Story Of Colgate Toothpaste
Story Of Colgate Toothpaste
कोलगेट कंपनीच्या यशाचे रहस्य
आज आपण अशा व्यक्तीच्या जीवनाबद्दल बघणार आहोत. ज्याने प्रभु येशू ख्रिस्ताला आपला व्यवसायात भागीदार बनवले. त्याची कंपनी जगभर प्रसिद्ध
झाली. त्या व्यक्तीच्या कंपनीचे नाव आहे ‘कोलगेट’.
होऊ शकते तुमच्या घरातही हे कोलगेट टूथपेस्ट अनेकदा वापरले असेल !
या व्यक्तीच्या साक्षी द्वारे तुमच्या आर्थिक स्थितीबाबत विश्वास वाढण्यास मदत मिळेल .जेव्हा तुम्ही ही साक्ष शेवटपर्यंत वाचाल .तेंव्हा तुमच्या या विश्वासाच्या वाढीमुळे तुम्हाला तुमच्या जीवनातील आर्थिक संकटातून दिलासा मिळेल.
विल्यम कोलगेट William Colgate
25 जानेवारी 1783 रोजी इंग्लंडमधील
केंट नावाच्या ठिकाणी रॉबर्ट कोलगेट आणि सारा कोलगेट यांना एक मुलगा होतो, ज्याचे
नाव ते विल्यम ठेवतात. 18 व्या शतकात जेव्हा गृहयुद्ध चालू होते. त्या काळात
विल्यम कोलगेटचे वडील रॉबर्ट कोलगेट हे अमेरिकेच्या स्वातंत्र्यसैनिकांचे आणि
फ्रेंच राज्यक्रांतीचे कट्टर समर्थक होते, तेंव्हा 1798 साली
विल्यम कोलगेटचे पालक लहान विल्यमला घेऊन इंग्लंड सोडून अमेरिकेत स्थायिक होतात.
विल्यम कोलगेट वडिलांच्या व्यवसायात मदत करतो. William Colgate Testimony.
मेरीलँडमध्ये राहत असताना त्यांचा साबण आणि
मेणबत्त्या बनवण्याचा व्यवसायात होता. या व्यवसायात विल्यम कोलगेटने वडिलांना मदत केली. परंतु सर्व
प्रयत्न करूनही त्यांचा व्यवसाय चालला नाही. यामुळे त्यांच्या परिवारात खूपच
आर्थिक समस्याचा सामना करावा लागला . आणि जेव्हा घरात आर्थिक समस्या निर्माण होते.
तेव्हा कर्जासारखी परिस्थिती निर्माण होते . वडिलांना कर्ज आणि आर्थिक समस्यांना
तोंड देताना पाहून 16 वर्षाच्या विल्यम कोलगेटने ठरवले की
आपण आपल्या वडिलांना मदत करावी. यावर त्याच्या वडिलांनी त्यास म्हंटले, मुला,
एक काम कर, आपल्या घरातील समस्यांवर उपाय
म्हणजे न्यूयॉर्क शहरात तू जाऊन काम कर. न्यूयॉर्क हे खूप मोठे शहर आहे, बेटा, तुला भीती वाटेल पण घाबरण्याची गरज नाही,
देव तुझ्या पाठीशी आहे.
विल्यम कोलगेट तर एक 16 वर्षांचा किशोरवयीन मुलगा
होता, त्याला त्याच्या आईपासून दूर राहायचे नव्हते. परंतु आर्थिक
मजबुरीमुळे आपल्या कुटुंबाला मदत व्हावी म्हणून
वडिलांच्या सल्ल्यानुसार तो न्यूयॉर्कला जाण्यास तयार झाला.
