बायबलनुसार घटस्फोट आणि पुनर्विवाह what does it say in the bible about divorce
बायबलनुसार घटस्फोट आणि पुनर्विवाह
Divorce and Remarriage in the Bible
![]() |
divorce according to the bible |
घटस्फोट आणि पुनर्विवाह: एक आध्यात्मिक आणि नैतिक अभ्यास
घटस्फोट म्हणजे काय ? definition of divorce according to the bible
घटस्फोट म्हणजे कायदेशीररित्या
आणि सामाजिकदृष्ट्या वैवाहिक
नात्याचा पूर्णपणे अंत
होणे.
म्हणजेच पती-पत्नी
यांच्यातील विवाहबद्ध संबंध
अधिकृतपणे संपुष्टात येणे. ही
एक अशी सामाजिक
व वैयक्तिक घटना
आहे जी केवळ
दोन व्यक्तींना नव्हे, तर
संपूर्ण कुटुंब, समाज आणि
विशेषतः मुलांना प्रभावित
करते. आधुनिक
काळात घटस्फोटाचे प्रमाण
वाढत चालले आहे, आणि
लोक वेगवेगळ्या कारणांमुळे
विवाहबंधन तोडत आहेत.
घटस्फोटाची कारणे Reasons for Divorce
घटस्फोटासाठी अनेक कारणे असू
शकतात,जसे कि
सतत वाद, गैरसमज, हिंसाचार, व्यभिचार (परपुरुष/परस्त्री संबंध), मानसिक छळ, संवादाचा अभाव, किंवा एकमेकांमध्ये प्रेमाचा अभाव.
घटस्फोटाचे नैतिक परिणाम
घटस्फोटाचा परिणाम केवळ
पती-पत्नीवरच नाही, तर
तो कुटुंब, मुले, समाज आणि
देवाशी असलेल्या नात्यावरही
परिणाम करतो. बायबलप्रमाणे, विवाहातील निष्ठा
हे एक अत्यंत
पवित्र मूल्य आहे.
- मुलांवर परिणाम:
मानसिकदृष्ट्या त्यांना
असुरक्षितता, भावनिक वेदना, आणि अनेकदा
अपराधीपणाची भावना
निर्माण होते.
- समाजावर प्रभाव:
समाजामध्ये विवाहसंस्थेवरचा आदर आणि
विश्वास कमी
होतो.
- आध्यात्मिक परिणाम:
देवाशी असलेले
नाते आणि
वैयक्तिक आत्मिक
विकास यावर
परिणाम होतो.
जगभरात अनेक संस्कृतींमध्ये
विवाह आणि घटस्फोट
याविषयी विविध विचार
आहेत.
परंतु बायबल आपणास
विवाह आणि घटस्फोट
याबद्दल अतिशय गंभीर
आणि विशेष गहन
आध्यात्मिक दृष्टिकोन मांडतो.
प्रथम बायबलनुसार विवाहाचे महत्त्व समजून घेऊया . divorce and remarriage in the bible
बायबलनुसार विवाह हा
केवळ एक सामाजिक
करार नसून तो
देवाने स्थापन केलेले एक चिरकालिक पवित्र बंधन
आहे.जो वैवाहिक जोडीदारापैकी एकाचा मृत्यू झाल्यावरच संपुष्टात येतो. उत्पत्ती
२:२४ मध्ये
लिहिले आहे: "म्हणून
मनुष्य आपल्या आई-वडिलांना सोडून आपल्या
पत्नीशी एकनिष्ठ राहील
आणि ते दोघे
एक देह होतील."
विवाहात जोडीदार एकमेकांस
पुढील शब्दाद्वारे वचनबध्द
करून घेतात . सुखात व
दुखा:त, रोग
व आरोग्यात
, गरिबीत व
श्रीमंतीत ,या भूमीवर जिवंत
असेपर्यंत ईतर स्री/पुरुष सोडून
एकनिष्ठ राहण्याचे शपथ
वाहिली जाते.
हे वचन दाखवते
की विवाह ही
देवाच्या इच्छेने झालेली
एकता आहे. त्यामुळे विवाह
हा फक्त दोन
व्यक्तींमधला झालेला एक
सामाजिक करार नसून, परमेश्वाराच्या उपस्थितीत केलेला
एक अतुट वचनबद्ध
करार आहे. त्यामुळे बायबल
विवाहाच्या शाश्वततेवर आणि
निष्ठेवर भर देते.
बायबलच्या
दृष्टीकोनातून
घटस्फोट divorce
according to the bible
मलाखी २:१६ मध्ये प्रभु
स्पष्टपणे म्हणतो,“मला सूटपत्राचा तिटकारा आहे; म्हणून सेनाधीश परमेश्वर म्हणतो, जो आपल्या पत्नीबरोबर क्रूरतेने वागतो त्याचा मी द्वेष करतो; तुम्ही आपल्या आत्म्याला जपा, विश्वासघाताने वागू नका.”
