जॉन पॅटन ,नरभक्षकरिता देवाचा संदेशवाहक मिशनरी ,Jhon Paton God's messenger to the Cannibals
नरभक्षकरिता देवाचा संदेशवाहक मिशनरी
जॉन पॅटन १८२४-१९०७
![]() |
John-g-paton-missionary |
तो त्याला गरडा घालणार्या नरभक्षक आणि निष्ठूर लोकांना म्हणाला कि, "तुम्ही मला बंदुकीने गोळया झाडा किंवा मला ठार करा. परंतु मला तुमचा अत्युत्तम मित्र बनायचं आहे. मी मरणाला भित नाही. तुम्ही मला ज्याच्यावर मी प्रिती करतो आणि सेवा करतो त्याच्याकडे पाठवत आहात,परंतु बस इतकेच कि, लवकर .
ते नरभक्षक होते, त्याच्या हातात काठया व इतर शस्त्रे होती त्यांच्याकडे पाहून असे निश्चित वाटत होते कि, ते पशुतुल्य कृत्य करायला तयार आहेत. त्याच्या अगदी विरूध्द जॉन पॅटन त्यांच्यासमोर उभा होता. धाडसी व शांत असा उभा राहीला प्रेम आणि जिव्हाळा त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. तो एक मिशनरी म्हणून प्रभू येशूचे प्रेम लोकांना द्यायला आला होता. परंतु ते त्याचा जीव घेऊ पहात होते .
तरूणपणः
जॉन पॅटनचा जन्म स्कॉटलंडमध्ये १८२४ मध्ये झाला. त्याचे आईवडील धार्मिक होते. त्याचे वडील एक व्यापारी होते ते प्रार्थना योध्दा देखील होते. त्याच्या घरात एक खोली होती ती खोली “पवित्र स्थान" अशी होती. जॉनचे वडील दिवसातून तीनदा त्या खोलीमध्ये जात आणि अंतःकरण ओतून आपल्या कुटुंबासाठी तसेच स्कॉटलंड आणि जगासाठी प्रार्थना करीत असत. हे भक्तीमय जीवन जॉनला आव्हान होते. त्यानेही त्याच्या वडिलांप्रमाणे पवित्र जीवन जगण्याचा पक्का निर्धार केला होता.
![]() |
John-G-Paton |
त्याची आई फार धार्मिक होती आणि तीचा देवावर दृढ विश्वास होता. एकदा जॉनचे वडील बाहेरगावी गेले होते, घरात बिलकुल अन्न नव्हत आईने तीची सर्व उपाशी मुले जवळ घेतली आणि दवाकडे भोजनासाठी प्रार्ताना केली व मुलांना म्हटले की, उद्या सकाळी भरपूर अन्न खावयास मिळणार आहे. आणि त्यांना झोपी लावले. दुसऱ्या दिवशी त्यांना खुप अन्न मिळाले जे त्याच्या वडीलांनी त्यांना गरज माहित नसतांना पाठविले होते. आश्चर्यचकित झालेल्या मुलांकडे पाहून ती म्हणाली, “माझ्या मुलांनो, तुमच्या स्वर्गिय पित्यावर प्रेम करा. विश्वासाने तुमच्या सर्व गरजा प्रार्थनेतुन सांगा. तो तुमच्या चांगल्यासाठी त्यांच्या गौरवाने तुमच्या सर्व गरजा पुरवील. जॉन हा धडा कधीच विसरला नाही.
