पवित्रीकरण
पवित्रीकरण

Meaning-of-holiness

१ १) पवित्रतेबद्दल बायबल काय म्हणते ?
१ पेत्र १: १३-१६ - “म्हणून तुम्ही आपली मनरूपी कंबर बांधा व सावध राहून येशू ख्रिस्ताच्या प्रकट होण्याच्या वेळी तुम्हांला प्राप्त होणार्या कृपेवर पूर्ण आशा ठेवा.
तुम्ही आज्ञांकित मुले व्हा आणि अज्ञानावस्थेतील आपल्या पूर्वीच्या वासनांनुसार वागूवर्तू नका;
तर तुम्हांला पाचारण करणारा जसा पवित्र आहे तसे तुम्हीही सर्व प्रकारच्या आचरणात पवित्र व्हा;
कारण असा शास्त्रलेख आहे की, “तुम्ही पवित्र असा, कारण मी पवित्र आहे.”
२) देव पवित्र आहे याचा अर्थ काय आहे ?
१ शमुवेल २:२ -परमेश्वरासारखा पवित्र कोणी नाही; कारण तुझ्याशिवाय कोणी नाहीच; आमच्या देवासारखा दुर्ग कोणी नाही;
यशया ६:३ ते आळीपाळीने उच्च स्वराने म्हणत, “पवित्र! पवित्र! पवित्र सेनाधीश परमेश्वर! अखिल पृथ्वीची समृद्धी त्याचे वैभव आहे.”
दुसर्या शब्दात सांगायचे म्हणजे परिपूर्णता . तो कोणाही इतरांपेक्षा अतिउच्च आहे आणि त्याच्याशी कोणीही तुलना करू शकत नाही. स्तोत्र ४०:५ देवाची पवित्रता त्याच्या संपूर्ण अस्तित्त्वात आहे. त्याचे प्रेम पवित्र प्रेम आहे. त्याची दया पवित्र दया आहे. त्याचा क्रोध सुद्धा पवित्र क्रोध आहे.
३) पवित्रीकरण म्हणजे काय ? पवित्रीकरणाचा अर्थ काय आहे ?
पवित्रीकरण हे पवित्र आत्म्याचे काम आहे. शुद्धता आणि पवित्रता हे तत्त्वतः समान आहेत.पवित्रीकरणाचा मूळ अर्थ वेगळे करणे असा आहे.
स्तोत्र.४:३ - तरी हे ध्यानात ठेवा की,परमेश्वराने आपणांसाठी भक्तिमान मनुष्य निवडून काढला आहे.
प्रभूने स्वतःच्या इच्छेप्रमाणे विश्वासणाऱ्यांना उपयोगात आणावे यासाठी देवाने त्यांना वेगळे ठेवले आहे.
पवित्र शास्त्रातील पवित्रीकरण म्हणजे व्यक्तीला
१) देवाने २) देवासाठी ३) पापापासून ४) पवित्र जीवन जगण्यासाठी वेगळे ठेवले आहे. २ तीमथ्य.२:२१ - म्हणून जर कोणी त्यापासून दूर राहून स्वतःला शुद्ध करील, तर तो पवित्र केलेले, स्वामीला उपयोगी पडणारे ,प्रत्येक चांगल्या कामास तयार केलेले असे मानाचे पात्र होईल.
विश्वासणाऱ्यांसाठी पवित्रीकरणाचे दोन अर्थ आहेत .
१.वाइटापासून वेगळे करणे ,२ इति.२९:५,१५,१८.
२.देवाकरिता वेगळे करणे ,लेवीय २७:१६.
४) पवित्रीकरण कोण करते . (त्रैकत्व)
१.देव जो पिता - १ थेस्सल.५:२३,२४.शांतीचा देव स्वतः तुम्हांस परिपूर्णपणे पवित्र करो; आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या आगमनसमयी तुमचा आत्मा,जीव व शरीर ही निदोष अशी संपूर्णपणे राखली जावोत.
२. देव जो पुत्र - इफिस.५:२६. अशासाठी की, तिला त्याने वचनाद्वारे जलस्नानाने स्वच्छ करून पवित्र करावे.
