Sadhu Sunder Singh biography in marathi

                                    रक्ताळलेल्या पायांचा प्रेषित

sadhu-sunder-singh-biography-in-marathi
sadhu-sunder-singh

                   साधु सुंदर सिंह १८८९-१९२

कडाक्याची थंडी पडली होती. साधु सुंदर सिगांच्या अंगावर पातळ कपडे असल्याने त्यांचे शरीर त्या थंडीने सलत होते. काटेकुटे व दगडधोंडयांनी त्यांचे अनवानी पाय जखमी केले होते. तरी देखील ते बर्फाच्छादीत डोंगरदऱ्यातून मार्गक्रमण करीत होते. त्यांच्या पायांतून ओघळणारे रक्त बर्फावर लाल ठसे उमटवित होते. पायांना मलमपट्टी करीत असतांना त्यांच्या मागून एक माणूस येत होता. त्याने सुंदर बरोबर बोलण्यास सुरूवात केली.तुम्ही कसे आहात?" त्याने विचारले, माझ्या आश्चर्यकारक तारणकर्ता येशूप्रभूमध्ये मी अगदी आनंदात आहे.सुंदर सिंगानी उत्तर दिले.

sadhu-sunder-singh
sadhu-sunder-singh

जेंव्हा त्याने विचारले, “तुम्ही रक्ताळलेल्या अनवाणी पायांनी हया डोंगरावरून का चालत आहात ?" त्यांनी उत्तर दिले, “त्या येशू ख्रिस्ताचे पाय जे क्रुसावर रक्ताळलेले होत ते लोकांना दाखविण्यासाठी." सुंदर सिंगाचा हा विश्वास होता की, त्याला जो ख्रिस्त क्रुसखांबावर टांगलेला होता, त्याच्याकरिता दुःख सोसण्यासाठी देवाने पाचारण केलेले आहे आणि त्याचे शुभवर्तमान तिबेट सारख्या देशामध्ये घेऊन जाऊन तेथील लोकांना सांगण्यासाठी देवाने मला बोलाविले आहे.

सुंदरसिंग एक लहान मुलगाः

साधु सुंदरसिंग, असं ज्याला म्हटलं जायचं त्यांचा जन्म पंजाब प्रांतातील रामपूर नावाच्या गावांमध्ये ३ सप्टेंबर १८८९ मध्ये झाला. त्यांचे आईवडील शीख होते. सुंदरची आई फार धार्मिक स्त्री होती. ती दररोज सकाळी उठल्याबरोबर सुंदरला अध्यात्मिक अन्न व आशिर्वादांसाठी प्रार्थना करायला भाग पाडायची. त्यानंतरच त्याला न्याहारी करता येत होती. सुंदरची आई सुंदरवर खुप प्रेम करायची. सुंदरने त्याच्या धर्मावर प्रेम करून एक साधु बनावे असे तिला वाटत होते. सुंदरने त्याच्या फार लहान वयातच हिंदू धर्माचे पवित्र ग्रंथ  भागवत गीता वाचायला सुरूवात केली. तो सात वर्षांचा चिमुरडा बालक असतांनाच भगवत् गिता मुखोत्गत केली होती. त्याच्या प्रियत्तम मित्राच्या निधनामुळे सुंदरला इतर धर्मियाचे धर्मग्रथ वाचायला भाग पाडले होते. रात्रीच्या वेळी जेंव्हा सवजण झोपून जात तेंव्हा तो शिखांचे पवित्र ग्रंथगुरू ग्रहन्द", हिंदूचे वेद व मुस्लीमाचे कराण यांचा फार काळजी पूर्वक अभ्यास करीत असे. इतर अनेकांप्रमाणे त्याला सध्दा जीवंत ख्रिस्त भेटला होता.

