पंडिता रमाबाई Pandita Ramabai


निराधारांची माता

  (पंडिता रमाबाई १८५२-१९२२)

Pandita-Ramabai

पंडिता रमाबाई


 

               “रमाबाई, तुझ्या चिजवस्तु घे; आम्ही निघत आहोत." तो लहान मुलगा म्हणाला.
त्या लहान ब्राम्हण मुलीने तिच्या भावाकडे करूणामय नजरेने पाहिल आणि विचारले, “ठिक ठिकाणी का बरे आम्ही जात आहोत ? आम्ही या सुंदर खेडयात का बरे राहु शकत नाही ?"
तिचा भाऊ म्हणाला, “आम्हाला सर्व पवित्र तीर्थक्षेत्रांस गेले पाहिजे आणि पिताजींनी महाकाव्य वाचले पाहिजे.फक्त जे पैसे आम्हाला त्यातून मिळतील, त्याचे आम्ही अन्न विकत घेऊ शकतो."
त्या लहान मुलीने तिचे गाठोडे घेतले आणि कुटुंबातील इतर लोकांबरोबर चालायला सुरूवात केली.
 
नियमितपणे स्थानांतरकरीत राहणेः

      रमाबाई नंतर पंडिता रमाबाई या नावाने ओळखली जाऊ लागली. ती धार्मिक ब्राम्हण कुटुंबातील होती. तिचा जन्म दक्षिण भारतातील  मँगलोर  येथे झाला होता. ती कुटुंबातील शेवटचे अपत्य होती. ती सहा महिन्यांची असल्यापासून तिच्या आईवडिलांनी तीर्थयात्रा करणे सुरू केले होते. ते रमाबाई बाळास टोपलीत बसवून नेत असत. ते प्रत्येक पवित्र तीर्थ क्षेत्र स्थळी काही महिने राहत असत. त्या कालावधीत ते पवित्र स्नान करीत आणि मंदिरात दर्शनासाठी जात असत. तिचे वडील संस्कृत भाषेतील महाकाव्य सार्वजनिक ठिकाणी बसून वाचीत असत. धार्मिक हिंदू लोक जेव्हा ते काव्य ऐकायला जमत तेव्हा त्या कुटुंबाला भरपूर पैसा व अन्न सामुग्री देत. रमाबाईची आई देखील हे महाकाव्य संस्कृतातून वाचन करीत असे. तिच्या पतीने तिला संस्कृत शिकावल होते. आईने  लहान रमाबाईला देखील संस्कृत वाचायला शिकविले होते. या मार्गाने यांचे जीवन चक्र चालू होते जो पर्यंत त्यांचे वडील फार अशक्त व वध्द झाले नव्हते तो पर्यंत.

दुष्काळः
           सर्व पैसे खर्च झालेले होते. काही धार्मिक मर्यादामुळे ते दुसरे कोणतेही काम करू शकत नव्हते. त्या वेळेला ज्या ठिकाणी ते राहत होते त्या दक्षिण भारतात फार कडक दुष्काळ पडला होता. लोक अन्नावाचून उपासमारीने मरत होते आणि तेथे अन्नाचा तुटवडा असल्यामुळे दुसऱ्या ठिकाणी स्थानांतर करीत होते. रमाबाईच्या कुटुंबामधील स्वाभिमानामुळे ते कोणते ही काम करू शकले नाहीत किंवा भीक देखील मागू शकले नाहीत. त्यांना कोणतेच काम माहित नव्हते. एक दिवस त्यांच्याजवळ तांदुळाचा एकही दाणा शिल्लक नव्हता म्हणून त्यांनी सर्वजण मिळून आत्महत्या करावी असे ठरविले. परंतू देवाने त्याच्या कृपेद्वारे त्यांना तसे करण्याचे थांबविले. मग त्यांनी एका खेडेगांवातील देऊळामध्ये राहायला आश्रय शोधला होता ,परंतू तेथील ब्राम्हण पुरोहिताने त्यांना तेथून हाकलून लाविले. मग ते एका जुन्या सोडून दिलेल्या मंदिरात राहू लागले. तेथेच रमाबाईचे वडील निधन पावले. त्यानंतर काही महिन्यांनी रमाबाईची आई व बहिण सुध्दा भुकपोटी उपासमारीने मृत्यू पावल्या. ज्या ज्या समस्यांतून रमाबाई तिच्या तरूणपणापासून गेलेली होती. त्यामळे तिला इतरांच्या समस्या समजण्यास आणि त्यांस आश्रय करून देण्यास मदत झाली.

