What the Bible says about Day of the Dead मृतदिन बद्दल पवित्रशास्र काय सांगते ?
What the Bible says about Day of the Dead मृतदिन बद्दल पवित्रशास्र काय सांगते ?मृतदिन साजरा
करण्याची ख्रिश्चनना पवित्राशास्रात
कोठेही आज्ञा नाही.
Day of the Dead
२ नोव्हेंबर [ मेलेले लोकांसाठी सण ] हा दिवस कशाप्रकारे साजरा करतात . How is Day of the Dead celebrated?
दरवर्षी
२ नोव्हेंबर हा दिवस ख्रिस्ती लोक संत आणि सर्व मृत
व्यक्तीसाठी मृतदिन म्हणून पाळतात . अनेक ख्रिस्तीजन या दिवशी कब्रस्तानात
जाऊन त्यांच्या
प्रियजनासाठी प्रार्थना
करण्यासाठी एकत्र जमतात आणि मृत व्यक्तीचे आवडते पदार्थ ,फुले,हार
, मेणबत्त्या त्यांच्या कबरेवर
ठेवतात, मृतांच्या वतीने
भक्ती आयोजित केल्या जातात
आणि त्यांना श्रद्धांजली वाहिली जाते .या दिवसाचा उगम हा
हजारो वर्षांपूर्वी मिक्टेकॅसिहुआटल नावाच्या देवीला समर्पित असलेल्या अझ्टेक
सणापासून झाला आहे.
मृतदिन साजरा करण्याची ख्रिश्चनना पवित्राशास्रात कोठेही आज्ञा नाही. What the Bible says about Day of the Dead
मृतांचा दिवस साजरे करणाऱ्यांपैकी बरेच जण स्वत:ला ख्रिश्चन म्हणवत असले तरी या मृतदिन साजरा करण्याची ख्रिश्चनना पवित्राशास्रात कोठेही आज्ञा नाही. मूर्तिपूजकांद्वारे मृत दिवस साजरा करणे ही एक त्यांच्यासाठी उपासना आहे, परंतु ख्रिश्चनांनी त्यात भाग घेणे किंवा मृतांसाठी क्षमा मागणे हे बायबलआधारित नाही . हे लिहिण्यामागे तुमच्या भावना दुखावल्या जावेत हा माझा उद्देश नाही . बायबल आधारे तुम्हास मी सांगत आहे , आणि आशा करतो की तुम्ही सावध व्हाल आणि इतर ख्रिश्चनांना उत्तर द्याल.
१ पेत्र ३:१५ – “तर ख्रिस्ताला ‘प्रभू’ म्हणून आपल्या अंत:करणात ‘पवित्र माना;’ आणि तुमच्या ठायी जी आशा आहे तिच्याविषयी विचारपूस करणार्या प्रत्येकाला उत्तर देण्यास नेहमी सिद्ध असा; तरी ते सौम्यतेने व भीडस्तपणाने द्या.
या
सैतानीक विधींद्वारे लोक सहभागी होऊन ते त्यांच्या प्रिय मृत नातेवाईकांशी संवाद
साधू शकतात , हे सत्य नाही.
बायबलनुसार, पश्चात्ताप न करणारे
मृत व्यक्ती एक दिवस निश्चितपणे अंतिम न्यायासाठी देवासमोर उभे राहतील.
प्रकटीकरण २० :११-१५- .......तेव्हा दुसरे एक ‘पुस्तक’ उघडले गेले ते ‘जीवनाचे’ होते; आणि त्या पुस्तकामध्ये जे लिहिले होते त्यावरून मृतांचा न्याय ‘ज्यांच्या-त्यांच्या कृत्यांप्रमाणे’ ठरवण्यात आला. तेव्हा समुद्राने आपल्यामधील मृत माणसांना बाहेर सोडले; मृत्यू व अधोलोक ह्यांनी आपल्यातील मृतांना बाहेर सोडले; आणि ‘ज्याच्या-त्याच्या कृत्यांप्रमाणे’ प्रत्येकाचा न्याय ठरवण्यात आला. तेव्हा मरण व अधोलोक हे अग्नीच्या सरोवरात टाकले गेले. अग्नीचे सरोवर हे दुसरे मरण होय.ज्या कोणाचे नाव ‘जीवनाच्या पुस्तकात लिहिलेले सापडले नाही’ तो अग्नीच्या सरोवरात टाकला गेला.
