Willam Cary , Morden Missonary विल्यम केरींची महत्कृत्ये
केरींची महत्कृत्ये
![]() |
willam-cary-morden-missonary |
- मुलींना शिक्षण घेता यावे म्हणून खेडोपाडी १०० शाळा सुरू केल्या.
त्या काळी मुलींना शिकू दिले जात नसे. मुलांच्या शिक्षणाला अधिक महत्त्व दिले जात असे, आणि मुलींना केवळ घरकामाला जुंपले जात असे. एवढेच नाही, तर गरीब भारतीय कुटुंबांतील मुलांना तर शिकताच येत नसे.
- सती प्रथेविरुद्ध लढा उभारला आणि तिच्यावर बंदी घालण्यासाठी कारणीभूत ठरले.
सती जाणे ही प्रेतक्रियेची सामाजिक प्रथा होती. विधवा झालेली स्त्री स्वतःच्या इच्छेने नवऱ्याच्या चितेवर स्वतःला जाळून घेत असे किंवा तिला बळजबरीन, सक्तीने चितेवर चढवले जात असे. केरी २५ वर्षे या दुष्ट प्रथेविरुद्ध लढा दिला. राजा राम मोहन रॉय, इश्वर चंद विद्या सागर यांसारखे इतर समाजसुधारकही त्यांना सामील झाले. परिणामी या भयंकर, दुष्ट प्रथेवर बंदी घालण्यात आली.
- कुष्ठरोगांवर औषधोपचार करण्याचा पहिला प्रयत्न
त्या काळात कुष्ठरोग्यांना जिवंत पुरले किंवा जाळले जात असे. त्यांची दयनीय अवस्था पाहून भारतातील कुष्ठरोग्यांवर औषधोपचार करण्याची चळवळ सुरू करणारे केरी हे पहिले व्यक्ती होते.
• गरीब शेतकऱ्यांना साहाय्य व्हावे म्हणून सेव्हिंग्ज बँकेची कल्पना रुजवली.
शेतीची मशागत करण्यासाठी गरीब शेतकऱ्यांना कर्ज घ्यावे लागत असे, परिणामी ते कर्जाच्या बोज्याखाली दबून गेले होते. व्याजखोरीच्या या दुष्ट सावकारापासून सुटका मिळवण्यासाठी सेव्हिंग्ज बँकेची कल्पना रुजवली.
- त्यांनी आणि त्यांच्या टीमने आशियामधील ४४ भाषांत पवित्र शास्त्राचे भाषांतर केले.
त्या काळात भारतात साक्षरतेचे प्रमाण केवळ ५ टक्के होते. केवळ श्रीमंत . आणि प्रतिष्ठित कुटुंबातील लोकांनाच शिक्षण घेता येत असे. पण सर्वांना देवाचे वचन वाचता यावे व सैतानाच्या जाचातून व बंधनातून त्यांची सुटका व्हावी म्हणून प्रत्येकाला शिक्षण घेता यावे अशी केरीची इच्छा होती.
- भारतातील अजूनही प्रभावी असणाऱ्या पहिल्या विद्यापीठाची, सेरामपूर कॉलेजची स्थापना केली..
लोकांना ईश्वरवैज्ञानिक आणि शैक्षणिक शिक्षण देता यावे म्हणून या विद्यापीठाची स्थापना केली होती. भारतातील नामांकित विद्यापीठांमध्ये त्याची अजूनही गणना होते.
- भारतातील पहिला छापखाना सुरू केला. या छापखान्यात भारतातील पहिले वर्तमानपत्र छापले.
भारतातील पहिला छापखाना सुरू केला, आणि पूर्वेकडच्या कोणत्याही भाषेतील पहिलेच वर्तमानपत्र सुरू करून छापले. “फ्रेंड ऑफ इंडिया" (भारताचे मित्र) या त्यांच्या इंग्रजी भाषेतील मासिकामुळे भारतात सामाजिक सुधारणेची चळवळ सुरू झाली. हे वर्तमानपत्र वाचून इतर समाजसुधारक केरींना मिळाले, आणि त्यांनी त्यांच्या लढ्याला बळ दिले.
- विज्ञान आणि नैसर्गिक इतिहास यांवरील पहिली भारतीय पुस्तके
केरी यांनी भारतातील शेतीचे पद्धतशीर सर्वेक्षण केले, आणि शेतीमध्ये सुधारणा व्हाव्यात म्हणून मोहीम सुरू केली. भारतातील पहिले विज्ञानाचे पुस्तक त्यांनी छापले.
Ø इतर कामगिरी
• संस्कृत, मराठी, पंजाबी आणि तेलगू भाषांचे शब्दकोश तयार केले.
•
पहिले वाचनालय सुरू केले.