वधस्तंभावरील सात शब्द Seven Words Of Jesus On The cross

 वधस्तंभावरील सात शब्द

seven-words-of-jesus-on-cross
वधस्तंभावरील सात शब्द

 नंतर ते कवटी म्हटलेल्या जागी आले तेव्हा तेथे त्यांनी त्याला व त्या अपराध्यांना, एकाला उजवीकडे व एकाला डावीकडे असे वधस्तंभांवर खिळले.  लुक २३;३३.

येशूचा शाररिक छळ भयंकर केला होता. चाबकाच्या फटक्यानी याची सुरुवात झाली .ज्यामुळे मारल्यावर चामड्याचा लचका निघून येई  आणि त्याच्या पाठीवर खोलवर जखमा होत होत्या. अशाप्रकारच्या चाबकाच्या फटक्यामुळे कित्येकजण मरण पावले होते. नंतर काही वेळाने , त्यांनी त्याच्या डोक्यावर काट्याचा मुकुट घातला. त्या मुकुटाचे अंकूचीदार काटे त्याच्या मस्तकावरील त्वचेत घुसत होते आणि त्यामुळे रक्त त्याच्या चेह-यारुन घळाघळा वाहत खाली येत होते. त्यांनी त्याच्या चेह-यावर चपराका मारल्या, त्याच्यावर थुंकले, आणि त्यांनी त्यांच्या हातानी त्याच्या गालावरील दाढी ओढली. त्यानंतर त्यांनी त्याला यरुशलेमेच्या भर रस्त्यावरुन त्याचा वधस्तंभ वधस्तंभी देण्याची जागा कालवरी येथपर्यंत , वाहाण्यास लावले . शेवटी, मोठ मोठाले खिळे त्याच्या पायात आणि हाताच्या हाताच्या मनगटावर ठोकण्यात आले. अशा प्रकारे त्याला निर्दयीपणे वधस्तंभावर खिळण्यात आले.

पवित्रशास्त्र सांगतेः ज्याप्रमाणे तुला पाहून बहुत लोक चकीत झाले [त्याचा चेहरा मनुष्याच्या चेह-यासारखा नव्हता, त्याचे स्वरुप मनुष्यजातीच्या स्वरुपासारखे नव्हते इतका तो विरुप होता] यशया ५२:१४. 

    चित्रपटांतून येशूची भूमिका साकारतांना जी खोलवरची भिषणतः व वधस्तंभावर खिळण्याची क्रुरता दाखवतात ती पुरेशा प्रमाणात दाखविली जात नाही. येशूने प्रत्यक्षात वधस्तंभावर जे दुःख सहन केले त्याप्रमाणात जे आपण चित्रपटांतून पाहतो ते कांहीच नाही. पॅशन ऑफ क्राईस्टया चित्रपटांतून सुद्धा जे आपण बघितले ते प्रत्यक्षात त्याच्याबरोबर घडले ते मुळीच तोडीचे नव्हते. त्याचे खरोखरचे दुःख भयंकर असे होते.

त्याच्या मस्तकावर खोलवर जखमा झालेल्या होत्या. त्याचा चेहरा व मानेवरुन रक्त वाहत होते. त्याच्या डोळे अक्षरशः सुजून झाकले गेले होते. त्याचे नाक व जबडा सुद्धा मोडला होता. त्याचे ओठ फाटून त्यातूनही रक्त वाहत होते. त्याला ओळखणे अक्षरशः कठीण झाले होते.

यशयाने सेवकाचे दुःखसहनाचे भविष्य अगोदरच सांगून ठेवल्याप्रमाणेच घडले होते. त्याचा चेहरा मनुष्याच्या चेह-यासारखा नव्हता, त्याचे स्वरुप मनुष्यजातीच्या स्वरुपासारखे नव्हते इतका तो विरुप होतायशया ५२;१४. त्याची होणारी निंदानालस्ती व त्याच्यावर थुंकले जाणे हे देखील संदेष्ट्याने सांगून ठेवले होते: मी मारणा-यापुढे आपली पाठ केली, केस उपट- णा-यांपुढे मी आपले गाल केले; उपमर्द व छिथू ह्यापासून मी आपले तोंड चुकवले नाहीयशया ५०;.

जेंव्हा त्याला वधस्तंभी खिळण्यात आले त्यावेळी त्याने सात उद्गार काढले. प्रभूयेशूचे हे वधस्तंभावरील सात उद्गार त्यावर आपण अधिक मनन करुया .

१)  पहिला उद्गार -  क्षमेचा  हे बापा, त्यांना क्षमा कर; कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही”  लुक २३;३३,३४

वधस्तंभावरील सात शब्द  Seven Words Of Jesus  On The cross
हे बापा त्याना क्षमाकर  
 

नंतर ते कवटी म्हटलेल्या जागी आले तेव्हां तेथे त्यांनी त्याला व अपराध्यांना, एकाला उजवीकडे व एकाला डावीकडे असे वधस्तंभावर खिळले. तेव्हां येशू म्हणाला, “हे बापा, त्यांना क्षमा कर; कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाहीलुक २३;३३,३४.

