If Sabbath is Saturday why church on Sunday . शब्बाथ शनिवार आहे मग रविवारी उपासना का ?

शब्बाथ शनिवार आहे मग रविवारी उपासना का ? If Sabbath is Saturday why is church on Sunday

If Sabbath is Saturday why church on Sunday

If Sabbath is Saturday why church on Sunday

  • काही ख्रिस्ती लोंकाच्या मते चर्चला जाण्याचा एकमेव योग्य दिवस शब्बाथ , म्हणजेच  शनिवार दिवस . यासाठी ते नियमशास्रातून दहा आज्ञांचा संदर्भ देतात. निर्गम २०;८-११  शब्बाथ दिवसाची आठवण ठेवून तो पवित्रपणे पाळ.
  • काही ख्रिस्ती लोंकाच्या मते चर्चला जाण्याचा योग्य दिवस प्रभूवार, प्रभूयेशुचा पुनरुथान दिवस म्हणजेच रविवार.

या मतभेदास्तव,   

        पुष्कळ वेळा हा प्रश्न विश्वासणारे अथवा सेवकांना विचारला जातो. विश्वासणारे व सेवक हया नात्याने अशा प्रश्नाचे उत्तर बायबल आधारित असणे आवश्यक आहे . 

तर मग हा विषय आपण क्रमा-क्रमाने बायबलमधून सविस्तर बघुया... 

शब्बाथ दिवस म्हणजे काय ? What is the Sabbath day?

 निर्गम २९:-११ नुसार, शब्बाथ हा आठवड्यातील सातवा दिवस होय. देवाने सहा दिवसांत सर्व सृष्टी निर्माण केली आणि सातव्या दिवशी विश्रांती घेतली. या कारणास्तव परमेश्वराने सातवा दिवस इस्रायलस विश्रांतीचा दिवस म्हणून नियुक्त केला .

 शब्बाथाचे पालन करण्यास देवाने विशेष कोणास आज्ञा केली होती ? For whom the Sabbath was ?

इस्राएल लोकांना पिढ्यांन पिढ्या शब्बाथ पाळावा म्हणून परमेश्वराची आज्ञा होती. वचन स्पष्ट सांगते की शब्बाथ पाळणे हे देव आणि इस्राएल यांच्यातील एक निरंतरची खूण होय. [निर्गम ३१:१६-१७].

अनुवाद ५ मध्ये, मोशेने इस्राएल लोकांच्या पुढच्या पिढीला दहा आज्ञा पुन्हा सांगितल्या. शब्बाथ पाळण्याची आज्ञा दिल्यानंतर, मोशेने इस्राएल राष्ट्राला शब्बाथ पाळण्याचे कारण दिले. तू मिसर देशात दास होतास आणि तेथून तुझा देव परमेश्वर ह्याने तुला पराक्रमी बाहूंनी व उगारलेल्या हाताने बाहेर आणले ह्याची आठवण ठेव; म्हणूनच तुझा देव परमेश्वर ह्याने तुला शब्बाथ दिवस पाळण्याची आज्ञा केली आहे.” [अनुवाद ५:१५]. 

    इस्राएलला शब्बाथ देण्याचा देवाचा हेतू असा नव्हता की त्यांनी निर्मितीची आठवण ठेवावी , परंतु त्यांना त्यांची मिसरातून गुलामगिरी आणि परमेश्वराने केलेली सुटका याची आठवण ठेवावी. 

 शब्बाथ पाळण्याविषयी इस्राएलास विशेष नियम देण्यात आले होते. Rules to observe the Sabbath.

१.     शब्बाथ दिवशी एखादी व्यक्ती आपले घर सोडू शकत नाही [निर्गम १६:२९],

२.     वसतीस्थानात विस्तव पेटवू शकत नाही [निर्गम ३५:]

३.     कोणतेही कामकाज करू नये [अनुवाद ५:१४].

४.    शब्बाथ नियम मोडणाऱ्या व्यक्तीला मृत्यूदंड देण्यात आला होता [निर्गम ३१:१५, गणना १५:३२-३५].

नवीन करारातील मंडळीला  शब्बाथ पाळण्याचे कोणतेही बंधन  नव्हते . The Sabbath isn’t for the New Testament Church.