कोलकोत्यामध्येः

        रमाबाई आणि तिचा भाऊ यांना जीवन संघर्ष करण्यासाठी सोडण्यात आलेले होते. एके रात्री त्यांना थंडी सहन होत नव्हती. म्हणून ते नदी किनारी गेले व त्यांनी स्वतःला कोरडया वाळूमध्ये मानेपर्यंत पूरून  घेतले होते. तसेच पुष्कळदा अन्नही मिळत नव्हते . अशाप्रकारे ते एका ठिकाणानंतर दुसऱ्या ठिकाणी आणि एका मंदिरानंतर दुसऱ्या मंदिराकडे देव दर्शनासाठी जात होते. आम्ही असेही म्हणू  शकतो की, त्यांनी संपूर्ण भारत प्रदक्षिना मारली वर्षाला असेल. ते ४००० मैल चालले आणि शेवटी कोलकोत्याला येऊन पोहचले.  तेथे त्यांचा सुशिक्षित ब्राम्हणाबरोबर संपर्क आला. महाकाव्य वाचनामुळे त्याना  पैसे व अन्न मिळू लागले. हयामुळे रमाबाई बुध्दीमान स्त्री बनली होती. तिच्या बद्धीमत्तेकडे पाहून मोठमोठे विद्वान लोक आश्चर्यचकीत होत होते. तिने दढनिश्चयाने ठरविले. भारतीय स्त्रीयांची परिस्थिती सुधारण्याचा तिने  निर्धार केला होता. तीने धैर्याने स्त्री शिक्षणाची गरज सांगितली. त्यांनी तिला पंडिता रमाबाई ही पदवी दान करून सन्मानीत केले.
तिला कोलकोत्यामध्ये ख्रिस्ती लोकांमध्ये एकत्र येण्याची संधी प्रथमच मिळाली होती. तिला ख्रिस्ती संमेलनाला हजर राहण्याचे निमंत्रण दिले गेले  होते. ख्रिस्ती लोकांतील चांगली कृत्ये व चांगल्या  सवयीमुळे तिला जास्त  माहितीकरून घेण्याचा उत्साह जागा झाला. तिला संस्कृत बायबल वाचण्यासाठी देण्यात आले परंतु ते ती वाचू शकत नव्हती व समजू शकत नव्हती. परंतु बायबल तिच्याबरोबर होते. जरी तीने हिंदूचे संस्कारशास्त्र वाचलेले होते व इतर पवित्र ग्रंथ वाचलेले होते तरी ते तिचे समाधान करू शकले नव्हते. कारण ते ग्रंथ कोणताही धर्मविश्वास स्त्रीला देऊ शकत नव्हते. सर्व संप्रदयावरील विश्वास गमविल्यानंतर तिने एक सुना बंगाली तरूणबरोबर लग्न केले. तेव्हा ती २२ वर्षाची तरूणी होती.

ख्रिस्ताकडे वळणेः
pandita-ramabai
visit to mukti


         जेव्हा ती आपल्या पतीबरोबर आसाममध्ये राहत होती तिला एक छोटे पुस्तके सापडले होते. ते बंगाली भाषेत लिहिलेले होते. फार आवडीन तीन ते लुककृत शुभवर्तमान वाचले. तेथे एक ख्रिस्ती मिशनरी वारवार भेटत असे आणि बायबलमधील गोष्टी तिला सांगत असे. तिच्या नवर्याला रमाबाईचा ख्रिस्ताकडे गेलेला ओढा आवडला नाही. परंतू लग्नानंतर दोन वर्षानीच तिचा नवरा कॉलऱ्याने मरण पावला. रमाबाई तिच्या तरून वयातच  विधवा झाली होती. तिला मुलगी झाली तिचे नांव तिने मनोरामा असे ठेवले . तिचा पति मरण पावल्यानंतर रमाबाई तिच्या मुलीला घेऊन पुण्याला गेली.तेथे सुद्धा  तिला ख्रिस्ती मिशनऱ्यांकडून सतत ख्रिस्तीत्वा बद्दल ऐकायला मिळत होते.