३. देव जो पवित्र आत्मा- २ थेस्सल.२:१३.बंधुजनहो,प्रभूच्या प्रियजनांनो तुम्हांविषयी आम्ही देवाची उपकारस्तुती नेहमी केली पाहिजे, कारण आत्म्याच्या द्वारे होणाऱ्या पवित्रीकरणात व सत्यावरच्या विश्वासात देवाने तुम्हांला प्रथमफळ म्हणून तारणासाठी निवडले आहे. पवित्रीकरण एक देणगी आहे आणि देणगी म्हणून आम्ही ते स्वीकारायचे आहे. या देणगीचा सतत उपयोग केल्याने आमचे अधिकाधिक पवित्रीकरण होईल.
५) आमचे
पवित्रीकरण कसे होते ?
what-is-holiness-bible

१. देवाच्या वचनाने : योहान.१७:१७- तू त्यांना सत्यात समर्पित कर; तुझे वचन हेच सत्य आहे.
पवित्रीकरण व्हावे म्हणून जास्तीत जास्त वेळ देवाच्या वचनाबरोबर घालवा. ते शुद्ध व स्वच्छ करते. त्या वचनाने पाप उघड केले जाते.
२. रक्ताने : इब्री.१३:१२ - म्हणून येशूनेही स्वरक्ताने लोकांना पवित्र करावे म्हणून वेशीबाहेर मरण सोसले.
वचन पाप उघड करते,रक्त ते स्वच्छ करते, परिणामी पवित्रीकरण होते.
३.शिक्षेने : इब्री.१२:१०,११ - त्यांना योग्य वाटली तशी थोडे दिवस ते शिक्षा करीत होते,पण तो करितो ती आपल्या हितासाठी म्हणजे आपण त्याच्या पवित्रतेचे वाटेकरी व्हावे म्हणून करितो. कोणतीही शिक्षा तत्काली आनंदाची वाटत नाही; उलट खेदाची वाटते तरी ज्यांना पित्याकडून वळण लागले आहे त्यांना ती पुढे नीतिमत्त्व हे शांतीकारक फळ देते.
४. देवाला समर्पण केल्याने : रोम.६:१९ - अमंगळपणा व स्वैराचार ह्यांस गुलाम असे समर्पण केले होते, तसे आता आपले अवयव पवित्रीकरणाकरिता नीतिमत्त्वाला गुलाम समर्पण करा.
५. स्वप्रयत्नाने : २ करिंथ.७:१ - आपणांला ही अभिवचने मिळाली आहेत. म्हणन देहाच्या व आत्म्याच्या सर्व अशुद्धतेपासून आपण स्वतःला शुद्ध करू आणि देवाचे भय बाळगून पावित्र्याला पूर्णता आणू.
पवित्रीकरणात आपल्यालाही वाटा आहे. पापाला शोधून, त्याचा न्याय करून त्याला दुर करावे, शुद्ध करावे म्हणून प्रार्थना करणे, पवित्र जीवनासाठी सामर्थ्य मिळावे म्हणून प्रार्थना करणे हे आपले काम आहे.
दररोज आम्ही पवित्रीकरणासाठी ख्रिस्ताला कार्य करू द्यावे. दररोज आम्ही त्याच्या पवित्रतेची,त्याच्या विश्वासाची,त्याच्या प्रीतीची,त्याच्या कृपेची मागणी केली पाहिजे.
तारणाऱ्याच्या पवित्र जीवनाला आम्ही आपलेसे करणे हेच पवित्र जीवनाचे रहस्य आहे. आपण कितपत तारणाऱ्याच्या पवित्र जीवनाला आत्मसात करतो, त्यावर पवित्रीकरणाची पातळी अवलंबून आहे.
६) पवित्रीकरणाची वेळ
१. परिवर्तनाच्या वेळी तात्काळ : १ करिंथ.६:११ - आणि तुम्हांपैकी कित्येक तसे होते तरी तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात व आपल्या देवाच्या आत्म्यात धुतलेले,पवित्र केलेले व नीतिमान ठरविलेले असे झाला.
२.प्रगतीने : याकोब.१:२२-२५ मध्ये माणूस आरशात चेहऱ्यावरची घाण पाहातो व नंतर तेथून निघून तो ती घाण धुऊन टाकतो अशा माणसाचे उदाहरण आहे.
देवाचे वचन पाप प्रकट करणारा आरसा आहे आणि ते पाप आपण कबूल केले पाहिजे.
