सार्वत्रिक मंडळी किंवा चर्च म्हणजे काय ? Universal Church
देवाची सार्वत्रिक मंडळी
मंडळी किंवा चर्च म्हणजे काय ?
मंडळी किंवा चर्च म्हणजे देवाने जगातून बोलावलेले, ज्यांच्या अंतःकरणात पवित्र आत्म्याचे वास्तव्य आहे असा विश्वासणाऱ्यांचा समुदाय म्हणजे मंडळी!
ज्यांचे तारण झाले आहे ते ख्रिस्ताच्या मंडळीत सामील आहेत. मंडळीसाठी' मूळ नव्या करारात जे ग्रीक शब्द वापरले आहेत त्यांचा अर्थ 'पाचारण करणे' किंवा 'बोलावलेले' असा आहे.
तारण ही वैयक्तिक बाब आहे. आपले आईवडील ख्रिस्ती आहेत म्हणून आम्हीही ख्रिस्ती आहोत हा चुकीचा विचार आहे. आपले स्वतःचे तारण होत नाही, तोपर्यंत आपण ख्रिस्ती या संज्ञेस पात्र नाही. तारण झाल्यावर तो व्यक्ती देवाच्या कुटंबातला एक होतो. इतर ख्रिस्ती लोक त्याचे भाऊ बहीण होतात. तारलेल्या मनुष्याचे नाते देवाशी आणि इतर विश्वासणाऱ्यांशी जुळते.
![]() |
what-is-the-church |
मंडळी हा शब्द नव्या करारात दोन अर्थाने योजिला आहे.
१. सार्वत्रिक मंडळी : सार्वत्रिक मंडळी सर्व जगातील, सर्व काळातील विश्वासणारे. या मंडळीला अदृश्य मंडळीही म्हणतात. या मंडळीचे दोन विभाग आहेत - विजयी मंडळी व झगडणारी मंडळी. ख्रिस्तामध्ये मरण पावलेल्यांना विजयी मंडळी म्हटले आहे. आणि जे विश्वासणारे अजून या जगात आहेत त्यांना झगडणारी मंडळी म्हटले आहे.
२. स्थानिक मंडळी : विश्वासणाऱ्यांची दृश्य संघटना.
अ) ख्रिस्ती लोकांचा एक लहानसा गट - रोम.१६:५ - जी मंडळी त्यांच्या घरी असते तिलाहि सलाम सांगा.
ब) एका गावातील किंवा शहरातील ख्रिस्ती समाज -१ करिंथ.१:१ - करिंथ येथील देवाच्या मंडळीस ...
क) एखाद्या देशातील किंवा राष्ट्रातील ख्रिस्ती मंडळ्यांचा गट – गलती १:१ - गलतियातील मंडळ्यांना ...
स्थानिक मंडळीचा सभासद झाल्याने सार्वत्रिक मंडळीमध्ये प्रवेश झाला असे होत नाही कारण स्थानिक मंडळीमध्ये सर्वच सभासदांचे तारण झालेले असेल असे नाही. नव्या कराराच्या काळातसुद्धा याचे उदाहरण आढळते.
१ योहान.२:१९ - आपल्यातून ते निघाले तरी ते आपले नव्हते.ते आपले असते आपल्याबरोबर राहिले असते..
(हे लोक काही कारणाने स्थानिक मंडळीतून बाहेर पडले यावरून आम्हांला समजले ते खरोखर आमचे ख्रिस्तामधील भाऊ नव्हते, असे योहान म्हणतो.)
परंतु सार्वत्रिक (अदृश्य) मंडळीमध्ये मात्र तारलेले लोकच असतात.
सार्वत्रिक मंडळी
सार्वत्रिक मंडळीचे मस्तक प्रभू येशू ख्रिस्त आहे.
कलस्सै.९:१८ - तोच शरीराचे म्हणजे मंडळीचे मस्तक आहे. मंडळीची स्थापना व्हावी म्हणून ख्रिस्ताने स्वतःचा प्राण दिला.
इफिस.५:२५ - ख्रिस्ताने मंडळीवर प्रीति केली आणि स्वतःचे तिच्यासाठी अर्पण केले. सध्याच्या काळात देव त्याची मंडळी तयार करीत आहे.
![]() |
Universal-church |
मंडळीची स्थापना
मत्तय. १६:१६ ते १८ - शिमोन पेत्राने उत्तर दिले, आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहा. येशूने त्याला म्हटले ...आणि या खडकावर मी आपली मंडळी रचीन.
येशु देवाचा पुत्र आहे. या सत्यावर देवाची मंडळी रचली आहे. ख्रिस्ताचे पुत्रत्व नाकारणारे लोक संपूर्ण ख्रिस्ती विश्वासाचा नाश करतात . पेंटेकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्मा उतरला तेव्हा मंडळी स्थापन झाली. ख्रिस्ती मंडळीत प्रवेश होण्यासाठी तारण होणे अगत्य आहे, प्रेषित २;४७ .
मंडळीची प्रतीके
१. शरीर - कलस्सै.१:१८ - तोच शरीराचे म्हणजे मंडळीचे मस्तक आहे. प्रभू येशू ख्रिस्त मंडळीचे मस्तक आहे.मंडळी त्याचे शरीर आहे.विश्वासणारे त्या शरीराचे अवयव आहेत. कलस्सै.२:१९ - त्या मस्तकापासून सर्व शरीराला सांधे व बंधने यांच्या योगे पुरवठा होत आहे व ते दृढ जडले जात असता त्याची ईश्वरी वृद्धी होते.
