सैतान-कोण-आहे who-is-satan
सैतान कोण आहे
![]() |
सैतान-कोण-आहे |
सैतानाचा परिचय व निर्मिती
१) सैतानाचे अस्तित्व
सैतानाला अस्तित्व आहे व तो व्यक्ती आहे.
योहान.१३:२ - ... इस्कर्योत ह्याच्या मनात त्याला धरून द्यावे असे सैतान घालून चुकला होता. प्रेषित.५:३ .......म्हणून सैतानाने तुझे मन का भरविले आहे . १पेत्र. ५.८ - सावध असा, जागे राहा; तुमचा शत्रू सैतान हा ...... , इफिस.६:११,१२ - सैतानाच्या डावपेचांपुढे तुम्हांला टिकाव धरता यावा म्हणून ......
२) सैतानाची नावे पवित्र शास्त्रात सैतानाला वेगवेगळ्या नावांनी संबोधिले आहे.
- सैतान,प्रकटी.१२:९ (सुमारे चाळीस वेळेस)
- अजगर,प्रकटी.१२:९
- अगाधकूपाचा दूत,प्रकटी.९:११
- अबद्दोन,प्रकटी.९:११
- या जगाचा अधिकारी...
- या युगाचा देव,२ करिंथ.४:४
- बालजबूल,मत्तय.१२:२४
- दियाबल,प्रकटी.१२:९ (समारे पन्नास वेळा) ९
- लबाड, .८:४४
- जो दुष्ट तो ,१योहान.५:१८
- जुनाट साप,प्रकटी.१२:९
- अपल्लूओन,प्रकटी.९:११
- अंतरिक्षाचा राज्याधिपती. योहान.१२:३१;१४:३०;१६:११ इफिस.२:२
- बलियाल,२ करिंथ.६:१५
- पडलेला तारा,प्रकटी.९:१
- परीक्षक,मत्तय.४:३
- भुतांचा अधिपती, मत्तय. १२:२४
- दोष देणारा,प्रकटी.१२:१०
- जगाला ठकविणारा,प्रकटी.१२:९
- मरणाचा अधिकारी,इब्री.२:१४
- शत्रू,१ पेत्र.५:८
३) सैतानाचा अधिकार
सैतान उच्च पदावर होता; कारण आद्य दूत मीखाएल,त्यानेही त्याच्यावर निंदेचा आरोप ठेवला नाही.
यहूदा.८,९ संदर्भावरून असा अर्थ निघतो की, सैतान खुद्द मीखाएलपेक्षा अधिक वरच्या दर्जाचा होता.
सैतान अंतरिक्षातील सत्ताधिकारी आहे.इफिस.२:२ - त्या पातकांमध्ये तुम्ही पूर्वी चालत होता,अर्थात ह्या जगाच्या रहाटीप्रमाणे अंतरिक्षातील राज्याचा अधिपति म्हणजे आज्ञा मोडणाऱ्या लोकांत आता कार्य करणाऱ्या आत्म्याचा अधिपति ह्याच्या धोरणाप्रमाणे चालत होता.
सैतान या जगाचा अधिकारी आहे.योहान.१४:३० - ह्यापुढे मी तुम्हांबरोबर फार बोलणार नाही, कारण जगाचा अधिकारी येतो; तरी माझ्यावर त्याची काही सत्ता नाही.
योहान.१६:११ - आणि ह्या जगाच्या अधिपतीचा न्याय झाला आहे, ह्यावरून न्यायनिवाड्याविषयी.
तो अधिकारी केव्हा झाला ?एदेन बागेत आदाम व हव्वा यांनी त्याचे ऐकल्यामळे तो अधिकारी झाला
सैतान या युगाचा देव आहे.२ करिथ ४.४ - त्यांची म्हणजे विश्वास न ठेवणाऱ्या लोकांची मने ह्या युगाच्या दैवताने केली आहेत, अशा हेतूने की, देवाची प्रतिमा जो ख्रिस्त त्याच्या तेजाच्या सुवार्तेचा प्रकाश त्यांच्यावर प्रकाशू नये.
