लग्न आणि योग्य जीवनसाथीची निवड
लग्न आणि योग्य जीवनसाथीची निवड
लग्नाचे महत्व
लग्न हे मानवी जीवनातील ही अत्यंत महत्वाची पायरी आहे. लग्न मनुष्याचे जीवन घडविते किंवा नष्ट करते याकरिता विचारपूर्वक योग्य जीवनसाथीची निवड करावी. योग्य जीवनसाथी प्राप्तीने वैवाहिक जीवन आरोग्यदायी बनते . परंतु अयोग्य जीवनसाथी तुमचे आयुष्य बरबाद करते. नीती १४:१ सांगते “प्रत्येक सुज्ञ स्त्री आपले घर बांधते; पण मूर्ख स्त्री आपल्या हातांनी ते पाडून टाकते.” पुरुषाच्या बाबतीत देखील तसेच आहे. आळशी आणि व्यसनी तरूण परिवाराच्या जबाबदारीबाबत बेपर्वा असतात.
जे तरूण-तरुणी लग्न निर्णयात परमेश्वराची इच्छा जाणण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी प्रथम हे जाणीव ठेवली पाहिजे की, ते प्रथम येशूचे शिष्य आहेत.म्हणून लग्न ही बाब दुय्यम स्थानी आहे आणि आमची प्रथम इच्छा प्रभुला अनुसरण्याची आहे. प्रभुला प्रथम स्थान दिल्यानंतर प्रभुची इच्छेला प्राधन्य देऊन देखील आपण इतर गोष्टींचा विचार निश्चितपणे करू शकतो.
लग्न करण्यासाठी योग्य वय किंवा वेळ Right Time for Marriage
वैवाहिक जीवनास सुरुवात करण्याच्या वेळी स्त्री-पुरुषांचे वय काय असावे, या प्रश्नाला जीवशास्त्रीय बाजू नुसार दोघेही शारीरीकदृष्ट्या प्रौढ असावेत. भारतीय नियमानुसार मुलगा हा किमान २१ वर्षे आणि मुलगी हि किमान १८ वर्षाची असावी. परंतु विवाह करताना अथवा जुळवताना केवळ शारीरिक स्थितीच न पहाता त्या दोघांची वैचारिक स्थितीचा देखील विचार करायला हवा.
म्हणूच, तरूणांनी वय वर्षे २५ आणि तरूणींनी वय वर्षे २० झाल्यानंतर सुज्ञतेने विचारपूर्वक आपला योग्य जीवनसाथी मिळण्यासाठी प्रार्थना असावी, प्रेमी / प्रेमिका मिळण्यासाठी नव्हे . त्यापूर्वी आम्ही लग्नाचा विचारही मनात न आणता, प्रभूचे वचन व त्याचे नितीमत्व यात व्यस्त असले पाहिजे.
योग्य जीवनसाथीची निवड How to choose life partner
कोणतीही सुंदर मुलगी किंवा मुलगा पाहिला की हाच तर माझा जीवनसाथी होण्यासाठी योग्य आहे. अशा विचारांनी वेळ व्यर्थ खर्चू नका आणि एखादी खरोखर सुंदर व्यक्ती दिसली तर आता हिला माझे हृदय व्यक्त केलेच पाहिजे नाही तर हातची जायची असे म्हणत घाई करू नका. जर ती व्यक्ती खरोखरच परमेश्वराने तुमच्यासाठी निवडली असेल तर देवबाप तुमच्यासाठी तिला राखून ठेवू शकतो. इतर कोणीही तिच्याशी लग्न करणार नाही. विवाह आशीर्वादित होण्यासाठी विवाहात परमेश्वराची इच्छा असणे अति महत्वाचे आहे.
जर तुम्ही खरोखर त्याचे शिष्य असाल तर तो तुमच्याकरिता उत्तम ते राखून ठेवील.
![]() |
लग्न |
दाविदाने शौलापासून राजासन हिसकण्याचा प्रयत्न कधीच केला नाही तर परमेश्वराच्या नेमलेल्या समयाची तो प्रतिक्षा करीत राहिला आणि त्याला परमेश्वराने “माझ्या मनासारखा” ही पदवी दिली [प्रेषितांची कृत्ये १३:२२] जर तुम्ही धीराने दाविदाप्रमाणे देवाच्या हातून सर्व काही प्राप्त करावयाची वाट बघाल. तर परमेश्वर त्याचा आदर करणाऱ्यांचा आदर करतो. तुम्ही आपली विवाहाची समस्या ही प्रभुच्या हातात विश्वासाने सोपवू शकता.
