Christian family ख्रिस्ती परिवार

 

ख्रिस्ती परिवार  

     कुटुंब व कौटुंबिक जीवन हे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात अतिशय महत्त्वाची बाब आहे. ज्याला कुटुंबाची ऊबआईवडीलांचे प्रेमकौटुंबिक जीवन यांचा अनुभव मिळाला नाही त्याच्या मनावर झालेला परिणाम व जखमा आयुष्यभर ओल्या राहतात. इतरांनी केलेले संगोपन,प्रेम नेहमी अपुरे पडते.देवाने कुटुंबसंस्था स्थापन केली.मानवी वाढ,सुख,स्थिरता यासाठी कौटुंबिक जीवन आवश्यक आहे. कुटुंबाचे महत्त्व फार मोठे आहे. पवित्र शास्त्रातील कुटुंबाची व आजच्या कुटुंबाची कल्पना फार वेगळी आहे. पूर्वी हिबू आणि ख्रिस्ती कुटुंब फार मोठे होते. आजचे कुटुंब लहान आहे. एकत्रित कुटुंबपद्धती आज नष्ट होत चालली आहे. आज स्त्रियाही नोकरी करतात. आधुनिक जीवनाचा परिणाम कुटुंबावर झाला आहे. जगाच्या दृष्टीने कुटुंब व कौटुंबिक जीवनाचे महत्त्व फार कमी झाले आहे.

तथापि देवाच्या दृष्टीने कुटुंब व कौटुंबिक जीवन फार महत्त्वाचे आहे. ख्रिस्ती कुटुंब आदर्श कुटुंब असावे. ख्रिस्ती कुटुंब मंडळीचा एक आवश्यक घटक आहे. ख्रिस्ती कुटुंबाशिवाय मंडळीचे जीवन भरभराटीस येऊ शकत नाही. मंडळीत व समाजात ख्रिस्ती कुटुंबाचे महत्त्व फार आहे.

ख्रिस्ती कुटुंबाचे वैशिष्ट्य

christian-family , ख्रिस्ती-कुटुंब
christian-family

ख्रिस्ती कुटुंब इतर कुटुंबांहून निराळे आहे तारण झालेल्या पतीपत्नीलाच ख्रिस्ती कुटुंबाची स्थापना करता येतेकारण अशा कुटुंबात प्रभू येशू ख्रिस्त कुटुंबाचा प्रमुख आहे. त्याचा अधिकार मानला जातो. दररोज सकाळ-संध्याकाळ त्याची भक्ती केली जाते. देवाच्या वचनाप्रमाणे चालण्याचा प्रयत्न केला जातो. पतीपत्नी एकमेकांबरोबर प्रेमाने व निष्ठापूर्वक राहून आपल्या मुलांचे संगोपन खऱ्या प्रेमाने करतात . खिस्ती शिक्षण देतात. त्यांना योग्य वळण लावतात. त्यांच्यासाठी प्रार्थना करतात . प्रेमाने व प्रार्थनेने कौटुंबिक समस्या सोडवतात.

आदर्श कुटुंबाचे वर्णन उत्पत्तीच्या पुस्तकात बघण्यास मिळते .  उत्पत्ती १८:१९ - मी त्याची निवड केली आहे ती अशासाठी की. त्याने आपल्या लेकरास  व आपल्या पश्चात आपल्या घराण्यास आज्ञा द्यावी आणि न्यायनीतीने वागण्यासाठी परमेश्वराचा मार्ग आचरावा.

 "देवाच्या मार्गाने चालणे व न्यायनीतीचे आचरण करणेहे ख्रिस्ती कुटुंबाचे वैशिष्ट्य आहे.

खिस्ती कुटुंबाचा जीवनक्रम

ख्रिस्ती कुटुंबाचा जीवनक्रम पवित्र शास्त्रात सांगितला आहे. प्रभू येशू ख्रिस्त पतीचे मस्तक व कुटुंबाचा प्रभू आहे. पती हा पत्नीचे मस्तक असून कुटुंबाचा प्रमुख आहे. पत्नी पतीच्या अधीन असून त्याची सहकारी आहे. मुले आईबापाच्या आज्ञेत आहेत.

या जीवनक्रमाविषयी पौल नव्या करारात स्पष्ट शिक्षण देतो.

