Haldi Ceremony in Christian Marriages! ख्रिस्ती विवाहात पाळल्या जाणाऱ्या अनिष्ट रूढीपरंपरा
ख्रिस्ती विवाहात पाळल्या
जाणाऱ्या अनिष्ट रूढी आणि परंपरा व त्याचे दुष्परिणाम
प्रभू येशू ख्रिस्त आपल्या वधूला घेऊन जाण्यासाठी लवकरच परत येत आहे. त्याची आज्ञा आहे कि, तो येण्यापूर्वी त्याची वधू पूर्ण तयारीत असावी, ती डागविरहित व सुरकुतीविरहित असावी. म्हणजेच तिचे पवित्रीकरण झालेले असावे.
आजकाल ख्रिस्ती जीवनात अनावश्यक रूढी परंपरानां देववचानापेक्षाही सरार्सपणे अधिक महत्व दिले जाते. वैयक्तिक इच्छा पूर्ण करण्याकरिता बायबल पेक्षा संस्कृतीवर जास्त भर दिला जातो . ज्या ठिकाणी देवालाच प्राधान्य दिले जात नाही. त्या ठिकाणी देवाच्या आशीर्वादाची अपेक्षा कशी करू शकतो ? काय या अनिष्ट रुढी परंपरामध्ये गुरफटलेल्या वधूला ख्रिस्त स्वीकारेल का ?
परमेश्वर देव म्हणतो, 'अज्ञानामुळे माझे लोक बंदिवासात गेले आहेत' [यशया ५:१३]
विवाहाच्या
निमित्ताने दोन कुटुंबे परस्परांशी अनेक तडजोडी करीत असली तरी विश्वासणाऱ्या वधुने
अथवा वराने आध्यात्मिक तडजोड़ मुळीच करू नये, आध्यात्मिक जीवनावर
परिणाम करणाऱ्या अशा, सैतानी तडजोडींचा ठामपणे प्रतिकारच
करावा. आपण मनुष्यांपेक्षा देवाचे, ऐकले पाहिजे. ख्रिस्ती जीवनशैलीनुसार, आपल्या प्रत्येक वस्तू , कार्य , हे केवळ परंपरेसाठी किंवा
बाह्य सौंदर्यासाठी नव्हे, तर देवभक्तीशी सुसंगत असावी.
१ करिंथ १०:३१ – " म्हणून
तुम्ही खाता, पिता किंवा जे काही करता ते सर्व
देवाच्या गौरवासाठी करा.”
म्हणूनच ,
प्रभूची इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रत्येक खिस्ती विश्वासी व्यक्तीने स्वतःच्या अंतःकरणाचे, मनाचे, वर्तनाचे, कुटुंबासहित कठोर परीक्षण नियमितपणे करण्याची आवश्यकता असते. प्रभूला न आवडणाऱ्या अनेक बाबी आपल्या आजूबाजूला असतात,म्हणून त्या आपल्या, अंगवळणी पडलेल्या असल्यामुळे आणि जरी आपले तारण झालेले असेल-नसेल , अर्धवट तारण असेल त्या आपल्याला खटकत नाहीत. अगदी सहजपणे त्यास सहमती दर्शवली जाते . परंतु त्याचा आपल्या खिस्ती जीवनावरच नव्हे तर संपूर्ण ख्रिस्ती समाजावर कळत-नकळतपणे गंभीर दुष्परिणाम होत राहतात. वचनाविरुद्ध वागल्याने पवित्र आत्मा खिन्न होतो. हे नाकारू शकत नाही .
“ तुम्हांला पाचारण करणारा पवित्र आहे तसे
तुम्हीही सर्व प्रकारच्या आचरणात पवित्र व्हा.”
(१ पेत्र. १:१५).
अज्ञानामुळे ख्रिस्ती दैनेनदिन जीवनात अनेक रूढी परंपराचा शिरकाव झाला आहे.
या लेखात त्यापैकी अशा रूढी विषयी बघणार आहोत. ज्यांना पवित्र शास्रात काहीच आधार नाही. जसे कि,
- सुपारी फोडणे
- हुंडा मागणे .
- शुभमुहर्त पाहणे .
- हिरव्या बांगड्या घालणे.
- ओटी भरणे.
- ख्रिस्ती विवाहात विवाहपूर्वी वधुवरांना हळद लावणे . Haldi ceremony in Bible
- ख्रिस्ती विवाहात अमंगळ गीतांवर नृत्य करणे .
