Graham Staines Biography in Marathi
Graham Staines Biography
ग्रॅहम स्टेन्स भारतात कधी आले ? When did Graham Staines come to India ?
१८ जानेवारी १९६५ रोजी त्यांच्या २४ व्या वाढदिवसादिवशी ते भारतात आले. ग्रॅहम ओरिसातील बारीपाडाच्या रस्त्यावर फिरत असताना, कुष्ठरोगाने ग्रस्त असलेल्या लोकांच्या असह्य दुर्दशेने त्यांचे हृदय विरघळले. त्याने देव आणि लोकांप्रती खोल समर्पणबद्धता दाखविली. त्याच्याकडे एक स्पष्ट मिशनरी दृष्टी होती. ख्रिस्ताचे प्रेम समाजातील अस्पृश्यांपर्यंत पोहोचवून त्यांची सेवा करणे हे त्याचे प्रभूकडून दैवी पाचारण आहे ही त्याची खात्री होती. ते १९६५ मध्ये मयूरभंजच्या इव्हँजेलिकल मिशनरी सोसायटीमध्ये सामील झाले आणि कुष्ठरुग्णांसाठी त्यांचे कार्य सुरू केले.
ग्रॅहम स्टेन्सचे कुटुंब Graham staines family
ग्रॅहमचे १९८३ मध्ये ऑस्ट्रेलियात ग्लॅडिसशी लग्न झाले , जी युथ मिनिस्ट्रीमध्ये कार्यरत होती . ग्रॅहमसाठी ती मयूरभंज कुष्ठरोग गृहात एक योग्य मदतनीस ठरली . बारीपाडा येथील मिशन कंपाऊंडमधील एका जुन्या घरात या त्यागी जोडप्याने आपले घर केले आणि अतिशय साधी जीवनशैली निवडली. त्यांना एक मुलगी (एस्तेर) आणि दोन मुले (फिलिप आणि तिमोथी) झाली. त्यांचे कौटुंबिक जीवन हे समाजासाठी एक आदर्श जीवनाचे उदाहरण होते.
Graham Staines Family |
ग्रॅहम स्टेन्सचे सेवाकार्य Graham Staines’ Ministry
स्टेन्स यांनी १९८३ मध्ये बारीपाडा येथील मिशनचे व्यवस्थापन हाती घेतले. ग्रॅहम हे चौहुबाजुने ख्रिस्त-केंद्रित मिशनरी होते. प्रौढ साक्षरता, भाषांतर कार्य, कुष्ठरोग कार्य, पुढारीपण प्रशिक्षण, मंडळी रोपण आणि सामाजिक विकास कार्य यासह विविध सामाजिक कामामध्ये त्यांचा प्रभावीपणे सहभाग होता. १९८२ मध्ये नोंदणीकृत सोसायटी म्हणून मयूरभंज कुष्ठरोग गृहाचीही स्थापना करून त्यांनी महान भूमिका बजावली. ग्रॅहम हे उडिया आणि स्थानिक संथाली बोली भाषेत अस्खलित होते. वधस्तंभाचा संदेश त्याने खेड्यापाड्यात पोहोचवून त्या भागातील आदिवासी लोकांमध्ये येशूच्या नावाची घोषणा केली . संपूर्ण नवीन करार हस्तलिखित प्रूफरीडिंगसह बायबलचा काही भाग हो भाषेत भाषांतर करण्यास त्यांनी मदत केली .एक उत्कृष्ट आणि आकर्षक उपदेशक म्हणून त्याचे वर्णन केले गेले.हे जोडपे ओरिसात सेवा करत असताना बारीपाडा येथे आग लागली होती आणि जवळपास १०० लोक होरपळून मरण पावले होते. आणि बरेच भयानकरीत्या भाजले होते. या रुग्णांस स्थानिक रुग्णालय सेवा देण्यात अपुरे पडले .तेंव्हा स्टेन्स दाम्पत्य ग्लॅडिस, एक प्रशिक्षित परिचारिका असल्याने जखमींवर उपचार करण्यात त्यांनी पुष्कळ रात्री घालवून जखमींची सुश्रुषा केली . या जोडप्याने पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत मोठा सहभाग घेतला . ग्रॅहम यांनी पत्रके वाटली तर ग्लॅडिसने जनजागृतीसाठी बारीपाडा येथे जीप चालवली.
