काय ख्रिस्ती विश्वासणारे संसारिक संगीत ऐकू शकतात का ? Can a Christian listen to secular music?

काय ख्रिस्ती विश्वासणारे संसारिक संगीत ऐकू शकतात का ?
Can a Christian listen to secular music?

 

प्रथम मला हे स्पष्ट करायला आवडेल कि, आपण  ‘विश्वासणारे’ प्रभूमध्ये कोण आहोत ?

बायबल विश्वासणार्याबद्दल सांगते कि,  पण तुम्ही तर ‘निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र,’ देवाचे ‘स्वत:चे लोक’ असे आहात; ह्यासाठी की, ज्याने तुम्हांला अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले ‘त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावेत  [१ पेत्र २;९].

म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे; जुने ते होऊन गेले; पाहा, ते नवे झाले आहे [1करिंथ  5:17].

तर मग, जे प्रकाशाचे आहेत ते अंधाराचे भागीदार कसे होऊ शकतात ? ख्रिस्ती विश्वासणारे एकाच वेळी जगाशी समरूप होऊन ख्रिस्ती जीवन जगू शकत नाही . असे ख्रिस्ती हे कोमट, दैहिक, पूर्णपणे समर्पित आणि वचनबद्ध नाहीत , अर्धवट आणि मानवास खुश करणारे आहेत.

काय ख्रिस्ती विश्वासणारे संसारिक गीत-संगीत किंवा शब्दविरहीत संगीत ऐकू शकतात का ?

Should believers listen to secular music?

विश्वासणारे संसारिक संगीत ऐकू शकतात का ? Can-a-Christian-listen-to-secular-music

गीत-संगीतामध्ये ताकत आहे. याचा आपल्या भावनांवर मोठा प्रभाव पडतो आणि आपल्या आत्मिक व जागतिक दृष्टिकोनाला आकार देऊ शकतो. म्हणूनच यावर आपण सविस्तर अभ्यास करू या.

खरोखर जर आपण वरील प्रश्नाचे बायबलआधारित उत्तर शोधू इच्छित असाल तर विनंती आहे ,हा लेख पूर्णपणे लक्षपुर्वक वाचा. या ठिकाणी आपण केवळ गीत-संगीतच नाही तर शब्दविरहीत संगीत यावर देखील बघणार आहोत. मला खात्री आहे यानंतर आपणास कोणतीही शंका राहाणार नाही .

संगीताचा उगम  Source Of Music

प्रकटी 14: 2 मध्ये असे म्हटले आहे , आणिअनेक जलप्रवाहांच्या ध्वनीसारखीव प्रचंड मेघगर्जनेच्या ध्वनीसारखी स्वर्गातून निघालेली वाणी मी ऐकली आणि जी वाणी मी ऐकली ती, जसे काय वीणा वाजवणारे आपल्या वीणा वाजवत आहेत, अशी होती. याचा अर्थ स्वर्गात संगीत आहे ,ध्वनी आहे आणि देवाने तो निर्माण केलेला आहे. परंतु देवाने निर्माण केलेल्या प्रत्येक गोष्टीला सैतान विकृत करतो. संगीताचा पहिला उल्लेख हा जुन्या करारातील उत्पत्तिच्या पुस्तकात काईनाच्या पाच पिढ्या नंतर आपण पाहतोकाईनाने खून केल्यामुळे तो देवाच्या उपस्थितीला मूकतो. काईनाने केलेली दुष्टता त्याच्या वंशरक्ताद्वारे पाच पिढ्यांनंतर देखील आढळते आणि आजही चालूच आहे. काईनाच्या वंशजांनी वाद्ये तयार केली व संगीताचा शोध घेतला (उत्पत्ती 4:1921) .आपण येहेज्केल 28:13 मध्ये लुसिफरविषयी वाचतो कि, जो स्वर्गातून पडला आणि त्याने देवाविरुद्ध बंड केले. त्याच्याठायी सर्व तंतुवाद्ये ,बासर्‍या आणि वाद्ये ह्यांचे कसब होते, या ठिकाणी दोन प्रमुख प्रकारातील वाद्ये आढळून येतात, पवनवाद्ये आणि सर्व तंतुवाद्ये यावरून आपणास ज्ञात होते कि, पृथ्वीवरील त्याचा उद्देश पुढे नेण्यासाठी सैतान संगीताचा वापरु शकतो .

