ख्रिस्ती विश्वासणारे आणि रक्षाबंधन Can Christians Celebrate Raksha Bandhan
Can Christians Celebrate Raksha Bandhan
रक्षाबंधन आणि ख्रिस्ती विश्वासणारे
रक्षाबंधनाची धार्मिक पार्श्वभूमी
रक्षाबंधन या सणाविषयी शोधअभ्यासातून विविधप्रकारे कथा वाचण्यास मिळते. त्यापैकी सामान्य एक कथाया सणाचा ऐतिहासिक आणि पौराणिक सबंध आहे .भारतीय इतिहासात अशी उदाहरणे आहेत जेथे युद्धापूर्वी रक्षासूत्र किंवा ताबीज बांधण्याची प्रथा होती
रक्षाबंधन आणि ख्रिस्ती विश्वास: बायबल काय सांगते ?
१. खरी सुरक्षा कोण देतो?
२. “बंधन” — बायबलमध्ये कोणते बंधन ?
बायबलमध्ये देवाशी आणि ख्रिस्ताशी
जोडलेले राहणे महत्त्वाचे आहे.येशू म्हणतो: योहान १५:४ — “तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी
तुमच्यामध्ये राहीन.”
म्हणजे ख्रिस्ती जीवनात धाग्याने बांधले जाण्यापेक्षा ख्रिस्ताशी
जोडलेले राहणे महत्त्वाचे आहे.
३. दानवांपासून संरक्षण
बायबल दुष्ट शक्तींचे अस्तित्व मान्य करते; परंतु त्यांच्यापासून संरक्षणासाठी राखी किंवा ताईत बांधण्याचा सल्ला देत नाही.इफिस ६:११— “सैतानाच्या डावपेचांपुढे
तुम्हांला टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्रसामग्री धारण करा.”
पुढे पौल सत्य, नीतिमत्ता, विश्वास, तारण आणि देवाचे वचन यांचा उल्लेख करतो
(इफिस ६:१३–१७).
म्हणून बायबलनुसार आध्यात्मिक संरक्षणाचे साधन धार्मिक विधी , राखी किंवा राखीचा धागा नसून देवावरील विश्वास आणि त्याचे वचन आहे.
४. “राखी बांधल्यामुळे पापांचा अंत होतो”
५. भाऊ-बहिणीचे प्रेम — नक्कीच जपावे .
येशूने सांगितले:
योहान १३:३४ — “तुम्ही एकमेकांवर प्रेम करा; जसे मी तुमच्यावर प्रेम केले तसे तुम्हीही एकमेकांवर प्रेम करा.”
“रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या नात्याचा सण आहे, म्हणून तो साजरा करण्यात काही गैर नाही,” असा काही ख्रिस्ती लोकांचा विचार असतो.
१. भाऊ-बहिणीचे प्रेम बायबलविरोधी नाही.
म्हणून कुटुंबात एकमेकांवर प्रेम करणे, काळजी घेणे, एकमेकांसाठी प्रार्थना करणे आणि अडचणीच्या वेळी पाठीशी उभे राहणे बायबलनुसार योग्य आहे.
परंतु प्रश्न केवळ प्रेमाचा नाही. त्या प्रेमाचे प्रतीक म्हणून आपण कोणती धार्मिक प्रथा स्वीकारत आहोत, तिचा धार्मिक अर्थ देववचनाशी सुसंगत आहे का, हेही बायबलच्या प्रकाशात तपासले पाहिजे.
२. प्रत्येक सांस्कृतिक प्रथा ख्रिस्ती व्यक्तीसाठी योग्य असेलच असे नाही.
एखादी व्यक्ती म्हणू शकते, “माझा हेतू चांगला आहे.” पण बायबल शिकवते की केवळ हेतू चांगला असणे पुरेसे नाही. पौल म्हणतो:१ करिंथ ६:१२ — “सर्व गोष्टींची मला मोकळीक आहे,” तरी सर्व गोष्टी हितकारक असतातच असे नाही. म्हणजेच, एखादी गोष्ट आपल्याला चांगली किंवा निरुपद्रवी वाटते म्हणून ती आपोआप ख्रिस्ती जीवनासाठी योग्य ठरत नाही.
आपण स्वतःला विचारले पाहिजे: “मी हे का करीत आहे? यामागचा धार्मिक अर्थ काय
आहे? यामुळे ख्रिस्ताशी असलेल्या माझ्या निष्ठेवर काही
परिणाम होतो का?”
म्हणून ख्रिस्ती व्यक्तीने कोणत्याही धार्मिक प्रथेत सहभागी होताना आपला विश्वास आणि देवाशी असलेली निष्ठा कमकुवत होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे.
३. रक्षाबंधनाचा धार्मिक अर्थ महत्त्वाचा आहे.