William Colgate Leaving For New York
ई .स. 1804 दरम्यान किशोरवयीन मुलगा , विल्यम कोलगेट न्यूयॉर्कच्या प्रवासाला निघतो. जाताना त्याच्या आईने बायबल उघडून त्याला मलाखी 3;10 दाखवून सांगितले कि, मुला परमेश्वाराचा दशांश देण्यासाठी कधीही विसरू नको. त्या अनोळखी शहरात जहाजाचे तिकीट काढून विल्यम जलप्रवासाने निघतो. जहाजात उदास, निराश आणि रडत बसलेला असताना जहाजाचा कप्तान विल्यमकडे विचारपूस करून म्हटले. तूझी समस्या मला सांगू शकतोस ? विल्यम सुरुवातीला शांतच राहिला , तो एकदम अनोळखी माणसाजवळ कसे मन मोकळे करणार . परंतु तो जहाजाचा कप्तान खूप चांगला आणि देवाची भीती बाळगणारा ख्रिस्ती माणूस होता. विल्यमने म्हटले न्यूयॉर्क सारख्या एवढ्या मोठ्या शहरात असे एकटे मला माझ्या आई-वडिलांपासून दूर जायचे नव्हते, परंतु घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे मला हा निर्णय घेणे भाग पडले.
विल्यम कोलगेटला कॅपटनचा बोध Success Story Of Colgate
हे ऐकून जहाजाचा कप्तान विल्यम कोलगेटला म्हणाला. विल्यम,माझे ऐक, गुडघे टेकून प्रार्थना कर, मला विश्वास आहे की प्रभु येशू ख्रिस्त निश्चित तुझे मार्गदर्शन करेल.विल्यमने गुडघे टेकून आपले दोन्ही हात वर करून प्रार्थना करू लागतो आणि त्याच वेळी जहाजाचा कप्तानही त्याच्यासोबत प्रार्थना करतो. प्रार्थनेत थोडा वेळ घालवल्यानंतर विल्यम कोलगेटला त्या जहाजाचा कॅप्टन म्हणतो. विल्यम, ऐक, देवाने मला सांगितले आहे की, येत्या काळात एक मुलगा साबण उद्योगात खूप पुढे जाणार आहे. प्रभु येशू ख्रिस्ताच्या आत्म्याच्या नेतृत्वाखाली माझ्याकडे आज तुझ्यासाठी काही महत्त्वाचे संदेश आहे .
जीवनात यशस्वी होण्यासाठी मी तुला महत्त्वाच्या चाव्या देऊ इच्छितो , त्या कधीही विसरू नकोस . जहाजाच्या कॅप्टनने पहिली गोष्ट सांगितली की विल्यम एक चांगला माणूस असावा. आणि आपले हृदय प्रभु येशू ख्रिस्ताला समर्पीत कर . दुसरी गोष्ट म्हणजे देवाला तुझ्या व्यवसायात प्रथम स्थान देणे. ग्राहकाला कधीही लुटू नको . प्रामाणिक राहा . यामुळे देव तुझी भरभराट करेल. प्रभूची इच्छा जाणून घेण्यासाठी दररोज प्रार्थना करत जा . आणि चौथी गोष्ट म्हणजे तु जे काही काम करशील त्याचा दशांश देवाला आवश्य दे. जे काही तू मिळवशील त्याचा दशांश आठवणीने नेहमी देवाला अर्पण कर.
कॅप्टनने विल्यमला सांगितलेल्या या चार गोष्टींमुळे
विल्यमचा एकटेपणा दूर झाला होता . त्याला
घरापासून दूर जाण्याचे दुःख होते. परंतु त्याला समजले की प्रभु येशू ख्रिस्त
त्याच्याशी बोलत आहे. जहाजाच्या कॅप्टनने त्याला बजावून सांगितले की, तु न्यूयॉर्कला पोहोचल्यानंतर पहिली गोष्ट म्हणजे एक चर्च
शोधून नियमितपणे सहभागिता ठेव .देव खात्रीने तुला आशीर्वाद करील .
William Colgate at New York
न्यूयॉर्कला पोहोचल्यानंतर विल्यमला कॅप्टनच्या सल्ल्यानुसार एक चर्च शोधून नियमित सहभागीता घेतो . आणि याच काळात तो स्वतःसाठी नोकरी देखील शोधात असतो. परंतु बेरोजगारीची मोठी परिस्थिती निर्माण झाल्याने कुठेही नोकरी मिळत नव्हती. तो काळ मोठ्या संकटांचा होता. खायला अन्न नव्हते. विल्यम कोलगेट रात्री खूप वेळा उपाशीच काढायचा. अशा वेळी त्याला त्याच्या आईच्या बनवलेल्या जेवणाची आठवणी यायची .वडिलांचे कष्टही त्यांना आठवत होते. एक गोष्ट त्याच्या मनात घुमत होती. कि, जर कष्ट केले तरच मी माझ्या कुटुंबाला मदत करू शकेन.
