उपवास प्रार्थना कशी करावी Fasting Prayer

 

उपवास प्रार्थना कशी करावी ?  Fasting Prayer

Fasting Prayer
 Fasting Prayer

उपवासाचा खरा अर्थ काय आहे ?  Meaning of fasting

उपवास म्हणजे देवाच्या सान्निध्यात राहणे. 'उपवासहा शब्द दोन शब्दांचा बनलेला आहे. उप म्हणजे जवळ वास म्हणजे राहणे उप + वास = जवळ राहणे देवाच्या जवळ राहणे. त्यामुळे उपवासाचा खरा अर्थ म्हणजे देवाच्या सान्निध्यात राहणे.

बायबलसंबंधी उपवास म्हणजे काय ? What is biblical fasting and prayer?

उपवास हा आपल्या देवाशी एक वैयक्तिक संबंध आहे . आपल्या उपवासाद्वारे आपण देवावर अवलंबून आहोत हे प्रकट होते . बायबलमध्ये उपवासाची संकल्पना व्यापक आहे. बायबल आधारित उपवासाबरोबर प्रार्थना नेहमीच समाविष्ट आहे . संदेष्टे , याजक आणि मंडळीने उपवास केल्याचे अनेक उदाहरणे बायबलमध्ये आहेत . जुन्या करारात पापाबद्दल शोक किंवा पापांचा पश्‍चात्ताप झाला आहे हे दाखवण्यासाठी उपवास करत [1 शमुवेल 7:4-6]. तसेच देवाची इच्छा किंवा मार्गदर्शन प्राप्त करण्यासाठी उपवास करत [शास्ते 20:26-28] . नवीन करारामध्ये देवाशी जवळीक साधण्यासाठी उपवास केला जात. आपले विचार आणि लक्ष देवावर अधिक चांगल्या प्रकारे केंद्रित करण्यासाठी आजपर्यंत उपवासाची ही शिस्त मंडळी पाळत आलेली आहे.

सर्वच उपवास देवाला मान्य आहेत असे नाहीतर प्रामाणिक आणि वचनानुसार असलेल्या उपवासलाच देव मान्यता दर्शवतो.

बायबलमध्ये उपवासाचे प्रकार  types of biblical fasting

1.    सामान्य उपवास: हे विशिष्ट कालावधीसाठी अन्न पूर्णपणे वर्ज्य आहे. [ उदा.एस्तेरचा उपास ,एस्तेर 4:15-16].

2.   आंशिक उपवास: आंशिक उपवासातव्यक्ती विशिष्ट प्रकारचे अन्न किंवा विशिष्ट जेवण टाळतात. दानियलचा उपवास [दानियल 10:3].

3.   निरंकार उपास : यामध्ये अन्न आणि पाणी दोन्ही वर्ज्य करणे समाविष्ट आहे. उदा. संदेष्टा एज्रा [एज्रा 10:6].

4.   सामूहिक उपास : एखाद्या गटाने किंवा लोकांच्या समुदायाने केलेला उपवास. [योएल 2:15-16].

5. अलौकिक उपवास: अन्न किंवा पाणी  घेता दैवीपणे टिकून राहते. उदा. संदेष्टा एलीया [1 राजे 19:8].

6.   विशेष दिवशी किंवा नियमित उपवास: परुशी आणि जकातदार दृस्तांत परुश्याने आठवड्यातून दोनदा उपवास करण्याबद्दल बढाई मारली [लूक 18:12].

7.  पश्चात्ताप झाल्यावर उपवास: निनवेच्या लोकांनी पश्चात्तापाचे चिन्ह म्हणून उपवास केला [योना 3:5-9].

8.   मार्गदर्शनासाठी उपवास: उपवास हा देवाचे मार्गदर्शन किंवा विवेक शोधण्याचे साधन म्हणून देखील वापरला जातो. पॉल आणि बर्नबास यांना त्यांच्या मिशनरी प्रवासावर पाठवण्यापूर्वी अँत्युखीया मंडळीने उपवास केला [ प्रे. कृत्ये 13:2-3].

9.   पश्चात्तापासाठी उपवास: उपवास बहुतेक वेळा पश्चात्ताप आणि देवाची क्षमा मिळविण्याशी संबंधित असतो. योनाच्या चेतावणीनंतर निनवेच्या लोकांनी पश्चात्तापाचे चिन्ह म्हणून उपवास केला [योना 3:5-9].

उपवासाचा उद्देश आणि कालावधी याची उदाहरणे Purpose Of Fasting

जुना करारातील उपवास who took fasting in the bible

·       इस्राएलांनी पाप केल्यामुळे मोशेने चाळीस दिवस उपवास केला [अनुवाद 9: 9,18,25].

