What does the bible teach about tithes and offerings? पवित्र शास्त्र दशमांश देण्याबदल काय सांगते ?


 

पवित्र शास्त्र दशमांश देण्याबदल काय सांगते ?   

What does the bible teach about tithes and offerings?

अनेक ख्रिश्चनांना दशमांश देण्याच्या मुद्द्यावर संघर्ष करावा लागतो. काही मंडळया  देण्याच्या बाबती अधिकच गंभीर असतात . आणि त्याच वेळी अनेक ख्रिस्ती व्यक्ती देण्याच्या या नियमाला महत्व देत नाहीत . दशांश / अर्पणे  हे आनंद व अशिर्वादाला दर्शवितात .

what-does-the-bible-teach-about-tithes-and-offerings

दशांश म्हणजे काय ? What is a tithe?

        दशांश ही जुन्या कराराचा नियम आहे. दशमांश ही नियमशास्त्राची अट होती . ज्यामध्ये इस्राएल लोकांनी त्यांनी पिकवलेल्या पिकांपैकी १० टक्के आणि ग्रामपशूंपैकी प्रथमवत्स निवासमंडप/मंदिरात दयावे लागत होते.

    लेवीय २७:३०- भूमीच्या उत्पन्नाचा संपूर्ण दशमांश परमेश्वराचा आहे, मग तो जमिनीचा उपज असो अथवा झाडांची फळे असोत; ते परमेश्वराप्रीत्यर्थ पवित्र होय .

[गणना १८:२६, अनुवाद १४:२४; २ इतिहास ३१:५.] खरेतर, जुन्या कराराच्या दशमांश यज्ञपद्धतीत अनेक प्रकारचे  दशांश समावेश होते - लेवींसाठी एक, मंदिराच्या कामासाठी व संणसाठी एक, आणि गरीब लोकांच्या जमीनीसाठी असे एकूण २३.३ टक्के भाग असत. ज्याव्दारे याजक व लेव्याच्या होमबलीची गरजा पुरविल्या जात होत्या.

नवीन करार दशमांश देण्याबदल काय सांगते ?  Does tithing apply to the New Testament?

        येशू ख्रिस्ताच्या बलिदानाने नियमशास्र पूर्ण झाले. नवीन करार कुठेही आज्ञा देत नाही, किंवा शिफारस देखील करत नाही की ख्रिस्ती विश्वासनाऱ्याने  दशमांश नियमाच्या अधीन राहावे. नवीन करारामध्ये कोठेही अर्पण देण्यासाठी उत्पन्नाची टक्केवारी निश्चित केलेली नाही, परंतु केवळ असे म्हटले आहे की अर्पणे आपल्या मिळकतीनुसार असावी . रोम १६:२-   

नवीन करार दशमांश देण्याबदल कुठेही आज्ञा नसतानाही आज ख्रिस्ती मंडळया दशमांश देण्याबदल नियम का लावतात ?  What does the bible teach about tithes and offerings?

याचे उत्तर , काही ख्रिस्ती मंडळयानी देण्यासाठी जुन्या करारातील नियमानुसार कमीत कमी स्वरुपात १० टक्के दशमांशची पध्दत अवलंबली आहे. हा आता नियम नसून आपणासाठी एक मापन आहे. जुन्या करारात दशांशचा नियम होता . परंतु नवीन करारात उदार अंत:करणाने देण्यास सांगत आहे. 

Offering-vessel

लक्षात घ्या, येशूने जुन्या कराराचे नियम रद्द न करता ते पूर्ण केलेत [मत्तय ५:१७]. उदाहरणार्थ,

१) आम्ही यापुढे प्राण्यांचा बळी देत ​​नाही तर विश्वासणारे म्हणून, आम्हाला जिवंत यज्ञ म्हणून स्वतःला अर्पण करण्यासाठी बोलावले जाते [रोम १२;१ ].  

२) पुरुषांना यापुढे सुंता करणे आवश्यक नाही, परंतु आपल्या सर्वांची पवित्र आत्म्याद्वारे अंतःकरणाची सुंता केली आहे.  

दशमांश आणि अर्पण यात काय फरक आहे ?   What is the difference between tithes and offerings?  

        दशमांश आणि अर्पण यात फरक करण्याचा प्रयत्न करताना, प्रथम दशमांश ही संकल्पना समजून घेणे आवश्यक आहे.. आज ख्रिश्चन सहसा असे विचार करतात की ते त्यांच्या स्थानिक चर्चला जे काही देतात ते दशमांश आहे, प्रत्यक्षात ते अर्पण आहे. दशमांश हे मोशेच्या नियमाचा भाग म्हणून इस्रायली लोकांना देण्यात आलेली आज्ञा होती . ज्यामध्ये सर्व इस्रायली लोकांनी कमावलेल्या आणि वाढवलेल्या प्रत्येक गोष्टीचा १० टक्के मंदिराला द्यायचा होता. नवीन करारात दशमांशचे बंधन नाही. पॉल म्हणतो की विश्वासणाऱ्यांनी त्यांच्या उत्पन्नाचा काही भाग अर्पण म्हणून बाजूला ठेवला पाहिजे, परंतु हा दशमांश नाही .रोम १६:१,२ - .....तुम्ही पवित्र जनांस योग्य असा तिचा प्रभूमध्ये स्वीकार करावा आणि ज्या ज्या कामात तिला तुमची गरज लागेल त्यांत तिला साहाय्य करावे;