आपल्या पापांची क्षमा करण्यासाठी येशू वधस्तंभावर गेला. तो येरुशलेमेला जाण्याच्या कितीतरी पूर्वी त्याला ठाऊक होते की त्याला मारले जाणार आहे . नवीन करार आपणास शिकवितो की , प्रभू येशू आपल्या पापांची खडणी भरण्यासाठी मुद्दामहून स्वतःला वधस्तंभावर खिळू द्यावे म्हणून येरुशलेमेला गेला.

कारण आपल्याला देवाजवळ नेण्यासाठी ख्रिस्तानेही पापाबद्दल, म्हणजे नीतिमान पुरुषाने अनीतिमान लोकांकरिता एकदा मरण सोसले१ पेत्र ३:१८.

शास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्या-आमच्या पापाबद्दल मरण पावला”  १करिंथ १५;.

येशू वधस्तंभावर असताना प्रार्थना करत आहे कि , “हे बापा, त्यांना क्षमा कर,” देवाने त्याच्या प्रार्थनेचे उत्तर दिले. जो कोणी येशूवर पूर्ण विश्वास ठेवतो त्याच्या पापांची क्षमा होते . त्याच्या मरणाने तुमच्या पापाबद्दल खंडणी भरलेली आहे. त्याच्या रक्ताने तुमचे पाप धुतले जाते.

२) दुसरा उद्गार - तारणाचा. लुक २३:३९-४३ -तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील”.

 

तू-आज-माझ्याबरोबर-सुखलोकात-असशील.”
तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील.”

त्याच्या दोन्ही बाजूला एक एक असे, दोन चोरांना वधस्तंभावर खिळले होते.

वधस्तंभावर खिळलेल्या त्या अपराध्यांपैकी [गुन्हेगाराने] एकाने त्याची निंदा करुन म्हटले, ‘तू ख्रिस्त आहेस ना? तर स्वतःला व आम्हांलाही वाचव.परंतू दुस-याने त्याचा निषेध करु म्हटले, ‘तुलाही तीच शिक्षा झाली असता तू देवाला सुद्धा भीत नाहीस काय? आपली शिक्षा तर यथान्याय आहे; कारण आपण आपल्या कृत्यांचे योग्य फळ भोगत आहोत; परंतू ह्याने काही अयोग्य [चुकीचे] केले नाही.मग तो म्हणाला, ‘अहो, येशू, आपण आपल्या राजाधिकाराने याल तेव्हां माझी आठवण करा. येशू त्याला म्हणाला, मी तुला खचीत सांगतो, तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील”  लुक २३:३९-४३.

दुस-याचे चोराचे जे बोल आहेत त्यात खूप मोठे प्रकटीकरण पहाण्यास मिळते . त्यातून आपणास हे प्रगट होते  की,

. तारण हे केवळ बाप्तिस्मा किंवा मंडळीचा सभासद असल्याने मिळत नाही - त्या चोराने ह्या दोहोंपैकी काहीही केले नव्हते.

. मी चांगला आहे, असे  वाटल्याने तारण मिळत नाही -चोराला केवळ वाईट वाटत होते - त्याला वधस्तंभावर खिळलेला होते तसेच त्याला त्याच्या पापाची जाणीव झालेली होती.

. सहज पुढे येऊन किंवा हात उंचावून तारण मिळत नाही - त्याला वधस्तंभावर खिळून त्याच्या हातात व पायात सुद्धा खिळे मारलेले होते. निस्वार्थपणे समर्पण महत्वाचे आहे.

.  येशूला अंतःकरणात बोलाविल्याची प्रार्थना म्हटल्याने तारण मिळत नाही. तर खरा पश्चाताप होणे गरजेचे आहे .

तुम्ही ज्या प्रकारे जगत आहां तो जीवनक्रम बदलून तारण मिळत नाही. हे करण्यासाठी त्याच्याजवळ वेळ नव्हता. तर नम्र बनून - पाप कबुली देऊन आज्ञापालन हवे आहे.

 प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेव म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईलप्रेषित १६;३१.

तुम्ही येशूवर पूर्ण अंतःकरणाने विश्वास ठेवा, म्हणजे तो तुमचे तारण त्याचे रक्त व नीतिमत्वाद्वारे करील.

३)  तिसरा उद्गार – प्रीतीचा  योहान १९;२५-२७ - बाई, पाहा, हा तुझा मुलगा! मग त्याने त्या शिष्याला म्हटले, पाहा, ही तुझी आई!