अन्न किंवा पाण्याशिवाय मानवाला इतके दिवस जगणे शक्य नाही. विशेष देवाच्या साह्याशिवाय इतक्या काळ अन्नपाण्याशिवाय राहाणे शक्य नाही. मोशे देवाच्या सान्निध्यात असल्यामुळे चाळीस दिवस आणि चाळीस रात्री उपवास करू शकला .

·       शौलच्या मृत्यूची वार्ता ऐकून दावीदाने शोक केला आणि संध्याकाळपर्यंत उपाशी राहिला [ 2 शमु 1:12].

·       दावीदाने आपल्या आजारी पडलेल्या मुलासाठी सात दिवसापर्यंत शोक आणि उपवास केला केला [शमुवेल 12:16].

·      एलीया ईजबेलच्या भीतीने पळून जात असताना देवदुताने पुरवलेल्या अन्नाच्या बळावर चाळीस दिवस  चाळीस रात्री उपवास केला [राजे 19:7-18].

·      अहाबाच्या वाईट प्रवृत्तीमुळे परमेश्वर आणीत असलेल्या अरिष्टा विषयी ऐकून अहाब दीन होऊन त्याने उपवास केला [राजे 21:27-29].

·       यिर्मयाच्या भविष्यवाणीवरून दानीएलाने यहूदाच्या पापाबद्दल उपवास केला [दानीएल 9: 1-19].

·      दानीएलास एक गूढ दृष्टान्तात मोठ्या युद्धाविषयी समजल्याने सबंध तीन सप्तके शोक केला आणि स्वादिष्ट अन्न मुळीच खाल्ले नाही [दानीएल 10: 3-13].

·       एस्तेरने यहुदी लोकांच्या सुटकेसाठी तीन दिवस  तीन रात्री उपास केले  [एस्तेर 4: 13-16].

·      नेहेम्याने येरूशलेमविषयी झालेली मोठी दुर्दशाबाबत ऐकून विलाप केला आणि उपास करून स्वर्गींच्या देवाची प्रार्थना केली [नहेम्या 1: 4-2:10]

·       योनाचा संदेश ऐकून निनवेच्या लोकानी उपास नेमला आणि श्रेष्ठापासून कनिष्ठांपर्यंत सर्व गोणताट नेसले [योना 3].

नवीन करारातील उपवास

·       हन्ना चौर्‍याऐंशी वर्षांची विधवा असून मंदिर सोडून  जाता उपास  प्रार्थना करून रात्रंदिवस सेवा करत असे [लूक 2:37]

·       सेवेच्या सुरूवातीच्या चाळीस दिवस आधी येशूने उपवास केला [मत्तय 4:1-11].

·       योहानाच्या शिष्यांनी उपवास केला [मत्तय 9:14-15].

·       अंत्युखियातील वडीलजनांनी पौलाला आणि बर्णबाला पाठवण्यापुर्वी उपवास केला [ प्रे. कृत्ये 13: 1-5].

·       दिमिष्कात,पौल तीन दिवस आंधळ्यासारखा झाला  त्याने काही अन्नपाणी घेतले नाही [प्रे. कृत्ये  9:9].

·       जहाज डूबनेच्या स्तिथीत असताना शिपायांनी 14 दिवस उपवास केला  [प्रे. कृत्ये 27: 33-34].

आपण उपवास का करावेत  ? Fasting prayer

उपवास प्रार्थना कशी करावी
fasting Prayer

आधुनिक जगातलोक विशेषतः वजन कमी करण्यासाठी आणि इतर कथित आरोग्य फायद्यांसाठी उपवास करतात . परंतु धार्मिक लोक विशिष्ट कारणाप्रती त्यांची बांधिलकी दर्शवण्यासाठी उपवास करतात. विशेषतः या दिवशी आपण भौतिक गोष्टीपेक्षा देवाचा अधिक विचार करतो .

सामान्यत: आपल्या उपवासाची काही कारणे पुढीलप्रमाणे असू शकतात .

when fasting is needed 

1.आपले प्रार्थना जीवन मजबूत करण्यासाठी [उदा. एज्रा 8:23]
2. विशेष गोष्टीत देवाचे मार्गदर्शन मिळवे याकरिता [उदा. शास्ते 20:26].
4. बंधनमुक्त होण्यासाठी किंवा संरक्षण मिळवे याकरिता [उदा.इति 20:3 – 4].
5. पश्चात्ताप व्यक्त करून देवाकडे परत जाण्यासाठी [उदा. शमू 7:6 ].
6. देवासमोर दीन होण्याकरिता [उदा. राजे 21:27-29]. 
7. देवाचे कार्य वाढण्याकरिता [उदा. नेहेम्या 1:3, 4].
8. इतरांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी [उदा. यशया 58:3 –7 ].
9. मोहावर विजय मिळवण्याकरीता [उदा. मत्तय 4:1–11 ]
10. देवाप्रती उपासना व्यक्त करण्यासाठी [उदा. लूक 2:३7 ].