विल्यम कोलगेट नौकरीच्या शोधात William Colgate Biography
नौकरी नसल्याने या बेरोजगारीतून बाहेर पडण्याचा कोणताही त्याला कोणताही मार्ग सुचत नव्हता. म्हणून त्याने निर्णय घेतला कि, दररोज पवित्र बायबल वाचून वचनाचा अभ्यास करण्यात वेळ घालवायचा. पवित्रशास्राचा अभ्यास करत करत उत्पत्तीचे पुस्तक 28 व्या अध्यायापर्यंत पोहोचतो . त्यात त्यास याकोबाच्या स्वप्नाचे वर्णन वाचायला मिळते. याकोब आपला भाऊ एसावपासून कसा पळून जात होता. मग जेव्हा तो बेरशेबा सोडून हारानकडे निघाला. एके ठिकाणी त्याने दगडाचा उशी वापरून विश्रांती घेण्याचे ठरवतो आणि तिथेच तो झोपतो. तेथे याकोबला एक स्वप्न पडते आणि त्या स्वप्नात तो देवदूतांना एका शिडीवरून उतरताना आणि चढताना पाहतो आणि त्याला यहोवा देवाचा आवाज त्याच्याशी बोलताना ऐकू येतो. मी यहोवा, तुझे आजोबा अब्राहाम यांचा देव आहे आणि इसहाकचाही देव आहे आणि जेव्हा याकोबला हा दृष्टांत मिळतो. तेंव्हा याकोब देवाशी एक करार करतो. जर देव माझ्यासोबत राहिला आणि या प्रवासात माझे रक्षण केले आणि मला खायला भाकर आणि घालायला कपडे दिले आणि मी माझ्या वडिलांच्या घरी सुखरूप परतलो, तर यहोवा माझा देव असेल. आणि हा दगड ज्यावर मी स्तंभ उभारला आहे ते देवाचे घर होईल. आणि तु मला जे काही देशील त्याचा दशांश मी अवश्य तुला देईन. यानंतर देव याकोबला मोठा आशीर्वाद देतो.
विल्यम कोलगेटला प्रार्थनेचे उत्तर मिळते God Answered Prayer Of William Colgate
विल्यम कोलगेट वाचत असताना हे वचन घेऊन प्रार्थना करू लागला की हे देवा, कृपया मला यश दे, मग मला जे काही मिळेल त्या सर्वाचा दशांश मी अवश्य देईन. तो प्रार्थनेचे जीवन जगत असताना बरेच दिवस त्याने संघर्ष केला. परंतु जेव्हा त्याने या वचनाच्या आधारे प्रार्थना सुरू केली तेव्हा एक चमत्कार घडला. त्याला एका साबण बनवण्याच्या कारखान्याच्या बाहेर लिहिलेले दिसते , की इथे एका असिस्टंटची गरज आहे, तो त्या फॅक्टरीजवळ पोहोचतो. विल्यम कोलगेट त्या छोट्या कारखान्याच्या मालकापर्यंत पोहोचतो आणि पाहतो की तो एक वृद्ध माणूस आहे .विल्यम कोलगेट म्हणतो, सर कृपया मला इथे काम द्या, मला आधीच साबण बनवण्याचा अनुभव आहे कारण माझे वडीलही साबण आणि मेणबत्तीचा व्यवसाय करायचे पण तो व्यवसाय बंद पडला.
म्हणूनच मी बर्याच दिवसापासून समस्यात असून नौकरीच्या शोधात आहे. मला ही नोकरी मिळाली तर मी प्रामाणिकपणे तुमच्याकडे काम करेन. देवाने विल्यम कोलगेटवर कृपा केली. आणि त्याच्या प्रार्थनेचे उत्तर दिले. जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा लक्षात ठेवा की, देवाची कृपा तुमच्यावरही येते. आणि माणसाची देखील तुमच्यावर कृपा होते . त्या वृद्ध मालकाच्या मनात देवाने काम केले आणि तो म्हणाला, ठीक आहे विल्यम, मी तुला नोकरी देतो, तू इथे सहाय्यक म्हणून साबण बनवण्याच्या प्रक्रियेवर लक्ष ठेवण्याचे काम तुला मिळेल . विल्यम अगदी देवाला घाबरून प्रामाणिकपणे काम करत गेला.
