George-Mueller जॉर्ज-मुल्लर-बायोग्राफी

अनाथांचा पिता 

George-Mueller जॉर्ज-मुल्लर-बायोग्राफी
George-Mueller जॉर्ज-मुल्लर

George Mueller जॉर्ज मुल्लर १८०५-१८९८

    विश्वास ठेवणे हेच त्याचे गरज भागविण्याचे एकमेव साधन मानुन जॉर्ज मुल्लर पुष्कळ अनाथालये स्थापन केली. आणि त्याच्या जीवनभर यशस्वीरित्या चालविली जॉर्ज मुल्लर त्याच्या वैयक्तिक गरजा भागविण्यासाठी सुद्धा प्रभूची वाट पाहत असत. हे विसाव्या शतकातील विश्वासणाऱ्यांना एक आव्हान आहे. त्याने आपली वैयक्तिक गरज किंवा अनाथालयाची गरजेसाठी माणसावर विश्वास कधीच ठेवला नाही.

पैशाची उपलब्धता असणे हा समाजाचा कणा आहे असे गणले जाते. परंतु खर्चाची किंचितही काळजी न करता देवाच्या सेवेमधील विश्वासाव्दारे नेहमीच विजयच होत असे . जॉर्ज मुल्लर हे  विश्वासाचा नायकविश्वासू प्रेषितया नावान देखील परिचीत होता.

तरूण वयातः

जॉर्ज मुल्लर त्याच्या तरूणपणात फार दुष्ट मार्गाने जीवन जगत होता. १५ वर्षांचा असताना त्याच्या वडिलांनी त्याला विद्यापीठासाठीच्या सराव वर्गासाठी पाठविले होते. लुथरन पाद्री होऊन  , त्याने देवाची सेवा करावी असे नाही तर त्याने सुखीसामाधानात जीवन जगावे अशी त्याच्या वडिलांची अभिलाषा होती . परंतु मुल्लर आपला वेळ कादबऱ्या वाचणे आणि इतर वाईट सवयीत घालवित असे. जॉर्ज मुल्लर चौदा वर्षाचा असताना त्याची आई मरण पावली. हा दुखःदायक प्रसंग देखील त्याच्या जीवनात कोणताच बदल करू शकला नाही.

एकदा जॉर्ज मुल्लर कैद करून कारागृहात टाकण्यात आले होते कारण त्याने वसतिगृहामध्ये फसवणुकीचा गन्हा केला होता. २४ दिवसांच्य तुरूंगवासात त्याने टाईमपास करण्यासाठी बायबल मागितले आणि ते वाचले देखील. नंतर  त्याच्या वडिलांच्या प्रयत्नांमुळे त्याची तरुंगातन सुटका करण्यात आली होती.

 ख्रिस्त शोध :

त्याच्या वडिलांच्या इच्छेनुरूप, त्याच्या वयाच्या २० व्या वर्षी त्याने विद्यापिठामध्ये त्याने ईश्वर ज्ञानाचे शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतला.तेथे देखील त्याने त्याचे दुष्ट जीवन जगणे सोडून दिले नाही. त्यावेळीबेटामित्राची विद्यापीठात त्याची ओळख झाली. बेटा , विश्वासू ख्रिस्ती जीवन जगण्याचा प्रयत्न करीत होता. शनिवार दिनांक ७ नोव्हेंबर १८२५ रोजी बेटाने जॉर्ज मुल्लरला  प्रार्थना सभांमध्ये भाग घेण्यासाठी आमंत्रित केले होते. बेटा अशा प्रकारच्या सभांना वारंवार जात असे.