- कुलदैवातांच्या पाया पडायला जाणे .
- आशीर्वाद मिळवण्यासाठी आईवडिलांच्या पाया पडणे.
- कुंकू लावणे.
- मंगळसूत्र घालणे .
- जोडवे घालणे.
- बाळाला तीट लावणे.
- बाळाची दृष्ट काढणे.
- गळ्यात क्रॉस घालणे.
- चाळीसावा दिवस पाळणे.
- मृतांसाठी दिवस पाळणे. 👉 वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अनिष्ट रुढीं म्हणजे काय ?
ज्या रूढीचा देव वचनाशी मेळ बसत नाही आणि देववचनाच्या विरुद्ध असतात. अशा रूढींना
अनिष्ट रूढी म्हटले जाते . या लेखात अशा अनेक मानवी
, सैतानी किंवा मुर्तीपुजेतून उगम झालेल्या रुढींचे अभ्यास करणार आहोत .
अशा रूढी पाळणाऱ्यानां देवाच्या राज्यात बिलकुल प्रवेश नाही . हे मी सांगत नाही तर पवित्रशास्र सांगते. हे पुढील शास्र्लेखावरून स्पष्ट होते .अशा रुढींचा त्याग तातडीने करावा .
परमेश्वर देव आपणास परराष्ट्रीयांच्या रीतीरिवाजांविरुद्ध ताकीद देतो .[अनुवाद १८:९-१४]
" 9 तुझा देव परमेश्वर तुला जो देश देत आहे त्यात तू जाशील तेव्हा त्यातल्या राष्ट्रांप्रमाणे अमंगल कृत्ये करायला शिकू नकोस. 10 आपल्या मुलाचा किंवा मुलीचा अग्नीत होम करणारा, चेटूक करणारा, शकुनमुहूर्त पाहणारा, मंत्रतंत्र करणारा, जादूगार, 11वशीकरण करणारा, पंचाक्षरी, छांछू करणारा, अथवा मृतात्म्याला विचारणारा असा तुमच्यापैकी कोणी नसावा. 12 कारण जो कोणी असली कृत्ये करतो त्याचा परमेश्वराला वीट आहे आणि त्यांच्या असल्या अमंगल कृत्यांमुळेच तुझा देव परमेश्वर त्यांना तुझ्यापुढून घालवून देत आहे. 13 तू आपला देव परमेश्वर ह्याच्याशी सात्त्विकतेने वाग. 14 ज्या राष्ट्रांचा तू ताबा घेणार आहेस ती शकुनमुहूर्त पाहणार्यांचे आणि चेटूक करणार्यांचे ऐकणारी आहेत; पण तुझा देव परमेश्वर तुला तसे करू देत नाही."
अनिष्ट रूढींचा उगम
अनिष्ट रूढींचा उगम हा प्रामुख्याने सैतानी कर्मकांडातून, मूर्तीपूजेतून, दैवतांच्या उपासनेतून, दुरात्म्यांच्या प्रेरणेतून व देववचनाबद्दलच्या अज्ञानातून होत असतो. अशा अनिष्ट रूढींचे पालन करण्यात नामधारी ख्रिस्ती लोकांबरोबर विश्वासी जनही कळत- नकळत सहभागी झाल्याचे दिसून येते. अनिष्ट रुढींच्या पालनामुळे ख्रिस्ती जीवनात दुरात्म्याचा शिरकाव झाल्याशिवाय राहात नाही .
विशेषतः या लेखात ख्रिस्ती विवाहात सरार्सपणे पाळल्या जाणाऱ्या अनिष्ट रूढी परंपरा बद्दल बघणार आहोत .
ख्रिस्ती विवाहप्रसंगात शिरकाव करणाऱ्या या अनेक अनिष्ट प्रथांचे मुळ हे मूर्तीपूजा आहे. ज्या समाजाच्या दबावाने ,मनुष्यांना खुश करण्याच्या हेतूने , संस्कृती म्हणून किंवा हौसेखातर पाळल्या जातात . यामुळेच विवाहा जीवनाची सुरवातच देवाला खिन्न करण्याने होते.
