Suicide आत्महत्या


Suicide आत्महत्या

आत्महत्या म्हणजे काय ?

सुसाइड किंवा आत्महत्या म्हणजे स्वतःच स्वतःच्या जीवाचा अंत घडवून आणणे होय . बऱ्याचशा आत्महत्यामागे दुःखद कारण असते , आणि ते म्हणजे  मनात दुखावलेल्या तीव्र निराशेच्या खोल भावना. या लोकांना असे वाटते की, त्यांच्या जीवनात निर्माण झालेली समस्या किंवा आव्हानांना ते सामोरे जाऊ शकणार नाहीत किंवा त्या समस्यांवर उपाय नाहीत. आशा वेळी लोक आत्महत्या करणे हाच एकमेव उपाय असल्याचे मानून असे कृत्य करण्यास प्रवृत्त होतात. पण ही समस्या खरोखरच तात्पुरती असते. 

suicide
Suicide

जगभरात दरवर्षी सुमारे ८००,००० लोक आत्महत्या करतात. २०२१ मध्ये १६४,०३३ भारतीयांनी आत्महत्या केल्या आणि राष्ट्रीय आत्महत्येचा दर हा १२ प्रति १ लाख होता. जे सर्वात पहिले नोंदवलेले वर्ष १९६७ पासून आत्महत्यांचा सर्वाधिक दर आहे .त्याचप्रमाणे आत्महत्या हे भारतात १५ ते ३९ वर्षे वयोगटातील मृत्यूचे सर्वात सामान्य कारणे असल्याचे आढळून आले आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते, भारतात आत्महत्या ही एक उदयोन्मुख आणि गंभीर सार्वजनिक आरोग्य समस्या आहे.   

पवित्रशास्र आत्महत्याविषयी काय सांगते ? What does the Bible say about suicide?

बायबल हे आत्महत्येला खून करण्यासमानच मानते. आत्महत्या करणे म्हणजे स्वताचा खून करणे होय [ निर्गम २०;१३ खून करू नकोस.] . माणसाचा मृत्यू कधी आणि कसा व्हायचा हे फक्त देवच ठरवतो. आपण केवळ स्तोत्र ३१:१५ प्रमाणे म्हणावायस हवे की, “माझी वेळ तुझ्या हाती आहे.

काही लोक शौक किंवा व्यसन म्हणून अमली पदार्थ सेवन करतात. हे देखील आत्महत्याच प्रकार होय. कारण सर्व प्रकारचे नशेली पदार्थाचा अंतिम परिणाम माहित असताना देखील बेपर्वाईने ते खाऊन स्वता;वर अकाली मृत्यू ओढावून घेतात.व्यसन केल्यामुळे आयुष्य कमी होते,आजार जडतो . हे धिटाईने केलेले पाप आहे [स्तोत्र१९;१३] .

जीवन देणारा देव आहे, आणि तो देण्याचा व घेण्याचाही अधिकारही केवळ देवाचाच आहे [ ईयोब१:२१]. स्वताचा जीव घेणे हे अधार्मिक आहे. कारण देवाने दिलेली जीवनाची देणगीला तुच्छ लेखने म्हणजे देवाला चुकीचे ठरवून सैतानास आपल्या जीवनात अधिकार देणे होय. कोणत्याही पुरुषाने किंवा स्त्रीने स्वतःचे जीवन संपवण्यासाठी देवाचा अधिकार हिसकावून घेण्याचा प्रयत्न करू नये. हे सैतानी कृत्य आहे. सैतानाचे भक्षक होऊ नका. लक्षात ठेवा आपला शत्रू सैतान हा सुरुवातीपासूनच मनुष्यघातकी आहे  [योहान ८:४४,१०;१०].

आत्महत्येचे कारणे   Causes Of Suicide

  • आत्महत्येचेमागे विविध कारणे सांगितले जाते जसे कि, 
  • विविध कारणाने  आलेले नैराश्य 
  • कौटुंबिक तणाव  
  • आर्थिक तणाव 
  • अपयश 
  •  वैयक्तिक नातेसंबंधांतील समस्या इ. 

