Should Christians celebrate Valentine Day ?

 



Should Christians celebrate Valentine Day ?

ख्रिश्चनांनी व्हॅलेंटाईन डे साजरा करावा की नाही ?

Should Christians celebrate Valentine Day

                   

व्हॅलेंटाईन डे म्हणजे काय  What is Valentine's Day?

व्हॅलेंटाईन डे हा जगातील सर्वाधिक लोकप्रिय दिवस आहे. इतका लोकप्रिय आहे की सर्वच विशेषत बहुतेंक तरुणतरुणी  यात अधिकतेने सामील होतात .

असा अंदाज आहे की अमेरिकन लोक या एकाच दिवसावर  सुमारे २० अब्ज डॉलर्स खर्च करतात आणि ख्रिसमसच्या नंतरचा त्यांच्यासाठी हा सर्वात महागडा दिवस  आहे.

तथापिबहुमत नेहमीच योग्य असतेच अस नाही ....

 व्हॅलेंटाईन डे कधी असतो ?  व्हॅलेंटाईन डे हा दिवस म्हणजे नेमके  काय ? When is Valentine's Day?

या दिवसाचे तरुणांमध्ये कुतूहल आणि व्हॅलेंटाईन डे बद्दलचे  आकर्षण पाहून मी या दिवसाविषयी गुगल सर्च करून पाहिले तर आलेली माहिती मला  फारच धक्काधायक वाटली .  जेव्हा मी तरुणाबरोबर यावर  चर्चा केली तर समजले कि , अगदी कॉलेजमध्येही तरुण विद्यार्थी  १४ फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाईन डे चे विशेष आयोजन करतात . क्लासरूम गुलाबाच्या फुलांनी सजवतात . आणि इच्छुक मुलगा पाहिजे त्या मुलीला गुलाबाचे फुल देऊन स्वता;चे  प्रेम प्रकट करतो. आणि विशेष म्हणजे शिक्षक ही यास विरोध करत नाही . उलट सहमती देतात .आणि याची सुरवात सात दिवस आधीच ७ फेब्रुवारीपासून  होते . प्रत्येक दिवस वेगवेगळ्या नावाने साजरा होतो .

1st day-Rose Day गुलाबाचे फुल भेट देतात .
2nd day-  Propose Day प्रेमाची कबुली देतात
3rd day - Chocolate Day ; चॉकलेट देतात
4th day- Teddy Day हृदय आकाराचे टेडी देऊन
5th day-  Promise Dayनाते टीकावण्याचे वचन देतात
6th day -Hug Day  ; मिठीत घेतात
7th day- Kiss Day; चुंबन घेतात
8th day- Valentine’s Day; शेवटी व्हॅलेंटाईन डे साजरा


ख्रिश्चनांनी हा दिवस साजरा करावा की नाही ?

सर्वात महत्त्वाचे म्हणजेव्हॅलेंटाईन डे बद्दल देव काय विचार करतो ?

ख्रिश्चनांनी व्हॅलेंटाईन डे साजरा का करु नये ,अशी काही  कारणे या पोस्टमध्ये मी  येथे देत आहेत.

१. व्हॅलेंटाईन डे चा उगम हा मूर्तिपूजक पासून आहे. The origin of Valentine's Day

जर आपण कोणत्याही विश्वकोश किंवा इतिहासात शोध घेतल्यास  कळून येईल कि  व्हॅलेंटाईन डे हा एक प्राचीन रोमन मूर्तिपूजक उत्सव आहे .

मूलतः या उत्सवास लुप्रेकलिया म्हणून ओळखले जातो जो प्रत्येक फेब्रुवारीच्या १४ तारखेला साजरा केला जातो . ल्यूपेरकलिया हा ल्युपरकस (प्रजनन देवता) जुनो (विवाहाची आणि स्त्रियांची देवी) आणि पॅन (निसर्गदेवते)  देवांचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो.

व्हॅलेंटाईन डेचे  मूळ मूर्तिपूजा आहे. देवाला मूर्तीपूजेचा तिटकारा आहे आणि तो आपल्या लोकांना त्यापासून दूर राहण्याची कडक स्पष्ट आज्ञा देतो.