संगीताच्या विविध शैली आहेत Different Styles Of Music ;  

जसे कि, कलासंगीत, लोकसंगीत , पाश्चात्य कला संगीत,रॉक ,पॉप, जाझ  ई.बायबल संगीतशैली संदर्भात काय स्वीकार्य किंवा अस्वीकार्य आहे याची यादी प्रदान करत नाही. त्याऐवजी, बायबल आपल्याला ज्ञान, बुद्धी आणि विवेक वापरण्यास प्रोत्साहन देते. लक्षात घ्या संगीताचा आपल्या अंतःकरणावर व मनावर सकारात्मक किंवा नकरात्मक  प्रभाव होत असतो. जर एखादी विशिष्ट शैली किंवा कलाकार आपल्याला सतत देवापासून दूर नेत असेल किंवा पापी वर्तनास प्रोत्साहन देत असेल तर ते टाळणेच चांगले.

संगीताचा उद्देश Purpose of Music  : बायबल आपणास संगीताचा उद्देश स्पष्ट करते .

  • पहिला उद्देश - उपासना करणे ; स्तोत्र 150:1-6 मध्ये आपण संगीताच्या उद्देशाचे एक मोठे उदाहरण पाहतो की संगीतचा उपयोग देवाची उपासना करण्यासाठी करावा.

विश्वासणारे संसारिक संगीत ऐकू शकतात का ? Can-a-Christian-listen-to-secular-music

  • दुसरा उद्देश - आराम किंवा प्रोत्साहान मिळवणे हा आहे.  1 शमू 16:23 मध्ये आपण पाहतो की, जेव्हा जेव्हा देवाकडील दुरात्म्याची शौलाला बाधा होई तेव्हा तेव्हा दावीद वीणा घेऊन आपल्या हाताने वाजवीत असे; मग शौलाला चैन पडून बरे वाटत असे, व तो दुरात्मा त्याला सोडून जात असे. या ठिकाणी त्याने कोणत्याप्रकाराचे संगीत वाजवले याची नोंद आढळत नाही. परंतु मी असे गृहीत धरतो की नक्कीच त्याने त्या संगीताद्वारे देवाचा महिमा केला असेल. कारण या संगीतामुळे शौलाला दुरात्मा सोडून जात असे.
  • तिसरा उद्देश - धोक्याचा इशारा कळवणे. नेहम्या 4:20 - विशिष्ट ध्वनी केला जात जेणेकरून प्रत्येकजन सावध होई. जसे कि, आज सावध करण्यासाठी सायरन वाजवले जाते.
  • चौथा उद्देश – शत्रूला  गोंधळात टाकण्यासाठी; शास्ते 7:16-22  शत्रूला गोंधळात टाकण्यासाठी आणि आश्चर्यचकित करण्यासाठी आवाजांचा वापर केला.
  • पाचवा उद्देश-  एकमेकांना प्रोत्साहित करण्यासाठी. इफिस 5:19 मध्ये सांगते की स्तोत्रे, गीते व आध्यात्मिक प्रबंध ही एकमेकांना म्हणून दाखवा; यावरून संगीताचा अंतिम उद्देश आपल्या निर्मात्याला आपली उपासना व्यक्त करणे हा आहे.

संगीताच्या मुख्य तीन श्रेणी आहेत Categories Music ;

१. धार्मिक संगीत Godly music २. धर्मनिरपेक्ष संगीत Secular music ३. संसारिक (जगिक)  संगीत worldly music .

1. धार्मिक संगीत  [Godly music]  अध्यात्मिक गोष्टींशी संबंधित असलेले संगीत. उदा.उपासना गीते.

2. धर्मनिरपेक्ष संगीत [Secular music]  ; धर्मनिरपेक्ष संगीत ’ म्हणजे धर्म किंवा अध्यात्मिक गोष्टींशी संबंधित नसलेले संगीत. उदा . राष्ट्रगीत किंवा शालेय गीत ,विवाह किंवा वाढदिवसाची गाणी इ.

