Worship उपासना
उपासना
उपासना म्हणजे काय ?
उपासना या शब्दाचा अर्थ सर्वश्रेष्ठ व्यक्तीचा आदर करणे किंवा तिचा सन्मान करणे. माणसाने देवाची उपासना केलीच पाहिजे.
पित्याला दाता म्हणून, पुत्राला तारणारा म्हणून आणि पवित्र आत्म्याला अंतरी राहणारा म्हणून ओळखणारी अंतःकरणाची उर्मी म्हणजे उपासना.
उपासनाचा संबंध अंतःकरणातील गरजांशी नाही, आशीर्वादांशीही नाही, तर प्रत्यक्ष देवाशी आहे २ शमु.७:१८-२२.
![]() | ||
|
२. उपासनाचे महत्त्व
१. उपासना करणे, नियमशास्त्रातील ही पहिली आज्ञा आहे
" निर्गम ३४:१४ - कारण तुला दुसर्या कोणत्याही देवाला नमन करायचे नाही; कारण ज्याचे नाव ईर्ष्यावान आहे, तो परमेश्वर ईर्ष्यावान देव आहे;" निर्गम २०:१,२
२. देवाने उपासनाच्या उद्देशानेच निवासमंडप व मंदिराची उभारणी केली. खऱ्या देवाची उपासना कशी करावी यासंबंधी लेवीयच्या पुस्तकात सविस्तर सूचना आपणास पहाण्यास मिळतात.
३ . देवाने अब्राहाम,मोशे, यशया,दावीद आणि इतरांना उपासनाचे मर्म शिकवले.
४. सार्वकालिक जीवनात उपासना करणे हेच आमचे काम असेल. प्रकटी.४:५
३. उपासनेचा विषय
लूक. ४:८; स्तोत्र.४५:११ ही वचने अगदी स्पष्ट आहेत, परमेश्वर तुझा देव ह्याला नमन
कर व त्याचीच सेवा कर. “तो तुझा प्रभू आहे म्हणून त्याचीच उपासना कर.” आम्ही मूर्तीची उपासना करायची नाही. निर्गम २०:३- माझ्याखेरीज तुला अन्य देव नसावेत.
![]() |
true worship |
- जगामध्ये अनेकजण दगड व लाकूड यांपासून तयार केलेल्या निर्जीव मूर्तीची उपासना करतात.
- अनेकजण स्वतःची, पैशाची, व्यवसायाची, कुटुंबाची, सुखसंपत्तीची, विज्ञानाची उपासना करतात.
- आम्ही माणसांचीही उपासना करता कामा नये. प्रेषित.१०:२५,२६ ...... त्याने त्याच्या पाया पडून त्याला नमन केले. पण पेत्र त्याला उठवून म्हणाला, “उभे राहा; मीही मनुष्यच आहे.”
- आम्ही देवदूतांचीही उपासना करू नये. प्रकटी.१९:१०; २२:८,९ तेव्हा मी त्याच्या पाया पडून नमन करणार होतो; परंतु तो मला म्हणाला, “असे करू नये; मी तुझ्या सोबतीचा .......... दास आहे. नमन देवाला कर”
- आम्हास निसर्गाचीही उपासना करायची नाही अनु.४:१४-२०; ईयोब ३१:२४-२८. आम्ही निसर्गाची प्रशंसा करू शकतो, परंतु सूर्याची, चंद्राची, झाडांची उपासना करण्यात आपण स्वतःला गुंतवू नये.
ही वचने अशा उपासनेला मनाई करतात.
१. आम्ही देवपित्याची उपासना करावी .योहान.४:२३.... कारण असे आपले उपासक असावेत अशीच पित्याची इच्छा आहे.
२. जो आमचा प्रभू व तारणारा त्या देवपुत्राची-येशू ख्रिस्ताची आम्ही उपासना करावी. योहान.९:३८ “प्रभूजी, मी विश्वास ठेवतो,” आणि त्याने त्याला नमन केले.
त्याच्या देहधारणेबद्दल, त्याच्या बलिदानाबद्दल, तो सध्या आमच्यासाठी जे मध्यस्थीचे व प्रमुख याजकाचे कार्य करीत आहे त्याबद्दल आम्ही त्याची उपासना करावी.
३. पवित्र आत्म्याची उपासना करण्यात अयोग्य असे काही नाही, तरी आम्ही पवित्र आत्म्याची उपासना करावी असे आम्हांला सांगितलेले नाही.
४. उपासनेचा पाया
पापी व्यक्ती पवित्र देवाची उपासना कशी काय करणार ? नीतिमान पित्याने बलिदान म्हणून स्वीकारलेले येशूचे रक्त , हाच एक आधार आहे.
