What is baptism ,बाप्तिस्मा म्हणजे काय ?

बाप्तिस्मा

what-is-baptism
what-is-baptism

पवित्रशास्त्रात आपणास पुढीलप्रमाणे  बाप्तिस्म्यांचा उल्लेख आढळतो.

१. पाण्याचा बाप्तिस्मा :- मत्तय २८ : १९     

   तेव्हा येशू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना म्हणाला, “स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांना शिष्य करा; त्यांना पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या; जे काही मी तुम्हांला आज्ञापिले ते सर्व त्यांना पाळण्यास शिकवा; आणि पाहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे.

२. अग्निने व आत्म्याने :-  मत्तय  ३ :१

 ...... त्याच्या वाहणा उचलून चालण्याचीदेखील माझी पात्रता नाही; तो पवित्र आत्म्याने व अग्नीने तुमचा बाप्तिस्मा करणार आहे.

लुक :३:१६, प्रे.कृ. १:५, १:८

३. दुःख सहनाचा :-  मार्क १०:३८

....जो प्याला मी पिणार आहे तो तुमच्याने पिववेल काय? व जो बाप्तिस्मा मी घेणार आहे तो तुमच्याने घेववेल काय?”

          लुक १२:५०,लुक १२:५०,मत्तय २६:३९  

४. पश्चातापाचा  :-  मार्क  १:४

त्याप्रमाणे पापांच्या क्षमेसाठी पश्‍चात्तापाचा बाप्तिस्मा घ्यावा अशी घोषणा करत बाप्तिस्मा करणारा योहान अरण्यात प्रकट झाला.

५. मृतांकरीता :-  १ करिंथ १५:२९

असे नसल्यास मेलेल्यांखातर जे बाप्तिस्मा घेतात ते काय करतील? जर मेलेले मुळीच उठवले जात नाहीत तर त्यांच्याखातर ते बाप्तिस्मा का घेतात?

६ . मोशेचा ;-  १ करिंथ १०; १-३

बंधुजनहो, आपले पूर्वज सर्वच मेघाखाली होते आणि समुद्रातून ते सर्व पार गेले;

मेघ व समुद्र ह्यांच्या द्वारे मोशेमध्ये त्या सर्वांचा बाप्तिस्मा झाला;

त्या सर्वांनी एकाच प्रकारचे आध्यात्मिक अन्न सेवन केले;

 

 बाप्तिस्मा या शब्दाचा मुळ ग्रीक शब्द  βάπτισμαव उच्चार “ बॅप्टिझो ” Baptizo. आणि  भाषांतर “ पुर्णपणे बुडविले जाणे ” असे आहे .

 

बाप्तिस्मा घेतल्याने  'नवीन जन्म' किंवा 'पापाची क्षमा होते असे नाही ; तर बाप्तिस्मा हे अंतरंगातील वास्तवतेचे  खऱ्या परिवर्तनाचे बाह्य प्रतीक आहे.

 

बाप्तिसम्याचा खरा अर्थ

. ख्रिस्ताने घालुन दिलेल्या आदर्शाप्रमाणे वागणे असा त्याचा अर्थ आहे. १ पेत्र२;२१ योहान.१३:१५.

 . सर्व धर्माचरण पूर्णपणे करणे असा त्याचा अर्थ आहे (मत्तय ३:१५). जर येशुला याची आवश्यकता होती, तर मला त्याची आवश्यकता आहेच.

३. पापाला मरून त्यापासून वेगळे होणे असा त्याचा अर्थ आहे.  कलस्सै ३:३ ,गलती.६:१४.

what-is-baptism
नवीन जन्म


. ख्रिस्ताशी समरूप होणे असा त्याचा अर्थ आहे, रोम.६:४-१३.

अ) त्याच्या मरणामध्ये समरूप होणे, रोम ६:५.

ब) त्याच्या पुरण्यामध्ये समरूप होणे,रोम ६:४.

क) त्याच्या पुनरुत्थानामध्ये समरूप होणे,रोम ६:४.

. ख्रिस्ताच्या शरीराशी एक होणे असा त्याचा अर्थ आहे . १करिंथ१२:१३

 

बाप्तिस्मा होण्यासाठी आवश्यक पात्रता ; ज्यांनी विशिष्ट अटींची पूर्तता केली त्यांचाच योहानाने बाप्तिस्मा केला.

१. ज्यांनी सुवार्ता ऐकून तिच्यावर विश्वास ठेवला,मार्क.१६:१६.

 २.ज्यांचे डोळे उघडण्यात आले. प्रेषित९:१८.

३. ज्यांनी पश्चात्ताप केला,प्रेषित.२:३८.

what-is-baptism

४. ज्यांनी पश्चात्तापास योग्य अशी फळे दिली, लूक. ३:८.  

५. ज्यांना पवित्र आत्मा मिळाला . प्रेषित१०:४७.

६. ज्यांना देवाच्या वचनाचे शिक्षण मिळाले आहे,मत्तय.२८:१९,२०.

 ७. जे ख्रिस्ताबरोबर मेले व पुरले गेले आणि त्याच्या पुनरुत्थानाच्या पार्श्वभूमीवर जगतात.

रोम.६:१-१३  हा या शिक्षणाचा मूळ पाया आहे. तो प्रत्येक  विश्वासणाऱ्याने समजून घेतलाच पाहिजे.