उपवासाचे नियम

पवित्र शास्रानुसार उपवास कसा करावा. Fasting the Right Way: Lessons from Scripture

मत्तय 6;16-18 ;

16तुम्ही जेव्हा उपास करता तेव्हा ढोंग्यासारखे म्लानमुख होऊ नकाकारण आपण उपास करत आहोत असे लोकांना दिसावे म्हणून ते आपली तोंडे विरूप करतात. मी तुम्हांला खचीत सांगतो कीते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत. 17 तू तर उपास करतोस तेव्हा आपल्या डोक्याला तेल लाव आपले तोंड धू18 अशा हेतूने कीतू उपास करत आहेस हे लोकांना नव्हेतर तुझ्या गुप्तवासी पित्याला दिसावेम्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला उघडपणे प्रतिफळ देईल”  

पुष्कळ बायबल अभ्यासक सूचित करतात कीयेथे येशू आपणास “जर तुम्ही  असे  म्हणता , तर तुम्ही जेव्हा असे म्हणतो. यावरून असे गृहीत जाते किख्रिस्ताचे अनुयायी उपवास करतील. तथापियेशू उपवासाचे प्रदर्शन किंवा लक्ष वेधण्याच्या उद्देशाने उपवास करू नये म्हणून ताकीद देतो.

यशया संदेष्टा देखील उपवास कसा करू नये याविषयी सूचना करतो.

3पाहाआपल्या उपासाच्या दिवशी तुम्ही आपले कामकाज चालवतातुम्ही आपल्या सर्व मजुरांकडून काबाडकष्ट करवता. पाहातुमच्या उपासांचा परिणाम तर असा होतो की तुम्ही त्या वेळी कटकटी करता  दुष्टपणाने ठोसाठोशी करतातुमचा शब्द उर्ध्वलोकी ऐकू जावा ह्यासाठी तुमचे हल्लीचे उपास आहेत असे नाही. 5 मला पसंत पडणारा असा हा उपास आहे कायमनुष्याच्या जिवास पीडा व्हावी असा हा तुमचा उपासाचा दिवस आहे कायलव्हाळ्यासारखे आपले डोके लववणे आणि आपल्या अंगाखाली गोणपाट  राख पसरणे ह्याला उपास म्हणतोस कायआणि असा दिवस परमेश्वराला मान्य होईल काय ? [यशाया 58;3-5 ]

यशया संदेष्टानुसार उपासांचे योग्य पालन  Effective Strategies for Biblical Fasting

6दुष्टतेच्या बेड्या तोडाव्यातजुवाच्या दोर्‍या सोडाव्यातजाचलेल्यांना मुक्त करावेसगळे जोखड मोडावेहाच मला पसंत असा उपास नव्हे काय? 7तू आपले अन्न भुकेल्यांना वाटावेतू लाचारांना  निराश्रितांना आपल्या घरी न्यावेउघडा दृष्टीस पडल्यास त्याला वस्त्र द्यावेतू आपल्या बांधवाला तोंड लपवू नये हाच तो उपास नव्हे काय? 8असे करशील तर तुझा प्रकाश प्रभातेप्रमाणे फाकेलतुझी जखम लवकर भरेलतुझी नीतिमत्ता तुझ्यापुढे चालेल  परमेश्वराचा गौरव तुझा पाठीराखा होईल.तेव्हा तू हाक मारशील ती परमेश्वर ऐकेलतू धावा करशील तेव्हा तो म्हणेलहा मी आहे. जर तू आपल्यामधून जोखड लादण्याचे सोडून देशीलबोट दाखवण्याचे  दुष्ट गोष्टी बोलण्याचे टाकून देशील;10 जर तू आपल्या जिवाला इष्ट ते भुकेल्यांना देशीलदुःखग्रस्त जिवांना तृप्त करशीलतर तुझा प्रकाश अंधकारात झळकेलनिबिड अंधकार तुला मध्यान्हाचे तेज असा होईल,11 परमेश्वर तुझा सततचा मार्गदर्शक होईलतो अवर्षणसमयी तुझ्या जिवास तृप्त करीलतुझ्या हाडांना मजबूत करीलतू भरपूर पाणी दिलेल्या मळ्यांप्रमाणे होशीलपाणी कधी  आटणार्‍या झर्‍याप्रमाणे होशील[यशाया 58;6-11 ]

उपवासाच्या बाबतीत गैरसमज

उपवास केल्याने स्वतःला अतिधार्मिक समजणे धोक्याचे आहे . नम्रतेचा आव आणण्याविरुद्ध बायबल ताकीद देते. देवाला अशा प्रकारची मनोवृत्ती मुळीच आवडत नाही. [लूक 18;9-14].