नीतिसुत्रे १९:१४ सांगते की “घर व धन ही वडिलांपासून मिळालेला दायभाग होत; सुज्ञ पत्नी परमेश्वरापासून प्राप्त होते”. हा विश्वास ठेवून प्रभुच्या इच्छेने व मदतीने आपल्या जीवनाचा जोडीदाराची निवड करावी. लक्षात ठेवा नीती १४:१ सांगते “प्रत्येक सुज्ञ स्त्री आपले घर बांधते; पण मूर्ख स्त्री आपल्या हातांनी ते पाडून टाकते.”
तरूणींनी नवरा मुलगा बघताना हा विचार करावा की, ज्या तरूणाबद्दल ते विचार करीत आहेत तो सर्वप्रथम ख्रिस्त येशूचा खरा शिष्य आहे का ? जो तुमच्यासाठी एक आदर्श ठरू शकेल. ज्याच्याकडे तुम्ही आदराने पाहू शकाल . आणि फक्त बायबल सांगते म्हणूनच नव्हे तर स्वत:हून त्याच्या शिष्यत्वामुळे आनंदाने तुम्ही त्याला आपल्या विवाहीत जीवनात प्रमुख मानू शकाल. पैसा ,रूप, नौंकरी किंवा ऐश्वर्य याकडे बघून केलेला विवाह सुखी असेलच याची खात्री देता येत नाही.
नीती३०;३१ - सौंदर्य भुलवणारे आहे व लावण्य व्यर्थ आहे, परमेश्वराचे भय बाळगणार्या स्त्रीची प्रशंसा होते.
परमेश्वराने जोडलेले विवाह God's will in marriage ;
अशा दोन विवाहांचा बायबलमध्ये उल्लेख आढळतो ज्याची तरतुद आणि व्यवस्था परमेश्वर देवाने केली केली.
![]() |
suitable partner |
१) परमेश्वराने आदामासाठी अनुरूप सहकाऱ्याची योजना आणि तरतुद केली :
उत्पत्ती २;२१-२३ सांगते, परमेश्वर देवाने आदामाला गाढ निद्रा आणली, आणि तो झोपला तेव्हा त्याने त्याची एक फासळी काढून तिची स्त्री बनवली आणि तिला आदामाकडे नेले. तेव्हा आदाम म्हणाला, “आता ही मात्र माझ्या हाडांतले हाड व मांसातले मांस आहे;
या क्रियेत देवाने अदामासाठी पत्नी शोधलेली आहे. आणि अदामाने तिला काहीएक दोष न काढता तिचा स्वीकार करून तिची प्रशंसा केली.
२) परमेश्वराने इसहाकासाठी देखील अनुरूप जोडीदाराची योजना आणि व्यवस्था केली ;
उत्पत्ती २४;१-६७ सांगते , अब्राहामाने प्रार्थनापुर्वक आपला एक सर्वांत जुन्या सेवकास इसहाकासाठी वधू शोधण्याचे काम सोपवले. त्याने नाहोराच्या नगरात जाऊन देवाच्या मार्गदर्शनाने इसहाकासाठी वधू शोधून आणली. इसहाकाने विश्वासाने आपल्या भावी वधूचा चेहारा बघण्यापूर्वीच पत्नी म्हणून स्वीकार केला.
२ इति १६:९ मध्ये लिहिले आहे, परमेश्वराचे नेत्र अखील पृथ्वीचे निरीक्षण करीत असतात जे कोणी सात्विक चित्ताने त्याच्याशी वर्ततात त्यांचे सहाय्य करण्यात तो आपले सामर्थ्य प्रगट करतो. परमेश्वराप्रमाणे अखील पृथ्वीचे निरीक्षण कोणीच करू शकत नाही. आणि जे त्याजवर सात्विकमनाने भरोसा टाकतात त्यांना तो कधीच निराश करणार नाही.
अनुरूप जोडीदार मिळण्यासाठी जरूर प्रार्थना करा . Pray for suitable life partner
जर तुम्हाला एक जबाबदार सूज्ञ उत्तम पत्नी / पती हवा असेल तर प्रथम येशूचे संपूर्ण अंत:करणाने शिष्य व्हा. आणि त्याला मार्गदर्शन मागा . अब्राहामाच्या सेवकाने प्रार्थना केली व परमेश्वराने त्यांचे अचूक मार्गदर्शन केले. त्याने त्याला योग्य मुलीपर्यंत पोहोचविले. जी इसहाकासाठी त्याने निवडली होती . तोच परमेश्वर आमचा स्वर्गीय पिता आहे तो हे तुमच्यासाठीही करू शकतो.