विल्यम कोलगेट शब्द पाळतो. william colgate tithe story
जेव्हा विल्यमला
त्याच्या पगारात एक डॉलर मिळतो, तेंव्हा
त्याने देवाला दिलेल्या शब्दानुसार
त्याच्या पगाराचा दहावा भाग, म्हणजे 10 सेंट आपल्या चर्चमध्ये तो अर्पण केले .याकोबाने याचप्रकारे प्रार्थना केली होती की, जर तु मला यश दिले तर माझ्या उत्पन्नाचा एक दशांश अवश्य अर्पण करीन.
विल्यम कोलगेट काम करताना आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करी . तो प्रत्येक कामाचे बारकाईने निरीक्षण करी . कारण त्या जहाजाचा कप्तानाचा बोध त्याच्या लक्षात होता . एक चांगला माणूस बनून जग . विल्यम कोलगेट प्रामाणिकपणे काम करत असताना त्यास अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. परंतु तो मंडळीच्या सहवासात सतत राहून बायबल वाचन व अभ्यास करून स्वताला धीर देत . मोठी कठीण परिस्थिती आली तरी तो प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून ठाम राहिला .
विल्यम कोलगेट भागीदार बनतो . William Colgate Got Promotion
त्याची मेहनत आणि त्याचा प्रामाणिकपणा पाहून त्या कारखान्याचा मालकाने विल्यम कोलगेटला आपल्या व्यवसायात भागीदार बनवले . पुढे असे होते कि विल्यम कोलगेट त्या कारखान्याचा एकमेव मालक झाला. देव आजही त्याला आशीर्वाद देत आहे. आणि हळूहळू त्या कारखान्याचे नाव त्यांच्या आडनावावरून कोलगेट असे ठेवतात. या काळात, विल्यम कोलगेटने विश्वासूपणे आपला दशांश देवाच्या राज्यामध्ये पेरणे सुरू ठेवले. प्रभूच्या राज्याच्या वाढीसाठी तो पेरत राहिला. सुवार्तेच्या कार्यासाठी देत राहिला.
विल्यम कोलगेटचा व्यवसायात वाढ . William Colgate Family
दरम्यान, 1811 मध्ये त्याचा विवाह मेरी गिल्बर्ट नावाच्या मुलीशी
झाला. आणि अशा प्रकारे देव त्याला कौटुंबिक आशीर्वादित केले . त्या छोट्या
साबणाच्या कारखान्यात रुजू झाल्यानंतर त्यांनी ६ वर्षे प्रार्थना आणि प्रामाणिकपणे
बुद्धीचा वापर करत काम सुरू ठेवले. आणि 6 वर्षांच्या मेहनतीनंतर अखेर त्याने यशाचा
उच्चांक गाठला.
कारण परमेश्वराचे वचन अनुवाद 8 ;18 -- पण तू आपला देव परमेश्वर ह्याचे स्मरण ठेव, कारण त्याने तुझ्या पूर्वजांशी शपथपूर्वक केलेला करार कायम राखण्यासाठी तोच तुला आजच्याप्रमाणे धनप्राप्ती करून घेण्याचे सामर्थ्य देत आहे. या वचनानुसार, देवाने त्याला बुद्धी आणि समज दिली ज्यामुळे तो व्यवसाय पुढे नेण्यास सक्षम झाला. आणि 6 वर्षांच्या मेहनतीनंतर त्याने यशाचा उच्चांक गाठला. न्यूयॉर्क शहरात कोलगेटची जी उत्पादने होती , जे साबण होते ते खूप लोकप्रिय होऊ लागले. त्याच्या मागण्या अचानक वाढल्या. साबणाची मागणी एवढी वाढली की पुरवठा करणे त्यांना अवघड झाले .
