पापाचे दुष्परिणाम व बचाव


पापाचे दुष्परिणाम बचाव

पापाचे-दुष्परिणाम-व-बचाव
 पापाचे-दुष्परिणाम-व-बचाव

ज्ञानाच्या अभावी माझ्या लोकांचा नाश  होत आहे .  असे परमेश्वर म्हणतो ( होशेय-४:६)  . ज्ञानामुळे आपण मुक्त होतो (नीती-११:९) .   आपण पवित्र असावे कारण आपला परमेश्वर पवित्र आहे (१पेत्र-१:१५-१६). परमेश्वरासारखा आपला स्वभाव नसेल तर आपण त्याच्याबरोबर चालू शकत नाही (आमोस-८:३). परमेश्वर आपल्याला शुद्ध करतो व पाप करू नका असे निक्षून सांगतो (योहान-५:१४) .
व्यभिचारी स्त्रीला देखील येशु म्हणाला, ह्यापुढे पाप करू नको ( योहान-८:११). जर आपण येशूच्या रक्तात शुद्ध होतो तर आपण पवित्र झाले पाहिजे, पापापासून वाचणे कठीण आहे कारण सैतान पापाचा दबाव आपल्यावर टाकत असतो.

१)  पाप संहारक / मारणारा आहे:- 

पापाचे वेतन मरण आहे  (रोम-६:२३)  . पाप प्रथम आनंदित करते व नंतर मारून टाकते पाप मधुर विष आहे . ते मधुर असते तरी ते विष आहे. दृष्टाईचे मरण दृष्टाईत असते (स्तोत्र-३४:२१) . दृष्टतेचा अतिरेक करू नको ,मूर्ख होऊ नको तू अकाली का मरावे (उपदेशक-७:१७) .  जो परमेश्वराला अंतरतो तो आपल्या जीवाची हानी करून घेतो, म्हणजे पाप करणे (नीती-८:३६).  जो धर्मिकतेत असतो तो दृढ असतो,जो वाईटाच्या मागे जातो . तो मरणाला आमंत्रण देतो (नीती-११:१९) . पाप्याला दृष्टता खाऊन टाकते (नीती-१३:६).

२) पाप आजाराला आमंत्रण  देते:

  मुर्खांना त्यांच्या दुराचारमुळे वा त्यांच्या दृष्कृत्यमुळे पीडा भोगावी लागते, त्यांच्या जीवाला सर्व प्रकारच्या अन्नाचा विट येतो.ते मृत्युद्वाराजवळ पोहोचतात, कारण आजारामुळे अन्नाची वासना उडते.  त्याचे कारण ,  पाप आहे  (स्तोत्र-१०७ : १७,१८) . जेव्हा आपण आपल्या पापाला झकतो तेव्हा आपण आजारी पडतो , व कबुल करतो तेव्हा तो पापाची क्षमा करतो व आरोग्य देतो (स्तोत्र-३२:३,५) .
हा व्यक्ती आडतीस वर्षांपासून आजाराने पिडलेला होता (योहान-५:५) . येशू त्याला म्हणाला, “पाहा, तू बरा झाला आहेस; आतापासून पाप करू नकोस; करशील तर तुझे पूर्वीपेक्षा अधिक वाईट होईल. (योहान-५:१४ )

३) पाप हे पाप्याला जाळ्यात अडकवते  / गुंतवते .  

sin-effects
sin-effects

जेव्हा आपण पुन्हा पुन्हा पाप करतो ते पाप आपल्याला गुंतवत असते (इब्री-१२:१).   जो कोणी पाप करतो तो  पापाचा गुलाम बनतो म्हणजे पाप आपल्याला दास करत असते (योहान-८:३४) दुर्जनाला त्याचे स्वतःचेच दुष्कर्म पछाडतात तो आपल्याच पापाच्या पाशात सापडतो (नीती -५:२२) . दुर्जन आपल्या दृष्टतेने पतन पावतो (नीती-११:५) .  सैतानाचा पाश हे पाप आहे. आपल्याला गुंतल्याने त्याला आनंद होतो . हे त्याचे मूळ आहे (२ तीमथी-२:२६).

४) पाप पाप्याला ह्र्दायाला कठोर बनवते   

(इब्री-३:१३).  पुन्हा पुन्हा पाप केल्यानी पापी कठोर बनतो म्हणून आपण पाप करू नये (स्तोत्र-९५:७,११) .

५) पापाचा आनंद क्षणिक असतो:- 
  पापचे क्षणिक सुख भोगण्यापेक्षा मोशेने देवाच्या लोकांबरोबर दुःख सोसणे पसंद केले (इब्री-११:२४,२५). लाबडीची भाकरी मनुष्यांस गोड लागते , पण मग त्याच्या तोंडात माती पडते (नीती-२०:१७) .


