मेरी स्लेसर, Mary Slessor Missionary Biography
आफ्रिकेची गोरी राणी
Mary Slessor Biography
मेरी स्लेसर १८४८-१९१४
Mary-slessor-biography |
ती सडपातळ मेरी धीटाईने म्हणाली, “तुम्हाला जे आवडते ते तुम्ही करू शकता." आणि तशीच उभी राहिली. गरगर फिरणारा गोळा बांधलेला एक साखळदोर तिजकडे जवळ जवळ येत होता .परंतु मेरी न डगमगता धैर्याने उभी राहिली. ती झोपडपट्टी भागातील मूलांसाठी बायबलचे वर्ग घेत होती. ते वर्ग बंद करण्याच्या निश्चयाने, हे सर्व दंगेखोर हया मूलीबरोबर अशाप्रकारे गैरवर्तन करीत होते.
![]() |
Mary-teaches-the-children |
धैर्याने उभा असलेल्या मेरीला पाहून, त्यांचा द्वेष कौतूक नवलाई मध्ये बदलला. ती संपूर्ण टोळी तिच्या सभेमध्ये जाऊन बसले. तोच त्या दंगेखोरांच्या नायकाच्या जीवनातील कलाटनीचा प्रसंग होता.
तरूण मेरी mary slessor early life
मेरी स्लेसरचा जन्म स्कॉटलंड मध्ये २ डिसेंबर १८४८ मध्ये झाला. तिचे आईबाप फार गरीब होते. जेव्हा मेरी ११ वर्षांची होती तेंव्हापासून आई-वडिलांना मदत करण्यासाठी ती एका कारखाण्या मध्ये सकाळी ६ पासून सायंकाळी ६ पर्यंत काम करीत असे. त्यानंतर ती रात्रीच्या शाळेमध्ये शिक्षण घेण्यासाठी जात असे. ती कारखानात काम करत असताना ही तिचे बायबल वेळ मिळेल त्याप्रमाणे वाचत असे . प्रभू तिच्या फार जवळ होता आणि तो नेहमी तिजबरोबर बोलत असे. योहानाचे शुभवर्तमान हे तिचे आवडीचे पूस्तक होते. मेरी नेहमी रात्री बायबल वाचन करीत असताना झोपायचे विसरून जाई .
मेरीचे वडील दारूडे होते आणि सतत ते तिच्या आईला मारत असत .तिचे जीवन फारच खडतर होते . ते कधी कधी मेरीला बाहेर काढून देत . ती रस्त्यावर फिरे आणि अंधारात रडत असे. परंतू या सर्व तसदींनी तिला भविष्यातील जीवनासाठी बळकट केले होते.
मेरीची आई चांगली ख्रिस्ती होती. ती लेकरांना तिच्याभोवती जमा करीत असे आणि येशू बद्दल त्यांना सांगत असे काही मुलांनी येशूबद्दल एकदाही ऐकले नव्हते. मेरीला मिशनबद्दलची इच्छा तिच्या आइपासून मिळाली होती. त्या दिवसांत मेरी तिच्या आईला सांगे,“मम्मी, मला मिशनरी व्हायचे आहे आणि त्या काळया मूलामूलींना शिकवायचे आहे.”
खेळ खेळते वेळी, ते संदशोप्रमाणे खेळत असत. मेरी काल्पनिक काळया मुलांना सुवार्ता सांगत . त्या मुलांना आफ्रिकेबद्दल खूप चांगली माहिती होती. त्यांचा भाऊ रॉबर्ट मिशनरी म्हणून आफ्रिकेला जाण्यास उत्सुक होता . त्यांच्या आईला देखील वाटले होते की, रॉबर्ट आफ्रिकेला मिशनरी म्हणून जाईल परंतू थोड्याच दिवसात ,मेरी १४ वर्षांची असतानाच तिचे वडील आणि दोन भाऊ (त्यांच्यापैकी एक होता रॉबर्ट) वारले होते. तेंव्हा कुटूंबाची सर्व जबाबदारी मेरीवर आली , म्हणून मेरीला नेहमीच स्वतःचा त्याग करून कुटुंबासाठी जगावे लागे. परंतू या सर्व त्रासांमध्ये मेरी पहिल्यापेक्षा अधिक सहनशील आणि धीट झाली .