“पित्याशी” असलेल्या नातेसंबंधामुळे आपण उपासना करावी मत्तय.६:९, रोम.८:१५.
५. विश्वासणाऱ्याला पवित्र आत्मा उपासनेमध्ये मार्गदर्शन करतो.
पवित्र आत्मा जो आमच्या प्रभूची उपासना करण्यासाठी मार्गदर्शन करतो, तोच उपासनाचे सामर्थ्य आहे. पवित्र शास्त्रवचनात त्याची उपासना करण्यासाठी, त्याची प्रशंसा करण्यासाठी व त्याला समजून घेण्यासाठी पवित्र आत्मा आम्हांला मार्गदर्शन करतो व शिकवतो.
उपासना ही अशी गोष्ट नाही की, जी साठवून ठेवता येते व सभेच्या वेळी उपयोगात आणता येते, तर उपासना विश्वासणाऱ्याच्या अंतःकरणात सतत असावी लागते. पित्याची पूर्णपणे, मनापासून उपासना करण्यासाठी आपल्याठायी असलेला पवित्र आत्मा खिन्न झालेला अथवा विझलेला नसावा. पित्याची व पुत्राची योग्य उपासना करण्यासाठी पवित्र आत्म्याने तुम्हांला मार्गदर्शन करावे म्हणून त्याला मोकळीक द्या.
६. उपासना कशी करावी ?
१. उपासनाचे स्वरूप आध्यात्मिक असावे, म्हणजे योहान.२:२४ प्रमाणे "... उपासना आत्म्याने......केली पाहिजे.”
![]() |
आत्म्याने उपासना |
२. उपासना खरेपणाने केली पाहिजे. आमच्या ओठांतून निघणारे शब्द सत्य, प्रामाणिक, अंतःकरणपूर्वक आहेत की नाहीत हे पाहण्यासाठी देव आमचे अंतःकरण पारखतो .
३. उपासना समजून-उमजून केली पाहिजे. देवाने अज्ञानाला उत्तेजन दिलेले नाही. पवित्र शास्त्र जे काही शिकवते त्याचे ज्ञान आपल्याला असावे अशी त्याची इच्छा आहे. रोम १२;२- देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे, म्हणून ह्या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वत:चे रूपांतर होऊ द्या.
चर्च मध्ये गुडघे टेकून न समजणारी प्रार्थना पुटपुटून उपासना करण्याकडे काहींचा कल असतो.
चर्चमध्ये गेल्याने देवाची उपासना होतेच असे नाही. कारण, अनेकांची मन हे उपासनेपासून अगदी दूर अशा गोष्टींमध्ये म्हणजे स्वयंपाक करण्याविषयी, बाजार करण्याविषयी किंवा अधिक पैसे कसे मिळवावेत याविषयी विचार करण्यात गुंतलेली असतात.
ख्रिस्ताद्वारे आपण देवाला जी उपासना सादर करतो, ती आध्यात्मिक, खरी व समजून उमजून असावी याकडे लक्ष देणे प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीचे कर्तव्य आहे..
उपासना चर्चमध्ये असो किंवा खाजगी घरात असो,तिला नियमांनी मर्यादा घालून तिची व्याख्या करता येत नाही.
सभेमध्ये आपण जी गाते गातो, प्रार्थना करतो, संदेश ऐकतो, दानार्पण देतो, अशा सर्वांद्वारे आपण उपासना अर्पण करतो .
आम्ही आत्म्याने उपासना करावी म्हणून प्रभू आतुरतेने वाट पाहतो, परंतु आम्ही अनेकदा त्याला निराश करतो. त्याचे खरे उपासक पाहून पित्याच्या अंतःकरणाला आनंद होतो. रोम १२;१
७. उपासनेमधील अडखळणे
उपासना करणे हे ख्रिस्ती विश्वासनार्याचे सर्वांत आद्य कर्तव्य आहे आणि त्यामुळेच सैतानाकडून त्याला विरोध होतो.
१. आज्ञाविरुद्ध - लेवीय १०:१-११ - नादाब व अबीह ह्यांनी अशास्त्र अग्नानी परमेश्वारासमोर नेला म्हणून ते मरण पावले.
उपासनेद्वारे विश्वासणारा त्याला स्वतःवर अजिबात भरंवसा नाही हे सूचित व मान्य करतो.
२. ऐहिकता - विश्वासणारा जगात आहे , परंतु तो निश्चितपणे जगाचा नाही योहान १७: ११-१५. ख्रिस्ती जीवनाचा केंद्र ख्रिस्तच असतो. उपासना करताना मनाचे, शरीराचे लक्ष प्रभूवर केंद्रित होते.