 शेतकरी आत्महत्या;

शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास भाग पडण्यास कारण म्हणजे सामान्यतः सोयी सुविधा नसणे, शेतीतून पुरेसा मोबदला न मिळणे  तसेच पूर आणि दुष्काळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतात अपयश.  यामुळे त्यांना गरीब परिस्थितीत राहावे लागते आणि सरकारकडून त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ते आपला स्वतःच विकास करू शकत नाहीत.
आत्महत्येचे मुख्य कारण म्हणजे स्वताच्या जीवनावर शाप कबूल करणे . बायबल सांगते "जिव्हेच्या हाती मृत्यू व जीवन ही आहेत; तिची आवड धरणारे तिचे फळ भोगतात [नीती१८;२१]".  वैयक्तिक नातेसंबंधांतील समस्या किंवा उदासीनता या कारणामुळे मनुष्य स्वताच्या जीवनात मृत्यूचा शाप बोलतात. काहीजण कौटुंबिक वाद होत असताना आत्महत्या करण्याची धमकी देतात. दीर्घ आजारपणास कंटाळून देखील स्वतःवर मृत्यूचा शाप बोलतात .परिणामी प्रसंगानुसार सैतान मुखाने बोलल्या शब्दाला घेऊन त्या जीवाची शिकार करतो. विशेषत; ज्या लोकांनी पूर्वी आत्महत्याचा प्रयत्न केलेला असतो त्या लोकाना आत्महत्याचा धोका अधिक असतो. 

suicide
Causes Of Suicide

देवाच्या लोकांनो, जर तुमच्याकडून कधीकाळी अशाप्रकारचा शाप अथवा प्रयत्न  कळत-नकळत केला गेला असेल तर त्वरित देवाला क्षमा मागून  असले शब्द येशूच्या नावात रद्द करा. 

तर तू आपल्या तोंडच्या वचनांना गुंतला आहेस; तू आपल्या तोंडच्या शब्दांनी बद्ध झाला आहेस. ह्यासाठी माझ्या मुला, तू असे कर की आपल्याला मुक्त करून घे ”. [ नीती ६;२,३ ]

धार्मिक आणि अधार्मिक असे कोणासही निराशेचा संघर्ष करावा लागू शकतो. पवित्र शास्त्रात आपण पाहातो की काही लोकांच्या जीवनात तीव्र नैराश्य आले. परंतु त्यांनी स्वताला देवाच्या हातात सोपवले.

  • शलमोन, सुखाच्या शोधात, त्याने जीवनाचा तिरस्कार केला [उपदेशक २:१७].
  • एलीया भयभीत आणि उदास होता आणि मृत्यूची इच्छा केली [१ राजे १९:].
  • योना देवावर इतका रागावला होता की त्याला मरण्याची इच्छा केली  [योना ४:].

परंतु आपणास पहाण्यास मिळते की, यापैकी कोणीही आत्महत्या केलेली नाही. तर शलमोन हा देवाची भीती बाळगणे आणि त्याच्या आज्ञा पाळणे शिकला [उपदेशक १२:१३]. एलीयाला एका देवदूताने सांत्वन दिले, त्याला विश्रांती करण्यास सांगितले आणि एक नवीन काम दिले. योनाला देवाने धमाकावून सूचना केली. पौल शिकला की, त्याच्यावर आलेली समस्या ही सहनशक्तीच्या पलीकडे होती. तरी, प्रभू या सर्वातून सोडवतो.

या उदाहरणावरून आपण हे शिकावे  की , आपण स्वतःवर अवलंबून न राहाता , तर जो मेलेल्यांना जिवंत करतो त्या देवावर अवलंबून राहावे” [२ करिंथकर १:९].

World Suicide Prevention Day जागतिक आत्महत्या प्रतिबंध  

दरवर्षी 10 सप्टेंबर रोजी 'वर्ल्ड सुसाइड प्रिवेंशन डे' (जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन) साजरा केला जातो. , हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश आहे म्हणजे लोकांना आत्महत्या रोखण्यासाठी जागरूक करणे होय.