सैतान भुतांचा राजा आहे. भुते सैतानाचे दूत आहेत.मत्तय.१२:२४-२६ - परंतु परूशी हे ऐकून म्हणाले, भुतांचा अधिपति जो बालजबूल त्याच्या साहाय्याशिवाय हा भुते काढीत नाही....
प्रेषित.१०:३८ - नासोरी येशूला देवाने पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला; तो सत्कमें करीत व सैतानाच्या सत्तेखाली असलेल्या सर्वांना बरे करीत फिरला, कारण देव त्याच्याबरोबर होता.
४) सैतानाचे सामर्थ्य
मनुष्याच्या सामर्थ्यापेक्षा सैतानाचे सामर्थ्य अधिक आहे.
इफिस.६:११,१२ - सैतानाच्या डावपेचापुढे तुम्हांला टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्रसामग्री धारण करा; कारण आपले झगडणे रक्तमांसाबरोबर नव्हे, तर सत्तांबरोबर, अधिकाऱ्यांबरोबर, सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपतींबरोबर, आकाशातल्या दुरात्म्यांबरोबर आहे.
सैतानाच्या अधिकारात सामर्थ्याने व दर्जाने इतके बलाढ्य जीव आहेत की, त्यांना “सत्ता,अधिकार,जगातील सत्ताधारी, आकाशातील दुष्ट आत्मे” असे म्हटले आहे.
सैतानाला देवाच्या
दूतांना पुष्कळ दिवस अडवून धरण्याचे सामर्थ्य आहे. दानी. १०:१२, १३ ..... अधिपति एकवीस दिवस मला आडवा आला. तेव्हा पाहा, मुख्य अधिपतींपैकी
एक मिखाएल माझ्या साहाय्यास आला व मी पारसाच्या राजाजवळ राहिलो.
पाचारण केलेल्या
लोकांशिवाय सर्व अविश्वासणारे सैतानाच्या सत्तेखाली आहेत. प्रेषित.२६:१८ - ..... सैतानाच्या अधिकारातुन देवाकडे वळावे म्हणून तू
त्यांचे डोळे उघडावे आणि त्यांना पापाची क्षमा व्हावी व .. १ योहान.५:१९ - आपण देवापासून आहो हे आपल्याला ठाऊक
आहे; सगळे जग त्या दुष्टाला वश झाले आहे.
सैतानाचे सामर्थ्य मोठे आहे, परंतु यहोवा देवाला ते थांबविता येते. ईयोब १:१० ते १२ - तो, त्याचे घर व त्याचे सर्वस्व याभोवती तू कुंपण घातले आहे ना? तू त्याच्या हातास यश दिले आहे ना? व देशात त्याचे धन वृद्धि पावत आहे ना? ..
५) सैतानाचा कावेबाजपणा
सैतानाजवळ पुष्कळ कावेबाज युक्त्या आहेत व तो त्यांकडून लोकांना फसवतो..
२ करिंथ.२:११ - अशा हेतूने की, आपल्यावर सैतानाचे वर्चस्व होऊ नये. त्याचे विचार आपल्याला कळत नाहीत असे नाही..
सैतानाजवळ इतक्या कावेबाज युक्त्या आहेत की, आपण त्यांच्या विरुद्ध टिकून उभे राहण्यास देवाची सगळी शस्त्रसामग्री धारण केली पाहिजे [इफिस ६:११,१२]. सैतान ज्यांना आपल्या सामर्थ्याने समोरासमोर लढून जिंकू शकत नाही, अशा पुष्कळ लोकांवर तो कावा व युक्ती यांच्या द्वारे वर्चस्व मिळवितो, याविषयी संशय नाही. हव्वेची व येशूची परीक्षा ही त्याच्या युक्त्यांची उदाहरणे आहेत.