त्यांनी कुष्ठरोग मिशनला स्वावलंबी बनवले. कुष्ठरोग गृहात सुमारे ८० ते १०० रूग्ण असत. त्यात एक उपचार केंद्र समाविष्ट होते. येथे या रुग्णांना सन्मानाची भावना दिली गेली. बरे झालेल्या रुग्णांनी समाजात स्वतंत्र स्थान बनवावे यासाठी , साड्या, चटई, टॉवेल आणि धोतर विणणे असे व्यावसायिक प्रशिक्षण दिले जात . या कुष्ठरुग्णपैकी अनेकांना बरे झाल्यानंतरही त्यांना गावात किंवा स्वताच्या घरी घेतले जात नसत. तेंव्हा ते पुन्हा आपल्या पूर्वस्थानी येत. डॉ ग्रॅहम त्यांना वडिलांप्रमाणे होते. आजूबाजूचे लोक त्याला प्रेमाने मोठा भाऊ म्हणत.
Graham-steains-leprosy-hospital-home |
रेव्ह. ग्रॅहम स्टेन्स कधीही वाद-विवादात पडले नाहीत . त्याने जे काही केले ते म्हणजे कुष्ट रोग्यांची सेवा आणि प्रभूचा संदेश लोकापर्यंत नेला . ओरिसा हे एक धर्माभिमानी हिंदू राज्य आहे परंतु ग्रॅहम यांनी ख्रिश्चन धर्मोपदेशक म्हणून कुपोषण आणि निरक्षरतेने ग्रस्त लोकांमध्ये काम केले. ग्रॅहम जंगालातील आदिवासींसाठी सार्वजनिक आरोग्य विषयक माहिती याबद्दल जनजागृतीसाठी शिबिरे भरवत तसेच सुवार्ता सांगत .
ग्रॅहम स्टेन्स आणि त्याच्या दोन्ही मुलांना जिवंत जाळले. Rev. Graham Staines: burnt alive
२२ जानेवारी १९९९ च्या रात्री रेव्ह. ग्रॅहम स्टेन्स आदिवासी क्षेत्र असलेल्या मनोहरपूर येथील जंगलातील शिबिरास गेले होते. उटी येथील शाळेला सुट्ट्या असल्याने ते आपल्या दोन मुलांसह ओरिसातील केओंझारला येत होते. कडाक्याच्या थंडी असल्यामुळे त्यांनी केओंझार जिल्ह्यातील मनोहरपूर गावात, ओरिसा येथे रात्र काढण्यासाठी प्रवास थांबवला. त्याची पत्नी बारीपाडा येथेच थांबल्या होत्या . वृत्तानुसार त्या रात्री, एका बजरंगदल हिंदू कट्टरपंथी सुमारे ५० लोकांच्या जमावाने, जे ग्रॅहमच्या सेवेबद्दल खूश नव्हते. त्यांनी जीपमध्ये स्टेन्स आणि मुले गाढ झोपेत असताना कुऱ्हाडी आणि इतर अवजारे घेऊन, वाहनावर हल्ला केला आणि पेट्रोल व केरोसीन ओतून वाहनाला पेटवून दिले . त्या तिघांना त्या जमावाने जिवंत जाळून मारले . या तिघांनीही जीपमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला परंतु जमावाने त्यांना बाहेर पडू दिले नाही . तेंव्हा पिता विंनती करत होता कि, हवे तर मला मारा परंतु माझ्या निष्पाप मुलांना जाऊ द्या ,परंतु तरीही या जमावाने सेवाभावी परिवारावर दया दाखवली नाही .आजूबाजूला असलेल्या घरांच्या आधीच कड्या लावून ठेवल्यामुळे मदतीसाठी कोणालाही येता आले नाही .
