Brother Bakht Singh biography in Marathi
ब्रदर भक्तसिंग
Brother Bakht Singh biography in Marathi
परिचय
भक्तसिंग चाब्रा १९०३-२००० यांना भारतात व दक्षिण आशियाच्या भागात सुवार्तीक म्हणून ओळखले जायचे. ते एक बायबल शिक्षक, वक्ते म्हणून भारतीय चर्चमध्ये नावाजलेले होते. त्यांना २१ व्या शतकातील भारतीय एलिया म्हटले गेले. ते कॅनडात इंजिनिअरींग शिकत असताना त्याना प्रभु येशुच्या उपस्थितीचा अनुभव आला. जरी त्यांनी सुरूवातीला त्यांच्या जीवनामध्ये बायबल फाडले होते, ख्रिश्चन लोकांचे विरोधक होते, तरी त्यांना येशुबद्दल प्रेम निर्माण झाले आणि बायबल शिकण्याची त्यांनी इच्छा दर्शविली. प्रभुचा आवाज ऐकल्यानंतर व पापाची जाणीव झाल्यावर पापाची कबुली देऊन त्यांनी ख्रिस्ताला वैयक्तीक तारणारा म्हणून स्विकारले व स्वत:चे जीवन ख्रिस्ताला समर्पित केले. ते सर्वात पहिले भारताचे सुवातीक, प्राचारक आणि नवीन तत्वाच्यानुसार मंडळी रोपन करणारे सेवक होते. त्यांनी भारतातून जगभर मंडळी रोपनाचे कार्य सुरू केले. १०००० पेक्षाही अधिक मंडळ्या त्यांच्याकडून रोपन केल्या गेल्या.
बख्त सिंग आणि त्याचा परिवार Bakht Singh family
बख्त सिंग यांचा जन्म ६ जून १९०३ साली सरगोधा जिल्ह्यातील जोया गावात,पंजाब मध्ये श्री लाल जवाहर मल आणि श्रीमती. लक्ष्मीबाई या धार्मीक शिख कुटूंबात झाला. शिख म्हणून तो वाढला . त्यांचा विवाह वयाच्या १२ व्या वर्षी ६ जून १९१५ रोजी रमाबाईशी झाला त्यांचे शिक्षण मिशनरी शाळेत झाले. परंतू ते कधीच ख्रिश्चन लोकांद्वारे प्रभावीत झाले नाही. उलट त्यांनी ख्रिश्चन लोकांचा तिरस्कार केला. शिख मंदीराच्या द्वारे तो नेहमी सामाजीक कार्यात सक्रीय असायचा. पंजाब युनिवर्सीटीतुन उत्तीर्ण झाल्यानंतर तो अॅग्रीकल्चरच्या शिक्षणासाठी १९२६ मध्ये इंग्लंडला गेला. त्याच्या आई-वडीलांचा त्याला इंग्लंडला जाण्याविषयी विरोध होता. त्यांना भिती होती की, हा ख्रिश्चन लोकांच्या संगतीने तो ख्रिस्ती होईल. परंतु भक्तसिंगाने खात्री दिली की, तो केव्हाही स्वत:चे धर्मांतर होऊ देणार नाही.
इंग्लंड व कॅनडातील जीवन :
इंग्लंड मध्ये तो स्वतंत्र जीवन जगू लागला आणि तेथील जीवनशैलीचा त्याने अवलंब केला. सिगारेट पीणे, धुम्रपान करणे, दारू करणे, युरोपमध्ये फिरणे आणि सर्व प्रकारच्या मौजेच्या गोष्टींमध्ये तो रमून गेला. त्याने सर्व लांब दाढी काढून टाकली जो शिख धर्माची खुण होती. वर्षानंतर तो लंडनला गेला १९२९ मध्ये तो कॅनडात युनिवर्सीटी ऑफ मॅनीटोबा मध्ये अॅग्रीकल्चर इंजिनिअरींगचे तो शिक्षण घेऊ लागला. तेथे त्याला जॉन इडीत हेवॉर्ड हे स्थानिक मित्र त्याला भेटले. ते धार्मीक ख्रिस्ती होते. त्यांनी भक्तसिंग यांना त्यांच्याबरोबर राहण्यासाठी बोलाविले. ते दररोज रात्रीच्या जेवणानंतर बायबल वाचन करीत व भक्तसिंगला सुध्दा त्यांनी बायबल भेट दिले. त्याला त्यांची मैत्री आवडली व त्यांच्याबरोबर तो चर्चमध्येही जाऊ लागला. तसेच तो बायबल वाचु लागला. काही दिवसांनी त्याला वचन समजल्यावर भक्तसिंगानी येशुचा वैयक्तीक तारणारा म्हणून स्विकार केला आणि ४ फेब्रुवारी १९३२ मधील कॅनडामधील व्हॅनकव्हर मध्ये त्याने बापतिस्मा घेतला.