हे ऐकल्यावर, ज्याचा शोध तो करीत होता. ते त्याला मिळणार आहे. अशा कल्पनेने त्याने त्या आमंत्रणाचा स्विकार करून तो त्या सभांना हजर झाला. हे एका ख्रिस्ती व्यापारी  वेकनरचे घर होते. गुडघे टेकून प्रार्थना करणे हा मुल्लरचा तेथील अविस्मरणीय अनुभव होता त्या घराच्या प्रमुख वेकनराने प्रार्थना सुरू केली. मुल्लुर सुशिक्षित मनुष्य होता. तर वेकनर अशिक्षित साधारण व्यापारी मनुष्य होता. त्याच्या सामर्थ्यवान आणि करूणामय प्रार्थनेने जॉर्जचे ह्रदय हेलावले गेले. याच ठिकाणी तो प्रथमच प्रार्थना करायला शिकला होता. हिच ती जागा जिथे ज्याचे ह्रदय महान शांतीने भरून गेले होते. त्या रात्री झोपण्यापूर्वी न कळत त्याचे गुडघे देवासमोर वाकले गेले. त्याने प्नार्थना केली तेव्हा तो २० वर्षांचा होता.

मिशन कार्याची आवड :

त्याच्या जीवनाने मोठा बदल पाहिला. आता त्याने बायबल अर्थपूर्णरित्या वाचायला सुरुवात केली होती. तो नियमित प्रार्थना करीत असे आणि न चुकता चर्चला जात असे नंतर त्याला सुवार्ता प्रचार करण्याची आवड निर्माण झाली . त्याने मिशनरी होण्याचा प्रयत्न केला.

त्याच्या अध्यात्मिक जीवनाची पातळी उंचविण्यासाठी त्यान प्रार्थना सभाना जाणे आणि चर्चच्या उपासनेत भाग घेणे चालु ठेवले. त्या माध्यमातून त्याने पुष्कळ ठिकाणी प्रचार केला. मिशनरी बनण्याची इच्छा व आवड त्याच्यामध्ये अविरतपणे वाढतच होती.

जेव्हा परमेश्वराला एखादी योजना कोणा एका व्यक्तिच्या व्दारे पूर्णत्वास न्यावयाची असते तेव्हा तो त्याच व्यक्तिव्दारे ती योजना सिद्धीस नेतो  . त्यासाठी देव त्या व्यक्तिच्या आवडीनिवडींवर अवलंबून राहत नाही. तो ती परिणाम कारकरित्या शेवटास नेतो. मुल्लरने सुध्दा पुष्कळ मार्गांची अवलंब करून आणि प्रयत्नांची पराकाष्टा करून मिशन कार्यात सामावून घेण्याचा प्रयास केला.

जॉर्ज आता २२ वर्षांचा होता. तेव्हा असे ठरविण्यात आले की, मल्लरने एका वृध्द मिशनऱ्याचा मदतनीस म्हणून बुखारिस्ट मध्ये जावे. अनपेक्षितरितीने त्याला त्यासाठी वडिलांची परवानगी देखील मिळाली. परंतु तेवढयातच टर्की व रशियामध्ये युध्द सुरू झाले होतो. त्यामुळे त्याला अडथळा निर्माण झाला. मग नंतर लंडन मिशन संस्थेव्दारे त्याला एक निमंत्रण मिळाले. मुलाखतीनंतर यहुदी लोकांमध्ये ख्रिस्ती मिशनरी म्हणून त्याला पाठविण्याचे ठरविण्यात आले. मुल्लर लंडनला देखील पोहचला परंतु देशाच्या कायदयाप्रमाणे त्या देशाच्या नागरिकाने सैन्यामध्ये भरती व्हावे. ३ वर्षाच्या सेवेनंतर त्याला दुसऱ्या देशात जाता येत होते. परंतु मुल्लरने हे केले नाही. कारण त्याने मिशन कार्यासाठी स्वतःचे समर्पण केलेले असल्यामूळे तो सैन्यात जाण्यास तयार नव्हता. म्हणून परदेशात जाण्यासाठी त्याने केलेली विनंती नाकारण्यात आली.

सेवेची सुरूवातः

एवढयात जॉर्जच्या जीवनामध्ये एक अर्थपूर्ण प्रसंग घडला. ईश्वरज्ञानाचे शिक्षण घेणारे ज्या आश्रमात राहत होते तो आश्रम फँकव्दारे चालविला जात होता. तो १७२७ मध्ये मरण पावला होतो. या आश्रमातील सर्वांना प्रभू विश्वासाव्दारे पोसित आहे. हे पाहून त्याला फार आश्चर्य वाटले. पण त्याचा परिणाम म्हणून जी सेवा नंतर तो करणार होता त्यासाठी फार मोठी मदत ठरली.