६) पाप आपल्यात अप्रतिष्ठा/ लज्जा आणते :-
sin-and-its-consequences
sin-makes-blind

पापामुळे लोक अंधारात जातात परंतु त्यातून बाहेर आल्यानंतर त्यांना लज्जा वाटते पाप करताना खूप चांगले वाटते , परंतु त्यातून बाहेर येतात तेव्हा लज्जा येते (नीती-१४:३४) .  हे प्रभो आमच्या तोंडास, अमाचे राजे, आमचे सरदार, आमचे वडील यांच्या तोंडास कळोखी लागली आहे . कारण आम्ही तुजविरुद्ध पाप केले आहे (दानियल-९:८) .     ज्यांनी पाप केले ते सर्वकाळच्या धिक्करासाठी उठवले जातील. धार्मिक परमेश्वराबरोबर राहतील (दानियल-१२:२).

७) पाप आपली प्रगती थांबवतो.  

 जो आपले दोष झाकतो त्याचे बरे होत नाही जो ते कबुल करून सोडून देतो त्याच्यावर दया होते  नीती-२८:१३  .

८) देवापासून दुरावा
sin-and-its-consequences
sin-and-its-consequences

  आपले अपराध आपण व परमेश्वर यांच्यात आडभिंतीप्रमाने बनतात.व आपल्या पापामुळे परमेश्वर आपल्याला दर्शन देत नाही ,आपले ऐकत नाही . आपण पुन्हा पुन्हा पाप करत असलो तर खरोखर परमेश्वरापासून वेगळे बनत असतो  यशया-५९:१,२  .आदामाबरोबर परमेश्वर संगती ठेवत होता. परंतु त्याने पाप केले व आदम देवापासून लपून राहिला पाप परमेश्वरासमोर आपल्यात दोषिभावना टाकते उत्पत्ती-३:९,१० .      जर आमच्या जीवनात पाप असेल तर परमेश्वर आपली प्रार्थना ऐकत नाही स्तोत्र-६६:१८ .   परमेश्वर दृष्टपासून दूर राहतो ,पण तो धर्मिकांची प्रार्थना ऐकतो नीती-१५:२९ .
परमेश्वर पापी लोकांचे ऐकत नाही . परंतु त्याची इच्छा पूर्ण करणाऱ्यांचे तो ऐकतो.   विश्वासणारा पाप करत असेल तर पवित्र आत्मा त्याबद्दलची टोचणी देतो , व पापापासून आवरतो (योहान-९:३१) .

९) पाप भीतीला आणते:-  

 कोणी पाठीस लागले नसता दुर्जन पळतात . पण धार्मिक सिंहासारखे निर्भय राहतात. पाप नसल्यामुळे आपल्यात धैर्य असते नीती-२८:१.   सर्वकाही झाले तरी जे पाप करीतच राहतात. त्यांना नेहमी भय असते स्तोत्र-७८:३२,३३.   जेव्हा आपण पाप करत नाही तेव्हा आपल्यात कोणतीही भीती नसते योहान-१४:३० .

१०) पाप आपल्या जिवनात  पराजयाला आणते:-  

 इस्राएल लोकांनी पाप केले त्यामुळे त्यांना पराजायला तोंड द्यावे लागले (१ राजे-८:३३) .  इस्राएल लोकांनी परमेश्वरासमोर पाप केले तेव्हा क्षत्रुसमोर ते पराजित झाले म्हणून यहोशवाने प्रार्थना केली (यहोशवा-७:१०,१२) .  इस्त्राएल लोक देवाच्या मार्गावर चालले तर परमेश्वर त्यांच्या क्षत्रूविरुद्ध लढण्यास तयार आहे. म्हणून आपण पाप करू नये . तर देवाच्या इच्छेप्रमाणे चालावे कारण त्याच्याने परमेश्वर आपल्याबरोबर राहतो (स्तोत्र-८१:१३,१४).

११)  पाप सैतानला दरवाजा,मार्ग खुला करतो:- 

 पाप हे सैतानाला आपल्या जीवनात येण्याचं द्वार, मार्ग आहे . रागामुळे सैतानाला वाव मिळतो. सारखे सारखे रागवल्याने पाप होते व सैतान कार्य करतो (इफिस-४:२६,२७). सैतान केवळ नाश घात व चोरी करण्यास येत असतो (योहान-१०:१०) .