 “ज्या राष्ट्रांचा ताबा घेण्यास तू जात आहेस त्यांचा पाडाव तुझा देव परमेश्वर तुझ्यासमोर करील व तू ती ताब्यात घेऊन तेथे वस्ती करशील;तेव्हा सांभाळनाहीतर तुझ्यासमोर त्यांचा पाडाव झाल्यावर तुला त्यांचे अनुकरण करण्याचा मोह होईल आणि ही राष्ट्रे आपल्या देवांची ज्या प्रकारे सेवा करीत होती तशीच आपणही करावी असे मनात आणून त्या देवांच्या नादी तू लागशील.आपला देव परमेश्वर ह्याच्या बाबतीत तू असे करू नकोसकारण ज्या गोष्टींचा परमेश्वराला वीट येतो व तिरस्कार वाटतो त्या सर्व गोष्टी ते लोक आपल्या देवांच्या बाबतीत करीत आले आहेतते देवांप्रीत्यर्थ आपल्या मुलामुलींचादेखील होम करीत असतात. मी तुला आज्ञापीत आहे ती प्रत्येक गोष्ट लक्षपूर्वक पाळतिच्यात अधिकउणे काही करू नकोस.(अनुवाद १२:२९-3२).

२. बायबल  सांगते लैंगिक अनैतिकतेपासून  दूर  पळा.

जारकर्माच्या प्रसंगापासून पळ काढा. जे कोणतेही दुसरे पापकर्म मनुष्य करतो ते शरीराबाहेरून होतेपरंतु जो जारकर्म करतो तो आपल्या शरीराबाबत पाप करतो.  तुमचे शरीरतुमच्यामध्ये वसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हांला मिळाला आहे त्याचे मंदिर आहे हे तुम्हांला ठाऊक नाही कायआणि तुम्ही स्वतःचे मालक नाही; कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहातम्हणून तुम्ही आपले शरीर [व आत्मा] जी देवाची आहेत त्याद्वारे देवाचा गौरव करा [१करिंथ ६:१८-२० ].

flee from sexual immorality

लैंगिक अनैतिकता ही  निराशाजनक भावनाअसाध्य व्याधी आणि सामाजिक समस्या आणते. प्रियानो देव आपल्यावर अपार प्रेम करतो आणि आपण अनावश्यक दु:ख भोगावे अशी त्याची इच्छा नाही.

जरी लैंगिक अनैतिकतेमुळे सुख मिळते तरी ते फार काळ टिकत नाही. परंतु जेव्हा तुम्ही खोल विचार कराल तेव्हां कळून येईल किअसल्या पापात पडणे म्हणजे अनेक प्रकारच्या असाध्य आजारांना आमंत्रण देण्याची जोखीम उचलणे होय .

तर तुम्ही आता म्हणत असाल कि लैंगिक अनैतिकतेचा व्हॅलेंटाईन डे बरोबर काय संबंध आहे व्हॅलेंटाईन डे म्हणजेच लुपेरकॅलिया मूर्तिपूजक हा उत्सव लैंगिक विधीसह साजरा करत . हा उत्सव म्हणजे कामुकपणावासना आणि प्रजनन या बाबत  आहे.

आमच्यासाठी सर्वात चांगले काय आहे हे देवाला माहित आहे . इतर पापांप्रमाणेच लैंगिक अनैतिकता देखील माणसास खोल वेदनांमध्ये घेऊन जाते .

३. विश्वासनार्याना प्रीती करण्यासाठी पाचारण करण्यात आलेले आहे वासनेसाठी नव्हे 

 

Should Christians celebrate Valentine Day

         

          अधिकतर पहाण्यास मिळते कि व्हॅलेंटाईन डे हा शुध्द प्रेमाऐवजी मोह आणि तीव्र वासना यांनीच भरपूर असतो

बरेच अविवाहित जोडपे व्हॅलेंटाईन डेचा वापर विवाहपूर्व लैंगिक संबंधात भाग घेण्यासाठी करत  आहेत. बहुतेकदा या लैंगिक कृत्यामुळे नको असणारे  आणि अनियोजित गर्भधारणा होते. दुर्दैवानेकाही लोक त्यांच्या चुका फक्त दुरुस्त” करण्यासाठी गर्भपात करतात.

४. ख्रिस्ती विवाहित जोडप्यानो ,तुम्ही तुमचे  प्रेम व्हॅलेंटाईन डे शिवाय सुद्धा साजरा करू शकता. व्हॅलेंटाईन डे च्या विशिष्ट दिवशी प्रेमावर मर्यादा का घालतात. दररोज आपले प्रेम प्रकट करणे चांगले नाही काय?

ख्रिस्ती विवाहित जोडपे जे तुम्हामध्ये पवित्र  नातेसंबंध आहेत त्याबद्दल दररोज तुमचे प्रेम आणि काळजी दाखवू शकतात व्यक्त करू शकतात  व्हॅलेंटाईन डे येण्याची वाट पाहण्याची गरज नाही.