प्रेषित अथवा सुरुवातीच्या मंडळीने कोणत्याही अर्थाने शब्बाथ दिवस हा उपासनेचा दिवस म्हणून निश्चित केल्याचा संदर्भ नवीन करारात आढळत नाही. परंतु आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा रविवार उपासना करत.

१.     [प्रे.कृ.२:४६] मध्ये पहाण्यास मिळते कि, आरंभीची मंडळी दररोज भेटत असे.

.     [प्रे.कृ.१३-१८] दरम्यान  पौलाने केवळ एकदाच शब्बाथचा उल्लेख केला आहे, त्या प्रसंगी तो यहुदीना सुवार्ता सांगताना आढळतो .तो म्हणतो  यहूदी लोक मिळवण्यासाठी मी यहूदी लोकांना यहूद्यासारखा झालो; नियमशास्त्राधीन लोक मिळवण्यासाठी मी नियमशास्त्राधीन नसता, त्यांना नियमशास्त्राधीनासारखा झालो.पौल या ठिकाणी उपासना करण्यासाठी गेला नसून, तर हरवलेल्यांना सुवार्ता सांगण्यासाठी गेला होता. [१करिंथ ९:२९]. 

.     आतापासून मी परराष्ट्रीयांकडे जातो" असे पॉलने सांगितल्यानंतर त्याने शब्बाथचा पुन्हा उल्लेख केलेला आढळत नाही. [प्रे.कृ.१८:]

.     पौल [कलस्सै :१६] मध्ये , शब्बाथ दिवसाचे पालन सुचवण्याऐवजी, सांगतो  तर मग खाण्यापिण्याविषयी, तसेच सण, अमावस्या किंवा शब्बाथ पाळण्याविषयी कोणाला तुमचा निर्णय करू देऊ नका.
गलती ४:-१९ - पण आता तुम्ही देवाला ओळखता, किंबहुना देवाने तुमची ओळख करून घेतली आहे; तर मग दुर्बळ व निःसत्त्व अशा प्राथमिक शिक्षणाकडे पुन्हा कसे वळता? त्याचे गुलाम पुन्हा नव्याने होण्याची इच्छा कशी करता? वार, महिने, सणाचे काळ व वर्षे ही तुम्ही पाळता.

५.    एवढेच काय प्रभूयेशूने देखील शब्बाथ पालनास शिष्यांवर दबाव टाकला नाही.  तो म्हणतो कि, [मत्तय १२:७,८, - मला दया पाहिजे, यज्ञ नको’, ह्याचा अर्थ तुम्हांला समजला असता तर तुम्ही निर्दोष्यांना दोष लावला नसता. कारण मनुष्याचा पुत्र शब्बाथाचा धनी आहे.     मार्क २;२७  -“शब्बाथ मनुष्यासाठी झालेला आहे, मनुष्य शब्बाथासाठी झालेला नाही.]  

वरील मुद्द्या  कडे अधिक बारकाईने पाहिल्यास हे दिसून येईल की नवीन करारातील मंडळीला  शब्बाथ पाळण्याचे कोणतेही बंधन नाही आणि हे देखील दिसून येईल की रविवारला देखील शब्बाथ म्हणून शास्रआधार नाही . [कलस्सै:१६-१७]

नवीन करारातील मंडळीला  शब्बाथ पाळण्याचे कोणतेही बंधन का नव्हते . What does the New Testament teach about the Sabbath observance?

शब्बाथ इस्रायलला देण्यात आला होता, मंडळीला नाही. नवीन करारात कुठेही मंडळीने शब्बाथ दिवसाला उपासनेचा दिवस म्हणून निश्चित केल्याचे आढळत नाही.

 

If Sabbath is Saturday why church on Sunday









            शब्बाथ आजही शनिवारच आहे, रविवार नाही आणि तो कधीही बदलला नाही. परंतु शब्बाथ हा जुन्या करारातील मोशेच्या नियमशास्राचा भाग आहे. केवळ शब्बाथ पाळून देव संतुष्ट होत नाही तर संपूर्ण नियमशास्त्र पाळणे बंधनकारक होते. म्हणजेच सुंता करणे, शुद्धीकरणाचे विधी पाळणे, दशांश व सर्व प्रकारचे अर्पणे देणे, मंदिराचा कर देणे, सर्व प्रकारचे शब्बाथ, अमावास्या, चंद्रदर्शने व सण पाळणे इ. .

