Hudson Taylor biography हडसन टेलर बायोग्राफी चीनमधील सुवार्तिक
हडसन टेलरचे वडिल त्याजबरोबर पुष्कळ गोष्टी बोलले होते. तरूण हडसन टेलरने त्या फार उत्सुकतेने ऐकल्या. ते फक्त चीनबहल होते.
तो जो अवधी होता जेव्हा जगाच्या निरनिराळया भागामध्ये नवीन धाडसी पाऊले उचलली गेली होती. परंतू चीन करिता कोणतेच प्रयास गेले नव्हते. मागील पाच वर्षात जो एक मिशनरी होता तो देखील मरून पाच वर्षे झाली तरी देखील चीनमध्ये दुसरा कोणताच मिशनरी पाठविण्याचा प्रयत्न होत नव्हता. हडसन टेलर केवळ ४ - ५ वर्षांचा असतांना त्याने जेव्हा हे ऐकले तेव्हा तो म्हणाला, “मी जेंव्हा मोठा होईल तेव्हा मी चीनला मिशनरी म्हणून जाईल.”
तरूणपण
हडसन टेलरचा जन्म इंग्लडमध्ये २१ मे १८३२ मध्ये झाला. त्याचे आईवडील सत्य व प्रेमाने भरलेले ख्रिस्ती होते. आजारपणामुळे तो अशक्त झाल्यामुळे त्याला २ वर्षे शाळेतजाता आले नाही आणि नंतर वयाच्या १४ वर्षांपर्यंत त्याने घरीच अभ्यास केला. जेव्हा तो ४ वर्षाचा होता तेव्हा त्याच्या आईवडीलांनी त्याला इब्री मुळाक्षरे शिकविली. बाळपणापासून हडसन टेलरला जगाला मिशनऱ्यांची गरज असल्याची जाणीव होती.
त्याचे परिवर्तन व सेवेसाठी पाचारण
बाळपणापासून हडसन टेलर अध्यात्मिक वातावरणात वाढत होता. तो १४ वर्षांचा असताना एका रविवारच्या दिवशी त्याने “ पूर्ण झाले " या विषयाची हस्तपत्रिकाने त्याला पापाची जाणीव करून दिली व त्याने ख्रिस्ताचा स्विकार केला. त्याची आई बाहेरगावांतून आल्यावर लगेच त्याने तिला झालेल्या तारणाबद्दल सांगितले. परंतू जेंव्हा त्याच्या आईने त्याला सांगितले की, हे मला पूर्वीच माहित होते. ते ऐकूण तो आश्चर्यचकीत झाला होता. त्याने तिला विचारले,"तुला ते कसे माहित झाले ?" ती म्हणाली, “जेव्हा मी ७०-८० मैल दूर होते तेव्हा मला तुझे तारण व्हावे म्हणून प्रार्थना करण्यासाठी मला फार ओझे आले आणि खात्री होईपर्यंत मी देवाची प्रार्थना व स्तुती केली.
तारणानंतर काही महिण्यानंतर भर दुपारी त्याने आपल्या बिछाण्याजवळ गुढगे टेकून त्याच्या भविष्याबद्दल प्रार्थना करायला सुरूवात केली. त्याने अशी प्रार्थना केली कि , “प्रभो, जोपर्यंत माझ्या जीवनाबद्दल तुझी काय इच्छा आहे हे तू सांगणार नाहीस तोपर्यंत मी ही खोली सोडणार नाही.” त्याला जाणवले कि , परमेश्वर सांगत आहे कि , “ माझ्यासाठी चीनला जा.” तेंव्हा पासून चीन त्याच्या हृदयात पक्क होत. हडसन टेलरने त्याला मिळालेल्या पाचारणबद्दल कधीच शंका बाळगिली नाही.
मिशनरी म्हणून तयारी करणे
हडसनने चीनमध्ये सेवा करण्यासाठी सर्व तयारी केली. त्याने चीन संबंधी सर्व पुस्तके वाचली होती. सखोल आद्यात्मिक जीवन प्राप्त करून घेण्यासाठी त्याने पवित्र आत्मा मिळावा म्हणून फार कळकळीने प्रार्थना केली. त्याने करार केला. “जर देवबाप माझे पूर्ण तारण करील तर मी त्याच्याकरिता काहीही करीन.” देवाने हया प्रार्थनेचे उत्तर दिले. हडसन देवाबरोबर केलेल्या कराराशी प्रामाणिक राहिला.
