डेव्हीड लिव्हींगस्टन David Livingstone biography in Marathi
अंधार खंडाला प्रज्वलीत करणारा मानव
डेव्हीड लिव्हींगस्टन १८१३-१८७३
![]() |
david-livingstone-biography-in-marathi |
लहानशी रक्कम आईच्या हातात देत डेव्हीडने उद्गराला “ आई ही माझ्या आठवडयाची कमाई आहे . त्याच्या कुटुंबातील दारिद्रय घालवण्यासाठी जे थोडेसे पैसे त्याने कमविले होते. त्यात त्याला फार आनंद व मनोरंजन वाटला . “ डेव्हीड या पैसाचे तु काय करणार आहेस, त्याच्या आईने विचारले. जरा शब्द चोरतच तो म्हटला ,
“आई जर तुझी परवानगी असेल , तर मी लॅटीन व्याकरणाचे पुस्तक विकत घेईन.” जे कमालीचे गरिबीमुळे घेणे शक्य नव्हते .
सुरवातीचे जीवन डेव्हीड लिव्हीगस्टनचा जन्म
खूप परिश्रमाने त्याने लॅटीनमध्ये यश मिळवले . त्यानंतर त्याने विज्ञानशास्त्र शिकावयास सुरूवात केली. त्याच्या प्रामाणिक कामामुळे त्यास कामात बढती मिळली. तसेच उन्हाळयात आणि हिवाळयात काम केल्यामुळे वैदकशास्त्राचा अभ्यास तो विद्यालयामध्ये करू शकला. त्याचबरोबर त्याने याच काळात ईश्वरज्ञानाचाही अभ्यास केला. हे सर्व शिक्षण घेण्यास त्यास कोणीही मदत केली नाही . या सर्व अनुभवचा त्याच्या जीवनात उपयोग झाला.
त्याला खेळण्यासाठी वेळ नसे. परंतु तो त्याच्या घराजवळ वाहत असलेल्या नदीकिनारी फिरण्याचा आनंद घेत असे. तो पक्षी, फुले आणि खडकांचे तो निरिक्षण करी. याबरोबरच त्यास पर्यटनावरील पुस्तके वाचणे आवडे. या सर्वापेक्षा त्यास बायबलचे वाचन अधिक आवडे. त्याचे बायबलवर खूप प्रेम होते. नंतरच्या जीवनात बायबलमधूनच त्यास सांत्वन मिळत असे.
आफ्रिकेसाठी पाचारण
वीस वर्षाचा असतानाच डेव्हीडने ख्रिस्ताला स्विकारले होते आणि याच वयात त्याने दुसऱ्या देशात मिशनरी म्हणून जाण्याचे ठरविले. एका जर्मन मिशनऱ्याने डेव्हीडला पत्र लिहिले की, डॉक्टर मिशनऱ्याची चीनला गरज आहे. डेव्हीड लिव्हिंगस्टनने आपले वैद्यकिय शास्त्राचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर चीनला जाण्याचा बेत निश्चित केला. त्याने दोन वर्षातच वैद्यकीय अभ्यास पूर्ण केला आणि चीनला जायला तयार झाला. परंतू देवाकडे वेगळया योजना होत्या. जेव्हा आम्ही आमच्या सर्व योजना देवाच्या हातात देतो, तेंव्हा देव त्याच्या इच्छा आपल्या जीवनात पूर्ण करतो .
चीनमध्ये युध्द सुरू झाल्यामुळे लिव्हीगस्टन तिकडे जाऊ शकला नाही. तो देवाच्या मार्गदर्शनाची प्रतिक्षा करत असताना, रॉबर्ट मॉफेट आफ्रिकेतील एक मिशनरी लंडनला आला आणि आफ्रिकेच्या गरजाबद्दल बोलला. लिव्हीगस्टन त्याच्याबरोबर बोलला. मॉफेटने त्याला सांगितले. जगातील १००० खेडयामध्ये राहणाऱ्या देवरहीत व आशारहित अशा खिस्तविणा असणाऱ्या लोकांमधून दूर वर येत असलेला मी पहिला आहे.