George-Mueller जॉर्ज-मुल्लर-बायोग्राफी
Orphanage

प्रभुसाठी काहीतरी करावे या इच्छेने त्याने ईश्वरविज्ञान विद्यार्थ्यांसाठी एक प्रार्थना गट सुरू केला, यहुदी मुलांसाठी बायबल  वर्ग सुरू केले. परंतु मनुष्याच्या मार्गदर्शनाखाली राहुन सेवा करण्याऐवजी पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाव्दारे सेवा करणे अधिक उत्तम आहे असे मुल्लरला वाटले आणि म्हणून जेव्हा तो त्याच्या मित्रांबरोबर नाताळचा काळ असताना त्याने मिशन संस्थेला असे पत्र लिहिले की, तो विनावेतन काम करण्यास इच्छुक आहे. त्याने स्वतःला विश्वासात जगण्यास तयार केले. परंतु सन १८३० मध्ये २५ वर्ष वयाच्या जॉर्जला सांगण्यात आले की, त्याला मिशनरी म्हणून कोठेही पाठविता येणार नाही. ते सुध्दा देवाचे कार्य होते.

त्यानंतर त्याने देवाच्या इच्छेप्रमाणे मेरी ग्रुव्हसबरोबर लग्न केले. त्याला चर्च पाद्री म्हणून पगारावर काम करण्यापेक्षा सेवेतून मिळणाऱ्या उत्पन्नावर जगणे त्याने पसंत केले . देवाला त्याच्या इच्छेप्रमाणे मुल्लरला सेवेत चालवायचे होते. त्या अगोदर विश्वासात जगणे देवाने त्याला शिकविले होते.

विश्वासु जीवनः

प्रसिध्द अनाथालयाचा अध्यक्ष ऑगस्ट एच फ्रँकचे जीवन चरित्र वाचल्यानंतर प्रभुने गतकाळातील १०० वर्षे २००० लेकरांना कसे पोसले. है मुल्लरला समजले. यामुळे रस्त्यावरून फिरणाऱ्या अनाथ मुलांबद्दल त्याला प्रेम वाटू लागले. तो सकाळी लवकर उठून आठ वाजता सर्व मुलांना एकत्र करून बायबल पाठ शिकवित असे. काही दिवसांतच त्याला ३०- ४० मुलांचे पालनपोषण करण्याची जबाबदारी मिळाली. तेव्हा जणू काही देवाने जॉर्जच्या अंत:करणात अनाथांवर प्रेम करण्याचे बी पेरले आहे असे वाटले . २१ फेब्रुवारी १८३४ मध्ये त्याला अनाथांकरीता एक चळवळ स्थापन कर इच्छा निर्माण झाली. त्यानंतर त्याने ५ मार्चला भारतीय व विदेशा बायबलअध्यन चळवळ स्थापन केली. हया नंतर त्याच्या जवळ फक्त एक सिलींग होती. तरीही मुल्लरला प्रभु त्याचा पाया, प्रार्थना त्याचा पुरावठा   सदस्य कार्यशिल व  विश्वासु असल्यामूळे ती चळवळ वाढली.

विश्वासाव्दारे ७ महिन्यात १६८ पौंड मिळाले. देवाच्या कृपेने  ही सेवा महिन्यात वाढत गेली. या बद्दलची वार्ता सर्व ब्रिस्टॉल शहरात पसरली. अनाथ आश्रम सुरू करण्यासाठी मुल्लरने प्रार्थना केली. आणि २० नोव्हें १८३५ रोजी त्याने धैर्याने एका भगिनीच्या घरात आश्रम सुरू केला. तेव्हा त्याला देवाचे वचन प्राप्त झाले,"तु आपले तोंड चांगले उघड म्हणजे मी ते भरीन" (स्तोत्र ८१:१०) ते वचन त्याच्या जीवनाचे मुळ ध्येय बनले होते. मल्लरला फक्त स्वर्गीय बँकेच्या मदतीचे चेक हवे होते. त्याने तो विश्वासात प्रबळ होत गेला. १ एप्रिल १८३६ ला त्याने मुलींची संस्था सुरू केली. त्याकरीता कोणाकडूनही मदत मागितली नव्हती. तरी काही वेळा त्याच्याकडे पैसा राहत नसे. परंतु रात्री तो गुढघ्यावर प्रार्थना करी व सकाळी सुर्योदयापुर्वी त्याला मदत मिळत असे.