१. सुपारी फोडणे -
या रितीला महाराष्ट्रातल्या बऱ्याच भागांमध्ये “लग्नाची बोलणी” किंवा “सुपारी फोडण्याचा” कार्यक्रम म्हणतात. अर्थात या बैठकीत फक्त हे ठरवले जाते की साखरपुडा, लग्न कुठे ,कधी करायचे आणि आपसातील घेणे-देणे याबद्दलची बोलणी सुपारी फोडून शिकामोहर्तब केली जाते .
सुपारी घेण्यामागील शास्र : हिंदू शास्रानुसार विशेष दोन कारणे :
अ. सुपाअरीचे पावित्र्य
नारळ या फळाएवढेच असल्यामुळे किंवा तशी संकल्पना रूढ असल्यामुळे ती फोडणे म्हणजे
शुभ कार्याची सुरुवात झाली असे मानली जाते.
आ. गणेश पुजेत सुपारीला महत्व दिले जाते . गणेशाचा आशीर्वाद मिळावा तसेच आयुष्यात येणारी संकटे सुटावीत, याकारणास्तव सुपारी हे फळ निवडले आहे . विशेष फोडण्यासाठी सुपारीचे पाच फळे घेतली जातात . पाच ही संख्या वैदिक शास्रानुसार पंचमहाभूते झालेल्या बैठकीला साक्षीदार असतात. यामुळेच कन्यादान करताना देखील पाच-पाच भांडे दिले जातात .
निर्णय तुमचा असेल ! तुमच्या विवाहाला पाच भुतांच्या कि, पवित्र आणि जिवंत देवाच्या साक्षीने विवाहास शिक्कामोर्तब करायचे .
2. हुंडा मागणे -
हुंडा मागणे - पवित्र शास्रातून उत्तर
चोर, लोभी, मद्यपी, चहाड व वित्त
हरण करणारे ह्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही.[ १ करिंथ ६:१०]
परंतु पवित्र जनांना शोभते त्याप्रमाणे, जारकर्म, सर्व
प्रकारची अशुद्धता व लोभ ह्यांचे तुमच्यामध्ये नावसुद्धा निघू नये. [ इफीस ५;४ ]
“आपल्या शेजार्याच्या घराचा लोभ धरू नकोस; त्याचे शेत, दास, दासी, बैल, गाढव अथवा आपल्या शेजार्याची कोणतीही वस्तू ह्यांचा लोभ धरू नकोस. [ अनुवाद ५:२१ ]”
३. विवाहपूर्वी वधुवरांना हळद लावणे . Haldi ceremony allowed in christianity?
प्रश्न : ख्रिस्ती
विवाहात विवाहपूर्वी वधुवरांना हळद लावणे योग्य आहे का ?
प्रथम हळदी या समारंभाची पार्श्वभूमी बघू या . मग तुम्हीच ठरवा ख्रिस्ती
विवाहात हळद लावणे योग्य आहे कि नाही !
हळदी
समारंभ हा एक पूर्णपणे विधर्मी धार्मिक विधी आहे . ज्यास पवित्रस्नान म्हणून देखील ओळखला जाते . या विधीशी जोडलेले अनेक विशेष पैलू देखील आहेत.
चला तर ! हळदीच्या विधीचे धार्मिक कारणे जाणून घेऊया.
1. भारतीय वेद आणि परंपरेनुसार असे सांगितले ले जाते की हळदी वाईट नजरेपासून संरक्षण करते. हळदी समारंभात लावलेली हळदीची पेस्ट लग्न होईपर्यंत वधू-वरांना होणाऱ्या कोणत्याही दुर्दैवापासून वाचवते. वैदिक ग्रंथांनुसार वधुवरांना हळद लावल्यास त्यांना लागलेली भूते निघून जातात. वेदांनुसार, हळदी समारंभ ही व्यक्तीचे मन, शरीर आणि आत्मा शुद्ध करणारी एक शुद्धीकरण करणारी घटना मानली जाते. याच कारणामुळे बऱ्याच आदिवासी जमातींमध्ये प्रेतालाही हळद लावण्याची पद्धत आजही दिसून येते. हळद लावण्याचा विधीनंतर, वधू-वरांना लग्न समारंभ होईपर्यंत घराबाहेर जाण्यावर बंधने असतात. जर जाणे आवश्यक असेलच तर पुन्हा नव्याने भूतबाधा होऊ नये म्हणून हळद लावलेले वस्र, कट्यार, लिंबु सोबत घेऊनच बाहेर जावे लागते.
