God देव

देव  
god
God

प्रस्तावना

            देव कोण आहे हे समजून घेणे आवश्यक आहे. देव निर्माणकर्ता आहे आणि मनुष्य त्याची निर्मिती आहे.  मनुष्याचे देवाविषयीचे ज्ञान मर्यादित आहे. देवाने स्वतःला पवित्र शास्त्रात जेवढ्या प्रमाणात प्रगट केले, तेवढ्याच प्रमाणात मनुष्य देवाला ओळखू शकतो. तसेच मनुष्य हा पापी, पतित असल्यामुळे त्याला पवित्र शास्रात प्रगट केलेली सत्ये मर्यादित प्रमाणातच समजतात.
         लोक अनेक गोष्टींविषयी चर्चा करतात. देव अस्तित्वात आहे किंवा नाही? "देव आहे हे सिद्ध कराअसे आव्हान नास्तिक व शंकेखोर लोक करतात, परंतु पवित्र शास्त्र देवाचे अस्तित्वाची खात्री देते.प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली.' उत्पत्ती १:१. हे देवाच्या अस्तित्वाचे प्रमाण सिद्ध केल्याने नव्हे, तर विश्वासाने पटते. जो दिसत नाही, ज्याला स्पर्श करता येत नाही, चाचपता येत नाही, त्याच्यावर विश्वास ठेवणे देहस्वभावानुसार चालणाऱ्या मनुष्याला अवघड वाटते, तरी कोणीतरी सर्वश्रेष्ठ शक्ती अस्तित्वात आहे ही मूळ कल्पना मानवांमध्ये सर्वत्र आढळते. जर देव नाही, तर मुळात ही कल्पना आली कोठून व रुजली कशी? आधुनिक मनुष्य देवाचे अस्तित्व नाकारीत असेल पण देवाचा शोध करूनही त्याला देवाच्या अस्तित्वाची खात्री पटली नाही या कारणाने नव्हे तर त्याला स्वतःचीच इच्छा पूर्ण करायची आहे आणि त्याला कोणत्याही अधिकाराला स्वतःस सादर करायचे नाही ,म्हणून तो देवाचे अस्तित्व नाकारतो.
           देवाचे अस्तित्व सिद्ध करणे अशक्य आहे, तर मग देवविषयक ज्ञान आपल्याला काठून मिळते ? अर्थात याचे पहिले साधन व उगमस्थान म्हणजे पवित्र शास्त्र ! देवाचा व मनुष्याची ओळख व्हावी म्हणून देवाने त्याचा संदेश मनुष्याला कळवला. एखाद्या मनुष्याजवळ पवित्र शास्त्र नसले, तरीही सृष्टीकडे पाहुन तो देवाला ओळखू शकतो.देवाने स्वतःस साक्षीविरहीत राहू दिले नाही,” असे पौलाने लुस्त्र येथील लोकांना सांगितले (प्रेषित. १४:१४-१७). आकाश, पृथ्वी, समुद्र व त्यातील सर्व काही उत्पन्नकर्ता देवाविषयी साक्ष देतात. पर्जन्य, फलदायक ऋतू, अन्न व हर्ष इत्यादी सर्व देवाच्या देणग्या असून त्याच्या साक्षी आहेत.
 स्तोत्र.१९:१- आकाश देवाचा महिमा वर्णिते, अंतरिक्ष त्याची हस्तकृती दर्शविते. .
रोम. १:२०- त्याच्या अदृष्य गोष्टी म्हणजे त्याचे सनातन सामर्थ्य व देवपण ही निर्मिलेल्या पदार्थांवरून ज्ञात होऊन स्पष्ट दिसत आहेत, अशासाठी की त्यांना कसलीहि सबब राहू नये.
प्रभू येशू ख्रिस्त देवाला प्रगट करण्यासाठी या जगात आला.देवाला कोणीहि कधीच पाहिले नाही; जो एकुलता एक जन्मलेला देवपित्याच्या उराशी असतो त्याने त्याला प्रगट केलेयोहान. १:१८. संपूर्ण पवित्र शास्त्र देवाविषयी शिकवते, तरी प्रभू येशू ख्रिस्ताच्या चरित्रावरून (शुभवर्तमानांवरून) आपल्याला अधिक ज्ञान मिळते. तो स्वतः म्हणतो, “ज्याने मला पाहिले आहे, त्याने पित्याला पाहिले आहेयोहान.१४:९.
            देवाविषयीचे ज्ञान पवित्र शास्त्रात व त्याने उत्पन्न केलेल्या सृष्टीवरून मनुष्याला मिळू शकते.तुम्ही . . . पूर्ण जिवेभावे माझ्या शोधास लागाल तेव्हा मी तुम्हांस पावेन,” असे अभिवचन देवाने स्वतः दिले आहे (यिर्मया २९:१३).