 
बाई-पाहा-हा-तुझा-मुलगा
बाई, पाहा, हा तुझा मुलगा!

येशूच्या वधस्तंभाजवळ त्याची आई, त्याची मावशी, क्लोपाची पत्नी मरीया आणि मरीया मग्दालिया ह्या उभ्या होत्या. मग येशूने आपल्या आईला व ज्या शिष्यावर त्याची प्रीति होती त्याला जवळ उभे राहिलेले पाहून आईला म्हटले, बाई, पाहा, हा तुझा मुलगा! मग त्याने त्या शिष्याला म्हटले, पाहा, ही तुझी आई! आणि त्यावेळेपासून त्या शिष्याने तिला आपल्या घरी ठेऊन घेतले”  योहान १९;२५-२७.

येशूने आपल्या आईची जबाबदारी ज्या शिष्यावर त्याची प्रीति होती त्या योहानावर सोपवली . तुमचे तारण झाल्यानंतर ख्रिस्ती जीवनात करण्यासारखे असे भरपूर आहे. तुम्ही इतरांची काळजी घ्यायला हवी. ख्रिस्ताने आपल्या प्रिय आईला आपला शिष्य योहान यासकडे सोपवले. त्याने, तुमची काळजी घेतली जावी म्हणून तुम्हांस स्थानिक मंडळीच्या अधीन केले आहे.

ख्रिस्ती जीवनात , स्थानिक मंडळीवर प्रेम करणे व तिची योग्यप्रकारे काळजी घेणे हे प्रत्येक तारण झालेल्या व्यक्तीचे कर्तव्य आहे . हे सत्य या पीढीचे लोक विसरलेले आहेत .

सर्व लोक त्यांना प्रसन्न असत आणि प्रभू तारण प्राप्त होत असलेल्या माणसांची दररोज त्यांच्यात (मंडळीत) भर घालत असे” (प्रेषित २; ४७).

 ४)  चौथा उद्गार -  क्लेशाचा   मत्तय २७:४५,४६.- माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास ?

माझ्या-देवा-माझ्या-देवा-तू-माझा-त्याग-का-केलास
माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास?

मग दुपारी सहाव्या तासापासून नवव्या तासापर्यंत देशभर अंधार पडला.आणि सुमारे नवव्या तासाला येशू मोठ्याने आरोळी मारून बोलला, “एली, एली, लमा सबख्थनी,” म्हणजे माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास ? मत्तय २७:४५,४६.

येशूची ही क्लेशयुक्त आरोळी त्रैक्याची व तसेच देवत्वाची वास्तविकता दाखवीत आहे. देव जो पुत्र वधस्तंभावर आपल्या पापे वाहत असताना , देव जो पिता त्याच्यापासून दूर गेलेला होता.

बायबल सांगते .  “कारण एकच देव आहे, आणि देव व मानव ह्यांच्यामध्ये ख्रिस्त येशू हा मनुष्य एकच मध्यस्त आहे” १तिमथी २:.

५)  पाचवा उद्गार -  दुःखसहनाचा  योहान १९:२८-२९ – मला तहान लागली आहे

 
मला-तहान-लागली-आहे
मला तहान लागली आहे.

ह्यानंतर, आता सर्व पूर्ण झाले आहे हे जाणून येशूने शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून, ‘मला तहान लागली आहे,’ असे म्हटले. तेथे आंब भरून ठेवलेले एक भांडे होते; म्हणून त्यांनी आंब भरलेला स्पंज एजोब झाडाच्या काठीवर बसवून त्याच्या तोंडाला लावला.      योहान १९:२८-२९ .

येशूने आपल्या पापांची खंडणी भरण्यासाठी वधस्तंभावर असाह्य वेदना सहन केल्या .

खरे पाहिले असता तो  आमच्या अपराधांमळे घायाळ झाला, आमच्या दुष्कर्मांमुळे ठेचला गेलायशया ५३;.

६) सहावा उद्गार - प्रायःश्चिताचा  योहान १९;३० – पूर्ण झाले आहे.

येशूने आंब घेतल्यानंतर, पूर्ण झाले आहे, असे म्हटले”  योहान १९;३० .

इब्री १०;१० -त्या इच्छेने आपण येशू ख्रिस्ताच्या एकदाच झालेल्या देहार्पणाद्वारे पवित्र केलेले आहोत

इब्री १०;१४ -  “कारण पवित्र होणा-यांना त्यांने एकाच अर्पणाने सर्वकाळचे पूर्ण केले आहे

इब्री १०;११,१२ - प्रत्येक याजक प्रतिदिवशी सेवा करत आणि जे य़ज्ञ पापे दूर करायला कदापि समर्थ नाहीत तेच यज्ञ वारंवार करत उभा असतो. परंतू पापांबद्दल  सार्वकालिक असा एकच यज्ञ अर्पून  हा देवाच्या उजवीकडे बसला आहे

वधस्तंभावर येशूने आपल्या सर्व पापांबद्दल प्रायश्चित केले, व एकदाच सर्वांकरिता मरण पावला.