अर्पण म्हणजे ख्रिश्चनांनी प्रभूच्या कार्यासाठी, स्थानिक चर्चसाठी / किंवा ख्रिस्तीसेवाभावी  संस्था आणि मिशनसाठी उदारहस्ते दिलेली अर्पण होय . परंतु प्रथम  या  पैशाच्या अर्पणापेक्षा देवाला स्वता;चे समर्पण हवे आहे . रोम १२:१- आपल्या उपासनेचा भाग म्हणून आपले शरीर जिवंत यज्ञ, पवित्र आणि देवाला प्रसन्न करणारे म्हणून अर्पण करा.  पौल स्वतःला अर्पण करण्याचे कारण देतो, कारण ख्रिस्ताने आपणास मोलाने विकत घेउन सार्वकालिक मृत्यूतून जीवनात आणले आहे .

रोम ६:१३ तुम्ही आपले अवयव अनीतीची साधने होण्याकरता पापाला समर्पण करत राहू नका; तर मेलेल्यांतून जिवंत झालेले असे स्वतःस देवाला समर्पण करा आणि आपले अवयव नीतीची साधने होण्याकरता देवाला समर्पण करा.

देवाला आपल्या आर्थिक अर्पणांपेक्षा प्रथम आपली अधीनता आणि आज्ञाधारकपणा हवा आहे. सत्य हे आहे की त्याच्या योजना आणि उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी त्याला आपल्या पैशाची आवश्यकता नाही.  शेवटी, तो सर्स्वचा मालक आहे आणि आपण त्यास काहीही देऊ शकत नाही. कारण आपणाजवळ जे काही आहे ते सर्व त्यांनेच निर्माण केले आहे . स्तोत्र ५०:१० - कारण वनातील सर्व पशू, हजारो डोंगरांवरील गुरेढोरे माझी आहेत..  तथापि, त्याला काय हवे आहे ? तो ज्याला महत्त्व देतो, ते म्हणजे देवाप्रती आभार आणि कृतज्ञतेने भरलेले आपले हृदय. असे हृदय ख्रिस्तामध्ये विपुल प्रेम आणि कृपेला प्रतिसाद म्हणून उदारपणे, स्वेच्छेने आणि आनंदाने देते.

दशमांश किंवा अर्पणे देत असताना कोणत्या विचाराने द्यावीत ?

What-does-the-bible-teach-about-tithes-and-offerings

        प्रत्येक विश्वासणऱ्याना प्रभूचे मार्गदर्शन घेऊन व प्रार्थनापूर्वक दशमांश किंवा अर्पणे द्यावीत. आपले सर्व  देणं किंवा अर्पणे हे पूर्ण शुध्द मनाने व देवाच्या आराधना म्हणून ख्रिस्तासाठी  सेवाभावी  वृतीने असले पाहिजे. २करिथ९:७ - प्रत्येकाने आपल्या मनात ठरविल्याप्रमाणे दयावे दु:खाने किंवा जरुर पडते म्हणुन देवु नये कारण संतोषाने देणारा देवाला आवडतो. 
 

येशूने स्वता;  देण्याविषयी शिकवले आहे .

मत्तय ६;३ - तू तर दानधर्म करतोस तेव्हा तुझा उजवा हात काय करतो हे तुझ्या डाव्या हाताला कळू नये.  
मत्तय २२;२१ - कैसराचे ते कैसराला आणि देवाचे ते देवाला भरून द्या. 
मार्क १२;३० - तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जिवाने, संपूर्ण बुद्धीने व संपूर्ण शक्तीने प्रीती कर. 
लुक ६;३८ - द्या म्हणजे तुम्हांला दिले जाईल; चांगले माप दाबून, हलवून व शीग भरून तुमच्या पदरी घालतील; कारण ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हांला परत मापून देण्यात येईल. 
  

येशूने गरिबास मदत करण्यास देखील उत्तेजन दिले. 

मत्तय १९;२१ - येशू त्याला म्हणाला, “पूर्ण होऊ पाहतोस तर जा, तुझे असेल-नसेल ते विकून दरिद्र्यांस दे म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल; आणि चल, माझ्यामागे ये. 

मत्तय ५;४२ - जो तुझ्याजवळ काही मागतो त्याला दे आणि जो तुझ्यापासून उसने घेऊ पाहतो त्याला पाठमोरा होऊ नकोस. 

मार्क १२;३१ -जशी स्वतःवर तशी आपल्या शेजार्‍यावर प्रीती कर. 