या संदेशाद्वारे डेव्हीड लिव्हींगस्टनच्या प्रभावित होऊन त्याने आफ्रिकेला जाण्याचा निर्णय घेतला . आफ्रिकेच्या प्रवास दरम्याने त्याने ग्रहांच्या परिभ्रमणाचा अभ्यास केला. दक्षिण आफ्रिकेतील केप शहरात उतरल्याबरोबर तो खगोलशास्त्र शिकला. नंतर त्याचा त्यास घनदाट अरण्यातून मार्ग शोधण्यासाठी फार उपयोग झाला .
दुर्गम मागासलेल्या भागलिव्हिंगस्टनने, केप शहरापासून कुरूमन पर्यंत ७०० मैल बैलगाडीने प्रवास केला. याच ठिकाणी रोबर्ट मोफेट सेवा करत असे . परंतु अध्याप ज्या मध्यभागात कोणीही गेलेले नव्हते अशा भागात लिव्हींगस्टनला देवाने देवू केलेले महान मिशन कार्यासाठी जायचे होते . त्याचा असा विश्वास होता की, ज्या ठिकाणी पूर्वी कोणीही गेलेले नाही, त्या ठिकाणी सुवार्ता करण्यासाठी देवाने त्याला बोलविले आहे. त्या अतर्गत भागामध्ये पुष्कळ रहिवासी होते. ज्यानी सुवार्ता कधीही ऐकलेली नव्हती. त्यांना सुवार्ता सांगण्याचा त्याने निश्चय केला.
सिंहाची शिकार
![]() |
david-livingstone-lion |
मबोस्टा दरीचे निसर्गरम्य सौंदर्य पाहुन लिवहींगस्टनने तेथे तीन वर्षे वास्तव्य केले . त्याचे लग्न रॉबर्ट मोफेटच्या मुलीशी झाले . मबोस्टा येथे बरेच सिंह होते ते खूपच त्रास देत शिवाय त्यानी तेथील बरेच लोक व पशु मारले होती. तेव्हा त्यांनी लिव्हीगस्टनची मदत घेतली त्याला माहित होते की, जर एक सिंह मारला तर बाकीचे सिंह पळून जातील.त्याने काही आफ्रिकन लोकाना बरोबर घेऊन सिंहाची शिकार करण्यासाठी निघाला ज्या सिंहावर त्याने गोळी झाडली त्याच सिंहाने त्याच्यावर उडी घेतली आणि त्याच्या खांद्यांचा लचका तोडला . त्याचवेळेस बरोबर असणार्यांनी त्यास गोळी मारून ठार केले .परंतु लिवहींगस्टनला झालेली जखम बरी होण्यास पुष्कळ काळ लागला. त्यांचा खांदा अपंग झाला होता. झालेले व्रण तो मरेपर्यंत गेले नाहीत .त्यानंतर त्याचे ते व्रण त्याची ओळख बनली . लिवहींगस्टनची जीवनशैली पाहून पुष्कळ आफ्रिकेतील लोकांनी ख्रिस्ताला स्वीकारले.
उत्तरेस स्थलांतर होणेपाण्याचा अभाव असल्यामळे तिकडे दुष्काळ पडलेला होता. " लिव्हींगस्टनला इतर लोकांप्रमाणे नाकतोडे आणि एक प्रकारचे बेडूक त्यावेळेस खावे लागले. आता उत्तरेकडे योग्य जागेच्या शोधात तो होता . त्याने एका अरण्याविषयी एकले जेथे कोणीही गेलेलं नव्हते . तेव्हा त्याने ३०० मैल लांब असलेले ओसाड अरण्य पाण्याविणा पार करायला सुरूवात केली. एक वेळेस तेथे राहणार्या जंगली व्यक्तीने पाणी दिले जे एका शाहागाचे अंडयाच्या कवचात भरून वाळूत पुरलेले होते. शेवटी तो नेगांमी बेटावर पोहचला . तो त्याचा पहिला भौगोलिक शोध होता त्या बेटाचा शोध लावणारा तो पहिला युरोपिअन होता.
