Hell in the bible नरक
नरक हेही वास्तविक ठिकाण असून खरे तर सैतान व त्याच्या दुष्ट दूतांसाठी तो तयार करण्यात आला होता. परंतु लोकांनी येशू ख्रिस्ताद्वारे मिळणाऱ्या स्वर्गाचा नाकार केला तर त्यांना नरकात जावे लागणार. नरक हे भयंकर यातनांचे ठिकाण आहे. माणसे सैतानाने निर्माण केलेल्या मोहात पडतात व नरकाचे भागीदार होतात. पापाबद्दलच्या नरक यातना पृथ्वीवर नव्हे,तर नरकात भोगाव्या लागतात. नरकही सार्वकालिक आहे.
१. नरक काय आहे ? Definition of hell
देवाच्या समक्षतेपासून दूर जाणे म्हणजे नरक होय.
२ थेस्सल.१:९ ... त्याच्या सामर्थ्याच्या गौरवापासून दूर करण्यात येऊन युगानुयुगाचा नाश ही शिक्षा त्यांना मिळेल. नरक त्रासाचे व शिक्षेचे ठिकाण आहे. .
लूक.१६:२३ तो अधोलोकात यातना भोगीत असता त्याने आपली दृष्टी वर करून ......
काही उपहास करतात आणि विचारतात,"नरक कोठे आहे ?” पवित्र शास्त्र सांगते का, तो “खाली" आहे.
यशया १४:९ - खाली अधोलोकात तुझ्या स्वागतार्थ गडबड उडाली आहे. यहेज्केल ३२:२७- जे...अधोलोकी गेले... गणना१६:३०-३३- पृथ्वीने आपले तोंड उघडून ह्यांना व ह्यांच्या सर्वस्वाला गिळून टाकले.
Hell meaning
नरक या विषयावरचा अभ्यास करताना नरकाच्या ज्या निरनिराळ्या संज्ञा आर त्यामुळे समस्या निर्माण होते.मूळ भाषेत या संज्ञा वापरल्या आहेत :
१) शेओल ; २) गेहेन्ना. ३) हेडीस
१) शेओल Sheol ;
जुना
करार मध्ये मृतांच्या ठिकाणाचे वर्णन
करण्यासाठी वापरलेला हिब्रू शब्द म्हणजे शेओल (अधोलोक) .याचा सरळ अर्थ “मृतांची जागा ” किंवा “ शरीर
सोडून गेलेल्या आत्म्यांचे ठिकाण आहे.
२) हेडीस Hades ;
नवीन करारात ग्रीक शब्द हेडीस हा शेओल शब्दाला पर्याय शब्द आहे.
३) गेहेन्ना Gehenna ;
नवीन करारात ग्रीक शब्द गेहेन्ना हा “नरक” साठी वापरला गेला आहे जो हिन्नोम या हिब्रू शब्दापासून आला आहे. याचाहि अर्थ “मृतांची जागा ” किंवा “ शरीर सोडून गेलेल्या आत्म्यांचे ठिकाण ” आहे.
नवीन करारामध्ये असे सूचित करते की, शिओल / हॅडीस हे शेवटच्या पुनरुत्थानाची वाट पहात असलेल्या लोकांच्या जीवात्मेचे तात्पुरते स्थान आहे.
नीतिमानांचे आत्मे मृत्यूच्या वेळी थेट देवाच्या उपस्थितीत जातात – ज्यास "स्वर्ग," "सुखलोक" किंवा " अब्राहामाचे ऊर " म्हटले आहे . लूक २३;४३ ,२ करिंथकर ५;८ ,फिलिप्पै १;२३ .
केवळ प्रकटीकरण १९ : २० आणि २०:१०, १४-१५ मध्येच नरकास अग्नीचे सरोवर म्हटले आहे जे अंतिम नरक आहे, जेथे सर्व पश्चात्ताप न करणारे मानव आणि बंडखोर देवदुंत अशा दोघासाठी सर्वकाळ शिक्षेचे ठिकाण आहे
नरकाचे दरवाजे Gates of hell
"नरकाचे दरवाजे" या शब्दाचे भाषांतर काही आवृत्त्यांमध्ये "हेड्सचे दरवाजे" म्हणून केले जाते. संपूर्ण पवित्र शास्त्रात मत्तय १६;१८ मध्ये एकदाच “नरकाचे दरवाजे” किंवा “अधोलोकाच्या द्वारांचे ” संदर्भ आढळतो . या ठिकाणी , येशू आपल्या मंडळी बाबत उल्लेख करतो कि, “आणखी मी तुला सांगतो, तू पेत्र आहेस आणि ह्या खडकावर मी आपली मंडळी रचीन व तिच्यापुढे अधोलोकाच्या द्वारांचे काहीच चालणार नाही ”.
