकाचा भाग वेगळा असतो. उदाहरणार्थ : पित्याने तारणाचा मार्ग आखला, पुत्र वधस्तंभावर मरण पावला आणि पवित्र आत्मा हे सत्य मनुष्याला पटवून देतो.

पवित्र आत्म्याचे जुन्या करारातील कार्य व नव्या करारातील कार्य यात वेगळेपण आहे. जुन्या कराराच्या काळात पवित्र आत्मा निवडक व्यक्तींमध्ये व निवडक प्रसंगी कार्य करीत असे. पेंटेकॉस्टपासून (पन्नासावा दिवस) तो ख्रिस्ताच्या मंडळीमध्ये वस्ती करून कार्य करतो.

शास्ते:३४ - परमेश्वराच्या आत्म्याने गिदोनाच्या ठायी संचार केला. १ शमु.१६:१४ - परमेश्वराचा आत्मा शौलास सोडून गेला. योहान.१४:१६ - म्हणजे सत्याचा आत्मा देईल,त्याने तुम्हाबरोबर सदासर्वदा राहावे.

स्तोत्र.५१:११ - आपला पवित्र आत्मा मजमधून काढून घेऊ नको, अशी प्रार्थना दावीद राजाने केली.

नव्या कराराच्या काळात अशी विनंती करण्याचे कारण नाही. कारण पवित्र आत्मा विश्वासणाऱ्यांमध्ये कायम वस्ती करून आहे.

 ८. पवित्र आत्म्याची कार्ये - जुन्या कराराच्या काळात

. उत्पत्तीमध्ये.

) विश्वात सुव्यवस्था करणे.

उत्पत्ती: - तेव्हा पृथ्वी आकारविरहित व शून्य होती, जलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता आणि देवाचा आत्मा जलावर तळपत राहिला होता.

) आकाश शोभिवंत करणे.

स्तोत्र.३३: - परमेश्वराच्या शब्दाने आकाश निर्माण झाले; त्याच्या मुखश्वासाने आकाशातील सर्व सैन्य निर्माण झाले (परमेश्वराचा मुखश्वास म्हणजे पवित्र आत्मा).

) पृथ्वीचा पृष्ठभाग पुन्हा नवीन करणे.

स्तोत्र. १०४:३० - तू आपला आत्मा पाठवतोस तेव्हा ते उत्पन्न होतात, तू पृथ्वीचा पृष्ठभाग पुन्हा नवा करितोस.

हे कार्य परमेश्वराच्या पवित्र आत्म्याकडून होते.

. मनुष्याला पापापासून वळविणे.

उत्पत्ती: - तेव्हा परमेश्वर म्हणाला, मनुष्य भ्रांत झाल्यामुळे माझ्या आत्म्याची त्याच्या ठायी सर्वकाळ सत्ता राहणार नाही.

पवित्र आत्मा मनुष्याला पापाची जाणीव करून देतो व त्याला पापापासून दूर होण्याची शक्तीही देतो.मनुष्याने हे ऐकले नाही, तर पवित्र आत्मा त्याच्यावर जबरदस्ती करीत नाही.

. मनुष्याला बुद्धी देणे.

ईयोब ३२. - पण मानवाच्या ठायी आत्मा असतो, सर्वसमर्थाचा श्वास त्यास बुद्धि देतो. मानवाच्या उत्पत्तीच्या वेळेस परमेश्वराने त्याच्या नाकपुड्यात जीवनाचा वास फुकल तेव्हा मनुष्य जीवधारी पाणी झाला (उत्पत्ती २:) इतर प्राणी उत्पन्न करीत असतान परमेश्वराने त्यांना त्याचा आत्मा दिला नाही. म्हणून त्यांना बुद्धी नाही. मनुष्य देवाच्या प्रतिरूपाचा निर्माण केला गेला म्हणून त्याला बुद्धी आहे.

4  सेवा करण्यासाठी मनुष्याला तयार करणे . निर्गम ३१:- - मी त्याला देवाच्या आत्म्याने परिपूर्ण करून अक्कल, बुद्धी, जन्म आणि सर्व प्रकारचे कसब दिले आहे.

सोने.रूपे व पितळ याची देवाच्या निवासमंडपासाठी कामे करण्यासाठी पवित्र आत्म्य त्यांना कला दिली.

