राखेचा बुधवार म्हणजे काय ? What is Ash Wednesday?

 राखेचा बुधवार Ash Wednesday

Ash Wednesday

Ash Wednesday

What is Ash Wednesday?

राखेचा बुधवार म्हणजे काय ?  

 लेंथ समयातील  म्हणजेच ४० दिवस उपवासाचा  पहिला बुधवार यास राखेचा बुधवार म्हणतात. या उपवासाची सुरवात राखेचा बुधवारपासून सुरू होते आणि इस्टर रविवारने समाप्त होते. या उपवासाचा कालावधी चौथ्या शतकात रविवार वगळून  ४० दिवस स्थापित केला.

राखेचा वापर

राखेचा बुधवार हा लेंथ समयचा पहिला दिवस आहे. या दिवशी  राखेचा उपयोग कपाळावर क्रॉसच्या चिन्हाच्या आकारात राख लावली जाते . या प्रथेमुळे या दिवसास " राखेचा दिवस " ​​असेही म्हटले जाते. याची सुरवात ही नेहमीच इस्टरच्या आधी ४० दिवस बुधवारने होते. या ४० दिवसामध्ये रविवारची गणना करत नाही .याची सुरवात  राखेचा गुरुवारकिंवा राखेचा सोमवार असे कधीच होत  नाही . बायबलमध्ये कोठेही राखेचा बुधवार असा उल्लेख आढळत नाही  या कारणात्सव  लेंथ चा ही उल्लेख केलेला नाही.

लेंथ समय पाळण्याची पद्धत  During Lent 

Ash-Wednesday-2021

Ash Wednesday

या काळात  व्यक्तीच्या कपाळावर क्रॉसचे चिन्ह  काढण्याची परंपरा आहे. या कृतीस  कपाळावर क्रॉसचे चिन्ह  काढणारा व्यक्ती हा येशू ख्रिस्ताशी समर्पित आहे असे मानली जाते.

लेंथ  समयात ४० दिवस उपवास करतात आणि या कालवधीत  स्व:नकार, संयम, मटन वर्ज्य करतात आणि पापी कृत्य आणि सवयींचा त्याग करतात तसेच पायात चप्पल किंवा बूट वापरणे त्यागतात , दाढी करणे ,  वाढदिवस साजरा करणे , लग्न जमवने किंवा करणे तसेच  यासारखे  आनंदउत्सव साजरा करणे टाळतात .  या दिवसात अधिक आध्यात्मिक राहाण्याचा प्रयत्न करतात . खोटे बोलणे , टीव्ही बघणे टाळतात , या दरम्यान धूम्रपान सोडतात.  हे राखेचे दिवस आणि लेंथ समय  शक्यतो कॅथोलिक आणि काही प्रोटेस्टंट संप्रदाय पाळतात  .

 परंतु पवित्रशास्रामध्ये राखेचा बुधवार हा उल्लेख आढळत नाही, तथापी  जुन्या करारात लोक पश्चात्ताप किंवा शोक करण्याचे प्रतीक म्हणून माती व राख वापरल्याचे आढळते .

दानीएल९;३-हे जाणून मी आपले मुख प्रभू देवाकडे लावून प्रार्थना, विनवण्या, उपास, गोणताट नेसणे व अंगावर राख उधळणे हे चालू केले,

२ शमुवेल१३:१९- तामारेने आपल्या डोक्यात राख घातली, आपल्या अंगावरचा पायघोळ झगा फाडून टाकला व डोक्यावर हात ठेवून वाटेने ती रडत ओरडत चालली.

 एस्तेर ४:१ -हे वर्तमान मर्दखयाच्या कानी पडले तेव्हा त्याने आपली वस्त्रे फाडली, गोणपाट नेसून राख फासली आणि नगराच्या मध्यभागी जाऊन मोठ्याने आक्रंदन केले.

 ईयोब २:८ - ईयोबाने आपले अंग खाजवण्यासाठी एक खापरी घेतली; आणि तो जाऊन राखेत बसला.

विश्वासनार्यानी राखेचा बुधवार पाळावा किंवा नाही  ?  

बायबलमध्ये  कोठेही या परंपरेचे स्पष्टपणे आज्ञा दिलेली  नाही किंवा निषेध ही करत नाही म्हणून राखेचा बुधवार पाळवा की नाही, प्रार्थनापूर्वक हा निर्णय घेण्यास वैयक्तिक स्वातंत्र्य आहे.