२. नरकाचे उगमस्थान
नरक खरे तर सैतान व त्याच्या दुष्ट दूतांसाठी तयार करण्यात आला होता. मत्तय.२५:४१ - अहो शापग्रस्तहो, माझ्यापुढून निघा आणि सैतान व त्याचे दूत ह्यांच्यासाठी जो सार्वकालिक अग्नी सिद्ध केला आहे त्यात जा.
माणसांसाठी नरक निर्माण केला नव्हता, परंतु माणसे येशू ख्रिस्ताद्वारे मिळणारा स्वर्ग नाकारतात,तर त्यांना सैतानाबरोबर कायमचे नरकात राहिले पाहिजे.
३. नरकाचा आकार
माणसानेच तेथे जाण्यासाठी आग्रह केल्यामुळे देवाला नरकाचा आकार वाढवावा लागला.
यशया ५:१४ - ह्यामुळे अधोलोकाने आपली क्षुधा वाढविली आहे, आपले तोंड अमर्याद पसरले आहे. नीति.२७:२० - अधोलोक व विनाशस्थान ही कधी तृप्त होत नाहीत.
४ नरकाचे वर्णन

lake-of-fire

२. नरक त्रासाचे ठिकाण आहे. लूक.१६:२३ - तो अधोलोकात
यातना भोगीत असता त्याने आपली दृष्टी वर करून ...
३. नरक अग्नीचे ठिकाण आहे . मत्तय.१३:४२ - त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकतील; तेथे रडणे व दात खाणे चालेल. प्रकटी. २०:१५ - ज्या कोणाचे नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेले नाही, तो अग्नीच्या सरोवरात टाकला जाईल.
४. नरक किड्यांचे ठिकाण आहे. मार्क.९:४४,४६,४८- जेथे ...किडा मरत नाही व अग्नी विझत नाही.
५. नरकात इतरांना ओळखण्याची पात्रता असते . माणसाला इतरांना ओळखण्याची पात्रता होती.
लूक.१६:२३ - तो अधोलोकात यातना भोगीत असताना त्याने आपली दृष्टि वर करून अब्राहाम व त्याच्या उराशी बसलेला लाजर ह्यांना दुरून पाहिले.
६. नरकात प्रार्थना ऐकली जात नाही . माणूस तेथेही प्रार्थना करतो,पण त्याची विनंती नाकारली जाते.
लूक. १६:२७,२९ - मग तो म्हणाला, तर बापा, मी विनंती करितो. त्याला बापाच्या घरी पाठव ... पण अब्राहामाने म्हटले, त्यांच्याजवळ मोशे व संदेष्टे आहेत त्यांनी ऐकावे.
७. नरकात स्वतःची इच्छा असणार
माणसाला तेथेही इच्छा निर्माण होते. त्याला पाणी पिण्याची इच्छा निर्माण झाली . त्याच्या लोकांनी इकडे (नरकात) येऊ नये म्हणून संदेष्ट्याने इशारा देण्यास पृथ्वीवर जावे असे त्याला वाटले.
लूक.१६:२४ - तेव्हा त्याने हाक मारून म्हटले,हे बापा, अब्राहामा,माझ्यावर दया करून लाजराला पाठीव. ह्यासाठी की, त्याने आपल्या बोटाचे टोक पाण्यात बुडवून माझी जीभ थंड करावी...
५ नरकाची मर्यादा ; स्वर्ग व नरक हे सार्वकालिक आहेत.

eternal fire

मत्तय.२५:४६ - ते तर सार्वकालिक शिक्षा भोगावयास जातील आणि नीतिमान सार्वकालिक जीवन भोगावयास जातील.
६. या सिद्धान्तावरील आक्षेप
१. देवाच्या प्रीतीशी हा सिद्धान्त विसंगत आहे
पवित्र शास्त्र देवाच्या प्रीतीविषयी सांगते. तसेच देवाच्या न्यायीपणाविषयी व पवित्रतेविषयीही सांगते. देव समतोल वृत्तीचा आहे. तो प्रेमळ आहे आणि न्यायीही आहे.