. मनुष्याला प्रबल शक्ती देणे . शास्ते १५:१४ - इतक्यात परमेश्वराच्या आत्म्याने एकाएकी त्याच्यावर झडप घातले त्याच्या दंडांना बांधलेले दोर अग्नीने जळालेल्या तागासारखे झाले आणि त्याच्या हातांची बंधने गळून पडली. शमशोनाने केले ते सर्व पराक्रम पवित्र आत्म्याच्या शक्तीने झाले.

. निवडक व्यक्तींना प्रकटीकरण देणे.  यहे.: - आत्म्याने आकाश व पृथ्वी यांच्या दरम्यान मला उचलून नेऊन दिव्य दृष्टीन यरुशलेम येथे....आणले.

पवित्र आत्म्याच्या शक्तीने यहेज्केलला पुढील काळाचा दृष्टान्त झाला. त्याचा संदेश सांगण्यासाठी संदेष्ट्यांना आत्म्याच्या द्वारे देवाचे प्रकटीकरण प्राप्त होत असे.ते आत्म्याच प्रेरणेने देवाचा संदेश देत असत (२ पेत्र.:२१).

पवित्र शास्त्राच्या संबंधाने पवित्र आत्म्याची कार्ये

पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने पवित्र शास्त्र लिहिले गेले. आजही पवित्र आत्म्याची पवित्र शास्त्रासंबंधाने कार्ये चालूच आहेत.

. तो पवित्र शास्त्रातील सत्य स्पष्ट करून सांगतो.   योहान.१४:२६ - तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हांला सर्व काही शिकवील.

            पवित्र आत्मा देवाचे वचन मनुष्याला समजावून सांगतो व त्याचे सत्य पटवून आपण पवित्र शास्त्र वाचतो, तेव्हा ते आपल्याला बौद्धिक पातळीवर समजते. परंतु आपण पवित्र आत्म्याच्या साहाय्याने तेच पवित्र शास्त्र वाचतो, तेव्हा ते देवाचे वचन आहे व सत्य आहे याची जाणीव होते. पवित्र आत्म्याच्या साहाय्याविना आपल्याला पवित्र शास्त्रातील काही गोष्टी समजणार नाहीत, कारण त्या मानवी बुद्धीपलीकडच्या आहेत. देवाच्या गोष्टी देव-पवित्र आत्मा मनुष्याला सांगतो.

. तो अंत:करण प्रकाशित करतो .

इफिस. :१७ ते १९ -..... म्हणजे त्यामुळे तुमचे अंत:चक्षु प्रकाशित होऊन ... ,१ करिंथ.:१० ते १२ - परंतु देवाने ते आत्म्याच्या द्वारे आपल्याला प्रकट केले,

कारण आत्मा हा सर्व गोष्टींचा व देवाच्या गहन गोष्टींचाही शोध घेतो.

पवित्र आत्म्याची कार्ये - नव्या कराराच्या काळात ,

नव्या कराराच्या काळात पवित्र आत्मा जगामध्ये, ख्रिस्ताच्या मंडळीमध्ये आणि विश्वासणाऱ्यांमध्ये कार्य करतो.

. पवित्र आत्म्याचे जगातील कार्य,

 ) परमेश्वराचा हेतू सिद्धीस जावा म्हणून पवित्र आत्मा जगातील दुष्टाईवर बंधन घालतो  .२ थेस्सल.: - अनीतीचे रहस्य आताच आपले कार्य चालवीत आहे. परंतु जो आता प्रतिबंध करीत आहे तो मधून काढला जाईपर्यंत प्रतिबंध करीत राहील.

जगातील दुष्टाईचा परिणाम आपल्याला सर्वत्र दिसतो, तरी परमेश्वर देव आपला हेतू सिद्धीस नेत आहे.

) पाप, धार्मिकता व न्यायनिवाडा यांविषयी तो जगाची खात्री करतो.  योहान.१६: - तो येऊन पापाविषयी,नीतिमत्त्वाविषयी व न्यायनिवाड्याविषयी जगाची खात्री करील. पवित्र आत्मा पापांचा दोष प्रकट करतो ख्रिस्ताचा वधस्तंभ हा पापाचा न्याय आहे (योहान.१६:११). पापांची जाणीव, देवाची पवित्रता, न्यायनिवाडा या गोष्टींची खातरी पवित्र आत्मा पापी माणसाला पटवून देतो. गोष्टींची खातरी पटली तरच माणसाला तारणाची जरुरी भासते.