विल्यम कोलगेट देवाशी विश्वासू राहातो. William Colgate testimony
कठीण परिस्थितीत देखील विल्यम आपला दशांश परमेश्वराला देण्यास विसरला नाही . तो देत
राहिला . आणि त्याच्या उत्पादनांची मागणी इतकी वाढली की त्याचा व्यवसाय खूप वेगाने
वाढू लागला. विल्यम कोलगेट त्या कारखान्याच्या अकाउंटंटकडे जाऊन म्हणतो, ऐका, तुम्ही वेगळे खाते काढावे अशी
माझी इच्छा आहे. ते प्रभु येशू ख्रिस्ताच्या नावाने स्वतंत्र बँक खाते असेल .
साहेब, काय बोलताय. मला दुसरे बँक खाते उघडायचे आहे , ते
देखील येशू ख्रिस्ताच्या नावाने. विल्यम कोलगेटने म्हटले होय कारण प्रभु येशू
ख्रिस्त माझा भागीदार आहे. मी प्रभु येशू ख्रिस्ताला माझा व्यवसायात भागीदार बनवले
आहे. माझ्या उत्पन्नाचा एक दशांश भाग मी त्यांना देईन असे मी सुरुवातीपासूनच प्रभूला
शब्द दिला आहे कि, त्यांच्या राज्यासाठी देईल. म्हणून तू देवाच्या नावाने बँक खाते
काढावे. आणि असे खाते उघडले जाते, ज्यामध्ये कंपनीच्या जे काही यश , उत्पन्न मिळत
आहे, त्या उत्पन्नाचा एक दशांश थेट त्या खात्यात स्वतंत्रपणे
जमा केला जाईल अशी सोय विल्यम करतो. विल्यम कोलगेटच्या लक्षात येते की, त्याच्या
कंपनीचा व्यवसाय जसजसा उच्च पातळीवर जात आहे तसतशी मागणी वाढतच चालली आहे.
विल्यम कोलगेटची उदारता . William Colgate religion
व्यवसाय करत असताना तो अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या
बॅप्टिस्ट चर्चमध्ये सहभागिता घेत असे. त्यांनी 1808 मध्ये रेव्ह. विल्यम
पार्किन्सन हातून बाप्तिस्मा घेतला, तेथेच त्यांनी डीकन म्हणून काम केले. प्रभूच्या राज्याच्या कार्यात
त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. त्याने प्रभु येशू ख्रिस्ताची विश्वसनीयता ओळखली.
त्याने येशू ख्रिस्ताला आपल्या व्यवसायात भागीदार केले. त्याने येशुकडून मिळत
असलेल्या आशीर्वादाचा अगदी जवळून अनुभव घेतला आणि म्हणूनच विल्यम कोलगेटने ठरवले
की आतापासून मी प्रभु येशू ख्रिस्ताला 10 वा भाग देणार नाही तर 20 वा भाग द्यायला
सुरुवात करेन. जसे कि, कमाईतील 20% द्यायला लागताच त्याचा व्यवसाय वेगाने वाढू
लागला. मग त्याने ठरवले की देवाची विश्वासूता इतकी आश्चर्यकारक आहे की तो त्याच्या
कमाईतील 30% देईल. हे करत असताना त्यांनी 40वा आणि 50वा भागही परमेश्वराला द्यायला
सुरुवात केली.
आजकाल पुष्कळ लोक
दशांश या भावनेतून देतात कि, देव त्यांना अधिक पैसे देईल. हा लोभी भावनेतून आलेला
दशांश आहे. पण विल्यम कोलगेट जो दशांश देत होता. तो दशांश लोभातून नाही, तर प्रेमातून येतो. कृतज्ञतेची भावनेतून होता. जिथे प्रेम आहे, तेथे दया
आहे. देवाने माझ्यावर आणि तुमच्यावर इतके प्रेम केले की त्याने त्याचा एकुलता एक
पुत्र, प्रभु येशू ख्रिस्त आमच्यासाठी देऊन टाकला .
