How did christianity came to india भारत देशात ख्रिस्ती धर्म कोणत्या वर्षी आला ?
संत थॉमसची कहाणी

St. Thomas the Apostle

भारत देशात ख्रिस्ती धर्म कोणत्या वर्षी आला व तो येथे कोणी आणला ?
How did Christianity came to india
चेन्नईमध्ये सॅथोम बॅसिलिका आहे. आणि हे चर्च भारतातील ख्रिस्ती धर्माच्या आगमनाविषयी माहिती देते.
संत थॉमसची कहाणी :
जवळजवळ दोन हजार वर्षापूर्वी यरुशलेम मध्ये प्रभु येशू ख्रिस्तला इसवी ३३ मध्ये वधस्तंभावर खिळण्यात आले. आणि त्यानंतर लवकरच प्रभूयेशूचे शिष्य येशूचा उपदेश घेऊन वेगवेगळ्या देशात गेले .त्यापैकी एक शिष्य म्हणजे संत थॉमस, ज्याने सुवार्ता सांगण्यासाठी भारत निवडला आणि त्याने भारतात येण्यासाठी भूमध्य सागर, लाल समुद्र आणि नंतर अरबी समुद्राद्वारे लांबचा प्रवास करून या देशात प्रवेश केला. काही लोकांचा असा विश्वास आहे की तो अफगाणिस्तानातून येथे आला होता.
संत थॉमस भारत देशात ;
अखेरीस ते भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील केरळ राज्यात पोचले, जेथून त्यांनी येशू ख्रिस्ताचा संदेश लोकांपर्यंत पोहचविण्यास सुरुवात केली, असे सांगितले जाते की त्यांचे संदेश खूप प्रभावी होते आणि लवकरच लोकांनी त्यांचे संदेश ऐकण्यासाठी गर्दी करायला सुरुवात केली.
सर्वप्रथम त्यांच्या प्रभावाने बर्याच ब्राह्मणांनी ख्रिस्तास स्वीकारले. या ब्राह्मणांना भारतातील सुरवातीचे ख्रिश्चन असल्याचा अभिमान आहे. केरळच्या क्रंगानोर, पलायूर आणि अव्हेलॉन आणि इतर भागांतील बर्याच ज्यू व ब्राह्मण कुटुंबांनी ख्रीस्तास स्वीकारले. हळूहळू ख्रिस्तला केरळ आणि तमिळनाडूच्या अनेक कुटुंबांनी स्वीकारले. नंतर त्यांनी भारताच्या पूर्वेकडील किनार्यावर सुवार्तेचा प्रसार केला.
अगदी कमी वेळातच केरळ राज्यात चर्च स्थापन होण्यास सुरवात झाली. त्या काळातील चर्च म्हणजे मोठ्या इमारती नसून तारण पावलेले लोकसमूह होय . आजही या गटातील ख्रिस्ती लोक केरळमध्ये आहेत त्यांना "थॉमस ख्रिश्चन" म्हणून ओळखले जातात. त्यांनी ईसवी ५२ ते ईसवी ७६ दरम्यान ख्रिस्ती धर्माची ओळख भारताला करून दिली , इतक्या वर्षापासून ख्रिस्ती धर्म भारतात आहे.
काय आपणास माहित आहे का ? की आपला भारत त्या देशांपैकी एक आहे, जेथे ख्रिस्ती विश्वासाने सर्वप्रथम आपली मुळं स्थापन केली . आणि हे अधिक चांगल्याप्रकारे समजून घेण्यासाठी हे माहित असणे आवश्यक आहे की, भारतात सुवार्ता पोहचल्याच्या २५० वर्षांनंतर ख्रिश्चन धर्माचा अधिकृतपणे स्वीकारणारा पहिला युरोपियन देश म्हणजे आर्मेनिया हा देश आहे जेथे ख्रिस्ती धर्म ईसवी ३०१ मध्ये दाखल झाला. केरळमधील थॉमस ख्रिश्चन हे जगातील सर्वात प्राचीन ख्रिश्चन आहेत.
संत थॉमसचा मृत्यू ;

