झावळ्याचा रविवार Triumphant Entry
मसीहा ख्रिस्त येणार असल्याचे , जख-या संदेष्ट्याने केलेले भाकित पूर्ण होणार होते. मत्तय २१: १-११,
जख-या ९;९- सीयोनकन्ये, जोराने आनंदाचा गजर कर; यरुशलेमकन्ये, गजर कर; पाहा, तुझा राजा तुझ्याकडे येत आहे; तो न्यायी व यशस्वी आहे; तो लीन आहे; गाढवावर,गाढवीच्या पिलावर म्हणजे शिंगरावर बसून येत आहे .
येशू व त्याचे शिष्य बेथफगे व बेथानी येथे पोहचले. हि जैतूनाच्या ड़ोंगराजवळची दोन लहान गावे आहेत. यरूशलमेच्या बाहेर असलेली मोठी टेकडी म्हणजे, जैतूनाचा ड़ोंगर होय.
प्रभू येशूला माहित होते कि , तिथे एक गाढवी व शिंगरू तयार असेल , म्हणून त्याने ते शिंगरू आणण्यासाठी, आपल्या दोन शिष्यांना तिथे पाठवले, तेव्हा शिष्यांनी जाऊन येशूच्या आज्ञेप्रमाने केले. गाढवी व शिंगरू हि आणून त्यांनी त्यावर आपली वस्त्रे घातली व येशू तिजवर बसला.
गाढवावर बसणे
गाढवावर बसण्याचे अनेक कारणे होती , त्यामधील जख-या संदेष्ट्यानी केलेली भविष्यवाणी पूर्ण होणार होती . जख-या ९;९ त्याचप्रमाणे जून्या कराराच्या काळात घोड्याला युध्दाचा प्राणी मानले जात व गाढवाला शांतीचा प्राणी मानत असे.... प्रभू येशू शांतीच्या गोष्टी सांगण्यासाठी आला होता याचे हे संकेत होते.
गाढव हा प्राणी यहूदी लोकांसाठी सन्मानित सवारी समजली जात असे.
दावीद राजाने जेव्हा शलमोनाचा राज्यभिषेक केला , तेव्हा त्याने आपल्या खास गाढवावर बसण्याची आज्ञा दिली होती १राजे१;३३ त्याचप्रमाणे देवाचा सेवक बलाम याचा जीव देखील एका गाढवीने वाचवला होता.
गणना २२ : २१-२३
प्रभू येशू रथातून पण येऊ शकला असता , पण त्याने तसे केले नाही, तो लीन नम्र झाला , सर्व प्राण्यांपैकी एका गाढवाची निवड़ केली , गाढव हा ओझं वाहणारा प्राणी हे आपण पाहत असतो. गाढव जसे येशू प्रभूचे ओझे उचलून चालत होते, ते ह्या गोष्टीचे संकेत होते कि , या प्रमाणेच प्रभू येशू देखील सर्व मानवजातीच्या पापांचे ओझे, आपल्या स्वतःवर घेऊन, मानवाच्या उद्धारासाठी आपले बहुमोल रक्त वधस्तंभावर सांड़ून खंड़णी भरून देणार होता.
वस्त्रे वाटेवर पसरले
तेव्हा लोकसमुदायातील बहुतेकांनी आपली वस्त्रे वाटेवर पसरली.त्या काळाच्या प्रथेनुसार इस्त्रायल लोक , आपल्या राजाला अधिक सन्मान देण्यासाठी असे करत. २राजे९;१३ पण हे लोक कोणाच्या सांगण्यावरून नव्हे तर , स्वेच्छेने आले होते व घोषणा देऊन दाविदाच्या घराण्यातील येणा-या राजाचे स्वागत करत होते.
![]() |
लोकसमुदायातील बहुतेकांनी प्रभूयेशुसाठी आपली वस्त्रे वाटेवर पसरली. |
याचा अर्थ स्पष्ट होतो कि , येशू हा परमेश्वर आहे, गौरवाचा राजा आहे. म्हणून सर्व लोक , अनेक भागातून येऊन जमा झाले व "होसान्ना-होसान्ना", दाविदाच्या पुत्राला होसान्ना, "परमेश्वराच्या नावाने येणारा तो धन्यवादित असो"..."उर्ध्वलोकी होसान्ना"....असा आनंदाचा गजर करीत होते, कारण त्यांना येशूच्या राज्यात विश्राम भेटावा हा त्यामागचा उद्देश असावा.
ज्या वेळेस येशू येरूशलमेत आला तेव्हा एक घटना घड़ली ,ती म्हणजे उपस्थितीत लोक आनंद करत होते, घोषणा देत होते, पण त्यावेळेस लोकांचा आनंद बघून, येशू आनंदी झाला नाही, तर त्यांच्याकडे पाहून रड़ला... लूक १९ : ४१-४४
कारण हे घोषणा करणारे वर्तमानकाळ बघत होते, तेव्हा प्रभू येशू त्यांचा भविष्यकाळ बघत होता.
ओरड़णारे , घोषणा देणारे यांनी शांतीच्या गोष्टी जाणून घेतल्या नाही. परमेश्वराची योजना, कृपेचा समय ओळखला नाही, या लोकांचा भविष्यकाळ बघून येशूला रड़ू कोसळले.
आज जगात देखील घोषणा सुरू आहे, लोक वेगवेगळ्या माध्यमातून मिंटीग, सभा, चिन्ह,चमत्कार,भविष्यवाण्या याद्वारे घोषणा, गजर करत आहेत.
जे लोक येशू समोर घोषणा देत होते, तेच लोक ठिक पाच दिवसांनंतर ओरडून ओरडून म्हणत होते,याला (येशूला) क्रूसावर चढवा , बरब्बाला सोड़ा. लूक २३:१३-२५. पिलाताने या लोकांना सांगितले कि , येशूला देह दंड द्यावा असा काही दोष त्याच्याठायी दिसत नाही, तर यहुद्याच्या नियमाप्रमाणे आजच्या दिवशी एका आरोपीला सोड़तात तर प्रभूयेशूला सोडून द्यावे का ? तेव्हा "होसान्ना" म्हणणारे लोक म्हणाले, येशूला नको बरब्बाला सोड़ा.... त्यावेळी पिलात म्हणाला मी , येशूला जी शिक्षा देतो त्यात माझा दोष नाही. तेव्हा उपस्थितीत लोक म्हणाले, याच्या रक्ताचा दोष आम्हांवर व आमच्या मुलांबांळावर असो .
प्रियांनो
आज आपण देखील घोषणा करतो, प्रभू येशूख्रिस्ताच्या येण्याची वाट पाहत आहोत , पण हे करत असताना , आपल्या वरील व आपल्या मुलांबांळावरील प्रभू येशूच्या रक्ताचा दोष माफ झाला कि नाही,याची खात्री करा.... वेळ अजून गेलेली नाही , कोणास ठाऊक प्रभू येशू कोणत्या घटकेस येईल,आजचीं संधी सोड़ू नका,कारण येशूने सांगितल्याप्रमाणे तो पून्हा येणार आहे आणि आम्हा प्रत्येकाला त्याला हिशोब द्यावा लागेल...म्हणून आजच आम्ही समय ओळखून शांतीच्यागोष्टी जाणून घेऊ व देवाची कृपा आमच्या जिवणासाठी आणि आमच्या कूटुंबासाठी समजून घेऊया. .....!!!
अधिक तारणाविषयी ऐकण्यासाठी वरील व्हिडीओवर क्लिक करा 👆
परमेश्वर आपणा सर्वांना आशिर्वादित करो.