विश्वासाचा आत्मिक पिता अब्राहाम याने उत्पती 14;20 मालकीसदेक याजकाला आपल्या मिळकतीचा दहावा भाग दिला. जर देवाला दशांश दिला तर काही तरी अधिक मिळेल अशी भावना अब्राहामाच्या मनात नव्हती. जेव्हा आपण देवाच्या राज्यात पेरतो तेव्हा कृतज्ञतेची भावना खूप महत्त्वाची असते. आपण देण्याद्वारे परमेश्वराचे आभार मानतो. तू मला दिले आहेस, म्हणून मी देत आहे , ही भावना आपली हवी. परमेश्वराला ‘देणे’ हे आमच्या अंतःकरणातून , कृतज्ञतेने आणि प्रेमाने असावे. आशीर्वाद देणे हे देवाचे भाग आहे . त्याबद्दल विचार आपण करू नये.
जर तुमचे प्रभू येशू
ख्रिस्तावर प्रेम असेल तर तुम्ही जे कमावता त्यातून देवाच्या राज्यात पेरण्यासाठी
तुम्हाला कोणी सांगावा याची गरज लागणार नाही कि, देवाचा दशांश द्या किंवा विसवंश
किंवा 30वा भाग द्या . हे प्रेमाखातर निर्माण झाले पाहिजे. प्रभु येशू ख्रिस्तावर
प्रेम केल्याने देण्याची भावना आपोआप आपल्यामध्ये येते.ज्यामध्ये कुरकुर नसते. नवीन
करारात दशांश द्या असे नाही, परंतु दशांश पेक्षा अधिक देऊ शकता. तुमचे प्रेम आणि
तुमची आर्थिक मदत देवाच्या राज्याच्या वाढीसाठी उपयोगाची आहे.
आज देवाच्या कार्यासाठी देत असताना काहीजण बाधा आणतात. ते सांगतात कि, हा जुन्या कराराचा नियम होता . आज आपल्याला पाळण्याची गरज नाही . निश्चितच त्यांचे सांगणे बरोबर आहे .परतू ते हे सांगत नाही कि, नवीन करार दशांशपेक्षाही अधिक देण्यास सांगतो.देवाच्या राज्याच्या वाढीसाठी त्याची गरज आहे.
विल्यम कोलगेट गरीबासाठी देतो. William Colgate tithing
विल्यम कोलगेट , सुवार्ताकार्याकारीता, गरिबांना
अन्नदानाकारीता , अनाथ आणि विधवांसाठी परमेश्वराच्या
राज्यासाठी देत राहिला. देवबाप त्याचा
उदारता पाहून त्यास व्यवसायात यश देत गेला.
विल्यम कोलगेटने त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या दिवसात उत्पन्नातील 90 टक्के देवाच्या राज्यात खर्च केला. देवाने त्याला खूप आशीर्वाद दिल्याने, त्याच्या कमाईचा फक्त एक दशांश भाग त्याच्यासाठी पुरेसा होता. म्हणून तो प्रभु येशू ख्रिस्ताच्या राज्यासाठी 90% भाग देत राहिला. अशा प्रकारे त्याची कंपनी सर्वात फायदेशीर कंपनी बनली. आणि कालांतराने विल्यम कोलगेट जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक बनला. देवाच्या राज्यात 90 टक्के देणारा देवाचे सेवक विल्यम कोलगेट याने त्याच्या यशाचे श्रेय बायबलला आणि बायबलच्या देवाला दिले.
विल्यम कोलगेट मंडळीत सक्रीय William Colgate Participate Various church Responsibilities
त्याने देवाच्या राज्यात चर्चला फक्त आर्थिक मदतच
नाही तर त्यांनी मानसिक, शारीरिक आणि आध्यात्मिक परिश्रम सुद्धा करत होता. विल्यम कोलगेट हे अमेरिकन बायबल सोसायटीचे बोर्ड मॅनेजर राहिले . नंतर
1850 मध्ये, विल्यम कोलगेटने अमेरिकन बायबल
युनियनची स्थापना केली. जेणेकरून सामान्य माणसालाही बायबल मिळू शकेल.