विश्वासाव्दारे चमत्कारः

सन १८३८ वर्षाच्या जून महिन्यामध्ये सर्व मदत बंद झाली होती. एक दिवस सकाळीच मी नेहमीप्रमाणे माझ्या बागेत फिरत असताना एका वचनावर मनन करीत होतो,“ येशु ख्रिस्त काल आज व युगानुयूग सारखच आहे ,इब्री १३:८.  न बदलणारा देव सर्व गरजा पूर्ण करील.  हे मना ! तु का खिन्न झाला आहेस  ?  असे मोठयाने बोलून मी स्तब्ध झालो होतो. परमेश्वराच्याठायी माझ्या मनातून आनंद ओसंडू लागला. असे विचार मनन केल्यानंतर काही मिनिटातच मला २० पौंडाची देणगी मिळाली. देवबाप चमत्कारिकरित्या माझे मनोरथ पूर्ण करीत होता.

१८ सप्टेंबर रोजी आश्रमामध्ये काहीच शिल्लक नव्हते म्हणून आश्रमातील काही निरूपयोगी वस्तू विकाव्यात असा मी विचार करीत होतो. मी देवाची इच्छा शोधली त्याच संध्याकाळी एक स्त्री लंडनहून आली आणि तिने पैसे व वस्तुंनी भरलेली बॅग दिली ज्या वस्तू तिच्या मुलीने पुष्कळ दिवसांपूर्वी पाठविल्या होते. देवाच्या वेळेतच आपल्या गरज भागली जाते .

१८ ऑगस्ट १८३९ मधली गोष्ट आहे . मजजवळ १ पैसासुद्धा  नव्हता. आणि त्यात  दिवशी एक विद्यार्थी आणि ६ नवीन मुलांचे अर्ज आले. आश्रमात तर अगोदरचेच  ९८ मुले होती.  मी काय करणार ?  मी गुडघे टेकले. जेव्हा मी प्रार्थना करीत होतो. तेव्हा कोणीतरी मला एक चेक पाठविलेला, तो ७ पौंडचा  होता.

George-Mueller जॉर्ज-मुल्लर-बायोग्राफी
 

आम्हाला जेवढे पैसे पाहीजे होते त्यानुसार देव आम्हाला देत होता. एके रात्री अन्नसामग्री विकत घेण्यासाठी आम्हाला फक्त एक पेन्नीची गरज होती . देवाने ती गरज अदभूत रीत्या पुरवली ? आश्रमातील मुलगी तिची पेटी साफ करीत असताना एक पेन्नी त्यातून घरंगळत आली.

१५ फेबुवारी १८४२ हा फार कठीण दिवस होता. संध्याकाळच्या जेणासाठी एकही ब्रेड शिल्लक नव्हता. माझ्या घरात काहीच नव्हते ही फार मोठी परीक्षा होती. परंतु मला हे माहित होते की, प्रभु माझ्या गरजा योग्स समयाला पूर्ण करतो. तो मला सोडणार नाही. असे म्हणून मी स्वतःला दुसऱ्या कामात गुंतवुन घेतले. प्रभुने आम्हाला त्या दिवशी देखील पुरविले आणि पुढे नेले.१९ मार्चला दारिद्रयाने आम्हाला घेरले होते. तीन दिवसांत फक्त ७ सिलींगपेक्षा कमी पैसे मिळाले होते. कुठूनही सहाय्य मिळेल याची आशा उरला नव्हती. तो दिवस आश्रमातील कामगारांचा प्रार्थनेचा दिवस होता. आमच्या प्रार्थनेचे उत्तर मिळाले . बरोबर १०:३० वाजता 3 वेगवेगळे लोक आले. आणि २१ सीलिंग देवून गेले. त्यानंतर संध्याकाळची प्रार्थना होती त्या दिवशा ३ सीलिंग पाहीजे होते आणि संध्याकाळच्या सेवेपूर्वी आम्हाला चमत्कारिक रित्या ३ सीलिंग जास्त मिळाल्या होत्या.