अशा प्रकारच्या विधींमध्ये सहभागी होऊन, लोक मान्य करतात की वाईट नजरेची
वैदिक संकल्पना खरी आहे, आणि हळद मन, शरीर
आणि आत्मा शुद्ध करू शकते.
भूतबाधेवरील
उपाय हळद नसून तो प्रभू येशू ख्रिस्त हाच आहे! हळद नव्हे तर प्रभू येशूचे रक्त
आपल्याला शुद्ध करते [ १ योहान १; ९ ] . जर आपण त्याला स्वीकारले असेल तर प्रभू
येशूच्या रक्ताने आपले शुद्धीकरण झाले आहेच त्यासाठी आणखी हळद लावून घेणे म्हणजें
त्या पवित्र रक्ताचा व तारणाऱ्याचा उघड अपमान करणे होय.
२. विवाहापूर्वी कुलदैवतांची पूजा म्हणून त्या दैवतांना व प्रसाद
म्हणून परस्परांना हळद लावण्यात येते. परस्परांना हळद लावणे म्हणजे
कुलदैवतांच्या पूजा किंवा उपासनेमध्ये सक्रिय सहभागी होणे होय.
खंडोबा
नावाच्या दैवताचीही पूजा म्हणून परस्परांना हळद लावतात व ती सर्वांना लागावी
म्हणून वर हळद हवेत उधळतात त्याला भंडारा
असे म्हणतात.
(संदर्भ
: भारतीय संस्कृती कोश, संपादन : पं. महादेवशास्त्री जोशी.
खंड दहावा, पृष्ठ ३१७, ३१९).
निर्गम
२०: १ मध्ये बायबल आपणास सांगते, “माझ्याशिवाय
तुला वेगळे देव नसावेत.
३.
हिंदू संस्कृतीत हळदीचा पिवळा रंग समृद्धी, प्रजनन आणि आशीर्वादाचे प्रतीक
आहे. विशेषत:
ज्योतिषशास्त्रानुसार पिवळा रंग 'गुरु, सूर्य, आणि मंगळ ' या ग्रहांचे प्रतिनिधित्व
करतो. ज्योतिषशास्त्रानुसार हळदीचा संबंध गुरूशीही आहे या ग्रहांना वैवाहिक
जीवनासाठी शुभ मानले जाते. म्हणून हळद लावल्याने गुरू ग्रहाचा आशीर्वाद राहतो,
ज्यामुळे वैवाहिक जीवनात आनंद मिळतो. याच कारणामुळे ज्या लोकांना
त्यांच्या वैवाहिक जीवनात अडथळे येत आहेत. त्यांना उपाय म्हणून गुरुवारी व्रत
ठेवण्याचा सल्ला दिला जातो.
बायबल, देवाचे वचन ज्योतिषशास्त्राशी अगदी विरुध्द आहे . अनुवाद
१८:१०-१२ मध्ये म्हटले आहे ,
“ ....चेटूक करणारा, शकुनमुहूर्त पाहणारा, मंत्रतंत्र
करणारा, जादूगार, वशीकरण करणारा,
पंचाक्षरी, छांछू करणारा, अथवा मृतात्म्याला विचारणारा असा तुमच्यापैकी कोणी नसावा.कारण जो कोणी
असली कृत्ये करतो त्याचा परमेश्वराला वीट आहे.”
“माझ्याशिवाय तुला वेगळे देव नसावेत. [ निर्गम २०: १ ]”
Haldi ceremony in Bible
काही हळदप्रेमी ख्रिस्ती, तकलादू कारण सांगतात कि, ' हळद लावल्याने रंग खुलून दिसतो' त्यामुळे सत्याकडे डोळेझाक करणे व स्वतः विवेकाची टोचणी थांबविणे सोयिस्कर होते. आजच्या आधुनिक काळात रंग खुलविण्याची शेकडो सौदर्यप्रसाधने उपलब्ध असताना विवाहासाठी हजारो रूपये खर्च करणारे वधुवरांसाठी हळद मात्र वापरून पैशाची मोठीच बचत करतात. विश्वासनार्यांनी हळदप्रेमींचे दडपण झुगारुन दिले पाहिजे. आपण देवाचेच भयं घरले पाहिजे व मनुष्यांपेक्षा देवाचेच ऐकले पाहिजे ! (लेवीय १८:३-५).