आत्महत्याचा परिणाम

बायबलनुसार आत्महत्या हे देवासमोर एक गंभीर पाप आहे . विश्वसनार्याना त्यांचे जीवन देवासाठी जगण्यासाठी पाचारण केले आहे. आत्महत्यासाठी नव्हे .देवाच्या दृष्टीने आत्महत्या हे घोर पातक आहे [उपदेशक ७;१७ – “दुष्टतेचा अतिरेक करू नकोस; मूर्ख होऊ नकोस; तू अकाली का मरावे ?”] .  एखाद्या व्यक्तीने आत्महत्या केल्याने गतगोष्टी बदलत नाहीत . परंतु, मागे राहिलेल्या प्रियजनावर आत्महत्येचा निश्चितपणे खोल प्रभाव पडतो त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. परीक्षेतून जाणाऱ्या प्रत्येक त्याच्या विश्वासू लेकराला तो त्याची कृपा देतो [स्तोत्र ६७:१]. आणि आपल्यापैकी प्रत्येकाने या वचनावर आशा बाळगावी, “ जो कोणी प्रभूचे नाव घेऊन त्याचा धावा करतो त्याचे तारण होईल” [रोम १०:१३].

 स्तोत्रकर्ता म्हणतो - आज ज्यांना परीक्षांचा सामना करावा लागत आहे त्यांना देव कृपा आणि दृष्टीकोन देईल:हे माझ्या जिवा, तू का खिन्न झालास? तू आतल्या आत का तळमळत आहेस? देवाची आशा धर; तो माझा देव मला दर्शन देऊन माझा उद्धार करतो, म्हणून मी पुनरपि त्याचे गुणगान गाईन.” [स्तोत्र ४३:].

आत्महत्या का करू नये

sucide

  • तुम्ही देवाचे मंदिर आहात. - १करिंथ ३;१६,१७ - तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुमच्यामध्ये देवाचा आत्मा वास करतो हे तुम्हांला ठाऊक नाही काय?  जर कोणी देवाच्या मंदिराचा नाश करतो तर देव त्याचा नाश करील; कारण देवाचे मंदिर पवित्र आहे, तेच तुम्ही आहात.
  • आत्महत्या केल्यानंतर पश्चातापाची संधीच उरत नाही .-  आत्महत्या केल्यानंतर त्यासाठी केलेला पश्चाताप उपयोग नाही [ लुक १६;२४].  
  • तुम्ही स्वतःचे मालक नाही. - १करिंथ ३;१९,२० -  तुमचे शरीर, तुमच्यामध्ये वसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हांला मिळाला आहे त्याचे मंदिर आहे हे तुम्हांला ठाऊक नाही काय? आणि तुम्ही स्वतःचे मालक नाही; २० कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात; म्हणून तुम्ही आपले शरीर [व आत्मा] जी देवाची आहेत त्याद्वारे देवाचा गौरव करा.
  • आत्महत्या पाप आहे.  याकोब ४;१७ -  चांगले करणे कळत असून जो ते करत नाही त्याचे ते पाप आहे. 

म्हणून जीवनात कितीही वाईट गोष्टी घडली तरीही, एक प्रेमळ आणि सर्व समर्थ  देव आहे कि ,जो आपली वाट पाहत आहे. त्याचे नाव येशू आहे. तो आशांना निराशेच्या दरीतून बाहेर काढील आणि अद्भुत प्रकाशचा मार्ग दाखवेल. तो निश्चित विश्वसनीय आहे.

स्वता;चे जीवन आत्महत्येने संपवू इच्छित असणाऱ्यांना सांगू इच्छितो, प्रभूयेशु तुझ तुटलेले हृदय पुनर्स्थापित करण्यासाठी समर्थ आहे.

यशया ६१:१-३ मध्ये, संदेष्ट्याने लिहिले, “गरिबांस  सुवार्ता सांगण्यास परमेश्वराने मला अभिषेक केला आहे. भग्नहृदयी जनांना पट्टी बांधावी , बंदिवानांना स्वातंत्र्याची घोषणा करण्यासाठी,अंधारातून मुक्त करण्यासाठी, परमेश्वराच्या कृपेच्या वर्षाची घोषणा करण्यासाठी... शोक करणाऱ्या सर्वांचे सांत्वन करण्यासाठी... ,  राखेऐवजी सौंदर्याचा मुकुट, शोकाऐवजी हर्षरूप तेल आणि खिन्न आत्म्याच्या ऐवजी प्रशंसारूप वस्त्र द्यावे याकरिता पाठवले आहे.