परंतु  जर तुम्ही राखेचा बुधवार किंवा लेंथ  समय पाळू इच्छिता तर बायबलमधून यास दुजोरा  मिळतो कि नाही हे पडताळणे गरजेचे आहे . प्रभू येशू आपल्याला उपवासाचे प्रदर्शन करण्याविषयी ताकीद देतो . तुम्ही जेव्हा उपास करता तेव्हा ढोंग्यासारखे म्लानमुख होऊ नका, कारण आपण उपास करत आहोत असे लोकांना दिसावे म्हणून ते आपली तोंडे विरूप करतात. मी तुम्हांला खचीत सांगतो की, ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत.तू तर उपास करतोस तेव्हा आपल्या डोक्याला तेल लाव, व आपले तोंड धू; अशा हेतूने की, तू उपास करत आहेस हे लोकांना नव्हे, तर तुझ्या गुप्तवासी पित्याला दिसावे, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला उघडपणे प्रतिफळ देईल. मत्तय :६-१६-१८” आपणास कधीही आध्यात्मिकतेचा गर्व होऊ देऊ नये.

            पापी कृत्यांबद्दल पश्चात्ताप करणे ही चांगली गोष्ट आहे. जेव्हा आपणास आपल्या पापी सवयींबद्दल पश्चात्ताप होतो तेव्हा देवाला आनंद होतो लूक १५:७. परंतु ही कृती नेहमी घडयाला हवी केवळ राखेचा बुधवार किंवा लेंथ  समयात नाही . देवाच्या कृपेने पश्चात्तापाची संधी मिळते म्हणून सतत पापात राहणे, ही ख्रिस्ती त्वाची ओळख  नाही . म्हणून स्वत: ला स्पष्टपणे ओळखून पापक्षमेची खात्री करून घ्यावी . हे लक्षात घ्या की कोणत्याही कर्मकांडामुळे कोणीही देवासमोर नीतिमान ठरू शकणार नाही . कारण पवित्राशास्र आपणास स्पष्ट सांगते कि,

“कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर हे देवाचे दान आहे ; कोणी आढ्यता बाळगू नये म्हणून कर्मे केल्याने हे झाले नाही. इफिस २;८,९”

अधिक वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा .  लेंटविषयी गैरसमज 


Next Post Previous Post
7 Comments
  • Pa.Balu Waghmare
    Pa.Balu Waghmare १७ फेब्रुवारी, २०२१ रोजी ८:४७ AM

    Thank u so much for blessed word of God about Ash wednesday..

  • Unknown
    Unknown १७ फेब्रुवारी, २०२१ रोजी १०:४३ AM

    खूप ऊपयूक्त माहीती.

  • Unknown
    Unknown १६ जुलै, २०२१ रोजी ८:२१ AM

    PRAISE THE LORD
    अतिशय सुंदर, आणि सोपी उत्कृष्ट शब्द रचना "राखेचा दिवस नेमका काय?" बायबल या बाबतीत काय शिकवत ? आणि "खरा पश्चताप म्हणजे काय ?"

  • Pa.Balu Waghmare
    Pa.Balu Waghmare १६ जुलै, २०२१ रोजी ९:३२ AM

    Thank u Pastor for your valuable teaching which is so meaningful..

  • Unknown
    Unknown २८ फेब्रुवारी, २०२२ रोजी ११:२१ AM

    उपवास कसा करावा येशुने सांगितले उपवासात पवित्र मंदिरात गेलेच पाहिजे का?

  • Pa.Balu Waghmare
    Pa.Balu Waghmare २३ मार्च, २०२२ रोजी १०:३४ AM

    It's real truth from the this teaching on Ash Wednesday..

  • सुरेंद्र शा. चोपडे
    सुरेंद्र शा. चोपडे १२ एप्रिल, २०२२ रोजी ३:११ PM

    आजपर्यंत राखेचा बुधवार का पाळला जातो हे खरोखर माहीत नव्हते. हा राखेचा बुधवार जवळपास सर्वच ख्रिस्ती पंथ पाळतात. ही माहिती अतिशय उपयुक्त होती.

Add Comment
comment url