     जेंव्हा सुंदर त्याच्या गावातील ख्रिस्ती शाळेत जाऊ लागला. तेव्हा त्याची व ख्रिस्ती धर्मप्रणालीची गाठ पडली. जेव्हा जेव्हा त्या शाळेमध्ये त्याला बायबल वाचायला सांगत तेंव्हा तेंव्हा तो फार दुराग्रही असल्याची भूमिका घेत असे. एकदा तर त्याने बायबल मधील नव्या कराराची पाने सर्वांदेखत फाडून टाकली होती. ख्रिस्ती धर्म प्रतिकार करणाऱ्या विद्यार्थ्यांचा तो नेता झाला. मग त्याने ती ख्रिस्ती शाळा सोडून दिली. तो सरकारी शाळेत दाखल झाला आणि ख्रिस्ती विश्वासाची विटंबना करण्याचे काम चालू ठेवले. सार्वजनिक जागेत शुभवर्तमान प्रचार करणाऱ्या मिशनरी सेवकांवर चिखल फेकण्यास व दगडमार करण्यास इतरांना चिथवून दिले. बायबलमधील नवा करार त्याने सर्वांसमोर जाळून भस्म केला. परंतू जितका ख्रिस्ताचा विरोध त्याने केला तितकाच त्रास त्याला सोसावा लागला. शेवटी त्याने बायबल वाचायला सुरूवात केली.

एके दिवशी भल्या पहाटे ३ वाजता सुंदर जागा झाला आणि त्याने शांति शोधण्याचे ठरविले आणि जर शांति मिळाली नाही तर त्याच्या घराजवळून जाणाऱ्या रेल्वेगाडी खाली जीवनाचा शेवट करण्याचे त्याने ठरविले. त्यानी आंघोळ केल्यावर प्रार्थना केली, जर देव असेल तर त्याने मला दर्शन द्यावे, मला शांति देऊन मुक्तीचा मार्ग दाखवावा." आणि अचानक त्याने त्याच्या खोलीमध्ये मोठा प्रकाश पाहिला त्या प्रकाशात त्याला जीवंत ख्रिस्त दिसला, ज्याचा द्वेष तो करीत होता. ख्रिस्ताने आपले खिळलेले हात त्याला दाखवित म्हटलेतू  माझा छळ का करतोस  ? मी तुझा तारणारा आहे.त्याच क्षणाला सुंदरचं हृदय आनंदानं भारावून गेलं. त्याची अध्यात्मिक तहान भागलेली होती याची त्याला जाणीव झाली. त्याचं संपूर्ण जीवन बदललं. जे लोक त्याच्याबद्दल संभ्रमात होते त्यांना त्याच्या तेजस्वी अनुभवामुळे हार पत्करावी लागली.

 छळ होण्यासाठीचे पाचारण:

     या अनुभूतीनंतर लगेचच सुंदरने आपण ख्रिस्ती झाल्याचे आपल्या वडिलांना सांगितले. त्याच्या या निर्णयाला घरातून तीव्र विरोध झाला . त्याच्या वडिलांनी त्याला कळकळीची विनंती केली की, त्याने आईचा धर्म सोडून देऊन सर्वांना अपमानीत करू नये. त्याच्या धनाढय काकाने तर त्याला त्याच्या घरी नेले व त्यांच्यापाशी असलेला सर्व पैसा, मोलवान माणिक रत्ने त्याला दाखवून म्हटले, “जर तू नवीन विश्वासाचा त्याग करशील तर मी हे सर्व तुला देईन.परंतू येशूची महान प्रिती सुंदरच्या अंतःकरणात खोल रूजलेली असल्यामुळे तो ख्रिस्ताला नाकारू शकला नाही. त्याला त्याच्या विश्वासामुळे  घरातून हाकलून लावले. त्याने ती रात्र अन्न पाणी व निवाऱ्या शिवाय एका झाडाखाली घालविली. नंतर त्याला घरी जाण्याची मोकळिक मिळाली. परंतू त्याला घराबाहेरील जागेमध्ये जेवण दिले जात असे. तसेच त्याला नीच जातीच्या लोकांबरोबर राहावयास व झोपावयास सांगण्यात आले होते. सुंदरने हे सर्व त्याच्या प्रभूकरिता आनंदाने सहन केले. हीच क्रुसाच्या अनुभवाला तोंड देण्याची त्याची सुरूवात होती. शेवटी घरच्यानीच सुंदरला विष चारून त्याला घराबाहेर हाकलून लावले. तो फार आजारी पडला आणि मृत्यू शय्येवर होता परंतू प्रभूने त्याचे महान कार्य सिध्द करण्यासाठी त्याला अद्भुतरीत्या मृत्यूपासून वाचवले..

