William Carey विल्यम केरी


मिशनरी चळवळीचा पिता 
William-Carey

William Carey

विल्यम केरी १७६०-१८३४

     जर तम्ही विल्यम केरी सारख्या साध्या घरात राहणाऱ्या, बुट दरूस्त करणाऱ्या लहान मुलाला पाहिले असते तर तुम्ही हा एक दिवस आधुनिक मिशन चळवळीचा पिता बनेल आणि तो बायबल जगाच्या १/३ भागात घेऊन जाईल असा कधीच विचार केला नसता.

एक लहान मुलगा म्हणूनः

      विल्यम केरी कडे लहानपणापासून चिकाटी होती. जर त्याने एखादे धाडसी कृत्ये करण्यास सुरूवात केली तर ते तो पूर्ण केल्याशिवाय राहात  नसे. त्याला नेहमी शूर व धाडसी काम करायला आवडे. एकदा एका पक्ष्याचे घरटे पाहण्यासाठी तो एका झाडावर चढला आणि तो त्या झाडावरून खाली पडला. त्याच्या आईने त्याच्या जखमांना मलमपट्टी केली आणि त्याला बिछाण्यावर पडून राहायला सांगितले होते. परंतू छोटा विल्यम केरी अपयश स्विकारणारा व्यक्ति नव्हताच. आणि तो आईची नजर चुकून बाहेर पडला , त्याच्या आईने त्याची शोधा शोध सुरू केली. परंतु जेव्हा तो परत आला तेंव्हा त्यांनी त्याच्या हातात पक्ष्याचं घरटे पाहिले.

          विल्यम केरी ला खेळ व प्रवास करणे. फार आवडत असे . कोलंबस हा त्याचा आवडता नायक होता तो नेहमी कोलंबसा विषयी बालत असे म्हणून त्याच्या मित्रांनी त्याला कोलंबस हे टोपण नांव दिले होते. तो निसर्गावर प्रेम करी. तो वनस्पती, रोपटे कृमी किटक आणि पक्षी जे त्याला शेतात दिसत त्याचे संकलन करून तो त्यांचा अभ्यास करीत होता. सर्वांपेक्षा जास्त त्याला प्रवास व शौर्य कृत्यावर लिहिलेली पुस्तके वाचण्याचा छंद होता . त्याला निरनिराळ्या भाषा शिकण्याची आवड होती. त्याने  त्याच्या बालपणातच लॅटीन भाषा शिकायला सुरूवात केली होती.

एक चांभार म्हणूनः
William-Carey , विल्यम-केरी

१२ वर्षांचा असतांना त्याने शिक्षण थांबविले तेंव्हा त्याच्या वडिलांनी त्याला एका चांभाराकडे धंदयाचे शिक्षण घेण्यासाठी ठेवले. त्यावेळी त्याला धर्माबद्दल कोणतीच आवड नव्हती. हे मात्र सत्य होते की, तो चर्चमधील  उपासना गीत म्हणणारा सभासद असून चांगल्या ख्रिस्ती कुटुंबातील होता. परंतू इतर गायकांप्रमाणे त्याच्यामध्ये  अशुध्द गोष्टी बोलणे , लबाडी करणे, आश्वासने देणे इ. गुण होते . तरी सुध्दा त्याच्या  मित्रापैकी एक नवशिका युध्दाचा बळकट साक्षी म्हणून त्याच्या सद्सदविवेक बुध्दीला टोचणी द्यायचा .


