नवीन वर्षात आध्यात्मिक जीवनाची तयारी कशी करावी? How to Prepare Your Spiritual Life for the New Year?
नवीन
वर्षात आध्यात्मिक जीवनाची तयारी कशी करावी?
How to Prepare Your Spiritual Life for the
New Year?
प्रत्येक
नवीन वर्ष आपल्यासमोर नवी सुरुवात, नवी स्वप्ने आणि नवे संकल्प घेऊन
येते. जगातील बहुतांश लोक वर्षाचा शेवट साजरा करतात, नव्या
वस्तू खरेदी करतात, पार्टी करतात, पण
देवाच्या लोकांसाठी नवीन वर्ष म्हणजे फक्त सण साजरा करणे नसून, नवीन आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात करण्याची संधी आहे.
बायबल
आपल्याला नवीनपणाचा खरा अर्थ शिकवते – “जो कोणी ख्रिस्तामध्ये आहे तो नवा सृष्टी
आहे; जुन्या गोष्टी निघून गेल्या; पाहा, सर्व काही नवे झाले आहे.” (२ करिंथ ५:१७).
म्हणून नवीन वर्ष म्हणजे आपले आध्यात्मिक जीवन अधिक मजबूत करण्याचा
दृढनिश्चय होय .
नवीन वर्ष म्हणजे नवीन सुरुवात, पण आध्यात्मिक वाढ ही
अचानक होत नाही. ती शिस्तबद्ध केलेल्या
तयारीमुळे होते. बायबल आपल्याला स्पष्ट मार्ग दाखवते.
तर चला, नवीन वर्षात आपले
आध्यात्मिक जीवन अधिक मजबूत कसे करावे? याविषयी काही
महत्त्वाच्या आध्यात्मिक तयारीकडे पाहू या:
१. प्रथम मागील वर्षाचे आत्मपरीक्षण करा
आध्यात्मिक जीवनाची सुरुवात ही स्वतःची तपासणी करण्यापासून होते. नवीन प्रवास सुरू करण्याआधी आपण
कुठे चुकलो? कुठे मजबूत होतो? याचा विचार करणे आवश्यक आहे.
स्तोत्र
१३९:२३-२४ मध्ये दावीद प्रार्थना करतो—
“हे देवा, माझी
झडती घेऊन माझे हृदय जाण; मला कसोटीस लावून माझे मनोगत
जाण.माझ्या ठायी दुष्टपणाकडे काही प्रवृत्ती असेल तर पाहा; आणि
मला सनातन मार्गाने चालव.”
जीवनातील पुढील गोष्टीवर आत्मपरीक्षण करा
1. पाप — जे देवाला
अप्रिय आहे.
2. कटुता / राग — जे नातेसंबंध तोडते.
3. वाईट सवयी — ज्या आध्यात्मिक जीवन कमजोर करतात.
4. आध्यात्मिक आळस — प्रार्थना, वचन,
संगती यापासून दूर नेतो.
२. देवाशी असलेले नाते दृढ करा
ख्रिस्ती
जीवनाचा मुख्य आधार म्हणजे देवाशी
व्यक्तिगत नाते असणे होय .
याकोब ४:८
सांगतो, - “देवाजवळ या म्हणजे तो
तुमच्याजवळ येईल.”
नवीन
वर्षात दररोज नियमित प्रार्थना, बायबल अभ्यास आणि देवाच्या उपस्थितीत वेळ घालवणे हे प्रथम
प्राधान्य ठेवा. जो देवाला प्रथम प्राध्यान्य देतो त्याचे जीवन तो स्वतः उभारत
असतो.
३. नियमित देवाचे वचन वाचा . - देव आपल्या लोकांशी वचनातून बोलतो.
स्तोत्र
१:२ सांगते , “जो परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करतो,
तो धन्य.”
यहोशवा १:८ — “नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे; त्यात जे काही लिहिले आहे ते तू काळजीपूर्वक
पाळ आणि रात्रंदिवस त्याचे मनन कर, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा
होईल व तुला यश:प्राप्ती घडेल.