खरे पहाता प्राचीन रोमन मूर्तिपूजक व्हॅलेंटाईन डे हा दिवस खरे प्रेम साजरे करण्यासाठी न करता तरुणतरुणी  वासना व्यक्त करण्यासाठी करत .

५. संत व्हॅलेंटाईन कोण आहे हे कोणालाही व्यवस्थित माहित नाही.

जरा  इंटरनेटवर संत व्हॅलेंटाईन कोण आहे याविषयी शोध घ्या आणि पहा त्यांच्या विषयी काय सापडते. त्यात  खूपच  मतभेद  आहेत कारण त्याची कथा सत्यंऐवजी दंतकथावर  आधारित आहे.

काही ख्रिस्ती व्हॅलेंटाईन याना संत म्हणून संबोधतात आणि देवासमान आदर देतात  .एखाद्या मनुष्याला देवासमान आदर करणे हे बायबलआधारित नाही . काही लोकांचे मत आहे की आपण संतांना प्रार्थना करावी कारण ते आपल्या विनंत्या देवाकडे पोहचवतात . ही निव्वळ सैतान करीत असलेली मनुष्याची घोर फसवणूक आहे जी आपण सर्वांनी थांबविली पाहिजे. मृत झालेली माणसे मृत आहेत. त्यांच्याकडे जिवंत लोकाना मदत करण्याची  क्षमता मुळीच  नाही.

 “बायबल हे स्पष्ट सांगते कि, ज्या अधोलोकाकडे तू जात आहेस तेथे काही उद्योगयुक्तिप्रयुक्तीबुद्धी व ज्ञान ह्यांचे नाव नाही.  उपदेशक ९;१०. “

ख्रिस्ताशिवाय कोणीही स्वर्गात गेला नाही. योहान ३;१३

६. व्हॅलेंटाईन डे च्या प्रचारानुसार देवाच्या प्रेमाची परिभाषा भिन्न आहे.

बायबलआधारित प्रेमाची परिभाषा अशी आहे .  देवावर प्रीती करणे म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणे होय. आणि त्याच्या आज्ञा कठीण नाहीत १योहान ५;

आपणास वरील परिभाषा  समजली का ?  जर नाहीपुन्हा वाचा.

देवाची प्रीती म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणे. देव आम्हास  आज्ञा करतोकारण तो आम्हावर प्रीती करतो. देवाच्या आज्ञा या आशीर्वादित आणि आनंदी जीवन कसे जगावे ,याविषयी आपल्याला मार्गदर्शन करतात.

व्हॅलेंटाईन डे अगदी उलट आहे. ख्रिस्ती या नात्याने मनुष्यांऐवजी देवाला संतुष्ट करणे  हे आपले कर्तव्य आहे.

आपण कोणाचे अनुसरण करावे ?  देवाचे  की माणसाचे 

 आपण कोणाला संतुष्ट करावे देवाला की मानुष्याला ?   

 आपण कोणावर विश्वास ठेवला पाहिजे ?  देवावर कि मनुष्यावर ?

प्रभू येशू मत्तय १५;६-९ मध्ये आम्हाला उत्तर देतो.

अशा प्रकारे तुम्ही आपल्या संप्रदायेकरून देवाचे वचन रद्द केले आहे. अहो ढोंग्यांनोतुमच्याविषयी यशयाने यथायोग्य संदेश दिला की,  ‘हे लोक [तोंड घेऊन माझ्याकडे येतात व] ओठांनी माझा सन्मान करतात,परंतु त्यांचे अंतःकरण माझ्यापासून दूर आहे. ते व्यर्थ माझी उपासना करतात; कारण ते शास्त्र म्हणून जे शिकवतात ते असतात मनुष्याचे नियम.

 

७. व्हॅलेंटाईन डे देण्यापेक्षा मिळवण्याची भावना निर्माण करतो.