sadhu-sunder-singh
sadhu-sunder-singh

विषबाधेतून पूर्ण बरे झाल्यानंतर तो लुधियाना येथे गेला. तेथे मिशनऱ्या सोबत राहून त्याने बायबलचा अभ्यास केला. मग त्याच्या १६ व्या वाढदिवशी त्याने सिमला येथे बात्पिस्मा घेतला. खुप विचारपूर्वक व भरपूर प्रार्थना पूर्वक त्याने स्वतःला ख्रिस्ताच्या हवाली करून ख्रिस्ती साधुचे जीवन जगण्यास समर्पित केले. त्याने त्याच्या चीजवस्तू व पुस्तके दुसऱ्यांना वाटून दिली . मग साधूचा वेष धारण करून अनवाणी पायांनी नवा करार हातात घेऊन कोणत्याही माणसाची मदतीशिवाय सुंदर त्याच्या प्रभूची सेवा करण्यासाठी निघाला.  तो म्हणत असे की, मला प्रभू येशू ख्रिस्त हयाच्या शिवाय कशाचाही अभिमान बाळगणे माझ्या हातून न होवो. जग मला वधस्तंभावर खिळलेले आहे व मी जगाला खिळलेले आहे. (गलती ६:१४) तो म्हणत असे कि ,जसे प्रभुने मानवजातीवरील प्रेमखातर स्वतःचे बलिदान दिले " तसेच, मी सुध्दा ख्रिस्ताच्या प्रेमाखातर स्वतःचे  बलिदान केले  पाहिजे.

साधु म्हणूनः


     तरूण सुंदर जो मुलासारखा दिसत होता. त्याने त्याच्या प्रभूसाठी  भूक , थंडी, आजारपण आणि तुरूंगवासातूनही गेला. वर्षानु वर्षे त्याने पर्वत, डोंगर पार करून पंजाब, काश्मीर, अफगाणिस्तान, नेपाळ आणि तिबेटला जावून ज्याना  येशूची ओळख नव्हती त्याना येशूच्या प्रीतीबद्दल सांगितले . परंतु पुष्कळदा त्याला फक्त विरोध व शत्रत्वालाच तोंड द्यावे लागले. पुष्कळदा जेव्हा तो उपाशी असायचा तेंव्हा त्याला पूर्ण रात्र जंगलात हाकलून दिले जायचे. थंडीवारा व पावसापासून निभावण्यासाठी तो गुहेमध्ये लपून राही. कधी कधी तर तो गुहेत जंगली श्वापदांबरोबर राहत होता. एक सकाळी त्याने एक चित्ता त्याच्यापासून काही फुटावर झोपलेला पाहिला होता. दुसऱ्या वेळी त्याला असे आढळून आले की, त्याने एका जंगली काळया अस्वलांसोबत रात्र घालविली होती. एका पहाटेस त्याच्या घोंगडीमध्ये काहीतरी असल्यासारखे वाटले, एक मोठा नाग त्याच्या घोंगडीमध्ये आश्रय घेऊन उब घेत होता. त्याने हिमालय पर्वत अनवानी पार केला होता. म्हणून त्याचे पाय दगड व बर्फीच्या गोळयांनी जखमी होत आणि रक्ताळत असत. म्हणून त्याला लोकरक्ताळलेल्या पायांचा प्रेषित" असे म्हणत असत..

