Bible reading plan and tips for beginners in Marathi नवीन विश्वासणाऱ्यांसाठी दररोज बायबल वाचण्यासाठी टिपा
Bible
study reading plan and tips for beginners in Marathi
नवीन विश्वासणाऱ्यांसाठी दररोज बायबल वाचण्यासाठी टिपा
नवशिक्यांसाठी बायबलचा अभ्यास कसा करायचा – जर तुम्ही वर्षानुवर्षे ख्रिस्ती विश्वासणारे असाल आणि , अजून हि तुम्हाला बायबल अभ्यासाची किंवा बायबल वाचनाची सवय नसेल, तर ही पोस्ट तुमच्यासाठीच आहे.
आपणास चर्चमध्ये बायबल कसे वाचावे हे शिकवले जात नाही, परंतु प्रत्येक विश्वासणार्याने बायबलचे वाचन आणि अभ्यास केलाच पाहिजे .
देवाचे पवित्र वचन [बायबल] वाचणे का जरुरी आहे ?
१) देवाची आज्ञा आहे. देव आपणाशी वचनाद्वारे बोलतो.
२) सत्य समजते . खोटे व खरे संदेश आणि संदेष्ट ओळखणे सोपे होते .
३) आपल्यासाठी देवाची असलेली योजना, मार्गदर्शन स्पष्टपणे समजते .
४) जीवन सुखी बनते .
५) विजयी जीवन जगण्यास सामर्थ्य प्राप्त होते.
पुष्कळसे ख्रिस्ती विश्वासानार्याना बायबल हे देवाचे वाचन माहित असून देखील वाचण्यास प्राधान्य देत नाहीत अथवा कंटाळा करतात . याचे मुख्ये कारणे पुढीलप्रमाणे असू शकतात .
१) तुमच्या तारणार्यावर तुमचे पुरेसे प्रेम नाही .
२) तुम्ही सार्वकालिक जीवनाबद्दल गंभीर नाहीत .
३) वाईट सवयी सोडू इच्छित नाहीत.
४) पवित्र वचनाला महत्व देत नाहीत .
५) तुम्ही ढोंगी ख्रिस्ती आहात .
नविन विश्वासणाऱ्यांसाठी बायबलचा अभ्यास करण्यासाठी टिपा
Bible reading plan and study guide
१. योग्य बायबल भाषांतर निवडा.
मराठी भाषिकासाठी मी बायबल सोसायटी ऑफ इंडिया R.V. सुचवेल . आणि इंग्रजी भाषिकासाठी मी N.I.V. चे बायबल सुचवेल. कारण बहुतेक लोक या भाषांतराला प्राधान्य देतात.
२. सुरवात कोठून आणि कशी करावी .
अनेकांना पवित्र-शास्र वाचायचे असते . परंतु समस्या हि असते कि वाचनाची सुरवात कोठून आणि कशी करावी हेच लवकर उमगत नाही . याचे उत्तर अगदी सोपे आहे. गोंधळून न जाता दररोज ठरविल्या वेळेपत्रकानुसार सरळ-सरळ प्रथम नवीन करारातील मत्तय या पुस्तकापासून ते प्रगटीकरणापर्यंत वाचा . नविन करार वाचून झाल्यानंतर उत्पत्ति पासून मालाखी पर्यंत वाचावे.
इंटरनेट वर अनेक प्रकारचे पवित्रशास्र वाचन पद्धती बघायला मिळतील .परंतु त्या सुटसुटीत वाटत नसल्याने काही काळाने आपोआप वाचणे कमी-कमी होत जाते , किंबहुन वाचण्याचा विसर पडतो. म्हणून सुरवातीला बायबल अनुक्रमाप्रमाणेच सोयीस्कर ठरेल.
आपणास वाचन करणे सोपे व्हावे म्हणून मी या लेखाच्या शेवटी काही Bible reading plans 2022 देत आहे. त्या तुम्ही डाउनलोड करू शकता .
३. सुरवात लहान ठेवा .