मत्तय.२४:२४ - कारण खोटे ख्रिस्त व खोटे संदेष्टे उठतील व साधेल तर निवडलेल्यांस देखील फसवावे म्हणून मोठी चिन्हे व अद्भुते दाखवतील.
सैतान कधी कधी तेजोमय दूताचे रूप घेतो.करिंथ. ११:१४ - ह्यात
आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. कारण सैतानहि स्वतः तेजस्वी देवदूताचे सोंग घेतो.
६) सैतानाची दुष्टाई
सैतान दुष्ट आणि दुष्टाईचे मूळ आहे.१ योहान.५:१९ - आपण देवापासून आहो हे आपल्याला ठाऊक आहे; सगळे जग त्या दुष्टाला वश झाले आहे.
तो प्रारंभापासून पाप करीत आला.१ योहान ३:८ - पाप करणारा सैतानाचा आहे. कारण सैतान प्रारंभापासून पाप करीत आहे.
सैतान हत्या करणारा व लबाडी करणारा असून त्याच्या ठायी मुळीच सत्य नाही.योहान.८:४४ - ... कारण त्याच्यामध्ये सत्य नाही. तो खोटे बोलतो तेव्हा तो स्वतःचे बोलतो. कारण तो लबाड व लबाडीचा बाप आहे.
७) सैतानाचा द्वेषभाव
सैतान प्रारंभापासून मनुष्यघातक आहे.
योहान. ८:४४ - तुम्ही आपला बाप सैतान ह्यापासून झाला आहा आणि तुमच्या बापाच्या वासनांप्रमाणे करावयास इच्छिता. तो प्रारंभापासून मनुष्यघातक होता ...
सैतान लोकांचे मनःचक्षू आंधळे करतो.२ करिंथ.४:४ - त्यांची म्हणजे विश्वास न ठेवणाऱ्या लोकांची मने ह्या युगाच्या दैवताने आंधळी केली आहेत. अशा हेतूने की, देवाची प्रतिमा जो ख्रिस्त त्याच्या तेजाच्या सुवार्तेचा प्रकाश त्यांच्यावर प्रकाशू नये.
सैतान मनुष्यांच्या मनातून देवाची वचने काढून टाकतो.लूक.८:१२ - वाटेवर असलेले हे आहेत की ते ऐकतात; नंतर त्यांनी विश्वास ठेवू नये व त्यांस तारणप्राप्ती होऊ नये म्हणून सैतान येऊन त्यांच्या अंतःकरणातून वचन काढून घेतो.
८) सैतानाचे भित्रेपण
जर आपण त्याच्या विरुद्ध उठून त्याला विरोध केला, तर सैतान पळून जातो. याकोब.४:७ - म्हणून देवाच्या अधीन व्हा; आणि सैतानाला अडवा; म्हणजे तो तुम्हांपासून पळून जाईल.
९) सैतानाचे वसतीस्थान
सैतान आकाशात राहतो. इफिस.६:१२ - कारण आपले झगडणे रक्तमांसाबरोबर नव्हे. तर सत्तांबरोबर,अधिकाऱ्याबरोबर, सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपतींबरोबर. आकाशातल्या दुरात्म्यांबरोबर आहे.
ईयोब १:६ - एक दिवस असा आला की, त्या दिवशी देवपुत्र परमेश्वरापुढे येऊन राहिले व त्यांच्यामध्ये सैतानहि आला.
प्रकटी. १२:९ - मग तो मोठा अजगर खाली टाकण्यात आला म्हणजे सर्व जगाला ठकविणारा, जो दियाबल व सैतान म्हटलेला आहे तो जुनाट साप खाली पृथ्वीवर टाकण्यात आला व त्याबरोबर त्याच्या दूतांस टाकण्यात आले.