हिंदू धर्माशी संबंधित अनेक परंपरा आणि श्रद्धा आहेत, त्यापैकी हिंदू शास्त्रामध्ये विवाहित स्त्रियांचे सोळा श्रृंगार सांगण्यात आले आहेत, ज्यांना धार्मिक महत्त्व आहे. विवाहित स्त्रिया त्यांच्या श्रृंगारमध्ये लाल कुंकू, बांगड्या, टिकली, मंगळसूत्र, पैंजण आणि जोडवी यांचा समावेश करतात. श्रृंगाराशी संबंधित या गोष्टी महिलांसाठी खास आहेत कारण त्यांच्या शास्रानुसार सोळा श्रृंगारास सौभाग्याचे प्रतीक मानले जाते.
4. ओटी भरणे ;
स्तोत्रसंहिता 128 : नुसार नवविवाहित जोडप्याला “समृद्धी, सौख्य आणि संततीसुख” हा सर्व आशीर्वाद परमेश्वराचे भय धरल्याने मिळतो. वरील प्रकारच्या विधी केल्याने नव्हे . कारण विवाह हा देवाने स्थापन केलेला पवित्र बंध आहे.
5. मंगळसूत्र
मंगलसूत्र
हे केवळ अखिल भारतीय परंपरा नसून कर्नाटक, महाराष्ट्र, दक्षिण भारत, उत्तर भारत आणि नेपाळमध्येही हिंदू
संस्कृतीनुसार विवाहाच्या सुरुवातीला सौभाग्याचे प्रतीक म्हणून वधूच्या गळ्यात
बांधले जाते. मंगळसूत्र
- विकिपीडिया
ग्रामीण भागात मंगलसूत्राला गाठले, डोरले, गुंठण आणि गंठण असे विविध स्थानिक नावांनी ओळखले जाते. यास स्त्रीच्या विवाहित असण्याचा प्रतीकचिन्ह
म्हणून देखील ओळखले जाते.
मंगलसूत्र
हे केवळ दागिना नसून,
त्यामागे हिंदू
संस्कृतीनुसार धार्मिक, आणि
भावनिक महत्त्व आहे. हिंदू संस्कृतीत अत्यंत पूजनीय मानले जाते.
[संदर्भ : भारतीय संस्कृती
कोश खंड ६ वा, पृष्ठ क्र. ६२७ संपादन : पं. महादेव शास्त्री जोशी
] नुसार -
शंकर व पार्वती या हिंदू दैवाताचे प्रतीक म्हणून सोन्याच्या
धातूपासून बनवलेल्या दोन वाटया व त्यांच्या मिलनाचे
साक्षीदार म्हणजे पंचमहाभुते म्हणून पाच मणी असे
त्याचे खरे स्वरूप आहे. आणि या मिलनाला नजर लागू नये म्हणून
यामध्ये काळे मणी गुंफूण तयार केलेले मंगल (मांत्रिकांच्या भाषेत तोडगा किंवा उतारा)
असे एकत्र गुंफलेले सूत्र ते मंगलसुत्र ! हे 'वधुच्या
गळ्यात बांधले जाते . हे बांधलयाने पाप नष्ट होते, संसारात संकट येत नाही. अशी त्यामागील श्रद्धा आहे.
मंगलसूत्र घालण्यामुळे जर पाप नष्ट होत
असेल,
तर वरानेही ते घालायला काय हरकत आहे ?
प्रश्न : मंगलसूत्र भारतीय संस्कृतीतील एक दागिना म्हणून वापरण्यास काय हरकत आहे?
उत्तर : पवित्र
शास्र सांगते ,
पापमुक्तीचा एकमेव मार्ग प्रभू येशूचे रक्तसिंचन आहे. त्याच्यावर
विश्वास ठेवणाऱ्यांना तो पापमुक्त करतो आणि जीवनातील संकटांवर मात करण्याचे
सामर्थ्य ही तोच देतो.
त्यामुळे, विश्वासणाऱ्यांनी
मंगलसूत्र घालणे टाळावे, कारण प्रभू येशूच खरा तारणहार आहे. पवित्र शास्त्र संगते
अज्ञानाच्या काळाची देवाने उपेक्षा केली, परंतू आता सर्वांनी सर्वत्र पश्चाताप करावा अशी तो
मनुष्यांस आज्ञा करितो [प्रेषित १७:३०]
6. कुंकू लावणे किंवा टिळा लावणे .
हिंदूसंस्कृतीनुसार कुंकू किंवा टिकलीचे महत्त्व
1.