आफ्रिकेला बोलावणे
मेरी आफ्रिकेला मिशनरी म्हणून जाण्यापूर्वी तिने स्वतःच्या शहरात ख्रिस्ताची सेवा संपूर्ण हृदयाने करीत होती. जर आम्ही आमच्या घरात व समाजात विश्वासू असलो तरच आम्ही इतर ठिकाणी देखील साक्षी होऊ शकतो. मेरी कारखानामध्ये १० तास कष्ट करीत असे. व त्यानंतर ती जितके तिला सेवा करता येईल तितके ख्रिस्तासाठी ती करीत राहत होती. तिने अशाप्रकारे १४ वर्षे सेवा केली. परंतू अजूनही आफ्रिकन जंगल आणि झोपडयाबद्दलचा दृष्टांत हे तिच्या डोळयासमोर नेहमी असे.
एक दिवस डेव्हीड लिव्हींगस्टन हा आफ्रिकेतील मिशनरी मरण पावल्याची वाईट बातमी स्कॉटलंडला पोहचली. आता प्रश्न उभा राहिला की. "कोण ती जागा घेईल ? " या आव्हानाने मेरीच्या विचारांना आफ्रिकेला जाण्यासाठी मजबूती दिली. मेरीने याबद्दल आपल्या आईला सांगितले. तिच्या आईने परवानगी दिल्यावर मेरीने ताबडतोब मिशन बोर्डाला लिहिले. लगेच मिशन बोर्डाने तिला होकार कळवला कि , आफ्रिकेमधील कालबर मध्ये मिशनरी म्हणून तिचा स्विकार करण्यात आला आहे.
सन १८७६ मध्ये एके सकाळी, स्टीम जहाजाच्या वरच्या मजल्यावर उभे राहून मेरी स्लेसरने तिच्या मित्रांची रजा घेतली. त्या जहाजामधील अमेरिकेला जाणारे व्हिस्कीचे ड्रम पाहून ती म्हणाली, “इतके गॅलन व्हिस्की, परंतू फक्त मिशनरी एकच” ती निराश झाली होती. जहाजामधील मित्राने आफ्रिकेमधील सर्व माहिती दिली. त्याने घनदाट अरण्याबद्दल संगितले, डोंगरातून वेगाने वाहणाऱ्या नदया , जे गोऱ्यांनी कदाचित पाहिले नसावे, एकाएकी येणारे प्रचंड तूफान वादळ व त्यामुळे झोपडया उडून जाणे आणि झाडे मुळासकट उखडून जाणे. त्याने पानघोडयांबद्दल, मगरी, हत्ती, बिबटे आणि सर्प यांच्या बाबतीतही वर्णन केले होते.
मेरी आफ्रिकेमध्ये
ते डयूक शहराच्या बंदरात जाऊन पोहचले. येथे मेरीने ४ वर्षे लोकांमध्ये सेवा केली आणि त्यांची भाषा शिकली व अधिक त्या लोकाबद्दल अभ्यास केला . लवकरच तिने स्वताला त्या लोकांमध्ये सामावून घेतले . परंतू तिच्या हृदयातील इच्छा आफ्रिकेतील आतील भागात जाण्याची होती ,जेथे कोणासही ख्रिस्ताबद्दल माहित नव्हते.
अंधारखंड
फारच लवकर मेरीला हे समजले की, आफ्रिकेला अंधारखंड का म्हटले जायचे. तेथे पाप होते, विश्वासघात होता, घाण, गुलामगिरी सर्वत्र पाहायला मिळे, माणसे, स्त्रीया आणि मूले पकडली जायची आणि त्यांना निष्ठूरपणे गुलाम म्हणून विकले जाईल. त्यांना जनावरांपेक्षा फार वाईट वागणूक देत. जे लोक तेथे राहत ते फार दृष्टतेने एकमेकांशी लढाई करीत. नेहमीच ते दुष्ट आत्म्याच्या भीतीमध्ये जीवन जगत .त्यांना वाटे की, ते आत्मे सर्व झाडांत, नदी किंवा तळयांमध्ये राहतात. लोक त्यांचा वेळ दारू पिण्यामध्ये, नाच करण्यामध्ये घालवत व एक वंश दूसऱ्या वंशाबरोबर भांडत असे. त्यांच्या वंशापैकी एक वंश हा नरभक्षक म्हणून ओळखला जायचा. दैवतांना खूष ठेवण्यासाठी ते प्राण्यांचे रक्त सांडीत असत.
