Good Friday 2025
Good Friday 2025

good friday 2025

Good Friday म्हणजे काय ?
या दिवसास पवित्र शुक्रवार Holy Friday देखील म्हटले जाते . कारण याच दिवशी सर्व मानव जातीच्या पापाची खंडणी भरण्यासाठी देवाने केलेली योजना सिद्धीस नेली
. प्रभूयेशुने सर्व मानवजातीचे पाप स्वता:वर घेऊन वधस्तंभावर बलिदान झाला आणि पुन्हा तिसर्या दिवशी तो जिवंत झाला आणि सर्व मानवजातीसाठी तारण , मोक्ष मिळवण्याचा मार्ग खुला करून दिला .आणि आता यापुढे
कोणत्याही बलिदानाची गरजच राहिली नाही .
आता हा मोक्ष ,तारण कसे मिळवायचे ?
पापाचामोबदला मृत्यू आहे.
पवित्र बायबल सांगते
"सर्वांनी पाप केले आहे” . "पापाचे वेतन मरण आहे." [रोम ६:२३] म्हणजेच अग्नीचे सरोवर त्यांच्या
वाट्यास आहे. पापी स्वभावामुळे मानवाचा देवाशी असलेला संपर्क कायमचा तुटला होता. आणि तो पुन्हा देवाशी आपआपल्या परीने जुडण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे . जसे कि , पुण्यकर्म करणे , अन्नदान करणे, यज्ञबली सामाजिक कार्य ई. कामे करणे. हि सर्व कामे जरी आपणास चांगली दिसत
असली तरी ती मोक्ष देऊ शकत नाहीत . आपण स्वताच्या प्रयत्नाने तारण किवां मोक्ष
प्राप्त करू शकत नाही अथवा आपल्या पुण्य-कर्माद्वारे विकत घेऊ शकत नाही. कारण धर्मशास्र सांगते कि, सर्वांनी पाप केले आहे . आमची सर्व नीतीची कृत्ये ही घाणेरड्या वस्त्रांसारखी आहेत.
परंतु देव
हा प्रेमळ असल्यामुळे तो या मानवाला नरकात पाठवू इच्छित नाही. दुसऱ्या बाजूने पाहिल्यास
देव हा न्यायी म्हणजेच न्यायाधीश देखील आहे, याकारणास्तव मानवाला त्याच्या पापाचा
दंड मिळणे रास्त आहे .
देवाने हा मोक्ष प्राप्तीचा प्रश्न प्रभूयेशुच्या द्वारे
सोडवला . The Story of Good Friday
परमेश्वर देवाने देह्धारण करून या पृथ्वीवर दोन हजार वर्षापूर्वी प्रभूयेशुच्या रूपाने जन्म घेतला . साडे-तेहतीस वर्ष तो या पृथ्वीवर मानवी आणि दैवी स्वरूपात जीवन जगाला . या काळात त्याने अनेक लोकांना विविध प्रकारच्या व्याधीतून मुक्त केले, अद्भुत चमत्कार केले जसे कि, मृताना जिवंत केले , असाध्य आजार बरे केलेत . आणि योग्यवेळी म्हणजेच पवित्र शुक्रवार Good Friday या दिवशी सर्व मानवजातीचे पाप प्रभूयेशुवर लाधून त्यास लोकांच्या पापक्षमेसाठी वधस्तंभावर बलिदान म्हणून चढवले. अशाप्रकारे प्रेमळ परमेश्वरदेवाने लोकांना पापमुक्त होण्याचा मार्ग तयार केला.
पवित्र बायबल सांगते ,”खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले, आमचे
क्लेश त्याने वाहिले; तरी त्याला ताडन केलेले, देवाने त्याच्यावर प्रहार केलेले व त्याला पिडलेले असे आम्ही त्याला
लेखले. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधांमुळे घायाळ झाला, आमच्या दुष्कर्मांमुळे ठेचला गेला; आम्हांला
शांती देणारी अशी शिक्षा त्याला झाली; त्याला बसलेल्या
फटक्यांनी आम्हांला आरोग्य प्राप्त झाले.”