जॉन १२ वर्षाचा असल्यापासून आपल्या वडीलांना त्यांच्या व्यापारात मदत करीत होता. त्याच वेळेस तो ग्रीक व लॅटीनचे शिक्षण घेत होता. तो यंत्र सामुग्री या विषयी खूप शिकला. जेव्हा तो मिशनरी झाला तेव्हा त्याला त्याची खूप मदत झाली . जॉनने येशूला आपल्या वैयक्तीक तारणारा म्हणून स्वीकारले होते आणि तळमळीने देवाचा संदेश सुवार्ता देण्यासाठी तयारी करत होता. ग्लासगो सेमनरीत ईश्वर ज्ञान घेण्याची संधी मिळाली ईश्वर ज्ञानाचे शिक्षण घेण्यासाठी जॉनने आपले घरदार सोडले. ग्लासगो शहरी जीवन फार सोपे नव्हते. त्याचा खर्च भागावण्यासाठी जॉन एका शाळेत शिक्षक म्हणून काम करीत असे . त्याने वैद्यकीय शिक्षण आणि ईश्वर ज्ञानाचा आध्ययन केले. जॉनने ग्लासगो शहर मिशन चळवळीत भाग घेतला आणि फार दिर्घकाळ खालच्या दर्जाच्या लोकांचे काम केले. ती नोकरी फार कंटाळवाणी होती परंतू जॉनने प्रामाणिकपणे काम करणे सुरूच ठेवले. दहा वर्षाच्या विश्वासू सेवेनंतर त्याने पुष्कळांना ख्रिस्ताकरिता जिंकले. त्यांच्यापैकी पुष्कळ दारूडे, देवाचा द्वेश करणारे व आदिवासी होते. त्याच्या कामासोबत त्याने विद्यापीठातील अध्ययन सुध्दा सुरू ठेवले.
त्याचे पाचारण ;
अनेक वर्षापासून येशुख्रिस्ता शिवाय नाश पावत असलेल्या इतर देशातील लोकांबद्दल जॉनला ओझे होते. त्याला जाणीव झाली देवाने त्यास मिशनरी म्हणून इतर देशात सेवा करण्यासाठी पाचारण करत आहे . त्यावेळेला त्याच्या ऐकण्यात आले की, नवीन हेब्रीडस मध्ये काम करणाऱ्या मिशनऱ्याला एका मिशनऱ्याची गरज आहे. कोणीही तिकडे जायला तयार नव्हते जॉनला देवाचे पाचारण झाले कि ," तुझ्या पेक्षा तिकडे जाण्यासाठी कोणीही योग्य नाही, म्हणून ऊठ आणि तिकडे जाण्यासाठी स्वतःचे समर्पण कर " तेव्हा त्याने स्वतःस मिशनरी म्हणून जाण्यासाठी समर्पण केले व त्याची निवड झाली . परंतु शहर सुवार्तिक लोकांनी त्यास पाठवण्यास कांकु केली. त्याचे मित्र आणि इतर जे लोक ओळखत होते. तो येथे करीत असलेली देवाची सेवा सोडून नरभक्षक लोकांत का जातो आहे ? हे समजत नव्हते. एक म्हतारा मनुष्य म्हणाला, “तरूणा जाऊ नकोस ते फार भयानक आहे, ते नरभक्षक तुला खाऊन टाकतील." परंतू जॉनने उत्तर दिले, “तुम्ही म्हातारे झालात. लवकरच लोक तुम्हाला कबरेत ठेवतील आणि किडे तुम्हाला खाऊन टाकतील. परंतु मी माझ्या प्रभु येशूचा सन्मान करील आणि त्याची सेवा करील आणि जरी मी मेलो तरी मला कोणताच फरक पडणार नाही. तर माझे शरीर त्या राक्षसांनी खाल्ले किंवा कबरेतील किडयांनी खाल्ले ” कारण माझ्या आई वडीलांनी मला परवानगी दिली आहे . प्रभुने त्याचे मार्गदर्शन केले होते. म्हणून जॉन पॅटन त्याच्या वयाच्या ३४ व्या वर्षी सन १८५८ मध्ये त्याच्या नववधुला बरोबर न्यु हॅब्राईटला बोटीने निघाले.
