पापाचा सिद्धांत (Hamartiology)


पापाचा सिद्धांत  (Hamartiology)

first-sin
पहिले पतन

परिचय : बायबलच्या सिद्धांतानुसार पापाची परिभाषा, त्याचे मूळ, परिणाम आणि त्याचे शेवट या अभ्यासास Harmartiology  म्हणतात. बायबलमध्ये पापाबद्दल सर्व माहीती पापाचा उगम, अर्थ ,आणि समस्या यावर योग्य उपाय व अधिक स्पष्टीकरण मिळते .

 पाप व्याख्या:  पाप म्हणजे सर्वसाधारणपणे बायबलनुसार देवाच्या नियमा विरोधात  केलेले अनैतिक कृत्य होय.


  प्रत्येकजण जो पाप करतो तो देवाचा नियम मोडतो. कारण पाप हे नियमभंग आहे. (१योहान ३: ४)
सर्व अपराध पाप आहे (१योहान५:१७)
जर तुम्हांला चांगले कसे करायचे हे माहीत असूनही जर ते तुम्ही करीत नाही, तर तुम्ही पाप करता. (याकोब ४; १७)
त्याची कृति विश्वासावर आधारित नाही, ते पाप आहे. (रोम १४:२३)
मूर्खपणाचे विचार पाप आहे (नीती २४: ९)

पापाचे मूळ :  पापाचा उगम कोठे व कसा झाला हे को्णालाच माहित नाही. आदाम आणि हव्वेने पाप करण्यापूर्वी, सैतानाने पाप होते केले व त्याला स्वर्गातुन पृथ्वीवर खाली फेकण्यात आले आहे.    (यशा  १४;१२-१७) प्रथम देवदूताने  देवाविरुध्द  बंड केले.

sin
first sin


आदाम आणि हव्वा याना देवाच्या  प्रतिमाप्रमाणे  निर्माण केले आणि एदेन बागेत ठेवण्यात आले होते .
देवाने त्यांना स्पष्टपणे आज्ञा केली केली होती की, चांगले व वाईटाचे ज्ञान करुन देणार्या वृक्षाचे फळ खाऊ नका , जर खाल  तर ते नक्कीच मरतील.
सैतानाने  हव्वेस भुरळ पाडली व फ़ळ खण्यास भाग पाड्ले.
हव्वेने  सैतानाचे खोट ऐकले आणि स्वातंत्र्य आणि  देवासारखे व्हायची लालसा केली .
अशा प्रकारे तिने ते  निषिद्ध फळ खाल्ले आणि आदामास ही दिले आणि   पापात पडले , देवाची आज्ञा पाळण्यात अयशस्वी झाले .

पाप म्हणजे काय ?

पापा म्हणजे काय हे दाखवण्यासाठी जुन्या व नव्या करारात वेगवेगळे शब्द वापरण्यात आले आहेत.
१. नेम चुकणे-   १योहान ५;१७  रोम३;२३
२.देवाविरुध्द  बंड करणे.    स्तोत्र ७८;१७
३.उल्लंघन करणे.   रोम४;१५
४.अविश्वास -   इब्रि ३;१२
५. आज्ञाभंग     इब्री२;  ,मत्त १५;१८-२०

 परिणाम  आणि  पापाचा   दंड :
सर्वानी पाप केले आहे आणि सपुंर्ण मानवजात पापाचा परिणाम भोगत आहे. पापाचा परिणाम दंड  किवां शासन असा आहे. शिक्षेचे दोन प्रकार आहेत.
१) नैतिक दंड   २)निश्चित दंड 
 
देवाने आदाम व हवेला बागेतून  हाकलून दिले.
देवाने आदाम व हवेला बागेतून  हाकलून दिले.

१) मृत्यू:


अ) शारीरिक मरण: शारीरिक मृत्यू  कोणालाही चुकवता येत नाही. रोम ५;२२
ब) आध्यात्मिक मृत्यू:  देवाच्या  उपस्थिती पासून वेगळे होणे (उत्पत्ती ३: २२-२४) , इफ़ीस २;
क) सार्वकालीक मृत्यू:  अनंतकाळासाठी देवाच्या  उपस्थिती पासून वेगळे होणे. (प्रगटी २0:१४) , रोम १;३२

२) हरवणे

लुक १५;२४  तो हरवला होता, पण आता सापडला आहे. व ते आनंद करु लागले.
पापामुळे मणुष्य देवापासुन व स्वर्गापासुन हरवला आहे.

