येशू ख्रिस्ताचे जीवन चरित्र The Life and Ministry of Jesus Christ
The Life and Ministry of Jesus Christ
येशू ख्रिस्ताचे जीवन चरित्र
ख्रिस्ताचे खरे शिष्य होण्याचा अर्थ केवळ प्रशंसा करणे किंवा येशुख्रिस्ताला पसंत करणे नव्हे तर त्याचे आज्ञापालन करणे व त्याचे अनुकरण करणे होय.
![]() |
The Life and Ministry of Jesus Christ |
येशूचे जीवन चरित्र आणि सेवेबद्दल माहितीचे स्त्रोत
'yesu krista jivan charitra'
एकच शुभवर्तमाना ऐवजी चार शुभवर्तमान का आहेत ?
सर्वप्रथम, शुभवर्तमान हे निव्वळ येशूच्या जीवन चरित्राचेच पुस्तक नाही . तर चार लेखकांपैकी प्रत्येकजण येशूच्या जीवनातील आणि शिकवणीतील त्यांना सर्वात काय आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण आहे ,याचे ते वर्णन करीत आहे. अर्थात, प्रत्येक लेखक हा देवाच्या पवित्र आत्म्याद्वारे प्रेरित होता .
या चारही शुभवर्तमानामध्ये कोणतेही वास्तविक विरोधाभास नाहीत. चार भिन्न दृष्टीकोन एकमेकांना पूरक आहेत आणि ते येशूच्या संपूर्ण जीवनाचे चित्र पूर्ण करण्यास मदत करतात. चारही शुभवर्तमानामध्ये सुसंवाद, सातत्य आणि ऐक्य पहाण्यास मिळते. प्रत्येकाचा दृष्टीकोन लक्षात ठेऊन एकत्र अभ्यास करणे मनोरंजक आहे, तसेच एका वेळी एकाच्याच दृष्टीकोनावर लक्ष केंद्रित करणे देखील मनोरंजक आहे.
प्रत्येक लेखकाचे विशेष दृष्टिकोन सारांशित करणे आव्हानात्मक असू शकते, परंतु आपण वैयक्तिक दृष्टिकोन बघुया ! मत्तय येशूला एक राजा म्हणून लक्ष केंद्रीत करतो, मार्क त्याला सेवक म्हणून सादर करतो, लुक त्याच्यावर मनुष्य म्हणून लक्ष केंद्रित करतो आणि योहान त्याला देव म्हणून हायलाइट करतो. या प्रत्येक भूमिकेत येशू हा आमचा आदर्श आहे.
येशूला दिलेले मूळ नावे शीर्षके आणि अर्थ
मत्तय १:२१ "तिला पुत्र होईल, आणि त्याचे नाव तू येशू असे ठेव, कारण तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापांपासून तारील.”
मत्तय १:२३ “पाहा, कुमारी गर्भवती होईल व तिला पुत्र होईल आणि त्याला इम्मानुएल हे नाव देतील.”
योहान १:४१ त्याला त्याचा सख्खा भाऊ शिमोन पहिल्याने भेटला, तेव्हा तो त्याला म्हणाला, “मशीहा आम्हाला सापडला आहे .
लूक ६:४६ तुम्ही मला ‘प्रभू, प्रभू’ म्हणता, पण मी जे सांगतो ते का करत नाही ?
मत्तय १६:१३ नंतर फिलिप्पाच्या कैसरीयाकडल्या भागात गेल्यावर येशूने आपल्या शिष्यांना विचारले, “मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात?
येशूला दिलेले नावे व त्याचा अर्थ यावरून आपणास त्याच्या मिशनबद्दल बरेच काही शिकू शकतो. येशू म्हणजे "तारणहार". येशू हा शब्द ग्रीक शब्द “इसुस” पासून आला आहे, जो हिब्रू येहोशुआ पासून आला आहे. [याच नावावरून इंग्रजी नाव जोशुआ मिळाले आहे]
येशू खऱ्या अर्थाने "देव आम्हा सोबत" होता आणि आहे. तो देवाचा पुत्र होता आणि म्हणूनच तो देव आहे. तो देहात देव होता. [लूक १:३५; योहान २०:२८].
येशू त्याच्या मानवी जन्मापूर्वी अस्तित्वात होता.
योहान १:१४ - शब्द देही झाला व त्याने आमच्यामध्ये वस्ती केली, आणि आम्ही त्याचा गौरव पाहिले. ते पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचा गौरव असावा असा अनुग्रह व सत्य ह्यांनी परिपूर्ण होता.
येशू ख्रिस्ताचा जन्म
birth of Jesus Christ

देवपित्याने पवित्र आत्म्याच्या द्वारे मरीया नावाच्या यहुदी कुमारीच्या गर्भात येशूची गर्भधारणा घडवून आणली. अधिक वर्णनासाठी पहा. मत्तय १:१९-२३ आणि लूक १:२६-३५ फिलिप्पै २:६-८ .