![]() |
mary-slessor-biography |
जर एखादा आफ्रिकेतील पुढारी मेला, तर इतर प्रमुख लोक त्याची बायको आणि मुले यांना कापून सोबतीकरीता त्याच्याबरोबर त्यांना पूरीत असत. कोणी हा गुन्हा केलेला आहे. त्याला ते शोधून काढण्यासाठी ते संशियाताना पकडून त्यांना विष प्यायला दिले जाई किंवा त्यांचे हात उकळत्या तेलामध्ये ठेवायला सांगितले जाई . जर जुळे जन्मले तर त्यांना मारून टाकीत ते असा विचार करीत की, ते सैतानाने पाठविले आहे किंवा त्यांना भुकेल्या चीत्ता समोर पुढे टाकीले जाई. आणि आईला जंगलात एकटे सोडले जाई . या लोकांनी कधीही येशूबद्दल किंवा येशूबद्दलच्या प्रिती बद्दल ऐकलेले नव्हते . त्यांना हे देखील माहित नव्हते की, येशू त्यांना त्यांच्या पापांतून मोकळे करून त्यांचे जीवन शुध्द आणि आनंदीत बनविल.
"माँ स्लेसर" Mary slessor and twins
एके दिवशी मेरीने ऐकले की, एका आफ्रिकन बाईला जुळे मुले झाले आहेत . मेरी तिच्या झोपडीकडे गेली. तेथे असलेल्या आजीबाईंना तिने विचारले, “तुम्ही हया बाळांचं काय करणार आहात ? ती म्हणाली की, ते त्यांच्या पाठी मोडतील आणि त्यांना झुडूपांमध्ये फेकून देतील.मग मेरीने तिला विनती करून ती बाळे माघून घेतली आणि तिने ती घरी नेली व वाढविली. परंतु एका नातलगाने येऊन एका बाळाला चोरून नेऊन त्याने ते मारून टाकले. परंतू मेरीने मुलगी बाळाला दत्तक घेतले. तिचे संगोपन व संरक्षण केल
![]() |
mary-slessor-and-twins |
. मेरी त्याच लोकांप्रमाणे गवती छपरात राहत असे आणि मासे खात असे. मासे, याम व केळी जसे ते लोक खात तसे ती देखील अन्न खात असे. ती त्या लोकांसाठी एक शिक्षिका म्हणून काम करीत होती. ती त्यांच्यासाठी कपडे शिवून देई, आजाऱ्यांची सेवा करून, त्यांच्यातील भांडणे-झगडे सोडवीत असे. तिने आईप्रमाणे माया दाखवल्यामूळे, लोक तिला “माँ” म्हणत. ती “माँ स्लेसर" नावाने प्रसिध्द झाली.
प्रदेशांतील आतील भागात
मेरीला आतील प्रदेशात जावयाचे होते जो फार घनदाट झाडाझुडूपांनी भरलेला होता. तेथील लोक फार निष्ठूर होते. ते समुद्र किनारी बसणाऱ्या लोकांचे शत्रू होते. जरी मिशनने तिला तिकडे जाण्यास मनाई केले होते , तरी एके रात्री ३ आफ्रिकेन मूले, एक आफ्रिकन मुलगी आणि एक बाळ या सर्वांसाबेत तिने जंगलातून प्रवास करावयास सुरूवात केली.
जेव्हा ते एका खेडयात पोहचले त्यांनी त्यांच्यासाठी एक घर उभे केले. बांबूच्या झोपडीत मातीची भांडी होती. झोपडीमध्ये पूरेशी जागा नसल्यामूळे त्यांनी ती भांडी बाहेर टांगली होती. त्यांनी चर्च बांधायला सुरूवात केली. मेरीने त्या खेडयातील लोकांना काही कपडे दिले. तिने त्यांना स्वयंपाक करावयाचे व कपडे शिवण्याचे शिक्षण दिले. तिने लेकरांना वाचायला व लिहायला शिकविले आणि येशूबद्दल सुध्दा सांगितले.
