Heaven in the bible स्वर्ग

स्वर्ग

 
heaven-in-the-bible
Heaven

 
प्रस्तावना

स्वर्ग हे काल्पनिक ठिकाण नाही. स्वर्ग वास्तविक असून सार्वकालिक आहे. स्वर्गामध्ये देवपिता राहतो. स्वर्गरोहणानंतर येशू तेथे गेला आणि जितक्यांनी येशूवर विश्वास ठेवला आहे ते सर्व तेथे असतील. देवानेच स्वर्गाची निर्मिती केली. आपल्या जीवनात कष्ट,दुःख असले तरी स्वर्गात गेल्यावर आपल्याला विश्राम मिळणार आहे. स्वर्गात देवदूत अहोरात्र देवाची स्तुती करण्यात मग्न आहेत.

१ स्वर्गाचा उगम

देवाने आरंभी स्वर्गाची निर्मिती केली. उत्पत्ती १:१- प्रारंभी देवाने आकाशे (Heavens - स्वर्ग) व पृथ्वी ही अस्तित्वात आणली (पं. रमाबाई). हे नेमके केव्हा केले किंवा किती वर्षांपूर्वी केले हे मानवासाठी रहस्यच ठेवण्यात आले आहे .स्वर्ग सर्वकाळासाठी असणार.

२ करिंथ.५:१  ....आमचे निवासस्थान स्वर्गात आहे. ते हातांनी बांधलेले गृह नसून सार्वकालिक आहे. स्वर्ग ही जागा तयार' लोकांसाठी (योहान.१४:२) तयार केली आहे.

२ स्वर्ग काय आहे ?

 स्वर्ग हे प्रभु परमेश्वराचे निवासस्थान आहे मत्तय.६:९ - हे आमच्या स्वर्गातील पित्या.

 २ करिंथ. १२:२ ह्या वचनात तिसऱ्या स्वर्गात उचलून नेलेल्या माणसाविषयी सांगितले आहे. पक्षी ज्या अंतराळात उडतात तो पहिला स्वर्ग आहे.

उपग्रह जेथे जातात तो दुसरा स्वर्ग.

 तिसरा स्वर्ग  म्हणजे देवाचे सिंहासन अथवा निवासस्थान होय.

.स्वर्गाला काय म्हटले आहे.

·        स्वर्ग इमारत आहे.  २ करिंथ.५:१ - कारण आम्हांला ठाऊक आहे की, आमचे पृथ्वीवरील मंडपरूपी गृह  मोडून टाकण्यात आले, तर देवाने आम्हांसाठी सिद्ध करून ठेवलेले आमचे निवासस्थान स्वर्गात आहे. ते हातांनी बांधलेले गृह नसून सार्वकालिक आहे. स्वर्ग ही देवाची इमारत आहे. ती मानवाने बनवलेली नाही (२ करिंथ.५:१).

·        स्वर्गाला कोठार म्हणतात.  मत्तय.३:१२ - ...आपले गहू कोठारात साठवील. गहू व भूस यांची विभागणी होऊन भूस जाळल्यानंतर हे घडेल (उत्तम ते स्वर्गात जाते).

·        स्वर्गाला देवाचे व ख्रिस्ताचे राज्य म्हटले आहे . इफिस.५:५ - जारकर्मी,अशुद्ध कृती करणारा किंवा लोभी,हा मूर्तिपूजक आहे; असल्या कोणासही ख्रिस्ताच्या व देवाच्या राज्यात वारसा नाही.

·        स्वर्गाला पित्याचे घर म्हटले आहे .  योहान.१४:२ - माझ्या पित्याच्या घरात राहाण्याच्या जागा पुष्कळ आहेत,नसत्या तर मी तुम्हाला सांगितले असते,मी तुम्हासाठी जागा तयार करावयास जातो.  

·        स्वर्गाला विसाव्याची जागा म्हटले आहे.  इब्री.४:९ - म्हणून देवाच्या लोकांसाठी शब्बाथाचा विसावा राहिला आहे.

·        स्वर्गाला सुखलोक म्हटले आहे.  २ करिंथ.१२:४ - त्याच मनुष्याविषयी मला माहीत आहे की, त्या मनुष्याला सुखलोकांत उचलून नेण्यात आले.