१.    पत्नीचा जीवनक्रम

देवाने एदेन बागेत मनुष्याचा सहकारी म्हणून स्त्रीला उत्पन्न केले. पतन होण्यापूर्वी क्रम व अधिकार यांचा प्रश्न नव्हता, कारण दोघे देवाच्या इच्छेप्रमाणे चालत होते. पतन झाल्यावर देव स्त्रीला म्हणाला, "... तो तुझ्यावर स्वामित्व चालवील . एदेन बागेत स्त्रीने तिच्या पतीबरोबरची समानता गमावली.

इफिसकरांस पत्रात पौल कुटुंबाच्या जीवनक्रमाविषयी सविस्तर लिहितो. तो प्रथम पत्नीचे कर्तव्य सांगतो.

इफिस.५:२२- २४ - स्त्रियांनो तुम्ही जशा प्रभूच्या अधीन तशा आपापल्या पतीच्या जधान असा. कारण जसा ख्रिस्त मंडळीचे मस्तक आहे तसा पती पत्नीचे मस्तक आहे. शिवाय ख्रिस्त हाच शरीराचा तारणारा आहे. तरी मंडळी जशी ख्रिस्ताच्या अधीन असते तसे स्त्रियांनीही सर्व गोष्टीत आपल्या पतीच्या अधीन असावे.

आज हे शिक्षण लोकांना अप्रिय आहे. जगाचा दृष्टिकोण पूर्णपणे बदलला आहे. स्त्रियांना प्रत्येक गोष्टीत समानता मिळावी अशी जगाची ओरड आहे. तसेच स्रियांनाही अधीनता नको आहे .

ख्रिस्ती पत्नीने पतीचा अधिकार मानून त्याची दासी व्हावे किंवा तिने कधीही स्वतःचे मत मांडू नये किंवा  दोघांनी कधीही एकत्र चर्चा करू नयेअसा या शिक्षणाचा अर्थ नाही. आपण जगात कोठेही गेलोतर अधिकाराचा क्रम आहे. त्याप्रमाणे देवाने कुटुंबाचा जीवनक्रम योजिला आहे.

पत्नीने तिच्या पतीच्या अधीन असावे हे तिचे रक्षण होण्यासाठी आहे. पतीने कुंटुबाची जबाबदारी उचलावीत्यांची  गरजा पुरवाव्यातदेवाच्या मार्गावर चालायला पुढारीपण करावे. या सर्व गोष्टीत त्याच्या पत्नीने त्याला साथ द्यावी अशी योजना आहे.

नीति.३१:१० ते ३१ यांमध्ये आदर्श पत्नीचे वर्णन केले आहे. तिच्या घरातील जबाबदाऱ्याना ती प्राधान्य देते. तिने नोकरी करू नये किंवा मंडळीच्या कार्यात भाग घेऊ नये असा याचा अर्थ नाही. तिच्या घरातील जबाबदाऱ्या पार पाडून तिला इतर कार्य करण्यास मोकळीक असते. (अर्थात हे तिच्या नवऱ्याच्या परवानगीने असते).

जी पत्नी तिच्या पतीच्या अधीन राहून देवाने दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडते . तिचे जीवन सुखी व आशीर्वादीत असते. तिच्याद्वारे तिचा पतीमुलेइतर लोक यांनी आशीर्वाद प्राप्त होतो. 

२. पतीचा जीवनक्रम

देवाने पतीला घराचा प्रमुख व पुढारी म्हणून नेमले. त्याने त्याचा अधिकार योग्य रीतीने चालवून पुढारीपणाच्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात.

इफिस ५:२५-३३या वचनांत पौल पतीच्या जबाबदाऱ्या व कर्तव्ये सांगतो. “पतींनोजशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली तशी तुम्हीही आपापल्या पत्नीवर प्रीती करा.  ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि स्वतःस तिच्यासाठी समर्पण केले,"

ख्रिस्त मंडळीचे मस्तक आहे. त्याचा अधिकार मंडळीवर आहे. तो मंडळीचे कल्याण करण्यासाठी स्वतःचे प्रभुत्व चालवतो. तो मंडळीवर इतकी प्रीती करतो की त्याने तिच्यासाठी स्वतःचे अर्पण केले. पतीने या प्रकारची प्रीती आपल्या पत्नीवर करावी. दिलेला अधिकार त्याने प्रीतीने चालवावा , कठोरपणे चालवू नये. निष्ठुरतेने वागू नये.