जॉन पॅटन न्यु हेब्रीडसमध्ये नरभक्षक लोकांसमवेतः
न्यु हॅब्रीइडस हे दक्षीन पॅसिपिक महासागरातील संयुक्त बेटे आहेत ती ऑस्ट्रेलियापासून ऑस्ट्रेलियाच्या ईशान्नेय १४०० मैल अंतरावर आहेत. तेथे राहणारे लोक हे जुन्या वारसावर जगणारे व बेशिस्त होते. त्यांना नरमांस भक्षण करणे अशा सारख्या पशुतुल्य सवयी होत्या. माणसांचा खून करणे हे त्यांच्यासाठी फारच साधे काम होते. जरी ज्यांनी पुष्कळांना मारले, ते शुर होते का ? नाही. कारण ते दुष्ट आत्म्याला घाबरत होते आणि दुष्ट आत्म्ये त्यांच्यात कार्य करत . दुष्ट आत्म्यांनी त्यांच्यावर हक्क करू नये म्हणून त्याच्याकडे मूर्ती होत्या. इतर साथीदार आणि वैद्य जे जादु टोना करीत ते जादूगार त्या लोकांमध्ये प्रसिध्द होते. त्यांना नैसर्गिक मृत्युची जराही कल्पना नव्हती. प्रत्येक मृत्यु हा जादु टोण्यानेच होतो असा त्याचा विश्वास होता आणि म्हणून ते सभा बोलावित आणि त्या मृत्युच्या मागील कारण कोण आहे हे शोधुन काढीत असत. ते शेवटी त्या व्यक्तिला शोधुन काढत जी त्याच्याबरेबर मित्रत्वाने वागत नव्हती.मग एक पुढारी बंदुकित गोळया भरवून तो ती एका तरूणाकडे देत असे. आणि लपुन राहुन आरोपीला गोळी झाडण्याच्या संधीची वाट पाहत असे. मग ज्याला गोळ्या झाडून मारलेले आहे. त्याचे मित्र ज्या तरूणाने त्याचा खुन केला. त्याला मारण्याचा प्रयत्न करीत हे असेच चालत राही शेवटी, सर्व वंशाचा नाश होत असे कारण फक्त एका माणसाच्या नैसर्गिक मृत्यू झालेला असे तो असा की, जर समजा नवरा मेला, तर बायकोला कंठ दाबुन मारीत आणि नवऱ्याच्या कबरेत ठेवीत . म्हतारे लोक भार होत म्हणून त्यांनाहि घाव घालून ठार करीत . सैतान आणि वडिलोपार्जित आत्म्याची भक्ती केली जात असे. या लोकांनी कधीही येशूबद्दल ऐकलेले नव्हते.
एक ख्रिस्ती मिशनरी म्हणून त्याने ख्रिस्ताचे शुभवर्तमान हया लोकांकडे नेले. पहिला गेलेला मिशनरी घाव घालून मारला व त्याला ताबडतोब खाऊन टाकण्यात आले होते. त्यानंतर जे मिशनरी तेथे आले त्यांना देखील मारले गेले किंवा पळवून लावण्यात आले. परंतू जेव्हा जॉन पेट्रोन गेला. तेथे दोन मिशनरी जोडपी होती. ती सर्व विरोध असतानाही त्यांच्यात काम करीत होती. शिवाय काहीचे तारण देखील झालेले होते.
थान्यामध्येः
न्यु हेब्राईडसमध्ये थान्या नावाचे एक बेट आहे. जेथे आतापर्यंत पेरलेल्या सुवार्तेला फार विरोध होता . मांत्रिक वैद्य हेच त्या सुवार्ता कार्याला फार विरोध करीत होते कारण जर लोक सुवार्ता एकतील तर त्याची शक्ती समाप्त होत असे. म्हणून जर एखादी नैसर्गिक आपत्ती वादळ किंवा दुष्काळ येई ते लोकांना सांगत का हे फक्त मिशनऱ्यामुळे घडले आहे. आणि ते त्यांना जीवे मारायला भाग पाडित असत. कधी - कधी अडखळणे ही गोऱ्या व्यापाऱ्यामुळे देखील होत होती. कारण मिशनरी त्याच्या फसव्या कामाना अटकाव होते. जेव्हा ते बेटातील लोकांना फसवत होते ते विक्रेते त्यांना मिशनऱ्याविरूध्द उठवून देत.