असेही सांगितले आहे की, “ज्या दूतांनी पाप केले त्यांस देवाने सोडले नाही, तर त्यांना नरकात टाकले.”
२पेत्र.२:४ - कारण ज्या देवदूतांनी पाप केले त्यांची देवाने गय केली नाही; तर त्यांस नरकांत टाकले आणि न्यायनिवाड्याकरिता राखून अंधकारमय खाड्यात ठेवले.
सैतान भूमीवर राहतो. ईयोब.१:७ - परमेश्वर सैतानास म्हणाला,तू आता कोठून आलास? सैतानाने परमेश्वरास उत्तर दिले मी पृथ्वीवर हिंडून फिरून आलो आहे.
१ पेत्र. ५:८ - सावध असा, जागे राहा; तुमचा शत्रु सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधीत फिरतो.
१०) सैतानाचे काम
सैतान या जगातील पापाचा उत्पादक आहे. उत्पत्ती ३:१-६ - पण बागेच्या मध्यभागी असलेल्या झाडाच्या फळाविषयी देवाने सांगितले आहे की ते खाऊ नका. त्याला स्पर्शही करू नका, कराल तर मराल. सर्प स्त्राला म्हणाला, तुम्ही खरोखर मरणार नाही; कारण देवाला हे ठाऊक आहे की, तुम्ही त्याचे फळ खाल त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील आणि तुम्ही देवासारखे बरेवाईट जाणणारे व्हाल . त्या झाडाचे फळ खाण्यास चांगले,दिसण्यात मनोहर आणि शहाणे करण्यास इष्ट असे त्या स्त्रीला दिसून आले; तेव्हा तिने त्याचे फळ काढून खाल्ले व आपल्याबरोबर पतीसहि ते दिले व त्याने ते खाल्ले.
प्रकटी. १२:९ . ...म्हणजे सर्व जगाला ठकविणारा,जो दियाबल व सैतान म्हटलेला आहे तो जुनाट साप खाली पृथ्वीवर टाकण्यात आला व त्याबरोबर त्याच्या दूतास टाकण्यात आले.
सैतान रोगांचा उत्पादक आहे.प्रेषित.१०;३८ - नासोरी येशूला देवाने पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला; तो सत्कर्मे करीत व सैतानाच्या सत्तेखाली असलेल्या सर्वांना बरे करीत फिरला.....
लूक. १३:१६ - पाहा, हिला सैतानाने अठरा वर्षे बांधून ठेवले होते...
सैतान मरणाचा उत्पादक आहे.इब्री. २:१४ - ज्या अर्थी मुले एकाच रक्तमांसाची होती त्याअर्थी तोहि त्यांच्यासारखा रक्तमांसाचा झाला, हेतु हा की, मरणावर सत्ता गाजविणारा म्हणजे सैतान ह्याला मरणाने शून्यवत करावे.
सैतान मनुष्यांनी पापात पडावे म्हणून त्यांना मोह घालतो. तो मोहविणारा आहे.मत्तय.४:१,३,५,८ - तेव्हा सैतानाकडून येशूची परीक्षा व्हावी म्हणून आत्म्याने त्याला अरण्यात नेले. तेव्हा परीक्षक जवळ येऊन म्हणाला ...मग सैतानाने त्याला पवित्र नगरीत नेऊन मंदिराच्या शिरोभागी उभे केले ... पुढे सैतानाने त्याला एका अतिशय उंच डोंगरावर नेऊन त्याला जगातील सर्व राज्ये व त्याचे वैभव दाखविले.
१ थेस्सल.३:५ - ह्यामुळे मलाहि आणखी दम धरवेना, म्हणून मी तुमच्या विश्वासासंबंधाने विचारपूस करण्यास पाठविले; कोण जाणे, भुलविणाऱ्याने तुम्हास भूल घातल्याने आमचे श्रम व्यर्थ झाले असतील.