१ देवाची नावे


  पवित्र शास्त्राच्या काळात व्यक्तीच्या किंवा ठिकाणाच्या नावावरून काही बोध मिळत असे. उदा. याकोब या नावाचा अर्थ 'युक्तीबाज' असा आहे. पुढे देवाने याकोबाचे नाव बदलले (उत्पत्ती ३२:२२-३२ वाचा). याकोबाला इस्राएल हे नाव देण्यात आले. इस्राएल याचा अर्थ देवाशी झगडून जय मिळवणे' असा आहे. त्याप्रमाणे याकोबाने त्या ठिकाणाचे नाव पनीएल असे ठेवले (उत्पत्ती ३२:३०). पनीएल याचा अर्थ 'देवाचे मुख' असा आहे. तसेच देवाच्या संबंधाने जी नावे वापरली आहेत, त्या नावांवरून देवाचे स्वरूप आणि त्याचा मनुष्याशी असलेला संबंध याविषयी आपल्याला ज्ञान मिळते.
 देवाच्या नावांचे तीन विभाग आहेत :
 १)  मूळ नावे 
२) एल् या नावाने झालेली जोडनावे 
३) याव्हे या नावाने झालेली जोडनावे

पहिला विभाग - मूळ नावे

 १. देव- इब्री भाषेत 'एल' (उत्पत्ती १:१).
 २. परमेश्वर देव- इब्री भाषेत याव्हे, (निर्गम १७:१५).
देवाच्या तिसऱ्या आज्ञेप्रमाणेतुझा देव परमेश्वर याचे नाव व्यर्थ घेऊनकोयहूदी लोक हे नाव उच्चारीत नसत.ज्या ज्या ठिकाणी जुन्या करारात हे नाव येईल त्या त्या ठिकाणी ते अदोनाय (प्रभू) लिहीत असत.
३. धनी किंवा स्वामी- इब्री भाषेत 'अदोनाय (उत्पत्ती १५:२).

दुसरा विभाग - 'एल' हा शब्द असलेली जोडनावे

१. सर्वसमर्थ देव-इब्री भाषेत 'एल् शादाय (उत्पत्ती १७:१).
२.परात्पर देव-इब्री भाषेत 'एल-एल्योन, (उत्पत्ती १४:१७-२४)
३.सनातन देव-इब्री भाषेत 'एल् ओलाम, (उत्पत्ती २१:३३).