![]() |
Livngstone-lake-discovery |
तेथून त्याने पुन्हा प्रवास सुरू केला. अंधश्रध्दा असणारया लोकांतून आणि बॉयर्स (दक्षिण आफ्रिकेत स्थायिक झालेले इच लोक) यांच्यापासून असलेल्या धोक्यातून तो पुढे जात होता. हे लोक करत असलेल्या गुलामांचा व्यापार बंद करण्याचा लिव्हीगस्टने आटोकाट प्रयत्न केला. यामुळे या लोकांनी त्यास भयंकर त्रास दिला . एकदा त्या बॉयर्सनी त्यांची खुर्ची टेबल व कपडे पळवून नेले,त्याची पुस्तके व औषधे नष्ट केली. परंतू त्याने त्याचा प्रवास चालूच ठेवला आणि आफ्रिकेच्या मध्यभागातून वाहणारी झाम्बेझ नदीचा शोध लावला. येथे राहून तो काम करू शकत नव्हता. कारण तेथे एक भयंकर ताप पसरत चालला होता.
एकटयाचा प्रवासआता येथून पुढे पत्नी व मुलांबरोबर प्रवास करणे फार धोकाधायक असल्याकारणामुळे त्याने त्यांना इंग्लडला पाठविले आणि ख्रिस्ताची सेवा करण्याची प्रबळ इच्छेने पुढील प्रवास आफ्रिकेच्या जंगलातून त्याने एकटयानेच केला. आता त्याला आफ्रिकेच्या मध्यभागातील पूर्वेपासून पश्चिमेकडे प्रवास करायचा होता. सन १८५५-१८५६ या काळात त्याने नवीन ठिकाणे शोधण्याचा प्रयत्न केला . या प्रवासात त्याला पुष्कळ आफ्रिकन लोक भटले, या लोकांनी कधीच अगोदर गोरया माणसास पाहिलेले नव्हते. त्याच्या कृपाळ आणि दयाळू स्वभावामुळे आफ्रिकन वशांतील लोकांबरोबर त्याची मैत्री झाली . जव्हा जेव्हा तो त्यांच्याबरोबर असे, तो त्यास उपदेश करी तसेच त्यांना औषधांची मदत देई. त्यांच्यातील काही मानवजात वंश त्याचा द्वेष करीत तेव्हा त्याला पुष्कळदा त्यांच्याकडील धोक्यांना तोंड द्यावे लागले.
गुलामाचां व्यापार
![]() |
slave trade |
या प्रवासामध्ये लिकींगस्टनला गुलामगिरी व्यापराकडून भयंकर परिणाम पाहायला भेटले. त्यांनी संपूर्ण खेडयावर हल्ला केला आणि वंश पुरूषांना, स्त्रीयांना आणि मुलांना गुलाम म्हणून पकडून नेले.आणि ते खेडे अग्नीने पेटवून दिले . त्यांनी त्या गुलामांच्या मानेवर लाकडांचे मोठे ओंडके देऊन जंगलातून त्यांना चालायला लावले होते. आणि नंतर त्यांना गुलाम म्हणून विकून टाकले. मार्गात ज्या लोकांना जखमा होत किंवा जे आजारी पडत त्यांना तेथेच, तसेच मरूण जाण्यासाठी सोडून दिले होते . पुष्कळ ठिकाणी मानवी हडांचे सांगाडे पसरलेले दिसत. जी खेडी पूर्वी फार सुपीक होती. परंतु गुलामगिरी व्यापार करणाऱ्या लोकांमुळे आत ते खेडे ओसाड पडलेली होती . या परिस्थितीने लिव्हीगस्टनच्या हृदयाला स्पर्श केला आणि त्याला त्याने त्यास “आफ्रिकेची उघडी जखम." संबोधले . त्याने असली दुष्कृत्ये मूळापासून नष्ट करायचे ठरविले हा निश्चिय पूर्ण करण्यासाठी आणि मिशनऱ्यांना अंतर्गत भागात येण्यासाठी त्याला नवीन मार्गाचा शोध करावा लागेल हे त्याला माहित होते . पुष्कळदा त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांचा गैरसमज व्हायचा की, तोच गुलामांच्या व्यापरी आहे म्हणून ते त्यास त्रास देण्याचा प्रयत्न करीत.