३) दोष

उत्पत्ती २६;१० तू आम्हाशी असे वागून ही वाईट गोष्ट केलीस; कारण आमच्या लोकातून कोणीही तुझ्या बायको बरोबर निजला असता आणि त्यामुळे त्याच्या माथी मोठे पाप लागून तो अपराधी ठरला असता.

४) विनाश

१ तिमथ्य ६;  पण जे श्रीमंत होऊ पाहतात ते मोहात आणि सापळ्यात व अति मूर्खपणाच्या आणि हानिकारक वासनांच्या आहारी जाऊन नाश पावतात.


पापाचा  अतिंम  परिणाम  म्हणजे  नाश  यातुन  सुट्ण्याचा  एकमात्र  उपाय  त्याचा   पुत्र  प्रभुयेशुख्रिस्त 


योहान३:१६
,देवाने जगावर एवढी प्रीति केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. देवाने आपला पुत्र यासाठी दिला की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला अनतंकाळचे जीवन मिळावे
(२करीथं ५:२१), ज्याच्याठायी पाप नव्हते त्याला आमच्यासाठी देवाने पाप केले. यासाठी की त्याच्यामध्ये आम्ही देवाचे नीतिमत्व व्हावे.
(मार्क १0:४५) तो  अनेकसाठी `खंडणी 'म्हणून त्याचे जीवन बहाल केले. (योहान १: १२,२९; १योहान २: २) .

नाश
doctrine-of-sin
firy-hell-heaven


पापाचा अंतिम परिणाम म्हणजे नाश. नाशापासून सुटण्याचा मार्ग देवाने योजिला आहे . देवाने जगावर एवढी प्रीती केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला.यासाठी कि जो  कोणी त्याजवर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर ...(योहान. ३:१६) पश्चाताप न  करणारे व विश्वास न ठेवणारे यांचा शेवट नाश आहे.

नाशाचे वर्णन पवित्र शास्रात पुढीलप्रमाणे केले आहे.

१. क्रोध व कोप, संकट व क्लेश,  रोम.२:८,९ - ... त्यांच्यावर क्रोध व कोप संकट व  क्लेश ही येतील.
२. सार्वकालिक अग्नी,  मत्तय. २५:४१ - अहा शापग्रस्तहो, माझ्यापुढून निघा आणि  सैतान व त्याचे दूत ह्यांच्यासाठी जो सार्वकालिक अग्नी सिद्ध केला आहे त्यात जा .
३. दुसरे मरण,  प्रकटी.२१:८ - ... ह्याच्या वाट्यास अग्नीचे व गंधकाचे सरोवर येइल हेच ते दुसरे मरण आहे.
४. युगानुयुगाचा नाश, २ थेस्सल. १:९ - . . . त्यांना प्रभूच्या समोरून व त्याच्या सामर्थ्याच्या गौरवापासून दूर करण्यात येऊन युगानुयुगाचा नाश ही शिक्षा त्यांना मिळेल.
५. नरक, २ पेत्र.२:२४ - ... तर त्यांस नरकात टाकले.


पश्चात्ताप न करणाऱ्यांचे भवितव्य

श्चात्ताप न करणाऱ्यांचा नाश होईल तेव्हा त्यांचे अस्तित्व नाहीसे होणार नाही. तर देवाची समक्षता व स्वर्गीय आनंद यापासून त्यांना कायमचे दूर करण्यात येईल.
 