 

बाप्तिस्म्याची पद्धत

काही मंडळ्या  पाणी ओतून किंवा शिंपडून बाप्तिस्मा करतात .

अ) ओतून - कदाचित ओतून हि पद्धत जुन्या करारातील अभिषेकाप्रमाणे (१ शमु. १०:१) ही पद्धत पुढे चालू ठेवली असावी.

ब) शिंपडून - कदाचित जुन्या करारातील सुंतेच्या विधीवरून पुढे चालू ठेवली असावी.

क) बुडवून – नवीन करारात येशुख्रिस्ताने आज्ञापिलेला बाप्तिस्मा हा बुडवून बाप्तिस्मा आहे , मत्तय २८ : १९ महान आज्ञा.

बाप्तिस्मा या शब्दाचा मूळ अर्थ "बुडविणे' असा आहे. इतिहासतील नोंदी वरून असे  समजते की , नवीन कराराच्या सुरुवातीपासून बुडवून बाप्तस्मा करण्याची पद्धत रूढ होती.

 बुडवून बाप्तिस्मा केल्याची उदाहरणे ;

मत्तय. ३:१६- तारणारायेशू लागलाच पाण्यातून वर आला.

प्रेषित. ८:३८.३९- षंढ आणि फिलिप्प. दोघे पाण्यात उतरले आणि मग ते पाण्यातून वर आले.

रोम. ६:१-१३ याप्रमाणे शिंपडून बाप्तिस्म्यापेक्षा बुडवून बाप्तिस्मा हे  ख्रिस्ताबरोबर मरण्याचे, पुरण्याचे व त्याच्याबरोबर पुनरुत्थित होण्याचे परिपूर्ण चित्र आहे.

 विश्वासणाऱ्याचा बुडवून बाप्तिस्मा होतो तेव्हा तो स्वतःला मेला असुन पूरला गेला व ख्रिस्ताबरोबर पुनरुत्थित झाला आणि आता येशूसाठी जगत आहे असे त्याद्वारे जगाला सांगितले जाते (कलस्सै.२:१२).

बाप्तिस्मा  कोणाद्वारे किंवा कोणी  करावा ?

मंडळीच्या एका किंवा अधिक प्रतिनिधींनी. उदा. बाप्तिस्मा करणारा योहान, फिलिप्प,पेत्र,पौल आणि सीला ...इ.

बाप्तिस्मा

कशामध्ये

कोणाद्वारे

तारणाचा

ख्रिस्ताच्या शरीरामध्ये

पवित्र आत्म्याद्वारे

पाण्याचा

पाण्या मध्ये

मनुष्याद्वारे

पवित्र आत्म्याचा

आत्म्यामध्ये

येशुख्रीस्ताद्वारे

 

४. बाप्तिस्मा कोठे करण्यात येतो ?

  • सामान्यपणे नदीमध्ये - येशूचा बाप्तिस्मा ;  मत्तय ३:१३-१७ ,बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाची सेवा; योहान.३:२२,२३.
  • तळे – हबशी षंढ ; प्रेषित ८: ३६
  • मुबलक पाणी असेल त्या ठिकाणी

 इमारतीत;  बंदिशाळेचा नायक व त्याचे घराणे - प्रेषित १६:३३  

शिमोन जादूगार- प्रेषित.८:१२,१३

बाप्तिस्मा केव्हा करावा ?

माझ्या पापांची क्षमा व्हावी असे मला वाटते किंवा प्रॉटेस्टन्ट ख्रिस्ती व्हायचे आहे , तेव्हा बाप्तिस्मा घ्यावा असे नाही, किंवा सामाजिक दृष्ट्या व व्यावसायिक दृष्ट्या माझी प्रगती व्हावी किंवा लग्न करायचे म्हणून बाप्तिस्मा घ्यावा असे नाही.

बाप्तिस्म्याच्या अटी समजून घेण्याइतकी व त्या अटी पूर्ण करण्याइतकी व्यक्ती प्रौढ होते, तेव्हा त्या व्यक्तीचा बाप्तिस्मा करावा.

नवीन करारात बालकांचा बाप्तिस्मा झाला का?

तीन कुटुंबांचा बाप्तिस्मा झाल्याची नोंद आढळते.  

)  फिलिप्पै येथील बंदिशाळेचा नायक -  प्रेषित.१६       

)   स्तेफन  - १करिंथ.१:१६

)   लुदिया  -   प्रेषित.१६:१५

प्रेषित ८:१२ -पुरुष व स्त्रिया यांचा बाप्तिस्मा झाला.

परंतु तेथे बालकांचा उल्लेख नाही.

बाप्तिस्मा होण्याअगोदर मूल मरण पावले तर त्याच्या तारणाबद्दल काय ? बाप्तिस्म्यामुळे मुलाचे तारण होते असे नाही किंवा नाश होतो असेही नाही. तारण ख्रिस्ताद्वारे आहे; बाप्तिस्म्याद्वारे नाही (प्रेषित. ४:१२). १ शमु.१२:१५-२३ मध्ये दाविदाचे मूल सुंता करण्याअगोदर व बाप्तिस्मा होण्याअगोदर मरण पावले तरी दावीद म्हणतो, "मी त्याच्याकडे जाईनआणि दाविदाच्या अपेक्षेप्रमाणे तो निश्चितच त्याला भेटावयास स्वर्गात गेला.

 



Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url