3. संसारिक(जगिक)  संगीत [ worldly music in the bible] ; सर्व सांसारिक गाणी धर्मनिरपेक्षच आहेत . परंतु धर्मनिरपेक्ष गाणी सांसारिक नाहीत.

‘जगिक ’ या शब्दाची परिभाषा बायबलनुसार  पुढीलप्रमाणे आहे . १ योहान 2:16 -  कारण जगात जे सर्व आहे ते, म्हणजे देहाची वासना, डोळ्यांची वासना व संसाराविषयीची फुशारकी, ही पित्यापासून नाहीत, तर जगापासून आहेत;

यातील जे गुण आहेत ते सांसारिकतेला प्रोत्साहन देतात ते गुण म्हणजे  १. देहाची वासना २. डोळ्यांची वासना आणि  ३.  संसाराविषयीची फुशारकी

जे काही आपल्या विश्वासाला धक्का  पोहचवते ते संसारिक आहेत . १ योहान २;१५- जगावर व जगातल्या गोष्टींवर प्रीती करू नका. जर कोणी जगावर प्रीती करत असेल  तर त्याच्या ठायी पित्याची प्रीती नाही.

धर्मनिरपेक्ष संगीत  Is secular music a sin ?

बायबल विशेषत: या विषयाला संबोधित करत नसले तरी काही तत्त्वे प्रदान करते ज्याद्वारे मनोरंजन आणि दैनंदिन जीवनाच्या विविध क्षेत्रांमध्ये आपणास निवड करण्यास मार्गदर्शन करतात (फिलिप 4:8).
1. त्या संगीतामागचा आशय, उद्देश व उगम, वाजवणारी किंवा गाणारी व्यक्ती याचा विचार करणे महत्वाचे आहे. 2. तुम्ही ऐकत असलेले संगीत तुम्हाला पवित्र आत्म्याच्या जवळ आणत आहे कि,त्याला विझवत आहे ?                             
3. ती गीते दैहिक स्वभावाचे पोषण करतात कि, तुमच्या आत्मिकेतेचे पोषण करत आहे ? एखाद्या विशिष्ट गाण्याचे प्रेरणा किंवा बोल बायबलसंबंधी मूल्यांच्या विरोधात जात असल्यास किंवा अनैतिकतेला प्रोत्साहन देत असल्यास, ते टाळणे शहाणपणाचे ठरू शकते.

तथापि, सर्वच धर्मनिरपेक्ष संगीत वाईट किंवा अधार्मिक आहेत असे मला म्हणायचे नाही .अशी काही धर्मनिरपेक्ष गाणी आहेत जी प्रोत्साहीत करणारी, प्रेरणा देणारी आणि राष्ट्रीय मूल्ये साजरी करणारी आहेत. ख्रिस्ती या नात्याने, आपण बायबलच्या तत्त्वांशी सुसंगत असलेल्या संगीताची प्रशंसा करू शकतो आणि त्याचा आनंद घेऊ शकतो.

शेवटी, ख्रिस्ती विश्वासणार्यांनी धर्मनिरपेक्ष संगीत ऐकावे की नाही हा प्रश्न वैयक्तिक खात्री आणि विवेकाचा विषय आहे. प्रत्येक व्यक्तीचे मत भिन्न असू शकते.

What does the bible say about worldly music?

जगिक संगीत ऐकण्याचे परिणाम  Dangers of secular music ;

१.     यास्तव ख्रिस्ती विश्वासाणारे या नात्याने आपण कोणत्या प्रकारचे गीत गातो किंवा ऐकतो यावर खूप सावधगिरी बाळगली पाहिजे, गीतांच्या आशयाचे परीक्षण केले पाहिजे. कारण बायबल सांगते कि, गीतांमध्ये सामर्थ्य असते. 'देव त्याच्या लोकांच्या स्तुतीमध्ये वसतो स्तोत्र 22:3. जेंव्हा आपण आत्म्याने  उपासना करतो तेंव्हा पवित्रआत्म्याची उपस्थिती  उतरून येते . तर मग आपण हिंसक किंवा घाणेरड्या अर्थाचे गाणी गायली अथवा ऐकली तर काय होईल? होऊ शकते यामुळे दुष्टात्मा आकर्षित होऊन बाधीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