![]() |
John Paton's wood house |
अशा या परिस्थितीत जॉन पॅटन त्याच्या पत्नी बरोबर अशा बेटावर आला होता. तो थान्यात उतरल्यानंतर तेथील लोकांचे चेहरे विनम्र दिसत होते. कदाचित त्यांना बनविलेल्या लाकडाचे घर पाहण्याची त्याना आवड लागली होती आणि तेथेच एक मैलावर नरभक्षक लोकांमध्ये उत्सव चालू होता. त्या जंगली निर्दयी लोकांचे तारणाचे ओझे होऊन जॉन फार हळहळ करीत होता.
थाना तेथील लोकांच्या भाषेला लिपी नव्हती म्हणून तो त्यांच्याबरेबर हातवारे करवून बोलत असे. एके दिवशी त्याला ते काय आहे ? या करिता त्याला विशिष्ट शब्द मिळाले. तुझे नाव काय आहे ? हया दोन प्रश्नांवर वारंवार विचारून त्याने त्याचा त्याची उत्तरे लिहिली आणि त्या व्यक्तींची नावे मिळवली व वस्तुची देखील नावे मिळवली हळुहळु तो त्याची भाषा शिकला.
परीक्षाः
थान्यामध्ये पॅटन जोडप्याला एका मुलगा झाला. त्या मुलाच्या जन्माने त्यांना खुप आनंद झाला. परंतू तीन आठवडयातूनच एक भयानक ताप आला आणि त्या बाळाची आई मेली एका आठवडयानंतर ते बाळदेखील मरण पावले. पॅटन सुध्दा आजारी होता. त्याने स्वतः कबर खणली त्याच्या हातांनी त्याच्या बायकोला व मुलाला पुरले त्याचे दुःख भयानक होते परंतू पेट्रोन म्हणाला, “जर मला येशू आणि त्याची सहभागिता नसती तर मी वेडा झालो असतो."
जेव्हा तो थान्यात कार्य करीत होता तेंव्हा त्याचा जीवन नेहमीच धोक्यात होता. पुष्कळदा पाऊस पडत नव्हता जेव्हा कोणता आजार येई बेटातील लोक पेट्रोनला दोष देत आणि त्याला मारण्याचा प्रयत्न करीत परंतू देवाच्या सुरक्षितेचा हात नेहमी नेहमी त्याच्यावर होता व त्याचे सर्व धोक्यापासून संरक्षण करीत असे.शिवाय नेहमीच त्याच्या वस्तूंची तेथील लोक चोरी करत .एकदा तर तेथील लोकांनी त्याची सर्व पांगरायाची कपडे ही चोरून नेली .इतर वेळी स्वायपाकाची भांडी चोरली .एकदा पुढार्याकडे फारच विनती करून केटली मिळावीली ती सुद्धा विनाझाकनाची .
त्याच्यात एक विधी असायचा ज्यास ते नायाक असे म्हणत त्यात पुढारी ज्याच्यामुळे मृत्य येत असे त्याच्यासाठी काही मंत्र म्हणून व्यक्तीला बोलावत असे आणि त्या व्यक्तीने उष्टे केलेले अन्न आणून थुंकत असे . तेंव्हा पॅटन ने काही उष्टी फळे त्याच्या हातात दिली परंतु पॅटनला काहीही झाले नाही .यावरून ते दोन पुढारी फार आश्यर्यचकीत झाले व त्यांनी पटन कडून येशूची गोष्ट एकली .