सैतान मनुष्यांसाठी पाश पसरतो.१तीमथ्य. ३:७ - त्याची निंदा होऊ नये व त्याने सैतानाच्या पाशात सापडू नये म्हणून त्याच्याविषयी बाहेरच्या लोकांनीहि चांगली साक्ष दिलेली असावी. २ तीमथ्य.२:२६ - आणि सैतानाने त्यांना धरून ठेविल्यानंतर ते त्याच्या पाशांतून सुटून देवाच्या इच्छेस वश होण्याकरिता शुद्धीवर येतील.
सैतान मनुष्याच्या मनात दुष्ट योजना घालतो.प्रेषित.५:३ - तेव्हा पेत्र म्हणाला, हनन्या, तू पवित्र आत्म्याशी लबाडी करावी व जमिनीच्या किंमतीतून काही ठेवून घ्यावे म्हणून सैतानाने तुझे मन का भरविले आहे?
योहान.१३:२ - शिमोनाचा मुलगा यहूदा इस्कोत ह्याच्या मनात त्याला धरून द्यावे असे सैतान घालून चुकला होता.
ही गोष्ट मनुष्यांच्या संमतीने व सैतानाला वाव दिला तर होते.
सैतान मनुष्यात शिरतो.योहान १३:२७ - आणि घास दिल्याबरोबर सैतान त्याच्यामध्ये शिरला.
सैतान मने आंधळी करतो.२ करिंथ. ४:४ - त्यांची म्हणजे विश्वास न ठेवणाऱ्या लोकांची मने ह्या युगाच्या दैवताःने आंधळी केली आहेत, अशा हेतने की देवाची प्रतिमा जो ख्रिस्त त्याच्या तेजाच्या सुवार्तेचा प्रकाश त्यांच्यावर प्रकाशू नये.
मनुष्यांची विशेषेकरून विश्वासणाऱ्यांची मने प्रकाशित करणे व त्यांना ख्रिस्त प्रकाशित करणे हे पवित्र आत्म्याचे काम आहे. अविश्वासणाऱ्या मनुष्यांनी येशूच्या ठायी असलेले गौरव पाहू नये म्हणून सैतान त्यांची मने आंधळी करतो.
सैतान काही लोकांच्या मनातून देवाची वचने काढून टाकतो.मार्क. ४:१५ - वाटेवर वचन पेरिले जाते तेथील लोक हे आहेत की, त्यांन ऐकल्याबरोबर सैतान येऊन त्यांच्यातले पेरलेले वचन हिरावून घेतो..
मत्तय.१३:१९ - कोणी राज्याचे वचन ऐकतो पण ते त्याला समजत नाही, तेव्हा तो दुष्ट येऊन त्याच्या अंतःकरणात पेरलेले ते हिरावून घेतो; वाटेवर पडलेला तो आहे.
जेथे जेथे देवाचे वचन सांगितले जाते, तेथे तेथे सैतान स्वतः किंवा त्याच्या हस्तकांद्वारे पेरलेले बी काढून नेण्याकरता हजर असतो. पेरलेल्या बियांचे रक्षण करावे म्हणून आपण देवाची प्रार्थना करणे अगत्याचे आहे.जे वचन आपण ऐकले आहे, ते कदाचित सैतान काढून घेईल म्हणून आपण त्याला दृढ धरून राहणेही आवश्यक आहे लूक ८:१५. जे ख्रिस्ताने शिकवले त्याची आठवण देणे हे पवित्र आत्म्याचे काम आहे योहान.१४:२६. ते मनुष्याला विसरायला लावण्याचे काम सैतान करतो. संसारप्रपंच व देह हे ह्या कामात सैतानाला सहकार्य द्यायला अगदी सिद्ध असतात.सैतान देवाच्या शेतात निदण पेरतो.
मत्तय. १३:३९ - ते पेरणारा वैरी हा सैतान आहे; - तो नेहमी मंडळी व तिचे सिद्धान्त भ्रष्ट करण्याच्या उद्योगात असतो.