Graham-Staines-burnt-alive |
ग्लॅडिस स्टेन्सचा पती आणि दोन किशोरवयीन मुले जळून खाक झाल्यानंतर त्यांची काय अवस्था झाली याची कोणी कल्पनाही करू शकत नाही. या घटनेने ग्लॅडिसचे सर्व काही हिसकावून घेतले जिने मिशनरी कार्यासाठी आपला देश सोडला आणि स्टेन्ससोबत लग्न केल्यानंतर भारतात स्थायिक झाली. ग्लॅडिस स्वतः आणि तिची १३ वर्षांची मुलगी एस्तर त्या भयंकर रात्री मनोहरपुरा येथे उपस्थित नसल्यामुळे वाचले होते.
रेव्ह. ग्रॅहम स्टेन्स अंत्ययात्र Graham Staines’ Funeral
डॉ. ग्रॅहम स्टुअर्ट स्टेन्सने आपल्या आयुष्यातील ३४ वर्षे भारतीय लोकांची प्रेमाने सेवा करण्यात घालवली . १९६५ पासून ते ओरिसामध्ये आदिवासी गरीब आणि विशेषत: कुष्ठरुग्णांसाठी काम करत होते. त्यांच्या अंत्ययात्रेस १०,००० हून अधिक लोकानी हजेरी लावली . ग्लॅडिसने तिच्या पती आणि दोन मुलांच्या अंत्यसंस्कारात “कारण तो जगतो” हे गाणे गायले.
ग्रॅहम स्टेन्सच्या निर्घृण हत्येमुळे, जगाच्या लक्षात आले की ख्रिश्चन मिशनरी हे अत्यंत कठीण आणि प्रतिकूल परिस्थितीत विविध दुर्गम भागात समाजातील वंचित आणि दुर्लक्षित घटकांची सेवा करत आहेत.
Graham's-and his sons grave-image |
ग्लॅडिसने तिच्या पती व मुलांच्या मारेकऱ्यांना क्षमा केली. Gladys forgave her husband and her children's killers.
मारेकऱ्यांना शिक्षा सुनावल्यानंतर लगेचच, विधवा झालेली ग्लॅडिसने एक निवेदन जारी केले की तिने मारेकऱ्यांना माफ केले आहे .आणि त्यांच्याबद्दल कोणतीही कटुता तिच्या हृदयात नाही. तिने मारेकऱ्यांना माफ केल्याने जगभर लाटा पसरल्या आणि भारतातील वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानांवर ख्रिस्ताची घोषणा झाली. यामुळे छळ होत असताना देखील अनेक वर्षे सुवार्ता नाकारलेल्या कुटुंबांमधून लोक येशूकडे आले
तिच्या पती आणि दोन मुलांच्या मृत्यूबद्दल आयोगासमोर तिच्या प्रतिज्ञापत्रात, ग्लॅडिस स्टेन्सने म्हटले: मला मार्गदर्शन करण्यासाठी आणि ग्रॅहमचे कार्य पूर्ण करण्यासाठी मला मदत करण्यासाठी प्रभु देव नेहमी माझ्या पाठीशी असतो, परंतु मला कधी-कधी विचार येतो की, ग्रॅहमची हत्या कोणत्या कार्यामुळे झाली? आणि २२/२३ जानेवारी १९९९ च्या रात्री त्याच्या मारेकर्यांना अशा क्रूर रीतीने वागण्यास कशामुळे प्रवृत्त केले. माझे पती ग्रॅहम आणि माझ्या दोन मुलांच्या मृत्यूसाठी जबाबदार असलेल्या व्यक्तींना शिक्षा करणे माझ्या हृदयापासून दूर आहे. परंतु त्यांनी पश्चात्ताप करावा आणि परिवर्तन व्हावे हीच माझी इच्छा आणि आशा आहे.