३. टीका करणारा आत्मा - जे लोक चर्चला जातात व तेथून घरी आल्यावर उपदेशकावर टीका करतात त्यांनी देवाची उपासना केली असे म्हणता येत नाही. खरी उपासना उपदेशकाच्या, मंदिराच्या व गायकसंघाच्याही पलीकडे जाते. इतरही मानव असून तेही चुका करू शकतात हे समजुन घ्यावे.
इतरांमधील प्रशंसनीय गोष्टींकडे लक्ष द्या आणि देवाकडून मिळालेल्या मदतीबद्दल प्रीतीने आणि आदराने तुमची अंतःकरणे भरून जाऊ द्या. टीका करण्यासाठी नव्हे तर उत्तेजन देण्यासाठी प्रशंसा करता यावी म्हणून इतरांकडे पाहा.
४. आळशीपणा - देवाची उपासना करण्यासाठी आवश्यक ती शक्ती खर्च करण्यामध्ये आळस करणे नीति.२४:३०-३४ - एकदा मी आळशाच्या शेताजवळून, बुद्धिहीनाच्या द्राक्षमळ्याजवळून जात होतो; तेव्हा तो काटेर्यांनी भरून गेला आहे, त्याची जमीन खाजकुइरीने व्यापली आहे, व त्याची दगडी भिंत कोसळली आहे, असे मला आढळले. ते मी पाहिले, त्याचा विचार केला, आणि ते पाहून मी बोध घेतला. “आणखी थोडीशी झोप घेतो, आणखी थोडीशी डुलकी घेतो, हात उराशी धरून जरा निजतो,” असे म्हणत जाशील तर दारिद्र्य तुला दरोडेखोराप्रमाणे, गरिबी तुला हत्यारबंद माणसाप्रमाणे गाठील.
देवाची उपासना करू इच्छिणारे अनेकजण शारीरिक रित्या नाही, तर मानसिक रित्या झोपतात त्यामुळे ते देवाला भेटून त्याची स्तुती करण्याची त्यांची जी मूलभूत इच्छा आहे ते ती पुरी करू शकत नाहीत.
आध्यात्मिक आळसाला चोर समजले पाहिजे आणि त्यामुळेच आध्यात्मिक गुंगीची जागा आध्यात्मिक जागृतीला दिली पाहिजे.
५. सहनशीलतेचा अभाव - आमची वेगवान पीढी त्याच्या सानिध्यात शांत राहून त्यांच्या चांगुलपणावर व कृत्यांवर मनन करण्यात अपयशी ठरली आहे.
प्रभू म्हणतो यशया ४०:३१- तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील; ते गरुडाप्रमाणे पंखांनी वर उडतील; ते धावतील तरी दमणार नाहीत, चालतील तरी थकणार नाहीत.
६. कर्मठपणा - देवाची उपासना मोकळ्या मनाने करण्याऐवजी विधिनियमांनी तिला बांधून टाकतात.
७. क्षमा न करणारे अंतःकरण - मत्तय.५:२३,२४. ह्यास्तव तू आपले दान अर्पण करण्यास वेदीजवळ आणत असता आपल्या भावाच्या मनात आपल्याविरुद्ध काही आहे असे तुला स्मरण झाले, ... मग येऊन आपले दान अर्पण कर.
आकडूपणा, अढी वगैरे गोष्टींची क्षमा करून, भरपाई करून, पुन्हा संबंध प्रस्थापित केले जाऊ शकतात .
८. गर्व - वंश, शिक्षण, स्वप्रयत्नांनी मिळवलेले यश, याविषयी व्यक्तीला वाटणारा गर्व खरयाअंतःकरणाने उपासना करण्यास बाधा निर्माण करतो.
आम्ही देवाची उपासना कोठे करतो ? गरिज्जिम पर्वतावर की यरुशलेममध्ये ? योहान ४;२० जागा हि महत्त्वाची नाही. जेव्हा आम्ही आत्म्याने उपासना करतो तेंव्हाच आम्ही खरया अर्थाने उपासना करतो .
खरया उपासनाचे दोन महत्त्वाचे परिणाम आहेत :
१. देवाला स्तुती,मान व गौरव दिल्यामुळे त्याचे गौरव होते.
२. विश्वासणारा आशीर्वादित होतो. देव उपासना करणाऱ्याचे अंतःकरण आनंदाने व शांतीने भरतो .
Nice.. Praise the lord 😇
Good information.....👍👌👌