इंग्लडमध्येः
      रमाबाईने विचार केला की, भारतीय स्त्रीयांच्या कल्याणासाठी आपण जास्त  शिक्षण किंवा प्रशिक्षण घेण्याची गरज आहे; म्हणून ती तिच्या मुली बरोबर १८८३ साली इंग्लडला गेली. तेथे चर्च ऑफ इंग्लड या मंडळीतील बहिणींनी तिचा स्विकार केला. त्यांच्या बरोबर झालेल्या नातेसंबंधामुळे तिला ख्रिस्ती धर्म तत्त्व शिकण्याची सवय झाली. तिने त्यांच्या घरांच्या शाखा उपशाखा पाहिल्या आणि तेथे चालणारे कार्य पाहिले. पडलेल्या आणि जुलूम झालेल्या दलीत स्त्रियांमध्ये झालेले कार्य तिच्या मध्ये खोल मुळावले गेले. त्यांच्यामध्ये ख्रिस्ताने केलेले परिवर्तन पाहून रमाबाईने देखील विश्वास ठेवला की, ख्रिस्त भारतीय स्त्रियांना देखील बदलू शकतो.
 
तारणः
pandita-ramabai
visit to mukti




अशाप्रकारे रमाबाईचे हृदय येशू ख्रिस्ताने दाखविलेल्या मार्गाकडे आकर्षिले गेले. तिचा बात्पीस्मा झाला आणि चर्च ऑफ इंग्लंडमध्ये तिचे दृढीकरण झाले. अजूनही तिला ख्रिस्त तिचा वैयक्तिक तारणारा आहे हे समजले नव्हते म्हणून तिच्या अंतःकरणातील तहाण अजून भागली नव्हती. त्यानंतर ती अमेरिकेला गेली आणि पुष्कळ ठिकाणी तिने भाषणे दिली. भारतात आल्यानंतर फार उत्कंठेने बायबल वाचायला सुरूवात केली.ख्रिस्ती धर्माची माहिती झाली तरी मला त्या धर्माचे जीवन ख्रिस्त आहे हे माहित नव्हते.स्वतःबद्दल ती म्हणाली. ती तिच्या आत्मीक जीवनाबद्दल समाधानी नव्हती. शेवटी पवित्र आत्म्याने तिचे मार्गदर्शन केले आणि बायबलद्वारे तिने वैयक्तिक तारणारा पाहिला आणि त्याला स्विकारले आणि तारणाची भेट मिळविली.


शारदा सदनः
pandita-ramabai
visit to mukti



  ख्रिस्ताला ओळखल्यानंतर रमाबाईला त्याची सेवा करण्याची इच्छा  झाली. जॉन पेट्रोन व हडसन टेलर यांच्या जीवन चरित्रानी तिच्यावर फार परिणाम केला. तीने विश्वास चळवळ स्थापन केली. ती अशा गोष्टींवर आधारीत होती  की, गरजा प्रभूकडून पूर्ण केल्या गेल्या पाहिजेत आणि त्याच्यावर पर राहून ते सर्व चालले पाहिजे. तिला भारतीय मुले आणि विधवा यांना व अपमानापासून तारावे आणि त्यांना ख्रिस्ताकडे न्यावे असे वाटत होते.  पुण्यामध्ये एक अनाथ आश्रम सुरू करण्यात आला त्याला शारदा सदन असत. त्याचा अर्थ ज्ञानाचे घर असा होतो. ज्या लोकांना वाईट वागविले जायचे, जाती बाहेर टाकले जायचे आणि उपाशीपोटी रहावे लागायचे त्या गरजुना  शारदा सदनात स्विकारले जात असे. ज्या स्त्रीया या गृहात येत त्यांना  स्वहस्ते  काम करण्याचे शिक्षण दिले जात असे. ते उद्योग व्यवसाय देखील शिकत असत त्या ठिकाणी दिलेल्या प्रशिक्षणामुळे त्यांना स्वतःच्या पायांवर उभे राहण्यास मदत होत असे. जेव्हा घरदार नसलेल्या मुली छळग्रस्त मुली सदनामध्ये येत. रमाबाई त्यांना प्रेमाने आणि दयेने स्विकारीत असे. ते सर्व तिच्यावर प्रेम करीत कारण ती त्यांची आई, मित्र व शिक्षिका होती. तिने कोणाला ख्रिस्ताला स्विकारण्याची बळजबरी केली नाही . तरी पुष्कळांनी ख्रिस्ताला त्यांचा तारणारा म्हणून स्विकारले ते केवळ तिने त्यांना ख्रिस्ताबद्दल सांगितले म्हणून नव्हे, तर तिचे जीवन व प्रेम पाहून


