What is the day of Pentecost in marathi पेंटेकॉस्ट म्हणजे काय ?
पेंटेकॉस्ट म्हणजे काय ?
What is the day of Pentecost ?
परिचय
पेन्टेकोस्टचा सण हा यहुदी लोकांच्या सणांपैकी एक होता. यहुदी लोक याला आठवड्यांचा सण , कापणीचा सण किंवा सप्तकाचा सण देखील म्हणत. हा सण मिसर देशांतील गुलामीतून निघाल्यावर तिस-या महिन्यांत साजरा होई .
या सणाविषयी प्रमुख शास्त्रभाग पुढीलप्रमाणे आहेत . निर्गम १९-२०,२४, २३:१६,१७, ३४:२२,२३ , अनुवाद १६:९-१२ ; लेवीय २३:१५-२१, आणि गणना २८:२६-३१
![]() |
the-day-of-pentecost |
खिस्ती लोकांच्या दृष्टीने पेंटेकॉस्ट दिवस विशेष दिवस आहे कारण येशूच्या मृत्युनंतर जो पहिला पन्नासावा दिवस होता त्या दिवशी येशूच्या शिष्यांवर पवित्र आत्मा प्रचंड सामर्थ्यानिशी उतरला. त्या दिवशी सर्व शिष्य पवित्र आत्म्याने भरले गेले , पवित्र आत्म्याने त्यांचा बाप्तिस्मा झाला. हा दिवस नवीन कराराच्या मंडळीचा जन्म दिवस होय.
पेंटेकॉस्ट म्हणजे काय ? What is the day of Pentecost ?
ग्रीक भाषेमधील "पेंटेकॉस्ट" या शब्दाचा अर्थ “पन्नासावा दिवस'' असा आहे. वल्हांडण सणानंतर हा पन्नासावा दिवस होय. पन्नासावा दिवस हा सप्तकाचा सण म्हणूनही ओळखला जाई [निर्गम ३४:२२; अनुवाद १६:९-११]. पन्नासाव्या दिवसाला 'प्रथम फळाचा दिवस' असेही म्हटले जाई. [गणना २८:२६]. कारण या दिवशी सर्व यहूदी हंगामातील प्रथम फळ देवाला अर्पण करीत असत.
देवाने इस्त्राएलांना हा सण पाळावयास आज्ञा केली होती. देवाने मोशेला फारोस जाऊन सांगण्यास बजावतो की, इस्त्राएल लोकांस, “माझ्या लोकांनी माझ्याप्रीत्यर्थ रानांत उत्सव करावा म्हणून त्यांस जाऊ दे.” [ निर्गम ५:१; १०:९ ]
पेन्टेकॉस्ट ख्रिस्तीसाठी का महत्त्वाचे आहे ? Why Is Pentecost Important to Christianity?
पेन्टेकॉस्ट सण असे निर्देश करतो की, ख्रिस्त येशूची मंडळी निर्माण करण्यासाठी देवाने त्याचा पवित्र आत्मा पाठविला आणि नवीन कराराच्या आज्ञा विश्वासणा-याच्या अंत:करणाच्या पाटयावर लिहील्यात .
इस्त्राएलांत ऐतिहासिक प्रतीकांत्मक कार्य व त्यानंतर मंडळीची स्थापन व त्याची ऐतिहासिक पूर्तता आपणांस नवीन कराराच्या मंडळीमध्ये दिसते .
आता ख्रिस्ती पेन्टेकॉस्ट सण हा सप्तकाचा सण किंवा 'प्रथम फळाचा दिवस' म्हणून नव्हे, तर प्रे.कृ. २ मध्ये पवित्र आत्मा हा प्रथमच आरंभिक मंडळीवर उतरला याची आठवण म्हणून मंडळीचा जन्मदिवस साजरा केला जातो .
नवीन करारातील पन्नासावा दिवस Day Of Pentecost

day of Pentecost
प्रेषितांची कृत्ये २;२-४ मधील अहवाल सांगतो की, येशू स्वर्गात गेल्यानंतर, येशूचे अनुयायी कापणीच्या सणासाठी [पेन्टेकॉस्ट]
एकत्र जमले असतांना ते घर संपूर्ण पवित्र आत्म्याने भरले” .आणि आत्म्याच्याद्वारे ते सर्व इतर
भाषांमध्ये बोलू लागले".

प्रेषितांची कृत्ये २;१-४- पेन्टेकॉस्ट म्हणजे पन्नासावा दिवस आल्यावर ते सर्व एकत्र जमले होते. २ तेव्हा अकस्मात मोठ्या वार्याचा सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला व ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले. ३ आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जिभांसारख्या जिभा त्यांना दिसल्या व प्रत्येकावर त्या एकेक अशा बसल्या. ४ तेव्हा ते सर्व जण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तसतसे ते निरनिराळ्या भाषांतून बोलू लागले.