सौभाग्याचे
प्रतीक – टिकली किंवा कुंकू
हे विवाहित स्त्रियांसाठी सोळा श्रृंगारापैकी एक असून, पतीच्या
दीर्घायुष्याचे आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जाते.
2.
धार्मिक
आणि आध्यात्मिक महत्त्व – "पती हाच परमेश्वर" या भावनेने स्रिया पतीला दैवत मानतात आणि त्याचे प्रतीक
म्हणून कपाळावर कुंकू लावतात. काही पुरुष देखील दैवताची भक्ती दर्शवण्यासाठी टिळा
लावतात.
3.
ज्योतिषशास्त्रीय
आणि देवीसंबंधी श्रद्धा – लाल रंग मंगळ ग्रहाशी संबंधित असून, ऊर्जा व
शुभत्वाचे प्रतीक मानले जाते. तसेच, लाल टिकली देवी
लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते.
पवित्राशास्रातून या शिक्षणाचे खंडन
ख्रिस्ती विवाहानुसार पती हा पत्निचा जीवनप्रवासातील जोडीदार आहे, तो प्रभू किंवा परमेश्वर नव्हे. दीर्घायुष्य आणि आत्मिक शांती देणारा केवळ येशूच आहे . विधर्मी लोक कपाळाचा संबंध नशीबाशी जोडतात. म्हणून कपाळावर अर्पणाचे प्रतीक म्हणून कुंकू किंवा टिकली लावतात. नशिबावर विश्वास ठेवणे हे शिक्षण संपूर्णपणे पवित्र शास्त्राविरुध्द आहे. अशी कर्मे करणा-यांचा देवाला तिटकारा आहे ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांनी तर नशिब हा शब्द देखील उच्चारू नये. नशिबाचा समान अर्थी असलेलया शब्द म्हणजे ‘लुसिफर’ या शब्दापासुन लक हा शब्द तयार झाला आहे . त्यामुळे, लक व नशिबावर विश्वास ठेवणे, म्हणजे प्रभूपरमेश्वराचे अस्तिस्त्वच नाकारणे होय. म्हणूनच, ख्रिस्ती विश्वासूंनी अशा अमंगळ रूढींपासून सावध राहून त्यापासून दूर रहावे.
7. ख्रिस्ती विवाहात अमंगळ गीतांवर नृत्य करणे .
ख्रिस्ती विवाह (ख्रिश्चन लग्न) हा एक पवित्र आणि धार्मिक सोहळा असतो, जिथे देवाच्या आशीर्वादाने वधू-वर विवाहबद्ध होतात. अशा प्रसंगी संगीतचा सहभाग असतो,देवाची उपस्थिती असते आणि मग , विवाह सोहळ्यात अमंगळ (अश्लील, अयोग्य किंवा धार्मिकदृष्ट्या अनुचित,माद्यधुंध होऊन ) गाण्यांवर नृत्य करणे योग्य ठरेल का, हे आपणच ठरावा.
जर हा प्रश्न मला कराल तर माझा सपशेल नाकारच असणार .पवित्र विवाह सोहळ्याची पावित्र्यता कायम कसे राहील हाच विचार माझा राहील.
यास योग्य पर्याय म्हणजे क्लासिक ख्रिस्ती स्तुतीगीते (Hymns) किंवा चर्चच्या अनुकूलतेनुसार सौम्य गीतांचा वापर करणे.
यावर अधिक शंकाकुशंकासाठी पुढील लेखवर जरूर क्लिक करा . 👉 काय ख्रिस्ती विश्वासणारे संसारिक संगीत ऐकू शकतात का ?
8. कुलदैवातांच्या पाया पडायला जाणे .
“आपल्यासाठी कोरीव मूर्ती करू नकोस; वर आकाशातील, खाली पृथ्वीवरील व पृथ्वीखालच्या जलातील कशाचीही प्रतिमा करू नकोस. त्यांच्या पाया पडू नकोस किंवा त्यांची सेवा करू नकोस; कारण मी तुझा देव परमेश्वर ईर्ष्यावान देव आहे; जे माझा द्वेष करतात त्यांच्या मुलांना तिसर्या-चौथ्या पिढीपर्यंत वडिलांच्या अन्यायाबद्दल मी शासन करतो;” [निर्गम २०: ४,५,]
मूर्तीपूजा हे व्याभिचारासमान पातक आहे.