          म्हणून विल्यम केरीने अधुन मधून प्रार्थना करायला सुरूवात केली. एकेदिवशी त्याने त्याच्या शिक्षकांचे शिल्लिंग नाणे चोरले आणि त्याऐवजी त्या जागी नकली नाणे ठेवून दिले त्याच्या शिक्षकांनी ते शोधले आणि सर्वांसमोर त्याला अपमानित  केले. या प्रसांगाने  विल्यम केरी ला नम्र केले. त्यामुळे देवाला त्याच्या हृदयात काम करणे शक्य झाले. आपण पापी आहोत याची जाणीव त्याला झाली. त्याच्या पाळकांनी म्हटले, चर्चला गेल्याने किंवा चांगले कृत्य केल्याने कोणीही ख्रिस्ती बनतो असे नाही ,तर ख्रिस्ताचा स्विकार केल्याने ख्रिस्ती बनतो.हे ऐकून तो फार गंभीर झाला व शेवटी त्याने गुडघे टेकले आणि रडून प्रार्थना करीत म्हणाला, “ प्रभू येशू, माझ्या हृदयात ये आणि माझी पापे धुवून टाक. मी आताच तुला स्विकारतो." अगदी त्याच क्षणाला ख्रिस्त त्याच्या अंतःकरणात आला.
        मोची कामाशिवाय, तो इंग्लडमधील मॉल्टन येथे एका लहान चर्चमध्ये पाळक म्हणून सेवा करीत होता. विल्यम केरी म्हणत असे, माझे काम देवाचे राज्य वाढविणे आहे आणि माझा खर्च भागविण्यासाठी मी बुट दुरुस्ती  करतो. विल्यम केरी बुट दुरूस्त करीत असतांना त्याच्याजवळ असलेल्या पुस्तकांचे वाचन करीत असे. अशाप्रकारे तो ग्रीक व लॅटीन भाषा शिकला. शिवाय तो फ्रेंच, इटालियन आणि डच या भाषा शिकला. हिब्रु शिकण्यास त्याला शिक्षक शोधण्यासाठी ९ मैल पायी चालावे लागले होते.

एक पाळक म्हणूनः


          त्या वेळी विल्यम केरीला कॅप्टन कुक याची जलपर्यटन सहासे वाचायला मिळाली. तेव्हा त्याला दक्षीण समुद्री बेटांवर हजारो लोकांना सुवार्ता देण्याची गरज जागृत झाली . त्याने स्वतः जगाचा नकाशा तयार केला आणि त्याच्या कामाच्या जागेवरील भिंतीवर तो चिकटवून दिला. त्यावर त्याने निरनिराळया देशांची लोकसंख्या आणि त्यासोबत इतर गोष्टी लिहिल्या. प्रत्येक दिवशी सकाळी तो नकाशाकडे पाही आणि बाकाच्या बाजूला गुडघे टेकून येशू शिवाय असणाऱ्या राष्ट्रांसाठी प्रार्थना करीत असे. अशाप्रकारे ज्यांनी सुवार्ता ऐकली नाही अशा लोकांच्या ओझ्यानं त्याचे अंतःकरण भारावून जात असे.

           त्याने एक प्रार्थना गट तयार केला. तो गट ज्यांनी ख्रिस्ताबद्दल ऐकलेले नाही. त्यांच्यासाठी प्रार्थना करीत असे. त्याने ही मिशन विषयीची गरज इतर पाळक लोकांना बोलून व लिहून कळविली. पाळकांच्या सभेमध्ये त्याने फक्त सुवार्ता न पोहचलेल्या देशाबद्दलच्या ओझ्याबद्दलच केवळ नव्हे तर पाळक या नात्याने त्यांच्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून देऊन त्याना त्याविषयी विचार करायला लावले. एक वृध्द पाळक साहेब मोठयाने  ओरडून म्हणाले, “खाली बस, तरूण माणसा ! जर देवाला इतर धर्मातील लोकाना सोडवायचे असेल तर तो ते आपल्या मदती शिवाय करू शकतो. विल्यम केरीला इतर सर्व पाळक लोकांमध्ये अपमान सोसावा लागला. परतू जसा बालपणापासून काही गोष्टी शिकत आला होता त्याने त्याचे मिशन कार्य पुढे चालू ठेवले.
सन १७९१ मध्ये विल्यम केरीची पाळकपणाची दिक्षा झाली . त्याचे  धार्मिक लोकांमध्ये चांगले नावं होते. सन १९७२ मध्ये त्याला पाळकांच्या वार्षिक सभेमध्ये बोलण्याचे आमंत्रण मिळाले. त्याच्या संदेशासाठीचा मुख्य विषय हा होता. परमेश्वराकडून मोठया गोष्टींची अपेक्षा बाळगा आणि देवासाठी मोठया गोष्टी करा." या वाक्याने सर्वांना हेलावून सोडले. या मिटिंगचा परिणाम म्हणून बॅप्टीस्ट मिशन चळवळ सुरू झाली आणि त्यांनी पाहिले मिशनरी पाठविण्याची तयारी केली.