तसदी व दुःखामध्ये सुंदरची सहनशिलता व आनंद पाहून त्याचा संदेश स्विकारीत असत. एकदा एका खेडयात तो एका लाकडी ओंडक्यावर बसला आणि गीत गायला सुरू केले तेंव्हा तेथे मोठा समुदाय जमा झाला परंतु जेव्हा तो येशू विषयी बोलू लागला. तेंव्हा पुष्काळाना त्याचा राग आला आणि अचानक कृपारामने त्याच्यावर जोराचा हल्ला केला. त्यामुळे त्याचे गाल आणि हात जखमी झाले होते, परंतु तो हळुवारपणे उठला तेव्हा त्याच्या तोंडातून रक्त पडत असतांना त्याने त्याच्या शत्रूसाठी प्रार्थना केली आणि ख्रिस्त प्रेमाबद्दल सांगण्यास सुरवात केली . कृपाराम हे पाहून फार प्रभावित झाला व   नंतरच्या दिवसांत तो येशूवर विश्वासणारा ठेवणारा बनला.

sadhu-sunder-singh
sadhu-sunder-singh

एकदा ज्या जंगलात चोर राहत होते. त्या जंगलातून सुंदर जात होता. अचानक चार चोरांनी त्याच्यावर हल्ला केला. त्यांच्या हातात चाकु पाहिल्यावर त्याने विचार केला की, हाच आता आपला शेवट आहे. असे समजून प्रार्थना करायला सुरूवात केली. ते चाकू धारण करणाऱ्या चोराला फार विलक्षण वाटले. त्याने त्याला विचारले, “तू कोण आहेस ?" तो म्हणाला, “मी एक ख्रिस्ती साधु आहे.त्याने नवा करार उघडला आणि त्यांना लाजारस व श्रीमंत माणसाबद्दल सांगितले. त्यामुळे त्या चोराला त्याची पापे बोचू लागली. त्याने सुंदरला एका गुहेत नेले व त्याला माणसांच्या हाडांचा मोठा ढीग दाखविला आणि म्हणाला, "या सर्वांच्या खुनांना मीच कारणीभूत आहे." सुंदरने त्या चोराना प्रभू येशूची क्षमाशिलता स्विकारण्याचे मार्गदर्शन केले.

तिबेटमध्येः

    सुंदर जेथे ख्रिस्ताच्या सुवार्तेचा प्रचार झाला नव्हता, अशा अवघड व धाकादायक ठिकाणी प्रभू येशूची उणीव भरून काढण्यासाठी तेथे गेला. त्याच्या अतःकरणात तिबेटकरिता फार उत्कट अभिलाषा होती. तिबेट जादुटोणा, अंधश्रध्दा व भुतांची भिती यात बुडालेले होते. गरीब लोक लामा व धार्मिक पुढार्याच्या जाचाखाली दडपुन गेले होते. तेथील लोक बौध्दधर्मीय होते.त्यांचा असा विश्वास होता कि ,प्रार्थना करण्याचा एकच मार्ग आहे.तो म्हणजे प्रार्थना लिहिलेल्या चाकांना फिरविणे किंवा ज्या झेंडयावर प्रार्थना लिहिलेल्या आहेत तो झेंडा फडकविणे त्या लोकांनी कधीच ख्रिस्ताबद्दल ऐकलेले नाही सुंदर पुष्कळ वेळा तिबेटला गेला. एकदा त्याला उघडया जागी थंडीत झोपावे लागले ते ठिकाण समुद्रसपाटीपासून १६००० फुट उंचीवर होते.

एकदा सुंदर एका लहान शहरात प्रचार करीत होता तेव्हा कैद  करून नेले व त्याचा कोर्टात खटला चालविण्यात आला. यासाठी कि, त्याने दुसऱ्या देशाच्या धर्माचा प्रचार केलेला आहे. तेव्हा सजा म्हणून त्याचे  कपडे फाडून काढण्यात आले व त्याला पाणी नसलेल्या कोरडया विहिरीत टाकून देण्यात आले.