तिसरा विभाग - 'याव्हे' शब्द असलेली जोडनावे

जुन्या करारात अशी दहा नावे आहेत :                                            
 १. याव्हे यिरे -  परमेश्वर पाहून देईल  (उत्पत्ती २२:१४)
२. याव्हे रोफेका -   तुला रोगमुक्त करणारा देव  (निर्गम १५:२६)
३. याव्हे मिक्वाद्देशकम - पवित्र करणारा परमेश्वर  (निर्गम ३१:१३)
४. याव्हे निस्सी - परमेश्वर माझा झेंडा ( निर्गम १७:१५)
५. याव्हे शालोम - क्षेमदाता परमेश्वर   (शास्ते ६:२४)
६. याव्हे शाबोथ - सैन्याचा देव परमेश्वर  (१ शमु.१:३)
७. याव्हे एलीओन  -परात्पर परमेश्वर  (स्तोत्र.७:१७)
८. याव्हे रोई - परमेश्वर माझा मेंढपाळ आहे (स्तोत्र. २३:१)
९. याव्हे सिदकेनु -  परमेश्वर आमची धार्मिकता (यिर्मया २३:६;३३:१६)
१०. याव्हे शाम्मा - तेथे परमेश्वर आहे (यहेज्केल ४८:३५)

1. देवाचे गुणधर्म
 परमेश्वर देव उच्च स्थळी व उच्च सिंहासनावर बसलेला आहे, (यशया ६:१). तरी तो मानवाशी नाते जोडतो.यावरून त्याची नैतिक गुणलक्षणे दिसून येतात.
god
god's-throne


१. चांगुलपणा

देव मुळात चांगला आहे, तो करतो ते सर्व चांगलेच असते. स्तोत्र.११९:६८- तू चांगला आहेस,तू चांगले करितोस. सृष्टी उत्पन्न केली तेव्हा त्यात काही दुष्टाई नव्हती.
उत्पत्ती १:३१- आपण केलेले सर्व खूप चांगले आहे, असे देवाने पाहिले. देवाला काहीच वाईट निर्माण करता येत नाही.कारण त्याचा स्वभाव चांगला आहे.

२. प्रीती

देव प्रीती करतो एवढेच नव्हे तर तो प्रीती आहे. १ योहान.४:८- देव प्रेमस्वरूप आहे.
ही प्रीती सर्वांचे हित करते. तो पाप्यांवर व शत्रूवरही प्रीती करतो. देव जगावर प्रीती करतो म्हणूनच त्याने तारणाचा मार्ग तयार केला.
प्रीतीमुळे देव विश्वासणाऱ्यांना वळण लावतो. पापांचा परिणाम नाश आहे. विश्वासणाऱ्यांनी पुन्हा पापात न पडता नाशापासून दूर राहावे,म्हणून देव त्यांना शिक्षा करतो. शिक्षा खऱ्या प्रीतीचे चिन्ह आहे.

३. कृपा

कृपा म्हणजे दयेस अपात्र असलेल्या व्यक्तीवर कृपा करणे. स्तोत्र.११६:५- परमेश्वर कृपाळू व न्यायी आहे. आमचा देव कनवाळू आहे. मनुष्याचे तारण कृपेने होते. इफिस.२:५- तुमचे तारण कृपेने झाले आहे.
कृपा हा मनुष्याच्या देवाशी असलेल्या संबंधाचा पाया आहे. देवाने मनुष्यावर कृपा केली नसती.तर सर्वांचा नाश झाला असता.

४. दया
god
god's marcy


देवाची दया अमर्याद आहे.
स्तोत्र.१० ३:११- जसे पृथ्वीच्यावर आकाश फार उंच आहे तशी त्याची दया त्याचे भय धरणाऱ्यांवर विपुल आहे.
देवाच्या दयेशिवाय मनुष्याला आशा नाही. देवाने त्याचा नाश करू नये असे मनुष्यामध्ये काही कारण किंवा पुण्याई (गुणवत्ता) नाही. तो देवाच्या दयेस मुळीच पात्र नाही . तरीदेवा, माझ्यावर दया करया प्रार्थनेचे उत्तर तो देतोच देतो.

५. सहनशीलता

देव सहनशील आहे म्हणून तो पापी मनुष्याचा नाश करीत नाही.
मीखा ७:१८- तू अधर्माची क्षमा करितोस, आपल्या वतनाच्या अवशेषाचे अपराध मागे टाकितोस, तो आपला राग सर्वकाळ मनात ठेवणार नाही, कारण त्याला दया करण्यात आनंद वाटतो.