गोरी राणी
मेरीने अनेक मैल चालून जाऊन त्यांच्यामध्ये असलेली अनेक भांडणे मिटविली . एक दिवस तिने ऐकले की, लवकरच एक युध्द सुरू होणार आहे. मग एकटीच ती अंधारातील जंगलात चालत गेली आणि देवाला प्रार्थना केली की, देवाने तिला जंगली पशूपासून सुरक्षित ठेवावे. तिला हे धैर्य कसे मिळाले ? ती जन्मताच धैर्यवान होती काय ? नाही. स्कॉटलंड मध्ये जर एखादी गाय शेतात चरत असेल तर तिला त्या मार्गाने जाण्याची भीती वाटत असे. तिच्यामध्ये वास करणारा पवित्र आत्मा तिला धैर्य देत होता. फार लवकरच तिला नितीमान न्यायाधीश म्हणून स्विकारण्यात आले होते. म्हणून तेथील नेते मंडळी तिच्याकडे नेहमी येऊन तिचा सल्ला घेत असत. एक समयी एक झगडा मिटवावयास पूर्ण दिवस खर्च करावा लागत असे. तिचा सल्ला नेहमी स्विकारण्यास येत असे. कारण ती नेहमीच खरी होती आणि लोकांना माहित होत की, ती कधीच चूकीचे करीत नाही. जेव्हा ब्रिटीश सरकारने तो प्रांत घेतला तेव्हा त्यांनी मेरीला त्यांची प्रतिनिधी म्हणून नेमले होते. तिला “गोरी राणी" म्हणत असत.
आफ्रीकन लोकांप्रमाणेच ती खूप साधे जीवन जगत असे. जो तुटपूंजा पगार तिला मिळत होता, त्यातून ती बचत करून आपल्या आईला व बहिणीला पाठवित असे. एक वाईट बातमी मिळाली की, त्या दोधी मायलेकी एका वर्षातच एकीनंतर एक मरण पावल्या होत्या. मेरीला असे वाटले की, तिला सर्वांनी सोडून दिले आहे. परंतू तिला तिच्या आफ्रिकन कुटूंबामध्ये आता पुष्कळ मुले होती. ती जुळी किंवा गुलाम किंवा अनाथ होती ज्यांना तिने सोडवून आणून त्यांचे सरक्षण केले होते. मेरी तिच्या कार्यात इतकी मग्न होती की, तिला आठवडयाचे वार देखील ध्यानात राहत नव्हते. तिच्या कार्यामध्ये तिच्या मित्रांच्या प्राथनेने तिला मदत केली होती.
आफ्रिकेसाठी इच्छातिच्या आजारपणामुळे तिला स्कॉटलंडला नेण्यात आले होते. ती बरा झाल्याबरोबर ताबडतोब तिला आफ्रिकेला पाठवावे असे तिला वाटायचे किवा असे म्हटले जायचे की, ती पोहत-पोहत आफ्रिकेला जाईल. कारण तिला, ख्रिस्ताविना पुष्कळ लोक मरत आहेत असे वाटे. जेव्हा ती आफ्रिकेला परतली तेव्हा ती त्या नरमांसभक्षक लोकांमध्ये व गुलामांचा व्यापार करणाया लोकांमध्ये बीनधास्त गेली. जरी ती वयोवृध्द होत होती, ती तिचे काम चपळाईने करीत असे. ती खेडेगावांत सायकलवरून प्रवास करीत असे कधी-कधी लोक तिला खर्चीत बसायला लावीत आणि उचलून नेत असत.
ब्रिटीश सरकारने त्या भागातील न्यायाधीश म्हणून तिच्या कार्याची प्रशंसा केली. मेरी स्लेसर ही ब्रिटीश राजवटीतील पहिली महिला न्यायाधिकारी होती. सुरूवातीला तिच्या कार्याची माहिती कोणालाही नव्हती. परंतू लवकरच तिचे कार्य बाहेरच्या जगापुढे प्रकट करण्यात आले. ब्रिटीश राजाने तिला “ चांदीचा क्रूस " तिच्या चांगल्या कार्याचे पारितोषिक म्हणून दिला. जे देवाचा सन्मान करतात , अशाप्रकारे देव त्यांचा सन्मान करतो.