ही अतिशय कठोर
आणि स्पष्ट घोषणा
आहे.
बायबलप्रमाणे,
विवाह एक पवित्र करार
आहे . देव
विवाहाची अखंडता आणि
निष्ठा यास महत्त्व
देतो.
देव घटस्फोटाला नकारात्मकपणे
पाहतो.
देवाला नात्यांची एकता, विश्वास, आणि
एकमेकांवरील प्रेम आवडते. त्यामुळे
देव वैवाहिक संबंध
जपण्यास प्राधान्य देतो.
येशू ख्रिस्ताची घटस्फोटाबाबत भूमिका purpose
of divorce according to the bible
मत्तय १९:३-९ या वचनांमध्ये
येशू ख्रिस्ताने घटस्फोटाच्या
संदर्भात कठोर भूमिका
घेतली.
परुशी लोकांनी येशूला
विचारले “कोणत्याही कारणावरून बायको टाकणे सशास्त्र आहे काय?” त्यावर
येशू म्हणाला: "देवाने जे जोडले आहे ते माणसाने तोडू नये.”
येशू पुढे अजून
एक गोष्ट स्पष्ट
करतो , ते
म्हणजे जो कोणी
आपल्या पत्नीला व्यभिचाराखेरीज
दुसऱ्या कोणत्याही कारणासाठी
सोडतो आणि दुसरीशी
विवाह करतो, तो व्यभिचार
करतो.
पौलाचे घटस्फोटाबाबत शिक्षण definition
of divorce according to the bible
प्रेषित पौलाने १
करिंथ ७ मध्ये
विवाह आणि घटस्फोटाबद्दल
मार्गदर्शन दिले आहे. तो
म्हणतो की विवाहित
दांपत्यांनी विभक्त होता
कामा नये. जर विभक्त
झालेच तर परत
एकत्र यावे, अन्यथा आयुष्यभर
एकटे राहावे. मात्र जर
अविश्वासी सोडून गेला, तर
विश्वासणाऱ्याला त्या बंधनात
अडकून राहण्याची आवश्यक
नाही.
वरील वचनांवरून स्पष्ट होते की, बायबल केवळ विशिष्ट दोन कारणांनीच घटस्फोटास परवानगी देते . Top reason for divorce in the bible
1. व्यभिचार, मत्तय
१९:३-९
2. जर
अविश्वासाणाऱ्याने विश्वाणाऱ्याबरोबर
राहण्यास नकार दिल्यास. १ करिंथ
७:१५
बायबलमधील क्षमा आणि पुनर्बांधणी What Does the Bible Say About Divorce?
बायबल फक्त नियमांवर
आधारलेले नाही, तर ते
दया,
क्षमा आणि पुनर्स्थापनाही
शिकवते.
जेव्हा कोणीतरी चुकीच्या
निर्णयामुळे किंवा अपयशामुळे
घटस्फोटाच्या मार्गावर जातो, तेव्हा
देवाची कृपा आणि
क्षमा त्यांना नव्याने
उभे राहण्याची संधी
देते.
१ योहान १:९ मध्ये लिहिले
आहे:
“जर आपण आपली पापे पदरी घेतली, तर तो विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करील, व आपल्याला सर्व अनीतीपासून शुद्ध करील.”
यावरून हे लक्षात
येते की घटस्फोट
झालेल्या व्यक्तीलाही देव
क्षमा करतो आणि
पुनर्स्थापन करतो –
अर्थात त्यासाठी पश्चात्ताप
आवश्यक आहे.
ख्रिस्ती विवाह टिकवण्यासाठी उपाय
ख्रिश्चन विवाह एक
सेवा समजली जाते. बायबलनुसार, विवाहात
अडचणी आल्यास त्यावर
प्रार्थना,
संवाद,
सल्ला,
आणि देवाच्या मार्गदर्शनाने
उपाय शोधावा. ख्रिश्चन कुटुंबसल्लागार, पाळक, किंवा
चर्च यांचे सहकार्य
घ्यावे.
हे नाते टिकवण्यासाठी
पुढील काही उपाय
उपयुक्त ठरू शकतात:
1.
प्रार्थना: नियमित
एकत्र प्रार्थना आणि
बायबल वाचन केल्याने
आत्मिक एकता वाढते.
2.
बायबल वाचन: देवाच्या वचनांवर
आधारित मार्गदर्शन मिळते.
3.
चर्चमध्ये सल्ला
घेणे: अनुभवी
ख्रिश्चन सल्लागारांची मदत
घेता येते.
4.
संवाद: मोकळा
व प्रामाणिक संवाद
वैवाहिक नात्याला मजबूत
करतो.