६.पवित्रता 

 पवित्रता या शब्दाचा अर्थ इब्री भाषेत वेगळेपणा, वेगळे होणे असा आहे. अशद्धता अनीती अशा गोष्टींपासून देव पूर्णपणे वेगळा आहे. यशया ६:३- पवित्र ! पवित्र ! पवित्र ! सेनाधीश परमेश्वर ! देवाच्या पवित्रतेमुळे तो वैभवी देव आहे.

७. नीतिमत्त्व  

 देव स्वभावतःच नीतिमान (न्यायी) आहे. अनु.३२:४- तो न्यायी व सरळ आहे.

८. विश्वासूपणा 

  १ करिंथ.१:९,१ थेस्सल.५:२४ , २ थेस्सल.३:३ ,२ तीमथ्य. २:१३- आपण अविश्वासू झालो तरी तो विश्वसनीय राहतो कारण त्याला स्वतःविरुद्ध वागता येत नाही.

३ देवाचे पितृत्व 

येश ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांना प्रार्थना करावयास शिकवले. तेव्हा त्याने देवाला का स्वर्गातील बापा' अशी हाक मारण्यास सांगितले. यहूदी शिष्यांना हा विचार नवीन होता कारण तोपर्यंत त्यांनी देवाला वैयक्तिक पातळीवर पिता मानले नव्हते. देव आमचा पिता आहे ही संकल्पना केवळ ख्रिस्ती धर्मात आढळून येते.
देवाचे पितृत्व दोन गोष्टींवरून प्रकट केले आहे.
१. तो प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता आहे योहान.१:१४- आम्ही त्याचे गौरव पाहिले. ते पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचे गौरव असावे असे ...होते. योहान.५:१७- येशूने त्यांस उत्तर दिले, “माझा पिता ...
२. तो प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्यांचा पिता आहे योहान.१:१२- ... त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. देव इस्राएल राष्ट्राचा पिता आहे अशी जुन्या कराराच्या काळात यहूद्यांची कल्पना होती. निर्गम ४:२२

४ देवाचे त्र्यैकत्व

देवाचे अस्तित्व तीन व्यक्तींकडून प्रकट होते -देवपिता,  देवपुत्र व देव-पवित्र आत्मा. तरी देव एकच आहे.
अनु.६:४ - हे इस्राएला श्रवण कर; आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे. हा सिद्धान्त मानवी बुद्धीला समजावयास खरोखरच कठीण आहे.मानवी बुद्धी मर्यादित आहे या कारणाने देवाच्या ज्या काही गोष्टी आपल्या समजण्यापलीकडे आहेत, त्या आपण विश्वासाने स्वीकाराव्यात.
यशया ५५:८,९ - माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नव्हेत, माझे मार्ग तुमचे मार्ग नव्हेत .आकाश जसे पृथ्वीहून उंच आहे, तसे माझे मार्ग तुमच्या मार्गाहून आणि तुमच्या कल्पनांहून उंच आहेत.
त्रेक्य देव शब्द पवित्र शास्त्रात आढळत नाहीत. परंतु
या सिद्धान्ताचा पाया पवित्र शास्त्रामध्ये आहे
१. मनुष्याची उत्पत्ती - उत्पत्ती १: २६ देवाने अनेकवचनी शब्द वापरले. "आपल्या प्रतिरूपाचा ...व आपल्या आपण करू."
२. प्रभू येशू ख्रिस्ताचा बाप्तिस्मा - मत्तय. ३:१३-१७ देवपिता स्वर्गातून बोलला. देवपुत्राने बाप्तिस्मा घेतला. देवाचा पवित्र आत्मा कबुतरासारखा उतरला.
३. शेवटली आज्ञा - मत्तय. २८:१९ "त्यांस पित्याच्या,पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या."
 ४. आशीर्वचन- २ करिंथ. १३: १४प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा,देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता ..."