मी मारेकऱ्यांना माफ केले आहे आणि जरूर पती व मुलाच्या हत्तेने मी फार दुखी; झाले तरीही माझ्या मनात देखील त्यांच्यासाठी कटुता नाही कारण क्षमा केल्याने बरे होते आणि आपल्या भूमीला द्वेष आणि हिंसाचारापासून बरे होण्याची गरज आहे. ग्लॅडिस स्टेन्स म्हणाल्या कि, माफी आणि गुन्ह्याचे परिणाम यांना एकत्र करू नये. देवाने मला क्षमा केली आहे आणि त्याच्या अनुयायांनी देखील क्षमा करावी अशी त्याची अपेक्षा आहे. बायबल सांगते,” जर तुम्ही इतरांना क्षमा कराल तर तुमच्याही पापांची क्षमा केली जाईल ”. म्हणून, अनंतकाळच्या स्वर्गात प्रवेश करण्यासाठी आपल्या सर्वांना आपल्या पापांची क्षमा आवश्यक आहे.
अनेक त्रासातून जात असताना
देखील, देवाने त्यांना जे काम करायला बोलावले होते ते काम पूर्ण करण्यासाठी श्रीमती
स्टेन्स आणि तिची मुलगी २००४ पर्यंत भारतातच राहिली..
ग्राहम स्टेन्स पत्नीला पद्मद्श्री नागरी पुरस्कार Padma Shri Award to Graham Staines’ wife
भारतातील ओरिसा येथील कुष्ठरोगी रुग्णांसोबत काम केल्याबद्दल तिला भारत सरकारकडून २००५ मध्ये पद्मदमश्री, नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांनी त्यांना देशासाठी केलेल्या विशिष्ट सेवेची दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान केला.
आता ग्लॅडिस स्टेन्स कुठे आहेत . Where is the Gladys Staines now
२००४ मध्ये, ग्लॅडिस स्टेन्सने तिच्या ९१ वर्षीय वडिलांची काळजी घेण्यासाठी ऑस्ट्रेलियाला परतण्याचा निर्णय घेतला, याशिवाय तिची मुलगी एस्तेर जी १८ वर्षांची होती तिला तिचे वैद्यकीय शिक्षण घ्यायचे होते. पण ओडिशात पतीने सुरू केलेले काम सुरू ठेवण्यासाठी ती नियमितपणे भारताला भेट देणार असल्याचे तिने सांगितले.
धारा सिंग ची शिक्षा murder Dhara Singh punished
ओरिसाची राजधानी भुवनेश्वर या ठिकाणी उच्च न्यायालयात खटला सुरु असतांना , स्टेन्स आणि त्याच्या दोन मुलांची हत्या केल्याप्रकरणी जमावातील दोषी मुख्य नेता दारा सिंग याला फाशीची शिक्षा सुनावली. २००५ मध्ये ओरिसा उच्च न्यायालयाने शिक्षा जन्मठेपेत बदलली. सर्वोच्च न्यायालयाने २१ जानेवारी २०११ रोजी उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला.
ग्रॅहम स्टेन्सच्या निर्घृण हत्यामागचा युक्तिवाद The argument behind the brutal murder of Graham Staines
स्टेन्सला त्याच्या धर्माचा प्रचार केल्याच्या गुन्ह्यासाठी जाळून मारण्यात आले असा युक्तिवाद करणारे लोक भारतीय राज्यघटनेने धर्मांतराला परवानगी दिली आहे हे अगदी जाणुनबुजून विसरलेत. कोणतीही खरी लोकशाही कोणत्याही नागरिकाला त्याच्या आवडीचा धर्म स्वीकारण्याची मुभा देते. त्याच प्रकारे, जर एखाद्याला कोणत्याही धर्माचे पालन न करता जगायचे असेल किंवा स्वतःला नास्तिक घोषित करायचे असेल तर त्या व्यक्तीला लोकशाही स्वातंत्र्य देते.