sadhu-sunder-singh
well
नंतर त्यांनी ती विहिर कुलूप लावून बंद केली. कारण त्या विहिरीमध्ये पुष्कळांना टाकलेले होते. सुंदर त्या हाडांच्या ढिगाऱ्यावर व शरीरांच्या सडलेल्या अवयवांवर पडला होता तेथील दुर्गंधी भयंकर होती. तो तेथे पडल्याने त्याला फार  जखमा झाल्या. वेदनांनी त्याचे शरीर फार दुखत होते. सुंदर त्या काळोख्या विहिरीमध्ये बिगर अन्न पाण्याचा आणि झोपेविना तीन दिवस फार कठीण यातना भोगीत होता. तिसऱ्या रात्री जेव्हा तो प्रार्थना करीत होता तेव्हा त्याने एक आवाज ऐकला. तेव्हा त्या विहिरीचा दरवाजा उघडलेला होता आणि एक दोर विहिरीमध्ये सोडलेला होता. त्या दोराला घट्ट पकड असा आवाज त्याने ऐकला. त्याप्रमाणे त्याने केले आणि ताबडतोब त्याला विहिरीबाहेर काढण्यात आले. ज्याने त्याला बाहेर काढले तो परका अपरिचीत होता. त्याने विहिरीचा दरवाजा बंद केला आणि तो अदृश्य झाला. त्यानंतर त्याला समजले की, त्याला स्वतः प्रभू येशूने मुक्त केले होते. जेव्हा त्याला बरे वाटून शक्ती प्राप्त झाली तेव्हा त्याने पुन्हा प्रचारकार्याला प्रारंभ केला आणि मग पुष्कळ भुकेल्या हदयांनी तारण पाहिले.

नेपाळमध्येः

    भारताच्या उत्तरेला नेपाळ देश आहे. तेथे सुंदरच्या काळात शुभवर्तमान सांगितले गेले नव्हते. शुभवर्तमान सांगण्याची त्या देशात मनाई होता. सुंदर नेपाळला गेला आणि ख्रिस्ताचे शुभवर्तमान सांगितले . तेव्हा त्याला तेथे अटक करून तुरुंगात टाकण्यात आले. तेथे त्या तुरूगामध्ये सहकारी कैद्यांना शुभवर्तमान सांगितले म्हणून त्यांनी त्याला वेगळया खोलीत बंद केले ती खोली म्हणजे भयंकर दुर्गंधीयुक्त गाईचा गोठा होता. तेथे त्यांनी त्याचे कपडे फाडून काढले हात पाय एका खांबाला बांधले. मग कोणी एकाने जळू आणले आणि  त्याच्या शरीरावर फेकून दिले. त्या जळूनी त्याचे रक्त शोषून घेण्यास सुरुवात केली . अशा भयानक वेदनांमध्ये असतांना देखील सुंदरने प्रार्थना आणि स्तती गीते गायिली तेव्हा त्या तुरूंगाधिकाऱ्याला वाटले की, तो मनोरुग्ण आहे आणि म्हणून त्यांनी त्याला मुक्त केले. जरी जळूंनी त्याचे रक्त शोषून घेतले होते आणि त्याला अशक्त केले होते. मग थोडे बरे वाटल्यावर तो पुन्हा त्या शहरात गेला आणि पुन्हा प्रचार करू लागला.

          त्याच्या सर्व क्लेशांमध्ये सुंदर म्हणाला, “मी माझ्या तारणाऱ्या येशूसाठी आनंदाने दुःख सोसायला तयार आहे.जेव्हा त्याला प्रश्न विचारण्यात आले, “तुझ्या आनंदाचे रहस्य काय आहे ?” त्याने उत्तर दिले कि ,आत्मे जिंकण्यासाठी मी ज्या सर्व यातना व दुःख यातून गेलो आहे. त्यामध्ये माझे समाधान व आशा म्हणजे ख्रिस्ताचा क्रुस आहे. ख्रिस्त स्वर्ग सोडून खाली आला आणि क्रुसाचे ओझे त्याने स्वतःवर घेतले म्हणून दुःख रूपी क्रुसाचे ओझे वाहणे व त्याच्याकरिता आत्मे जिंकणे ही फार मोठी गोष्ट नाही . जेंव्हा त्याला नेपाळ तुरूंगातील अनुभवाबद्दल विचारले तेव्हा तो म्हणाला, “देवाच्या सान्निध्याने माझा तुरूंग स्वर्ग बनला होता."