hell



मत्तय. २२:१३ - ह्याचे हातपाय बांधून ह्याला बाहेरील अंधारात टाका, तेथे रडणे व दात खाणे चालेल.
त्यांना सार्वकालिक पीडा भोगावी लागेल व ते त्यांना समजेल. श्रीमंत मनुष्य व लाजर यांची गोष्ट वाचा (लूक, १६:१९-३३). या दाखल्यावरून आपण नाशाविषयी पुढाल गोष्टी  शिकतो.
१. तो क्लेश व पीडा भोगत होता, वचन २३-२४.
२. त्याला स्मरणशक्ती होती,वचन २५.
३. लाजर स्वर्गीय सुख उपभोगत आहे हे त्याला दिसले,वचन २३,२५.
४. श्रीमंत मनुष्य स्वर्गीय सुखापासून विभक्त झाला होता, वचन २६.
 ५. केवळ या जीवनात मनुष्याला त्याचे भवितव्य ठरविण्याचा संधी आहे व २७-३०.
या जगात असताना जे पश्चात्ताप करीत नाहीत, त्यांना मरणानंतर दुसरी संधी मिळत  नाही. आपले भवितव्य याच जीवनात निश्चित होते हे गंभीर व भयानक सत्य आहे .
मनुष्याचा आत्मा अमर आहे म्हणून त्याला मिळणारी शिक्षा किवा सौख्य हि अमर आहे
.जे  या जगात असताना पश्चाताप  करून प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात ते सार्वकालिक सौख्य उपभोगतील.  जे या जगात असताना संधी साधून घेत नाहीत, ख्रिस्ताकडे येत नाहीत,ते
सार्वकालिक शिक्षा भोगतील.
पापाचा परिणाम भयंकर आहे. हे आपण थोडक्यात पाहिले आहे. 
सार्वकालिक शिक्षा ,क्लेश , पीडा या गोष्टींचा विचार करणे सर्वांना अप्रिय आहे. तरी हे पवित्र शास्त्रातील शिक्षण आहे .मनुष्याचा नाश व्हावा अशी देवाची इच्छा नाही (मत्तय.१८:१४). या त्रासापासून मनुष्याची सुटका व्हावी म्हणून देवाने आपला एकुलता एक पुत्र पाठविला.एवढेच नव्हे तर मनुष्यावर येणारी येणारी शिक्षा ख्रिस्ताने स्वतः वधस्तंभावर भोगली आणि अशा रीतीने मनष्याची सुटका केली. जे ही सुटका  समजून उमजून नाकारतात त्यांना सदासर्वकाल पीडा भोगण्याशिवाय गत्यंतर नाही.

सारांश

·        पापाचा उगम कोठे व कसा झाला हे पवित्र शास्त्रात सांगितले नाही. मनष्याचे पतन होण्यापूर्वी सैतानाने देवाविरुद्ध बंड केले आणि या कारणासाठी त्याला स्वर्गातून घालवण्यात आले. तेव्हापासून तो देवाचा प्रमुख शत्रू आहे.
·          देवाने दिलेली आज्ञा मोडल्याने पाप या जगात आले.आदाम व हव्वा यांच्याद्वारे मनुष्याचे पतन झाले.
·        पतनाचा परिणाम प्रथमतः त्या पहिल्या जोडीवर आणि पुढे संपूर्ण मानवजातीवर झाला.
·         प्रत्येकाला पापी स्वभाव मिळाला आहे. पापाचे मूळ मनुष्याच्या अंतःकरणात आहे.
·        सर्वांनी पाप केले आहे.
·        पापाचा मूळ अर्थ देवाविरुद्ध बंड असा आहे.
·         मानवाची संपूर्ण वत्ती पापाने भरलेली आहे.
·        देवाचा क्रोध सर्वांवर आहे.
·        पापाची व्याप्ती सर्वत्र आहे.
·         पापाचा परिणाम म्हणजे मृत्यू. मनष्याला पापावर काही उपचार करता येत नाही .ख्रिस्ताशिवाय त्याला आशा नाही.
·         जो पश्चात्ताप करीत नाही त्याचा नाश ठरलेलाच आहे.
·        आपले भवितव्य या जगात निश्चीत होते .मरणानंतर दुसरी संधी नाही . 
·        आपण पश्चाताप करावा  व देवाने दिलेले तारण स्वीकारावे .

अधिक माहिती  प्रार्थना सपंर्क
पास्टर दिपक 
मो.९२७००४७३१६ , email : deepakforjesus@gmail.com


Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url