ग्रॅहम स्टेन्सच्या निर्घृण हत्याबद्दलच्या प्रतिक्रिय Reactions to the brutal murder of Graham Staines
या क्रूर हत्याचा तीव्र उत्स्फूर्त संताप जगभर व्यक्त केला गेला. भारतातील आणि जगभरातील वृत्तपत्रांनी या घटनेबद्दल लिहिले आणि त्यावर भाष्यही केले. अनेक राष्ट्रीय नियतकालिकांनीही या हत्येवर मुखपृष्ठ प्रकाशित केले.
· स्टेन्स आणि त्यांच्या मुलांना जिवंत जाळल्याच्या घटनेनंतर लगेचच भारताचे तत्कालीन राष्ट्रपती के आर नारायणन यांनी एक निवेदन जारी केले आणि त्याबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले. फार मोठी घटना घडल्याशिवाय राष्ट्रपती भवन कधीही अशी घोषणा करत नाही. राष्ट्रपती नारायणन यांनी या घृणास्पद कृत्याचे वर्णन "इतिहासातील काळ्या कृत्यांच्या यादीशी संबंधित" आणि “सहिष्णुता आणि मानवतेच्या परंपरेचे विकृती” म्हणून केले .
· ज्येष्ठ पत्रकार अभय मोकाशी यांनी दैनिक मिड-डेमध्ये ग्रॅहम स्टेन्स आणि त्यांच्या दोन मुलांना जाळल्याचा निषेध व्यक्त करताना त्यांच्या 'नेशन स्टेट' या स्तंभात लिहिले कि, मला माहित नाही की, ऑस्ट्रेलियन मिशनरी,ग्रॅहम स्टेन्स ज्यानां त्यांच्या दोन मुलासह जिवंत जाळण्यात आले. ते धर्मांतर करत होते कि नाही .परंतु त्याने एक गोष्ट नक्कीच केली - “ज्यांना स्वकीयांनी देखील त्यागले होते, प्राण्यांपेक्षा वाईट वागणूक दिली होती,त्या कुष्ठरुग्णांचे त्याने मानवात रूपांतर केले. स्टेन्स, त्याची पत्नी आणि त्यांच्या मुलांनी कुष्ठरुग्णांना माणसांसारखे जगण्यास मदत केली.
· ते पुढे म्हणाले, "स्टेन्स आणि त्यांच्या दोन पुत्रांच्या हत्येला जबाबदार असलेल्या हिंदू कट्टरवाद्यांनी हे जाणून घेतले पाहिजे की, या तिघांच्या मृत्यूमुळे ख्रिश्चन धर्माचे नाही, तर संपूर्ण मानवतेचे नुकसान झाले आहे. ज्या हिंदू कुष्ठरुग्णांसाठी त्यांनी आपले जीवन वाहून घेतले होते त्या हिंदू कुष्ठरुग्णांनी त्यांच्या तारणहारास गमावले आहे.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते स्वामी अग्निवेश म्हणाले की, या घटनेने राष्ट्राच्या विवेकबुद्धीला धक्का बसला आहे.· तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी “ माझं डोकं लाजेनं झुकतं आहे ” अशी टिप्पणी केली होती
· काही वर्षांनी 2002 मध्ये, शांतता कार्यकर्त्यांनी ग्लॅडिस स्टेन्स यांना (Gandhi Community Harmony Award) गांधी सामाजिक शांतता पुरस्कार दिला.
अधिक ग्रॅहॅम विषयी ऐकण्यासाठी पुढील व्हिडिओ वर क्लिक करा. ,👇👇
जर आपणास या आर्टिकल द्वारे आशीर्वादीत , उत्तेजन मिळाले असल्यास जरूर हि माहिती पुढे शेअर करा.
References :- English book ' Burnt Alive', Babu K. Verghese,Websites- camilopark.blogspot.com, biblevani.com, Wikipedia
Very Nice information in marathi thank you so much.
Good information ,Thank you so much ..... I am really bless this testimony.......God bless you.....😇😇