५ देवाचे अस्तित्व

  देवाचे अस्तित्व सिद्ध करता येत नाही,तरी देव आहे या समजुतीला आधार देणारे काही पुरावे आहेत.

god
God is almighty



१ . सदसद्विवेकबुद्धीवरून मिळणारा पुरावा
योग्य काय व अयोग्य काय आहे, हे मनुष्याला समजते. चोरी करू नये,खून करू नये, अशा गोष्टी मानवी मनावर जणू काय कोरलेल्या आहेत. आपले आचरण कसे असावे याची कल्पना मानवी मनात सर्वत्र आहे. सर्व धर्मांची नैतिक आचरणविषयक तत्त्वे बहुतेक सारखीच आहेत. आपण कसे वागावे हे मनुष्याला माहीत आहे. (तो त्याप्रमाणे वागतोच असे नाही)
आचरणाचा हा आदर्श मनुष्याला कोठून मिळाला? हे ज्ञान उपजत नसते. परिपूर्ण सत्य व्यक्तीकडून मनुष्याला हा आदर्श प्राप्त झाला व ती व्यक्ती म्हणजे देव. देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केलाउत्पत्ती १:२७.
२. वैश्विक (सृष्टीसंबंधी) पुरावा
विश्व कोठून व कसे अस्तित्वात आले? याचा निर्माणकर्ता कोण आहे? आधुनिक मनुष्याचे मत आहे की, हे सर्व आपोआप निर्माण झाले. विश्व आपोआप निर्माण झाले, तर आजही नवीन उत्पत्ती आपोआप का होत नाही? तुम्ही घड्याळ वापरता का? घड्याळाचे सर्व भाग एका डबीत ठेवून ती डबी सतत हलवण्याची व्यवस्था केली, तर आपोआप घड्याळ तयार होईल का? शक्यच नाही ! केवळ ज्ञानी म्हणजे घड्याळाचे रचनातंत्र माहीत असलेल्या व्यक्तीकडूनच घड्याळाची रचना होणे शक्य आहे. विश्वाची रचना व त्याचे नैसर्गिक नियम पाहिले, तर ते सहज किंवा आपोआप उत्पन्न होणे शक्य नाही. त्यासाठी योजकाची गरज आहे. देव हा योजक आहे. त्याच्या योजनेनुसार त्याने विश्व निर्माण केले, असा विश्वास ठेवणे योग्य आहे.
३. मानवविज्ञानावरून मिळणारा पुरावा
 ज्या अर्थी मनुष्याला डोळे, नाक, कान, इतर ज्ञानेंद्रिये, विचार करण्याची शक्ती व बुद्धी  आहे, त्याअर्थी विश्वाचा निर्माणकर्ता निर्जीव नसून सजीव,ज्ञानगुणसंपन्न व नीतिमान होता है उघडच आहे.
स्तोत्र.९४:९ - ज्याने कान घडविला तो ऐकणार नाही का? ज्याने डोळा बनविला तो पाहणार नाही का?
 ४. जीवावरून मिळणारा पुरावा  जाव आपोआप निर्माण होत नाही. जीवातून जीव निर्माण होतो. मनुष्याने अनेक प्रयल केले. पंरतु त्याला अद्याप जीव निर्माण करता आला नाही. परमेश्वर देव जीवांचा उगम आहे. आणि तो सर्वांना जीवन देतो. स्तोत्र.३६:९- कारण जीवनाचा झरा तुझ्याजवळ आहे. योहान. ११:२५- येशूने तिला म्हटले, पुनरुत्थान व जीवन मीच आहे.