 

 [याकोब २;१०- कारण जो कोणी  संपूर्ण नियमशास्त्र पाळून एका  नियमाविषयी चुकतो तो सर्वांविषयी दोषी होतो.]

 आता शब्बाथाचा आग्रह धरणारे हे नियम किती काटेकोरपणे पाळतात ? नियमशास्त्र न पाळता शब्बाथ पाळल्याचे दाखवण्यात काही अर्थ नाही.

नवीन कराराची मंडळी मोशेच्या नियमशास्राधीन नसून येशूच्या अधीन आहे, जी येशू ख्रिस्ताच्या मृत्यू आणि पुनरुत्थानाद्वारे स्थापन झाली आहे. ख्रिस्ती विश्वासणारे नियमशास्राच्या बंधनातून मुक्त आहेत .

[गलती ४:-२६; रोम ६:१४ - तुम्ही नियमशास्त्राधीन नाही, तर कृपेच्या अधीन आहात.]

पॉल कलस्सै २;१४ मध्ये सांगतो कि, यहुदी शब्बाथ हा त्याच्या नियमांसह ख्रिस्ताने वधस्तंभावर रद्द केला. [कलस्सै २;१४ - आपल्याविरुद्ध असलेले म्हणजे आपल्याला प्रतिकूल असलेले विधींचे ऋणपत्र त्याने खोडले व वधस्तंभाला खिळून त्याने ते रद्द केले].

         तथापि, काही ख्रिस्ती पंथामध्ये या दिवसाबद्दल चुकीचा अर्थ आणि गैरसमज आहेत.

जे कोणी ख्रिस्ताचे बलिदान अथवा शिक्षण तुच्छ लेखतात ते ख्रिस्तविरोधक आहेत, खोटे पंथ आहेत. 

    शब्बाथाचे चुकीचे शिक्षण देणारे पंथ . Sects that teach false teachings of the Sabbath

विशेष करून सेवेन्थ डे चर्च, यरुशलेम माता, यहोवा विटनेस सारख्या खोटे शिक्षण देणारे पंथ अशक्त विश्वासू व्यक्तीचे मन वळविण्याचा प्रयत्न करीत असतात.

If Sabbath is Saturday why church on Sunday
false teacher

जसे की सेव्हन्थ डे अॅडव्हेंटिस्ट चर्च शब्बाथला उपासनेचा दिवस मानतात. याच दिवशी उपासना झाली पाहिजे, असा आग्रह ते धरतात. हे पंथ असे देखील शिकवतात की शब्बाथ दिवशी कोणतेही काम करू नये, परंतु "विश्रांतीचा दिवस " या​​पेक्षा "उपासनेचा दिवस" ​​या कल्पनेवर अधिक जोर दिला जातो.

होय ! शब्बाथ हा विश्रांतीचा दिवस होता, परंतु हा नियम मोशेच्या नियमाशास्रत पाळण्याची आज्ञा होती. [निर्गम १६:२३-२९; ३१:१४-१६; ३५:-; अनुवाद ५:१२-१५; नेहेम्या १३:१५-२२; यिर्मया१७:२१-२७] .

सेवेन्थ डे चर्च चे लोक असे म्हणतात की, शब्बाथ दिवसाची भक्ती ही रोमन सम्राट कॉनस्टेटाईन बदलून रविवारमध्ये बदलली. पण हे खरे नाही.

    त्याने फक्त रविवार हा सुट्टीचा वार म्हणून घोषित केला. त्या दिवशी सर्व सरकारी कचेऱ्या, दुकाने, बाजार बंद ठेवण्याची अधिकृत सरकारी घोषणा केली. [Codex Justinianus lib. 3, tit. 12, 3; trans. in Philip Schaff, History of the Christian Church, Vol. 3, p. 380, note 1]

मग जर कॉनस्टेटाईनने रविवार भक्ती सुरु केली नाही तर कोणी केली ? Who changed the Sabbath to Sunday ?