) तो सत्याची साक्ष देतो.

योहान. १४:२६ - असा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो मजविषयी साक्ष देईल. पवित्र आत्मा ख्रिस्ताविषयी साक्ष देण्यासाठी देवाचे वचन व विश्वासणाऱ्यांची साल यांचा उपयोग करतो व ख्रिस्ताविषयीची सत्ये मनुष्याला पटवून देतो.

.मंडळीमधील कार्य,

 ) त्याने मंडळीची स्थापना केली.

प्रेषित. :१ ते ४ ही वचने वाचा. पेंटेकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्मा उतरला आणि त्याच दिवशी ख्रिस्ताचे शरीर म्हणून मंडळीची स्थापना झाली (इफिस.:२२,२३).

) तो मंडळीमध्ये वस्ती करतो.

करिंथ.:१९ - तुमचे शरीर,तुम्हांमध्ये वसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हांल मिळाला आहे त्याचे मंदिर आहे,हे तुम्हांस ठाऊक नाही काय?

) तो सत्यात  नेतो .  योहान.१६:१३ - सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो तुम्हांस मार्ग दाखवून सत्यात नेईल. देवाचे प्रकट केलेले सत्य पवित्र आत्मा कळवतो.

 ) तो मार्गदर्शन करतो.

प्रेषित.१५:२८ - पुढे दिलेल्या जरुरीच्या गोष्टींशिवाय तुम्हांवर जास्त ओझे लादू नये असे पवित्र आत्म्याला व आम्हांला योग्य वाटले.

ज्या विदेशी (म्हणजे यहूदीतर) लोकांनी विश्वास ठेवला त्यांनी कोणत्या गोष्ट पाळाव्यात, हे ठरविताना पवित्र आत्म्याने प्रेषित व वडीलवर्ग यांना मार्गदर्शन केले त्याप्रमाणे याकोबाने हे पत्र लिहिले.

) लोकांना पाचारण करून तो ख्रिस्ताच्या मंडळीची पूर्णता करतो.

प्रेषित. १५:१४ ते १८ - परराष्ट्रीयांतून आपल्या नावाकरिता काही लोक काढून घ्यावे म्हणून ...ज्या राष्ट्रांना माझे नाव देण्यात आले आहे त्या सर्वांनी प्रभूचा शोध करावा,हे। त्याला युगादिपासून माहीत आहे ते करणारा प्रभु असे म्हणतो.

परमेश्वर पवित्र आत्म्याच्या द्वारे सर्व राष्ट्रांतून लोकांना पाचारण करून ख्रिस्ताची मंडळी पूर्ण करीत आहे.

 मंडळीमध्ये देवाची सेवा करण्यासाठी पवित्र आत्मा दाने देतो.

Gifts-of-the-holy-spirit_पवित्र-आत्म्याची-कृपादाने-
Gifts-of-the-holy-spirit_पवित्र-आत्म्याची-कृपादाने-

 रोम.१२:-;१ करिंथ.१२:-११,२८-३१ कार्याचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी सर्वांत सर्व कार्ये करणारा देव एकच आहे. तथापि आत्म्याचे प्रकटीकरण सार्वजनिक हितासाठी एकेकाला होते. कारण एखाद्याला आत्म्याच्या द्वारे ज्ञानाचे वचन मिळते; एखाद्याला त्याच आत्म्यानुसार विद्येचे वचन; एखाद्याला त्याच आत्म्यात4 विश्वास; एखाद्याला त्याच एका आत्म्यात निरोगी करण्याची कृपादाने;  एखाद्याला अद्भुत कार्ये करण्याची शक्ती; एखाद्याला संदेश देण्याची शक्ती; एखाद्याला आत्मे ओळखण्याची शक्ती; एखाद्याला विशेष प्रकारच्या भाषा बोलण्याची शक्ती व एखाद्याला भाषांचा अर्थ सांगण्याची शक्ती मिळते;

            तरी ही सगळी कार्ये तोच एक आत्मा करतो, तो आपल्या इच्छेप्रमाणे एकेकाला ती वाटून देतो.

. विश्वासणाऱ्यांमध्ये कार्य .