२. सार्वकालिक शिक्षा
सार्वकालिक शिक्षेची गरज आहे का ? शेवटी सर्व पापे फेडली जाणार नाहीत का? . प्रत्येक पापासाठी मरणाची शिक्षा आहे.
रोम.६:२३ - पापाचे वेतन मरण आहे
३. शिक्षा झालेल्या व्यक्तीला पश्चात्ताप करून, प्रभचा धावा करून नरकात क्षमा मिळणार नाही का ?
तारण या जीवनापुरतेच मर्यादित आहे. शिक्षा झालेल्या व्यक्तीच्या सर्व भावना नाकारल्या जातात.
लूक. १६:२५,२६,२९,३१ - अब्राहाम म्हणाला, मुला,तू आपल्या आयुष्यात सुख भरून पावलास, तसा लाजर आपले दुःख भरून पावला ह्याची आठवण ह्याला समाधान मिळत आहे व तू क्लेश भोगीत आहेस; एवढेच नव्हे तर तुम्हांकडे पार जाऊ पाहतात त्यांस जाता येऊ नये व तिकडून कोणी आम्हांकडे येऊ नये म्हणून आमच्या व तुमच्यामध्ये मोठा दरा स्थापिलेला आहे .पण आब्राहामाने त्याला म्हटले. त्यांच्याजवळ मोशे व संदेष्टे आहेत, त्यांचे त्यांनी ऐकावे ... तेव्हा त्याने त्याला म्हटले,ते मोशेचे व संदेष्ट्यांचे ऐकत नसतील तर मेलेल्यांमधूनहि कोणी उठला तरी त्यांची खातरी होणार नाही.
त्याने तारणासाठी व सुटकेसाठी केलेल्या प्रार्थना सर्वदा नाकारल्या जातील.
४ . नरक म्हणजे जेथे चांगले व वाईट यांना जावे लागते अशी कबर तर नाही ना?
लूक १६ व्या अध्यायात आपण वाचतो की, दोन्ही माणसे मृत झाली व कबरेत गेली, कारण दोघांनाही पुरण्यात आले होते. परंतु दोघांच्या आत्म्याचे निवासस्थान वेगवेगळ्या ठिकाणी होते. एकजण अशा ठिकाणी गेला की, जेथे त्याचे समाधान करण्यात आले आणि दुसरा यातनेच्या ठिकाणी गेला. या दोघांनाही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणाकडे जाता येऊ नये म्हणून मध्ये मोठा दरा स्थापला होता.
५. मरणानंतर पुर्नजन्म नाही का ? निश्चितच नाही.
इब्री.९:२७ - ...माणसांना एकदाच मरणे व त्यानंतर न्याय होणे नेमून ठेवले आहे. मार्क.९:४२-५०; मत्तय.१८:८,९ या वचनांवर विचार करा.
६ .नरकामधील शिक्षेचे प्रमाण
अनु. ३२:२२ - कारण माझ्या कोपाने आग लागली आहे, अधोलोकाच्या तळापर्यंत ती पसरली आहे. पृथ्वी व तिचा उपज ती भस्म करीत आहे ...
मत्तय. १०:१५; मार्क. ६:११; लूक. १०:१२ - त्या नगरापेक्षा सदोम व गमोरा या प्रदेशाला सोपे जाईल.देवाचा न्याय कमीअधिक शिक्षेची मागणी करतो.जे त्याला जास्तीत जास्त वेळा नाकारतात, त्यांना आगीचे जास्त चटके बसतील.
सारांश
· आम्ही तारणाकडे दुर्लक्ष करू नये.
· ख्रिस्ताद्वारे मिळणारे तारण स्वीकारून नरकात जाणे टाळावे.
· शेवटी सर्व पापे फेडावी लागणार हे लक्षात ठेवून पापापासून दूर राहावे.
· या जीवनातच पश्चात्ताप करून क्षमा मिळवावी.
· शिक्षा झालेल्या व्यक्तीने नरकात पश्चात्ताप केला.प्रार्थना केली तरी त्या व्यक्तीला क्षमा मिळणार नाही.
💓Please share to your loved ones....!