म्हणूच देवाशी पुन्हा जुडण्यासाठी प्रभूयेशुचे बलिदान स्वीकारणे हाच एक मार्ग आहे . Good Friday
पवित्र ग्रंथ सांगते , पापाची क्षमा होण्यासाठी देवाला कुठल्या
प्राणी अथवा पक्ष्याचे रक्त नाही तर निष्कलंक रक्त सांडण्याची गरजेचे होते . [हिब्रू ९:२२]. म्हणूनच येशूने आपले निर्दोष रक्त सांडून सर्व
मानवजातीसाठी उद्धाराचा मार्ग उपलब्ध करून दिला.आमच्या पापांसाठी त्यांनी पीडा सहन
केली.
येशूच्या क्रूसावरील मृत्युमुळे
आपल्या पापाची खंडणी भरली गेली आहे . जर आपण ख्रिस्तावर विश्वास ठेवला, तर तो आपल्याला नवीन जीवन देतो. अनेक लोकांचे असे म्हणणे आहे की,
ख्रिस्ती मार्ग फक्त गोऱ्या लोकांचा धर्म आहे. परंतु हा साफ चुकीचा गैरसमज आहे .हे
आपणास पुढील बायबलमधील वचनातून स्पष्ट होते .
“देवाने
जगावर एवढी प्रीती केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की,
जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला
सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. [योहान ३:१६] ”
पापाची क्षमा मिळवणे : Good Friday Meaning
पश्चात्ताप आणि विश्वासाद्वारे आपणास
ख्रिस्तामध्ये तारण प्राप्त होते. याचा अर्थ पापी मार्गांपासून वळून पश्चात्तापपूर्वक
ख्रिस्तावर विश्वास ठेवणे. येशू तुमच्या पापांची क्षमा करेल आणि तुम्हाला जीवनाचा
मार्ग दाखवेल. कोणीही हे जीवन स्वतःच्या प्रयत्नाने
प्राप्त करू शकत नाही, ही
त्याची मोफत देणगी आहे.
"कारण कृपेनेच
विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर हे देवाचे दान आहे; कोणी आढ्यता बाळगू नये म्हणून
कर्मे केल्याने हे झाले नाही." [इफीस २;८,९]
"येशूने त्याला म्हटले,
“मार्ग, सत्य व जीवन मीच आहे; माझ्या द्वारे आल्यावाचून पित्याकडे कोणी येत नाही." योहान १४;६
जेंव्हा तुम्ही येशू ख्रिस्ताला तारणारा आणि प्रभु
म्हणून स्विकारता तेव्हा तो तुम्हास त्याच्या कुटुंबात दत्तक करुन घेतो.
"परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणार्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला." [योहान १;१२ ]
पुढील प्रार्थनेद्वारे हे तारण आपण प्राप्त करू शकता .
प्रिय प्रभूयेशु मला माहित आहे की, मी
पापी आहे या क्षणी मी तुझजवळ पश्चातापपूर्वक माझ्या
अपराधांची क्षमा मागतो. माझा विश्वास आहे की तू माझ्या पापांसाठी मेला आणि
मेलेल्यांतून उठला. मी माझ्या पापांपासून वळतो आणि तुला माझ्या हृदयात आणि जीवनात
येण्यासाठी आमंत्रित करतो. मी माझा प्रभु आणि तारणारा म्हणून तुझा स्वीकार करतो .
गुड फ्रायडे कधी आहे.
या वर्षी गुड फ्रायडे दि. १८ एप्रिल २०२५ रोजी साजरा करत आहोत . आणि
पुनरुत्थान दि. २० एप्रिल
२०२५ रोजी साजरा करत आहोत.
अधिक माहितीसाठी आम्हास संपर्क करा. 👉 livinggodspeaks@gmail.com
अधिक तारणाविषयी ऐकण्यासाठी वरील व्हिडीओवर क्लिक करा