येशू, देवाचा पापरहित पुत्र देखील, तुमच्याप्रमाणेच नाकारण्याच्या आणि अपमानित अनुभवातून गेला . यशया संदेष्टा ५३:२-६ मध्ये त्याच्याबद्दल असे वर्णन करतो कि , मनुष्यांनी त्यास "तुच्छ व नाकारलेला" असा मनुष्य ...., त्यांचे जीवन क्लेशांनी व दु:खाने भरलेले होते.परंतु त्याने जे दु:ख सोसले ते त्याचे स्वतःचे नव्हते; तर ते आमचे होते. येशू ख्रिस्ताने हे सर्व आपल्या सर्व पापांची क्षमा व्हावी म्हणून सोसले.

तुमच्या पापाचे ओझे कितीही असो, जर तुम्ही नम्रपणे तुमचा तारणहार म्हणून त्याला स्वीकारले तर तो तुम्हाला क्षमा करेल. “...संकटाच्या दिवशी मला हाक मार. मी तुला सोडवीन...” [स्तोत्र ५०:१५]. तुमच्या हातून घडलेला कोणताही मोठा अपराध  येशूकरिता क्षमा करण्यास मोठा नाही. त्याच्या काही निवडक सेवकांनी गंभीर अपराध केला . 

उदाहरणार्थ ;

  • दाविद राजाकडुन व्यभिचार आणि खून झाला ,
  • आणि प्रेषित पौलाने शारीरिक आणि भावनिक अत्याचार यासारखी गंभीर अपराधं केलीत.

परंतु त्यांनी पश्चात्तापपुर्वक देवाकडे क्षमा मागितली आणि नवीन जीवन त्यांना विपुलपणे मिळाले. म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे; जुने ते होऊन गेले; पाहा, ते नवे झाले आहे.” [२ करिंथ ५:१७].

चला..! पश्चात्तापपुर्वक येशुकडे या, त्याला तुमचा आनंद पुनर्संचयित करण्यासाठी परवानगी द्या, त्याच्यावर विश्वास ठेवा . तुम्ही गमावलेला आनंद परत मिळवून देण्याचे आणि टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला तो अभिवचन देतो. तुमचे तुटलेले हृदय त्याच्यासाठी मौल्यवान आहे. [स्तोत्र ५१:१२, १५-१७].

येशूला आपल्या जीवनाचा तारणारा आणि मेंढपाळ म्हणून स्वीकार करा. तो त्याच्या वचनाद्वारे तुमच्या विचारांना आणि पावलांना मार्गदर्शन करेल . स्तोत्र ३२:८ सांगते . “मी तुला बोध करीन; ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याचे शिक्षण तुला देईन; मी आपली दृष्टी तुझ्यावर ठेवून तुला बुद्धिवाद सांगेन. तुमचे जीवन प्रेमळ प्रभूयेशुच्या हातात सोपवा.

जर तुम्ही येशू ख्रिस्तावर तुमचा तारणारा म्हणून विश्वास ठेवू इच्छित असाल, तर तुमच्या अंत:करणातपुढील प्रार्थना देवाला करा.

👉 हे देवा, मला तुझी गरज आहे. माझ्या सर्व अपरांधाबद्दल मला क्षमा कर. मी येशू ख्रिस्तावर माझा विश्वास ठेवतो आणि त्यास माझा तारणारा आणि प्रभु म्हणून स्विकारतो. कृपया मला शुद्ध कर.., बरे कर.., आणि माझे जीवन पुन्हा आनंदीत कर. माझ्यावर असलेल्या प्रेमाबद्दल आणि माझ्यासाठी येशूने केलेल्या बलिदानाबद्दल मनापासून तुझे उपकार मानतो.

कृपया अधिकाधिक या आर्टिकलला शेअर करा , देवबाप आपणास आशीर्वादित करो . 

Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url