कोणत्याही चीनी शिक्षकाची मदत न घेता फार अटीतटीचे प्रयत्न करून तो चीनी भाषेत लुकाचे शुभवर्तमान शिकला. कठीण परिश्रम आणि वारंवार सराव करून त्याने स्वतःला शिस्त लावली. त्याने ऐषआराम आणि समाधानी जीवन जगणे बाजूला केले. त्याला जी संधी मिळाली तिचा उपयोग सेवेसाठी केला. वडीलाच्या व्यवसायामध्ये मदत करत असताना तो लॅटीन व ग्रीक, ईश्वर ज्ञान आणि वैद्यकशास्त्र यांचा त्याने अभ्यास करून भावी आयुष्यसाठी स्वता;ला तयार केले . तसेच त्याने जगातील निरनिराळया भागात सेवा करणऱ्या संस्थाची ओळख करून घेतली . विशेष त्याने चीन असोसियनची माहिती मिळविली.. (नंतर त्यास चीनी गॉस्पल लीग म्हणून ओळखले गेले .)
वयाच्या १९ व्या वर्षी हडसन वैद्यकशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी लंडनला गेला. तेथे तो पुष्कळ आद्यात्मिक शिस्ती विषयी शिकला. मोठी संकटे व दारिद्रय यांनी त्याला ख्रिस्ताच्या अधिक जवळ आणले. स्वद्वेषाचे जीवन जगून, त्याने त्याचे २/३ उत्पन्न देवाला दिले. त्या काळामध्ये जर तुम्ही त्याला इंग्लडमध्ये भेटला असता तर तुम्ही आश्चर्यचकित होऊन विचारले असते. “देव त्याला मिशन क्षेत्रामध्ये कसकाय उपयोग करू शकतो ?” तो फार हडकुळा व अशक्त होता. तो पहिल्या दर्जाचा मिशनरी म्हणण्यास लायक नव्हता. परंतू देवाचे अभिवचन हे आहे की, “मला जो सामर्थ्य देतो त्यांच्याकडून मी सर्वकाही करावयास शक्तीमान आहे.” (फिलिपै ४:१३) देव हडसन टेलर सारख्या लोकांचा उपयोग करून घेतो. जे देवाला सर्व गौरव द्यायला तयार असतात.
मजबुत विश्वास पर्यंत पोहचणे
एक तरूण माणूस म्हणून हडसनच्या विश्वासाची परिक्षा वारंवार झाली. तो एका हॉस्पिटलमध्ये काम करीत होता. त्याला बसच्या भाडयासाठीहि पैसे नसायचेत . तेव्हा तो त्याच्या घरापासून हॉस्पिटलपर्यंत ८ मैल पायी चालत जात असे. त्याचं आहार फार साधारण होता . तो एका दिवसला एकच भाकर खात असे. त्यातील तो आर्धी सकाळसाठी व आर्धी रात्रीसाठी ठेवीत असे. एकदा तो हॉस्पिटल मध्ये तापाने मृत्यू पावलेल्या एका प्रेताचे शवविच्छेदन करीत होता. तेव्हा शवविच्छेदन करतांना त्याच्या हाताचे बोट सुध्दा कापले गेले. त्याचा संसर्ग होऊन तो आजारी पडला होता. तो मरणाच्या काठावर आला होता. त्याला वाटले चीन माझे फक्त स्वप्नच राहाते कि काय ! अजूनही त्याचा विश्वास बळकट होता. तो लवकर बरा झाला. तो या सर्व अनुभवातून आल्यामुळे विश्वासात मजबूत झाला.
चीनमध्ये
चीनकरिता हडसने बोट पकडली. तेव्हा ३ व्यक्ति त्याला निरोप द्यावयास आल्या. सन १८५३ च्या सप्टेंबर महिण्यात तो चीन सुवार्ता क्लबचा सभासद म्हणून चीनला गेला. त्याचा जलपर्यटन साडे पाच महिने चालले. अशक्त २२ वर्षाचा हडसन जुलै महिन्यात शांघायला पोहचला. जसे त्याचे पाय या वचनदत्त भुमिला लागले तेव्हा जो आनंद व जो हर्ष त्याला झाला होता तो शब्दांनी व्यक्त करता येणार नाही. त्यावेळेला त्याला हे माहित नव्हते की, तो चीनच्या अंतर्गत भागाला सुवार्तेकरिता उघडा करील.