जर एखादा ख्रिस्ती व्यक्ती राखीला फक्त
प्रेमाचे साधे प्रतीक मानून बांधतो, तरीही
आपण हे विसरू नये की रक्षाबंधन ही केवळ आधुनिक “भाऊ-बहिणीच्या प्रेमाची” संकल्पना नसून
तिच्याशी विविध धार्मिक-सांस्कृतिक अर्थ
आणि भावना जोडलेले आहेत. जसे कि, “ही
राखी माझ्या भावाचे दुष्ट शक्तींपासून रक्षण करेल”
या कारणास्तव ख्रिस्ती
व्यक्तीने त्यात सहभागी होणे बायबलच्या विश्वासाशी विसंगत ठरेल.
कारण बायबल स्पष्ट सांगते: स्तोत्र
२७:१
— “परमेश्वर माझा प्रकाश व माझे तारण आहे; मी
कोणाला भिऊ?”
आपले आध्यात्मिक संरक्षण धाग्यात नाही, परमेश्वरात आहे.
४. ख्रिस्ती व्यक्तीने दुसऱ्या आध्यात्मिक शक्तीवर अवलंबून राहू नये.
१ करिंथ १०:२१— “प्रभूच्या प्याल्याचा आणि
भुतांच्या प्याल्याचा तुम्ही सहभाग घेऊ शकत नाही.”
येथून एक महत्त्वाचा सिद्धांत समोर येतो:
५. “पण मी मूर्तीची पूजा करत नाही” — मग?
परंतु बायबल प्रत्येक गोष्टीकडे केवळ “मी पूजा केली की नाही?” या एका प्रश्नाने पाहत नाही. आपल्या कृतीचा अर्थ काय आहे आणि त्यातून इतरांना माझ्या ख्रिस्ती विश्वासाबद्दल काय संदेश मिळतो?” हेही महत्त्वाचे आहे.
पौल म्हणतो:
१ करिंथ १०:३१— “म्हणून तुम्ही खाता, पिता किंवा काहीही करता, ते सर्व देवाच्या गौरवासाठी करा.”
म्हणून ख्रिस्ती व्यक्तीने स्वता:ला विचारावे: माझ्या या कृतीने देवाचा गौरव होतो का?
६. तुमची कृती दुसऱ्याला अडखळण्यास कारण होऊ नये
पौल म्हणतो:रोम १४:१३ मध्ये सांगतो की, भावाला अडखळण्याचे कारण होईल असे आपण काही करू नये.
म्हणून एखादा ख्रिस्ती म्हणू शकतो: “माझ्या बहिणीवर माझे खूप प्रेम आहे; पण तिच्यावर प्रेम व्यक्त करण्यासाठी मला धार्मिक अर्थ असलेल्या विधीत सहभागी होण्याची गरज नाही.”
तो त्याऐवजी बहिणीसाठी प्रार्थना करू शकतो, तिला भेट देऊ शकतो, तिची काळजी घेऊ शकतो , अडचणीच्या वेळी उभा राहून प्रेम व्यक्त करू शकतो.
७. मग ख्रिस्ती व्यक्तीने काय करावे?
माझ्या मते आपली भूमिका अशी असावी ,हे भाऊ-बहिणीच्या नात्याचा अपमान नाही. उलट, प्रेम कायम ठेवून आपल्या विश्वासाबाबत प्रामाणिक राहणे आहे.
राखी बांधायला आलेल्या ख्रिस्तीतर बहिणीला तुम्ही काय उत्तर द्याल .
“ताई, तुमच्या प्रेमाबद्दल आणि आपुलकीबद्दल मी मनापासून आभारी आहे. तुम्ही मला भाऊ मानून राखी बांधायला येत आहात, याचा मला आदर आहे. पण मी ख्रिस्ताचा अनुयायी असल्यामुळे माझ्या विश्वासाशी संबंधित धार्मिक प्रतीक स्वीकारण्याबाबत मला काळजी घ्यावी लागते. माझे रक्षण, आशीर्वाद आणि आध्यात्मिक आधार केवळ प्रभू येशू ख्रिस्ताकडून आहे. म्हणून मी राखी बांधून घेऊ शकत नाही. पण तुम्ही माझी बहीण आहात या प्रेमाचा मी नक्कीच आदर करतो आणि तुमच्यासाठी प्रार्थना करीन.”१ पेत्र ३:१५ — “सौम्यतेने व भीतीने उत्तर देण्यास नेहमी सिद्ध असा.”
“राखी नाकारायची आहे, बहीण नाही.” ख्रिस्ती व्यक्तीने धार्मिक प्रतीक नाकारताना देखील ख्रिस्ताचे प्रेम, आदर आणि चांगुलपणा दाखवावे.
रोम १२:१- २
म्हणून बंधुजनहो, मी देवाच्या करुणांमुळे तुम्हांला विनवतो की, तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावीत; ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे, म्हणून ह्या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वत:चे रूपांतर होऊ द्या
★ संदर्भ - www.prabhatkhabar.com, wikipedia , Marathi R.V. Bible
Please share.....
Please share.....

Thank u so much for valuable and informative masage
खुप छान माहिती.धन्यवाद पास्टर