सैतान आज्ञाभंग करणाऱ्याला सामर्थ्य देतो.२ थेस्सल.२;९ - ज्यांचा नाश होत चालला आहे त्यांनी आपले तारण साधावे म्हणून सत्याची आवड धरावयाची ती धरली नाही; त्यामुळे त्यांच्यासाठी सैतानाच्या कृतीप्रमाणे सर्व प्रकारची खोटी महत्कृत्ये,चिन्हे, अद्भुते आणि सर्व प्रकारचे अनीतिजनक कपट ह्या युक्त असे त्या अनीतिमानाचे येणे होईल.
लोक सत्य नाकारतील तर सैतान त्यांना पायरीपायरीने सर्व प्रकारचे भ्रम व असत्य यात नेईल.
सैतानाचे कार्य चालवण्यासाठी त्याला त्याचा सेवकवर्ग व मंडळी आहे.करिंथ.११:१४,१५ - ह्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही. कारण सैतानहि स्वतः तेजस्वी देवदूताचे सोंग घेतो म्हणून त्याच्या सेवकांनीहि नीतिमत्त्वाच्या सेवकांचे सोंग नेतले तर ती मोठीशी गोष्ट नाही; त्यांचा शेवट त्यांच्या कर्मांप्रमाणे होईल.
प्रकटी. ३:९ - पाहा, जे सैतानाच्या सभेचे असून आपणाला यहूदी म्हणवितात पण तसे नाहीत ते खोटे बोलतात .
सैतान त्याच्या सेवकांकडून देवाच्या सेवकांना मार देतो.२ करिंथ. १२:७ - प्रकटीकरणाच्या विपुलतेमुळे मी चढून जाऊ नये म्हणून माझ्या शरीरात एक काटा, म्हणजे मला ठोसे मारण्याकरिता सैतानाचा एक दूत, ठेवण्यात आला आहे; मी चढून जाऊ नये म्हणून ठेवण्यात आला आहे.
त्यामुळे त्यांचे भलेच होते. ते नम्र राहतात आणि देवाच्या प्रार्थनेकडे ओढले जातात. वचन ८ पाहा.
सैतान देवाच्या सेवकांच्या कामात अडथळा निर्माण करतो.जखऱ्या ३:१ - तेव्हा मुख्य याजक यहोशवा हा परमेश्वराच्या दिव्यदूतासमोर उभा आहे व त्याचा विरोध करण्यासाठी सैतान त्याच्या उजवीकडे उभा आहे असे त्याने मला दाखविले.
दानी. १०:१३ - पारसाच्या राज्याचा अधिपति एकवीस दिवस मला आडवा आला; तेव्हा पाहा; मुख्य अधिपतींपैकी एक मीखाएल माझ्या साहाय्यास आला व मी पारसाच्या अधिपतीजवळ राहिलो.
सैतान ख्रिस्ताच्या सेवकांचा मनोदय पूर्ण करण्यात अडथळा आणतो.१ थेस्सल २:१८ - ह्यामुळे आम्ही तुम्हांकडे येण्याचे इच्छिले, परंतु सैतानाने आम्हांस अडविले.
परंतु त्याच्यातून चांगलेच निष्पन्न होते. थेस्सलनिकेला जात असता पौलाला असा अडथळा आला; त्यामुळे तेथील संतजनांना व पुढे येणाऱ्या पिढीला हे मोलवान पत्र प्राप्त झाले.
सैतान येशूच्या शिष्यांना हलवून चाळतो.लूक. २२:३१ - शिमोना, शिमोना, पाहा, तुम्हांस गव्हासारखे चाळावे म्हणून सैतानाने मागणी केली.
त्यातन शेवटी चांगलेच मिळते. शिमोन सैतानाच्या निर्दय चाळणीतुन पर्वी होता त्यापेक्षाही अधिक निर्मळ गहू असा बाहेर पडला. त्याच्यातून काही भूस चाळून टाकावे इतकेच सैतानाला करता आले.