बायबल सोसायटीमध्ये केलेल्या योगदानाव्यतिरिक्त, विल्यम कोलगेटने हॅमिल्टन लिटररी अँड थिओलॉजिकल इन्स्टिट्यूटला आर्थिक आधार देण्याचा निर्णय घेतला, जे नंतर एक मोठे बायबल कॉलेज आणि थियोलॉजिकल सेमिनरी मध्ये रुपांतर झाले. 1890 मध्ये हॅमिल्टन लिटररी आणि थिओलॉजिकल इन्स्टिट्यूशनचे नाव बदलून कोलगेट करण्यात आले. विल्यम कोलगेट देवाच्या राज्याच्या प्रसारासाठी आणि प्रगतीसाठी बॅप्टिस्ट मिशनरी गटाला मदत करत असे . सुवार्ता करण्यासाठी प्रभूच्या कोणत्याही सेवकाला आणि मिशनरीला कधीही पैसा हा अडथळा ठरू नये, त्यांना कधीही आर्थिक समस्या येऊ नयेत म्हणून अनेक मिशनरी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या खर्चाची जबाबदारी स्वतःवर घेताली . विल्यम कोलगेटने मिशनरींना मदत करण्यासाठी भरभरून दिलेल्या आर्थिक मदतीमुळे अनेक मिशनरी जगातील अशा भागात जाऊ शकले. जिथे आजवर कोणीच गेले नव्हते.
विल्यम कोलगेट अखेरचा निरोप घेतो. William Colgate Finished His Earthly Life
1857 मध्ये वयाच्या 74 व्या वर्षी विल्यम कोलगेट
यांनी या जगाचा निरोप घेतला. तुम्हाला असे वाटत असेल की आता विल्यम कोलगेटची
प्रभूमध्ये झोपी गेलेली कहाणी संपली आहे. साक्ष संपली असे नाही. साक्ष अजून बाकी
आहे. कारण विल्यम कोलगेटने प्रभू येशू ख्रिस्ताला त्याच्या व्यवसायात भागीदार
बनवले होते. तो काल, आज जिवंत आहे आणि युगानुयुग सारखाच
आहे. तो विश्वसनीय आहे. प्रामाणिक आहे.
विल्यम कोलगेट देवासोबत राहण्यासाठी हे जग सोडून गेले. पण तरीही प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवरील कोलगेट नावाच्या एकमेव कंपनीचे भागीदार होते. आणि त्यामुळे ती कंपनी अधिक वेगाने वाढू लागली. प्रभू येशू ख्रिस्ताच्या आशीर्वादामुळे त्याला कोणीही थांबवू शकले नाही. जेव्हा आपण प्रभु येशू ख्रिस्ताला आपला भागीदार बनवतो, मग तो आपला व्यवसाय असो, नोकरी असो, विवाह असो, जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात, तेव्हा तो विश्वासघात करणार नाही.
कंपनीला आशीर्वाद मिळत राहिला. William Colgate Success story
विल्यम कोलगेट या जगातून गेला पण प्रभु येशू ख्रिस्त
त्याच्या कंपनीला आशीर्वाद देत राहिला. ही साबण बनवणारी कंपनी हळूहळू परफ्यूम बनवू
लागली आणि जेव्हा त्यांनी परफ्यूम बनवायला सुरुवात केली तेव्हा त्यांचे परफ्यूम
जगभर प्रसिद्ध झाले. 19 व्या शतकाच्या सुरूवातीस वैयक्तिक उपयोग उत्पादनांची मागणी
वाढू लागली.
कोलगेट कंपनीने टूथ पावडर बनवायला सुरुवात केली आणि नंतर टूथपेस्ट बनवायला सुरुवात केली. कोलगेट व इतर सर्व कंपन्या टूथपेस्ट कॅनमध्ये विकत असे . 18 व्या शतका देवाने विल्यम कोलगेटच्या मुलाला अशी बुद्धी दिली, ज्यामुळे त्याच्या मुलाने ठरवले की आतापासून आपण कोलगेट ही टूथपेस्ट ट्यूबमध्ये विकू. 1896 पासून प्रथमच टूथपेस्ट ट्यूबमध्ये मिळू लागली. त्याबरोबरच इतर वस्तूंचे उत्पादन देखील सुरू केले. प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला आश्चर्यकारकपणे यश दिले .