उपवास धरण्याची गोष्ट ही देव आणि तुम्हीफक्‍त तुम्हा दोघांतली गोष्ट असली पाहिजे. तिच प्रदर्शन करायचे नसते. उपवास केल्याने आपल्या पापांची आपोआप भरपाई होईलअसा विचार आपल्या मनात ठेऊ नये. पापांची क्षमाउपवास धरल्याने नव्हे तर मनापासून पश्‍चात्ताप केल्याने होते.

यशया 58:३ मध्ये इस्राएली लोक असे दाखवत होतेकीउपवास धरून ते जणू काय देवावर उपकारच करत होते. त्यांनी देवास म्हटले “आम्ही उपास करितो ते तू का पाहत नाहीसआम्ही आपल्या जीवास पीडा देतो ती तू का लक्षात आणीत नाहीस?” आजही अनेकांना असेच वाटते. उपवास धरून ते देवाला त्यांच्यासाठी काही तरी करण्यास भाग पाडू शकतात. उपवास धरल्यामुळे परमेश्वर देव आपणास काहीतरी देण्यास बांधील आहे , हा समज खोटा आहे .

Fasting and praying scriptures

मत्तय 6:16-18 - तुम्ही जेव्हा उपास करता तेव्हा ढोंग्यासारखे म्लानमुख होऊ नकाकारण आपण उपास करत आहोत असे लोकांना दिसावे म्हणून ते आपली तोंडे विरूप करतात. मी तुम्हांला खचीत सांगतो कीते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत. 17 तू तर उपास करतोस तेव्हा आपल्या डोक्याला तेल लाव आपले तोंड धू; 18 अशा हेतूने कीतू उपास करत आहेस हे लोकांना नव्हेतर तुझ्या गुप्तवासी पित्याला दिसावेम्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला उघडपणे प्रतिफळ देईल.

योएल 2:12 - “आता तरी” परमेश्वर म्हणतो, “तुम्ही मनःपूर्वक माझ्याकडे वळाउपोषणआक्रंदन  शोक करून वळा.”

दानिएल 10:3 - तीन सबंध सप्तके संपेपर्यंत मी स्वादिष्ट अन्न मुळीच खाल्ले नाहीमांस  द्राक्षारस ही माझ्या तोंडात गेली नाहीत आणि मी तैलाभ्यंगही केला नाही.

एज्रा 8:23 - ह्यास्तव आम्ही उपास करून आपल्या देवाची प्रार्थना केली ती त्याने ऐकली.

यशया 58:6 - दुष्टतेच्या बेड्या तोडाव्यातजुवाच्या दोर्‍या सोडाव्यातजाचलेल्यांना मुक्त करावेसगळे जोखड मोडावेहाच मला पसंत असा उपास नव्हे काय?

प्रे.कृत्य 13:2 - ते प्रभूची सेवा  उपास करत असता पवित्र आत्मा म्हणाला की, “बर्णबा  शौल ह्यांना ज्या कार्यासाठी मी बोलावले आहे त्यासाठी त्यांना माझ्याकरता वेगळे करून ठेवा.”

स्तोत्र 69:10 - मी उपास करून शोक केलातेच माझ्या निंदेस कारण झाले.

प्रे.कृत्य 14:23 - त्यांनी त्यांच्यासाठी प्रत्येक मंडळीत वडील निवडलेआणि उपास  प्रार्थना करून ज्या प्रभूवर त्यांनी विश्वास ठेवला होता त्याच्याकडे त्यांना सोपवले.

नेहेम्या 1:4 हे ऐकताच मी खाली बसून रडू लागलो आणि बरेच दिवसपर्यंत विलाप करीत राहिलोमी उपास करून स्वर्गींच्या देवाची प्रार्थना केली.

 Please comment and Share 🙏🙏

चाळीस दिवसांच्या उपवासाविषयी काय ?

प्रार्थना कशी करावी ?

 

Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url