येशूच्या जन्माची परिस्थिती
लूक २:१,४-७ त्या दिवसांत असे झाले की, सर्व जगाची नावनिशी लिहिली जावी अशी कैसर औगुस्त ह्याची आज्ञा झाली.
योसेफ हा दाविदाच्या घराण्यातला व कुळातला असल्यामुळे तोही गालीलातील नासरेथ गावाहून वर यहूदीयातील दाविदाच्या बेथलहेम गावी गेला, व नावनिशी लिहून देण्यासाठी, त्याला वाग्दत्त झालेली मरीया गरोदर असताना तिलाही त्याने बरोबर नेले. ते तेथे असताना असे झाले की, तिचे दिवस पूर्ण भरले; आणि तिला तिचा प्रथमपुत्र झाला; त्याला तिने बाळंत्याने गुंडाळून गव्हाणीत ठेवले, कारण त्यांना उतारशाळेत जागा नव्हती.
येशूच्या जन्मानंतर घडलेल्या घटनांचे वर्णन लूक २ मध्ये आणि उर्वरित मत्तय २ मध्ये केले आहे. येशूच्या जन्माची नेमकी तारीख अज्ञात आहे.
येशूचे बालपण
लूक २:३९-४० - नंतर प्रभूच्या नियमशास्त्राप्रमाणे सर्वकाही पुरे केल्यावर ते गालीलात आपले गाव नासरेथ येथे परत गेले. तो बालक वाढत वाढत आत्म्यात बलवान होत गेला व ज्ञानाने पूर्ण होत गेला; आणि त्याच्यावर देवाची कृपा होती.
![]() |
Childhood of Jesus |
येशू हा त्याच्या जगिक आई-वडील आणि भाऊ-बहिणीबरोबर मोठा झाला. येशू निश्चितच वेगळा होता, १२ वर्षांचा असतानाच तो मंदिरातील विद्वानांशी शास्त्रवचनांवर चर्चा करण्यास सक्षम होता. [लूक २:४१-५२]. आणि पुढे चालून परिपूर्ण अर्पण आणि तारणहार झाला , त्याने कधीही पाप केले नाही [इब्री. ४:१५].
येशूने आपले सेवाकार्य कधी, कोठे आणि कसे...
लूक ३:२३ येशूने वयाच्या तीसव्या वर्षी त्याच्या सेवेला सुरुवात केली. मत्तय ३:१३- मग योहानाच्या हातून बाप्तिस्मा घेण्याकरता येशू गालीलाहून यार्देनेवर त्याच्याकडे आला. मत्तय ४:१- तेव्हा सैतानाकडून येशूची परीक्षा व्हावी म्हणून आत्म्याने त्याला अरण्यात नेले. मत्तय ४:१२- नंतर योहानाला अटक झाली आहे हे ऐकून येशू गालीलात निघून गेला.
येशू त्याचा बाप्तिस्मा आणि ४० दिवसांच्या उपवासनंतर त्याचे सेवाकार्य सुरू करण्यासाठी गालीलला परतला. गालील हे येरुसलेमच्या उत्तरेस, गलील समुद्राच्या सभोवतालचे क्षेत्र आहे.
येशूचा संदेश काय होता ?
ministry-of-Jesus

सुवार्ता म्हणजे "चांगली बातमी" होय. येशूचा संदेश हा देवाची सर्व मानवतेसाठी असलेली तारणाची योजनेबद्दल होता, म्हणजेच देवाच्या राज्यात मिळणारे अनंतकाळचे जीवन !
येशूच्या सेवेबद्दल आणखी उल्लेखनीय आणि आश्चर्यकारक गोष्टी
मत्तय ४:२३ आणि येशू सर्व गालील फिरला, त्यांच्या सभास्थानात शिकवत, राज्याची सुवार्ता सांगत, आणि लोकांमध्ये सर्व प्रकारचे आजार आणि सर्व प्रकारचे रोग बरे करत असे.
येशू जिथे कुठे गेला तिथे लोकांना बरे केले, जे अनेक महत्वाच्या गोष्टी प्रकट करते. त्याच्या चमत्कारांनी हे सिद्ध केले की तो देवाने पाठविला होता [कृत्ये २:२२]. त्यांनी दाखवून दिले की तो आपल्या शारीरिक गरजा तसेच आपल्या आध्यात्मिक गरजा पूर्ण करतो. वर्णभेद ,स्री-पुरुष , वंश, वय किंवा स्थिती याची पर्वा न करता त्याने सर्व लोकांवर प्रेम केले आणि त्यांचा आदर केला, जगाने कधीही न पाहिलेले प्रेम बघितले आणि जे त्याच्या सर्व भावी अनुयायांसाठी एक आदर्श बनले [योहान १३: ३४-३५]. त्याच्याकडे पापांची क्षमा करण्याचा आणि आपल्या आध्यात्मिक समस्यांपासून बरे करण्याचा अधिकार आहे हे त्याने चमत्कारांद्वारे सिद्ध केले [मत्तय ९: ६].