कंपनीने 100 वर्षे पूर्ण केली. William Colgate quotes
1906 मध्ये या कंपनीने 100 वर्षे पूर्ण केली. तेव्हा विल्यम कोलगेटचे नातू रिचर्ड कोलगेट यांनी म्हटले 1806 मध्ये माझ्या आजोबांनी सुरू केलेल्या कंपनीत प्रभु येशू ख्रिस्ताला भागीदार बनवले. आज या कंपनीला 100 वर्षे पूर्ण झाली आहेत. या जगात खूप बदल झाले आहेत. परंतु प्रभु येशू आजपर्यंत आमच्याशी विश्वासू आहे. प्रभु येशू ख्रिस्ताने माझ्या आजोबांना सांगितले होते की, जेव्हा तुम्ही व्यवसाय कराल तेव्हा तुमच्या ग्राहकांना फसवू नका. परंतु त्यांच्यासाठी सर्वोत्तम उत्पादन बनवा.
त्यामुळे आमची कंपनी लोकांसाठी सर्वोत्तम उत्पादने बनवण्यासाठी वचनबद्ध आहे. 1908 मध्ये ही कंपनी सार्वजनिक झाली. आणि या कंपनीने मौखिक आरोग्य आणि दातांच्या सुरक्षेबाबत जगभरात मोफत मोहीम राबवण्यास सुरुवात केली .आणि अशा प्रकारे मुलांच्या आरोग्यासाठी शाळांमध्ये मोफत टूथपेस्ट आणि ब्रश दिले जाऊ लागले. 1910 मध्ये कंपनीचे कार्यालय जर्सी शहरात हस्तांतरित करण्यात आले, जिथे जगातील सर्वात मोठे घड्याळ स्थापित केले गेले. जे प्रभु येशू ख्रिस्त विश्वासू असल्याची साक्ष देते कि, येशू ख्रिस्त काल, आज आणि युगानुयुग सारखाच आहे. या कंपनीचा भागीदार प्रभु येशू ख्रिस्त आहे . काळ बदलेल, परंतु येशू ख्रिस्त बदलणार नाही.
असंख्य उपकंपनी International Subsidiaries Of Colgate Company
अनेक दशके लोटली आणि कोलगेट लोकांमध्ये लोकप्रिय राहिले .आज, कोलगेटच्या 200 देशांमध्ये पसरलेल्या असंख्य उपकंपनी संस्था आहेत, परंतु ती सार्वजनिकपणे तीनमध्ये सूचीबद्ध आहे . युनायटेड स्टेट्स, भारत आणि पाकिस्तान.
1980 च्या दशकापर्यंत, कोलगेट कंपनी मौखिक आरोग्य , वैयक्तिक काळजी, घरगुती काळजी आणि पाळीव प्राण्यांचे पोषण या क्षेत्रात नाव उंचावले . कोलगेट कंपनीने नेहमीच आपल्या कर्मचाऱ्यांची काळजी घेतली.
1990 नंतर आशियामध्ये मऊ साबण लोकप्रिय झाला. कोलगेटने मेनन कंपनीही विकत घेतली. आणि ते डिओडोरंट बनवायला सुरुवात केली. तसेच ब्राझील आणि स्वित्झर्लंडच्या मोठ्या कंपन्या विकत घेतल्या.1990 च्या दशकातील राजकीय आणि आर्थिक बदलांमध्ये, कोलगेट जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आणि रशिया, कंबोडिया, चीन आणि व्हिएतनाममध्येही ते यशस्वी झाले.
आज मौखिक स्वच्छता उत्पादनांच्या बाबतीत कोलगेट जगातील नंबर वन कंपनी बनली आहे.
तुमच्या कामात, व्यवसायात देवाकडे बुद्धी मागा.
देवाने जशी याकोबाला मदत केली तशी , ज्याप्रमाणे देवाने विल्यम कोलगेटला मदत केली, तशीच तो तुम्हाला मदत करेल कारण प्रभु येशू ख्रिस्त काल,
आज आणि युगानुयुग सारखाच आहे.
जर आपण या जीवनचरित्र वाचून
आशीर्वादित झाला असाल तर पुढे शेअर करा.
धन्यावाद !