सन १८४३ चा जून महिना होता. पुन्हा अन्न सामग्री नसल्याने असाहाय्य होतो. डिसेंबर पर्यत प्रत्येक दिवसाची गरज दिवसे दिवस भागवली जात होती. या वाईट दिवसांत मी धैर्याने आणखी एक जबाबदारी उचलली. हजारो अनाथांची भूक भागविण्यासाठी मी पूर्णपणे देवावर विसंबून होतो आणि त्याच्या सहाय्याने आणि आशिर्वादाने त्यांना भरवित होतो. देव आजही विश्वासू  आहे हे सिध्द करण्यासाठी ही अनाथालये अजून ही चालू आहेत.

जेव्हा आमच्या सेवेत विघ्न येते. देव त्याचे रूपांतर चांगल्या गोष्टीत करण्यास समर्थ असतो. ३१ ऑक्टोबर १८४५ मुल्लरला एक पत्र आले . विल्सन मार्गावरील जेथे ही अनाथालये होती तेथील एका व्यक्तिने हे पत्र पाठविले होते. त्यात असा मजकूर होता,“तुमच्या अनाथालयामुळे आम्हाला त्रास होतो. तेव्हा शक्य असल्यास तुम्ही दुसरीकडे स्थलांतर करावे.अनाथ मुलांना दररोज जेवण देणे हीच एक मोठी समस्या असतांना ही मुल्लरला एक दणका बसला होता. परंतू आपल्या विश्वासापासून यतकिंचीतही न घसरता, तो प्रेमळ प्रभूच्या पायाजवळ स्थिर राहिला.

पुढील १५ दिवस तो आणि त्याची पत्नी प्रभुची त्याबाबतीत प्रतिक्षा करीत होते. एक फार मोठी रक्कम व मोठया जागेची गरज होती. ९ डिसेंबर रोजी, ३० दिवसानंतर ही त्यांचा असा विश्वास होता की, देवबाप आमची सर्व गरज त्याच्या गौरवाने व विपुलपणे  पूर्ण करील. म्हणून ते धीराने त्याच्या परिपूर्ततेची वाट पहात होते. दुसऱ्याच दिवशी त्यांना १००० पौडांची दणगी मिळाली. आता त्यांची खात्री झाली होती की, देव त्याला इमारत बांधण्यासाठी मदत करत आहे.

जागा विकत घेतली होती. बांधकाम सुध्दा सुरू झाले आणि चमत्कारीकरित्या पर्ण झाले. जेव्हा त्यांनी हिशोब केला तेव्हा ७७६पौंड  शिल्लक दिसत होते. फार मोठी रक्कम मिळाली होती त्याचे श्रेय मुल्लरची अथक प्रार्थना आणि प्रयत्न. प्रयत्न; हे एक महान आश्चर्य होते.

१४ जानेवारी १८५१ मध्ये मुल्लरने नवीन संस्था सुरू करण्यासाठी प्रार्थना सुरू केली देवाचे वचन वाचत असतांना त्याची दृष्टी इब्री लोकांस पत्र ६ वा अध्यायातील १५ व्या वचनावर पडली, “ त्याने धीर धरिला, म्हणून त्याला अभिवचनानुसार लाभ झाला .या देवाच्या वचनाप्रमाणे त्याचवर्षी १२ नोव्हेंबरला दुसरे भव्य अनाथालय बांधण्यात आले. त्यानंतरची शिल्लक होती ती २३९२ पौंडस १२ मार्च १८६२ मध्ये तिसरे अनाथालय उभे राहिले ते पूर्ण झाल्यावर देखील त्यांच्याजवळ १०,३०९ पौंड शिल्लक होते.