5.
क्षमा: चुकांवर
प्रेमाने आणि दयाळूपणाने
पांघरून टाकणे आवश्यक
आहे.
पुनर्विवाह विषयी बायबल काय सांगते ? bible remarriage
अनेक चर्चेसमध्ये पुनर्विवाहाबाबत
धोरण वेगवेगळं असू
शकतं. बायबलमध्ये पुनर्विवाह
(remarriage) या
विषयावर स्पष्ट आणि
नैतिकदृष्ट्या गांभीर्याने विचार
केला आहे. बायबलमध्ये विवाह
हे देवाने स्थापन
केलेले पवित्र नातं
मानले गेले असून, त्यात
घटस्फोट आणि त्यानंतर
पुनर्विवाह याकडे काही
विशेष परिस्थितींमध्येच स्वीकार्य
म्हणून पाहिलं जातं. ही
एकता भंग न
करता कायम ठेवावी, हे
देवाचे उद्दिष्ट आहे. म्हणूनच
पुनर्विवाहास फक्त काही
अपवादात्मक परिस्थितींमध्येच परवानगी आहे, लक्षात घ्या हा नियम नाही.
1. विधवांचे पुनर्विवाह
रोमकरांस ७:२-३ मध्ये
लिहिलं आहे: "पती
जिवंत असेपर्यंत स्त्री
विवाहबंधनात असते, परंतु पती
मरण पावल्यावर ती
त्या बंधनातून मुक्त
होते."
यावरून स्पष्ट आहे
की विधवा किंवा
विधुराला बायबलनुसार पुन्हा
विवाह करण्यास परवानगी
आहे.
या बाबतीत कोणताही
दोष किंवा पाप
नाही.
2. घटस्फोटानंतर पुनर्विवाहाची परवानगी can people divorce according to the bible
मत्तय १९:९ मध्ये येशू
म्हणतो:
" जो कोणी आपल्या बायकोला जारकर्माच्या कारणाशिवाय टाकून दुसरी करतो तो व्यभिचार करतो; [आणि जो कोणी अशा टाकलेल्या स्त्रीबरोबर लग्न करतो तोही व्यभिचार करतो.]”
यावरून हे स्पष्ट होते की फक्त व्यभिचाराचे कारणाने घटस्फोट झालेल्या व्यक्तीस पुनर्विवाहाची परवानगी नाही.
बायबलनुसार पुनर्विवाह फक्त पुढील परिस्थितीत परवानगी आहे:
१.
पती /
पत्नीचा मृत्यू झाला
असेल.
रोमकरांस ७:२-३,
१ करिंथ
७:३९
२.
विश्वास न
ठेवणाऱ्या नात्यातील दुराव्यामुळे
झाला असेल. १
करिंथ ७:१५
वरील
कारणाव्यतिरिक्त पुनर्विवाह जगाच्या दृष्टीने मान्य असेल. पण ते देवाच्या वचनाविरुद्ध आहे.
सारांश
मलाखी २:१६ मध्ये, बायबल स्पष्टपणे सांगते की “मला सूटपत्राचा तिटकारा आहे; म्हणून सेनाधीश परमेश्वर म्हणतो, जो आपल्या पत्नीबरोबर क्रूरतेने वागतो त्याचा मी द्वेष करतो; तुम्ही आपल्या आत्म्याला जपा, विश्वासघाताने वागू नका.”
विवाह देवाच्या दृष्टीने पवित्र, उदात्त संस्था आहे.
" विवाहात
जोडीदार एकमेकांस पुढील
शब्दाद्वारे देवाच्या उपस्थितीत वचनबध्द
होतात . सुखात-दुखा:त,रोग-आरोग्यात , गरिबीत-श्रीमंतीत ,या भूमीवर जिवंत
असेपर्यंत एकनिष्ठ राहण्याचे
शपथ वाहिली जाते.
या कारणास्तव
देवाच्या नजरेत विवाह
हा निरंतर नातेसंबध
आहेत.
म्हणून कोणत्याही परिस्थितीत परमेश्वर देव ख्रिस्ती विश्वासाणाऱ्यानी क्षमाशील असावे म्हणून प्रोत्साहीत करतो . इफिस ४:३२ मध्ये, परमेश्वर म्हणतो, “तुम्ही एकमेकांबरोबर उपकारी व कनवाळू व्हा; जशी देवाने ख्रिस्ताच्या ठायी तुम्हांला क्षमा केली आहे तशी तुम्हीही एकमेकांना क्षमा करा.”
Footnotes - इफिस ४:३२, उत्पत्ती २:२४, मलाखी २:१६, मत्तय १९:३-९ ,१ करिंथ ७:१-४० ,१ योहान १:९ ,रोमकरांस ७:२-३
Nice information about Marriage life