आमच्यामध्ये ख्रिस्ताच्या चारित्र्याप्रमाणे नसणाऱ्या सर्व गोष्टी पवित्र आत्मा आपल्या एकाच वेळी दाखवत नाही, तसे केले, तर त्यामुळे खूपच निराशा येईल आणि आमची आशा नष्ट होईल.
ज्या क्षणी आपल्याला आपले एखादे पाप प्रगट होईल तेव्हा आम्ही लगेच स्वतःला स्वच्छ करावे व प्रगतीने पवित्रीकरणाच्या वाटेने सतत पुढे जात राहावे.
३. अंतिम वेळी : १ थेस्सल.५:२३ - शांतीचा देव स्वतः तुम्हांस परिपूर्णपणे पवित्र करो आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या आगमनसमयी तुमचा आत्मा जीव व शरीर ही निर्दोष अशी संपूर्णपणे राखली जावोत.
एक दिवस आम्ही संपूर्णपणे पवित्र होणार आहोत. कसलीच उणीव राहणार नाही. जेव्हा येशुख्रिस्त येईल व जेव्हा आमची शरीरे बदलतील, तेव्हा आम्हांला हा आश्चर्यकारक अनुभव येईल.
आम्ही त्याच्याप्रमाणे परिपूर्ण व पवित्र होऊ (१ योहान.३:२). किती मनोरम दिवस असेल तो !
फिलिप्पै. ३:१२-१४ मध्ये पौल दररोज त्याच्या प्रगतीने पवित्रीकरणाबरोबर भविष्यातील परिपूर्णतेकडे नेटाने चालला होता.
७) आमच्या पवित्रीकरणाची गरज
योहान. १७:१९ – “आणि त्यांनीही सत्यात समर्पित व्हावे म्हणून मी त्यांच्याकरिता स्वतःला समर्पित करतो.
८) पवित्रीकरणाचे फळ
१. ख्रिस्ताद्वारे परिपूर्णता : इब्री.१०:१४- कारण पवित्र होणाऱ्यांना त्याने एकाच अर्पणाने सर्वकाळचे पूर्ण केले आहे.
२. पवित्रेतीची फळे : रोम.६:२२ - परंतु आता तुम्हांला पापापासून मुक्त केल्यावर तुम्ही देवाच्या गुलाम झाल्यामुळे ज्याचा परिणाम पवित्रीकरण असे फळ तुम्हांला मिळत आहे.
पवित्रतेसाठी, पवित्रीकरणासाठी. शद्धतेसाठी. ख्रिस्तस्वरूप होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर देवपुत्राप्रमाणे होण्यास तुम्ही उत्सुक आहात का ?
तुमची पापे कबूल करा, मदत मागा , त्याला सांगा, आज्ञापालन करा मग तो तुमच्या हृदयाची उत्कंठा पूर्ण करील .
९) पवित्रीकरणाची वाटचाल चालू कशी ठेवायची ?
विश्वासणारे म्हणून, आपण जगापासून परमेश्वरासाठी स्वतःला वेगळे केले पाहिजे. आपल्याला जगाच्या नव्हे तर देवाच्या दर्जांनुसार जगण्याची गरज आहे. देवाने आम्हाला परिपूर्ण होण्यासाठी नव्हे तर जगापासून वेगळे होण्यासाठी बोललेले आहे.
१. पवित्र आत्म्याद्वारे तुम्हाला तुम्हांला जो प्रकाश मिळाला आहे त्याला अनुसरून बिनशर्त आज्ञापालनाचे जीवन जगा.
२.तुम्ही अपयशी झालात की,लगेच देवाला सांगा. तो तुम्हांला पुनः स्थापील.
३.सैतानाला प्रतिकार करा,म्हणजे तो तुमच्यापासून पळून जाईल . याकोब.४:७.
४. शास्त्रवाचन,प्रार्थना,साक्ष देणे,इतरांसाठी जगणे या गोष्टींत विश्वासू राहा.
जर आपण आशीर्वादित झाला असाल तर जरूर शेअर करा. 👃👃
सुचना: वरील बायबलमधील संदर्भ हे "पवित्र शास्त्र" बायबल सोसायटी ऑफ इंडिया, ह्या अधिकृत भाषांतरित आवृत्तीतून घेतले गेले आहेत.
Nice 👍
Nice 👍
Amen 🙏❤️