Thomas killed in india

असे म्हटले जाते , संत थॉमस केरळ किनारपट्टीवर उतरल्यानंतर काही वर्षांनी चेन्नईजवळील पायी प्रवास करून मायलापोरच्या काठावर पोहचले. आज "लिटल माउंट" म्हणून ओळखल्या जाणा-या ठिकाणी तो राहत असे , दररोज काही किलोमीटर दूर समुद्रकाठच्या लोकांना भेट देऊन येशूविषयी बोलत असे. इथेही त्यांचे उपदेश खूप प्रभावी होते आणि असे सांगितले जाते की तेथील राजेसुद्धा संत थॉमसचे संदेश ऐकायला येत असत. त्याच्याकडून होत असलेले चमत्कार , सुवार्तेचे कार्य आणि लोकप्रियतेमुळे त्याच्यासाठी शत्रू देखील निर्माण झाले. शत्रू एकत्र येऊन संत थोमाला ठार मारण्याचा निर्णय घेतला. एक दिवस तो लिटल माउंटवर प्रार्थना करीत असताना काली देवीच्या पुजार्यांनी एकत्र येऊन त्याच्यावर हल्ला करण्यात आला. तो तेथून पळता पळता थकून जवळच्या टेकडीवर पोहचला असता तेथेच त्यास भाल्यांनी बोसकून ठार करण्यात आले. ज्या टेकडीवर तो रक्तसाक्षी झाला आज त्या टेकडीस "संत थॉमस माउंट" म्हणून ओळखले जाते. त्याच्या अनुयायांनी तेथून त्याचा मृतदेह ज्या ठिकाणी तो दररोज उपदेश करीत तेथे त्याच ठिकाणी समुद्रकाठी मायलापूर येथे आणून त्यास पुरण्यात आले. आणि येथे त्याच्या अनुयायांनी एक भव्य चर्च बांधले . त्याची कबर आजही मायलापूर येथे पाहण्यास मिळते .
पुढील १४०० वर्षे बहुतेक लोक संत थॉमसला विसरले, परंतु कधीकधी पर्शिया, आर्मेनिया आणि इतर पूर्व-पूर्व देशांमधील लहान ख्रिस्ती समूह , पैकी बहुतेक नेस्टोरियन ख्रिश्चन चेन्नईत येऊन संत थॉमसची स्मरण करून त्यांच्या आठवणी ताजेतवाने करीत.
ईसवी १५०० पोर्तुगीज चेन्नई येथे व्यापारासाठी आले तेव्हा त्यांना संत थॉमस यांच्या कथांविषयी आणखीन खात्री मिळाली. ते संत थॉमस यांच्या कार्याविषयी चांगले परिचित होते. अर्मेनियन व्यापाऱ्यानी त्यानां चेन्नईतील थोमाच्या कबरेवर नेले, तेथे पोर्तुगीजांनी थोमाच्या कबरेवर पोर्तुगीज वास्तुकलेनुसार एक छोटेशे चर्च बांधले.
संत थॉम ऑफ बॅसिलिका
१६०० च्या दशकात जेव्हा इंग्रज चेन्नईला आले तेव्हा त्यांनी तेथील किना-यावर आपला अधिकार स्थापित केला. १८९० च्या दशकात त्यांनी पोर्तुगीज चर्चपेक्षा इंग्रजी वास्तुकलेनुसार चर्चचे नूतनीकरण करण्याचा निर्णय घेतला. आणि अशा प्रकारे आता एक अतिशय सुंदर निओ-गॉथिक आर्टचे कॅथेड्रल मिळाले जे आज "संत थॉम ऑफ बॅसिलिका" म्हणून ओळखले जाते.
![]() |
Santhome_Basilica |
संत थॉमस बॅसिलिका ही सर्वात मोठे चर्च पैकी नसेल, परंतु ते खूप महत्वपूर्ण चर्च आहे. पोर्तुगीज लोकांनी संत थॉमसची कबर शोधून काढल्यानंतर थॉमसचे अवशेष युरोपला नेण्यासाठी अनेक प्रयत्न केले .प्रथम त्याला इराकमधील एडेसा येथे , नंतर ग्रीसमधील किओस आणि शेवटी इटलीमधील ओटूना येथे नेण्यात आले. या सर्व ठिकाणी संत थॉमस उत्साह साजरा केला जातो. परंतु संत थॉमसच्या थडग्यावर बॅसिलिका बांधल्याचा चेन्नईला अभिमान आहे. संत थोमा यांना भारताचे प्रेषित म्हणतात
काय तुम्हाला माहिती आहे ? जगात फक्त तीनच चर्च येशू ख्रिस्ताच्या शिष्यांच्या अवशेषांवर बांधले आहेत. हे व्हॅटिकन मधील संत पीटर, स्पेन मधील संत जेम्स आणि चेन्नई मधील संत थॉमस , यामुळे या चर्चला एक विशेष स्थान प्राप्त झाले आहे.
ही भारतातील ख्रिश्चन धर्माच्या आगमनाची कहाणी आहे. युरोपपेक्षाही ख्रिश्चन धर्म हा भारतात अगदी २५० वर्ष जुना आहे.
अधिक माहिती ऐकण्यासाठी पुढील
व्हीडीओवर क्लिक करा .🙏🙏
कृपया ही माहिती आपणास आवडल्या असल्यास जरूर पुढे पाठवा .
धन्यवाद ... 🙏🙏🙏
Nice Information Pastor. Thank you Pastor.