गौरवामध्ये विश्रांती mary slessor death
मेरी स्लेसर पुन्हा तिच्या मातृभूमीला गेली नाही. तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत तिला आफ्रिकेमध्येच सेवा करण्याची इच्छा होती. ती आजारपण व म्हातारपणापुढे कधीच झूकली नाही. जरी ती आजारी पडली आणि तिला हालचाल करता आली नाही, तरी ती बिछाण्यात पडल्या-पडल्या प्रार्थना करीत असे. तिचे विचार स्वर्गाकडे वळाले. शेवटी १३ जानेवारी १९५१ रोजी तिच्या महान राजाच्या समक्षतेत तिच्या विश्वासू व प्रामाणिक कार्याचा आशिर्वाद घेण्यासाठी गेली. तिचे बायबल तिच्या बिछाण्यात तिच्या बाजूलाच होते. तिच्या सर्व धडपडीत तेच साक्षीदार होते. त्या बायबलमध्ये सर्वत्र संदर्भ आणि टिप्पने लिहिलेली होती. तिची संपत्ती म्हणजे काही जून कपडे, थोडी पूस्तके आणि ढीगभर पत्रे मागे सोडली . जरी ती एक गरीब जीवन जगली होती. तरी तिने खरोखर पुष्कळांना धनवान केले.
![]() |
Mary-Slessor-tomb |
एक सडपातळ आणि भित्री स्कॉटलंडची स्त्री एक उपयोगी व परिपूर्ण जीवन जगली आणि आशिर्वाद मिळविण्यासाठी दूर निघून गेली. कारण तिने तिच्या सर्व मार्गात देवाचे आज्ञापालन केले होते.
तुमचे जीवन सुध्दा आर्शीवार्दीत होईल.जर तुम्ही वाईट जीवन सोडून येशूचे अनुकरण कराल .
एका गरीब कुटूंबात जन्म घेऊन, मेरी स्लेसर तिच्या बालपणापासून ख्रिस्ताचा प्रेमात वाढली. तिच्या घरातील बिकट परिस्थितीमूळे तिने कारखान्यात काम केले आणि रात्री शाळेत जाऊन अभ्यास केला. अशा परिस्थितीत असतांना, तिच्या आईने तिच्या लेकरांना येशूच्या प्रेमाबद्दल आणि काळया आफ्रिकन मूलांबद्दल ज्यांनी येशूबद्दल कधीच ऐकले नाही. आपल्या भोवती बोलावून शिकविले होते. नंतर मेरी स्लेसरने निर्णय घेतला, “मी मिशनरी म्हणून आफ्रिकन मुलामुलींमध्ये जाईन आणि त्यांना शिकवीन.” ती तिच्या निर्णयात पक्की होती. प्रभू तिला तेथे घेऊन गेला. तिने आपले संपूर्ण जीवन त्या अंधारखंडात घालविले, आणि पुष्कळ लोकांना ख्रिस्ताकडे वळविले. प्रिय तरूणांनो, तुम्ही ख्रिस्ताकरिता तुमचे जीवन कसे खर्च करित आहात ? मेरी स्लेसर स्त्री असतांना प्रभूकरिता महान गोष्टी करू शकली.
आपल्या देशातील खेडयांमध्ये पुष्कळ लोकांना ख्रिस्ताबद्दल काहीच माहित नाही. तुम्ही त्यांच्या करिता काय करणार आहात ? तिच्या फार कठीण सेवेमध्ये सुध्दा तिने आपल्या कुटुंबावर प्रेम केले. तिला जो तुटपुंजा पगार मिळत होता. त्यापैकी काही भाग तिने आपल्या कुटुंबाकरिता घालविला. प्रिय तरूणांनो, तुम्ही कोणत्याही उच्चपदावर विराजमान झालेले असाल, तरी तुम्ही तुमच्या आई-वडिलांना विसरता कामा नये. तुम्ही त्यांचा सन्मान करावा. एवढेच केवळ नाही, तुम्ही देवाची सेवा तुमच्या मंडळीमध्ये केली पाहिजे, जेव्हा आम्ही हे करू, तेंव्हा देवबाप आम्हाला उंच करील.
Please Share and be blessed ....🙏