स्तोत्र ११९:१०५ — “तुझे वचन माझ्या पावलांसाठी दिव्यासारखे व माझ्या मार्गावर
प्रकाशासारखे आहे.”
या नवीन
वर्षात पुढीलप्रमाणे सवय लावून घेऊन तिचे
काटेकोरपणे पालन करा .
·
वाचा — दररोज किमान १५–२०
मिनिटे बायबल वाचा.
·
लिहा — बायबल द्वारे देव काय बोलतो ते नोटबुकमध्ये लिहा.
·
मनन – वाचलेल्या वचनावर दिवसभर
मनन करा .
·
पाठ करा – मनाला भिडलेले वचन पाठ करा.
·
लागू करा — वाचन म्हणजे माहिती; पालन
म्हणजे परिवर्तन.
वचन
आपल्याला मार्ग दाखवते, बळ देते, चुकांपासून जपते.
४. प्रार्थनामय जीवन विकसित करा
प्रार्थना
ही केवळ गरज व्यक्त करण्याचे माध्यम नाही; ती देवाशी संवाद आहे.
१ थेस्सलनी ५:१७ सांगते, “निरंतर प्रार्थना करा.”
नवीन वर्षात करावयाच्या गोष्टी :
- प्रार्थनेसाठी दररोज निश्चित वेळ ठरवा.
- उपवासासहीत
प्रार्थना करा.
- स्वतःसाठी, कुटुंबासाठी, चर्चसाठी आणि
सेवेसाठी सतत प्रार्थना करा.
- पवित्र
आत्म्याच्या नेतृत्वाखाली प्रार्थना शिका.
- प्रार्थना
तुम्हाला अध्यात्मिकदृष्ट्या जागृत ठेवते.
- प्रार्थनेसाठी दररोज निश्चित वेळ ठरवा.
५. वाईटापासून दूर राहा – पवित्र जीवन जगा
देवाची मुले पवित्रतेत चालण्यासाठी निवडलेली
आहेत.
१ पेत्र १:१५ सांगते, - “तर तुम्हांला पाचारण करणारा जसा पवित्र आहे तसे
तुम्हीही सर्व प्रकारच्या आचरणात पवित्र व्हा.”
नवीन वर्षात करावयाच्या गोष्टी :
· आपल्या
कोणत्या सवयी, बोलणे, विचार
किंवा कृत्य आध्यात्मिक जीवनाचा नाश करतात त्या ओळखून त्या कबूल करून सोडून द्या.
· योग्य
निर्णय घेण्यासाठी आत्म्याचे मार्गदर्शन घ्या.
· या
वर्षी मला पापापासून दूर राहायचे आहे" असा नवा निर्णय घ्या.
· पवित्रता
ही देवाच्या उपस्थितीची गुरुकिल्ली आहे.
६. विश्वासाची कृती करा – सेवाकार्यात पुढे
चला
याकोब २:१७ सांगते ह्याप्रमाणे
विश्वासाबरोबर जर क्रिया नाहीत तर तो जात्या निर्जीव आहे.
नवीन वर्षात करावयाच्या गोष्टी :
· मंडळीच्या
सेवाकार्यात सक्रिय पुढाकार घ्या. (गायन, प्रार्थना,
सुवार्ता, मदतकार्य).
· गरीब,
आजारीआणि गरजूंची मदत करा.
· देवाचे
राज्य वाढवण्यासाठी आपले कला- कौश्यल्य वापरा.
· ख्रिस्ती
जीवन स्वार्थी नाही; ते इतरांची सेवा करण्यासाठी
आहे.
७. आध्यात्मिक सहभागीता मजबूत करा
नीतिसूत्रे 13:20 — “सुज्ञांची सोबत धर म्हणजे सुज्ञ होशील.”
एकटा
विश्वासी कमकुवत पडतो; परंतु मंडळीतील सहवास विश्वासाला बळकटी देतो.
इब्री
१०:२५ सावधगिरी देते,
“आपण कित्येकांच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे
न सोडता एकमेकांना बोध करावा, आणि तो
दिवस जसजसा जवळ येत असल्याचे तुम्हांला दिसते तसतसा तो अधिक करावा.