पुष्कळ वेळेस देवाने त्या नरभक्षक लोकाच्या हातून सेवकाचे प्राण वाचवले.
अनिव्हा मध्ये:
जॉन पॅटन पुन्हा लग्न केले आणि न्यू हेब्रिटस मध्ये आला. परतू या वेळेला तो अनिव्हा बेटावर गेला. तेथे त्याचा प्रेमाणे स्वीकार केला. सेवा वाढली. एक वडील पुढारी तारला गेला. लोकांना कपडे घालण्याचे शिकवले गेले. एकदा पॅटन एका लाकडाच्या तुकडयावर काही लिहून ते लाकूड एका माणसाच्या हाती देऊन ते त्याला बायकोला द्यावयास सागितले. पेट्रोनच्या बायकोने ते वाचले व पेट्रोनला जे पाहिजे होते ते दिले. तो अशिक्षित पुढारी आचंबित झाला की, या परदेशी माणसाने लाकडाच्या तकडयावर बोलावले आहे श्रीमती पॅटन जे लाकडावर लिहिले होते ते शांततेत वाचले . अशा प्रकारे लोक वाचायला आणि लिहायला शिकले.
अनिव्हा अगदी लहान बेट होते ७ मैल लांब व २ मैल रूंद होते. ते पूर्ण बेट ख्रिस्ताकडे आणण्यात आले. हे सर्व एक विहिर खोदल्याद्वारे झाले . अव्हीनामध्ये पिण्याच्या पाण्याचा तुटवडा होता. म्हणून पॅटन प्रार्थना केली आणि विहिर खोदायला सुरूवात केली ते आश्चर्य करित होते की, पाऊस खालून कसा काय पडेल ? ते जवळ येण्याला घाबरत होते. त्यांनी एकमेकांचे हात हातात घेतले आणि खाली डोकावले जॉन पॅटन त्यांना पाण्याची चव पहायला सांगितली. पुढाऱ्याने पाण्याला स्पर्श केला ते हालविले आणि पिऊन पाहिले, बस्स ऐवढेच तो ओरडला यहोवा हा सत्य परमेश्वर आहे ! कारण पेट्रोनने त्यांना सांगावे लागत होते की, यहोवा देवाने हे पाणी आपल्याला दिले आहे. मग त्या पुढाऱ्यानी सर्व लोकांना सर्व देवतांच्या मुर्ती जाळून टाकावयास किंवा पुरावयास लावल्या या प्रकारे ते संपूर्ण बेट ख्रिस्ताकडे आले.
![]() |
John-Paton-digged-well |
पॅटन ने त्यांच्यासाठी सन १८९९ मध्ये नवा करार प्रकाशित केला . त्या वर्षापासून २५ नरभक्षक बेटावर मिशनरी झाले होते.
वृध्दापकाळात सुध्दा हा देवाचा सेवक म्हटला कि, “अगदी पूर्ण बसू पर्यंत मी कार्य करीत राहीन" त्याप्रमाणे त्याने न्य ब्राइडसाठी कार्य केले तो ऑस्ट्रेलियाच्या लोकांना प्रार्थना आणि आवश्यक मदतीसाठी सदोदित हाक देत . याप्रकारे तो या बेटावर कार्य करीत राहिला. त्याचा मुलाने देखील थान्यामध्ये मिशनरी केले . बेटातील ज्या लोकांनी पेट्रोनला घालावून दिले होते तेच ख्रिस्ताकडे आले. शेवटी हजारो नरभक्षक लोक ख्रिस्ताकडे येत असतानाच जॉन पॅटन २८ जानेवारी १९०७ मध्ये वयाच्या ८३ व्या वर्षी देवाच्या गौरवी राज्यात प्रवेश केला. आता न्यू हेब्राइडस , थाना बेटासाहित तेथे पाच मिशनरी कार्य करीत आहेत.
Please Share it .....
May God bless you ....