२.    रोम 10:17 सांगते की विश्वास ऐकण्याद्वारे येतो . याव्यतिरिक्त अजून ऐकण्याद्वारे काय येऊ शकते . ऐकण्याद्वारे भय येऊ शकते का ? काय ऐकण्याद्वारे ताणवाचा  सामना करावा लागू शकतो का? ऐकण्याद्वारे वासना, निराशा येऊ शकते का ? होऊ शकते की यावर तुम्ही विजय  मिळवण्याचा प्रयत्न करीत आहात, परंतु तुम्ही असमर्थ होत आहात . कारण तुम्ही  त्या प्रकारच्या गीतांच्या निवडीद्वारे त्यांना आमंत्रित करत आहात . वाईट गीते दैहिक स्वभावाचे पोषण करतात .आणि मग विचार करता कि, मला का बरे यावर विजय मिळत नाहीये ? जर तुमचे मन आणि विचारच अशा गीत-संगीताशी जोडलेले असेल , ज्यामध्ये अश्लीलता, अनैतिकता आणि फक्त कचराच असेल तर त्यावर मात करणे अगदी अशक्य आहे . म्हणून आपण जे काही ऐकतो त्याविषयी अतिशय सावध असले पाहिजे.

३.     मनोरंजनाच्या नावाखाली हा दुरात्म्यासाठी प्रवेश मार्ग असू शकतो ?  माझा विश्वास आहे, असे होऊ शकते. मनोरंजन या शब्दाचा प्रत्यक्षात अर्थ आहे "मनात जाणे", काहीतरी तुमच्यात प्रवेश करते. तुमच्या कानातून काहीतरी आत प्रवेश शकते. तुमच्या डोळ्यांतून काहीतरी आत शिरू शकते. वाईट गीते देहस्वभावासाठी पेरणी करतात. याचा अर्थ असा नाही की आपण जे काही पाहातो-ऐकतो बाधीतच असते ,परंतु आपण सावधगिरी बाळगली पाहिजे.

४.    बहुतेक जगिक संगीत हे दैहिक आणि सैतानाची उपासना करणाऱ्या, दुष्टात्म्याद्वारे प्रेरित, ख्रिस्त नाकारणाऱ्या, नवीन युग आणि सार्वभौमिकतेचा प्रचार करणाऱ्या, मूर्तिपूजक , मूर्तिपूजक तत्त्वज्ञान मानणारे , दारू आणि मादक पदार्थांचे व्यसन असलेल्या, ज्यांच्याठाही नवीन जन्माचा अनुभव नाही अशाकडून आलेले असते . जरी गीत किंवा गीतांचे शब्द  वाईट नसले तरी ती चाल अथवा संगीत निर्माण करतो तो अंधकाराने भरलेला आहे [२ करिंथ ११:१४ ].

५.    खरे सांगायचे तर या जगात दोन प्रकारचे लोक आहेत. एक प्रकाशाने भरलेले आणि दुसरे अंधकाराने भरलेले आहेत. जसे कि दावीद,तो संगीत वाजवत होता, केवळ शब्दविरहित संगीताने दुसर्‍या माणसावर आराम मिळण्याचा आणि निश्चितच त्रासदायक आत्म्यांना निघून जाण्याचा परिणाम झाला. जर पवित्र आत्म्याने भरलेल्या संगीतकाराच्या संगीताने दुरात्म्याच्या त्रासापासून सुटका मिळू शकते , तर मग असेही असू शकते की जे लोक अघोरी आत्म्याने ग्रसीत आहेत त्यांनी बनवलेल्या संगीताद्वारे  लोकांच्या जीवनात दुरात्मे प्रवेश करू शकतात [योहान १०:१०] .

६.    बॉलीवूड कलाकार , गीतकार , गायक पैकी काहीजनांचा सबंध  सैतानी उपासनेशी आहेत असे ऐकण्यास मिळते आणि यामुळेच काही कालावधीतच त्यांना प्रसिध्दी आणि यश प्राप्त होते [ मत्तय ४;९ ] . एका मुलाखतीत हानिसिंगाने याची पुष्टी देखील केली आहे. तर मग जो जग आणि जगिक लोकांवर राज्य करतो त्या अधिपतीद्वारे नियंत्रित करणाऱ्या व्यक्तीशी तुम्ही कसे सहमत होऊ शकता. 

