स्थानिक मंडळी म्हणजे काय ? Local Church
स्थानिक मंडळी
आज पुष्कळ लोक ईमारतीलाच मंडळी म्हणतात. परंतु खरे तर विश्वासणार्यालाच चर्च म्हणजेच मंडळी म्हणण्यात आले आहे. मंडळी हा ग्रिक शब्द एक्लिसिया पासून आलेला आहे, त्याचा अर्थ आहे कि “बोलविलेले लोक” असा होतो. “चर्च” या शब्द इमारतीशी निगडीत नसून लोकाशी आहे. परंतु जेव्हा लोक तुम्हाला विचारतात कि तुम्ही कोणत्या मंडळीत अथवा चर्च मध्ये आराधनेला जाता तेव्हा ते एका इमारतिचे वर्णन सांगतात. रोम १६;५ म्हण्ते “…….जी मडळी त्यांच्या घरी आहे तीलाही सलाम” पौलस त्याच्या घरी एकत्र होणार्या मंडळी बद्दल बोलत आहे - तो मड्ळीच्या इमारती संदर्भात बोलत नाही.परतु तो विश्वासणार्या विषयी बोलत आहे.
स्थानिक मंडळी म्हणजे विश्वासणाऱ्यांचा एक गट. हे विश्वासणारे देवाची भक्ती करण्यासाठी, त्याचे वचन ऐकण्यासाठी आणि धार्मिक विधी पाळण्यासाठी एकत्र जमतात. ख्रिस्ती लोकांनी या रीतीने एकत्र यावे असे नव्या करारातील शिक्षण आहे.
![]() |
Local Church |
इब्री.१०:२५ - आपण कित्येकांच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे सोडू नये. प्रेषितांच्या काळात विश्वासणारे देवाची उपासना करण्यासाठी एकत्र जमत असत. आरंभी ते दररोज जमत असत, नंतर ते रविवारी एकत्र येऊ लागले. प्रभू येशू ख्रिस्त आठवड्याच्या पहिल्या दिवशी मेलेल्यांतून उठला, तेव्हा ते हा दिवस 'पवित्र वार' म्हणून पाळत असत. तेव्हापासून ही ख्रिस्ती लोकांची पद्धत आहे आणि प्रार्थनेला हजर राहणे ही जबाबदारी प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीवर आहे. बहुतेक मंडळ्यांमध्येही दर रविवारी सकाळी व सध्याकाळी उपासना भरते. तसेच रविवारी देवाच्या सेवा- कार्यासाठी मंडळीतून धन अर्पण जमा केले जाते .
१ करिंथ.१६:२ - आठवड्याच्या पहिल्या दिवशी तुम्ही प्रत्येकाने जसे आपणांस यश मिळाले असेल तसे...
जुन्या कराराच्या काळात नियमशास्त्राप्रमाणे दशांश देणे आवश्यक होते. नव्या करारात असा नियम सांगितला नाही. देवाला काय व किती द्यावे हा वैयक्तिक प्रश्न आहे. देवाने आपल्याला दिले असेल त्या प्रमाणात आपण देवाला द्यावे. आपण हे विचारपूर्वक व प्रार्थनापूर्वक ठरवावे. आनंदाने व उदार मनाने देवाला द्यावे.
२करिथ. ९:७ - प्रत्येकाने आपआपल्या मनात ठरविल्याप्रमाणे द्यावे. दुःखी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये; कारण संतोषाने देणारा देवाला प्रिय असतो.
उपानेला हजर राहणे, नियमितपणे दान (पैसे) अर्पण करणे, मंडळीच्या कार्यात भाग
घेणे मंडळीसाठी प्रार्थना करणे, देवाला शोभेल असे जीवन जगणे ही प्रत्येक विश्वासानार्याची जबाबदारी आहे.
मंडळीचे विधी व संस्कार
मंडळीचे विधी दोन आहेत, १. बाप्तिस्मा २. प्रभुभोजन
या दोन विधींसंबंधी प्रभू येशूख्रिस्ताने आज्ञा दिल्या आहेत
१. बाप्तिस्मा - बाप्तिस्मा म्हणजे 'नवीन जन्म' किंवा 'पापाची क्षमा' नाही. अंतरंगातील वास्तवतेचे खया खर्या परिवर्तनाचे - बाप्तिस्मा हे बाह्य प्रतीक आहे.