पवित्र आत्मा आणि अग्नीच्या या बाप्तिस्म्याद्वारे, प्रेषित मोठ्या सामर्थ्याने भरले आणि त्यांना सुवार्तेच्या रहस्यांची अधिक ओळख झाली आणि त्यांनी राष्ट्रे व अनेक लोकांना त्यांच्या भाषेत देवाची महत्कृत्ये विदित केली.
या घटनेने एक मोठा लोकसमुदाय आकर्षित झाला आणि तेंव्हा पेत्राने उभा राहून पश्चात्ताप व ख्रिस्ताच्या सुवार्तेबद्दल संदेश दिला [प्रेषितांची कृत्ये २:१४]. आणि त्या दिवशी ज्यांनी त्याच्या संदेशाचा स्वीकार केला त्यांचा बाप्तिस्मा झाला; आणि त्यांच्यात सुमारे तीन हजार नवीन माणसांची भर पडली. याचीच आठवण म्हणून ख्रिश्चन पेन्टेकॉस्ट साजरा करतात.
२. जुन्या करारात या घटनेची भविष्यवाणी करण्यात आली होती आणि येशूने देखील[ योहान १४:२६ ] मध्ये वचन दिले होते. पवित्र आत्मा येईल आणि तो त्याच्या लोकांसाठी सहाय्यक असेल.
तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठवील तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हांला सर्वकाही शिकवील आणि ज्या गोष्टी मी तुम्हांला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हांला आठवण करून देईल योहान १४:२६.
नवीन कराराची ही घटना देखील महत्त्वपूर्ण आहे कारण जुन्या कराराची भविष्यवाणीची ती पूर्ताता करते.
योएल २:२८-२९ - “ह्यानंतर असे होईल की, मी मनुष्यमात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन; तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील, तुमच्या वृद्धांना स्वप्ने पडतील, तुमच्या तरुणांना दृष्टान्त होतील. २९ तुमचे दास व दासी ह्यांच्यावरही त्या दिवसांत मी आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन.
जुन्या करारातील पन्नासावा दिवस Day Of Pentecost

what is the day of Pentecost

पहिला महिना अबीब किंवा निसान याच्या वल्हांडण सणांत मिसर देशाच्या दास्यगृहातून इस्त्राएलाची सुटका झाली . तांबडा समुद्र पार केल्यावर अग्निस्तंभाने त्यांना सिनाय पर्वताच्या पायथ्याशी आणले या ठिकाणी त्यांना पन्नासाव्या दिवसाच्या सण प्रथम पाळला . तिसरा महिना सिवान मध्ये सिनाय पर्वतावर दहा आज्ञा लिहून त्या इस्त्राएलांना देण्यात आल्या . यामुळे हा पन्नासावा दिवस यहूदी लोक नियमशास्त्र मिळाल्याचा उत्सवाचा सण पाळीत . येथे निवासमंडप, अहरोनाचे याजकीयत्व आणि वलिदानाची पध्दत लावून देण्यात आली . येथे संपूर्ण राष्ट्र, “रानातील मंडळी” म्हणून प्रस्थापित झाली. [प्रे. कृत्ये .७ :३८] नंतर इस्त्राएल लोक ज्यावेळी वचनदत्त देशांत प्रवेश झाले त्यावेळी यहोवाला खास व विविध अर्पणे सादर करण्यांत आली तेथे मोठया आनंदाने व उत्सवाने पन्नासाव्या दिवसाचा हंगामाचा सण पाळण्यात आला.
जुना करार आणि नव्या कराराचा पन्नासावा दिवस त्यातील साम्य व तुलना घटनात्मकदृष्टया
अलौकीक दैवी प्रकटीकरण : देवाच्या डोंगरावर मोशे चढल्यावर अलौकीक दैवी उपस्थिती अनुभवली . तुतारीच्या नादानें, मेघगर्जना. विजा व गडद मेघांनी देवाची समक्षता प्रगट झाली . [निर्गम १९:१६-१९; इब्री १२:१८-२१]
अशाच प्रकारचा अनुभव एलियाने देवाचा डोंगर होरेब येथे घेतला, भमिकंप झाला, मोठा सुसाटयाचा वारा, अग्नि व शांत मंद अशी देवाची वाणी ऐकली तेथे देवाची समक्षता अनुभवली . [१राजे १९:८-१४]
पन्नासाव्या दिवशी नव्या कराराचा मध्यस्थ आपला प्रभु येशू देवाचे डोंगर सियोन येथे गेला [इबी १२:२२-२९; प्रगटी १४:१-४]. वरच्या माडीवर त्याच्या महान समक्षतेचा अनुभव झाला . पवित्र आत्मा मोठया वा-याच्या सुसाटयासारखा आकाशांतून आला व अग्निच्या जिभा शिष्यांवर बसल्या . याप्रकारे महान देवाची समक्षता तेथें प्रकट झाली आणि ते अन्यभाषेत बोलू लागले . प्रत्येक राष्ट्रांतील भक्तिमान यहूदी कृपेच्या सुवार्ताद्वारे आत्म्याच्या अग्निने भरले .