२. मंदिर - १ करिंथ.३:१६ - तुम्ही देवाचे मंदिर आहा. विश्वासणारे देवाचे मंदिर आहेत.प्रभू येशू ख्रिस्त कोनशिला आहे आणि विश्वासणारे या इमारतीचे धोंडे आहेत. देवाची मंडळी पूर्ण होण्यासाठी ते एकत्र रचले जातात.
३. ख्रिस्ताची वधू – २ करिथ.११:२ - तुम्हांविषयी माझी आस्था ईश्वरप्रेरित आस्था आहे; मी एका पती बरोबर तुमचे वाग्दान केले आहे. अशा हेतूने की तुम्हांला शुद्ध कुमारी असे ख्रिस्ताला सादर करावे.
प्रकटी.१९:७ - कारण कोकऱ्याचे लग्न निघाले आहे आणि त्याच्या त्याच्या नवरीने स्वतःला सजविले आहे.
खिस्ताचे व त्याच्या मंडळीचे नाते किती निकटचे आहे हे या प्रतीकांवरून स्पष्ट होते. विश्वासणाऱ्यांचे एकमेकांशी तसेच निकटचे नाते आहे.
मंडळीची वैशिष्ट्ये
१) एकता २) पवित्रीकरण ३) सार्वत्रिकता ४) प्रेषितपरंपरा.
१. एकता
मंडळीची एकता ख्रिस्तामध्ये आहे.
गलती ३:२८ - यहूदी व हेल्लेणी,दास व स्वतंत्र,पुरुष व स्त्री.हा भेद नाही; कारण तुम्हें सर्वजण ख्रिस्त येशूच्या ठायी एकच आहा.
इफिस.४:५,६ - प्रभु एकच विश्वास एकच.बाप्तिस्मा एकच.सर्वांवर आणि सर्वांमधून आणि सर्वांच्या ठायी असलेला देव जो सर्वांचा पिता तोही एकच आहे. तर विश्वासणाऱ्यांचे नाते ख्रिस्ताशी आहे म्हणून मंडळीमध्ये एकता आहे. ही एकता मानवाने साधलेली नाही. ख्रिस्त हाच या एकतेचा पाया आहे.
२. पवित्रीकरण
पवित्रीकरणाचा मूळ अर्थ वेगेळे करणे असा आहे .
अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा - 👉 पवित्रीकरण म्हणजे काय ?
३. सार्वत्रिकता
खिस्ताची सुवार्ता सर्वांसाठी आहे. जो कोणी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो . तो देवाच्या मंडळीत प्रवेश करतो याहून दुसरी अट नाही.
४ प्रेषितीय परंपरा
१. प्रेषित व संदेष्टे या पायांवर तुम्ही रचिलेले आहा इफिस.२:२०.
२. प्रेषितांनी नव्या करारात दिलेल्या शिक्षणाशी सभासदांनी सतत चिकटून राहावे. या दोन गोष्टींचा यात अंतर्भाव होतो.
ते प्रेषितांच्या शिक्षणात, सहवासात, भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात तत्पर असत” प्रेषित.२:४२.
मंडळीचा उद्देश
१. देवाची आराधना व गौरव करणे
इफिस.१:५,६ - त्याने आपल्या मनाच्या सत्संकल्पाप्रमाणे आपल्याला येशू ख्रिस्ताच्या द्वारे स्वतःचे दत्तक होण्याकरिता प्रेमाने पूर्वीच नेमिले होते. त्याच्या कृपेच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून हे झाले. ही कृपा त्याने आपल्यावर त्या प्रियकराच्या ठायी विपुलतेने केली आहे.
२. सुवार्ता गाजविणे
मत्तय. २८:१९,२० - यास्तव तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य करा; त्यास पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नामाने बाप्तिस्मा द्या. जे काही मी तुम्हांस आज्ञापिले ते सर्व त्यांस पाळावयास शिकवा.
३. ख्रिस्ती शिक्षण देणे
१ थेस्सल.५:११ - यास्तव तुम्ही एकमेकांचे सांत्वन करा व एकमेकांची उन्नति करा.
इफिस.४:११-१५ वाचा.
४. साक्ष देणे
प्रेषित. १:८ ......पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल.
मंडळी हा विचार ख्रिस्ती लोकांच्या दृष्टीने श्रेष्ठ व महत्त्वाचा आहे. या जगात ख्रिस्ती लोकाची संख्या फार अल्प आहे. अनेक ठिकाणी ते तुच्छ मानले जातात. काही ठिकाणी त्यांचा छळही होत आहे. विश्वासणारे देवाच्या सार्वत्रिक अदृश्य मंडळीचे घटक आहेत व त्या मंडळीचा विचार केला, तर विश्वासणाऱ्यांची संख्या अल्प नाही, हे कळून येते. जे
“तर मग आपण एवढ्या मोठ्या साक्षीरूपी मेघाने असलेले आहो म्हणून आपणहि सर्व भार व सहज गुंतविणारे पाप टाकून, आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे," इब्री.१२:१
स्थानिक मंडळी मधूनच सार्वत्रिक
मंडळीत प्रवेश होतो , म्हणूच स्थानिक मंडळी मध्ये सभासदत्व असणे फार गरजेचे आहे.
स्थानिक मंडळी वाचण्यासाठी 👈 विषयी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
खरच खूप मार्मिक शिक्षण आणि शिकण्यालायक आहे.. धन्यवाद पा. शेळके
खुपच छान शिक्षण