सुरवातीला मी नविन करार साधारण दहा दिवसात वाचून पूर्ण केला होता . आणि जुना करार हा साधारण ८-९ महिन्यात वाचून पूर्ण केला होता. परंतु मला वंशावळ हि फारच कंटाळवानी वाटली म्हणून मी हा भाग सोडून पुढील भाग सुरु करत .
तुम्ही माझ्यासारखे वाचू नका. तर सुरवात हि लहान करा , जेणेकरून अगदीच तणाव वाटणार नाही . उदा. दिवसातून दोन ते तीन अध्याय किंवा दिवसातून २० मिनिटे बायबल वाचण्याचे ध्येय ठेवून सुरुवात करा. एकदा ही सवय झाली की, तुम्ही वेळ किंवा अध्यायाची संख्या वाढवू शकता.
४. नोंद किंवा अधोरेखित करणे .
पवित्र शास्र वाचत असताना, काहीजन उपदेशक सांगतो म्हणून उगाचच संपूर्ण बायबलवर निळ्या-लाल रेषा मारून ठेवतात .परंतु असे करू नका तर, तुम्हास कळावे म्हणून विशेष वाटणारे म्हणजेच बोध ,शिक्षण असे भाग अधोरेखित करा. त्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या रंगाचे हाय-लायटर पेन वापरु शकता . मी सुद्धा माझे पवित्र शास्र वाचत असताना तीन रंगाचे हाय-लायटर पेन वापरतो . नारंगी रंग मला काहीतरी इशारा सूचित करतो, हिरवा रंग मला शिक्षण सूचित करतो आणि पोपटी बोध सूचित करतो , अशाप्रकारे मी स्वतासाठी कोड निश्चित केलेले आहेत . तुम्ही हि आपणासाठी तुमच्यापरीने रंग कोड निश्चित करू शकता .
५. बायबल वाचनाची वेळ निश्चित करा.
दररोज एक विशिष्ट वेळ बाजूला ठेवा. कोणतीही वेळ तुम्ही तुमच्या वाचनासाठी देऊ शकता . परंतु लक्षात ठेवा ती वेळ तुमच्यासाठी उत्तम असावी , ज्यात तुम्ही उत्तम प्रकारे लक्ष केंद्रित करू शकता .पुष्कळांसाठी उत्तम वेळ ही सकाळची असते . कदाचित तुमच्यासाठी दुपार किंवा सांयकाळ असू शकते. आपले वेळापत्रक सेट करा आणि नंतर त्यास चिकटून रहा.
६. लागणारे साहित्य .
तुमच्याकडे तुमचे बायबल, पेन , पेन्सिल, वही जरूर ठेवा . वाचन करीत असताना अनेक प्रश्न तुम्हाला पडतील तेंव्हा त्याचे उत्तर लगेच मिळत नसेल तर तेथेच अडून बसू नका , तर ते तुमच्या जवळ असलेल्या नोंद्वाहीमध्ये लिहून ठेवा , माझा अनुभव आहे. जस-जसे आपण वाचन करीत पुढे जातो ,तसं-तसे उत्तरे मिळत जातात .
७. अभ्यास अथवा वाचन करण्यापूर्वी प्रार्थना करा.
शिकण्यासाठी बायबल वाचा, केवळ तुमचे पुढील वाचन पूर्ण करण्यासाठी नाही. सुरुवात करण्यापूर्वी देवाला छोटीशी प्रार्थना करा प्रार्थनेविना वचन समजणे कठीण आहे . म्हणून पवित्र आत्म्याने तुम्हाला शहाणपण ,ज्ञान व समजबुद्धी देण्याची विनंती करा . आणि नंतर तुम्ही वाचलेल्या शब्दांनी आशीर्वादित व्हा!
सहा महिने बायबल वाचन वेळापत्रक Download Here
नऊ महिने बायबल वाचन वेळापत्रक Download Here
बारा महिने बायबल वाचन वेळापत्रक Download Here
अनेक प्रकारचे बायबल वाचन वेळापत्रक Download Here
कृपया इतरानाही शेअर करा ...🙏🙏