संकटेआफ्रिकेतील पुढारी ज्याचे प्रथम परिवर्तन झाले होते. त्याने लिव्हिंगस्टनला म्हटले, “ तुम्ही लवकर येऊन हे शुभवर्तमान का नाही सांगितले ? " माझ्या पूर्वजांनी यापैकी काहीएक एकलेले नव्हते." हे शब्द लिव्हिंगस्टनच्या हृदयात कोरले गेले. हजारो लोक जे हया अंतर्गत भागात वस्ती करून राहत होते. त्यांनी सुवार्ता कधीही ऐकलेली नव्हती. आणि या सर्वांपर्यंत सुवार्ता पोहचवणे हे काम सोपे नव्हते. त्याचे कपडे जीर्ण झाले होते. त्याच्या पायांना फोड आलेले होते. अंगावर खूप जखमा झाल्या होत्या , यामुळे कधी कधी लोक त्याला पैसे देवून सूध्दा अन्न देत नव्हते. त्याला उपाशी राहावे लागे. काही वेळा तो मुंळ खाऊन वेळ काढी. जमीनीवरच तो झोपत असे. याचा परिणाम म्हणजे त्यास ३१ वेळा तापाचा सामना करावा लागला .त्याचे शरीर म्हणजे अगदी सांगाड्याप्रमाणे झाले होते. काही वेळेला त्याला इतका उच्च ताप असे कि ,त्याच्याबरोबर असणाऱ्या लोकांची नावे देखील तो विसरून जात असे. दिवस व तारखा देखील त्याच्या लक्षात राहत नसत. परंतू या परिस्थितही तो कधीच निराश झाला नाही. स्वतःला उत्साहीत करण्यासाठी तो वारंवार बायबलचे वाचन करीत असे, त्याच्या रोजनिशीत तो लिहितो. “मी प्रभुमध्ये स्वतःला शक्तिमान बनवितो”. जसा तो सेवेत पुढे जात होता तसा तो कोठेही जाण्यास तयार होता. त्याचे आव्हान हे होत की, जे लोक गुलामांचा व्यापार करतात त्यांच्यापर्यंत मिशनरीद्वारे ख्रिस्ताचे प्रेम घेऊन जाणे.
इंग्लडमध्ये लिव्हींगस्टनचा सन्मान
लिव्हींगस्टन ने नद्या आणि सरोवरांचा शोध लावल्यामुळे तो अफिकेमध्ये प्रसिध्द झाला. व्हिक्टोरिआ धबधब्याचा शोध त्याच्याद्वारे लागला. जेव्हा तो इंग्लडला गेला तेव्हा त्याचा फार मोठा सन्मान करण्यात आला. आफ्रिकेतील १६ वर्षाच्या वास्तव्यात त्याने ९००० मैलाचा प्रवास पायी किंवा बोटीने केला. त्याला सुवर्णपदक आणि त्याने केलेले शोध व संसोधनामुळे सन्मानीत पारितोषिके प्राप्त झाली. लोक फार मोठया जमावाने त्याच्याकडे त्याचे भाषण एकण्यासाठी येत असत. वर्तमानपत्रात त्याच्याबद्दल लेख असत. त्याने त्याच्या प्रवासाबद्दल पुस्तक देखील लिहिले.
पुन्हा आफ्रिकेला प्रवासलिव्हींगस्टन पुन्हा आफ्रिकेला एक सरकारी अधिकारी म्हणून आला. आता त्यास नवीन स्थळे शोधण्याचे आणि मिशन कार्य करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले होते. आता त्याच्याकडे पुष्कळ मदतनीस होते. परंतू एका नतर एक तापाने आजारी होई आणि त्याच्यापासून दूर पाठविला जाई . त्याची पत्नी जी त्याच्या बरोबर होती ती देखील तापली आणि ३ महिण्यातच तिचाही मृत्यू झाला . तिला एका झाडाखाली पुरण्यात आले. जेथे प्रवासाच्या सुरुवातीला लाव्हगस्टनला त्याच्या मुलीला पुरावे लागले होते. परंतु त्याच्या बायकोचे मरण त्याला सहन करता आले नाही तो लिहितो “हया मोठया धक्याने माझं हृदय माझ्यामधून दूर नेले आहे." परंतू त्याचा निर्धार होता कि, जगातील कोणतीही गोष्ट मला प्रभूचे कार्य करण्यापासून मला वेगळे करू शकणार नाही "मी प्रभूमध्ये स्वतःला शक्तीमान करून पुढे जातो."