केरी भारतामध्येः


          आता विल्यम केरी मिशनरी म्हणून जाण्यास तयार झाला. परतू त्याने विचार केला कुठे जायचे ? दक्षिण समुद्री बेटे किंवा पश्चीम आफ्रिका. परंतू विल्यमकेरीकरिता भारत होता. म्हणून देवबापाने डॉ. थॉमसला विल्यम केरीकडे पाठविले कारण त्याने भारताला भेट दिली होती. त्या माणसाची उत्सुकता व हेतुंनी केरीला धरून ठेवले. म्हणून त्याने भारतात मिशनरी म्हणून जाण्याचा निश्चय केला. नवीन मिशन चळवळीच्या पुढाऱ्यांनी आणि थोडया इतर लोकांनी त्याला प्रार्थना व आर्थिक मदतीचे वचन दिले. केरी ३३ वर्षाचा होता तेव्हा त्याने मिशनरी म्हणून भारतात जाण्याचा निश्चय केला होता.

        पुष्कळ नियोजन केले होते तरी काही अडथळे निर्माण झाल्यामुळे थोडा विलंब झाला होता. केरी आणि डॉ. थॉमस हे सन १३ जून १७९३ रोजी भारतात जाणाऱ्या जहाजात बसले. प्रवासातील पुष्कळ अडचणींना तोंड देत देत ते दोघे नोव्हेंबर महिन्यात भारतातील कलकत्ता शहरात पोहचले. करीबरोबर त्याची बायको ४ मुले आणि बायकोची बहिण (मेव्हणी) आले होते ,परंतू तरी त्यांना ख्रिस्तासाठी भारतीयांना भेटण्यास कुठल्याही प्रकारची आवड नव्हती. त्याचे मित्र व नातेवाईकांना केरीच्या हातात पैसे नसतांना व कोणी जास्त लोक त्याला सहाय्य करणारे नसतांना दुसऱ्या देशात जाण्यास वेडा झाला आहे असे वाटले. परंतू केरी आवेशी व आशावादी होता. त्याच्या दूरच्या जलपर्यटनाच्या काळातच त्याने बंगाली भाषा शिकायला सुरूवात केली होती. त्यानंतर तो हिंदी, पारशी, मराठी आणि संस्कृत या भाषा शिकला. भारतात आल्यानंतर बायबल वचनांचे भाषांतर बंगाली भाषेमध्ये  करून त्याने सुवार्ता सांगितली होती. खरोखर देवाने त्याला भाषा शिकण्याची तीव्र इच्छा देऊन स्वतःला मिशन कार्यासाठी तयार केले होते.

        जेव्हा तो भारतामध्ये वास्तव्यास होता. तेव्हा पहिल्याच वर्षी कुटुंबातील प्रत्येक सदस्य एका नंतर एक आजारी पडत होते. त्याचा ५ वर्षांचा मुलगा पीटर  विषमज्वराने मृत्यु पावला कोणीही हिंदू किंवा  मुसलमान कबरेचा खड्डा खणण्यासाठी पुढे आला नाही. केरी आजारीपणामुळे अशक्त झालेला असतांना देखील त्याने स्वतःच मुलासाठी  कबर खोदायला सुरूवात केली. नंतर दोन नोकर त्याला मदत करायला पुढे आले. केरीला या कृतज्ञतेपोटी रडू कोसळले.
स्वतःचे व कुटुंबाचे संरक्षणासाठी कॅरीने इंडीगो इंडस्ट्रीमध्ये व्यवस्थापकाची नोकरी केली. त्याच्याकडे बायबलचे वचन छापण्यासाठी छपाई यंत्र होते. काही काळानंतर त्याचे काम सुटले होते . त्याचे  छपाई यंत्र आगीमध्ये भस्मसात झाले होते. आशा परिस्थितीठी  तो हिम्मत हारला नाही . त्याचा फक्त एकच प्रश्न होता, मी भारताला कशी मदत करू शकतो ?