सुखलोक हा स्वर्गाचा असा एक भाग आहे जेथे जगाच्या उत्पत्तीपासून - आजपर्यंत मेलेले सर्व नीतिमान आत्म्यांचा वास्तव्य आहे. ह्यापुढेहिजो पर्यंत प्रभू येशूचे दुसरे येणे होत नाही तोपर्यंतसर्व नीतिमान आत्मे हे सुखलोकांत सामील होतील. ते तिथे चीर विसाव्यात आहेत आणि ते प्रभू येशूच्या दुसऱ्या येण्याची वाट पाहत आहेत.

 

 स्वर्गाची वैशिष्ट्ये
Jesus-and-His-bride
Jesus and His bride

·        स्वर्ग उच्चस्थानी आहे. यशया ५७:१५ - मी उच्च व पवित्र स्थानी वसतो.

·        स्वर्ग पवित्र ठिकाण आहे  . स्तोत्र.२०:६- तो...आपल्या पवित्र स्वर्गातून त्याचे ऐकेल.

·        स्वर्ग आनंदाचे ठिकाण आहे . प्रकटी.७:१७ - देव त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील.

·         स्वर्गात मरण, शोक, रडणे, कष्ट नाहीत . प्रकटी. २१:४ - ह्यापुढे मरण नाही, शोक, रडणे, कष्ट ही नाहीत, कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या.

·        स्वर्गात रात्र किंवा काळोख नाही .  प्रकटी. २२:३ ते ५ - पुढे रात्र असणार नाही आणि त्यांस दिव्याच्या अथवा सूर्याच्या प्रकाशाची गरज नाही; कारण प्रभुदेव त्याच्यावर प्रकाश पाडील.

·        स्वर्गात भूक व तहान लागणार नाही किंवा उष्णता असणार नाही.  प्रकटी.७:१६ - ह्यापुढे ते भुकेले होणार नाहीत व तान्हेलेही होणार नाहीत. त्यांस सूर्य किंवा कोणतीही उष्णता बाधणार नाही.


 स्वर्गाचे रहिवासी 

Crown-of-Righteousness
Crown of Righteousness

१. होकारात्मक

·        देवपिता तेथे राहतो  . मत्तय.६:९ - हे आमच्या स्वर्गातील पित्या ...

·        स्वर्गरोहणानंतर येशू तेथे गेला  प्रेषित.३:२१ - सर्व गोष्टी पूर्वस्थितीला पोहचण्याच्या ज्या काळाविषयी देवाने आरंभापासून आपल्या पवित्र संदेष्ट्यांच्या मुखाने सांगितले त्या काळापर्यंत येशला स्वार्गात राहणे प्राप्त आहे.

·        देवदुत, अगणित जीव तेथे असतील.  मत्तय.१८:१० ....... स्वर्गात त्यांचे दिव्यदूत माझ्या स्वर्गातील पित्याचे मुख नित्य पाहतात.

·        देवाने नेलेले हनोख व एलीया तेथे असतील.  उत्पत्ती ५:२४ - हनोख देवाबरोबर चालला, त्यानंतर तो नव्हता; कारण देवाने त्याला नेले.

मत्तय.१७:३ - तेव्हा पाहा, ... एलीया हे त्याच्याबरोबर संभाषण करीत असलेले त्याच्या दृष्टीस पडले.

·        येशूवर विश्वास ठेवणाऱ्या व्यक्ती मरण पावल्या त्या तेथे असतील .  १ थेस्सल.४:१४ - येशूच्या द्वारे जे झोपी गेले आहेत त्यांना देव त्याच्याबरोबर आणील. ज्याला देवाने परले तो मोशे तेथे असेल.

मत्तय. १७:३ - तेव्हा पाहा मोशे ...हे त्याच्याबरोबर संभाषण करीत असलेले त्यांच्या दृष्टीस पडले.

२. नकारात्मक

Day of the Lord


·        सैतानाचा तेथे कधीही प्रवेश होणार नाही. प्रकटी. २०:१० - त्यांस ठकविणाऱ्या सैतानाला अग्नीच्या व गंधकाच्या सरोवरात टाकण्यात आले. त्यात ते श्वापद व तो खोटा संदेष्टा आहे; तेथे त्यांस रात्रंदिवस युगानुयुग पीडा भोगावी लागेल.