रोम. ८:२८ - परंतु आपल्याला ठाऊक आहे की, देवावर प्रीति करणाऱ्यांस म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलाविलेल्यास देवाच्या करणाने सर्व गोष्टी मिळन कल्याणकारक होतात.
सैतान बंधुवर्गावर रात्रंदिवस आरोप ठेवतो.प्रकटी.१२:९,१० - .....कारण आमच्या बंधूंना दोष देणारा आमच्या देवासमोर रात्रंदिवस, त्यांच्यावर दोषारोप करणारा,खाली टाकण्यात आला आहे.
ग्रीक भाषेत “सैतान” नावाचा अर्थ “तुफान करणारा”, “आरोप करणारा”,“चहाडी करणारा” असा आहे.
ईयोब १:६,९ -...सैतानाने परमेश्वराला उत्तर दिले की, ईयोब देवाचे भय काय फुकट बाळगितो?
ईयोब २:४-५ - सैतानाने परमेश्वरास उत्तर दिले, त्वचेसाठी त्वचा ! मनुष्य आपल्या प्राणासाठी आपले सर्वस्व देईल. तू आपला हात पुढे करून त्याच्या हाडामांसास लावून तर पाहा, म्हणजे तो तुझ्या तोंडावर तुझा अव्हेर करील.
सैतान ख्रिस्तसेवकांना बंदिशाळेत टाकतो.प्रकटी. २:१० ... तुमची परीक्षा व्हावी म्हणून सैतान तुम्हांपैकी कित्येकांस तुरुंगात टाकणार आहे आणि तुमचे दहा दिवस हालअपेष्टांत जातील.
त्याकडून चांगलेच होते. या रीतीने ज्यांची परीक्षा होते ते शुद्ध केले जाऊन त्यांना जीवनाचा मुकुट मिळतो.
१२) सैतानाविषयी आपले कर्तव्य
आपण जागृत राहावे. १ पेत्र. ५:८ - सावध असा, जागे राहा; तुमचा शत्रू सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधीत फिरतो.
आपण सैतानाला वाव देऊ नये.इफिस.४:२७ - आणि सैतानाला वाव देऊ नका. “राग बाळगण्याने” असा येथे अर्थ आहे. आपण सैतानाचा प्रतिकार करावा.
याकोब ४:७ - म्हणून देवाच्या अधीन व्हा; आणि सैतानाला अडवा म्हणजे तो तुम्हांपासून पळून जाईल.१योहान २:१४ - ... तुमच्या ठायी देवाचे वचन राहते आणि त्या दुष्टाला तुम्हा जिंकले आहे.
सैतानाच्या योजनांना विरोध करण्यासाठी आपण देवाची सगळी शस्त्रसामग्री घ्यावी.इफीस. ६:११ - सैतानाच्या डावपेचांपुढे तुम्हांला टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्रसामग्री धारण करा.
ही देवाची सगळी शस्त्रसामग्री म्हणजे कोणती ? इफिस.६:१४-१८.
[१योहान.५:१८; कलस्सै. १:१३. ख्रिस्त देवाच्या मुलांना सैतानाच्या सत्तेपासून राखतो व सोडवतो.योहान.१०:२८,२९].
१३) सैतानाचे भवितव्य
मनुष्याला पापात लोटल्यापासून सैतान विशेष शापाखाली आहे (राहतो) .उत्पत्ती ३:१४ - तेव्हा परमेश्वर सर्पास म्हणाला,तू हे केले म्हणून सर्व ग्रामपशु व वनचर यांपेक्षा तू शापग्रस्त हो; तू पोटाने चालशील आणि आयुष्यभर माती खाशील.
सैतानासाठी सर्वकाळचाअग्नि सिद्ध केला आहे.