पाचारण :
तो इंग्लंड मध्ये असतांना १९२९ साली त्याने अदभूतरित्या येशूचा स्विकार केला. १९३३ मध्ये स्पष्ट पाचारणाद्वारे तो पुन्हा भारतात त्याच्या लोकांकडे तो आला. व मुंबईत आई-वडीलांना भेटला. त्यांना त्याच्या परिवर्तनाची बातमी पत्राद्वारे आधीच कळालेली होती. त्यांनी त्याचा स्विकार केला परंतु विनंती केली की, आपल्या परिवाराच्या अभिमानाखातर तुझ्या परिवर्तनाची माहिती तु गुप्त ठेवावी. परंतु त्याने विनंती नाकारल्यावर ते त्याला तेथेच सोडून गेले व अचानक त्याला बेघर व्हावे लागले.
भारतातील सेवाकार्य
त्यानंतर तो मुंबईच्या रस्त्यावर सुवार्ता सांगु लागला. या काळात भक्तसिंगाला कठीण समस्या व परिक्षामधून जावे लागले. परंतु परमेश्वराने त्या सर्वातून त्याचे पालनपोषण केले. तो सर्व गरजांसाठी प्रभुवर अवलंबून राहीला. त्याने देवाच्या आज्ञेला प्रथम स्थान दिले.
मोठी गर्दी त्याच्याकडे आकर्षित झाली. भारतातील वसाहतीमध्ये तो फिरून सुवार्ता सांगु लागला. या त्याच्या भुमिकेमुळे १९३७ मध्ये चर्च इतिहासात मोठे संजीवन आले. त्याच्या लुक २५:५ मधील जीवांताचा शोध मेलेल्या मध्ये का करता ? या संदेशामधून सर्व आलेला सेवकवर्ग प्रभावित झाला. लवकरच भक्तीसिंगाच नाव पर्ण भारतात प्रोटेस्टेंट ख्रिस्ती लोकांच्या मुखात बसले. त्याची असाधारण जीवनशैली आणि सेवेची बातमा मासिक व बातमी पत्राद्वारे संपूर्ण जगात पोहोचली. त्या काळी तो भारतातील तरूण सेवक होता. एकाच महिन्यात त्याला संपूर्ण भारतातून ४०० पेक्षा अधिक आमंत्रणे मिळाली. १९३८ मध्ये तो मद्रास, केरला आणि इतर दक्षिण भारतात त्याने सुवार्ता सांगितली. त्यांच्या सेवेद्वारे हजारो लोक ख्रिस्ताकडे वळाले. दीर्घ आजार त्यांच्या प्राथनेद्वारे बरे झाले.
१९४१ मध्ये रात्रभर प्रार्थना केल्यानंतर नवीन कराराच्या तत्वानुसार त्याने प्रार्थना सुरू केल्या. १९४१ मध्ये चैन्नईत लेवीय २३ नुसार पवित्र प्रार्थना सभा भरविली. यानंतर प्रत्येक वर्षी मद्रास, हैद्राबाद, दक्षिण भाग, अहमदाबाद आणि उत्तरेस कालिसपाग मध्ये अशाप्रकारच्या सभा त्यांनी घेतल्या. हैद्राबाद मध्ये नेहमीच २५००० लोक सहभागी होत. यात ते जेवणाची, झोपण्याची व राहण्याची सोय करीत. यासाठी ते मोठा टेन्ट उभारी. शिक्षण व प्रार्थना रात्री उशिरापर्यंत चाले. याचा सर्व खर्च स्वयं सेवकाच्या अर्पण व दानार्पणद्वारे पुरविला जात.