जेव्हा हडसन चीनमध्ये उतरला तेव्हा त्याला कोणीच मित्र नव्हते. शिवाय त्याला हेही माहित होते की, शांघायी बंडखोर हे समुद्र किणाऱ्यावर राहत आहेत. तेथे जेवण फार महाग होते. हया गोष्टी एकटया तरूण माणसासाठी आनंदाच्या बातम्या नव्हत्या. परंतु प्रभूमध्ये त्याचा विश्वास दृढ होता.
हडसन चीनी लोकांना ख्रिस्ताकडे वळविण्यास फार उत्सुक होता. म्हणून त्याच्या तुटपुंज ज्ञानाबरोबर त्याने सुवार्ता पुस्तक व हस्तपत्रिका घेऊन लोकांमध्ये गेला . जेव्हा तो चीन लोकांबरोबर कार्य करू लागला तेव्हा चीनी भाषेतील नवीन शब्द त्याने शिकून घेतले व तो अस्खलीत चीनी बोलू लागला. जेथे यापूर्वी मिशनरी गेले नव्हते. अशा ठिकाणी तो गेला. अशाप्रकारचा प्रवास करणे त्या दिवसात फार धोक्याचे होते कारण चीनमध्ये पुष्कळ समस्या होत्या.
एकदा एका शक्तिशाली दारूडयाने हडसनवर हल्ला करून हडसनचे केस फार घट्ट पकडून उपटण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तो अगदी बेशुद्ध होण्यास आला होता. तरीही हडसनने हस्तपित्रका वाटणे चालूच ठेवले. तो हे करत होता. कारण त्याला असे वाटले होते की, त्याठिकाणी जाण्याची अशा प्रकारची संधी त्याला पुन्हा मिळणार नाही. या गोष्टीमळे लोकांनी त्याला विरोध केला. त्याच्यावर रागावले आणि त्याला सरकारी अधिकाऱ्यांकडे घेऊन गेले. परंतू तो अधिकारी त्याच्याबरोबर नुसता सभ्यतापूर्वक वागला नाही तर त्याने त्याच्याकडून एक नवा करार देखील मिळविला.

हडसन चीनच्या आतील भागाला भेट देण्याच्या बातीत फार पक्का होता. जेथे अजून ही पुष्कळ लोकांना सुवार्ता कळली नव्हती. त्याने पौलाचे उदाहरण काही मार्गाने अमलात आणण्याचे ठरविले, लोकांचे तारण करणे, प्रत्येकासाठी सर्वकाही करणेस सर्व काही बनने. म्हणून त्याने चीनी लोकांसारखा पोशाखा घातला आणि तो त्यांच्या सारखाच जगू लागला. काही युरोपिअन लोकांना व मिशनऱ्यांना हे आवडले नाही. त्याच्या या कार्याला यश येऊन काही महिन्यातच ख्रिस्तासाठी त्याने पहिला आत्मा मिळविला.
त्रासात परंतु निराशा नाही
टेलरला सेवा कार्यामध्ये पुष्कळ वेळा निराश होण्याचा मोह झाला , भविष्यकाळ त्याच्यापुढे अंधकारासारखा उभा होता तेव्हा तो लिहित , “माझा मार्ग नेहमी मोकळा आहे.” फक्त मला एक पाऊल उचलावे लागेल आणि मला प्रभूवर विश्वास ठेवून वाट पहावी लागेल. मग सर्व काही चांगलं होईल. ज्या मिशन चळवळीने त्याला पाठविले होते तिच्याकडून त्यास कधीच नियमितपणे आर्थिक मदत मिळत नसे. त्याने संमकिंग या ठिकाणी मेडीकल मिशन केंद्राची स्थापना केली आणि त्याला हजारो आत्मे मिळाले. परंतु ब्रिटीश सरकारच्या वकीलांनी त्याला सांगितले " की, त्याने चीनच्या आतील भागात जाऊ नये आणि जर तो गेला तर त्याला फार मोठी रक्कम दंड म्हणून भरावी लागेल. आणखी ते त्याला म्हणाले कि , शिवाय कोणतीच ब्रिटिश सुरक्षितता मिळणार नाही म्हणजेच चीनकडून नेहमीच हल्ला होण्याची दाट शक्यता . परंतू टेलर स्वसंरक्षणाखातर या लोकांना सुवार्ता सांगण्याची जबाबदारी झटकू शकत नव्हता. दुसरी निराशजनक गोष्ट ही होती की, त्याचा सह मित्र विल्यम ब्रेनसचा मृत्यू झाला होता.त्याची सहभागिता हडसन करिता फार उपयोगाची अशी होती. परंतू सन १८५६ ला विल्यम ब्रेन्सला कैदी म्हणून पकडून मारण्यात आले.