मंदिरांमध्ये, मुली आणि स्त्रियांना पापाचे गुलाम केले जात असे. रमाबाईने त्यांना सोडविले. त्यांच्या पैकी पुष्कळांनी शारदा सदनमध्ये प्रवेश केला. एकदा रमाबाई वृंदावन मध्ये वेषांतर करून गेल्या होत्या. तेथे त्याना पाहिले की, पुष्कळ मुली व स्त्रीया पुरोहितांच्या गुलाम होत्या. त्याना तिन सांगितले की, त्यांनी त्या जीवनातून सुटून शारदा सदनमध्ये आश्रय घेऊ शकता .
pandita ramabai
visit to muki mission


ती बैलगाडीने खेडेगावात जाई व गरजूंना अन्न व कपडे पुरावत असे. हे कार्य करण्यासाठी ती फक्त देवावरच अवलंबून राहत होती. तिने पुष्कळ मंदिरातील स्त्रियांना मुक्त केले होते. त्यामुळे अनेक हिंदू पूजारी  तिचा विरोध करून द्वेष करीत असत. एकदा गुजराती  एका बाईला एका क्रूर पुजार्याच्या जबडयातून सोडविण्यासाठी तिला गुजरात मधुन मुंबईमधील दवाखान्यात पाठविण्यात आले होते. परंतू त्यांनी तिला शोधून पुन्हा गुजरातमध्ये नेण्याचे प्रयत्न केले गेले. ती फार घाबरलेली होती. कारण तिला चाबकाने मारतील अशी भिती तिला वाटत होती. या कारणाने तिने गुजरातला जाण्याचे नाकारले. त्यासाठी दवाखान्यात रात्रदिवस तिच्यावर खडापहारा ठेवण्यात येत होता यासाठी की, तिने बाहेर जाऊ नये. परंतू  एका मित्राद्वारे  रमाबाईने तिला त्या संकटातून बाहेर पडण्यास आणि शारदा सदनात येण्यास मदत केली होती. रमाबाईची किर्ती सर्व भारतभर व इतर सर्व देशांत पसरली. सरोजीनी नायडू सारख्या भारतीय नेत्यांनी तीची स्तुती केली होती. भारताची थोर कन्याम्हणून तिचा गौरव देखील झाला . दुसऱ्या देशांतील लोकांनी तिला प्रार्थनेद्वारे व पैशाद्वारे मदत केली.

मुक्तीः

 
    रमाबाईचे मिशन कार्य वाढले, त्यामुळे शारदा सदनामध्ये सर्व स्त्रियांना राहायला पुरेनासे झाले. म्हणून पुण्याजवळील केडगांव शहरामध्ये जमीन विकत घेण्यात आली आणि शारदा सदन सारखे दुसरे घर तिथे बांधण्यात आले. त्या घराला मुक्ती म्हणतात. मुक्तीच्या स्थापनेसाठी व सेवेसाठी पुष्कळ प्रार्थना झाल्या. जी लेकरे तेथे जात. त्यांना सुध्दा उद्योग धंदयाचे शिक्षण दिले जात असे. त्यामुळे जेव्हा ते मुक्ती सोडून जात तेव्हा त्यांना स्वतःसाठी धंदा व्यवसाय किंवा नोकरी  मिळविणे फार सोपे होत असे. त्यांच्या पैकी पुष्कळ परिचारीका झाल्या. काही  विणकाम करणाऱ्या तर काही फ्रेम मेकर्स आणि काही बायबल शिक्षिका झाल्या. जेव्हा एक मुलगी मुक्ती सोडते आणि नवीन जीवनात प्रवेश करायची  तेव्हा दुसरी मुलगी तिच्या जागेवर येते असे .