६ देवाचे व्यक्तित्व 

 व्यकित्वाची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत - मानवामध्ये पुढील लक्षणे असतात. मनुष्य व प्राणी यांमधील जो फरक आहे तो पुढील गोष्टींवरून दिसून येतो. ही पाच लक्षणे देवाच्या अंगी असतील तर देवाला व्यक्तित्व आहे असे सिद्ध होईल.

१.बुद्धी किंवा विचारशक्ती  देवाला बरेवाईट कळते. नीति. १५:३- परमेश्वराचे नेत्र सर्वत्र आहेत, ते बरेवाईट पाहात असतात.
देवाला मन आहे, त्याला जाणीव आहे. तो संकल्प करतो व तो संकल्प हिताचा असतो. ज्याला बुद्धी किंवा विचारशक्ती नाही, त्याला संकल्प करता येत नाही. त्याला गूढ गोष्टी समजत नाहीत.
यिर्मया २९:११- परमेश्वर म्हणतो, “तुम्हांविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो. ते संकल्प हिताचे आहेत. अनिष्टाचे नाहीत, ते तुम्हांस तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत.
२. भावनांची जाणीव करून देणारी शक्ती स्तोत्र. ३३:५ त्याला नीति व न्याय ही प्रिय आहेत. परमेश्वराच्या वात्सल्याने पृथ्वी भरली आहे.
देवाला काही गोष्टी प्रिय आहेत. देव कनवाळू, कृपाळू, मंदक्रोध, दयाळू व ममताळू आहे.या गुणांप्रमाणेच तो मनुष्यांशी वागतो, स्तोत्र.१०३:८-१३ .
३.इच्छाशक्ती  देव आपल्या इच्छेनुसार सर्व काही करतो.त्याला काही असाध्य नाही.तो सर्व काही पूर्ण करतो. मनुष्य इच्छा धरतो पण अनेकदा त्याला त्याची इच्छा पूर्ण करता येत नाही. देवाच्या संबंधी तसे नाही. तो त्याची इच्छा पूर्ण करण्यास समर्थ आहे. स्तोत्र.११५:३- त्याला योग्य दिसते ते सर्व तो करितो.

४. निवड करण्याची शक्ती  संपूर्ण पवित्र शास्त्रात देवाला निवड करण्याची शक्ती आहे, हे दिसून येते. अब्राहामाच्या काळापासून आजपर्यंत देव आपली इच्छा व योजना यानुसार निवड करीत आला आहे . त्याने अब्राहामास विश्वासणाऱ्यांचा पिता म्हणून निवडले. जुन्या कराराच्या का त्याचे निवडलेले राष्ट्र होते.पवित्र शास्त्रात अशी अनेक उदाहरणे आहेत.
प्रेषित.९:१५- परंतु प्रभूने त्याला म्हटले,... ह्यांच्यासमोर माझे नाव घेऊन जा तो माझे निवडलेले पात्र आहे.
५. सद्सद्विवेक शक्ती उत्पत्ती १:३१- आपण केलेले सर्व फार चांगले आहे असे देवाने पाहिले. नहेम्या २:१८- माझ्या देवाचा वरदहस्त मजवर आहे.
देवाला व्यक्तित्व आहे हे वरील वचनांवरून स्पष्ट होते. आपला देव अव्यक्त कि काल्पनिक शक्ती असा नाही, तर तो सजीव व्यक्ती असून त्याला निश्चित गुणलक्षणे आहे या कारणाने त्याचे व मनुष्याचे वैयक्तिक पातळीवर नाते जुळते. देव व्यक्ती नसता तर त्याने प्रीती,दया,सहभागिता यांचा अनुभव आपल्याला कसा आला असता?

