येशू ख्रिस्त कोण आहे WHO IS JESUS CHRIST
येशू ख्रिस्त कोण आहे WHO IS JESUS CHRIST
![]() |
WHO IS JESUS CHRIST |
दोन हजार वर्षांपूर्वी इतिहासाच्या रंगभूमीवर एक मनुष्य अवतरला. तो जगामध्ये जन्मास आला, इतर मानवांप्रमाणे मानवांमध्येच वाढत गेला. परंतु इतर मानवांपेक्षा तो अगदीच वेगळा होता. तो कोणी सामान्य मनुष्य नव्हता. त्याला जन्म देण्यासाठी, कुमारिकेची पवित्र आत्म्याच्यायोगे गर्भधारणा झाली. तो स्वतः पृथ्वीवर मानवाच्या रूपात येणारा देव होता. तो देवाचा पुत्र होता. [लूक १:२६-३५]
प्रारंभी शब्द होता; शब्द देवासह होता आणि शब्द देव होता..... शब्द देहरूप होऊन जगात आला. आणि त्याने काही काळ आमच्यात वास्तव्य केले. आम्ही त्याचे गौरव पाहिले, जे पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचे असून अनुग्रह व सत्य यांनी परिपूर्ण होते. [योहान १:१,१४]
येशूचा या जगात येण्याचा विशिष्ट हेतू
१. सैतानाच्या शक्तिपासून मानवजातीची मुक्तता करण्यासाठी.
मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधावयाला व त्यांना तारावयाला आला आहे. [लूक१९:१०, कलस्सै १:१३]
२. त्याच्या प्राणार्पणाची खंडणी देऊन आपणांस परत विकत घेण्यासाठी.
.......याप्रमाणे मनुष्याचा पुत्र सेवा करून घ्यावयास नाही तर सेवा करावयास व पुष्कळांच्या पापासाठी आपला प्राण अर्पण करण्यास आला आहे.' [मत्तय २०;२८]
३. आमच्या जीवनातील सैतानाची कृत्ये नष्ट करण्यासाठी-
पाप करणारा सैतानाचा आहे; कारण सैतान प्रारंभापासून पाप करीत आहे.'सैतानाची कृत्ये नष्ट करण्यासाठीच देवाचा पुत्र प्रगट झाला. [१ योहान३;८]
४. मानवजातीस सार्वकालिक जीवन देण्यासाठी -
ती साक्ष हीच आहे. की, देवाने आपल्याला सार्वकालीक जीवन दिले आणि हे जीवन त्याच्या पुत्राच्या ठायी आहे. ज्याला तो पुत्र मिळाला आहे त्याला जीवन मिळाले आहे. परंतु ज्याला देवाचा पुत्र मिळाला नाही त्याला जीवन मिळाले नाही. [१ योहान ५:११-१२ , योहान३:१६,१७ ,१०:१० ]
५. देवाच्या कुटुंबामध्ये आम्हास नवा 'जन्म देण्यासाठी -
परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणार्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला;त्यांचा जन्म रक्त, अथवा देहाची इच्छा, अथवा मनुष्याची इच्छा ह्यांपासून झाला नाही; तर देवापासून झाला. [योहान १:१२,१३, १योहान ३:१,२]
६. येशूने आम्हास परमेश्वराचे प्रेम दाखविले -
देवाने आपल्या एकुलत्या एका पुत्राला जगात पाठविले आहे, यासाठी की त्याच्याद्वारे आपणांस जीवन प्राप्त व्हावे; यावरून देवाची आपल्या वरील प्रीति प्रगट झाली. प्रीति म्हणावी तर हीच; आपण देवावर प्रीति केली असे नाही, तर त्याने तुम्हा आम्हावर पापाचे व्हावे म्हणून स्वपुत्राला प्रायश्चित व्हावे म्हणून र पाठविले. [१योहान ४:९,१०, रोम ५;८
येशूने केलेले दैवी कार्य
अ] त्याने रोगी, लंगडे आणि अंधळ्यांना बरे केले.
त्याची किर्ती संबंध सूरिया देशात पसरली. तेव्हा विविध प्रकारचे रोग आणि व्यथा, आणि ग्रस्त असलेल्यांना, विशेषतः भूतग्रस्त, फेफरेकरी व पक्षघाती अशा सर्व रोग्यांना येशूकडे आणले आणि त्याने त्यांना बरे केले. मत्तय ४:२४,योहान ९:१-७
ब] त्याने भूते काढली.-
तेव्हा नाना प्रकारच्या रोगांनी पिडलेल्या पुष्कळ माणसांना त्याने बरे केले व अनेक भूते काढली; त्या भूतांनी त्याला ओळखले म्हणून त्याने त्यांना बोलू दिले नाही. [मार्क १:३४, मार्क ५:१-१७]
क] येशूचा निसर्गावरील अधिकार. -
नंतर मोठे वादळ झाले व लाटा मचव्यावर अशा आदळत होत्या की तो पाण्याने भरू लागला....... तेव्हा त्याने उठून वाऱ्याला धमकावून समुद्राला म्हटले उगा राहा, शांत हो. मग वारा पडला व अगदी शांत झाले....तेव्हा ते [शिष्य ]अतिशय घाबरले व एकमेकांस म्हणून लागले, हा आहे तरी कोण? वारा व समुद्र हे देखील याचे ऐकतात [मार्क ४:३७-४१ ,योहान ६:१-२१] .