सेवेत जाण्यापूर्वी परमेश्वराने त्याच्या समोर ३ अटी ठेवल्या.
१] कोणत्याही संस्थेशी संलग्न रहायचे नाही. - सर्वांची समानतेने सेवा करायची.
२] स्वत:च्या योजना बनवु नको. - मी तुला प्रत्येक पाऊली तुझे मार्गदर्शन करील.
३] तु तुझी कोणतीही गरज मनुष्यासमोर ठेवायची नाही. - केवळ मला मागायचे मी पुरवठा करील.
बदर भक्तसिंगने मद्रासमध्ये यहोवाशाम्मा चर्च चालू केले :
मंडळ्या आत्मीकतेत थंड झालेल्या होत्या. त्यात पुन्हा संजीवन आणण्यासाठी जो मंडळीचा मस्तक येशुने भक्तसिंग या पात्राची संजीवन आणण्यासाठी निवड केली. आणि मंडळ्या आत्मीकतेमध्ये अधिक वाढल्या. भक्तसिंगाने यासाठी प्रार्थना उपासाद्वारे प्रभुचे मार्गदर्शनावर भाग घेतले. प्रभुने त्याच्या सह सेवकांना प्रेषितांचे कृत्य २:४२ च्या तत्वावर स्थानिक मंडळी स्थापण्यास मार्गदर्शन केले.
सेवेचे केंद्र मद्रासकडून हैद्राबाद मध्ये स्थापित केले :
भक्तसिंग आणि त्याचे सहकारी २५ सप्टेंबर १९५० रोजी हैद्राबादमध्ये आले आणि परमेश्वराने मंडळी रोपनासाठी नवीन सुविधा पुरविल्या. त्याने तेथील ठिकाणाला हेब्रॉन नाव दिले. १९५० ते १९७० काळात स्थापित झालेल्या मंडळ्या ह्या सर्वात वेगाने वाढणा-या मंडळ्या होत्या. १९४६ साली भक्तसिंग सेवेसाठी भारताच्या बाहेर पडला. परमेश्वराने त्याचा युरोप, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, आफ्रीका या भागात चांगला उपयोग करून घेतला.
भक्तसिंग चाब्रा मृत्यू Death of Bhakt Singh
भक्तसिंग चाब्रा हे १७ सप्टेंबर २००० मध्ये ते हैद्राबाद या ठिकाणी ख्रिस्तवासी झाले. आणि त्यांना नारायणगुडा येथे ख्रिस्ती स्मशानभूमीत मुठ-माती देण्यात आली. त्यांच्या अत्यंसंस्कार यात्रेमध्ये अडीच लाख लोक सहभागी होते.
अंत्य यात्रा मिरवणूक Funeral procession of Bhakt Singh
शुक्रवार दिनांक २२, सप्टेंबर २००० रोजी संपूर्ण हैद्राबाद शहर उभे होते. फर्मान कंपाऊंड, सर्व रस्ते, मुख्य रस्ते [चिकादापाली], गोलकोंडा क्रॉस रोड ते नारायण गुडा कब्रस्तान हे संताच्या समुद्राप्रमाणे दिसत होते. जवळ-जवळ अडीच लाख लोकांनी ते भरलेले होते. लोकांना आवरणे पोलीसांना अशक्य झाले होते. ३ किलोमीटरचे अंतर कब्रस्तान पर्यंत पोहोचण्यासाठी ३ तास लागले. ही अंत्य यात्रा सुवार्ता सभामध्ये परावर्तीत झाली. प्रत्येकाच्या हातात बायबल, वचनाचे बॅनर, देवाची स्तुती स्तवन करीत चालले होते. ज्याने ७० वर्षे विश्वासूपणे सेवा केली त्याने त्याच्या खातर ही ख्रिस्ताच्या विजयाचा पुरावाच होता. त्यांच्या अत्यंयात्रा मिरवणूक विशेष होती. मृत्यूच्या पूर्वी हैद्राबादच्या आसपास भुकंपाचे धक्के बसले. आवेळी विजांचा गड-गडाट झाला. व थोड्यावेळासाठी सर्व परिसर अंधकार झाला. शुक्रवार २२ सप्टेंबर २००० हेब्रॉन मधुन प्रेत नेत असतांना सुर्य एकदम प्रखर झाला. मेघ धनुष्य सुर्याभोवती थोड्यावेळासाठी पसरला. ते एका मुकूटाप्रमाणे दिसत होते. मग अचानक कब्रस्तानामध्ये कबुतरे घिरट्या मारू लागले.