सर्वसाधारणपणे महिला खूप भावनिक असतात. त्यांना व्हॅलेंटाईन डे किंवा इतर दिवशी प्रेमाचे चिन्ह म्हणून काहीतरी  भेट मिळावी अशी त्या अपेक्षा करतात.  व्हॅलेंटाईन डे देण्याच्या ऐवजी घेण्यासाठी अधिक अपेक्षा ठेवतो.  पुष्कळ  स्त्रिया त्यांच्या जोडीदाराकडून काहीतरी भेट मिळण्याची अपेक्षा करतात. हक्काची अशी भावना ठेवतात कि, आज व्हॅलेंटाईन डे आहे आणि मी भेटवस्तूला पात्र आहे मला ती मिळायलाच हवी . याबदल्यात तरुणही तरुणीकडून नको ती मागणी ठेवतात . दुसरीकडेपुरुषांना जोडीदारास आनंदित करण्यासाठी असे काहीतरी विकत घेण्याचा दबाव येतो कि,त्यांचा जोडीदार संतुष्ट होईल . कधीकधी अशी भेट स्वेच्छेने मुळीच नसते. देणे भाग पडते म्हणून देतात.

८. देव आपल्यास जगाशी समरुप होऊ नये म्हणून आज्ञा करतो.

मी आधी म्हटल्याप्रमाणे व्हॅलेंटाईन डे ही जगातील एक अतिशय लोकप्रिय दिवस आहे, कारण तो मानवी स्वभावाच्या वासनेला पूर्ण करते.  तथापिख्रिश्चनांनी आपल्या मानवी स्वभावावर विजय मिळवावा आणि देवासारखे अधिक व्हावे अशी देवाची इच्छा आहे.

 प्रेषित पौल यावर स्पष्ट  बोलतो;   म्हणून बंधुजनहोमी देवाच्या करुणांमुळे तुम्हांला विनवतो कीतुम्ही आपली शरीरे जिवंतपवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावीतही तुमची आध्यात्मिक सेवा आहे.देवाची उत्तमग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावेम्हणून ह्या युगाबरोबर समरूप होऊ नकातर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वत:चे रूपांतर होऊ द्या.रोम १२;,

 “तुम्ही विश्वास न ठेवणार्‍यांबरोबर संबंध जोडून विजोड होऊ नकाकारण नीती व स्वैराचार ह्यांची भागी कशी होणारउजेड व अंधार ह्यांचा मिलाफ कसा होणारविश्वासणारा आणि अविश्वासणामध्ये भागी कशी होऊ शकते ? देवाचे मंदिर मूर्तिपूजकांसाठी  कसे  उघडे करू शकतो आम्ही जिवंत देवाचे मंदिर आहोत.देव स्वतः म्हणाला आहे ख्रिस्ताची बलियाराशी  एकवाक्यता कशी होणारविश्वास ठेवणारा व विश्वास न ठेवणारा हे वाटेकरी कसे होणार ? देवाच्या मंदिराचा मूर्तींबरोबर मेळ कसा बसणारआपण तर जिवंत देवाचे मंदिर आहोतदेवाने असे म्हटले आहे की, ‘मी त्यांच्यामध्ये वास करून राहीन. मी त्यांचा देव होईनव ते माझे लोक होतील.म्हणूनत्यांच्यामधून निघा व वेगळे व्हा,’असे प्रभू म्हणतो,‘आणि जे अशुद्ध त्याला शिवू नका;म्हणजे मी तुम्हांला स्वीकारीन;’आणि मी तुम्हांला पिता असा होईन,’तुम्ही मला पुत्र’ व कन्या असे व्हाल,‘असे सर्वसमर्थ प्रभू म्हणतो.  २करिंथ ६;१४-१६

 

☝व्हॅलेंटाईन बद्दल सल्लामसलत ऐकण्यासाठी वरील व्हिडिओ वर क्लिक करा.

निष्कर्ष

ख्रिस्ती युवक-युवतीनो जग ज्याला प्रेम म्हणून ओळखते ते आहे केवळ वासना ते खरे प्रेम नाही .तुम्हाला हे एका उदाहरणाद्वारे खरे प्रेम व खोटे प्रेम स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतो .

“ एकदा एक युवक रस्त्याने जाताना त्यास  सुंदर गुलाबाचे फुल दिसले . त्याला ते खूप आवडले  त्याने जवळ जाऊन त्या झाडाच्या आवतीभोवती  खणले ,खतपाणी टाकले त्यास काही इजा होऊ नये म्हणून कुपण केले. काही वेळाने दुसरा एक युवकास जाताना त्यालाही  ते फुल त्याला दिसले . त्यालाही ते फुल खूपच आवडले . आणि मग त्याने  ते फुल तोडले व त्याचा सुगंध घेतला आणि खिशाला लावले.               आता तुम्हीच तुम्हाला सांगा कोणी त्या फुलावर खरे प्रेम दाखवले.