१२)  पाप  सदासर्वकाळासाठी  लपून  राहत  नाही :-   

कोणतीही गोष्ट कधीही लपून राहत नाही तर कधीनकधी ती उघडी होते (लुक-१२:२,३) .परमेश्वराचे भय धरणे व त्याच्या आज्ञा पाळणे हे मनुष्य कर्तव्य आहे ( उपदेशक-१२:१४) . आपले पाप आपल्याविरुद्ध साक्ष देतात पाप बोलत असतात (यशया-५९:१२) . वासना गर्भवती होऊन पापाला जन्म देते (याकोब-१:१३,१६).  याकोब पाप करणाऱ्या मनुष्याची तुलना गर्भवती स्त्रिबरोबर करतो .त्या स्त्रीला तीन महिन्यापर्यंत गर्भाची जाणीव नसते . परंतु त्याचे दिवस भरल्यावर त्या बाळाला बाहेर यावेच लागते . त्या प्रकारे पाप जास्त दिवस झाकत नाही तर ते उघडे पडतेच

पापापासून कसे वाचावे / पापला कसे टाळावे.


sin-and-its-consequences

Bible Protect us from sin



१ )  परमेश्वराच्या द्रुष्टीतून काही एक सुटत नाही ;  . परमेश्वराचे नेत्र सर्वत्र असतात . ते बरे वाईट सर्व पाहत असतात ( निती-१५:३) .  हे लक्षात ठेवले तर आपण पाप करणार नाही.  परमेश्वर म्हणतो,आकाश व पृथ्वी ही मी व्यापून राहतो (यिर्मया-२३:२४) . परमेश्वराच्या दृष्टीला सर्व उघडे व प्रकट केले आहे ( इब्री-४:१३) . जे अंधारात असते ते उजेडात आणले जाते ( लुक-१२:२,३).

२) परमेश्वराचे भय धरल्याने :- 

 परमेश्वराचे भय धरल्याने मनुष्य दुष्कर्मपासून दूर राहतो ( निती-१६:६). येशु म्हणतो ज्याला नाश करून नरकात टाकण्याचा अधिकार दिला आहे . त्यालाच आपण घाबरले पाहिजे ( लुक-१२:४,५). इयोब देवाला भिणारा व पापापासून दूर राहणारा होता ( इयोब-१:१).  परमेश्वराचे भय जीवनाचा झरा आहे.ते भय मृत्यूपाश चुकवीते (नीती-१४:२६,२७ )

३) परमेश्वराच्या हृदयाला पापखिन्न करते याची जाणीव :- 

 उत्पत्ती-६:५,६ या वाचनात मनुष्याच्या पापामुळें परमेश्वर खिन्न झाला. (नीती-६:१६-१९) यात सांगितलेल्या गोष्टीमुळे परमेश्वराला वीट येतो व त्याचे हृदय खिन्न होते.

४) पापमुळे आपण नरकात जाऊ याची जाणीव ठेवणे:- 

 (मत्तय-५:२९,३०) (प्रकटीकरण-२०:१४,१५) ,(प्रकटीकरण-२१:८) . ज्या गोष्टीमुळे आपण पापात पडतो. त्या आपल्यापासून दूर कराव्या. त्या नसताना आपण स्वर्गात गेलेले बरे नरकात आपण पडू नये म्हणून पापाला प्रवृत्त करणाऱ्या गोष्टी काढाव्या (मार्क-९:४३ - ४८).   सत्य माहीत झाल्यावरही आपण पाप केले तर आपला नाश झाल्याशिवाय राहणार नाही  (इब्री-१०:२६,२७).

५) प्रार्थना केल्याने पापापासून दूर राहू शकतो.

  भक्तिमान लोकांना परीक्षेतून कसे सोडवावे व अनीतिमान लोकांना शिक्षा भोगत न्यायाच्या दिवसासाठी कसे राखून ठेवावे हे प्रभूला कळते (२ पेत्र-२:९).

६)  परमेश्वराचे  वचन  आपल्या  ह्रुदयात  राहिल्याने .

sin

prayer



पाप करू नये म्हणून देवाचे वचन ह्रुदयात ठेवावे ( स्तोत्र-१९:११). देवाचे नियमशास्त्राचे रात्र दिवस मनन कर . ते तुझ्या मुखात सदैव असो (यहोशवा१:८ ) देवाचे वचन ह्रुदयात असल्याने आपला पाय ढळत नाही (स्तोत्र-३६:३१) .

७) प्रतिफळाच्या आशेने:-  

 जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे. पापाची क्षमा करील व आपापल्या सर्व अनितीपासून शुद्ध करील (योहान-१:९) . (इब्री-१२:२, योहान-१४:१ते२३  , प्रकटीकरण-२१:४,,२१)


कृपया हे शिक्षण  आपल्या प्रियजनानही पाठवा  .. 

Please share to your loved ones.....







Next Post Previous Post
1 Comments
  • Unknown
    Unknown २५ एप्रिल, २०२० रोजी १०:४९ PM

    ज्ञानात भर पाडणारा संदेश 🙏👍

Add Comment
comment url