मला शंका  वाटते की, या अज्ञानामुळे  त्यांनी तयार केलेले गीत-संगीताद्वारे किती लोकांच्या जीवनात,  दुरात्म्यांचा प्रभाव  असेल  आणि यामुळे  उन्नती, आशीर्वाद यांचा अभाव , आजार असेल .जर तुमचा या गोष्टींवर विश्वास नसेल तर  पुन्हा बायबल बघा ,जसे की जसे आत्मिकसंगीत आपल्याला पवित्र आत्म्याच्या जवळ आणण्यासाठी उपयोगी आहे. तसेच वाईटसंगीत अंधकाराच्या राज्यात आणू शकते

दुषित संगीत केवळ आत्म्यांनाच आकर्षित करत नाही तर मनुष्याच्या जीवनात देखील प्रवेश करतात . बायबल गलती 6:8 मध्ये सांगते जो आपल्या देहस्वभावासाठी पेरतो त्याला देहस्वभावा-पासून नाशाचे पीक मिळेल . रोम १३:१४ सांगते , ‘देहवासना तृप्त करण्यासाठी तरतूद करू नका.’  मनोरंजनाच्या नावाखाली देवहीन लोकांप्रमाणे देहवासनाचे खाद्य सेवन करणे हा विश्वासणार्याचा गुण नाही .

बायबलनुसार मग कोणते गीत स्वीकारण्यायोग्य आहे, हे कसे ठरवायचे ?

Should believers listen to secular music?

केवळ तिच गीते का ,ज्या गीतांमध्ये येशू, पवित्र आत्मा आणि बायबलसंबंधी देवाची उपासना आहे. कारण  अशी अनेक ख्रिश्चन गाणी आहेत जी उपासनागीते  नाहीत. तर काही ख्रिश्चन गाणी प्रार्थना व्यक्त करणारी, काही ख्रिश्चन गाणी आनंद व्यक्त करणारी ,काही ख्रिश्चन गाणी शोकगीते आहेत, वाढदिवसाची, विवाहाची आहेत, उपासनेची नाहीत. म्हणून ती गाणी काढून टाकली पाहिजेत का ? आणि केवळ देवाची स्पष्ट उपासना असलेली गाणीच वापरावीत का ? 

यासाठी बायबल आपणास फिलिप्पै ४:८ मध्ये आपल्याला एक मापदंड  देते, 

बंधूंनो, शेवटी इतके सांगतो की, जे काही सत्य, जे काही आदरणीय, जे काही न्याय्य, जे काही शुद्ध, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जो काही सद्‍गुण, जी काही स्तुती, त्यांचे मनन करा.”

या वचनातून मला आठ गोष्टीद्वारे गात असलेले किंवा ऐकत असलेल्या गीत-संगीताचे  मापन करता येते ; १) त्यात सत्य आहे का ? २) आदरणीय आहे का ? ३) न्याय्य आहे का ? ४) शुद्ध आहे का ? ५) प्रशंसनीय आहे का ? ६] श्रवणीय आहे का ? ७ ] सद्‍गुण आहे का ? ८] स्तुतीयोग्य आहे का ?