9.आशीर्वाद मिळवण्यासाठी आईवडिलांच्या पाया पडणे .
हिदू संकल्पना नुसार आईवडिलांना देवासमान मानतात. आईवडिल हे जन्मदाते आहेत. त्यांना देवासामान मान देणे हे बायबल आधारित नाही .
निर्गम २०: १ आपणास सांगते, “माझ्याशिवाय तुला वेगळे देव नसावेत.
प्रकटी २२:८,९ ........
10. हिरवा चुडा किंवा हिरव्या बांगड्यां
हिंदू संस्कृतीत हिरव्या बांगड्या
सौभाग्य, समृद्धी आणि शुभत्वाचे
प्रतीक मानल्या जातात.
विवाहानंतर स्त्रियांनी हिरव्या बांगड्या घालण्याची परंपरा विशेषतः महाराष्ट्र, कर्नाटक आणि काही इतर भागांमध्ये आढळते.
हिरव्या
बांगड्यांचे वापरण्याचे विधर्मी कारणे
1.
वेद, पुराण, ज्योतिषशास्त्र : विवाहित स्त्रियांसाठी हिरव्या बांगड्या
त्यांच्या पतीच्या दीर्घायुष्याचे आणि सुखसमृद्धीचे प्रतीक मानल्या जातात.
2.
वास्तुशास्त्रानुसार: हिरवा रंग हा नवीन जीवन, निसर्ग, आणि प्रजनन
क्षमतेचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे नवविवाहित महिलांना हिरव्या बांगड्या
घालण्याचा संकेत असतो. हातामध्ये असलेल्या हिरव्या
बांगड्यांच्या आवाजामुळे घरात सकारात्मक ऊर्जे वाढते.
3. धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व: गणपती, लक्ष्मी आणि पार्वती यांसारख्या देवी-देवतांना हिरवा रंग प्रिय आहे, त्यामुळे हा रंग धार्मिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाचा मानला जातो
विवाहात बांगड्या घालण्याबाबत बायबल काय सांगते?
बायबलमध्ये बांगड्या घालण्याबाबत
थेट उल्लेख नाही, परंतु दागिने,
अलंकार आणि बाह्य सौंदर्यापेक्षा आत्मिक सौंदर्यावर भर देण्याचा
संदेश वारंवार दिला आहे.
ख्रिस्ती विवाहामध्ये पती-पत्नीमधील
प्रेम, निष्ठा आणि देवाची
भक्ती यावर अधिक भर दिला जातो.
बाह्य सौंदर्य किंवा विशिष्ट दागिने विवाहासाठी आवश्यक नसतात. ख्रिस्ती
विवाहाचा केंद्रबिंदू म्हणजे प्रभूवर असलेला विश्वास आणि परस्परवरील प्रेम.
सौंदर्य
भुलवणारे आहे व लावण्य व्यर्थ आहे, परमेश्वराचे भय बाळगणार्या स्त्रीची प्रशंसा होते. [नीती ३१:३० ]
ख्रिस्ती
महिलांनी काय करावे ?
केवळ संस्कृतीचा भाग म्हणून
मर्यादित अलंकार परिधान करीत असाल ,
परंतु त्याने ख्रिस्ती विश्वासाला हानी पोहचत नसेल , तर त्यात चुक नाही. मात्र,
त्या गोष्टी ख्रिस्ती विश्वास आणि शिकवण याच्या विरोधात जात असेल
तर त्यांचा त्याग करावा .
ख्रिस्ती विवाह 👈 वाचण्यासाठी क्लिक करा .
योग्य जीवनसाथीची निवड 👈 वाचण्यासाठी क्लिक करा .
जर आपण या लेखाशी सहमत असाल तर जरूर शेअर करा , प्रतिक्रिया नोंदवा .
धन्यवाद ...... 🙏
खूपच छान माहिती मिळाली. धन्यवाद पालक साहेब
खूपच चांगली माहिती मिळाली त्याबद्दल आपले खूप खूप आभारी आहे
गरजेची माहिती दिलीत पाळक साहेब खूप खूप आभार
👍 खुपच सुंदर माहीती आहे..... 👌👌अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून च सैतान ख्रिस्ती विश्वासणार्याची फसवणूक करतो . परंतु वचनाच्र्या खर्या आज्ञापालनाने आपण सैतानाला आडवे शकतो..... 😇😇
Very nice information
Thanks for sharing