देवाची परिपूर्णता

मानवांमध्ये देवाच्या अस्तित्वाची मूळ कल्पना आहे, तरी आजपर्यंत अनेक देव मानले गेले आहेत. मग खरा देव कोणता? ज्याप्रमाणे प्रत्येक विषय, वस्तू किंवा व्यक्ती यांमधे भिन्नता दाखविणारी वैयक्तिक लक्षणे आवश्यक असतात, त्याप्रमाणेच देवाच्या अंगी असलेल्या लक्षणांवरून मनुष्य त्याला देव म्हणून ओळखू शकतो. (अर्थात ही लक्षण नसतील, तर तो देव नाही असे म्हणणे बरोबर आहे)
लहान मूल आपल्या आईची लक्षणे व्यक्त करू शकत नाही, तरी त्या लक्षणांवरून ते आपल्या आईला ओळखते.ते फसत नाहि  खरा देव कोण व खोटा देव कोण या बाबतीत मनुष्याने फसू नये म्हणून देवाने शास्त्रात  स्वतःचे प्रकटीकरण केले आहे.
 
१. देव आत्मा आहे. 
God-is-Spirit
God-is-Spirit

आत्मिकता देवत्वास आवश्यक असलेले तत्त्व आहे. देवाचे अस्तित्व अंतराळ, स्थळ किंवा काळ यावर अवलंबून नाही.तो जिवंत आत्मा असून जगाचा उत्पन्नकर्ता आहे.  योहान.४:२४- देव आत्मा आहे. १ तीमथ्य.१:१७- जो सनातन राजा, अविनाशी,अदृष्य असा एकच देव ...

२. देवाचे एकच रूप आहे      

  देव एकच आहे. त्याच्याशिवाय देव नाही.   यशया ४४:६- मजवेगळा देव नाहीच. संशया ४५:२१- मजवाचून न्यायी व तारणकर्ता दुसरा कोणी देव नाही.
३. देव सनातन आहे 
  देवाला आरंभ व अंत नाही. स्तोत्र.९०:२- पर्वत उत्पन्न झाले, त्यापूर्वी तू पृथ्वी व जग निर्माण केली त्यापूर्वीच ...तू युगानुयुग देव आहेस. तीमथ्य.१:१७- जो सनातन ...राजा ...त्याला सन्मान व गौरव युगानुयुग असो.
 ४. देव सार्वभौम (सर्वसत्ताधारी) आहे   
त्याची इच्छा व योजना यांनुसार तो सर्व काही करतो. परमाधिकार देवाच्या हाती आहे.
ईयोब ९:१२- तो हिसकावून घेऊ लागला, तर त्याचा हात कोण धरील? तू हे काय करितोस असे त्याला कोण म्हणणार?
. देव अविकारी (कधीही न बदलणारा) आहे.
देव जसा आहे तसा तो राहतो. तो कोणत्याही बाबतीत अधिक किंवा कमी होत नाही. कारण तो परिपूर्ण आहे.
१ शम्.१५:२९- जो इस्राएलचे केवळ वैभव आहे तो खोटे बोलणार नाही, तो पस्तावा करावयाचा नाही,त्यास पस्तावा व्हावा असा तो काही मानव नाही. मलाखी ३:६- मी परमेश्वर बदलणारा नाही.

६. देव समर्थ आहे ;

 देवाचे सामर्थ्य नेहमीच नवीन निर्मिती करणारे असते.जे देव उत्पन्न करतो ते तो अस्तित्वात नसलेल्या पदार्थापासून उत्पन्न करतो (मनुष्य केवळ अस्तित्वात असलेल्या पदार्थापासून वस्तू तयार करू शकतो).

देवाचे उत्पादक सामर्थ्य त्याच्या शब्दाने कार्य करते. उत्पत्ती १:३- देव बोलला,प्रकाश होवो आणि प्रकाश झाला. देवाला सर्व काही साध्य आहे. ईयोब ४२:२- तुला सर्व काही करता येते. तुझ्या कोणत्याही योजनेला प्रतिबंध होणे नाही. मत्तय.२८:१८- स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे.