![]() |
christian marriage |
लक्षात घ्या आदामासाठी पत्नी तयार करताना परमेश्वराने त्याला गाढ निद्रा आणली . त्याला पत्नी शोधत इकडे तिकडे बागेभोवती पळावे लागले नाही. आपणही परमेश्वराची इच्छा पूर्ण करीत असू तर निश्चितच शांतचित्त राहू शकतो आणि योग्य वेळी प्रभू आपला जोडीदार आपल्या जीवनात आणील पण याचा अर्थ हा नव्हे की आपण काहीच प्रयत्नच करू नये तर याचा अर्थ हा आहे की आपण लगेचच गाफील अथवा विनाविचाराने निर्णय घेऊ नये.
विवाहाचे नियम Rules and conditions for marriage
ख्रिस्ती विवाहासाठी बायबल आधारित अटी ;
१] विवाहास इच्छुक उमेदवार हे दोघेही प्रभू येशूचे तारण झालेले शिष्य असावेत.
२ करिंथ ६;१४ -तुम्ही विश्वास न ठेवणार्यांबरोबर संबंध जोडून विजोड होऊ नका; कारण नीती व स्वैराचार ह्यांची भागी कशी होणार? उजेड व अंधार ह्यांचा मिलाफ कसा होणार ?
२] दोघेही विवाह-इच्छुक उमेदवार प्रौढ असावेत .[ बाल विवाह हा पवित्रशास्र आधारित नाही ]
उत्पत्ती २;१८ -मग परमेश्वर देव बोलला, “मनुष्य एकटा असावा हे बरे नाही; तर त्याच्यासाठी अनुरूप साहाय्यक मी करीन.”
३] जोडीदार हा जवळच्या आप्तजनातील नसावा [मावस,सावत्र अथवा चुलत भाऊ-बहीण नसावेत. [लेवीय २०;१७-२१]
४] नववधू आणि वर दोघेहि अविवाहित असावेत.
लुक १६;१८ - जो कोणी आपली बायको टाकून दुसरीबरोबर लग्न करतो तो व्यभिचार करतो; आणि नवर्याने टाकलेल्या बायकोबरोबर जो लग्न करतो तो व्यभिचार करतो.
५] एकदा विवाह झाल्यानंतर निर्णय बदलता येत नाही कारण ख्रिस्ती विवाह हा आयुष्यभरासाठी आहे. परमेश्वराला घटस्फोटाचा तिटकारा आहे.
मत्तय १९;६ सांगते - ह्यामुळे ती पुढे दोन नाहीत तर एकदेह अशी आहेत. म्हणून देवाने जे जोडले आहे ते माणसाने तोडू नये.”
बायबल आधारित विवाहा बद्दल अधिक माहिती 👉 ; ख्रिस्ती विवाहाचा सिद्धांत
लग्न पत्रिका wedding card
लग्न पत्रिका साठी बायबल वचने Bible verse for wedding card
- इफिस ५;२५ पतींनो, जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली तशी तुम्हीही आपापल्या पत्नीवर प्रीती करा; ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि स्वतःस तिच्यासाठी समर्पण केले.
- १ योहान ४;१६ जो प्रीतीमध्ये राहतो तो देवामध्ये राहतो
- इफिस ५;३१ “आणि ती उभयता एकदेह होतील.”
- मत्तय १९;६ ह्यामुळे ती पुढे दोन नाहीत तर एकदेह अशी आहेत. म्हणून देवाने जे जोडले आहे ते माणसाने तोडू नये.”
- स्तोत्र ३४;४ म्हणजे परमेश्वराच्या ठायी तुला आनंद होईल; तो तुझे मनोरथ पूर्ण करील.
- स्तोत्र १२६;३ परमेश्वराने आमच्यासाठी महत्कृत्ये केली आहेत; त्यामुळे आम्हांला आनंद झाला आहे.
- स्तोत्र ११८;२४ परमेश्वराने नेमलेला दिवस हाच आहे. ह्यात आपण उल्लास व आनंद करू.
- १ करिंथ १३;१३ सारांश, विश्वास, आशा, प्रीती ही तिन्ही टिकणारी आहेत; परंतु त्यांत प्रीती श्रेष्ठ आहे.
- उत्पत्ती २;१८ मग परमेश्वर देव बोलला, “मनुष्य एकटा असावा हे बरे नाही; तर त्याच्यासाठी अनुरूप साहाय्यक मी करीन.”
- नीती ३१;१० सद्गुणी स्त्री कोणाला प्राप्त होते? तिचे मोल मोत्यांहून अधिक आहे.
- नीतिसुत्रे १९:१४ सुज्ञ पत्नी परमेश्वरापासून प्राप्त होते.
Please share and comment .........🙏
May God Bless You .
YOU MAY LIKE THIS TOO 👇
Very nice..