कुटुंब, चर्च, प्रार्थना गट, बायबल अध्ययन गट – हे आपल्याला विश्वासात
बांधून ठेवतात आणि अध्यात्मिकतेत वाढवतात.
नवीन वर्षात करावयाच्या गोष्टी :
·
तुम्हास देवापासून दूर करणाऱ्या
गोष्टींपासून दूर राहा.
·
आध्यात्मिक संगत कायम ठेवा .
·
प्रार्थना गट, बायबल
अभ्यास, चर्च उपस्थिती नियमित ठेवा.
·
मनोरंजनावर नियंत्रण ठेवा (मोबाईल, सोशल
मीडिया इ.)
८. तक्रारी नव्हे तर कृतज्ञता मनात ठेवा
कृतज्ञ
हृदय देवास आनंद देतो.
१
थेस्सलनी ५:१८, - “सर्व स्थितीत उपकारस्तुती करा; कारण तुमच्याविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे. '
नवीन वर्षात करावयाच्या गोष्टी :
- देवाने
दिलेल्या आशिर्वादांची आठवण ठेवा.
- दिवसाची
सुरुवात देवाचे आभार मानून करा.
- सर्व
परिस्थितीत देवावर विश्वास ठेवा
कृतज्ञता
जीवनात आनंद वाढवते.
९. आध्यात्मिक शिस्त लावा (Spiritual Discipline)
पॉल म्हणतो (१ करिंथ ९:२७ ): “मी माझ्या शरीराला शिस्त
लावतो.”
जसे आपण आर्थिक किंवा शैक्षणिक उद्दिष्टं ठेवतो तसे आध्यात्मिक उद्दिष्टं ही
ठेवा.
मत्तय
६:३३ सांगते,
“तर तुम्ही पहिल्याने देवाचे राज्य व त्याचे
नीतिमत्त्व मिळवण्यास झटा.…”
या वर्षासाठी विशेष ध्येय्य ठेवा ,उदाहरणार्थ
·
या वर्षी संपूर्ण बायबल पूर्ण करणार.
·
आठवड्याला एकदा उपवास करणार .
·
दर आठवड्याला किमान २ लोकांना शुभवर्तमान
सांगणार.
·
कुटुंबासोबत रोज सामूहिक प्रार्थना करणार
.
·
ख्रिस्ताने सांगितल्यानुसार जीवन जगणार .
·
आठवड्यातून एक दिवस उपवास करणार .
·
प्रार्थना, वाचन, उपवास आणि ध्यान — हे चार खांब मजबूत करा.
पवित्र आत्म्याची मार्गदर्शन मागा (Seek the Holy Spirit’s Leading)
·
पवित्र आत्म्याशिवाय आध्यात्मिक जीवन
शक्य नाही.
·
रोज “पवित्र आत्म्या,
आज मला मार्गदर्शन कर” अशी प्रार्थना करा.
·
कुठल्याही मोठ्या निर्णयापूर्वी
त्यांच्या मार्गदर्शनाची वाट पहा.
·
आत्म्याचे फळ वाढवा – प्रेम, शांती,
संयम, नम्रता (गलती 5:22–23).
१०. प्रभूच्या पुनरागमनासाठी सज्ज राहा
नवीन वर्ष
म्हणजे आपण येशूच्या पुनरागमनाच्या अधिक जवळ आलो आहोत!
मत्तय
२४:४४, “म्हणून तुम्हीही सिद्ध असा …”
येशू
केव्हा येईल हे माहित नाही, म्हणून जागृत, विश्वासू , आणि
अध्यात्मिकदृष्ट्या सिद्ध रहा.
समाप्ती (Conclusion):
आध्यात्मिक तयारी म्हणजे
प्रार्थना + वचन + शिस्त + सेवा +
पवित्रता + विश्वास.
नवीन वर्ष हे देवाजवळ जाण्याचे आणि आत्मिकदृष्ट्या मजबूत होण्याचे मोठे
संधीचे दार आहे.
🌟 देवाच्या कृपेने तुमचे वर्ष आध्यात्मिकदृष्ट्या फलदायी होवो! 🌟
Please Share