सुंदरचे जगाला आव्हानः

    सुदरचे परिश्रम व अद्वितीय अनुभव लवकरच सर्व जगभर पसरले होते. सर्व जगभरातून ख्रिस्ती लोकांनी या भारतीय प्रेषिताला बघायला गर्दी केली. सर्व भारतातून लोक सुंदरला ख्रिस्ती व ख्रिस्तीत्तर सभांमध्ये बोलण्यासाठी आमंत्रित करीत होते. जेथे जेथे तो गेला तेथे सुंदरने ख्रिस्ती क्रुस उचलण्यास व स्वत्याग करून ख्रिस्ताला अनुसरण्याचे आव्हान केले. त्याच्या प्रेषितीय कार्याच्या आव्हानाने पुष्कळ लोकांना प्रार्थना व सेवाकार्य करण्यासाठी प्रोत्साहीत केले. त्याने श्रीलंका, बार्मा, मलेशिया, चीन आणि जपान या देशांचा प्रवास केला तो . तो इंग्लड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया युरोप या सारख्या पाश्चिमात्य राष्ट्रामध्ये देखील गेला. जेथे तो गेला तेथे लोंकानी खिस्ताचे प्रतिरूप त्याच्यात पाहिले. एकदा त्याच्या सुवार्ता सभेत बसलेल्या एका लहान मुलीने विचारले, “तो येशू आहे का ?" ख्रिस्ताकरिता आत्मे जिंकणे व पवित्रता संपादन करणे या बद्दलच्या अभिलाषेने सुंदरला खरोखर प्रभु येशू सारखे बनविले होते.

अंतिम शब्दः

    सन १८ एप्रिल १९२९ रोजी सुंदरने खालील शब्द त्याच्या मित्राला लिहिले होते, “आज मी तिबेटला निघत आहे. मला प्रवासातील धोके व अडखळणांची जाणीव आहे. परंतू तरीही माझी कर्तव्यपणाला लावून पूर्ण करावयाची आहेत.दिवस लोटले, त्याचा परतण्याचा समय आला परंतू तो परत आला नाही. त्याच्याबद्दल किंवा त्याच्याबद्दल कोणतीही खबर बातमी आली नव्हती. तो कदाचित एखाद्या पर्वत माथ्यावरून पडून एक रक्तसाक्षी म्हणून निधन पावला असेल किंवा त्याला तिबेटमधील त्या विहिरीमध्ये ढकलून दिले असेल, किंवा म्हशीच्या कातडयात शिवून तळपत्या सुर्याखाली ठेवून दिल्यामुळे त्याची त्वचा आकसून जावून त्याची हाडे मोडून गेली असतील. असा तो मृत्यू पावला असेल. अंत कसाही का होईना, स्वर्गीय सार्वकालिक मुगुट मात्र निश्चित त्याच्याकरिता ठेवलेला आहे.

 

अपणांसाठी विचारः

प्रियानो, साधु सुंदरसिंगाने म्हटले होते की, तो त्रासामध्ये  ख्रिस्ताकरिता दुःख सहन करायला आनंदाने तयार आहे. जेथे जेथे तो गला तेथे तेथे ख्रिस्ताचे प्रतिरूप त्याच्यामध्ये लोकांना दिसले. आमची मनःस्थिती काय आहे ? आजदेखील पुष्कळ तरूण बंधुभगिनी ख्रिस्ताविना जगत आहेत. साधु सुंदर सिंगाप्रमाणे जसा त्याने स्वतःचा त्याग करून  स्वतःचे अर्पण केले तसे आज आपण स्वतःचे ख्रिस्ताला समर्पण करुया आणि हा समय हंगामाचा समय आहे .चला ख्रिस्ताकारीता आत्म्याची कापणी करुया .

 

Please share ....

धन्यवाद ....

 

 

 

Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url