 ७. देव सर्वज्ञानी आहे ; 

देवाचे ज्ञान पूर्ण आहे. तो ज्ञानाचे उगमस्थान आहे. त्याला भूत, वर्तमान आणि भविष्यकाळ माहीत आहेत. त्याच्यापासून काही लपवता येत नाही. १ इति. २८:९- परमेश्वर सर्वांची मने पारखितो आणि त्यात जे काही विचार व कल्पना उत्पन्न होतात त्या त्यास समजतात .
स्तोत्र.९४:११ मानवांचे विचार वायफळ आहेत हे परमेश्वर जाणतो
दानी.२:२० ....कारण ज्ञान व बल त्याचीच (देवाचीच) आहेत.

 ८. देव सर्वव्यापी (सर्वत्र) आहे. ; तो सर्वत्र उपस्थित आहे. स्तोत्र.१३९:७ ते १० - मी तुझ्या आत्म्यापासून कोठे निघून जाऊ? मी तर पासून कोठे पळून जाऊ? मी वर आकाशात चढलो तरी तेथे तू आहेस अधोलो पाहा तेथे तू आहेस . . . समुद्राच्या अगदी पलीकडच्या तीरावर ... तरी तेथेही या मला चालवील.मत्तय.२८:२० - पाहा युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे


सारांश
 १. देवाचे अस्तित्व कोणाला सिद्ध करता येत नाही आणि ते कोठेही आढळत नाही.
२. देवाच्या ज्ञानविषयक गोष्टी विशेषेकरून पवित्र शास्त्रातून शिकता येतात.
३. देवाच्या अस्तित्वाला बळकटी देणारा पुरावा सृष्टीवरून मिळतो.
४. देव व्यक्ती आहे त्यामुळे तो विश्वासणाऱ्यांशी वैयक्तिक संबंध ठेवतो.
५. देवाचा चांगुलपणा अनेक प्रकारे व्यक्त होतो.
६. देव सर्वांचा उत्पन्नकर्ता आहे. मानव सहज उत्पन्न झाला नाही. देवाची इच्छा योजना यांनुसार त्याच्या सामर्थ्याने मानवाची उत्पत्ती झाली.
७. तो विश्वासणाऱ्यांचा पिता आहे (प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे हे नाते जोडले जाते).
८ . देव एक आहे. तो तीन व्यक्तींच्या द्वारे प्रकट होतो. देवपिता, देवपुत्र व देव- पवित्र आत्मा.
९ . देवविषयक गोष्टी शिकाव्या. हे अत्यंत महत्त्वाचे आहे. देवाने मनुष्याला बद्धी व 'विचार करण्याची शक्ती दिली आहे. देवाचे सिद्धान्त समजून घेण्यासाठी त्यांचा उपयोग केला जावा (मानवी बुद्धी मर्यादित आहे हे नेहमी लक्षात ठेवावे), पवित्र आत्मा देवाच्या गोष्टींचा खुलासा करतो तरी काही गोष्टी मानवाला समजण्यापलीकडच्या आहेत.या गोष्टी विश्वासाने स्वीकारल्या पाहिजेत.
१० . आपण देवाच्या नावांविषयी मनन करावे. अशा रीतीने आपल्या देवाविषयीचे
आपले ज्ञान अधिक सखोल होईल. देवाच्या कार्याविषयी आपल्याला ज्ञान मिळेल.अशा मननाचा परिणाम म्हणजे आदर धरणे व आराधना करणे.
 ११ . आपल्याला अत्यंत थोर व वैभवशाली पवित्र देव आहे. त्याच्या कृपेने आपण जगतो आणि त्याच्या प्रीतीने व दयेने आपले तारण होते म्हणून आपण
त्याच्यावर प्रीती करावी. त्याच्यावर विश्वास ठेवावा. त्याची आराधना करावी. त्याची उपकारस्तुती करावी. त्याच्या अधिकाराला स्वत:स सादर करावे. त्याच्या आज्ञा पाळाव्या. त्याची सेवा करावी. त्याचे भय धरावे.



Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url