मनुष्याचा आत्मा हा अनंतकाळ जिवंत राहतो , जेव्हा तो मृत्यू होतो, तो एकतर सुखलोकात जातो किंवा सार्वकालिक नरकात टाकण्यापूर्वी अधोलोकात अंतिम न्यायाची वाट पाहत असतो. बायबल स्पष्टपणे सांगते की,
ज्या अर्थी माणसांना एकदाच मरणे व त्यानंतर न्याय होणे नेमून ठेवले आहे . इब्री ९:२७.
याचा सरळ आणि स्पष्ट
अर्थ असा आहे की, जेव्हा एखादी
व्यक्ती मरते तेव्हा त्याचे शरीर मातीत जाते, परंतु आत्मा अनंतकाळ संवेदनशील राहतो, तो एकतर नरकात यातना उपभोगण्यासाठी किंवा
देवाबरोबर शाश्वत गौरवात जातो .
पश्चात्ताप
न करणाऱ्या मृतांना अनंतकाळच्या असहनीय यातना भोगाव्या लागतील.
लूक शुभवर्तमानात, येशूने शिकवले की देवाने स्वर्ग आणि नरक यामध्ये एक दरी स्थापित केली आहे [लूक १६:२६ - एवढेच नव्हे तर जे इकडून तुमच्याकडे पार जाऊ पाहतात त्यांना जाता येऊ नये म्हणून व तिकडून कोणी आमच्याकडे येऊ नये म्हणून आमच्या व तुमच्यामध्ये मोठी दरी स्थापलेली आहे.] ख्रिस्ताशिवाय मरणाऱ्या प्रत्येक आत्म्याने सार्वकालीन जीवन मिळवण्यासाठी सर्व आशा गमावल्या आहेत. पश्चात्ताप न करणाऱ्या मृतांना अनंतकाळच्या असहनीय यातना भोगाव्या लागतील ,ते देवाच्या उपस्थितीपासून आणि त्याच्या सामर्थ्याच्या गौरवापासून सार्वकालासाठी दूर नरकात असतील .
येशूने स्वतः म्हटले
मत्तय २५:४६-ते तर सार्वकालिक’ शिक्षा भोगण्यास जातील; आणि नीतिमान ‘सार्वकालिक जीवन उपभोगण्यास’ जातील
देव पृथ्वीवरील
चांगल्या आणि वाईट लोकांवर देखील कृपा करतो .ते जीवनातील हरएक प्रकारचा आनंद
उपभोगू शकतात ,वास, चव आणि आवाज यांचा अनुभव घेऊ शकतात ; ते प्रेम करू शकतात
आणि इतर आनंद उपभोगू शकतात. परंतु ज्या क्षणी ते ख्रिस्ताशिवाय मरतात, ते अशा सर्व आशीर्वादांपासून कायमचे मुकतात . त्यांच्यासाठी
मृत्यूनंतर न्याय नेमून ठेवला आहे .
तू माती आहेस आणि मातीला परत जाऊन
मिळशील.
शरीर हे माती आहे आणि मृत्यूनंतर ते पुन्हा मातीला जाऊन मिळते - "[ तू माती आहेस आणि मातीला परत जाऊन मिळशील.” उत्पत्ति ३:१९ ]. यापुढील त्याच्या सर्व सांसारिक योजना संपुष्टात येतात , “ज्या अधोलोकाकडे तू जात आहेस तेथे काही उद्योग, युक्तिप्रयुक्ती, बुद्धी व ज्ञान ह्यांचे नाव नाही. [ उपदेशक ९:१०”. मृत व्यक्तींना सल्लामसलत करण्याची बुद्धी नसते, किंवा ते त्यांच्या प्रार्थना ऐकण्यास किंवा त्यांना प्रतिसाद देण्यास सक्षम नसतात.]
मृतांच्या दिवशी, मृतांच्या आत्म्याना आवाहन करणारा प्रत्येक उत्सव हा एक घृणास्पद पाप आहे आणि ते पूर्णपणे निरर्थक आहे.
अनुवाद १८:१०-१२ - आपल्या मुलाचा किंवा मुलीचा अग्नीत होम करणारा, चेटूक करणारा, शकुनमुहूर्त पाहणारा, मंत्रतंत्र करणारा, जादूगार, वशीकरण करणारा, पंचाक्षरी, छांछू करणारा, अथवा मृतात्म्याला विचारणारा असा तुमच्यापैकी कोणी नसावा.
मृतांकारिता बाकीच्या लोकांसारखा
तुम्ही खेद करू नये.