Worldly music and Christianity

विशेष वर्शिप लीडर साठी ; काही वर्शिप लीडर नवीन संगीत शिकण्याच्या मोहापायी सतत सेक्युलर गाणी ऐकतात, हे स्वतास ख्रिश्चन पुढारी म्हणतात.परंतु विधर्मी संगीतकारांच्या संपर्कात असतात जे जीवन अशुद्ध जीवन जगतात, त्याचे संगीत अनैतिकतेला प्रोत्साहन देतात. तुम्ही म्हणता अशा प्रकारचे संगीत माहित असणे आवश्यक आहे आणि म्हणूनच विधर्मी संगीतकारांच्या संपर्कात असाव लागत. तुमची वेशभूषा, केशभुषा देखील संसारिक संगीतकाराप्रमाणे करता.. केवळ स्वताच्या फेमसाठी [प्रसिद्धीसाठी ] सोशल मिडीयावर गीत-संगीत ,नृत्य प्रसारित करता ज्याद्वारे पवित्राशास्राची तत्वे पायदळी तुडवले जात आहेत. हे तुमच्या लक्षात देखील येत नाहीये.  खरे पहाता मंडळीने जगाला प्रभावित केले पाहिजे परंतु आज मंडळीच जगाद्वारे प्रभावित होत आहे . जगिक लोकांप्रमाणेच उपासनेला देखील तरुण-तरुणी लाजिरवाणे कपडे वापरत आहे. तुमची ही स्वत्रंता केवळ तुम्हा स्वत:लाच नुकसान पोहचवत नाही तर अनेक नवीन तरुण विश्वासनार्याना तुमच्यासोबत ओढत आहे .

विश्वासणारे संसारिक संगीत ऐकू शकतात का ? Can-a-Christian-listen-to-secular-music

आजकालची उपासना गीते म्हणजे उपासना गीते नसून मनोरंजनाचा भाग बनवली आहेत. आज अनेक ख्रिस्ती , गाणारे आणि वाजवणारे आहेत, परंतु खूपच कमी उपासक आहेत, अस का ? कारण ते प्रभूच्या सान्निध्यात वेळ घालवत नाहीत,मंडळीच्या अधीन राहात नाहीत . त्यांना पवित्र आत्मा देखील माहित नाही. त्यांना फक्त गीत माहित आहेत, त्यांना बीट्स माहित आहेत आणि त्यांना नवीन सर्वात ट्रेंडी गोष्ट माहित आहे आणि म्हणूनच ते परफॉर्म करू शकतात, लोकांना नाचवू शकतात, मनोरंजन करू शकतात.  लोक अशा  वर्शिप लीडरवर प्रेम करतात, त्यांना त्यांची गाणी आवडतात . परंतु त्यांच्या आराधनाने बंधने तुटत नाहीत. लोकांना देवाच्या उपस्थितीत नेता येत नाहीत. या कारणास्तव मंडळीमध्ये देवाची उपासना करण्यास रुची निर्माण होत नाही. पवित्रआत्म्याशी ओळख होत नाही. अभिषेक मिळवण्याचीही भूक लागत नाही.

या आर्टिकलद्वारे कोणाचे मन दुखवावे हा माझा हेतू मुळीच नाही ,तर देवाचा उद्देश स्पष्ट करणे हा आहे. प्रियानो आपले पाचारण जगाचे अनुकरण करण्यासाठी नाही तर, आपल्या मनाचे नूतनीकरनाद्वारे जग  बदलण्यासाठी  आहे. आणि आपण असे लोक असले पाहिजे कि, आपल्याद्वारे  इतर लोक अभिषक्त झाले पाहिजेत .त्यांची तारणार्याशी ओळख झाली पाहिजे . जर आपल्यातच सांसारिक विकृती आणि ऐहिक अनैतिकता असेल तर असे घडू शकत नाही. १ करिंथ १५ ;१९ सांगते  तुम्ही जगाचे नाही. मी तुम्हांला जगातून निवडले आहे”.

1 करिंथ 10:31- आपल्याला सर्व काही देवाच्या गौरवासाठी करण्याची आठवण करून देते. याचा अर्थ असा आहे की ख्रिस्ती या नात्याने, आपण आपल्या मनोरंजनाच्या निवडींसह आपल्या जीवनातील सर्व पैलूंमध्ये देवाचा सन्मान केला पाहिजे. जर एखादे विशिष्ट गाणे किंवा संगीत शैली देवाचा सन्मान करण्याच्या आपल्या क्षमतेत अडथळा आणत असेल किंवा आपल्याला बायबलसंबंधी मूल्यांपासून दूर नेत असेल तर ते टाळणे शहाणपणाचे ठरू शकते.

जर आपण या आर्टिकलद्वारे आशीर्वादीत  झाला असाल , जरूर प्रभूच्या गौरावासाठी याची लिंक पुढे शेअर करा.

मनापासून धन्यवाद ...

Blog by Pr.Deepak Shelke


Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url