“जगावर व जगातल्या गोष्टींवर प्रीती करू नका. जर कोणी जगावर प्रीती करत असेल तर त्याच्या ठायी पित्याची प्रीती नाही. कारण जगात जे सर्व आहे तेम्हणजे देहाची वासनाडोळ्यांची वासना व संसाराविषयीची फुशारकीही पित्यापासून नाहीततर जगापासून आहेत; आणि जग व त्याची वासना ही नाहीशी होत आहेतपण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्वकाळ राहतो. १योहान २;१५-१७

खरे प्रेम काय आहे वाचण्यासाठी येथे क्लिक करा ;  👉  खरी प्रीती

ख्रिस्ती युवक-युवतीनो जगामध्ये वावरत असतानाशाळा कॉलेज कामाच्या ठिकाणी  आपला संपर्क इतरांबरोबर येतो तेव्हां   इतर मुलामुलीप्रमाणेच वागण्याच मोह होईल,  प्रथम ओळख मग मैत्री आणि मैत्रीचे रुपांतर खोट्या प्रेमात परंतु ख्रिस्ती युवक-युवतीनो,माझ्या बहिणीनो-भावानो,माझ्या मुला-मुलीनो  वेळीच सतर्क व्हा. आपण जगाच्या प्रवाहाबरोबर न वहाता ख्रिस्ताची साक्ष जगासमोर ठेवली पाहिजे .आपल्या बोलण्या-बसण्यातून देवाचे गौरव झाले पाहिजेत . ख्रिस्ती युवक-युवतीनो सैतान धूर्त कुयुक्त्या द्वारे तुमच्या जीवनाचा नाश करतो.व्हॅलेंटाईन डे च्या नावाखाली सैतान अनेक युवक-युवतीना फसवत आहे . अनेक युवक-युवती प्रेमाच्या नावाखाली ख्रीस्तीतर जोडीदाराशी विवाह संबध जोडतात.आणि अशा विवाहाचा शेवट सुखाचा होईल याची शाश्वाती नसते. कदाचित अशा विवाहानंतर मग आयुष्यभर पस्तावा आणि रडण्याशिवाय पर्याय राहात नाही .

 “सर्व गोष्टींची मला मोकळीक आहे,” तरी सर्व गोष्टी हितकारक असतातच असे नाही; “सर्व गोष्टींची मला मोकळीक आहे,” तरी मी कोणत्याही गोष्टीच्या आहारी जाणार नाही१करिंथ६;१२

होय....!  प्रत्येकाला भावना असतात कीमाझ्यावर कोणीतरी खरे प्रेम करणारे असावे. बायबलनुसार प्रेमाचे प्रकार आहेत. भाऊ-बहिणीचे प्रेमआई-वडील आणि मुलांचे प्रेम , मैत्रीप्रेम तसेच पती-पत्नीचे प्रेम . पती-पत्नीचे प्रेम हे विशेष आहे आणि ते एकदाच होते . आणि म्हणून हे प्रेम आपण आपल्या होणार्या भावी जोडीदारासाठीच काळजीने राखून ठेवा . विनाकारण ते परक्यास  देण्याची चूक करू नका . तुमचे हे पहिले प्रेम मोतीप्रमाणे आहे तेव्हां  तुमचे मोती डुकरापुढे टाकू नका. डूकांराना त्याची किंमत नसते . तुमचे मौल्यवान अद्वितीय मोती ते गटारीत लोळवतील आणि लोळवतील ते  मोती तुम्हाला परत मिळवता येणार नाहीत .

 देवाच्या प्रिय मुला-मुलीनो ,ख्रिस्ती युवक-युवतीनो,माझ्या बहिणीनो-भावानो,  जर आपण प्रेम प्रकरणात  गुंतलेले किंवा मोहीत होत आहात  आणि आपणास योग्य मार्गदर्शन हवे आहे तर निःसंकोचपणे वेळीच  या बाबत तुमच्या विश्वासू पाळक किंवा  आत्मिक प्रौढ वडील यांच्याशी  सल्लामसलत करा . 

देवाच्या इच्छेनुरूप विवाह काय  आहे याविषयी  वाचण्यासाठी  येथे करा  👉  पवित्र ख्रिस्ती विवाह

लग्न आणि योग्य जोडीदाराची निवड 

जर आपण या संदेशाद्वारे आशीर्वादित झाला असाल तर जरूर पुढे शेअर करा.

आणि कॉमेंट बॉक्स मध्ये आपली प्रतिक्रिया कळवा .

धन्यवाद .....

 

Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url