ईस्टर संडे म्हणजे काय? Easter Sunday

ईस्टर संडे म्हणजे काय? 

Easter Sunday

Easter Sunday images

Easter Sunday


Easter Sunday

ईस्टर संडे काय आहे याबद्दल काही ख्रिस्ती लोकामध्ये खूप गोंधळ आहे. काहींसाठीइस्टर संडे हा इस्टर बनी (ससा) आणि रंगीत ईस्टर अंडी आहे. बहुतेक लोकांचा समज आहे कीइस्टर संडेचा येशूच्या पुनरुत्थानाशी काहीतरी संबंध आहेपरंतु पुनरुत्थानाचा इस्टर संडे, अंडी आणि इस्टर बनी(ससा) यांच्याशी नेमका काय संबंध आहे याबद्दल ते अज्ञानी आहेत.

Origin of Ester Sunday ईस्टरचा उगम

खरे बघितले असता पावित्रशास्रामध्ये , येशू ख्रिस्ताचे पुनरुत्थान आणि ईस्टर संडेशी संबंधित असलेली रूढी परंपरा यांच्यात कोणताही संबंध नाही. जर ईस्टर संबंधित पार्श्वभूमी बघितली तर हे आपल्या लक्ष्यात येईल कि, ख्रिस्ती धर्म हा गैर-ख्रिश्चनांसाठी अधिक आकर्षक बनवण्यासाठीप्राचीन रोमन कॅथलिक चर्चने येशूच्या पुनरुत्थानाचा उत्सव आणि वसंत ऋतूतील प्रजनन विधींचा समावेश असलेल्या उत्सवांचे मिश्रण केले आहे . या वसंत ऋतु प्रजनन विधी उत्सवांचे उगमस्थान हे अंडी व ससा रूढी-परंपरांचे पासून आहेत.

बायबल स्पष्ट करते की आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच  रविवारी येशूचे पुनरुत्थान झाले. (मार्क 16:2,9; लूक 24:1)  येशूचे पुनरुत्थान साजरा करणे हे रास्त आहे (करिंथ 15 पहा). येशूचे पुनरुत्थान रविवारी साजरे करणे रास्त असले तरीज्या दिवशी येशूचे पुनरुत्थान साजरे केले जाते त्या रविवारला इस्टर म्हणून संबोधले जाऊ नये. कारण रूढी-परंपरानुसार असलेला इस्टरसंडे या दिवसाचा येशूच्या पुनरुत्थानदिनाशी काहीही संबंध नाही.
परिणामीअनेक ख्रिश्चन विश्वासणार्याचे मत असे आहे की, आपण ज्या दिवशी येशूचे पुनरुत्थान साजरे करतो तो दिवसास "इस्टर संडे" Easter Sunday म्हणून संबोधला जाऊ नये. तर उलट, "पुनरुत्थान रविवार" Resurrection Day  यास  बायबलआधारित असा साजरा करावा.

easter sunday images इस्टर बनी, इस्टर अंडी  

ईस्टर संडे म्हणजे काय?

येशूच्या पुनरुत्थानाच्या ऐवजी “इस्टर अंडी किंवा इस्टर बनी” या रूढी-परंपरेस महत्व देणेतसेच मोबाईल मध्ये easter sunday images ठेवणे हे मूर्तीपूजा आहे . या दिवसात सैतान वेगवेगळ्या माध्यमातून तारण पावलेल्यांची फसवणूक करत आहे. पावित्रशास्रामध्ये “इस्टर अंडी किंवा इस्टर बनी” यांचा कोठेही उल्लेख नाही.  ख्रिस्ती विश्वासाणार्यांनी अशा सर्वप्रकारच्या मुर्तीपुजेपासून दूर असावे. परमेश्वर देव अशा गोष्टींचा तिटकारा करतो.

या दिवशी येशूचे मेलेल्यांतून पुनरुत्थान झाले आणि त्याचे पुनरुत्थान हे दर्शवते. येशूला आपला तारणहार म्हणून स्वीकारण्याद्वारे आपल्याला स्वर्गात सार्वकालिक जीवन प्राप्त होते .

येशूचा मृत्यू व पुनरुत्थान  याद्वारे आपणास तारण कसे प्राप्त होते. याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठीकृपया पुढील लेख वाचा: 

 नवजीवन जीवन

 राखेचा बुधवार म्हणजे काय ?

वधस्तंभावरील सात शब्द

Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url