ड. येशूने मृतांस पुन्हा जिवंत केले.
...येशूने मोठ्याने हाक मारून म्हटले, लाजरा, बाहेर ये तेव्हा जो मेलेला होता तो बाहेर आला; त्याचे हातपाय प्रेतवस्त्रांनी बांधलेले व तोंड रुमालाने वेष्टलेले होते. येशूने त्यांना म्हटले, “ह्याला मोकळे करून जाऊ द्या.” [योहान ११:४३-४४]
येशूने या पापमय जगतासाठी स्वताचे पवित्र जीवन बलिदान केले .
१. आपल्या जीवनातील आमचे व्याधी येशूने सोशिले.
पृथ्वीवर आम्ही आमच्या आयुष्यात कोणकोणत्या अडचणींना तोंड देतो त्याचा येशूने अनुभव घेतला आणि आम्हाला त्यावेळी कसे वाटले याचीही त्याने जाणीव करून घेतली.
कारण आपल्या सर्वांच्या दुर्बलतेविषयी ज्याला सहानुभूती वाटत नाही असा आपला प्रमुख याजक नाही तर तो सर्व प्रकारे आपल्यासारखा पारखलेला होता; तरी निष्पाप राहिला. [इब्री ४:१५, मत्तय ८:१७ ]
२. येशू सर्व मानवजातीची पापे वाहाण्यासाठी क्रुसावर मरण सोसले. -
एखाद्या सामान्य गुन्हेगाराला लाकडी खांबावर खिळावे त्याप्रमाणे दुष्ट लोकांनी येशू ख्रिस्ताला देहात शासन दिले. तो स्वतःला वाचवू शकला असता, परंतु त्याने तसे केले नाही. कारण त्याच्या मृत्यू करवी [क्रुसावरील] परमेश्वर जगाला वाचवणार होता. येशू आपणांसाठी मरण पावला. [मार्क १५:१६-३९]
त्याने स्वतः तुमची आमची पापे स्वदेही खांबावर नेली. यासाठी की आपण पापाला मेलेले होऊन सदाचरणा साठी जगावे. त्याला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झाला आहा [१पेत्र २:२४, यशया ५३:५,६.
३. येशू मानवजातीसाठी मरणातून उठला .-
देवाने आपल्या पुत्राला तिसऱ्या दिवशी कबरेतून मरणातून उठविले. [मत्तय २८ वाचावे ] हे सुद्धा आम्हासाठीच होते.
तरी देव दयासंपन्न आहे म्हणून आपल्या अपराधांमुळे मृत झालेले असताही त्याने आपल्यावरील स्वतःच्या अपरंपार प्रेमामुळे खिस्ताबरोबर आपणाला जिवंत केले. [कृपेने तुमचे तारण झाले आहे] आणि खिस्त येशूच्या ठायी त्याच्याच बरोबर उठविले व त्याच्याचबरोबर स्वर्गात बसविले....इफि २:४-६,रोम ६:४
४. येशूने आम्हांसाठी स्वर्गाचे द्वार खुले केले.-
पृथ्वीवरील त्याचे कार्य संपल्यावर येशू देवाबरोबर म्हणजे त्याच्या पित्या बरोबर असण्या साठी स्वर्गात परत गेला. हे त्याचे परत जाणेसुद्धा आम्हांसाठी होते......
कारण परमेश्वराच्या सान्निध्यात जाण्याचा - मार्ग त्याने आम्हांस मोकळा केला. आपण
तिथे राहावे आणि तेही कायमचेच यासाठी!
यास्तव बंधूजनहो, त्याने पडद्यातून म्हणजे स्वदेहातून जो नवीन व जीवन युक्त मार्ग आपल्यासाठी प्रस्थापित केला त्यामार्गाने पवित्रस्थानात येशूच्या रक्ताद्वारे प्रवेश करण्याचे आपल्याला धैर्य आले आहे; आपण खऱ्या अंतःकरणाने व विश्वासाच्या खात्रीने जवळ येऊ..[इब्री १०:१९-२२,योहान १४:१-३]
Please share and be blessed ...!
Thanks ...🙏🙏