·        चोरांचा तेथे कधीही प्रवेश होणार नाही.  लूक.१२:३३ - जे तुमचे आहे ते विकून दानधर्म करा; तसेच स्वर्गातील अक्षय धनाच्या जाण न होणाऱ्या थैल्या आपणांसाठी करून ठेवा; तेथे चोर येत नाही व कसर लागत नाही.

प्रकटी.२१:८ - परंतु भेकड.विश्वास न ठेवणारे, अमंगळ,खून करणारे,जारकर्मी, चेटकी, भूतपूजक व सर्व लबाड माणसे ह्यांच्या वाट्यास अग्नीचे व गंधकाचे सरोवर येईल.

·        देहाच्या सतरा फळांचा परिपूर्ण स्वर्गात कधीच प्रवेश होणार नाही.  गलती.५:१९ ते २१ - देहाची कर्मे तर उघड आहेत; ती ही : जारकर्म, अशुद्धपणा, मारपणा, मूर्तिपूजा, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, स्ट, फुटी, पक्षभेद ... अशी कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही.

 

 स्वर्ग परिपूर्ण ठिकाण आहे.

feast-of-the-lamb
feast-of-the-lamb

१. परिपूर्ण समाधानाचे ठिकाण  परिपूर्ण व विपुल समाधानाचे ते चित्र आहे.

प्रकटी.२२:१, ...जीवनाच्या पाण्याची स्फटिकासारखी नितळ नदी मला दाखविला. नदीच्या दोन्ही बाजूस बारा जातींची फळे देणारे जीवनाचे झाड होते.

२. ते परिपूर्ण तरतूदीचे ठिकाण आहे.

सर्वकाही उत्तम व गौरवाने पुरविलेले. प्रकटी.२२:२..... ...त्या झाडाची पाने राष्ट्रांच्या आरोग्यासाठी उपयोगी पडतात.

३. तेथे पापाचा लवलेशही नसेल . प्रकटी.२२:३........ पुढे काहीही शापित असणार नाही.

एदेन बागेतील मानवावरचा शाप कायमचा दूर करण्यात आला.

४. ते परिपूर्ण सत्तेचे ठिकाण आहे.  २२:३ . तिच्यामध्ये देवाचे व कोकऱ्याचे राजासन असेल. तेथे देवाचा. नीतिमान देवाचाच आणि कोकऱ्याचा अधिकार असेल.

५. ते परिपूर्ण सेवेचे ठिकाण आहे . प्रकटी.२२:३.......त्याचे दास त्याची सेवा करतील.

६. ते परिपूर्ण सहभागितेचे ठिकाण आहे .  प्रकटौ.२२:४  .....ते त्याचे मुख पाहतील.

७. त्या ठिकाणी देवाचे पूर्ण नियंत्रण असेल . आमच्यावर केवळ देवाचीच मालकी असेल. प्रकटी.२२:४- त्याचे नाव त्यांच्या कपाळावर असेल.

आमची दुहेरी निष्ठा नसणार. आम्ही देवाशी एकनिष्ठ असू. तेथे सर्व काही त्याचेच असेल.

 ८. ते परिपूर्ण गौरवाचे ठिकाण आहे .  तेथे कृत्रीम प्रकाश नसेल.ते युगानुयुग राज्य करतील. प्रकटी.२२:५-...त्यांस दिव्याच्या अथवा सूर्याच्या प्रकाशाची गरज नाही. कारण प्रभु देव त्याच्यावर प्रकाश टाकील आणि ते युगानुयुग राज्य करतील.

 

सारांश

·        आम्ही स्वर्गात जायला तयार' असावे.

·        आम्ही आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या विश्वासापासून कधी ढळू नये.

·        आपल्या जीवनात कष्ट शोक वगैरे असला तरी स्वर्गात आपल्याला विश्राम मिळणार यासाठी देवाची स्तुती करावी.

·        स्वर्ग'तयार' असलेल्या लोकांसाठी आहे.

·        स्वर्गाच्या पवित्रतेमुळे अविश्वासू व्यक्तीला स्वर्गात आवडणार नाही.

·        स्वर्ग आनंदाचे ठिकाण आहे.

 

 

Next Post Previous Post
1 Comments
  • Np
    Np ३ ऑगस्ट, २०२० रोजी ७:१७ AM

    Praise the lord pastor.
    Marriage is a very important thing in human life. blog content is very good, Thanks pastor for choosing this topic,this topic very important for our youth,so keep writing in God bless.

Add Comment
comment url