त्यावेळी  भारतात दुष्काळ पडला होता. तेव्हा पुष्कळ लोक उपासमारीने मरण पावले. तेव्हा रमाबाईला तिच्या जीवनातील कठीण दिवस आठवले. म्हणून तिने लोकांकरिता काहीतरी करण्याचे ठरविले. ३०० मुलांना मदतीची गरज होती.  मुक्ती लोकानी  पूर्णपणे भरून  गेली होती. रमाबाई स्वतः सुरक्षित राहू शकत होती .परंतु तिने लोकांच्या या  गरजेबद्दल लिहिले आणि प्रार्थना सुरू केली.  यामुळे  फार लवकरच  मदत सुरू झाली . 
तिने चांगले केलेः 
          रमाबाई ख्रिस्त कार्यात नेहमी व्यस्त होत्या. त्यांनी थोडी गाणी व  कविता मराठीत लिहिल्या.  सुरूवातीला लहान दोन आश्रम उभे केलेत मुक्तीमध्ये मध्येच दोन गृहे उभी राहिली. मुक्तीमध्ये २००० स्त्रीया व मुले होती . शेवटी १९२२ मध्ये तिच्या धन्याचे शब्द ऐकूण, “ शाब्बास माझ्या खऱ्या व विश्वासू  दासी", ती सार्वकालिक आशीर्वाद मिळविण्यासाठी दूर गेली. परंतु तिची  सेवा अजूनही चालू आहे. आज देखील मुक्तीआश्रम घर छळ झालेल्या , निराधार लोकांसाठी खुले आहे. जेथे शेकडो लोक फलदायी जीवन मिळविण्यासाठी येतात.

 एक दिवस जेव्हा ख्रिस्त पुन्हा येईल, तेव्हा जो कोणी त्याजवर विश्वास ठेवील त्याला उठविल. पुष्कळ स्त्रिया आणि लेकरे यांच्या आनंदासाठी रमाबाईने आपले जीवन ओतले आणि पुष्कळ श्रम केले तिला आशिर्वादीत म्हणतील. रमाबाईची सेवा आणि विजय याने पुष्कळ आचंबित आश्चर्यकारीक होतात.

 हे कसे घडून आले ?

 एक अशक्त ब्राम्हण मुलगी जिला नाकारले होते तिने प्रभु करिता आणि समाजाकरिता किती महान गोष्टी केल्या. यातील गुपीत हे आहे की, तीने अपले जीवन ख्रिस्ताच्या हातात दिले होते. देवाने तिला विशेष उद्देशाने पाचारण केले आणि तिने विश्वासाने आज्ञापालन केले. कारण तिचा तारणार्या प्रभू येशूवर विश्वास होता . रमाबाई म्हणत असत. 

  जे प्रभूने मजकरिता केल तर तूमच्यासाठी देखील करू शकतो.फक्त एकच जीवन आणि ते सुद्धा लवकर निघून जाईल परंतू जे आम्ही ख्रिस्ताकरिता संपादन करू ते राहील.

Please share to your loved one and be blessed....!  
कृपया हि महान साक्ष  प्रत्येक ख्रिस्तीपार्यंत पुढे पाठवा .



Next Post Previous Post
2 Comments
  • केंद्रिय लोकशाही पत्रकार संघ (CDJA)हरिशदादा (हरिभाऊ)बहिरु चक्रनारायण (महाराष्ट्र राज्य सचिव)
    केंद्रिय लोकशाही पत्रकार संघ (CDJA)हरिशदादा (हरिभाऊ)बहिरु चक्रनारायण (महाराष्ट्र राज्य सचिव) ३ एप्रिल, २०२२ रोजी १२:५२ AM

    परमेश्वराने निवडलेले एक पवित्र पात्र म्हणजेच पंडीता रमाबाई

  • अनामित
    अनामित २६ मे, २०२३ रोजी २:५९ PM

    Very encouraging biography

Add Comment
comment url