देव कॅरीचा उपयोग करतोः

सात वर्षांच्या कठीण परिश्रमानंतर पहिला बाप्तिस्मा कृष्णपल ला   दिला. जरी कृष्णला ख्रिस्ती झाल्यामुळे  अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. तो प्रामाणिक होता म्हणून पुष्कळाना  त्याने ख्रिस्ताकडे आणले.
william-cary-biography

       सन १७९८ मध्ये केरीला मदत करण्यासाठी  इंग्लंडमधील ४ माणसे आली . त्यांनी सेरामपूर मध्ये मोठे मिशन सेंटर बांधले. तसेच  भारतामध्ये वेगवेगळया ठिकाणी त्यांनी मुलांमुलींसाठी पुष्कळ शाळा सुरू केल्या. त्यांच्याकडे बायबलवचने व छोटी पुस्तके छापण्यासाठी  एक फार मोठी प्रिंटींग मशीन होती.
        दोन वर्षानंतर सन १८३४ मध्ये ते स्वर्गवासी झाले आणि  त्याचे  ज्या भारतावर प्रेम होते तेथेच त्यांना पुरले. त्यांनी ४१ वर्षे भारतातच घालविली आणि एकदा सुध्दा ते इंग्लडला परतले नाही. त्याच्या श्रमाचं फळ आजही तेथे आहे. कुठल्याही प्रकारची शंका न धरता आम्ही त्यांना म्हणू शकतो.आधुनिक मिशन चळवळीचा पिता !"

थोडक्यात केरीचे कार्य 


william-carey

     1800  मध्ये, केरी यांनी सेरापूर हाविद्यालयाची स्थापना केली. त्यांनी अनाथ घर आणि कुष्ठरोगाचे रुग्णालय देखील स्थापन केले. त्यांनी कलकत्ता येथील शासकीय महाविद्यालयात बंगालीचे प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. नंतर त्यांनी त्या महाविद्यालयात मराठी आणि संस्कृत शिकवले. त्यांनी 30 वर्षे प्राध्यापक म्हणून काम केले. पगाराचा बराचसा भाग सेवाकार्यासाठी दिला . केवळ थोडासा भाग ते  स्वत: साठी ठेवत .
          मृत्यूपूर्वी त्याने  40 पेक्षा जास्त भाषांमध्ये नवीन कराराचे भाषांतर केले होते आणि यापैकी सुमारे 20 भाषांमध्ये त्यांनी जुने आणि नवीन करार यांचे भाषांतर केले आहे. असे म्हटले जाते की त्याने बायबल जगातील एक तृतीयांश लोकांना दिले.

               तसेच, त्यांच्या प्रभावामुळे सरकारने पतींच्या अंत्यसंस्काराच्या वेळी विधवांना जिवंत जाळण्यास मनाई करणारा कायदा संमत केला. गंगा नदीत टाकून मुलांचा त्याग करण्याची प्रथा बंद करण्यास त्याचे योगादान मोठे  होते . या सर्व कामात केरीने स्वःताला नेहमी एक लहान नोकर म्हणून मानले . आपल्या शेवटच्या दिवसांत भेट दिलेल्या मित्राला ते म्हणाला,  "मी गेल्यावर कधीही  डॉ. कॅरीविषयी बोलू नका – तर  केरीच्या तारणर्याबद्दल बोला."


तरूणांसाठी विचार

         विल्यमकेरीने आपला देश सोडून दिला, ४१ वर्षे त्यांनी भारतावर प्रिती करून भारतीयांसाठी कार्य केले. पुष्कळ सामाजिक सेवा केल्या. त्यामुळे भारतीयांना खऱ्या परमेश्वराची ओळख होण्यास मदत झाली. आज आम्हाला आमची परिस्थिती कशी दिसते ? आम्ही काही क्षण विचार करू शकतो का? आम्ही आमच्या मंडळीसाठी आणि देशासाठी काय केले आहे ? चर्च मंडळीच्या वाढीच्या संदर्भात आमची काय भुमिका आहे ? केरीने प्रभूचे कार्य फार समर्पणाने व त्यागाने केले. ते म्हणतात, “देवापासून महान गोष्टींची अपेक्षा करा आणि देवाकरिता मोठे कार्य करा " आज विल्यम कॅरीप्रमाणे पुष्कळ तरूणांना मंडळीमध्ये व समाजामध्ये उभे रहावे लागेल ते तुम्ही का असू शकत नाही ? प्रिय तरूणांनो, विचार करा. तुम्ही कोणत्याही वस्तुस्थितीत असाल तरी तुम्ही उठून आपल्या प्रेमळ प्रभू येशूसाठी चमकु शकता.

Please Share and encourage others too.   ....!


Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url