केवळ एकच व्यक्ती मृताला बोलावण्यास
योग्य व सामर्थ्यवान आहे; तो त्यांना
न्यायाच्या पुनरुत्थानासाठी बोलावेल [योहान ५:२८-२९ - कारण कबरांतील सर्व माणसे त्याची वाणी
ऐकतील आणि ज्यांनी सत्कर्मे केली ते जीवनाच्या पुनरुत्थानासाठी व ज्यांनी
दुष्कर्मे केली ते न्यायाच्या पुनरुत्थानासाठी बाहेर येतील, अशी वेळ येत आहे.] . जे ख्रिस्तामध्ये
मेले आहेत ते खरोखर मेलेले नाहीत, कारण ते लगेच
प्रभूच्या सान्निध्यात जातात; बायबल म्हणते की ते
महानिद्रा घेतात. ख्रिस्ताशिवाय
ज्यांना आशा नाही त्यांच्यासाठी मृत्यू निश्चितच दुःखदायक आहे [१ थेस्सलनीकाकर
४:१३ - बंधुजनहो, झोपी गेलेल्या
लोकांविषयी तुम्ही अजाण नसावे अशी आमची इच्छा आहे, ह्यासाठी की, ज्यांना आशाच नाही
अशा बाकीच्या लोकांसारखा तुम्ही खेद करू नये. ] तथापि, आपण जे प्रभूला ओळखतो त्यांना या वचनाने
प्रोत्साहन दिले पाहिजे की, ज्याप्रमाणे येशू
मरण पावला आणि पुन्हा उठला,
ख्रिश्चनांचा अशा गोष्टीशी काहीही संबंध नसावा .
मृतांसाठीची भक्ती देवाच्या इच्छेच्या विरुद्ध आहे . Who celebrates Day of the Dead?
कोणतीही रूढी परंपरा किंवा प्रथा देवाच्या इच्छेच्या विरुद्ध असेल, तेव्हा त्याचा कोणतेही प्रकारे पाठपुरावा करू नये . खरं तर जे असे करतात त्यामुळे देवाचा आत्मा खिन्न होतो, आपल्या जीवनात सैतानी शक्तींना वाव मिळतो . तसेच अशा मूर्खपणाने आपण देवाचा क्रोध भडकावत आहेत [२ इतिहास ३३:६ - ..... ह्यांच्याशी संबंध ठेवत असे; परमेश्वराच्या दृष्टीने वाईट असे पुष्कळ करून त्याने त्याला संताप आणला.] आपण आधीच पाहिल्याप्रमाणे, बायबल आपल्याला मृत व्यक्तींशी सल्लामसलत किंवा चौकशी करू नये असा इशारा देते, जसे की बहुतेकदा मृतांच्या दिवशी केले जाते. देवाच्या लोकांनी मृतांच्या दिवशी केल्या जाणाऱ्या अशा पापी प्रथांपासून स्वतःला दूर ठेवावे. [प्रकटीकरण १८:४ - मग स्वर्गातून निघालेली दुसरी एक वाणी मी ऐकली; ती म्हणाली, “‘माझ्या लोकांनो,’ तुम्ही तिच्या पापांचे वाटेकरी होऊ नये आणि तुम्हांला तिच्या पीडांतील कोणतीही पीडा होऊ नये म्हणून ‘तिच्यामधून निघा ].मंडळीसाठी येशूची आज्ञा
चर्चचे
प्राथमिक ध्येय शिष्य बनवणे, त्यांना बाप्तिस्मा
देणे आणि ख्रिस्ताने दिलेल्या सर्व गोष्टींचे पालन करण्यास शिकवणे हे आहे [मत्तय
२८:१९-२० - तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांना शिष्य करा; त्यांना पित्याच्या, पुत्राच्या व
पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या; जे काही मी तुम्हांला आज्ञापिले ते
सर्व त्यांना पाळण्यास शिकवा; आणि पाहा, युगाच्या
समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे.” ],
[गलती ४:१९- तुमच्यामध्ये ख्रिस्ताचे स्वरूप निर्माण होईपर्यंत मला पुन्हा तुमच्यासंबंधी प्रसूतिवेदना होत आहेत.].
मृतांचा दिवस पवित्र शास्त्रातील वचनाच्या विरुद्ध आहे. म्हणून या रुढीपासून ख्रिस्ती लोकांनी दूर राहिले पाहिजे कारण हे सैतानाच्या खोट्या गोष्टींचे आणखी एक प्रकटीकरण आहे .
सावध असा, जागे राहा; तुमचा शत्रू सैतान हा गर्जणार्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधत फिरतो १ पेत्र ५:८