        नवीन करारा देण्याचे तत्त्वे हे एका मुख्य घटकावर केंद्रित आहेत, ते म्हणजे  देवाबरोबरचे आपले नाते. आता परमेश्वराला किती द्यायचे हे ठरवणे ही प्रार्थनेची बाब असू शकते.  जेव्हा आपण आपल्या देवासोबतच्या नातेसंबंधातून देवाचे हृदय जाणून घेण्याचा प्रयत्न करु , तेव्हा किती द्यावे याबद्दल परमेश्वराची इच्छा प्रकट होईल . ती कदाचित दशमांश असू शकते किंवा ती अन्य काही रक्कम असू शकते.

        दशमांश किंवा अर्पण देण्यामागील मुख्य तत्व हे आहे की , आपण आपल्या पैशाने जे करतो ते आपले हृदय कोठे आहे हे दाखवते . मत्तय ६;२१ म्हणते " कारण जेथे तुझे धन आहे तेथे तुझे मनही लागेल." देवाला जेव्हा आपण आपल्या उत्पन्नाच्या १०% किंवा त्याहून अधिक परत देतो, तेव्हा ते हे दर्शविते की, जे काही माझ्याजवळ आहे ते देवानेच दिलेले आहें आणि मी पैशापेक्षा देवावर अधिक प्रेम करतो.

प्रेषित पौलाने सुरुवातीच्या चर्चला वारंवार देण्याविषयी नवीन करारातील तत्त्व शिकवले.

पहिले तत्त्व - पौलाने रोम आणि गलतिया येथील मंडळ्यांना सांगितल्याप्रमाणे साप्ताहिक किंवा मासिक आधारावर नियमितपणे देणे हे नवीन कराराचे पहिले तत्त्व आहे. आमच्या सामुदायिक उपासनेचा एक भाग म्हणून आम्हास नियमित द्यायचे आहे. त्याचप्रमाणे, चर्चच्या सामान्य गरजा आणि आर्थिक जबाबदाऱ्या आहेत ज्या पूर्ण होणे आवश्यक आहे. करिंथ १६:, - आता पवित्र जनांसाठी जी वर्गणी गोळा करायची तिच्याविषयी मी गलतीयातील मंडळ्यांना आज्ञा दिल्याप्रमाणे तुम्हीही करा. आठवड्याच्या पहिल्या दिवशी तुम्ही प्रत्येकाने जसे आपणाला यश मिळाले असेल  त्या मानाने आपणाजवळ द्रव्य जमा करून ठेवावे; अशा हेतूने की, मी येईन तेव्हा वर्गण्या  होऊ नयेत.

दुसरे तत्व -  म्हणजे आपल्या उत्पन्नाच्या प्रमाणात देणे. पौलाने आपण किती समृध्द झालो आहोत आणि आपल्या साधनांनुसार किंवा क्षमतेनुसार द्यायला शिकवले १करिंथ १६: - आठवड्याच्या पहिल्या दिवशी तुम्ही प्रत्येकाने जसे आपणाला यश मिळाले असेल  त्या मानाने आपणाजवळ द्रव्य(पैसे) जमा करून ठेवावे; अशा हेतूने की, मी येईन तेव्हा वर्गण्या  होऊ नयेत.

  २करिंथ :, - जर आम्ही आर्थिकदृष्ट्या समृध्द असेल, तर आम्हाला त्याच मानाने द्यायला हवी. आणि जर आपण आर्थिकदृष्ट्या कमजोर आहोत तर, लहान भेट देखील पूर्णपणे देवाला स्वीकारणीय आहे.
पुढे, नवा करार विश्वासणाऱ्यांना उदारतेने, आणि काही वेळा त्यागातून देण्यास शिकवतो.  प्रेषित २०:३५, २करिंथ :,- ती अशी की, संकटाच्या बिकट परीक्षेत त्यांचा आत्यंतिक आनंद व त्यांचे कमालीचे दारिद्र्य, ह्यांमध्ये त्यांची औदार्यसंपदा विपुल झाली. कारण त्यांनी आपल्या शक्तीप्रमाणे व शक्तीपलीकडेही आपण होऊन दान दिले अशी मी साक्ष देतो.

 तिसरे तत्व -  प्रत्येकाने आपापल्या मनात ठरवल्याप्रमाणे द्यावे; दु:खी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये; कारण संतोषाने देणारा देवालाप्रिय असतो [ फिलिप्पै ४:१६] . दुस-या शब्दात सांगायचे तर, आपले देणे आपल्या स्वतःच्या स्वतंत्र निवडीतून आले पाहिजे. जेव्हा आपण एखाद्या सहविश्वासूला, विशेषत: सुवार्तेच्या सेवकास गरज भासत असते, तेव्हा आपण सक्षम असल्यास ती गरज पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे . गलतीकर ६: - ज्याला वचनाचे शिक्षण मिळाले आहे त्याने ते शिक्षण देणार्‍याला सर्व चांगल्या पदार्थांचा वाटा द्यावा. .
जर या शिक्षणातून आपल्या ज्ञानात भर पडली असल्यास किंवा आपण या शिक्षणाद्वारे आशीर्वादित झाला असाल तर कृपया जरूर इतरांनाही पाठवा . 🙏 🙏

Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url