अजून ही देवबाप टेलरला मार्गदर्शन करीत होता. त्याने निंग्पो मध्ये सेवा सुरू करावयाचे ठरविले ते बंदाराचे शहर असून देखील जेथे एक सुध्दा डॉक्टर नव्हता. तो निंग्पोला जातांना त्याच्या नोकरानेच त्याच्यावर हल्ला करून त्याच्याजवळ जे काही होते ते सर्व लुबाडून पळून गेला. या स्तिथीत उपासमार व पुरेशी झोप नसल्याने यामुळे तो रस्त्याच्या बाजुला मुर्चीत होऊन पडला होता. तरी सुध्दा त्याने चीजवस्तु गेल्याची चिंता न करता त्याच्या आजुबाजूला असलेल्या लोकांना ख्रिस्ताचा संदेश दिला. त्याने नव्या कराराची निंग्पोमध्ये आवृत्ती काढली. मग त्याने मारीया डिरे बरोबर लग्न केले जी त्याला निंग्पोमध्ये भेटली होती. दोघे ही आजाऱ्यांची सेवा व चीनी लोकांना सुवार्ता सांगणे या कामाला लागले. पुष्कळ तास अभ्यास करणे, संदेश देणे, प्रवास करणे आणि आशा अनेक परिस्थितीमुळे टेलरच्या आरोग्यावर परिणाम झाला. ७ वर्षांच्या कठीण परिश्रमानंतर टेलरला त्याच्या आजारपणामुळे इंग्लडला पुन्हा जावे लागले.
चीनची अंतर्गत मिशन चळवळ
त्याने त्याचा वैद्यकीय अभ्यास लंडनमध्येच पूर्ण केला. त्याच्याकडे चीनचा फार मोठा नकाशा भिंतीवर लावलेला होता. तो त्याला चीनच्या ११ राज्यामध्ये राहणाऱ्या ३८ करोड लोकांची ज्यांच्यामध्ये एक ही मिशनरी नाही याची आठवण करून देत असे. टेलरने चीनच्या गरजांबद्दल पुस्तके व लेख लिहिले होते. त्याने ११ राज्यांसाठी २४ मिशनरी देवबापाने पाठवावेत अशी प्राथना केली. २ दिवसांनी विश्वासाने त्याने “ चीन अंतर्गत चळवळी ” च्या बँकखात्यात लहान रक्कम जमा केली . त्या विश्वासाच्या परिणामाने ती चळवळ चालू झाली टेलरने मिशन चळवळीबद्दल भाष्य केले की, “लहानशा रक्कमे बरोबर देवाची सर्व अभिवचने एकत्रितपणे."
देवाने त्याची प्रार्थना ऐकली. ११ महिन्यानंतर हडसन टेल सोबत २४ पैकी १६ मिशनरी जे त्याने देवाकडे मागितले होते त्यांनी चीनला जलपर्यटन केले . तो देश त्यांच्यासाठी अपरिचित असा होता फक्त देवावर अवलंबन राहणे शिवाय पगाराचे कोणतेच वचन त्यांना दिले नव्हते.
चीनमध्ये त्यांचे स्वागत करायला कोणीही नव्हते. परंतु त्यांनी पक्का विचार केला होता त्या देशात जाण्याचा की, जेथे परदेशीयांचा विरोध होत होता. जहाजावर काम करणाऱ्या ३४ लोकांपैकी २० पेक्षा अधिक लोकांनी ख्रिस्ताचा स्विकार केला. हडसन टेलर नेहमी म्हणतात, “फक्त समुद्रपार केल्याने कोणीही मिशनरी होऊ शकत नाही. एक व्यक्ति जो स्वतःच्या देशात उपयुक्त नाही त्याचा दुसऱ्या देशात उपयोग करून घेण्याची अपेक्षा धरू नये."
पुन्हा चीनमध्ये
शांधायला पोहचल्यानंतर जीवाची जोखीम घेऊन ते देशाच्या अंतर्गत भागात गेले. तरूण टेलर त्या गटाचा पुढारी होता. पुष्कळ वेळेला त्यांना जेवण किंवा राहायला जागा मिळत नव्हती. परंतू विश्वासाच्या द्वारे देवाने त्यांच्या गरजा पुरवल्या. टेलरचे गुपीत हे होते की, त्याला लहानपणी मिळालेला साधा विश्वास , तो म्हणतो “ प्रत्येक संकटावर वर विश्वासाने विजयी होणे हीच देवाच्या मुलांची ताकद आणि अन्न आहे."