त्याच्या जीवनात पुष्कळ दुःखे आली होती. एकदा एक गेंडा त्याच्यावर धावत आला. परंतू जेव्हा तो त्याच्या जवळ आला तो एकाकी थांबला देवानेच त्याला वाचविले. दुसऱ्यावेळी एका आफ्रिकेच्या माणसाने त्याच्यावर बाण सोडला. तो अगदी त्याच्या मानेजवळून झाडाला लागला. देव नेहमीच त्याच्याबरोबर होता. तो नेहमी म्हणत असे कि “जोपर्यंत त्याचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणीही त्याला इजा करू शकणार नाही”. दुसरा मोठा धक्का हा होता की, ज्या ब्रिटिश सरकारने लिव्हींगस्टनला आपला अधिकारी म्हणून आफ्रिकेला पाठविले होते त्यांनी त्याला वेतन पाठविणे बंद केले.नाईलाजस्तव त्याला इंग्लडला परतावे लागले.पुन्हा एकदा देवाने त्याच्यासाठी आफ्रिकेला जाण्यासाठी एक मार्ग उघडला. यानंतर लिव्हीगस्टन इंग्लडला पुन्हा कधीच परतला नाही .
शेवटच्या शोधाकडील प्रवासलिव्हींगस्टन पुन्हा आफ्रिकेच्या मध्यभागाकडे गेला. आता तो ६० वर्षाचा होता. पुष्कळ वर्षे अथक प्रवास केल्यामुळे त्याच्या आरोग्यावर परिणाम झाला होता. आफ्रिकेन लोकांकडून झालेला विरोध त्याच्या सहकार्यांनी केलेला विश्वासघात याचा देखील त्यांच्यावर परिणाम झाला होता. त्याला पाठवण्यात आलेले पत्र व चिज वस्तु चोरीला गेल्या होत्या. त्याच्या काही जरूरी वस्तु अरब व्यापाऱ्यांकडे त्याने ठेवल्या होत्या. लिव्हींगस्टन कडून त्यांना काही एक निरोप न मिळाल्यामुळे त्यांनी त्या वस्तू विकून टाकल्या. लिव्हींगस्टन गरीबासारखा उपाशी, कपडया शिवाय आणि आफ्रिकेन लोकाच्या मित्रत्वा शिवाय राहिला. त्याने लिहिलेली पत्रे गुलाम विकणाऱ्या व्यापाऱ्यांनी शत्रुत्व मनात बाळगुन चोरली आणि नष्ट केली. जेव्हा त्याला ताप येई तेव्हा तो औषधे घेऊ शकत नव्हता कारण त्याची औषधाची पेटी देखील गहाळ झाली होती. म्हणून बाहेर जगाशी व स्वकीयाशी देखील संपर्क तुटला गेला होता. यामुळे संबधीत लोकांनी असे गृहीत धरले की, लिव्हींगस्टन हे जग सोडून गेला असावा . परंतु प्रभूने लिव्हींगस्टनला सोडले नव्हते .
एका अमेरिकन “न्यूयार्क हेरॉल्ड” मासिकाचा संपादक याने हेन्री स्टॅनली नावाच्या व्यक्तीस लिव्हींगस्टन बद्दल माहिती मिळवण्यासाठी पाठवले . पुष्कळ प्रवास केल्यानंतर उज्जी या ठिकाणी त्याची भेट झाली . त्याने बरोबर आणलेले अन्न व औषधे लिव्हींगस्टनला दिले यामुळे त्यास बळकटी आली . पुष्कळ महिने लिव्हींगस्टन बरोबर प्रवास केल्यानंतर हॅन्री स्टॅनली जो नास्तिक म्हणून आला होता तो त्याच्या ख्रिस्ती जीवनशैली मुळे त्याच्याकडे आकर्षित झाला. जेंव्हा तो शहरी परतला तो ख्रिस्ती विश्वासणारा म्हणून परतला . आराम व प्रसिध्दी मिळावी यासाठी स्टॅनलीने लिव्हींगस्टनला त्याच्या शहरातील निवासस्थानी पतरण्यास खूप गळ घातली. परंतु लिव्हींगस्टन म्हणाला माझं काम अजुन संपलेल नाही.आणि येण्यास साफ नकार दिला .