गृहजीवनातील प्रत्येक क्षेत्राची जबाबदारी पतीवर आहे. तो पत्नीबरोबर चर्चा करतो. ज्या गोष्टीत तिला अधिक माहिती व कार्यक्षमता आहे त्या गोष्टींविषयी ती त्याला मार्गदर्शन करते. तथापि अंतिम जबाबदारी त्याची आहे. घरातील लोकांच्या आत्मिक जीवनाचा जबाबदारी त्याच्यावर आहे. कौटुंबिक भक्तीपवित्र शास्त्रातील शिक्षणउपासनेला हजर राहणे, या सर्व गोष्टींत त्याला पुढाकार घ्यायचा आहे. आवश्यक गरजा पुरवून देणे हेही  त्याचे आद्य  कर्तव्य आहे. या बाबतीत साहाय्य करण्यासाठी पत्नीने नोकरी करावी किवा करू नये याविषयी अंतिम निर्णय पती करतो.

मुलांना शिस्त लावणे हे बापाचे कर्तव्य आहे. मुले आईचा मान राखतात किवान याकडे पित्याने लक्ष द्यावे.

देवाने पतीला स्वामित्व आणि मोठी जबाबदारी दिली. जो पती देवाच्या साहाय्याने ही कर्तव्य पूर्ण करतो त्याचे कुटुंब सुखी व आशीर्वादीत होते.

 ३ . मुलाचा जीवनक्रम

 दहा आज्ञांपैकी एक मुलांना उद्देशून दिलेली आहे. निर्गम २०:१२ - आपला बाप व आपली आई यांचा मान राख.

आईबापाने आपल्या मुलांना योग्य शिक्षण द्यावे आणि त्याप्रमाणे मुलांनी वागावे.  नीति. १:८ - माझ्या मुलाआपल्या बापाचा बोध ऐक. आपल्या आईची शिस्त सोडू नको.

इफिस ६;१-३  मुलांनोप्रभूमध्ये तुम्ही आपल्या आईबापांच्या आज्ञेत राहाकारण हे योग्य आहे. आपला बाप व आपली आई ह्यांचा मान राखह्यासाठी कीतुझे कल्याण व्हावे व तू पृथ्वीवर दीर्घायू असावे.” अभिवचन असलेली हीच पहिली आज्ञा आहे.

Christian family
Christian family

मुलांनी आपल्या आईबापांचा मान राखून त्यांच्या आज्ञेत राहावे. आपणास प्रभू येशू ख्रिस्ताने हा कित्ता घालुन दिला आहे. लुक.२:५१ - मग तो त्यांच्याबरोबर खाली नासरेथास गेला व त्यांच्या आज्ञेत राहिला. आईबापांनी मुलांवर प्रेमाने व योग्य रीतीने अधिकार चालवावा. इफिस.६:४ - बापांनोतुम्ही आपल्या मुलांना चिरडीस आणू नकातर प्रभूच्या शिस्तीत  व शिक्षणात त्यांना वाढवा.

देवाने ख्रिस्ती कुटुंबाचा जीवनक्रम पवित्र शास्त्रात स्पष्ट सांगितला आहे. प्रभु येशू ख्रिस्त घरात मस्तक ( प्रथम ) आहे . जे परिवार  त्यांचे कौटुंबिक जीवन देवाच्या योजनेप्रमाणे  जगतात  त्या घराला सुख शांती व आशीर्वाद प्राप्त होतात. असे घर शेजाऱ्यांना आदर्श आहे. देवाची इच्छा व योजनेप्रमाणे चालणारे जीवन हे इतंरासाठी साक्ष आणि देवाला गौरव देणारे आहे .

स्तोत्र.१२७:१ - परमेश्वर घर बांधीत नाहीतर ते बांधणाऱ्यांचे श्रम व्यर्थ आहेत.

परमेश्वर आपणास अधिक त्याच्या शिक्षणामध्ये वाढ करो.

Biblical Responsibilities Husband and Father

Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url