सुमारे २० वर्षानंतर चीनची आतील मिशन चळवळ वाढली. तिथे २२५ मिशनरी आणि ५९ मंडळयातून १७०० विश्वासणारे होते . प्रशिक्षण गृहे सुरू केली गेली. हजारो पुस्तके आणि पुस्तिका वाटण्यात आले . पुष्कळ नुकसान देखील झाले. हडसन टेलरची ३ मुले व पत्नी मरण पावला. पत्नी जी त्याला १२ वर्षे आधार होती ती कॉलऱ्याने मरण पावली .
त्याची मुलगी जिच्यावर त्याचे खुप प्रेम होते ती मरण पावली तेव्हा तो लिहितो,“माझ्या हृदयातून रक्तप्रवाह होत आहे.” जेव्हा त्याची पत्नी मरण पावली तेव्हा तो लिहितो, “मी एकटा नाही, देवपूर्वीपेक्षा माझ्या अधिक जवळ आहे."
हडसन टेलरने चीनच्या गरजा लोकांना कळविल्या परंतू त्याने कधीच पेसे मागितले नाहीत. जेंव्हा त्याला कार्याकरिता लोक लागत किंवा पैसे लागत तो फक्त देवाला मागत असे. त्याने केव्हाही मिशन चळवळीसाठी दानार्पण घेण्याची परवानगी दिली नाही. फक्त त्याच तत्त्वाप्रमाणे चालून सेवा पुढे पुढे वाढत गेली.
हडसनच्या मनात नेहमीच चीन
हडसन पुष्कळ वेळा इंग्लंडला गेले परंतू ताबडतोब पुन्हा चीनला परतले. त्यांनी पुन्हा लग्न केले. ते ख्रिस्ताकरिता चीनच्या प्रत्येक शहरात पोहचण्यास शक्तीमान होते. परंतू पाठीच्या मणक्यामध्ये समस्या निर्माण झाल्यामुळे त्याला पुष्कळ महिने आराम करावा लागला. त्या दिवसांमध्ये देवाने त्यांना चीनच्या गरजा बद्दलचा मोठा दृष्टांत दिला. आजारपणातून उठल्यानंतर ते त्यांच्या पत्नी सोबत अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यासारख्या देशांत गेले आणि त्यांना चीनच्या गरजां बद्दल सांगितले. परंतू त्यांनी कधीच पैसे मागितले नाहीत सन १९०० मध्ये जेव्हा ते इंग्लडमध्ये होते तेव्हा त्यांच्या मिशन कुटुंबातील ७९ जणांची चीनी द्वारे क्रूर रीत्या हत्या केली त्यामध्ये २१ लेकरे होती. ४ वर्षानंतर त्यांची दुसरी बायको देखील वारली.टेलर हा इंग्लंडमध्ये राहू शकला नाही .१९०५ मध्ये त्यांनी इंग्लंड ते चीन पर्यंतचा आपला अकरावा आणि शेवटचा प्रवास सुरू केला. चीनमध्ये त्याचे खूप आगत स्वागत झाले आणि शेवटच्या प्रांतातील एकाची राजधानी चंगशा येथे सुवार्तेसाठी जाण्याची त्यांची इच्छा होती .मनुसमान तेथे पोचल्यावर तो देवाचा माणूस आपल्या देवाबरोबर राहण्यास गेला.
जेव्हा हडसन टेलर मरण पावला तेव्हा चीनच्या अंतर्गत चळवळीत ८४९ मिश्नरी होते. कम्युनिस्टांनी चीनचा ताबा घेईपर्यंत त्यांनी चीनमध्ये सेवा कली. जरी हडसन टेलरला जगातील गोष्टी ,ऐष आराम नव्हते तरी,त्यांनी पुष्कळाना श्रीमंत केले. त्याचे गुपीत हे होते की, ते जीवंत देवावर व त्याच्या वचनावर विश्वास ठेवत होते. देवबाप त्याच्या वचनाप्रमाणे करतो असा त्यांचा विश्वास होता. तो म्हणतो, “ विश्वास असंभवाकडे पाहून हसतो; आज्ञाधारकपणा प्रश्न करत नाही."
Please share and be blessed.