रविवारची भक्ती ही आरंभीच्या मंडळीने सुरु केली. बायबलमध्ये हयाबाबत पुरावे आढळतात. प्रेषितांनी स्वतः आठवड्याचा पहिला दिवस पाळल्याचे आणि आरंभीच्या मंडळीने रविवार उपासनासुरु केल्याचे स्पष्ट होते.

पुरावे

१.     मत्तय २८:१ -यहूदी लोकांचा शब्बाथ पूरा होईपर्यंत येशू ख्रिस्त कबरेमध्ये राहिला व आठवड्याच्या             पहिल्या दिवशी [रविवारी] मरणातून पुन्हा उठला.

२.     प्रेषित. २०:७ प्रेषित आणि मंडळी आठवड्याच्या पहिल्या दिवशी त्यांच्या नियमित उपासनेसाठी            एकत्र जमत असल्याचा पुरावा येथे आढळतो. [प्रेषित १७:११]

३.     १ले करिंथ. १६:२ मध्ये रविवारच्या दानार्पणा विषयी सूचना येथे आढळते.

४.     प्रकटीकरण १:१० मध्ये योहान प्रभूवारहा त्याकाळी पाळत असल्याचे बोलतो, प्रभूच्या दिवशी मी         आत्म्याने संचारित झालो….

आता मंडळी आठवड्याचा पहिला दिवस, रविवार हा “प्रभूचा दिवस”, आपल्या पुनरुत्थानाचा प्रमुख, ‘ख्रिस्तप्रभू’ यांच्याबरोबर नवीन सृष्टीचा उत्सव साजरा करते [प्रकटीकरण १:१०]. आम्हा ख्रिस्तीवर नियमशास्रातील शब्बाथ-विश्रांतीचे पालन करण्यास बंधन नाही.

तर आता उठलेल्या ख्रिस्ताची सेवा व अनुसरण करण्यास फक्त शनिवार किंवा रविवारी नाही तर आपल्या सोयीनुसार दररोज स्वतंत्र आहोत.  

आपल्या भारत देशामध्ये बहुदा रविवार हा सुट्टीचा वार असल्याने त्या दिवशी उपासना  घेणे हे  आपणासाठी सोयीस्कर आहे . म्हणून  पुष्कळ ठिकाणी  रविवार उपासना  घेतली जाते .

[रोम१४:५- कोणी माणूस एखादा दिवस दुसर्‍या दिवसापेक्षा अधिक मानतो. दुसरा कोणी सर्व दिवस सारखे मानतो. तर प्रत्येकाने आपल्या मनाची पूर्ण खातरी करून घ्यावी ]

कृपया हे शिक्षण, कोणीही विश्वासी चुकीच्या शिक्षणात फसू नये म्हणून तुम्हास माहित असणारे सर्व विश्वासी तसेच शब्बाथविषयी योग्य शिक्षण माहित नसलेल्यांना शेअर करा.

 अधिक माहितीसाठी पुढील व्हिडीओवर क्लिक करा  

 

 खरे संदेष्टे आणि खोटे संदेष्टे कसे ओळखावे ?   या विषयावर  वाचण्यासाठी  येथे क्लिक करा 

राखेचा बुधवार म्हणजे काय ?   या विषयावर  वाचण्यासाठी  येथे क्लिक करा

 

Note: The above biblical references are taken from the official R.V.Marathi edition of the "Holy Scriptures" Bible Society of India. And  some Notes from marathi book 'khote shikshak v tyaanchi shikavan p-95, [Codex Justinianus lib. 3, tit. 12, 3; trans. in Philip Schaff, History of the Christian Church, Vol. 3, p. 380, note 1]

Next Post Previous Post
2 Comments
  • अनामित
    अनामित ३० मे, २०२२ रोजी ७:५३ AM

    Thank you for this Article, it is so helpful for our Believers and Pastors to stand against false Doctrine...

  • Godspeaks
    Godspeaks ३१ मे, २०२२ रोजी ९:२९ PM

    Thanks

Add Comment
comment url