पुढील शिक्षण वाचण्यासाठी येथे क्लिक करा - 👉 बाप्तिस्मा
२. प्रभुभोजन – ख्रिस्ताने लावून दिलेल्या विधीपैकी हा एक विधी आहे . मत्तय २६;२६-२९ ख्रिस्ताने गेथासेमाने बागेत जाण्याअगोदर एकदाच शिष्यांबरोबर हा विधी पाळला होता .
पुढील शिक्षण वाचण्यासाठी येथे क्लिक करा 👉 प्रभुभोजन कोणी घ्यावे ?
कृपासाधने
बाप्तिस्मा व प्रभुभोजन यांच्या द्वारे विश्वासणाऱ्याला देवाचा आशीर्वाद प्राप्त होतो, हे आपण पाहिले. ज्याच्याद्वारे देवाचे आशीर्वाद मिळतात त्या गोष्टींना कृपासाधने असे हणतात. देवाचे आशीर्वाद नेहमी विश्वासाने स्वीकारले जातात.
१. प्रार्थना
अडचणीच्या वेळेस देवाचा धावा करणे म्हणजे प्रार्थना अशी अनेकांची कल्पना आहे. परंतु ख्रिस्ती प्रार्थना फार महत्त्वाचे कृपासाधन आहे.प्रार्थनेच्या द्वारे देवाची सखोल ओळख होते,
इफिस. ६:१८ - सर्व प्रकारची प्रार्थना व विनंती करा, सर्व प्रसंगी आत्म्याच्या प्रेरणेने प्रार्थना करा आणि ह्या कामी पूर्ण तत्परतेने व सर्व पवित्र जनांसाठी विनंती करीत जागृत राहा.
![]() |
प्रार्थना |
कलस्सै.४:२ - प्रार्थनेत तत्पर असा व तिच्यात उपकारस्तुती करीत जागृत राहा.
१ थेस्सल.५:१७ - निरंतर प्रार्थना करा. मंडळी एकत्र येऊन प्रार्थना करते तेव्हा देव विशेष आशीर्वाद देतो.
२. पवित्र शास्त्राचे वाचन
देव आपल्या वचनाद्वारे विश्वासणाऱ्याला स्वतःची ओळख करून देतो. त्याला शिकवतो. मार्गदर्शन करतो व आशीर्वाद देतो. एवढेच नव्हे, तर पवित्र आत्मा विश्वासणार्याला देवाचे वचन समजावून सांगतो. देवाच्या वचनाद्वारे पापांची जाणीव, पश्चात्ताप, विश्वास व पवित्रीकरण हे साध्य होते.
![]() |
बायबल |
तीमथ्य.४:१३ - वाचन, बोध व शिक्षण याकडे लक्ष ठेव.
३. उपदेश ऐकणे
प्रत्येक विश्वासणाऱ्याला पवित्र शास्त्राच्या वाचनाने देवाचे सत्य ग्रहण करता येते. तथापि संदेश ऐकल्याने न समजणाऱ्या,लक्षात न येणाऱ्या कठीण गोष्टींचा उलगडा होतो .
१ तीमथ्य.४:६ - ह्या गोष्टी बंधुवर्गापुढे मांडल्या तर विश्वासाच्या वचनांनी व सुशिक्षणाला तू अनुसरलास त्याच्या वचनांनी पोषण करून घेणारा असा तु ख्रिस्त येशूचा चांगला सेवक होशील.
४. उपासना करणे
उपासना करणे चा अर्थ सर्वश्रेष्ठ व्यक्तीचा आदर करणे किंवा तिचा सन्मान करणे. माणसाने देवाची उपासना केलीच पाहिजे.
उपासना कशी करावी किंवा उपासनाचे आशीर्वाद 👈 याविषयी जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
व्हिडीओ बघण्यासाठी 👇 येथे क्लिक करा
सार्वत्रिक मंडळी :
सार्वत्रिक मंडळी म्हणजे सर्व जगातील, सर्व काळातील विश्वासणारे. या मंडळीत केवळ तारणार्यांचाच समावेश होतो .या मंडळीला अदृश्य मंडळीही म्हणतात. या मंडळीचे दोन विभाग आहेत - विजयी मंडळी व झगडणारी मंडळी. ख्रिस्तामध्ये मरण पावलेल्यांना विजयी मंडळी म्हटले आहे. आणि जे विश्वासणारे अजून या जगात आहेत त्यांना झगडणारी मंडळी म्हटले आहे .
पुढे वाचण्यासाठी कृपाया क्लिक करा 👉 सार्वत्रिक मंडळी
Thank u so much Pastor for blessed teaching..