भक्तसिंग चाब्रा यांनी ख्रिस्तासाठी जीवन खर्ची केले :
१) एक गव्हाचा दाणा होता जो जमीनीत पडून मरू इच्छित होता.
२) प्रभुच्या मार्गाचे त्याने अवलंबन केले.
३) स्वत:पेक्षाही प्रभुवर सर्वात अधिक प्रेम केले.
४) आनंदाने धाव संपविली.
५) सेवा पूर्ण केली. जो प्रभुने दिलेला दृष्टांत होता.
६) स्वत:चे जीवन जगण्याद्वारे प्रभुचे प्रेम व कृपा प्रकट केली.
सेवेचे रहस्य : Bakht Singh prayer life
परमेश्वराने त्याचा उपयोग निवडलेल्या पात्राप्रमाणे जगातील अनेकांचे आत्मीक जीवन बनविण्यासाठी करून घेतला. त्याने ख्रिस्ताची आणि मंडळीचा दृष्टांत याची सेवा केली.
पुष्कळांनी त्याच्या सेवेचे रहस्य जाणून घेण्याची इच्छा दर्शविली. त्यापैकी काही पुढीलप्रमाणे .
१] तो पुर्णपणे देवावर विसंबून होता.
२] बायबल हे देवाचे वचन आहे आणि त्यानुसारच प्रत्येक विश्वासणा-यास त्याने प्रोत्साहीत केले आणि प्रत्येकाला स्वत:चे बायबल पाहीजे व त्यावरच विसंबून पाहिजे.
३] त्यांना बायबलचा सखोल अभ्यास होता. क्षणात ते बायबलचे प्रत्येक वचनाचे उत्तर देत. अनेक वेळेस ते तासनतास त्यांनी गुडघ्यावर येवून बायबलचे वाचन व मनन केले. तेव्हा पवित्र आत्म्याने त्यांना बायबल मधील महान गुजगोष्टी प्रकट केल्या.
४] नेहमीच कोणत्याही परिस्थितीत देवाचीच इच्छा पुर्ण केली.
५] त्यांना देवाबद्दल आणि आत्मे जिंकण्याबद्दल तळमळ होती.
६] बायबल नुसार आत्म्याने व ख-याने त्यांनी स्वत: व इतरांनाही बायबलची आज्ञा पालन करण्यास शिकविले.
७] प्रितीच्या मेजवाणीची सहभागीता त्यांनी दिली.
८] वार्षिक महासभा - प्रथम पवित्र महासभा मद्रासमध्ये यहोवाशाम्मा डिसेंबर १९४१ मध्ये घेण्यात आली जी १९ दिवस चालली. ही महासभा भक्त सिंगाच्या सेवेचे रहस्य होते.
९] विश्वासी जीवन :- ब्रदर भक्तसिंग हे विश्वासाचे भक्त होते. परमेश्वराने त्याच्या विश्वासाचा आदर केला आणि त्याच्या संपर्ण आयुष्यभर त्यांची प्रत्येक गरज भागविली.
१०] सुवार्ता फेरी :- ज्या-ज्या ठिकाणा ते गेले त्या ठिकाणी ते सुवार्तेद्वारे शहराला त्यांनी ख्रिस्तासाठी उलथा-पालट केली.
११] प्रार्थनाशिल जीवन :- ब्रदर भक्तसिंग हे प्रार्थनायोध्दा होते. त्यांनी तासनतास प्रभूबरोबर प्रभूची इच्छा जाणण्यात घालविली. हे त्यांचे सेवा वाढण्याचे मोठे कारण आहे.
Please share and comment ....