पवित्र आत्मा विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये अनेक कार्ये करतो. जसे त्याच्या कार्याशिवाय तारणप्राप्ती होत नाही, तसे त्याच्या साहाय्याशिवाय ख्रिस्ती जीवन जगणे शक्य नाही.

) तो मनुष्याची पापातून व मरणातून सुटका करतो.

रोम.: - ख्रिस्त येशूमधील जीवनाच्या आत्म्याचा जो नियम त्याने तुला पाप व मरण ह्यांच्या नियमापासून मुक्त केले आहे. पापाचे वेतन मरण आहे. मनुष्याला मरण चुकविता येत नाही. केवळ पवित्र आत्माच त्याची त्यापासून सुटका करू शकतो.

) तो मनुष्यास देवाचा पुत्र होण्याचा हक्क देतो.   रोम.:१४ - जितक्यांना देवाचा आत्मा चालवित आहे तितके देवाचे पुत्र आहेत.

पवित्र आत्म्याने कार्य केल्याशिवाय देवाचा पुत्र होण्याचा हक्क मिळत नाही. हा केवळ विश्वासणाऱ्यांचा हक्क आहे.देवाचा पुत्र होण्यासाठी प्रथम मनुष्याचे तारण झाले पाहिजे.

) तो मनुष्याच्या ठायी     आत्म्याचे फळ    निर्माण करतो.   गलती.:२२,२३  आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ, प्रीती, आनंद, शांति, सहनशीलता,ममता, चांगुलपणा,विश्वासूपणा,सौम्यता,इंद्रियदमन हे आहे.

Fruits-of-the-holy-spirit_पवित्र-आत्म्याची-फळे-
पवित्र-आत्म्याची-फळे

पवित्र आत्म्याच्या कार्याशिवाय हे गुण मनुष्यामध्ये निर्माण होत नाहीत, कारण ते मानवी स्वभावाच्या विरुद्ध आहेत. हे गुण उत्तम आहेत, असे सर्वजण कबूल करतील, पण आत्म्याच्या कार्याशिवाय त्यांना त्याप्रमाणे वागता येत नाही.

 ) तो प्रार्थना करावयास शिकवतो .  रोम. :२६ - आत्माही आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो. कारण आपण यथायोग्य प्रार्थना कशासाठी केली पाहिजे हे आपल्याला ठाऊक नाही; पण आत्मा स्वतः अनिर्वाच्य कण्हण्याने मध्यस्थी करितो.

पवित्र आत्मा आपल्याला प्रार्थनेची प्रेरणा देतो व प्रार्थना कशी करावी, काय मागावे हे सुचवतो.

 अधिक प्रार्थने विषयी वाचण्यासाठी क्लिक करा   👉  देवासोबत वेळ घालवणे

) तो मार्गदर्शन करतो.  प्रेषित. १६:, - ... त्यांना पवित्र आत्म्याकडून प्रतिबंध झाल्यामुळे येशूच्या आत्म्याने त्यांस जाऊ दिले नाही.

देवाचे वचन, इतरांचा सल्ला, उपदेश व परिस्थिती या गोष्टींचा उपयोग करून पवित्र आत्मा विश्वासणाऱ्यांना मार्गदर्शन करतो.

) तो मर्त्य शरीरे जिवंत करतो.

रोम. :११ - ज्याने येशूला मेलेल्यातून उठविले त्याचा आत्मा जर तुम्हांमध्ये वसति करितो, तर ज्याने ख्रिस्त येशूला मेलेल्यांतून उठविले तो तुम्हांमध्ये वसति करणाया आपल्या आत्म्याने तुमची मर्त्य शरीरेहि जिवंत करील.

येशू ख्रिस्त मेलेल्यातून उठला म्हणून विश्वासणारेही उठतील,हे पवित्र आत्म्याचे कार्य आहे.

 ) तो मनुष्याचे पवित्रीकरण करतो.

थेस्सल.:१३-...कारण आत्म्याच्या द्वारे होणाऱ्या पवित्रीकरणात व सत्यावरच्या विश्वासात देवाने तुम्हांस प्रथम फळ म्हणून तारणासाठी निवडले आहे.

एवढ्यानेच पवित्र आत्म्याची कार्ये संपली असे नाही. पवित्र आत्मा विश्वासणाऱ्याच्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात कार्य करतो. पवित्र आत्म्याच्या मदतीशिवाय आपल्याला पवित्र शास्त्र समजत नाही. देवाचे सत्य पटत नाही. त्याच्या आज्ञा पाळण्यास सामर्थ्य मिळत नाही व स्वर्गात पोहोचण्याची आशा नाही.