वृध्दापकाळी देखील सेवा कार्य
लिव्हांगस्टनने दुसऱ्या वर्षी देखील प्रवास केला. परंतू आता तो अशक्त होत चालला होता. दोन आफ्रिकन मदतगारांनी, जे त्याच्या बरोबर होते. त्याला बाकावर बसायला लावले आणि त्याला घेऊन गेले. फार जोराचा पाऊस आला. त्याचे आजारपण अधिकच वाईट झाले. तो त्याची रोजनिशी लिहु शकत नव्हता. त्या आफ्रिकन मुलांनी प्रेमाने त्यांची काळजी वाहिली. त्याचे जीवन आणि शक्ती हळुहळु त्याला सोडून जाऊ लागली. त्यांनी त्याला एका झोपडीत ठेवले व त्याची काळजी घेतली. सन १८७३ च्या मे महिण्यात सकाळी तो त्याच्या बिछान्याजवळ गुडगे टेकलेले दिसत होता. त्याचे तोंड उशीवर असलेल्या हातावर होते. तो त्या प्रार्थना अवस्थेतच मरण पावला. त्याचा मृत्यू होतांना सुध्दा त्याने हरवलेल्या आफ्रिकन आत्म्यासाठी ज्यांना ख्रिस्त माहित नाही अंशासाठी प्रार्थना केली असेल यात शंकाच नाही.
प्रेमळ विश्वासू आफ्रिकन लोकांनी त्याचे हृदय कापून एक स्मारक म्हणून आफ्रिकेतील ईलाल नावाच्या खेड्यात पूरले. आणि मसाला लावलेले शरार ९०० मैलापेक्षा दूर समुद्रकिनारी आणले. मग तेथून त्यांचे शरीर इंग्लंडला घेऊन गेले आणि सिंहाने जखमी केलेल्या जखमांच्या चट्टयांवरून त्याचे प्रेत त्यांनी ओळखले गेले. त्याचे ते शरीर वेस्ट मिनीस्टर अॅबे या ठिकाणी पूरण्यात आले जेथे प्रसिध्द आणि पुरस्कार मिळालेल्यांची शरीरे ठेवली जात. त्याला तेथे ठेवत असताना त्यास सन्मान देण्यासाठी हजारो लोकांचा जमाव एकत्र झाला होता.
![]() |
david-livingstone-memorial |
त्या जमावामध्ये एक माणूस ज्याचे कपडे फार घाणरडे आणि फाटलेले होते. तो खूपच ओक्साबोक्सा रडत होता. जेव्हा एका माणसाने त्याला विचारले ," तु एवढा का रडत आहेस ?" तेव्हा तो म्हणाला की डेव्हीड आणि मी एकाच खेडयात जन्मलो होतो. एकाच संडे स्कूलमध्ये आमची वाढ झाली. आणि एकाच ठिकाणी आम्ही काम केले. त्याने देवाचा मार्ग निवडला आणि मी स्वतःचा मार्ग निवडला आता सर्व देश त्याचा सन्मान करीत आहे, आणि मी दुर्लक्षित केलेला आणि अपमानित केलेला आहे. आता माझे कोणी नाव काढावे अस माझ्याबाबत काहीच नाही, फक्त दारूडयाची कबर माझी वाट पाहत आहे.
१ शमुवेल २:३० - “ जे माझा आदर करीतात त्यांचा मी आदर करीन आणि जे मला तुच्छ मानीतात त्यांचा अवमान होईल.” लिव्हींगस्टने देवाचा सन्मान केला आणि देवाने लिव्हींगस्टनचा सन्मान केला. आज हजारो मिशनरी आफ्रिकेत आहेत. सुवार्ता अफ्रिकेच्या मध्यभागापर्यंत पोहचली आहे. गुलामगिरीच्या बेडया तोडल्या गेल्या आहेत. हे सर्व घडून आले आहे ,कारण लिव्हींगस्टनने देवाचा सन्मान केला आणि आज्ञापालन केले.
Please share and be blessed ......🙏 🙏