मुल्लरने चौथे अनाथालय बांधायचे ठरविले. परंतू नुसता आश्रम नसून त्यामध्ये उन्हाळी प्रशिक्षण केंद्र सुध्दा उभारायचे होते अशा इमारतीच्या बांधकामासाठी जवळपास ५०,००० पौंडाची आवश्यकता होती, आणि वार्षिक खर्च धरला तर तो १,७५,००० पौंडस एवढा होत होता. त्याने विश्वासाने त्याकरिता प्रार्थना सुरू केली. एक महिन्यानंतरच त्याला २००० पौंडस मिळाले. पुढील वर्षाच्या जानेवारी महिन्यात त्याला २०,००० पौंड व ऑक्टोबर मध्ये ५००० पौंड आणि २७,००० पौंडस् ५ नोव्हेंबर १८६८ ला चौथे अनाथालय पूर्ण झालेले होते. १८७० मध्ये ५ वे अनाथालय पूर्ण होऊन अनाथ मुलांना प्रवेश देणे चालू झाले होते.

या पाच अनाथालयाचा दररोजचा खर्च हा देवाकडून दिला जाईल. येणाऱ्या वर्षांमध्ये खर्च वाढणार आहे परंतू परमेश्वर कधीच सोडून देणार नाही. हे कार्य जे १८३८ पासून १८४९ पर्यंत जवळपास १० वर्षे देवबापाने प्रत्येक दिवशी पुढे पुढे नेले होते. जॉर्ज मुल्लर साक्ष  देतात कि, त्याने  आम्हाला वेळोवेळी भरविले.

अतिशय श्रीमंत खजीनदार असलेला आमचा प्रभू आम्हाला पुढे नेत गेला. त्याने प्रत्येक वर्षी ४४,००० पौडस दिले. २१०० लोक जेवन व त्यांच्या इतर सर्व गरजासाठी आमच्यावर अवलंबून आहेत. आम्हाला एकूण १८९ मिशनऱ्यांना, १०० शाळासांठी, ९००० विद्यार्थ्यांकरता, ४०,००,००० हस्तपत्रिका करिता पैसे पाठवावे लागत. हा सर्व पुरवठा देव पुरवत होता .

प्रत्येक वर्षी देवाने आश्चर्यकारकरित्या पुढे नेल. दान फक्त पैशाच्या रूपातच नाही तर भाकरी, चपला व फळे याही स्वरूपात येत होते. जेव्हा त्याने अनाथ आश्रम सुरू केला होते . तेव्हा पहिले दान फक्त एक सिलींग होते व तेही एका मिशनऱ्याने पाठविले होते. त्या दिवसापासून तर शेवटपर्यंत जे मुल्लरने त्याच्या रोजनिशीत लिहिलेले आहे. पुष्कळांनी आपण विचार करू शकत नाही एवढया औदार्याने दिले. काहींनी तर त्यांची संपत्ती देखील मुल्लरच्या अनाथालयासाठी लिहून दिली. याप्रकारे प्रभूने मुल्लरच्या अनाथालयांचे पुष्कळ वर्षे पालन पोषण केले. या विश्वासाच्या नायकाने त्याची पृथ्वीवरील शर्यत १० मार्च १८९८ ला यशस्वीरित्या पूर्ण केली. तेव्हा तो ९३ वर्षाचा होता. 

अपणांसाठी विचार

त्याने देवावर विश्वास ठेवला व जग जिंकले. त्याने विश्वासाद्वारे महान गोष्टी केल्या त्याने पुष्कळ मुलांना शिकविले आणि प्रभुकडे आणले. जाजे मुल्लरने मिशन कार्यात स्वतःला समावून घेण्यासाठी पुष्कळ प्रकारच्या सेवा करून पाहिल्या परंतू देवाकडे त्याच्यासाठी एक योजना होती आणि ती त्याच्याद्वारे पूर्ण करायची होती आणि ती योजना होती अनाथांना एकत्र करून त्याना ख्रिस्ताकडे नेणे. याद्वारे पष्कळ मुलांनी प्रभूला त्यांचा वैयक्तिक तारणारा म्हणून जीवनात स्विकार केला. प्रियानो, तुमचा विश्वास कसा हा आहे ?  देवाकरिता ! आणि देवाची तूमच्या जीवनासाठी काय इच्छा आहे ! देवा करितां तुम्ही काय करू इच्छिता ?



कृपया, आपल्या प्रियजनानी वाचावे म्हणून पुढे पाठवा  धन्यवाद .....



Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url