मत्तय.२५:४१ - मग डावीकडच्यांसहि तो म्हणेल, अहो शापग्रस्तहो,माझ्यापुढून निघा आणि सैतान व त्याचे दूत ह्यांच्यासाठी जो सार्वकालिक अग्नि सिद्ध केला आहे त्यात जा.
सैतानाचे कार्य नाश पावेल.१ योहान. ३:८ - पाप करणारा सैतानाचा आहे; कारण सैतान प्रारंभापासून पाप करीत आहे; सैतानाची कृत्ये नष्ट करण्यासाठीच देवाचा पुत्र प्रगट झाला. येशूच्या मरणाने सैतान शून्यवत झाला.
इब्री. २:१४ - ज्या अर्थी मुले एकाच रक्तमांसाची होती त्याअर्थी तोहि त्यांच्यासारखा रक्तमांसाचा झाला, हेतु हा की, मरणावर सत्ता गाजविणारा म्हणजे सैतान, ह्याला मरणाने शून्यवत करावे.
ख्रिस्ताच्या मृत्यूमुळे सैतानाची सत्ता ढासळली जाऊन नष्ट झाली. वधस्तंभावर येशूने सैतानाच्या सैन्यावर जय मिळवला.
कलस्सै.२:१५ - त्याने सत्ताधिशांना व अधिकाऱ्यांना नाडून त्यांच्याविरुद्ध वधस्तंभावर जयोत्सव करून त्यांचे उघडउघड प्रदर्शन केले.
येशूच्या मृत्यूद्वारे सैतान बाहेर टाकला गेला.योहान.१२:३१ - आता ह्या जगाचा न्याय होतो, आता ह्या जगाचा अधिकारी बाहेर टाकला जाईल….
सैतान आपल्या पायांखाली तुडवला जाईल.रोम.१६:२० - शांतीचा देव सैतानाला तुमच्या पायांखाली लवकरच तुडवील.
ख्रिस्तागमनसमयी सैतान बांधलेला असा हजार वर्षे अगाधकूपात राहील.प्रकटी. २०:२ - त्याने दियाबल व सैतान म्हटलेला जुनाट साप म्हणजे तो अजगर ह्यास धरले आणि त्याने एक हजार वर्षेपर्यंत बांधलेल्या अवस्थेत पडून राहावे म्हणून त्याला अथांग डोहात टाकून दिले.
मग थोडा वेळ बाहेर येऊन तो राष्ट्रांना फसवील.प्रकटी.२०:७,८- आणि तो पृथ्वीच्या चार कोपऱ्यांतील गोग व मागोग राष्ट्रांस ठकवावयास व त्यांस लढाईसाठी एकत्र करण्यास बाहेर येईल. त्यांची संख्या समुद्राच्या वाळूइतकी आहे.
नंतर सैतानाला अग्नीच्या व गंधकाच्या सरोवरात, त्याने रात्रंदिवस सर्वकाळ यातना भोगाव्या म्हणून टाकण्यात येईल.प्रकटी. २०:१० - त्यांस ठकविणाऱ्या सैतानाला अग्नीच्या व गंधकाच्या सरोवरात टाकण्यात आले...तेथे त्यांस रात्रंदिवस युगानुयुग पीडा भोगावी लागेल.
अधिक माहिती व सविस्तर बघण्यास्ठी वरील व्हिडीओवर क्लिक करा .👆
सारांश
१. सैतानाचे अस्तित्व आहे. २. मनुष्याच्या सामर्थ्यापेक्षा सैतानाचे सामर्थ्य अधिक आहे. ३. सैतानाचे सामर्थ्य अधिक असले तरी ते थांबविता येते. ४. सैतानाजवळ पुष्कळ कावेबाज युक्त्या आहेत. ५. सैतानासाठी सर्वकाळचा अग्नी सिद्ध केला आहे .
नरक किंवा गंधकाचे सरोवर काय आहे वाचण्यासाठी येथे क्लिक करा 👉 नरक