५० व्या दिवशी दहा आज्ञा देवाने स्वतःच्या बोटांनी दोन दगडी पाटयांवर लिहून दिल्या त्या यहूद्यांनी मूर्तिपुजा करून मोडल्या याचाच दुष्परिणाम हा झाला की, त्या दिवशी ३००० लोक ठार मारले गेले .
नवीन करारात देवाचे बोट जो पवित्र आत्मा हा विश्वासणार्यांच्या
अंतकरणात नवीन कराराच्या प्रीतीच्या दोन आज्ञा लिहिल्या [मत्तय २२:३७-३९]
३७ येशू त्याला म्हणाला, “‘तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जिवाने व पूर्ण मनाने प्रीती कर.’३८ हीच मोठी व पहिली आज्ञा आहे.३९ हिच्यासारखी दुसरी ही आहे की, ‘तू आपल्या शेजार्यावर स्वतःसारखी प्रीती कर.’४० ह्या दोन आज्ञांवर सर्व नियमशास्त्र व संदेष्ट्यांचे ग्रंथ अवलंबून आहेत.
पेन्टेकॉस्ट म्हणजे पन्नासाव्या दिवशी पेत्राने आत्म्याने भरून संदेश दिला आणि पवित्र आत्म्याच्या प्रगटीकरणाद्वारे ३००० लोकांचे तारण झाले.
The Significance of Pentecost Today
चर्चसाठी पेन्टेकॉस्टचे महत्त्व समजून घेण्यासाठी आपण काळजीपूर्वक अभ्यास करणे आवश्यक आहे पेन्टेकॉस्ट हा यहुदी उत्सव होता. या कारणात्सव प्रारंभिक मंडळी जुन्या कराराच्या प्रमाणे पेन्टेकॉस्ट साजरा करत नाही.
पेंटेकोस्टबद्दल विशेष माहिती
१. पेन्टेकोस्ट यहुदीसाठी मोठा उत्सव होता. याचा अर्थ असा होता की यहुदी नियमानुसार, सर्व प्रौढ यहुदी पुरुष या उत्सवात सहभागी होण्यासाठी जेथे-कुठे राहत असतील तेथून ते काळजीने यरुशलेममध्ये येत.
२. पेन्टेकॉस्टच्या दिवशी काही उत्सव ,यज्ञ आणि अर्पण नियमशास्त्रात नमूद केले होते. पेन्टेकॉस्टच्या दिवशी, मुख्य याजकाने ताज्या भाजलेल्या गव्हाच्या दोन भाकरी घ्यायच्या होत्या आणि त्या परमेश्वरासमोर अर्पण करायच्या होत्या. या भाकरी नवीन कापणी केलेल्या गव्हापासून बनवली जायची. [लेवीय २३ :१५-१७]
थोडक्यात, प्रेषितांच्या काळात पेन्टेकॉस्ट हा एक मोठा आणि भव्य कापणीचा उत्सव होता. जेरुसलेमचे रस्ते हजारो यात्रेकरूंनी भरलेले होते, जे देवाच्या चांगुलपणाचा आणि गव्हाच्या कापणीचा उत्सव साजरा करण्यासाठी चहूकडून आले होते.
पन्नास आकडयाचे वैशिष्टये : Specialties Of Pentecost
पन्नास हा आकडा स्वातंत्र्य, मुक्तता, सुटका यांचे प्रतिक किंवा चिन्ह आहे. इस्त्राएलांत प्रत्येक पन्नास वर्षानंतर [७ x ७ = ४९+ १ = ५०] याला पन्नासावे वर्ष म्हणजे योबेल वर्ष म्हणावें. त्यावेळी गुलामांना मुक्त केले जाई, कर्ज रद्द केले जात, कुटुंब एकत्र येई व सर्व देशांत स्वातंत्र्य जाहीर होई आणि सर्व दाखविण्यासाठी महानादाचे शिंग देशभर सर्वत्र फुकावे . [लेवीय २५:८-१७]
साजरा करण्याची वेळ Observance Of Pentecost
पेन्टेकॉस्ट हा सण वल्हांडण सणानंतरच्या पन्नासव्या दिवशी, म्हणजेच हिब्रू महिन्याच्या सिवानच्या सहाव्या दिवशी साजरा केला जातो, म्हणजेच हा दिवस साधारण मे किंवा जून मध्ये येतो .
जर आपण या शिक्षणाद्वारे आशीर्वादित झाला असाल तर जरूर पुढे शेअर करा. धन्यवाद .....
पुढील लेख देखील वाचण्यासाठी क्लिक करा. शब्बाथ शनिवार आहे मग रविवारी उपासना का ?