येशू हा चर्चचा पाया आणि प्रमुख
इफिस २: १९-२०- तर ह्यावरून तुम्ही आतापासून परके व उपरे नाहीत; पण पवित्र जनांच्या बरोबरीचे नागरिक व देवाच्या घरचे आहात; प्रेषित व संदेष्टे ह्या पायावर तुम्ही रचलेले आहात; स्वतः ख्रिस्त येशू मुख्य कोनशिला आहे.
कलस्सी १:१८ तोच[ख्रिस्त] शरीराचे म्हणजे मंडळीचे मस्तक आहे; तो आदी, मृतांतून प्रथम जन्मलेला आहे; अशासाठी की, सर्वांमध्ये त्याला प्राधान्य मिळावे.
येशूचा म्रुत्यु
येशूने भाकीत केल्याप्रमाणे तो मेला आणि मेलेल्यांतून उठला .मत्तय १२:४० कारण जसा ‘योना तीन दिवस व तीन रात्री मोठ्या माशाच्या पोटात होता’ तसा मनुष्याचा पुत्र तीन दिवस व तीन रात्री पृथ्वीच्या पोटात राहील.
येशूच्या साडेतीन वर्षांच्या सेवेच्या सरते शेवटी, येशूने स्वेच्छेने स्वत:ला अटक, छळ, वधस्तंभावर आणि बलिदान होण्याची परवानगी दिली. येशूचे शेवटची आणि सर्वात महत्वाची भविष्यवाणी होती की तो तीन दिवसात मेलेल्यांतून उठेल . तो तीन दिवस आणि तीन रात्री कबरेत असेल [मत्तय १२: ३८-४०]. ते तंतोतंत पूर्ण झाले!
येशू ख्रिस्ताच्या मृत्यूचे मुख्य कारण काय होते ?
योहान ३:१६ " देवाने जगावर एवढी प्रीती केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे."
योहान २०: ३०-३१ आणि खरोखरच येशूने त्याच्या शिष्यांच्या उपस्थितीत इतर अनेक चिन्हे केली, जी या पुस्तकात लिहिलेली नाहीत; परंतु हे असे लिहिले आहे की तुम्ही विश्वास ठेवा की येशू हा ख्रिस्त आहे, देवाचा पुत्र आहे आणि विश्वास ठेवल्याने तुम्हाला त्याच्या नावाने जीवन मिळेल.
ख्रिस्ताने पृथ्वीवरील त्याचे जीवन, आपल्याकरिता मंडळी स्थापन करण्यासाठी एक उदाहरण असे ठेवले आहे. तो आम्हा प्रत्येकाच्या पापांचा दंड भरण्यासाठी व त्या पापांची क्षमा मिळवण्यासाठी मरण पावला. आणि आता तो आमचा तारणारा , मुख्य याजक आणि गुरु म्हणून आम्हा सोबत आहे . [इब्री ४:१४-१५].
आता आपणास काय करावयास हवे ?
प्रे.कृत्ये २:३६-३८ म्हणून इस्राएलाच्या सर्व घराण्याने हे निश्चयपूर्वक समजून घ्यावे की, ज्या येशूला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारले त्याला देवाने प्रभू व ख्रिस्त असे करून ठेवले आहे.” हे ऐकून त्यांच्या अंतःकरणास चुटपुट लागली आणि ते पेत्र व इतर प्रेषित ह्यांना म्हणाले, “बंधुजनहो, आम्ही काय करावे?” पेत्र त्यांना म्हणाला, “पश्चात्ताप करा व तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या; म्हणजे तुम्हांला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल.
जेव्हा लोकांना खात्री झाली की येशू "प्रभु आणि ख्रिस्त" आहे [वचन ३६] आणि त्याच्या मृत्यूचा दोष प्रत्येकावर आहे, तेव्हा त्यांच्यापैकी अनेकांनी विचारले, "आम्ही काय करावे ?" त्यांना जाणीव झाली की, "सर्वांनी पाप केले" आणि "ख्रिस्त आमच्या पापांसाठी मरण पावला" [रोम३:२३; १करिंथ १५:३]. आणि सर्व दोषी आहेत. पेत्र त्यांना म्हणाला, “पश्चात्ताप करा व तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या; म्हणजे तुम्हांला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल.
आजही “पश्चात्ताप करून बाप्तिस्मा” घेण्याची पेत्राने केलेली सूचना तितकीच खरी आहे जितकी त्यावेळी होती.
जर आपण "येशू ख्रिस्ताचे जीवन चरित्र" या माहितीद्वारे आशीर्वादित झाले असेल तर जरूर इतराना शेअर करा .
कालक्रमानुसार येशूचे जीवनाचा तक्ता 👈 बघण्यासाठी येथे क्लिक करा
Story of Colgate toothpaste कोलगेट टूथपेस्ट यशाचे रहस्य 👈 वाचण्यासाठी येथे क्लिक करा
जर आपण आशीर्वादित झाला असाल जरूर पुढे शेअर करा