४.  पवित्र आत्म्याविरुद्ध पाप करणे .

१.   माणसांच्या आढ्यतेमुळे पवित्र आत्म्याची निंदा होते.   

पवित्र आत्म्याची निंदा या पापाची क्षमा नाही (मत्तय.१२:३१,३२).

२.     माणसांच्या गर्वामुळे पवित्र आत्म्याचा अपमान होतो.

इब्री. १०:२९ - तर त्याने देवाच्या पुत्राला पायांखाली तुडविले, जेणेकरून तो स्वतः पवित्र झाला होता. ते “कराराचे रक्त” ज्याने अपवित्र मानले आणि कृपेच्या आत्म्याचा अपमान केला तो किती अधिक दंडास पात्र ठरेल म्हणून तुम्हांस वाटते?

पवित्र आत्मा पापी व्यक्तीसमोर ख्रिस्ताचे प्रायश्चित्ताचे कार्य सादर करतो. जर पापी व्यक्तीने त्यावर विश्वास ठेवण्याचे किंवा स्वीकारण्याचे नाकारले, तर त्याद्वारे तो पवित्र आत्म्याचा अपमान करतो.

३.     माणसांच्या अवज्ञेमुळे पवित्र आत्मा खिन्न होतो.

यशया ६३:,१० - तरी त्यांनी बंड केले व त्याच्या पवित्र आत्म्यास खिन्न केले

४.     माणसांच्या अविश्वासामुळे पवित्र आत्म्याला विरोध होतो.

प्रेषित.:५१ - तुम्ही तर पवित्र आत्म्याला सदा विरोध करिता; जसे तुमचे पूर्वज तसेच तुम्हीही.

आम्ही देवाच्या वचनाविषयी जेव्हा शंका घेतो तेव्हा आम्ही पवित्र आत्म्याला विरोध करतो.

५.    माणसांच्या लबाडीमुळे पवित्र आत्म्याची परीक्षा पाहिली जाते.

प्रेषित.:१ ते ९- प्रभूच्या आत्म्याची परीक्षा पाहण्यास तुम्ही संगनमत का केले

आपल्या बांधवांसमोर जेव्हा एखादी व्यक्ती आपण देवाला पूर्णपणे समर्पित असल्याचे ढोंग करते,परंतु प्रत्यक्षात मात्र गुप्तपणे स्वतःचे पाप कुरवाळीत राहून देवाला नाकारते,तेव्हा ती व्यक्ती ह्या पापाविषयी अपराधी असते.

राजे ५:२५ ते २७ - गेहजीने लबाडी केली आणि त्याला शिक्षा म्हणून कुष्ठरोग झाला. पवित्र आत्म्याशी कधीही लबाडी करू नका.

६.     माणसांच्या पूर्वग्रहामुळे पवित्र आत्मा विझतो.

थेस्सल.:१९,२० - “आत्म्याला विझवू नका” ही गंभीर आज्ञा आहे.

७.    माणसांच्या असभ्यतेमुळे पवित्र आत्मा खिन्न होतो.

इफिस.:३० -आत्म्याला खिन्न करू नका तुम्ही त्या आत्म्याच्या योगे मुद्रित झाला आहा.

पवित्र आत्मा व्यक्तीप्रमाणे कामे करतो एवढेच केवळ नव्हे, तर त्याला व्यक्तीप्रमाणे वागणूक मिळते.

. पवित्र आत्म्याचा अपमान होतो.

 इबी.१०:२९-...आणि कृपेच्या आत्म्याचा अपमान केला.

 . पवित्र आत्म्याशी लबाडी केली जाते.

 प्रेषित.:- तेव्हा पेत्र म्हणाला, हनन्या,तू पवित्र आत्म्याशी लबाडी करावी ...

. पवित्र आत्म्याला दुखवतात व त्याच्याविरुद्ध बंड करतात .

यशया ६३:१० - तरी त्यांनी बंड केले व त्याच्या पवित्र आत्म्यास खिन केले.

आत्मा शक्ती नव्हे, तर व्यक्ती आहे,ही खात्री पवित्र शास्त्राच्या आधाराने बाळगणे बरोबर आहे.

 

 

 

 

Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url