७)  सातवा उद्गार -  देवाला समर्पित होण्याचा लुक २३;४६ – हे बापा, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो.”

 
मी-आपला-आत्मा-तुझ्या-हाती-सोपवून-देतो!
मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो!

लुक २३;४६ - तेव्हां येशू उच्च स्वराने ओरडून म्हणाला, हे बापा, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो! असे बोलून त्यांने प्राण सोडला

मृत्यूपूर्वी येशूने आपल्या शेवटच्या उद्गारात देव जो बाप याला आपले संपूर्ण समर्पण केल्याचे दिसत आहे.

शताधिपती ज्याने त्याला वधस्तंभावर खिळले तो तेथे उभा राहून त्याचे हे सात उद्गार ऐकत होता. शताधिपतीने पुष्कळांना वधस्तंभावर खिळलेले पाहिले होते, परंतू येशू ज्याप्रकारे मरण पावला त्याप्रकारे आजवर कोणासही मरतांना त्यांने पाहिले नव्हते. तो त्याच्या शरीरातील-रक्त वाहात असतांना सुद्धा अद्भभूत असा उपदेश देतो आहे.

लुक २३;४७ - तेव्हां जे झाले ते पाहून शताधिपतीने देवाचा गौरव करुन म्हटले, खरोखर हा मनुष्य नीतिमान होता”.

मार्क १५:३९ - त्या शताधिपतीने येशू संबंधाने अधिक विचार केल्यानंतर म्हटला कि , “खरोखर हा माणूस देवाचा पुत्र होता”.

प्रभूयेशु हा देवाचा पुत्र आहे! तो मरणातून जीवंत, शाररिकरित्या पुनरुत्थित झाला आहे. तो स्वर्गात चढला. तो देवाच्या उजवीकडे बसला आहे.

प्रेषित १६;३१ - “ प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेव म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल ”.

असे कांही लोक आहेत की त्यांना म्हणतात कि, फक्त देवावर विश्वास ठेवणे पुरेसे आहे. परंतू अस नाहीये . देवावर केवळ विश्वास ठेऊन कोणाचेही तारण होत नाही. तर येशू स्वतः म्हणाला कि , “माझ्याद्वारे आल्यावाचून पित्याकडे कोणी येत नाही”  योहान १४;.

 “येशू ख्रिस्त हाच स्वर्गात जाण्याच्या अनेक मार्गापैकी एक मार्ग नव्हे , किंवा अनेक मार्गापैकी एक सर्वात चांगला मार्गही नव्हे ; तर तो एकमेव मार्ग आहे *

जर  तुम्ही येशूवर विश्वास ठेवणार नाहीत, तर तुम्ही तारण गमावाल.  तुम्ही कितीही चांगले  असा , तुम्ही किती वेळा तरी चर्चला जात असा, किंवा पवित्रशास्त्र वाचीत असा, पण जर तुमचा  विश्वास येशूवर नसेल तर तुम्ही आपले तारण गमाविलेले व्यक्ती आहांत.

 “माझ्याद्वारे आल्यावाचून पित्याकडे  कोणी येत नाही.”  येशू हाच एकमेव मार्ग आहे ज्याच्या रक्ताने आपली पापे धुऊन शुद्ध होतात.

 

जर आपण या वचनाद्वारे आशीर्वादित झाला असाल, तर जरूर तुमच्या प्रियजनास पाठवा..  🙏 🙏
 

राखेचा बुधवार  म्हणजे नेमके काय  

बायबल आधारित बापतीस्मा

 

Note: The above biblical references are taken from the official R.V.Marathi edition of the "Holy Scriptures" Bible Society of India. And sermon ideas from Dr. R.L. Hymers ,* Dr.A..W. Tozer-That Incredible Christian, p. 135.

 

Next Post Previous Post
4 Comments
  • Pa.Balu Waghmare
    Pa.Balu Waghmare २ एप्रिल, २०२१ रोजी ९:०९ AM

    Thank u Pastor for these 7 words by Jesus Christ which heart touchable for everyone..

  • God Speaks
    God Speaks २ एप्रिल, २०२१ रोजी ९:२९ AM

    yes , its from heart of Lord Jesus.
    May God fill you with His Wisdom and knowledge everyday.

  • अनामित
    अनामित २९ मार्च, २०२४ रोजी ११:०७ AM

    PRAISE GOD 🙏

  • अनामित
    अनामित ११ एप्रिल, २०२५ रोजी ९:२७ PM

    Very Good.

Add Comment
comment url